Home Blog Page 3139

महिंद्राने महाराष्ट्रात दाखल केले तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगत 4 व्हील ड्राइव्ह ट्रॅक्टर

पुणे: 20.7 अब्ज डॉलर उलाढाल महिंद्रा समूहाच्या महिंद्रा अँड महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरने (एफईएस) महाराष्ट्रात आपल्या नोवो युवो व जिवो ब्रँडची 4 व्हील ड्राइव्ह (4डब्लूडी) रेंज दाखल केल्याचे आज जाहीर केले आहे. ट्रॅक्टरची किंमत आकर्षक असून, एक्स-महाराष्ट्र, 11.5 लाख रुपयांपासून नोवो 65 एचपी 4डब्लूडी, 7.7 लाख रुपयांपासून युवो 45 एचपी 4डब्लूडी (575 DI) आणि 4.21 लाख रुपयांपासून जिवो 24 एचपी 4डब्लूडी (245 DI) मिळेल. 150 कस्टमर टच पॉइंट्सच्या महिंद्राच्या विस्तृत जाळ्यामार्फत हे ट्रॅक्टर राज्यभर तातडीने उपलब्ध होणार आहेत.

4 व्हील ड्राइव्ह वैशिष्ट्यामुळे निसरड्या किंवा उंचसखल भूपृष्ठावर उत्तम ट्रॅक्शन मिळते व त्यामुळे उत्पादकता वाढते. सर्व 4डब्लूडी ट्रॅक्टरमध्ये प्रगत तंत्रज्ञान समाविष्ट आहे, जसे DiGiSENSE आणि ही वैशिष्ट्ये कार्यामध्ये सोय व सुलभता आणण्याच्या दृष्टीने तयार केली आहेत. तसेच, शेतीच्या कामांसाठी उत्पादकता व कार्यक्षमतेतही वाढ केली जाणार आहे.

यानिमित्त बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे मार्केटिंग, फार्म डिव्हिजनचे उपाध्यक्ष रवींद्र शहाणे यांनी नमूद केले, “महिंद्रामध्ये आम्ही प्रणेते शेती तंत्रज्ञान आणून ग्रामीण भागाच्या भरभराटीला चालना देत आहोत. या तंत्रज्ञानामुळे शाश्वत उत्पादकतेला चालना मिळेल व त्या बदल्यात, शेतीच्या उत्पन्नात वाढ होईल. आमचे प्रगत ट्रॅक्टर तंत्रज्ञान शेतकऱ्यांना शेतीच्या कार्यक्षम पद्धतींचा वापर करण्याची सुविधा देऊन त्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी यशस्वी ठरले आहे.”

 शहाणे यांनी सांगितले, “अद्ययावत 4डब्लूडी उत्पादने सादर करताना आम्हाला अतिशय आंनद होत असून त्यामुळे या उद्योगात नवा बेंचमार्क निर्माण केला जाणार आहे. 4डब्लूडी प्रकार आता ट्रॅक्टर्सच्या नोवो, युवो व जिवो ब्रँडमध्ये उपलब्ध असून त्यामुळे ऊस व फुलशेती अशा विविध प्रकारच्या पिकांना शेतीच्या विविध सेवा पुरवल्या जाणार आहेत.”

जवळजवळ 3 वर्षांपूर्वी दाखल करण्यात आलेला नोवो 50-60 एपी श्रेणीमध्ये तंत्रज्ञानाच्या बाबतीत अत्यंत प्रगत आहे. महिंद्रा नोवो अतिशय वैविध्यपूर्ण आहे आणि त्याचा वापर शेतीच्या निरनिराळ्या 40 कामांसाठी केला जाऊ शकतो. युवोतील आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण केल्या जातील – जमिनीच्या मशागतीपासून कापणीपर्यंत, तसेच पाकणीनंतरच्या गरजांपर्यंत.

2 वर्षांपूर्वी दाखल केलेला युवो भारतातील झपाट्याने प्रगती करणारा ट्रॅक्टर ब्रँड ठरला आहे. पूर्णतः स्वतंत्र सुविधेवर तयार करण्यात आलेला आणि विशेष व या उद्योगातील पहिलावहिला 12F+3R फुल कॉन्स्टंट-मेश गिअरबॉक्स समाविष्ट असलेला महिंद्रा युवो अतिशय वैविध्यपूर्ण आहे आणि त्याचा वापर शेतीच्या निरनिराळ्या 30 कामांसाठी केला जाऊ शकतो. युवोतील प्रगत तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण केल्या जातील – जमिनीच्या मशागतीपासून कापणीपर्यंत, तसेच पाकणीनंतरच्या गरजांपर्यंत – आणि शेतकऱ्यांना कामे अधिक, जलद व उत्तम करण्यासाठी मदत करतील.

महिंद्रा जिवो हा अत्यंत वैविध्यपूर्ण ट्रॅक्टर असून त्याचा वापर पिकांची निगा, जमिनीची मशागत व आंतरपिकांची कामे अशा निरनिराळ्या कामांसाठी करता येऊ शकतो. फुलशेती व रो क्रॉप फार्मिंग या श्रेणींच्या नव्या गरजा विचारात घेऊन महिंद्रा जिवोची निर्मिती केली आहे आणि त्याची अरुंद व आटोपशीर रचना व उच्च बळ विचारात घेता तो शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरेल. महिंद्राचा पहिला सब 25HP 4डब्लूडी ट्रॅक्टर म्हणून, हा उच्च कामगिरी करणारा ट्रॅक्टर व या श्रेणीतील सर्वोत्तम टॉर्क व इंधनक्षमता यामुळे तो या श्रेणीत आघाडीवर आहे.

महिंद्रा नोवो

 तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगत असलेला महिंद्रा नोवो विविध एचपी क्षमतांमध्ये (49.9, 52, 57, 65 व 75 एचपी) उपलब्ध असून तो सर्व प्रकारच्या वापरांमध्ये व मातीच्या स्थितीमध्ये किमान आरपीएम ड्रॉपसह सातत्यपूर्ण व एकसमान बळ देत राहील. नोवोची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढील आहेत

  • 305 एनएम इतके सर्वोच्च टॉर्क व 28% बॅकअप टॉर्क असलेले अतिशय शक्तिशाली इंजिन
  • तीन रेंज लिव्हर्स व फुल सिंक्रोमेश ट्रान्समिशन
  • वेग 1.7 kmph ते 36 kmph (क्रीपर स्पीड 0.4 kmph पासून)
  • 2600 किलो इतकी या श्रेणीतील सर्वाधिक क्षमता
  • झटपट लोअरिंगसाठी सर्वाधिक पम्प फ्लो
  • 65 HP व 75 HP, मेटॅलिक डीप रेड पेंट
  • स्टाइलाइज्ड मेटॅलिक 3 डी डिकॅल

 महिंद्रा युवो

12 राज्यांतील ग्राहकांकडून अभिप्राय संकलित करणाऱ्या महिंद्राच्या प्रोजेक्ट टीमने केलेल्या सखोल संशोधनातून व विकास कार्यक्रमातून युवोची निर्मिती झाली आहे. युवो विकसित करण्यासाठी अंदाजे 7000 इनपुट वापरण्यात आले आहेत. त्यानंतर महत्त्वाच्या वापरांचा समावेश करत, 12 राज्यांमध्ये 140,000 तास प्रयोगशाळेतील व कार्यक्षेत्रातील प्रत्यक्ष चाचणीसाठी देण्यात आले.

30 – 45 एचपी या दरम्यानच्या क्षमतेचे ट्रॅक्टर गरजेचे असलेल्या भारतीय शेतकऱ्यांसाठी महिंद्रा युवोमध्ये तंत्रज्ञानविषयक अनेक नवी वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. कोणत्याही स्थितीच्या मातीमध्ये शेतीची कामे दर्जेदार पद्धतीने करण्याच्या दृष्टीने त्याची निर्मिती केली आहे व 30 प्रकारचे वापर करण्यासाठी त्यामध्ये वैविध्य समाविष्ट केले आहे. त्यामुळे भारतात कोठेही वापरण्यासाठी हा ट्रॅक्टर उपयोगी ठरेल.

प्लॅनेटरी ड्राइव्ह व 15 गिअर-स्पीड ट्रान्समिशन असलेले युवो 4डब्लूडीचे शक्तिशाली इंजिन हा ट्रॅक्टर शेतीच्या सर्व प्रकारच्या वापरांसाठी आदर्श बनवते. तांदळासारख्या पिकाच्या लागवडीच्या दृष्टीने ड्रॉप डाउन फ्रंट अॅक्सलची निर्मिती केली आहे.

 
ज्यादा जल्दी बेहतर परफॉर्मन्स या युवोच्या आश्वासनाला 4डब्लूडी प्रकारामुळे चालना. युवोमध्ये अनेक खास वैशिष्ट्ये असून ती पुढीलप्रमाणे आहेत:

  • 18% बॅक अप टॉर्क, या उद्योगातील सर्वाधिक
  • 400 तास सेवेचा इंटर्व्हल, या श्रेणीतील सर्वात मोठा कालावधी व त्यामुळे वेळेची बचत होण्यास आणि उत्पादकता व कार्यक्षमता वाढण्यास मदत होते
  • कृषीविषयक वेगाचे अधिक पर्याय देण्यासाठी, या श्रेणीत पहिल्यांदाच 15 गिअर स्पीड्स
  • अतिशय प्रगत हायड्रॉलिक्स – 1500 किलो उचलण्याची क्षमता
  • शेतकऱ्यांना सहजपणे वापरता येण्यासाठी या श्रेणीतील सर्वोत्तम अर्गोनॉमिक्स

 महिंद्रा जिवो

महिंद्रा जिवो हा 25HP श्रेणीतील अत्याधुनिक, दर्जेदार तंत्रज्ञान असलेला लहान ट्रॅक्टर प्लॅटफॉर्म आहे. 24HP इतकी इंजिनाची क्षमता व PTO power of 22HP इतकी पीटीओ क्षमता यामुळे जिवो रो क्रॉप व फुलशेतीसाठी साजेसा आहे.

महाराष्ट्रातील वाइनयार्डमध्ये जिवो यशस्वीपणे दाखल केल्यानंतर व त्याची कामगिरी सिद्ध झाल्यानंतर, जिवो आता पश्चिम बंगालमध्येही दाखल केला जाणार आहे. जिवो हा आटोपशीर, 24 HP 4डब्लूडी ट्रॅक्टर असून, सर्वोत्तम पीटीओ एचपी व इंधनक्षमता, तसेच अतिशय आकर्षक दरात स्टायलिश व आरामदायी डिझाइन ही त्याची खास वैशिष्ट्ये आहेत.

महिंद्रा जिवोमध्ये अनेक खास वैशिष्ट्ये असून ती पुढीलप्रमाणे आहेत

  • ऑटोमॅटिक डेप्थ अँड ड्राफ्ट कंट्रोल (एडीडीसी) – जमिनीची मशागत करण्यासाठी आदर्श पर्याय
  • 8 फॉरवर्ड + 4 रिव्हर्स ट्रान्समिशन – वेगाचे विविध पर्याय उपलब्ध
  • साइड शिफ्ट गिअर्स – ओपन फ्लोअर स्पेस व गिअर बदलणे सोयीचे
  • उच्च ग्राउंड क्लीअरन्स – पिकांची देखभाल करण्यास वापरण्यासाठी अतिशय उपयुक्त
  • 2 स्पीड PTO – सुधारित रोटॅव्हेटर वापरासाठी
  • 750 किलो लिफ्ट क्षमता – उचलण्याची क्षमता या श्रेणीतील सर्वाधिक असल्याने मोठी उपकरणे वापरणे शक्य
  • 25 KMPH इतका सर्वोच्च वेग – शेतातील उत्पादनाच्या वाहतुकीसाठी अधिक ट्रिप
  • सर्वाधिक पीटीओ क्षमता – वाइनयार्डमध्ये वापर करताना सातत्यपूर्ण स्प्रेइंगसाठी

बुधवारी वीजग्राहक तक्रार निवारण दिन

पुणे, दि. 04 : पुणे परिमंडलातील सर्व विभागीय कार्यालयांत बुधवारी (दि. 6 जून) महावितरणच्या वतीने वीजग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

वीजग्राहकांच्या प्रामुख्याने वीजबील, नवीन कनेक्शन आदींसह वीजसेवेशी संबंधीत तक्रारी त्वरीत निकाली काढण्यासाठी सर्व विभाग कार्यालयांत या तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

रास्तापेठ, पद्मावती, नगररोड, पर्वती, बंडगार्डन, कोथरूड, पिंपरी, भोसरी, शिवाजीनगर तसेच मंचर, राजगुरुनगर आणि मुळशी या विभाग कार्यालयांत सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेदरम्यान कार्यकारी अभियंता हे वीजग्राहकांनी दाखल केलेल्या तक्रारींवर सुनावणी घेतील आणि त्या निवारणासाठी तात्काळ कार्यवाही करणार आहेत. वीजग्राहकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

सर्व धर्मीय रोजा इफ्तार कार्यक्रम संपन्न

पुणे- लष्कर भागात  रमजान महिन्यातील रोजा व गणेश चतुर्थीचा उपवास यानिमित्ताने पुणे मीडिया वाँच व सिध्दार्थ ग्रंथालय व वाचनालय  यांच्या संयुक्त विद्यमाने “मोदक-खजुर” सर्व धर्मीय रोजा इफ्तार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातून सर्वांनी एकमेकांना मोदक व खजुर भरवून लष्कर भागात राष्ट्रीय एकात्मता राखण्याचा संकल्प केला.

         यावेळी लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुवर, मौलाना काझमी,मनजितसिंग विरदी, वाहिद बियाबाणी, इसाक जाफर, इक्राम खान , देवीप्रसाद जोशी महाराज,  मेजरसिंग कलेर ,  विकास भांबुरे,अशोक देशमुख, अयाज बागवान, भोलासिंग अरोरा, इमाद सय्यद,अक्रम शेख , भारती अंकलेल्लू, मोना राठोड, सुनिता भगत,निलेश कणसे,विनय भगत,बलबीरसिंग कलसी,अरुणकुमार कोद्रे , अजय लोणकर , सागर शाह , नितेश व्होरा आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे आयोजक महेश जांभूळकर,दिलीप भिकुले आदी उपस्थित होते.

      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत महेश जांभूळकर यांनी केले तर सुत्रसंचालन विकास भांबुरे यांनी केले तर आभार दिलीप भिकुले यांनी मानले .

“अश्वत्थामा मला भेटला” ही तत्वज्ञानात्मक काल्पनिका -संजय सोनवणी

पुणे-‘अश्वत्थामा’ हा मराठी लघुपट आज प्रदर्शित झाला .या निमित्ताने प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांनी विविध आठवणींना उजाळा दिला .
ते म्हणाले ,
“अश्वत्थामा मला भेटला” ही कथा माझ्या “आदमची गोष्ट” या माझे मित्र व चपराक प्रकाशनचे घनश्याम पाटील यांनी आवर्जुन प्रकाशित केलेल्या कथासंग्रहात सामाविष्ट होती. या संग्रहात वेगवेगळ्या विषयांण्वरील पण अंतत: मानवी मनाचा तळगर्भ उलगडण्यचा प्रयत्न करणा-या कथा आहेत. अश्वत्थामा मला भेटला ही कथा अणि त्यवर सलाम पुणेने निर्माण केलेला व मीच दिग्दर्शित आणि अभिनितही केलेला लघुपटाचा निमित्ताने मला माझ्या १९९१ साली प्रसिद्ध झालेल्या अश्वत्थामा आणि नंतर १९९८ साली लिहिलेल्या शुन्य महाभारत या कादंबरीची आठवण होणे स्वाभाविक आहे. या दोन्ही कादंब-या गाजल्या असल्या तरी अश्वत्थामाच्या आवृत्त्या जास्त (म्हणजे आठ) झाल्या. एका आवृत्तीच्या प्रकाशनाला प्रकाशकाने आचार्य व्यास आणि राम शेवाळकरांना बोलावले होते. अर्थात अश्वत्थाम्याला नायक करुन महाभारत युद्धाची खरी रुजुवात द्रोणाने घातली ही व या कादंबरीतील माझ्या अनेक भुमिकांना या दोघांचाही विरोध होता. पण असे असुनही ते आले. बोलले.
शुन्य महाभारतात तर मी महाभारत उलटे पालटे करुन टाकले. नवी गीताही लिहिली. कृष्ण अर्जुनाच्या वाट्याला न जाता दुर्योधनानेच मागून घेतला असता तर पुढचे महाभारत कसे घडले असते? आणि तेच मी तत्वज्ञानाच्या पातळीवर लिहिले होते. या कादंबरीची बरीच चर्चा झाली.
मला मृत्युचे आकर्षण आहे. या विषयावर मी द अवेकनिंगसह अनेक कादंब-या लिहिल्या. वेगवेगळ्या पैलुने मृत्यू या संकल्पनेची मी तपासणी करत राहिलेलो आहे. अश्वत्थामा हा मिथकांनुसार सप्त चिरंजीवांपैकी एक. चिरंजीवत्व शक्य नाही हे उघड आहे. पण ही मिथके सांभाळत  मी अश्वत्थाम्याच्या अजरामरत्वात मानवी वेदनांचे चिरंजीवत्व शोधत “अश्वत्थामा मला भेटला” ही तत्वज्ञानात्मक काल्पनिका लिहिली. अश्वत्थाम्यावर कादंबरी लिहिलेल्या स्वत: वेदनांच्या छायेत जगणा-या लेखकाकडेच अश्वत्थामा येतो आणि जखमेवर तेल मागतो…आणि तत्वात्मक चर्चेतून मानवी जीवन, त्याच्या कल्पना यातील फोलत्व उलगडत वेदनांचे चिरंतनत्व ठळक करतो अशी ही कथा. कथेला चित्रीत करणे सोपे नसते. पण माझे मित्र सलाम पुणेचे शरद लोणकर एक जिद्दी माणूस. त्याने यावर लघुपट निर्माण करायचे ठरवले. पटकथा लिहिली. दिग्दर्शनही केले. मयुर लोणकर या ताज्या दमाच्या कलावंताने अश्वत्थामा साकार करायची तशी अवघड जबाबदारी पेलली आणि लेखकाच्या भुमिकेत मीच. हे अर्थात अद्भुतच आहे पण अशी अद्भुते माझ्या जीवनात अनेकदा घडली आहेत.
या लघुपटाच्या निमित्ताने एकंदरीतच मानवी जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळेल याचा विश्वास आहे.
हा लघुपट येथे आम्ही आमच्या वाचक,रसिक ,प्रेक्षकांसाठी सादर करतो आहोत ..पहा ..

‘फेरेरो’तर्फे बारामती येथे चौथे ‘किंडर स्पोर्ट – जॉय ऑफ मुव्हिंग’ शिबिर

0

बारामती- फेरेरो इंडिया या कंपनीतर्फे ‘किंडर स्पोर्ट’ हे मुलांसाठीचे शिबिर बारामती येथे सुरू झाले. या शिबिराचे उदघाटन ‘एन्व्हार्यमेंट फोरम ऑफ इंडिया’च्या संस्थापिका सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी फेरेरो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक स्टेफानो पेले, फेरेरो इंडियाचे सेक्रेटरी जनरल व राजदूत इंदर चोप्रा, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

2 जून ते 6 जून या काळात चालणाऱ्या या शिबिरात मुलांना विविध मैदानी खेळ खेळण्यासाठी संधी मिळेल. तसेच या खेळांमधून मिळणाऱ्या आरोग्याची माहिती त्यांना देण्यात येईल. फेरेरो या कंपनीच्या जागतिक स्तरावरील सामाजिक उपक्रमांचा हा भाग आहे. यंदा बारामतीतील विविध शाळांमधील 5 ते 12 वयोगटाच्या 400हून अधिक मुलांना या शिबिरात संधी मिळणार आहे. त्यांचे खेळ घेण्यासाठी 20 प्रशिक्षक येथे उपस्थित असतील. या प्रशिक्षकांना इटली या देशात ‘किंडर स्पोर्ट’चे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

चांगल्या आरोग्यासाठी मैदानी खेळांचे महत्त्व मुलांच्या मनावर बिंबविण्याकरीता ‘किंडर स्पोर्ट’मध्ये यंदा ‘जॉय ऑफ मुव्हिंग’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. इटलीतील रोम विद्यापीठ, फोरो इटालिको, पेडमॉन्ट भागातील क्रीडा प्रशासन आणि इटालियन ऑलिम्पिक समिती यांच्या सहकार्याने ‘जॉय ऑफ मुव्हिंग’ संकल्पना तयार करण्यात आली आहे.

बारामतीतील शिबिरात 400 मुलांचे 5-6, 7-8. 9-10 व 11-12 वर्षे असे चार वयोगट निर्माण करण्यात येतील. त्या-त्या वयातील मुलांच्या शारिरीक, मानसिक गरजा वेगवेगळ्या असतात हे या ठिकाणी लक्षात घेतले जाईल. फूटबॉल, बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, अथलेटिक्स हे खेळ त्यांच्यासाठी आयोजिक केले जातील.

या शिबिराच्या आयोजनाबद्दल बोलताना फेरेरो इंडियाचे सेक्रेटरी जनरल इंदर चोप्रा म्हणाले, की किंडर स्पोर्ट हे चौथे शिबिर बारामतीमध्ये घेताना आम्हाला आनंद होत आहे. हा उपक्रम पुण्याशेजारच्या शहरांमध्येही नेण्याचा आमचा हा उद्देश आहे.

भारतात किंडर स्पोर्ट हा उपक्रम 2014 मध्ये बारामतीमध्येच सुरू झाला. गेल्या वर्षीदेखील या शिबिरात चारशे मुले सहभागी झाली होती. ‘किंडर स्पोर्ट’ला जगभरातील ऑलिंपिक समित्या, सरकारी संस्था, क्रीडा संघटना व महासंघ यांचे सहकार्य लाभलेले आहे. शालेय विद्यार्थी व तरुण वर्य यांच्याशी संपर्क साधण्याची या सर्व संस्थांची सामायिक उद्दीष्टे ‘किंडर स्पोर्ट’मधून सफल होतात.

किंडर स्पोर्ट जागतिक स्तरावर..

‘किंडर स्पोर्ट – जॉय ऑफ मुव्हिंग’ हा फेरेरो समुहाचा सामाजिक बांधिलकी संदर्भातील आंतरराष्ट्रीय स्वरुपाचा प्रकल्प आहे. मैदानी खेळांतून मिळणारा आनंद प्रत्येक मुलाला मिळावा, हा या प्रकल्पाचा हेतू आहे.

तरूण पिढीमध्ये मैदानी खेळ व प्रत्यक्ष शारिरीक हालचाली यांविषयी आवड निर्माण व्हावी व पुढील आयुष्यात या पिढीने खेळ ही आपल्या दिनचर्येची आवश्यक बाब मानावी, यासाठी तिला या ‘किंडर स्पोर्ट’मधून उत्तेजन दिले जाते. अधिकाधिक देशांमध्ये या प्रकल्पाचा प्रसार व्हावा, अशी महत्वाकांक्षा बाळगून त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठीच या क्षेत्रातील जगभरातील तज्ज्ञ व त्यांच्या संस्था, 4 ऑलिंपिक समित्या, 126 क्रीडा महासंघ व संघटना, तसेच आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा महासंघ (आयएसएफ) यांचे सहकार्य घेण्यात आले आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून शाळांना उपकरणे व साहित्य पुरवणे, शारिरीक शिक्षणासाठी त्यांना मदत करणे, विद्याथ्यार्ना चॅम्पियन बनण्यासाठी उत्तेजन देणे, लहान मुलांसाठी क्रीडा स्पर्धा तसेच क्रीडा शिबिरे आयोजित करणे, जगभरातील नामवंत खेळाडू व अथलेट यांच्या सहकार्याने त्यांना चैतन्ययुक्त जीवनशैलीच्या संकल्पनेचे अॅम्बेसिडर म्हणून सादर करणे आणि जगातील अशाच इतर काही प्रकल्पांना मदत करणे, अशी या किंडर स्पोर्ट संकल्पनेची व्याप्ती आहे.

2005मध्ये ही संकल्पना प्रथम राबविण्यात आली. तेव्हापासून हा प्रकल्प वाढत असून जगभरातील अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दीष्ट गाठले जात आहे. सध्या 28 देशांमधील 44 लाख मुलांनी किंडर स्पोर्टचा आनंद घेतलेला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर 3200 कार्यक्रम ‘किंडर स्पोर्ट’ने आतापर्यंत आयोजित केले आहेत…

–    व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, सॉकर, अॅथलेटिक्स, जलतरण, फेन्सिंग, स्कीईंग, वॉटर पोलो, नौकानयन, हॅन्डबॉल, डॉजबॉल, बॅडमिंटन अशा विविध खेळांचे आयोजन,

–    1443 अॅथलेट्स, चॅम्पियन्स व माजी चॅम्पियन्स यांचा विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग,

–    चार ऑलिंपिक समित्या व 126 क्रीडा महासंघ व संघटना यांचा सहभाग,

–    आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा महासंघ (आयएसएफ) यांच्यामार्फत जगभरातील 4 कोटी मुलांना खेळांचा आनंद.

महिला प्रीमियर लीग स्पर्धेत शिवनेरी पँथर्स संघाला विजेतेपद

पुणे: हेमंत पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन व भारत अगेंस्ट करप्शनच्या सहयोगाने आयोजित हेमंत पाटील महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत सायली लोणकर(76धावा) हिने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर शिवनेरी पँथर्स संघाने एचपी सुपर किंग्स संघाचा 6 गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.

व्हिजन क्रिकेट अकादमी, सिंहगड रोड येथील क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम लढतीत पहिल्यांदा खेळताना एचपी सुपर किंग्स संघाने 20षटकात 6बाद 150धावा केल्या. यात सई पुरंदरेने 30धावा, पूनम खेमनारने 25धावा, ऋतुजा गिलबिलेने 21धावा, तेजश्री ननावरेने 18धावा, काजल निकलेने 16धावा व प्रियांका घोडकेने 12धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. शिवनेरी पँथर्स कडून आदिती जोशी(2-13), किरण नवगिरे(1-28), भूमिका उंबरजे(1-17)यांनी सुरेख गोलंदाजी केली. शिवनेरी पँथर्स संघाने हे आव्हान 19.5षटकात 4गड्यांच्या बदल्यात151धावा करून पूर्ण केले. यामध्ये सायली लोणकरने 54चेंडूत 7चौकार व 1षटकारासह 76धावा, गौतमी नाईकने 34 चेंडूत 5चौकारांसह 40धावा केल्या. सायली लोणकर(74धावा)व गौतमी नाईक(40धावा)यांनी पहिल्या गडयासाठी चेंडूत 50धावांची भागीदारी करून संघाला ऑरेख सुरुवात करून दिली. त्यानंतर भूमिका उंबरजेने 14धावा, किरण नवगिरेने 11धावा करून संघाला विजय मिळवून दिला.सामन्याची मानकरी सायली लोणकर ठरली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
एचपी सुपर किंग्स: 20षटकात 6बाद 150धावा(सई पुरंदरे 30(25,6×4), पूनम खेमनार 25(19,3×4), ऋतुजा गिलबिले 21(24,2×4), तेजश्री ननावरे 18(22,1×4), काजल निकले 16(19,1×4), प्रियांका घोडके 12, आदिती जोशी 2-13, किरण नवगिरे 1-28, भूमिका उंबरजे 1-17)पराभूत वि.शिवनेरी पँथर्स: 19.5षटकात 4बाद 151धावा(सायली लोणकर 76(54,7×4,1×6), गौतमी नाईक 40(35,5×4), भूमिका उंबरजे 14(11,1×4), किरण नवगिरे 11(14), पूजा जैन 2-24, आरती भेनवाल 1-21);सामनावीर-सायली लोणकर.

इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: सायली लोणकर(229धावा);
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: प्रियांका घोडके(8विकेट);
मालिकावीर: पूनम खेमनार(266धावा व 4 विकेट).

जातीयवादी पक्षाचा पराभव करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे-अजित पवार

पुणे –  आगामी निवडणुकांमध्ये जातीयवादी पक्षाचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे , त्यासाठी कार्यकर्त्यांचे जाळे बांधून बूथ कमिट्या मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी केले . समता भूमी येथील सावित्रीबाई फुले स्मारकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्यावतीने आयोजित कार्यकर्त्याना मार्गदर्शन अजितदादा पवार बोलत होते . त्यांनी सांगितले कि , नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपची लाट ओसरत चालली आहे . जनतेला खोटी आश्वसनें देउन हे सरकार सत्तेवर आलेले आहे . आतापर्यंत कोणतीच आश्वासनाची पूर्तता सरकारने केलेली नाही . त्यामुळे हे सरकार अपयशी ठरले आहे . पुण्यातील आठही विधानसभा मतदार संघावर झेंडा फडकाविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे . झोकून देउन पक्षाचे काम करा , पक्षाला मजबूत करा . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्तेत असताना सर्व समाजाला संधी दिली आहे . त्याचा निश्चितच पक्षाला फायदा मिळणार आहे .      या कार्यकर्ता मेळाव्यास पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार ऍड. वंदना चव्हाण , प्रदेश प्रवक्ते ऍड अंकुश काकडे , आमदार ऍड. जयदेवराव गायकवाड , मेळाव्याचे आयोजक   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष भोलासिंग अरोरा ,निरीक्षक निलेश निकम ,  माजी आमदार कमल ढोलेपाटील , महापालिका विरोधी पक्षनेते चेतन तुपे , भगवानराव वैराट , माजी महापौर मोहनसिंग राजपाल , माजी उपमहापौर निलेश मगर , नगरसेवक प्रशांत जगताप , नगरसेवक प्रदीप गायकवाड , नगरसेविका रत्नप्रभा जगताप , पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर , पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राकेश कामठे , विद्यार्थी अध्यक्ष ऋषी परदेशी ,माजी नगरसेविका सुरेखा कवडे ,  ऍड, भगवानराव साळुंके , अशोक राठी , माजी नगरसेवक शांतीलाल मिसाळ , कासम शेख , भारत कांबळे , प्रदीप देशमुख , संदीप नवघणे आदी मान्यवर उपस्थित होते .

या मेळाव्याचे प्रास्तविक  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष भोलासिंग अरोरा  यांनी केले तर सूत्रसंचालन उध्दव बडदे यांनी केले तर आभार राहुल तांबे यांनी मानले . या मेळाव्यास   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या महिला अध्यक्षा मीना पवार , युवती अध्यक्षा पूजा वाघमारे , युवक अध्यक्ष विशाल नाटेकर , नरेश जाधव , मयूर गायकवाड , मुनीर सय्यद , फईम शेख , कुलदीपसिंग टूटेजा , युसूफ शेख , समीर शेख ,पोपट गायकवाड ,  चेतन मोरे , रणजित परदेशी , सुनिल पडवळ , जनार्दन जगताप , संदीप गाडे , सुनील भोईटे , नितीन रोकडे , मंगेश मोरे , शिवाजी शिंदे , महेंद्र लालबिगे , गणेश लांडगे ,आदी मान्यवर व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

टेनिस स्पर्धेत नील जोगळेकर, पर्श परमार , अन्या जेकब, आदिती लाखे यांचा दुस-या पात्रता फेरीत प्रवेश

पुणे- पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे एमएसएलटीए केपीआयटी अरूण वाकणकर यांच्या स्मरणार्थ अरूण वाकणकर मेमोरियल एटीएफ आशिया 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत  नील जोगळेकर,  पर्श परमार ,  अर्णव पापरकर , अननमय उपाध्याय ,  जोशुआ इपन    अन्या जेकब,  आदिती लाखे,  सिया देशमुख  यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत पात्रता फेरीच्या दुस-या चरणात प्रवेश केला.
 
म्हाळुंगे बालेवाडी येथील एमएसएलटीए स्कुल ऑफ  टेनिस येथे  आजपासुन सुरू झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात पहिल्या पात्रता फेरीत  नील जोगळेकरने स्वरमन्यू सिंगचा  6-4, 6-1 असा तर  पर्श परमारने वेद पवारचा  6-3, 7-5 असा पराभव करत पात्रता फेरीच्या दुस-या चरणात प्रवेश केला.
 
मुलींच्या गटात  अन्या जेकबने  श्रीहिता जलीगामा हीचा  6-3, 4-6, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव केला. आदिती लाखेने सिद्धी खोतचा 7-5, 6-1 असा तर सिया देशमुखने सलोनी परिधाचा  6-1, 6-1 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी: मुले:
नील जोगळेकर(भारत) वि.वि.स्वरमन्यू सिंग (भारत)  6-4, 6-1;
पर्श परमार (भारत)  वि.वि.वेद पवार (भारत)  6-3, 7-5;
अर्णव पापरकर (भारत)  वि.वि.अंकित भतेजा (भारत)  6-3, 6-0;
अननमय उपाध्याय (भारत)  वि.वि.वेदांत भोसले (भारत)  6-1, 6-0;
जोशुआ इपन (भारत)  वि.वि.सर्वेश झंवर (भारत)  6-1, 6-0;

मुली:
अन्या जेकब (भारत)  वि.वि.श्रीहिता जलीगामा (भारत)  6-3, 4-6, 6-2;
आदिती लाखे (भारत)  वि.वि.सिद्धी खोत (भारत)  7-5, 6-1;
सिया देशमुख (भारत)  वि.वि.सलोनी परिधा (भारत)  6-1, 6-1.

कर्वे समाज सेवा संस्थेच्यावतीने सेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्टेट इलिजीबिलीटी टेस्ट (सेट) परीक्षेमध्ये पुणे येथील कर्वे समाज सेवा संस्थेच्या एम. एस. डब्ल्यू द्वितीय वर्षाच्या दोन विद्यार्थ्थानी समाजकार्य(एम. एस. डब्ल्यू) विषयामध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केले असून त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या वतीने संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

एम. एस. डब्ल्यू द्वितीय वर्षाचे विद्यार्थी तुषार दोडमिसे व स्वाती केदार यांनी यावर्षी प्रथमच सेट परीक्षा दिली होती व पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांनी उत्तीर्ण होण्याची किमया केली आहे. तुषार दोडमिसे व स्वाती केदार यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सी एस आर सेलचे मानद संचालक डॉ. महेश ठाकूर, ज्येष्ठ प्रा. डॉ अनुराधा पाटील व समुपदेशन अभ्यासक्रम समन्वयक प्रा. चेतन दिवाण यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला.

डॉ. ठाकूर, डॉ. पाटील व प्रा. दिवाण तसेच सी. एस. आर. व समुपदेशन अभ्यासक्रमाच्या उपस्थित विद्यार्थ्यांनी  सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मुंबईतील नद्या, नाले स्वच्छ, सुंदर करा – रामदास कदम

0

मुंबई: मुंबईतील नद्या, नाले पुढील सहा महिन्यात सुंदर आणि स्वच्छ करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मुंबईतील नदी प्रदूषण आणि राज्यातील प्रदुषित नदी पट्टे या संदर्भात आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी अपर मुख्य सचिव सतीश गवई उपस्थित होते.

श्री. कदम म्हणाले, मिठी, दहिसर, बोईसर या मुंबईतील नद्या स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषण मुक्त होण्यासाठी सहा महिण्याचा कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा. नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करणे, गाळ, कचरा काढणे, सांडपाणी बंद करणे, कारखान्याचे रासायनिक पाणी सोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे, नदी काठाने झाडे लावणे, नदी परिसरात नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी सुविधा निर्माण करणे, बसण्यासाठी खुर्च्याची सोय करणे, त्यामुळे कुणीही कचरा टाकणार नाही. परिसरात अतिक्रमणे होणार नाहीत. नदी परिसराला पर्यटन स्थळांचे स्वरुप येईल. याच वेळी पर्यावरण मंत्र्यांनी राज्यातील नद्या स्वच्छतेचा आढावा घेऊन घरातील सांडपाणी आणि कारखान्याचे रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उपस्थित महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी पंचगंगा, चंद्रभागा, भीमा, मुळा-मुठा, बिंदुसरा या प्रमुख नद्यांच्या प्रदुषित पाण्यावर चर्चा झाली. या बैठकीला अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2022 अंतर्गत १५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

0

मुंबई : महाराष्ट्र शासनाने 5 वर्षे मुदतीचे १५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले असून  (Re-Issue) ही विक्री शासनाच्या अधिसुचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल.

शासकीय रोख्यांची विक्री भारतीय रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट शाखेच्या वतीने दि. २० जुलै २००७ च्या सुधारित सर्वसाधारण अधिसुचनेतील कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येईल. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसुचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणूकदारास एकूण अधिसुचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.

भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक  ५ जून  २०१८ रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक ५ जून २०१८  रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाची आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिडस संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत सादर करावेत. अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.३० पर्यंत सादर करावेत.

लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक ६ जून  २०१८  रोजी करण्यात येईल.

यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक ६ जून  २०१८  रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्यांचा कालावधी पाच वर्षांचा असेल. रोख्यांचा कालावधी  दि. २७ सप्टेंबर २०१७    पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक २७ सप्टेंबर २०२२  रोजी पुर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा ७.०२ टक्के दर साल दर शेकडा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मुळ दिनांकापासून  मुळ किंमतीवर प्रतिवर्षी २७ सप्टेंबर आणि २७ मार्च रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे रोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील अशी माहिती वित्त विभागाच्या १ जून २०१८ रोजीच्या अधिसुचनेत नमूद करण्यात आली आहे.

बारावी फेरपरीक्षेच्या; ऑनलाईन प्रवेश अर्ज वेळापत्रक जाहीर

0

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत नियमित, पुन:परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीनुसार योजनेअंतर्गत विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) फेरपरीक्षा जुलै-ऑगस्ट 2018 मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. या फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscborad.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत.

बारावी फेरपरीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरणे आवश्यक आहे.

 

शुल्क प्रकार विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख
नियमित शुल्क सोमवार, दि.04/06/2018 ते बुधवार, दि.13/06/2018 गुरुवार, दि. 14/06/2018 ते सोमवार, दि.18/06/2018 सोमवार, दि. 25/06/2018
विलंब शुल्क गुरुवार, दि. 14/06/2018 ते सोमवार, दि. 18/06/2018 मंगळवार, दि. 19/06/2018 ते शुक्रवार, दि. 22/06/2018

 

सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील बाबी लक्षात घ्याव्यात.

श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट 2018 व फेब्रुवारी-मार्च 2019 अशा लगतच्या दोन संधी उपलब्ध राहतील याची नोंद घ्यावी.

लातूर व कोकण विभाग वगळून इतर विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रचलित शुल्क बँक ऑफ इंडियात मंडळाच्या खात्यामध्ये जमा करुन बँक ऑफ इंडियाच्या चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. लातूर विभागीय मंडळाच्या कक्षेतील उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी एच.डी.एफ.सी. बँक (HDFC Bank) आणि कोकण विभागीय मंडळाच्या कक्षेतील शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी ॲक्सिस बँक (AXIS Bank) या बँकेत मंडळाच्या जमा खात्यात शुल्क जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात.

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फेब्रुवारी-मार्च 2019 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल.

नियमित शुल्कासह तसेच विलंब शुल्कासह आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क दोन स्वतंत्र चलनाद्वारे भरण्यात यावे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबर 2018 मध्ये घेतली जाणार नाही याची विद्यार्थी, पालक, प्राचार्य, मुख्याध्यापक व सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.

 

 

 

मराठीतली मॅशअप क्विन सावनी रविंद्र घेऊन आलीय तिचं नवं मॅशअप साँग

सावनी रविंद्रने फिल्म प्लेबॅक सिंगींगसोबतच मॅशअपच्या दुनियेतही आपला ठसा उमटवला आहे. तिच्या मॅशअप्सना नेहमीच तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलंय. त्यामूळेच आता सावनी आपलं ‘टिक-टिक वाजते – पियु बोले’ हे मॅशअप घेऊन आलीय. संगीतकार गौरव डगावकरसोबत सावनीने हे मॅशअप गायलंय.

सावनी आणि गौरव ह्याअगोदर वन वे तिकीट चित्रपटातल्या ‘मस्त मलंगा’ गाण्यासाठी एकत्र आले होते. ह्या गाण्यावर चाहत्यांच्या प्रेमासोबतच पुरस्कारांचीही बरसात झाली होती. सावनी आपल्या नव्या मॅशअपविषी सांगते, “गौरव भेटला की आमची नेहमीच जॅमिंग सेशन रंगतात. अशाच एका जॅमिंगसेशन दरम्यान हे गाणं आकाराला आलं. गौरव टिकटिक वाजते गात होता. आणि मी पियु बोले गाऊ लागले. आणि मॅशअप रंगलं. मग आम्ही हे मॅशअप रेकॉर्ड करायचे ठरवले. गौरव आणि माझं हे पहिलं मॅशअप आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे, कानसेनांना हे मॅशअप खूप आवडेल.”

साँगफेस्ट इंडिया निर्मित ह्या गाण्याचं चित्रीकरण कर्जतच्या तन्मय फार्म्समध्ये झाले आहे.  बॉलीवूडचे सुप्रसिध्द अरेंजर दिपजंन गुहा ह्यांनी म्युझिक अरेंजमेंट केली असून शशांक आचार्यने बासरी वाजवली आहे तर सागर मोंडलने कझोन बॉक्स प्ले केला आहे.

… अखेर पालिकेचे रखडलेले पुरस्कार सुरु होणार !

 माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पाठपुराव्याला यश 
पुणे – सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील  महनीय, दिग्गज व्यक्तिमत्वांचा महापालिकेतर्फे पुरस्काराद्वारे सन्मान करण्याचा खंडित झालेला  मार्ग अखेर मोकळा झाला असून रखडलेल्या पुरस्कारांचे वितरणही आता लवकरच होणार आहे. पक्षनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याने माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
 शहराला  अनेक महनीय, दिग्गज व्यक्तिमत्वे लाभली आहेत . गेल्या ७० वर्षात त्यांच्या कार्याप्रती आदर आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी त्या- त्या महनीय व्यक्तींच्या नावाने विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा सन्मान महापालिकेतर्फे करण्यात येतो,तोही तरतुदीनुसार  मात्र राज्यशासनाच्या एका परिपत्रकामुळे या परंपरेत खंड पडण्याची स्थिती ओढवली आणि आठ – नऊ महिने या पुरस्कारांचे वितरण थांबले.राज्यशासनाच्या परिपत्रकाचा आणि न्यायालयाचे  निर्देश पुढे करून पुरस्कारांचे वितरण रोखण्यात आल्याने माजी उपमहापौर आबा बागुल यांनी कायद्यातील तरतुदींकडे वारंवार लक्ष वेधून हे पुरस्कार सुरु करण्याची मागणी केली होती आणि तसा ठरावही दिला होता. पक्षनेत्यांच्या बैठकीत हे  रखडलेले  पुरस्कार पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता संत जगनाडे महाराज, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, स्वरभास्कर आदी पुरस्कारांच्या वितरणाचा मार्ग सुकर झाला आहे. गतवर्षी रखडलेले आणि यंदाचे १७ पुरस्काराचे वितरण आता होणार आहे.या निर्णयाबद्दल बोलताना माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सर्व पक्षनेत्यांसह सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींचेही आभार मानले आहे. आबा बागुल म्हणाले,  ज्या महनीय व्यक्तींचा सन्मान केला जातो ,त्यांच्याकडून कधीही पुरस्काराच्या  रकमेची मागणी होत नाही. आपणच ती देत असतो. मात्र  न्यायालयाच्या निर्देशानुसार  राज्यशासनाने सरसकट पुरस्कार कार्यक्रमावर घातलेली बंदी  होती . केवळ पुणे नाही तर अन्य महापालिकाही  त्यांच्या -त्यांच्या शहरातील महनीय व्यक्तींचा सन्मान करीत असते. त्यामुळे जे पुरस्कार सुरु केलेले आहेत,ते कदापि बंद करू नयेत.   महनीय व्यक्तींच्या नावाने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण आणि त्यासाठी येणारा खर्च पाहता कोणतीही उधळपट्टी  पुणे महानगरपालिकेकडून होत नसल्याचे राज्यशासनाला  निदर्शनास आणून द्या तसेच  कायद्यातील तरतुदीनुसार मानधन न देणे ही तरतुद निदर्शनास आणून देऊन   पुरस्कार पुन्हा सुरु करा , यासाठी सतत पाठपुरावा केला  ,त्याला सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी साथ दिली,त्यांच्या लढ्याला यश आले असे मी मानतो,असे आबा बागुल म्हणाले. 


विद्युत वाहनांचे उत्पादन व वापरासाठी महिंद्रचा राज्य सरकारशी करार

-विद्युत वाहनांची व सुट्या भागांच्या निर्मितीसाठी चाकणच्या कारखान्यात महिंद्र समुहातर्फे
आणखी गुंतवणूक
– महिंद्रच्या विद्युत वाहन व सुट्या भागांच्या निर्मितीला महाराष्ट्र सरकारतर्फे पायोनीअर मेगा
प्रोजेक्ट असा दर्जा
– सरकारशी झालेल्या करारानुसार, पुढील वर्षभरात 1000 विद्युत वाहने महिंद्रतर्फे प्रमुख शहरांत
होणार दाखल.
मुंबई : विद्युत वाहनांच्या उत्पादनाचा पुढील टप्पा गाठण्यासाठी महिंद्र अॅन्ड महिंद्र या कंपनीने महाराष्ट्र सरकारशी
दोन करार केले. विद्युत वाहनांचा वापर व्यक्तिगत तसेच सार्वजनिक स्वरुपात पूर्णपणे करण्याच्या सरकारच्या
धोरणाचा भाग म्हणून हे करार करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुख्य सचिव आणि उद्योग खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी, तसेच महिंद्र अॅन्ड
महिंद्र कंपनीच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोयंका यांनी या करारांवर सह्या केल्या. याप्रसंगी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, महिंद्र समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र आणि इतर मान्यवर
उपस्थित होते. विद्युत वाहनांचा वापर करण्यात महाराष्ट्र हे राज्य जगात अग्रभागी असावे व राज्यात या वाहनांचा
वापर अधिकाधिक व्हावा, या उद्देशाने हे करार करण्यात आले,
पहिल्या करारानुसार, महिंद्र अन्ड महिंद्र कंपनीच्या चाकण येथील कारखान्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. या
ठिकाणी विद्युत वाहने, इ-मोटर, कंट्रोलर, बॅटरी पॅक व अन्य सुटे भाग यांची निर्मिती करण्यात येईल. यासाठी कंपनी
500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. दुसऱ्या करारान्वये, महिंद्र कंपनीने महाराष्ट्र राज्यात विद्युत वाहने मुख्य
शहरांमध्ये विकायची आहेत. या कामी राज्य सरकार कंपनीला मदत करणार आहे. महिंद्रची विद्युत वाहने टॅक्सी
संघटनांनी, प्रवासी कंपन्यांनी, लॉजिस्टिक्स कंपन्यांनी वापरावीत, यासाठी सरकार व महिंद्र कंपनी संयुक्तपणे प्रयत्न
करणार आहेत. सुमारे 1000 वाहने येत्या 1 वर्षात विकण्याचे उद्दीष्ट सध्या ठेवण्यात आले आहे.
या घडामोडींची माहिती देताना डॉ. पवन गोयंका म्हणाले, ‘चाकणमध्ये विद्युत वाहनांच्या निर्मितीचा विस्तार
करण्याचा कार्यक्रम आखताना आम्हाला आनंद होत आहे. याकामी आम्हाला सतत प्रोत्साहन व मदत देणाऱ्या
महाराष्ट्र सरकारचे आम्ही आभार मानतो. देशात वाहतुकीच्या क्षेत्रात विधायक पावले उचलण्याचे आमचे कार्य गेल्या
दशकभरापासून सुरू आहे. ते यापुढेही सुरू राहील. विद्युत वाहनांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करून
आम्ही पर्यावरणाविषयी आमची जागरुकता दर्शवित आहोत. व्यक्तिगत व सार्वजनिक वाहतुकींमध्ये या विद्युत
वाहनांचा अधिकाधिक व जलद गतीने उपयोग व्हावा, या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. महाराष्ट्र सरकारने आमचे हे
प्रयत्न ओळखले आहेत व आमच्या कामात सरकार सहभागी झाले असल्याने आगामी काळात आमची या क्षेत्रातील
प्रगती अशीच होत राहील, असा विश्वास वाटतो.’
उत्पादीत झालेल्या विद्युत वाहनांचा पहिला 25चा ताफा हा मुंबईतील झूमकार या कंपनीला जागतिक पर्यावरण
दिनाच्या निमित्ताने पाठविण्यात येणार आहे. अन्य वाहने राज्यात विविध कारणांसाठी, उपक्रमांसाठी पाठविली
जातील. यात घर ते कार्यालय असा प्रवास करण्यासाठी काही विशिष्ट अधिकाऱ्यांना या गाड्या देण्यात येतील. तसेच
टॅक्सी व्यावसायिक, खासगी वाहतूकदार, ग्राहकाने स्वतः चालविण्यासाठी भाडेतत्वावर गाड्या देणारे यांचा विचार
प्राधान्याने करण्यात येणार आहे.

महिंद्र कंपनीतर्फे मोटर कंट्रोलर, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी पॅक, ड्राईव्हट्रेन व अन्य उपकरणे, सुटे भाग आयात केले
जातात. त्यांचे उत्पादन करण्यासाठी कंपनीतर्फे भागीदार शोधण्यात येत आहेत. हे सुटे भाग महिंद्र समुहातील अन्य
कंपन्यांना व इतर ग्राहकांना पुरवण्यात येतील.
प्रवासी वाहनांच्या क्षेत्रात मोठे बदल होणे यापुढील काळात अपेक्षित असून महिंद्र समूह त्यात आघडीवर असणार
आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हा यामागील एक उद्देश असेल. महाराष्ट्र सरकारनेदेखील या उद्दीष्टांची दखल घेतली
असून विद्युत वाहनांच्या विस्तारीत उत्पादनाच्या प्रकल्पाला ‘पायोनीअर मेगा प्रोजेक्ट’ असा दर्जा सरकारने दिला
आहे.