Home Blog Page 3135

प्रणव मुखर्जींना पुणेरी पगडीची भेट दिली वाघोलीकरांनी !

0
पुणे :संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्मित्त्वांवर लेखन करणारे युवा लेखक र्‍हिदम वाघोलीकर यांनी मंगळवारी सायंकाळी दिल्ली येथे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना  गानसम्राज्ञी लता मंगेशकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यावर स्वतः लिहिलेली पुस्तके भेट दिली. तसेच पुणेरी पगडी भेट दिली. प्रणव मुखर्जी यांनी पगडी आणि पुस्तकांचा स्वीकार करून वाघोलीकर यांच्या लेखन उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी आशय वाघोलीकर हेही उपस्थित होते.
वाघोलीकर यांच्या ‘क्रिएटिंग पॉसिबिलिटीज’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे स्मृतीचिन्ह देऊन या भेटीत माजी राष्ट्रपतींचा गौरव करण्यात आला.
यापूर्वी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनाही वाघोलीकर यांनी ही पुस्तके भेट दिली होती.
र्‍हिदम वाघोलीकर हे पुण्यातील २४ वर्षीय युवा लेखक आहेत.
 त्यानी गानसम्राज्ञी लता मंगेशकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यावर पुस्तके लिहिली आहेत. लता मंगेशकर यांच्या भाची रचना खडीकर -शहा या  दोन्ही पुस्तकाच्या अतिथी संपादक आहेत.  ​
‘स्वरलता -रिदमिक रेमीनीसेस ऑफ लता दीदी ‘या ​लता मंगेशकर यांच्यावरील पुस्तक अनोख्या ग्रामोफोन आकारात त्यांच्याच हस्ते प्रकाशित झाले होते, तर किशोरीताईंवरील ‘द सोल स्टिरिन्ग व्हाईस -गानसरस्वती किशोरी आमोणकर’ हे ​पुस्तक ‘स्वरमंङळ ‘ (इंडियन हार्प) आकारात  ​छापण्यात आले आहे.
या लेखनाबद्दल यापूर्वी र्‍हिदम वाघोलीकर आणि रचना खडीकर – शहा यांना ​’इंटरनॅशनल अचिव्हर्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

आचार्य अत्रेंची पत्रकारिता तरुणांसाठी प्रेरणादायी

0

– रविंद्र बेडकीहाळ

पुणे – आचार्य अत्रेंची पत्रकारिता तरुण पत्रकारांसाठी प्रेरणादायी आहे. पत्रकार म्हणून त्यांनी केलेले कार्य उत्तुंग आहे, असे प्रतिपादन सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष रविंद्र बेडकीहाळ यांनी केले.

येथील आचार्य अत्रे प्रतिष्ठान तर्फे विनोद विद्यापीठ, शिवाजीनगर येथे आयोजीत साहित्य सम्राट आचार्य अत्रे स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. बाबुराव कानडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

बेडकीहाळ म्हणाले, पत्रकार म्हणून काम करतांना अत्रेंनी नेहमी अन्याया विरूद्ध लढा दिला. त्यांचे मराठा दैनीकातील लिखाण हे क्रांतिकारी होते. त्यांचे अग्रलेख प्रभावी होते आणि नेहमी जनसामन्यांची बाजू मांडणारे होते. वाचकांवर त्यांच्या लिखाणाचा मोठा पगडा होता. मराठी मनाचा प्रतिनिधी म्हणून अत्रेंनी दैनिक मराठा नावारुपाला आणले. पत्रकार म्हणून अत्रेंनी त्यांच्या लेखणीचे शस्त्र करीत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात क्रांतीचे बीज पेरले. अत्रेंनी महाराष्ट्राचा पुढील 50 वर्षाचा राजकीय आणि सामाजिक विचार त्यांच्या पत्रकारीतेतून मांडला त्यामुळे त्यांना दृष्टा पत्रकार म्हणून संबोधण्यात आले आहे.

बेडकीहाळ यांनी या व्याख्यानाच्या निमित्ताने अत्रे यांच्या पत्रकारीतेवर प्रकाश टाकला तसेच या क्षेत्रात अत्रेंनी दिलेल्या योगदानाची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

व्याख्यानास मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते

जळगावात 9 वर्षीय चिमुरडीचा अर्धनग्नावस्थेत‍ मृतदेह सापडला

0

जळगाव- शहरातील समता नगर परिसरात एका टेकडीवर 9 वर्षीय चिमुरडीचा अर्धनग्नावस्थेत‍ सापडल्याने खळबळ उडाली आहे. चिमुरडीचा मृतदेह एका पोत्यात सापडला आहे. मृतदेहावर नखांनी ओरबड्याच्या खुणा आहेत. त्यामुळे चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्‍यात आली असावी, असा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,समता नगरातील धामणगाव वाड्यात सदर मुलगी राहात होती. काल (मंगळवार) संध्याकाळपासून ती बेपत्ता होती. तिचे आई-वडिलांसह नातेवाईकांनी रात्रभर तिचा शोध घेतला. रामानंदनगर पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी देखील मुलीचा शोध घेतला. परंतु मुलगी आढळून आली नाही.

टेकडीवर पोत्यात सापडला मृतदेह…
घरासमोरील उंच टेकडीवर आज (बुधवार) एका पोत्यात मुलीचा मृतदेह सापडला. बकर्‍या चारणार्‍या महिलेला एका पोत्याजवळ काही कुत्रे दिसली. तिने जवळ जाऊन पाहिले असता तिला मुलीला पाय दिसला. तिने ही माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. मुलीच्या आई-वडिलांसह पोलिसांना ही माहिती देण्यात आली. मुलीचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत आहे. तसेत मृतदेहावर नखांनी ओरबड्याच्या जखमा आहेत. त्यामुळे मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोत्यात सापडली माचिस..
चिमुरडीच्या मृतदेहासोबत पोत्यात एक माचिस सापडली आहे. त्यामुळे मुलीचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा मारेकर्‍याचा प्रयत्न होता असेही पोलिसांनी सांगितले आहे.

भोंदूबाबावर संशय..?
मुलीच्या घराशेजारी एक भोंदूबाबा राहातो. तो देखील मंगळवारी रात्री नऊ वाजेपासून बेपत्ता आहे. त्याचा मोबाइलही बंद येत आहे.

या प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी महाआरती

0

पुणे- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. ते लवकर बरे व्हावेत म्हणून पुण्यात भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी ग्रामदैवत कसबा गणपती समोर महाआरती केली. यावेळी पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

अटलबिहारी वाजपेयी यांना सोमवारी दिल्लीमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एम्स रूग्णालयात दाखल झाले होते. वाजपेयींना चांगले आयुष्य लाभो यासाठी पुणे शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीसमोर पुणे भाजपाच्यावतीने योगेश गोगावले यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी नगरसेवक राजेश येनपुरे, अजय खेडेकर, पुष्कर तुळजापूरकर तसेच आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

मोदी सरकार देशातील गरिबांची लूट करुन श्रीमंतांचे खिसे भरत आहे

मुंबई-मोदी सरकार देशातील गरिबांची लूट करुन श्रीमंतांचे खिसे भरत आहे. जनतेचा पैसा उकळून श्रीमंतांचे कर्ज माफ केले जात आहेत असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज मुंबईत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर हल्लाबोल केला.

भारताचे संविधान, संस्थांवर आक्रमण करणाऱ्या भाजपा, आरएसएसविरोधात देशातील सर्व विरोधीपक्ष एकवटत आहेत. ही फक्त राजकारण्यांची नाही तर जनतेचीही भावना आहे असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. ‘जे छोटे व्यवसायिक आहेत ते दुखी आहेत. हे सरकार देशातील जे सर्वात श्रीमंत आहेत त्यांच्यासाठी काम करत आहे. त्यांचं लाखो, करोडोंचं कर्ज माफ करण्यात आलं. छोट्या व्यवसायावंर आक्रमण केले जात आहे’, असा आरोप राहुल गांधींनी केला.

तसंच कच्चं तेल स्वस्त असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर का वाढत आहेत ? असा सवाल राहुल गांधींनी यावेळी विचारला. तसंच पेट्रोल – डिझेल जीएसटीत आणण्याची मागणी केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.

अर्थमंत्री मुनगंटीवार यांचा खडकी, देहूरोड, पुण कॅन्टोनन्मेंटच्या सदस्यांनी केला सत्कार

0

मुंबई – राज्यातील सात कॅन्टोन्मेंटसाठी प्रत्येकी पाच कोटी रूपयांचा विकास निधी आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ तेथील रहिवासी नागरीकांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या आठवड्यात घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल शिवाजीनगरचे आमदार विजय काळे, मावळचे आमदार बाळा भगडे यांच्यासह पुणे, खडकी आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सदस्यांनी आज मंत्रालयात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांचा आभार मानले. यावेळी अर्थमंत्र्यांनी सर्व सदस्यांशी सविस्तर चर्चाही केली. कॅन्टोन्मेंट बोर्डाला विकास कामांसाठी निधी देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. त्याच बरोबर कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरीकांना राज्य शासनाच्या योजनांचाही लाभ मि

यावेळी खडकी कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष अभय सावंत, ज्येष्ठ सदस्य सुरेश कांबळे, हिवरकर, पुणे कॅन्टोन्मेंटच्या माजी उपाध्यक्षा डॉ. किरण मंत्री, देहूरोड कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, देहूरोडचे सीईओ अभिजीत सानप, आमदार विजय काळे, आमदार बाळा भेगडे यांच्यासह तिन्ही बोर्डाचे सदस्य आणि अर्थमंत्रालयातील अधिकारीही हजर होते. सन १९६० पासून पहिल्यांदाच अशा प्रकारे कॅन्टोन्मेंट बोर्डाला विकास निधी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

राज्य सरकारने जकात बंद करण्याचा निर्णय घेतला आणि याचा मोठा फटका कॅन्टोन्मेंट बोर्डांना बसला. त्यांना जकाती पोटी मिळणारे उत्पन्न बंद झाले. त्यामुळे त्यांना विकास कामांसाठी निधीची चणचण भासू लागली. कॅन्टोन्मेंट बोर्ड हे संरक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली काम करत असल्याने त्यांना आतापर्यंत राज्य शासानाकडून विकास निधी दिला जात नव्हता. विधानसभेसाठी कॅन्टोन्मेंटचे मतदार मतदान करून आमदार निवडत होते. पण राज्य सरकारच्या कोणत्याही योजनांचा लाभ या मतदारांना मिळत नव्हता.

ही बाब सर्वप्रथम आमदार विजय काळे यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर विकास निधी मिळण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही केली. या दोन्ही महोदयांनी विकास निधी देण्याबद्दल सकारात्मकता दाखवली. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या एका कार्यक्रमास अर्थमंत्री मुनगंटीवार यांना पाहुणे म्हणून त्यांनी बोलवले आणि त्याच कार्यक्रमात राज्यातील सातही कॅन्टोन्मेंटच्या उपाध्यक्ष, सीईओ यांच्या एकत्रित भेट मुनगंटीवार यांच्याशी घालून दिली. या सर्वांचे म्हणणे ऐकल्यावर मुनगंटीवार यांनी कार्यक्रमातच कॅन्टोन्मेंटला विकास निधी देण्याची घोषणाही केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात मुख्यमंत्री फडवणीस यांच्या समावेत शिवाजीनगर मतदारसंघातील कामांबाबत मुंबईत झालेल्या बैठकीत आमदार काळे यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निधीची मागणी केली. दोन महिन्यात याबाबतचा निर्णय घेण्याचे आश्वसन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार गेल्या मंगळवारी (दि. ५ जून) झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील प्रत्येक कॅन्टोन्मेंट बोर्डाला पाच कोटी रूपये विकास निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या क्रांतीकारी निर्णयबद्दल आज मंत्रालयात जाऊन कॅन्टोन्मेंटच्या उपाध्यक्ष, सदस्यांनी अर्थमत्रीं सुधीर मुनगंटीवार यांचा शंकराची मूर्ती, स्मृती चिन्हं देऊन त्यांचे आभार मानले.

भैय्यूजी महाराज यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

0

इंदूर : राष्ट्रसंताचा दर्जा प्राप्त झालेले आध्यात्मिक गुरु भैय्यूजी महाराज (वय 50) यांनी आज  स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.

भैय्यूजी महाराज हे इंदूरमध्ये वास्तव्यास होते. इंदूरमधील सिल्वर स्प्रिंग भागात असलेल्या त्यांच्या बंगल्यातील दुसऱ्या मजल्यावर त्यांनी आज दुपारी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. इंदूरमधील बॉम्बे रुग्णालयात त्यांनी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालविली होती. भैय्यूजी महाराजांनी स्वत:वर का गोळी झाडली याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली. भैय्यूजी महाराज यांनी गेल्यावर्षीच दुसरा विवाह केला होता. त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. पुण्यातील खासदार अनिल शिरोळे यांच्यासह असंख्य मान्यवर भैय्यू महाराजांचे चाहते होते .सुरुवातीच्या काळात  मॉडेलींग करणारे भय्यू ..महाराज झाले एवढे लोकप्रिय झाले कि राजकारणी ,उद्योजक यांचासः मोठा चाहता वर्ग त्यांचा देशभर निर्माण झाला . दिल्ली दरबारी त्यांचा सन्मान होत होता . शेतकरी,कामगार, पत्रकार ,छोटे व्यावसायिक यांच्या आत्महत्येच्या बातम्यांना सरावलेल्या त्यांच्या चाहत्या वर्गाला , समाजाला  एक राष्ट्र संत उल्लेख होणाऱ्या भैय्युजींच्या आत्महत्येच्या वृत्ताने मोठा धक्का बसला आहे .

असे सांगण्यात येते कि ,, गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या घरी कौटुंबिक कलह सुरु होता. त्यामुळे ते खूप अस्वस्थ होते. याच कारणावरून त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची शक्यता आहे. भैय्यूजी महाराज यांना नुकताच मध्य प्रदेश सरकारकडून राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला होता. मात्र, त्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यावेळी त्यांनी म्हटले होते, की संतांसाठी पदाचे महत्त्व काही नसते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात ते प्रसिद्ध होते. डिसेंबर 2011 मध्ये दिल्लीतील आंदोलनासामयी अण्णा हजारे आणि केंद्र सरकारमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावली होती. त्यापूर्वीही विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानाही त्यांची भूमिका बजावली होती.मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी भैय्यूजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, की संस्कृती, ज्ञान आणि सेवा असे त्रिवेणी व्यक्तिमत्व होते. त्यांचे विचार कायम समाजाला प्रेरित करत राहतील.

– खा. अनिल शिरोळे यांनी दुखः व्यक्त केले आहे ,ते म्हणाले ,’
अत्यंत दु:खद,धक्कादायक,वेदना देणारी अशी ही घटना आहे. त्यांच्या जाण्याने देशांचे,समाजाचं कधीही न भरून येणारे नुकसान झालं आहे. सर्व समाजाला स्वत:चं कुटुंब मानून त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते स्वत:चं सर्वस्व पणाला लावून मदत,मार्गदर्शन करीत. ते ज्या तळमळीनं स्वत:ला झोकून देऊन समाजसेवा करीत,तसं काम करणे हीच त्यांना श्रध्दांजली ठरेल.

खवय्या पुणेकरांसाठी गजबकी मेजवानी..(व्हिडीओ)

पुणे-पुणे म्हणजे खवैय्यांचे शहर अशी ख्याती आहे ,खावो ,खिलावो ,मौज करो हे ब्रीद जीवनात आचरणारे पुणेकर बहुसंख्य भेटतील.पुण्यात खाणाऱ्यांची उणीव नाही तशी खाऊ घालणाऱ्यांची देखील नसावी . आणि अशा खाऊ खिलाडी वृत्तीच्या पुणेकरांना रमजान च्या महिन्यात एक खिलानेवाला खिलाडी खुणावतो आहे. आणि त्याच्याकडे पुणेकर मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत . अशा माणसाची खिलाडीची जाहिरात तोंडोतोंडी होते , तसे आमच्या सारख्या पंचतारांकित हॉटेलापासून ते हातगाडीवरही खाणाऱ्या खवय्यांना नदीम इनामदारने कॅम्पातील सलीम भाई च्या स्टाॅलची माहिती दिली आणि वेळ होती संध्याकाळी पावनेसातची… त्यात मध्येच एडविन रोबर्ट भेटला .. आणि त्याला पत्ता विचारला तर , काय खायला चाललात काय ? असा सवाल करत त्याने हाताने रस्ता दर्शविला ..अर्थात आम्हाला हा रस्ता ठाऊक होताच पण … हा स्टाॅल , तेथील खाऊगिरी नवखी होती . मग प्रथम आस्वाद घेतला .. आणि मग मात्र सलीम भाई शी बोलल्या शिवाय राहवले नाही …  त्याची माहिती घेतली ..आणि ‘अन्न्दाताभव ‘ म्हणून व्हिडीओ रिपोर्ट हि केला …

सलीम शाह (वय 32) हे रस्तापेठेतील पावर हाउस येथील प्रसिद्ध केटरर आहे. 2009 साली त्यांनी छोट्या जागेत व्यावसाय सुरु केला आणि आज ते शहरातील एक अग्रगण्य केटरर बनला आहे. त्याच्याकडील रमजानच्या विषेश 45 खाद्यपदार्था व्यतिरीक्त शाह नवाबी सिक, शाह नवाबी तिलक आणि शाह नवाबी गोल्ड कबाब या पदार्थासाठी लोक बराच वेळ रांगेत उभे असतात. त्याचे म्हणणे आहे   स्टर्टर प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असतात परंतु आपल्याकडे सर्व वयोगटांतील व्यक्तीच्या तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर उपलब्ध आहेत. नवाबी सिक व नवाबी टिक्का वगळता इतर पदार्थाचा दर 30 रुपये आहे आणि नवाबी सिक व नवाबी टिक्का यांचा दर अनुक्रमे 60 रु व 100 रु आहेत तर तंदूरि बिर्याणी 120 रुपयाला आहे. लखनऊयेथील बदशाह नगर मधील एका नातेवाईकाकडून त्यांनी हे कौशल्य आत्मसात केल्यावर 1998 मध्ये तो पुण्यात आला.. 400 चौ फुटाच्या किचन मध्ये त्याने  या व्यवसायाला सुरुवात केली यात त्यांना सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित व्यापारी राजू श्रीगिरी आणि त्यांचे भाऊ आनंद श्रीगिरि यांच्याकडून भरपूर सहकार्य मिळाले. त्यांच्या येथे सर्व खाद्यापदार्थ  स्वस्त दरात उपलब्ध आहेत जे इतर ठिकाणच्या तुलनेत जवळजवळ अर्ध्या किंमतीहून कमी आहे. पुणे कॅम्पमधील लष्कर  न्यायालयाच्या समोर राणी लक्ष्मीबाई उद्याना जवळ ते सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत व्यवसाय चालवतो .  नवाबी सिक, टिक्का, गोल्ड कबाब आणि बिर्याणी हे पदार्थ संपूर्ण वर्षभर उपलब्ध असतात. डॉलरकबाब सोबत मेयोनीज हे या हंगामाची खासियत आहे ज्याच्यासाठी लोक खुप गर्दी करतात. एका तासात 4000 डॉलर कबाब विकले जातात आणि या एका तासामुळे मांसाहारी पदार्थांची खूप मागणी आहे हे समजते.

सलीम यांना त्यांचा लहान भाऊ अबरार शाह यांनी खूप सहाय्य केले आहे. खाद्यपदार्थामध्ये नावीन्यपूर्ण बदल करुन पुण्यातील खवय्यांना त्याने साद घातली आहे.

 एकाच वेळी 300 लोकांपर्यंत रांग असते. सलीम शाह आपल्या बनला आहे .या ग्राहकांमधे 80 टक्के लोक मुस्लिमेतर समुदायाचे आहेत ज्यांना सलीम शाह यांचे रमजानचे मांसाहारी पदार्थ खुप आवडतात

वारकर्‍यांची गैरसोय होऊ देणार नाही -महापौर मुक्ता टिळक यांची ग्वाही

0
महापौरांनी केली पालखी मार्गाची पाहाणी
पुणे- संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालख्याचे ७ जुलै रोजी पुण्यात आगमन होणार आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी आज अधिकार्‍यांसोबत पालखी मार्गाची पाहाणी केली आणि विविध प्रकारची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. पाल‘यांचे शहरात आगमन झाल्यानंतर वारकर्‍यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
नगरसेवक प्रकाश ढोरे, शीतल सावंत, सुनीता वाडेकर, आदित्य माळवे, अमोल बालवडकर, विशाल धनवडे, अजय खेडेकर, नाना सांगडे, लक्ष्मी आंदेकर, सुलोचना कोंढरे, मनिषा लडकत, अतिरिक्त मनपा आयुक्त शीतल उगले-तेली, राजेंद्र निंबाळकर, माधव देशपांडे, सहायक मनपा आयुक्त विजय लांडगे यावेळी उपस्थित होते.
कळस-धानोरी, औंध-बोपोडी, संगमवाडी, पाटील इस्टेट, निवडुंग्या विठोबा मंदिर व पालखी विठोबा या पालखीतळांची पाहाणी करण्यात आली. रस्त्यावरील बेवारस गाड्या उचलाव्यात, कचरा, राडारोडा उचलावा, खड्‌ड्यांची डागडुजी करावी, पालखी कालावधीत २४ तास पाणीपुरवठा करावा, मनपाचे टँकर उपलब्ध करून द्यावेत, आरोग्यविषयक सुविधा पुरवाव्यात, मोबाईल टॉयलेट व स्वच्छतागृहांची व्यवस्था पुरवावी, महापालिका शाळा उपलब्ध करून द्याव्यात, पालखी मार्गाची स्वच्छता करावी, ड्रेनेजलाईनची प्रलंबित कामे पूर्ण करावीत, पालखी तळावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, आवश्यकतेनुसार विद्युत व्यवस्था करावी अशा सूचना महापौरांनी प्रशासनाला केल्या.

‘यशस्वी’ संस्थेच्या वतीने पर्यावरण जनजागृती

0
पिंपरी : चिंचवड येथील ‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने नुकत्याच आलेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या  निमित्ताने पर्यावरणविषयक जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आपल्या सभोवताली अगदी सहज मिळणारी स्वच्छ हवा,सुर्यप्रकाश, पाणी  याचे महत्व आपल्याला नसल्यामुळेच आज या सगळ्या गोष्टी प्रदूषित व्हायला लागल्या आहेत. आपण प्रत्येकाने फक्त स्वतः पुरता आणि स्वतःच्या कुटुंबापुरता जरी पर्यावरणाला हानी न पोहोचवण्याचा निर्णय घेतला तरी सुद्धा खूप मोठा फरक दिसून येईल. यासाठी प्रत्येकाने पर्यावरणाप्रती जागरूक होणे ही  काळाची गरज आहे.
तर यावेळी बोलताना  यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सचे संचालक संजय छत्रे यांनी सांगितले की, पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी विद्यार्थीदशेपासूनच प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुनर्वापर प्रक्रियेबद्दलही त्यांनी सविस्तर माहिती दिली.  याप्रसंगी संस्थेच्या प्रांगणात कुंड्यामधून  फुलझाडे लावण्यात  आली.
या कार्यक्रमासाठी प्रा. अनन्या नाईक,पवन शर्मा, अभिजित चव्हाण, इंद्रजित माळी,प्रा. उर्मिला सातपुते,प्रा. प्रियंका साळुंखे, आदिती चिपळूणकर  यांच्यासह संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रा. क्षितिजा देशपांडे – जेऊरकर यांनी केले.

आचार्य अत्रे महाराष्ट्रातील एक उत्तुंग व्यक्तीमत्व- डॉ. सोमनाथ कोमरपंत

0

पुणे- आचार्य अत्रे हे महाराष्ट्राला लाभलेले एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. त्यांचे सर्व क्षेत्रांवर प्रभुत्व होते, असे प्रतिपादान गोवा विद्यापीठाचे निवृत्त मराठी विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी केले.

येथील आचार्य अत्रे प्रतिष्ठान तर्फे विनोद विद्यापीठ शिवाजीनगर येथे आयोजीत साहित्य सम्राट आचार्य अत्रे स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. बाबुराव कानडे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. कोमरपंत म्हणाले, अत्रे हे महाराष्ट्राच्या साहित्यीक, कला, समाजकारण, चित्रपटसृष्टी, राजकारण, पत्रकारीता, या सर्वच क्षेत्रात काम करणारे एक प्रतिभाशाली व्यक्तीमत्व होते. अत्रे महाराष्ट्राचे शक्तीपीठ होते. त्यांनी निर्माण केलेली साहित्य कृती महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरली. जिवनाच्या अनेक समस्यांवर तोडगा काढतांना त्यांच्यातील एक लेखक प्रगल्भ होत गेला. मराठी रंगभुमीला जीवंत ठेवण्यात अत्रेंच योगदान मोठे आहे. नवयुग वाचनमाला आणि दै. मराठा हि त्यांची खरी ओळख आहे. त्यांनी व्यंगचित्रे रेखाटली आणि त्यातून टिका देखील केली पण विडंबन कधीच केले नाही.

  डॉ. कोमरपंत यांनी या व्याख्यानाच्या निमित्ताने अत्रे यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला. तसेच चित्रपट, नाटक, कविता, पत्रकारीता, राजकारण, आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रात अत्रेंनी दिलेल्या योगदानाची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

व्याख्यानास मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.

क्रेडाई महाराष्ट्राच्या वतीने रेरा कार्यशाळेचे आयोजन

0

पुणे . :- विकसकांना रेरा नंतरच्या नियमांची माहिती व्हावी यासाठी क्रेडाई

 महाराष्ट्र आणि महारेराच्या वतीने पुणे येथे या कार्यशाळेचे

 आयोजन करण्यात आले आहे. येत्या १५ जूनला क्रेडाई-पुणे मेट्रोच्या

 ऑडीटोरियम मध्ये दुपारी २ ते ५ पर्यंत हा कार्यक्रम होणार असून

 महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू विकासकांना मार्गदर्शन करतील. क्रेडाई

 महाराष्ट्रने दूर दूरच्या गावांमधील विकासकांनाही याचा फायदा

 व्हावा यासाठी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) क्रेडाई पुणे

 मेट्रोच्या फेसबुक पेज वरून संपूर्ण महराष्ट्रात करण्याचे

 ठरवले आहे.

यामुळेच  भंडारा, परभणी, चंद्रपूर, रत्नागिरी,मालवण, सावंतवाडी,इत्यादी

 ठिकाणी बसून कार्यशाळेत मिळणारे मार्गदर्शनाचा अनुभव

 इतर विकासकांना देण्याचा आमचा मानस आहे अशी माहिती कटारिया यांनी दिली.

ते पुढे म्हणाले महारेराच्या वेबसाईटवरील अटींची पूर्तता  न केल्यास यामुळे

 दंडाला सामोरे जावे लागेल. असे होवू नये यासाठी या

 कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

यावेळी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया,क्रेडाई पुणे मेट्रोचे

 अध्यक्ष श्रीकांत परांजपे, क्रेडाई महाराष्ट्राच्या स्टेट अॅडव्हायरी

 कौन्सिलचे अध्यक्ष सुहास मर्चंट,क्रेडाई महाराष्ट्राच्या रेरा कमिटीचे

 संयोजक अखील अग्रवाल उपस्थित असणार आहेत. ही कार्यशाळा

 सर्वांसाठी खुली असणार आहे.

क्रेडाई पुणे मेट्रोच्या फेसबुक पेजचे लाईक बटन दाबल्यानंतर या कार्यशाळेचा

लाभ घेता येणे शक्य आहे. संबंधित लिंक सोबत जोडली

 आहे. https://www.facebook.com/CredaiPuneMetro

पंकजा मुंडेंनी आपले वय ,अनुभव आणि बुद्धी चे भान ठेवावे – खा. वंदना चव्हाण

पुणे : पुण्यातील विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामविकास व महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली. ही टीका तथ्यहीन असून, अत्यंत खालच्या पातळीची व अशोभनीय आहे व महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही, अशी टीका पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष, खा. वंदना चव्हाण यांनी पत्रकाद्वारे केली.
‘१९८४-८५ च्या लोकसभेत २ खासदारांपर्यंत रसातळाला गेलेल्या भाजपा सरकारच्या आजच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीची चिंता करू नये.  शरद पवार यांची राजकीय व सामाजिक उंची समजण्या इतकी त्यांची बौद्धिक उंची नसल्यामुळे हे व असे वक्तव्य त्यांच्याकडून वारंवार होत असावे.
भारतीय जनता पार्टीचे सर्वेसर्वा पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवार यांचे महत्व व देशाच्या राजकारणातील स्थान समजते, पण त्यांच्या नावावर निवडून आलेल्या पंकजा मुंडेना हे समजत नाही हे भारतीय जनता पार्टीचे दुर्दव आहे.
पंकजा मुंडेनी आपल्या वयाचे व अनुभवाचे भान ठेऊन बोलले पाहिजे. किमान आपले वडील (कै. गोपीनाथ मुंडे) यांच्या दुर्दवी मृत्यू झाल्यानंतर जी मदत शरद पवार यांनी केली याची तरी जाणीव त्यांनी मनात ठेवणे गरजेचे आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे.
चिक्की घोटाळ्यात अडकलेल्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.

पश्‍चिम महाराष्ट्रातील जनतेच्या मागण्यांबाबतचे विभागीय आयुक्तांना निवेदन सादर

0

सरकारने जनतेच्या मागण्यांची गंभीर दखल घेण्याची :  अजित पवार यांची मागणी

पुणे : राष्ट्रवादी काँगे्सच्या वतीने दिनांक 2 एप्रिल ते 12 एप्रिल या काळात घेण्यात आलेल्या हल्लाबोल-संघर्ष यात्रेद्वारे शेतकरी, सर्व सामान्य जनता, कष्टकरी यांच्या समस्या जाणून घेतल्या. या यात्रेच्या निमित्ताने गावागावात, शिवारात जावून जनतेच्या अडचणी, भावना, मागण्या समजून घेतल्या. या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी आज विधीमंडळ पक्ष नेते अजित पवार यांनी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना निवेदन सादर केले.

या निवेदनामध्ये सर्वसामान्य जनतेच्या विविध मागण्यांचा समावेश आहे. या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्याची विनंती यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, दिलीप वळसे -पाटील, शशिकांत शिंदे, हसन मुश्रीफ, विजयसिंह मोहिते-पाटील, खा. अ‍ॅड. वंदना चव्हाण,बाबुराव चांदेरे , रवींद्र माळवदकर ,धनंजय महाडीक, बबनराव शिंदे, सुमन पाटील, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, दत्ता भरणे, हणमंत डोळस, जयदेव गायकवाड, नरेंद्र पाटील, रणजीतसिंह मोहिते-पाटील, के. पी. पाटील, दीपक साळुंखे यांच्या स्वाक्षर्‍या असेलेले निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या पश्‍चिम महाराष्ट्र विरोधी भूमिकेचा निषेध करून पश्‍चिम महाराष्ट्रातील रखडलेली विकासप्रक्रिया सुरू करण्यासाठी, तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या जनतेच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाच्या वतीने दिनांक 2 एप्रिल ते 12 एप्रिल 2018 या काळात कोल्हापूर ते पुणेपर्यंत आयोजित सरकारविरोधी हल्लाबोल संघर्ष यात्रेत सहभागी जनतेच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

या निवेदनात नमूद केल्यानुसार, ‘गेल्या साडेतीन वर्षात दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीटीसारख्या संकटाने ग्रासलेल्या शेतकर्‍याला सरकारने कोणतीच मदत केली नाही. त्यातून राज्यात 15 हजार शेतकरी आत्महत्या झाल्या. कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव या दोनच शेतकर्‍यांच्या प्रमुख मागण्या होत्या. त्याही सरकार वेळीच पूर्ण करू शकलेले नाही. गारपीटीने द्राक्षे, कांदा, गहू, ज्वारी, ही पिके जवळजवळ संपूर्ण हातची गेली. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाने राज्यातील, पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकरी उद्धवस्थ झाला आहे. ऊस, सोसाबीन, तूर, कापूस, उडीद, मूग अशा कुठल्याच उत्पानांना आज भाव नाही. अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा सगळ्याच शेतकर्‍यांसमोर प्रश्‍न आहे. महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर आहे, पश्‍चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात इतकी गंभीर परिस्थिती असतानाही सरकार नावाची यंत्रणा ढिम्म बसून,असल्याचे चित्र संतापजनक आहे.

जनतेच्या अडीअडचणी समस्या सोडविणे, हे घटनात्मक कर्तव्य असतानाही संकटात सापडलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या मदतीबाबत सरकार कोणताही सकारात्मक निर्णय घेत नाहीत. या भागातील विकासप्रक्रिया गेल्या साडेतीन वर्षांत पूर्णपणे ठप्प आहे. एकूण परिस्थितीबाबत जनतेच्या भावना तीव्र असून, या भावनेची सरकारने गंभीर दखल घ्यावी, अशी आमची मागणी आहे.’

या मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात, तसेच याबाबतची घोषणा ताबडतोब करण्यात यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे.

सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर पोहोचल्या बॉलीवूडच्या मोस्ट हाइप्रोफाइल इफ्तार पार्टीला!

0

राजकीय नेते बाबा सिद्दीकी ह्यांची इफ्तार पार्टी ब़ॉलीवूड आणि पेज-थ्री सर्कलमध्ये दरवर्षी चर्चचा विषय ठरते. ह्या पार्टीचे आमंत्रण येणे हे बॉलीवूडसाठी स्टेटस सिम्बॉल असतो. फक्त सिलेक्टिव्ह सेलेब्सनाच ह्या पार्टीचे इन्व्हिटेशन मिळते. ह्या हायप्रोफाइल पार्टीचे आमंत्रण यंदा मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर ह्या दोन ए-लिस्टर्स अभिनेत्रींना मिळालं होतं.

बॉलीवूड सूत्रांनुसार, आजपर्यंत मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या कोणत्याही मोठ्या अभिनेत्रीला ह्या पार्टीचे आमंत्रण मिळाले नव्हते. सई आणि अमृताची ह्या शाही इफ्तार पार्टीच्या रेड कार्पेटवरची हजेरीच सांगून गेली की, आज त्या मराठीच नाही तर ब़ॉलीवूड सर्कलमध्ये किती लोकप्रिय आहेत.