Home Blog Page 3134

कल्याण येथून पुण्यात येऊन सोनसाखळी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले.

0

पुणे-कल्याण येथून पुण्यात येऊन सोन साखळी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. हे दोघे महिन्यातून एकदा पुण्यात येत असत. पुण्यातील औंध भागात मागील सात महिन्यांपासून या दोघांनी उच्छाद मांडला होता. महिन्यात एकदाच चोरी करून जात असल्याने पोलिसांना डोकेदुखीचा विषय ठरत होता.परंतु खडकी पोलिसांनी सापळा लावून चोरी करताना दोघांना रंगेहाथ ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.

याप्रकरणी परेश किशोर धावरी (28) आणि आकाश राजेश कंडारे (22) दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 193 ग्राम सोन्याचे 5 लाख 95 हजार 500 रुपये किमतीचे दागिने आणि ऐवज जप्त केला असल्याची माहिती परिमंडल 4 चे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिली.

ही कारवाई परिमंडळ 4 चे पोलीस उपआयुक्त दीपक साकोरे, खडकी विभाग सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस ठाण्याचे पोलीस वरिष्ठ निरीक्षक निरीक्षक लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक (क्राइम) अजित लकडे, डीबी टीम चे पोलीस सब इंस्पेक्टर निलेश महाडिक, एएसआई लक्ष्मण बंगार, पोलीस कर्मचारी हेमंत माने, तुषार शिंदे, किरण घुटे, अण्णा ठोकळ, रणधीर माने, सुरेश गेंगजे, बाबा शिर्के, अशोक शेलार, विशाल मेमाणे, गणेश लोखंडे, प्रदीप गाडे, विनायक मुधोलकर, सुभाष आढाव, किशोर दुशिंग यांनी केली.

या आरोपींकडून ९ चोरीच्या घटना उघडकीस आल्या असून, यांना पकडण्यासाठी सिसिटीव्ही चा मोठा उपयोग झाला. गस्त घालतेवेळी पोलिसांच्या लक्षात आले होते की , हे दोघे चोरी करताना नंबर नसलेल्या गाडीचा उपयोग करत होते. पोलिसांनी त्यावेळी पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु ,चकमा देऊन दोघे पळून गेले होते. ७ जून रोजी सकाळी एक महिला रस्त्याने जात असताना हे दोघे मागून आले आणि गळ्यातील मंगळसूत्र घेऊन पळून गेले. महिलेने ताबडतोब फोन वरून पोलिसांना माहिती दिली , यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेत अर्ध्या तासात घटनास्थळाच्या जवळून दोघांना ताब्यात घेतले.

दोघे जिगरी मित्र असून दोघांचे आईवडील मुंबई मनपात सफाई कामगार आहेत . एका आरोपीचा मामा खडकीत राहतो ,त्याची बाईक घेऊन तिची नंबर प्लेट बदलून हे चोरी करायचे. सात महिन्यांपासून चोरी करत होते परंतु याची कल्पना मामाला नव्हत.

लघुउद्योगांसाठी भांडवल या विषयावर देआसरा फाउंडेशनतर्फे कार्यशाळा संपन्न

0

पुणे-नव्याने व्यवसाय सुरु करायचा असेल तर भांडवल कसे उपलब्ध करायचे हा प्रश्न प्रत्येक नव व्यावसायिकांच्या समोर असतो. याच विषयावर अधिक माहिती देण्यासाठी देआसरा फाउंडेशन ने नुकतीच  कार्यशाळा आयोजित केली होती. ही कार्यशाळा मोफत होती यात एकूण ७० नवउद्योजक यासाठी उपस्थित होते. या कार्यशाळेत लघुउद्योग चालू करणाऱ्यांना कर्ज कशा पद्धतीने बँकांमधून उपलब्ध होते,त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात या बद्दलची सविस्तर माहिती या कार्यशाळेत देण्यात आली.

या वेळी मार्गदर्शन करताना देआसराचे उद्योगमित्र श्री. प्रतिक बुडगुडे म्हणाले की, “योग्य भांडवलाचा प्रकार हीच यशस्वी व्यवसायाची गुरुकिल्ली आहे. आणि याच द्वारे कोणत्याही उद्योजकाने आपल्या व्यवसायाचा प्रभावीपणे विकास कसा करायचा हे जाणून घेणे अतिशय महत्वाचे आहे.”

अनेक लघु उद्योगांसाठी वाढ ही प्राथमिकता आहे, परंतु योग्य व सुरक्षित भांडवलपुरवठा मिळणे ही आजच्या काळाची गरज आहे. तसेच या कार्यशाळेत सरकारच्या कोणत्या योजना कार्यरत आहेत, त्या योजनांचे वैशिष्ठ व त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींची माहिती देखील त्यांनी यात दिली.

त्याच बरोबर व्यवसायासाठी कर्ज किती प्रमाणात घ्यावे, कर्जाची आवश्यकता किती आहे,त्यासाठी कोणती बँक योग्य आहे,घेतलेले कर्ज कशा प्रकारे फेडावे त्याचे नियोजन कसे असले पाहिजे या विषयाची सर्व माहिती यावेळी उद्योजकांना देण्यात आली.

थायलंडमधील रॅली मालिकेत संजयला यशाचा आत्मविश्वास

0
पुणे- पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले भरगच्च मोसमात थायलंडमधील रॅली मालिकेच्या नव्या मोसमातील पहिल्या फेरीसाठी सज्ज झाला आहे. थायलंड प्री-रॅली असे या मालिकेस संबोधले जाते.
 
थायलंड-कंबोडिया सीमेपासून जवळ असलेल्या नाखॉन प्रांतात ही रॅली होत आहे. शनिवारी सकाळी रेकी आणि सायंकाळी रॅलीचा प्रारंभ, सुपर स्पेशल स्टेज आणि रविवारी स्पेशल स्टेजेस होतील. थायलंडमध्ये दाखल झालेला संजय या रॅलीत यशाच्या आत्मविश्वासाने सहभागी होत आहे.
 
यंदाच्या मोसमाचा प्रारंभ त्याने थायलंडमध्ये याच रॅलीने केला होता. फेब्रवारीत ही फेरी पार पडली. गेल्या वर्षाच्या मालिकेतील ती अखेरची फेरी होती. आता संजय नव्या मालिकेतील सलामीच्या फेरीत भाग घेईल. इसुझू कारटेक डेलो 
संघाने सुसज्ज केलेली इसुझु डी-मॅक्स कार संजय चालवेल. थायलंडचा मिनील थान्याफात त्याचा नॅव्हीगेटर असेल. गेल्या वर्षाच्या अखेरीस संजने कंबोडियातील पहिल्यावहिल्या खमेर रॅली रेडमध्ये उपविजेतेपद मिळविले होते. आशिया क्रॉस कंट्री रॅलीत पाच वेळा विजेतेपद मिळविलेल्या नाथ्थाफोन आंग्रीथानोनन याने ही रॅली जिंकली होती. त्यानंतर त्याने यंदाच्या मोसमाचा प्रारंभ करताना गिअर बिघडूनही रॅली पूर्ण करताना एकूण क्रमवारीत तिसरा क्रमांक मिळविला होता.
 
अलिकडेच झालेल्या या दोन रॅलींमधील कामगिरीमुळे संजयचा आत्मविश्वास उंचावला आहे. याशिवाय त्याने लॅट्विया आणि इस्टोनिया येथील आव्हानात्मक रॅली यशस्वीरित्या पूर्ण केल्या. संजयने जागतिक रॅली मालिकेच्या (डब्ल्यूआरसी) जोडीला डकार रॅलीचेही लक्ष्य ठेवले आहे. याविषयी संजय म्हणाला की, थायलंडमध्ये युटिलीटी कार चालविणे डकारच्या पूर्वतयारीसाठी आवश्यक आहे.
मोसमाच्या प्रारंभी हायड्रॉलीक क्लच पंप बिघडल्यानंतरही संजयने तीन स्टेज एकाच गिअरमध्ये चालवित रॅली पूर्ण केली. 38 किलोमीटर अंतर त्याने केवळ दुसऱ्या गिअरवर चावविले, पण त्याने रॅली पूर्ण केल्यामुळे थान्याफातला नॅव्हीगेटरच्या राष्ट्रीय क्रमवारीत यश मिळाले.
 
मागील वर्षी संजयला कारच्या तांत्रिक बिघाडामुळे दोन फेऱ्या पूर्ण करता आल्या नव्हत्या, पण खमेर रॅली रेड आणि मोसमाच्या प्रारंभी दोन रॅली त्याच्यासाठी उत्कंठावर्धक ठरल्या.
 
संजयने सांगितले की, विचाई वात्ताहाविशुथ हे संघाचे तांत्रिक प्रमुख आहेत. ते व त्यांचे सहकारी मला सुसज्ज कार मिळावी म्हणून बरीच मेहनत घेतात. 
 
संजयचे आता थान्याफात याच्याशी चांगले ट्युनिंग जमले आहे. तो म्हणाला की, आता आमच्यात चांगला समन्वय निर्माण झाला आहे. थायलंडचे नागरीक शांत आणि नम्र स्वभावाचे असतात.

जळगाव घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीची पुण्यात निदर्शने

0

पुणे- शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ जळगाव येथे
घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली .जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना यावेळी निवेदन देण्यात आले .
जळगाव जिल्हातील जामनेर तालुक्यातील वाकडी गावात विहिरीत आंघोळ केल्याने पाणी विटाळले म्हणून मातंग
समाजातील दोन तरुणांना विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात वाकडी
गावात घडलेली हि घटना अत्यंत संतापजनक आहे.
उना, राजकोट नंतर आता महाराष्ट्रामध्ये देखील दलितांवरील अत्याचार करण्याचे प्रकार वाढलेले आहेत. भाजप शासित
अनेक राज्यांमध्ये अशा घटना मोठ्याप्रमाणात घडताना दिसतात. परंतु सरकार अशा घटना रोखण्यास कोणतेही पाउल
उचलताना दिसत नाही. अश्याप्रकारे निर्दयी मारहाण करणाऱ्यांना व जातीयवादी प्रवृत्तींना सरकार पाठीशी घालत
असल्याचे दिसत आहे.
अशा सरकारचा तीव्र निषेध करण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी यांच्याकडे शहराध्यक्षा वंदना चव्हाण
यांच्यासमवेत आ. जयदेवराव गायकवाड, चेतन तुपे, प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर, अशोक राठी, भैया
जाधव, पंडित कांबळे, मनाली भिलारे, राकेश कामठे, प्रदीप देशमुख, ऋषी परदेशी, शशिकांत तापकीर, भोलासिंग
अरोरा, स्वप्नील खडके इ. उपस्थित होते .

शाळांमधील विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पेढा देउन स्वागत

0

पुणे-शाळेचा पहिला दिवस समता सामाजिक संस्थेच्यावतीने पुणे लष्कर भागातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचे स्वागत प्रसिध्द नटश्रेष्ठ व मी महात्मा फुले बोलतोय या नाटकाचे नाटककार कुमार आहेर यांच्याहस्ते गुलाबपुष्प व पेढा देउन करण्यात आले . या कार्यक्रमाचे आयोजन समता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले , अभिषेक भोसले , अनिकेत भोसले , अक्षद भोसले , राजू बेलापूरकर , महामूद खान आदींनी केले होते . शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांचे स्वागत अनोख्या पद्धतीने झाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला . अशी माहिती विजय भोसले यांनी दिली .

डीईएसमधील शाळांमध्ये पहिला दिवस उत्साहात

0

पुणे -डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांमध्ये शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. न्यायमूर्ती रानडे बालक मंदिरात शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागताची विशेष तयारी करण्यात आली होती. सनईचे सूर, रांगोळी, ङ्गुग्यांची सजावट आणि स्वागतासाठी छोटा भीम, डोरोमॉन उपस्थित होते. अहिल्यादेवी शाळेत पाटीपूजनाचा कार्यक‘म करण्यात आला.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत पहिल्याच्या विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात साहित्यिक ग. दी. माडगूळकर यांचे स्मारक व्हावे या मागणीसाठी तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी केली होती. न्यू इंग्लिश स्कूल रमणबागमध्ये पारंपरिक पध्दतीने पाटी पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. वाचन संस्कृतीचे महत्व सांगणारी नाटीका सादर करण्यात आली.
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक लोकमान्य टिळक, समाजसुधारक आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, शाहू महाराज, महादेव बल्लाळ नामजोशी आदींच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला. मा. स. गोळवलकर प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. पर्यावरण रक्षणाचा संदेश, प्रबोधनपर गाणी आणि कथा सांगण्यात आल्या.
डीईस प्री प्रायमरी, प्रायमरी, सेकंडरी स्कूल मातृमंदीर या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत औक्षण करून करण्यात आले. पपेट शो, नृत्य, गाणी, गोष्टी, बैठ्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. सेकंडरी शाळेतील विद्याथ्यांनी या वर्षी दोन ई सायकली तयार करण्याचा निर्धार केला. पर्यावरण राखण्यासाठी या वर्षी सवोतोपरी प्रचार व प्रसार करण्याचा निर्धार करण्यात आला.

महापौर मुक्ता टिळकांनी घेतला मुलींचा पहिला तास

0
पुणे- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १९८० मध्ये स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आज ८१ वर्षांनंतर पुन्हा सह-शिक्षणास प्रारंभ झाला आणि नवीन प्रवेश घेतलेल्या मुलींचा शाळेच्या पहिल्या दिवशी पहिला तास पुण्याच्या महापौर आणि टिळक घराण्याच्या सूनबाई मुक्ता टिळक यांनी घेतला.
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये १९३६ पर्यंत विद्यार्थिनींना प्रवेश दिल्याच्या नोंदी आढळतात. त्यानंतर ८१ वर्षे या शाळेत ङ्गक्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थिनींना प्रवेश देऊन सह-शिक्षण सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनाने घेतला. या ऐतिहासिक घटनेच्या तुम्ही सार्‍या जणी घटक आहात,  झाशीची राणी लक्ष्मीबाईप्रमाणे पराक‘मी व्हा, अशा शब्दात महापौरांनी विद्यार्थिनींचे स्वागत केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, संचालक सुनील भंडगे, मु‘याध्यापक नागेश मोने यांची प्रमुख उपस्थित होती.
लोकमान्य टिळक, समाजसुधारक आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, महादेव बल्लाळ नामजोशी या धुरीणांनी १८८० मध्ये नाना वाड्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात वर्गात बेंच नव्हते. मुलांना जमिनीवर बसावे लागायचे. ही जमीन खडबडीत व खड्डेयुक्त होती. शाळा सुरू व्हायच्या आधल्या दिवशी लोकमान्यांनी  वर्गाची स्थिती पाहिली. मुलांची गैरसोय व्हायला नको म्हणून स्वतः खड्डे बुजवून जमीन शेणाने सारवून घेतली. ही आठवण सांगून या धुरीणांची दूरदृष्टी आणि त्यांनी घेतलेल्या अपार कष्टांमुळेच आज हे शैक्षणिक वैभव पाहायला मिळत आहे, असे मत महापौर टिळक यांनी व्यक्त केले.
राम गणेश गडकरी, केशवसूत, बाळासाहेब खेर, ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, गोपिनाथ तळवलकर असे प्रतिभावंत विद्यार्थी घडविणार्‍या या शाळेत पालकांची मागणी लक्षात घेऊन यावर्षीपासून विद्यार्थिनींना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी इयत्ता पाचवीत ३० विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला असून ही सं‘या शंभरपर्यंत वाढू शकते असा विश्‍वास अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी व्यक्त केला.
तारांगण, वेधशाळा, भूगर्भशास्त्र संग‘हालय, सर्जन मंचाद्वारे चित्रकला, शिल्पकला व ओरिगामी प्रशिक्षण, इंग‘जी प्रयोगशाळा, सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अहंम भारत, समाजसेवा शिबिरे, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन असे वैशिष्ट्यपूर्ण उपक‘म शाळेत राबविले जातात अशी माहिती मु‘याध्यापक नागेश मोने यांनी दिली.

पुणे महापालिका १९ कामगारांना देणार डच्चू ?

0

पुणे- शेकडो कोटीची टेंडर्स ,हजारो कोटीचा व्यवहार ,मेट्रो आणि  स्मार्ट सिटी कडे वाटचाल करणाऱ्या महापालिकेत गरीबाचा पैसा खातोय का कोणी ? असा सवाल स्थायी समितीच्या तरुण तडफदार अध्यक्षांना विचारण्याची वेळ आली आहे. कारण त्यांच्या कार्यालयापासून सर्व पदाधिकाऱ्यांची  कार्यालये आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी राबणाऱ्या १९ तथाकथित म्हणजे दुर्दैवाने अनधिकृत ठरणाऱ्या कामगारांना गेली 5 महिने पगार दिलेला नाही . आता १५ जून पर्यंत चा त्यांचा पगार (इकडून तिकडून) देवून त्यांना डच्चू देण्याचा घाट पालिकेत घातला जातोय .बरे पगार किती तर, कामगारांच्या मते दरमहा 6 ते 7 हजार आणि प्रशासनाच्या मते १० ते 11 हजार रुपये दरमहा .. हजारो कोटींचा ताळमेळ घालत शहराला सुंदरतेची स्वप्न दाखविणाऱ्या महापालिकेने अगदी खालच्या श्रेणीतील कामगारांचा अशी पिळवणूक का बरे करावी ? असा प्रश्न कोणाला पडत नाही, हे दुदैव आहे .
प्रकरण असे आहे ,कि , महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयांतर्गत ‘हे’ सर्व सुमारे १९ कामगार अर्थात बिगारी, काम करतात . सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेसहा  पर्यंत हे हाथ राबत असतात . यांची हजेरी नगरसचिव कार्यालय ठेवते .त्यांच्या कामावरही हेच कार्यालय नियंत्रण ठेवते .
महापालिकेच्या तिजोरीतील हजारो कोटीचा व्यवहार पाहणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षांचे कार्यालय ,  स्थायी समितीचे सभागृह एवढेच नव्हे तर अन्य पदाधिकाऱ्यांची कार्यालये ,मुख्य सभा चालते ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचे सभागृह या सर्वांची साफसफाई हे कामगार करतात . बरे हे कामगार येथे कशा पद्धतीने कामावर घेतलेत … यावर माहिती घेतली तर हे ठेकेदारी पद्धतीने आल्याचे सांगितले जाते . ठेकेदाराचे नाव मात्र कोणी सांगत नाही .
अधिक खोलात गेल्यावर सांगण्यात येते  कि पूर्वी घनकचरा विभागाने टेंडर काढून हे कामगार घेतलेत . पण पुढे नगरसचिव कार्यालयातील सफाई-बिगारी कामगार भरतीचे  टेंडर घनकचरा विभागाने का काढावे ? नगरसचिव विभागानेच का काढू नये ? असा सवाल तत्कालीन अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी उपस्थित केला . दरम्यान मागे(तत्पूर्वी ) काढलेल्या टेंडरची मुदत हि संपली . पण कामावर मात्र त्यांना आहे तसेच ठेवण्यात आले आणि नंतर जानेवारी पासून या सर्व कामगारांचे पगार थांबले.
या प्रकाराकडे ना कोणत्या कामगार संघटनेने लक्ष दिले, ना कोणत्या कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्याने लक्ष दिले .महापालिकेत कोणते कामगार कायदे कसे पायदळी तुडवून गरीबाचा पैसा कसा कोणी खातोय काय  ? कोण गरिबांच्या असहाय्यतेचा कसा कोणी फायदा घेतोय काय  ? याकडे राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या कामगार आयुक्तांनी कधी ढुंकूनही लक्ष दिलेले  नाही .
पण किमान जे कर्मचारी अवघ्या ६ ते १० हजाराच्या मासिक वेतनात  आपल्या कार्यालयाची परिसराची स्वच्छता ठेवतात त्यांना आपण सर्व कामगार कायदे पाळून रीतसर पद्धतीने कामावर घेतलेले आहे काय ?त्यांना दरमहा किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देतो काय  अशा साध्या साध्या प्रश्नांवर स्थायी समिती अध्यक्षांनी दुर्लक्ष केले तर ते  कोणालाही योग्य वाटणार नाही  .
याबाबत नगरसचिव कार्यालय त्यांची रीतसर हजेरी ठेवून  घनकचरा विभागाकडे पाठविण्याचे काम करते  ,तर घनकचरा विभागाच्या भूमिकेनुसार , हा नगरसचिव विभागाचा प्रश्न आहे .पण तरीही त्यावर एक बैठक एकत्रित   झाली  आणि आता त्यांना १५ जून पर्यंतचा पगार देण्याचे ठरले .हा पगार कोठून  कसा देणार याबाबत मार्ग काढला जाईल .त्यानंतर त्यांच्या जागेवर अन्य विभागातले कर्मचारी नेमण्यात येतील .म्हणजे हे कर्मचारी या पुढे सेवेतून काढून टाकण्यात येतील असे निर्देश घनकचरा विभागाकडून देण्यात येत आहेत .
‘माय मराठी’ ने महापालिकेतील विविध खात्यातील कामगारांचा आढावा घेवून 2 बोगस कामगार रंगे हाथ पकडून देवून अशा  ७२ स्मार्ट कामगारांची यादी जाहीर केली होती . कामगारांना रीतसर कामावर घ्या आणि काम करवून घ्या , आणि कायद्यानुसार वेतन आणि अन्य संरक्षण द्या अशा बाबींकडे तत्कालीन अधिकारी,पदाधिकारी यांचे लक्ष वेधले होते . अशा तरुणांवर बोगस कामगारांचा शिक्का   ठेवून महापालिकेतील कोणती आसामी या गरीबांचा पैसा खातो आहे हे शोधून काढण्याची जबाबदारी कोणाची आहे ? आहे त्या कामगारांचे व्यवस्थापन कायम ठेवून फक्त कागदोपत्री म्होरक्या (बिनकामाचा निव्वळ पैशाचा अधिकार असणारा ठेकेदार ) देणारी  टेंडर पद्धती हि दुसरीकडे राबविण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती उजेडात येते आहे .
एकंदरीत तरुणाईच्या असहाय्यतेचा गरिबीचा आणि गरजेचा फायदा घेवून महापालिकेत त्यांना राबवून घेवून त्यांचा पैसा खाणारी ‘बडी आसामी ‘ कोण आहे ?त्याचा पर्दाफाश नव्या दमाचे नवे स्थायी समिती अध्यक्ष करतील काय ? .त्याच बरोबर पालिकेत होणारी कामगार भरती आणि त्यांचा पुढील व्यवहार हे सर्व कामगार कायदे पाळूनच होतील अशी दक्षताही त्यांनी घ्यावी अशीही अपेक्षा आता  त्यांच्याकडून करण्यात येते आहे .

फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि त्यांचे सीएसआर भागीदार मुकूल माधव फाऊंडेशनकडून ५० शौचालयांचे बांधकाम पूर्ण

0

मुंबई-ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाण्याच्या प्रवृत्तीला पायबंद आणि स्वच्छतेला चालना देण्याचा भाग म्हणून फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. आणि त्यांचे सामाजिक दायीत्व उपक्रम (सीएसआर) भागीदार मुकूल माधव फाऊंडेशन (एमएमएफ) यांनी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील सोनाले या आदिवासी क्षेत्रात ५० व्यक्तिगत शौचालये सौर ऊर्जेवर आधारीत दिव्यांसह बांधून दिले आहेत. ही शौचालये व्यक्तिगत वापरासाठी आणि लाभार्थी व्यक्तीच्या नामफलकासह तयार करण्यात आली आहेत. शिवाय चांगल्या स्वच्छतेच्या चांगल्या सवयी बाणवल्या जाव्यात म्हणून प्रत्येक लाभार्थीस एक मग आणि एक बादलीदेखील दिली गेली आहे. दुसऱ्या टप्प्यात मुकूल माधव फाऊंडेशनने पुणेस्थित झेएफ स्टीअरिंग गीअर कंपनीला आणखी ५० शौचालयांच्या बांधणीसाठी योगदान देण्याला प्रोत्साहित केले आहे. झेडएफ गीअरबरोबरीनेच, हिंदुजा समूह देखील या प्रकल्पाला पाठबळाला पुढे आला असून, तिसऱ्या टप्प्यात २३ शौचालये आणि या परिसरातील जलसाठ्याच्या संवर्धनाच्या प्रकल्पालाही मदत केली जाणार आहे. ज्यामध्ये गाळ उपसा, फिल्टरिंग, विंधण विहिरी तयार करणे आणि विद्यमान विहिरी व बांधांची दुरुस्ती करणे अशा कामांचा समावेश आहे.

मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितु छाब्रिया म्हणाल्या, “स्वच्छता आणि सफाईच्या योग्य सुविधा रोग पसरविण्यास प्रतिबंध करण्यासह निरोगी कुटुंब आणि सुदृढ समाजाची खात्री देतात. आम्ही एमएमएफ / फिनोलेक्समध्ये नेहमी स्वच्छतेच्या उपक्रमांमध्ये आघाडीवर राहिलो आहोत आणि केएसडब्ल्यूएच्या सहकार्याने उघड्यावर शौचाच्या सवयीचे धोके समजावून देताना अधिक सक्रिय भूमिका आम्ही बजावू इच्छितो. आम्ही या उपक्रमाद्वारे सबंध समाजाला एक मजबूत संदेश पाठवू इच्छितो.”

“समविचारी कॉर्पोरेट कंपन्यांना या प्रकल्पासाठी एकत्र आणून फिन्लेक्स आणि एमएमएफने प्रकल्पाची व्याप्ती वाढविली आहे, ज्यामुळे मोठ्या लाभार्थींच्या गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतील,” असे पुस्तीही छाब्रिया यांनी जोडली.

“या उत्कृष्ठ उपक्रमाचा आम्हीही एक भाग बनलो हे खूप आनंददायी आहे,” असे झेडएफ स्टीअरिंग गीअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी उत्कर्ष मुनोत यांनी नमूद केले.

मुकुल माधव फाऊंडेशन द्वारे सुरू करण्यात आलेला हा एक चांगली उपक्रम लाभार्थींना समाजाचे ऋण फेडण्याचे प्रोत्साहन आणि शिक्षण देत आहे. एक प्रतिकात्मक रक्कम प्रत्येकी २००० रुपये संकलित केले जात आहेत आणि भारत सरकारच्या सैनिक कल्याण निधीकडे पाठविले जात आहेत, (नोंदणी क्रमांक. 453 / 2014-15 / 956 www.mahasainik.com) जो सैनिकांच्या विधवांच्या आणि मुलांच्या कल्याणासाठी वापरात येतील.

मुंबईपासून ११५ किमी दूर अंतरावर स्थित, पालघर जिल्ह्यात आदिवासींची मोठी लोकसंख्या आहे. जरी हा जिल्हा ठाणे आणि मुंबईच्या अगदी जवळ असला, तरीही जिल्ह्यातील काही गावे मूलभूत सुविधांच्या अभावी अत्यंत अविकसित आहेत. म्हणून, फिनोलेक्स आणि एमएमएफने स्वच्छता आणि पाण्याशी संबंधित कल्याणकारी योजनांमधील अभावग्रस्ततेचे अंतर कमी करण्याचा निर्णय घेऊन येथे हा प्रकल्प सुरू केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी प्रदीप गारटकर

0

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 2018 ते 2020 या कालावधीसाठी महाराष्ट्रातील 24 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर आहेत. यामध्ये पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रदीप गारटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या विविध जिल्हाध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत निवडणूक होऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली. उर्वरित जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

निवडण्यात आलेल्या नवनियुक्‍त जिल्हाध्यक्षांची नावे आणि त्यापुढील कंसात जिल्हयाचे नाव नमुद करण्यात आले आहे. बाबाजी गोपाळराव जाधव (रत्नागिरी), प्रमोद घोसाळकर (रायगड), अनंत लक्ष्मण सुतार (नवी मुंबई), प्रकाश शंकर दुबोले (मिरा भाईंदर), सुनिल भुसारा (पालघर), प्रदीप गारटकर (पुणे ग्रामीण), सुनिल गुलाबराव माने (सातारा), विलासराव शिंदे (सांगली ग्रामीण), दिपक (आबा) साळुंके पाटील (सोलापूर ग्रामीण), मनोज दादासाहेब मोरे (धुळे शहर), किरण एकनाथ शिंदे (धुळे ग्रामीण), राजेंद्र गावीत (नंदुरबार), डॉ. निसार अहमद देशमुख (जालना), आमदार राणा जगजितसिंह पाटील (उस्मानाबाद), मकरंद भालचंद्र सावे (लातूर शहर), बाबासाहेब पाटील (लातूर ग्रामीण), अ‍ॅड. नाझीर हुसेन काझी (बुलढाणा), राजकुमार दिपचंद मुलचंदानी (अकोला शहर), राजेंद्र महल्‍ले (अमरावती शहर), सुनिल वर्‍हाडे (अमरावती ग्रामीण), सुनिल राऊत (वर्धा), अनिल अहिरकर (नागपूर शहर), नाना पंचबुध्दे (भंडारा) आणि पंचम बिसेन (गोंदिया).

बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्सने बनवली युलिप अधिक मजबूत गुंतवणूक

ग्राहकांसाठी विमा योजनेची परिपक्वता रक्कम वाढवण्यासाठी दोन अभिनव वैशिष्ट्ये लाँच

  • पहिल्यांदाच अशा प्रकारची वैशिष्ट्ये – रिटर्न ऑफ मोर्टलिटी चार्जेस (आरओएमसी) आणि रिटर्न एन्हान्सर
  • कंपनी लाँच करणार असलेल्या युलिपसाठी पार्श्वभूमी

 पुणे– बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही भारतातील आघाडीची खासगी जीवन विमा कंपनी या क्षेत्रातील युलिपची समीकरणे बदलवण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने युलिपमध्ये नुकतीच दोन नवी वैशिष्ट्ये लाँच केली आहेत, ज्यात ग्राहकांसाटी विमा योजनेची परिपक्वता रक्कम (मॅच्युरिटी कॉर्पस) लक्षणीय प्रमाणात वाढणार आहे. ही वैशिष्ट्ये कंपनीच्या ग्राहकांना कंपनीची उत्पादने निवडल्यानंतर त्यांच्या जीवनातील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सक्षमता प्रदान करण्याच्या तत्वाशी सुसंगत आहेत.

 रिटर्न ऑफ मोर्टलिटी चार्जेस (आरओएमसी) आणि रिटर्न एन्हान्सर – ही कंपनीने लाँच केलेली महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. कंपनीने ही वैशिष्ट्ये पहिल्यांदा बजाज अलियान्झ लाइफ गोल अश्युअरसोबत लाँच केली आणि त्यांना बजाज अलियान्झ लाइफ गोल बेस्ड सेव्हिंग्जमध्ये परत आणली आहेत. दोन्ही युलिप्स त्यांच्या स्वतःच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांसह लाँच करण्यात आली आहेत व त्याचबरोबर ग्राहकांना त्यांच्या जीवनध्येयासाठी सोप्या व प्रभावी मार्गाने गुंतवणूक करण्यासाठी सक्षम करतील अशा प्रकारे तयार करण्यात आली आहेत.

 नवे उत्पादन आणि युलिपच्या अभिनव वैशिष्ट्यांविषयी मीडियाला उद्देशून बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण चौघ म्हणाले, एक कंपनी या नात्याने आम्ही ग्राहकांसाठी त्यांचे जीवन ध्येय मिळवून देणारे बनण्यासाठी आमचे स्वरूप बदलवत आहोत. आमच्याकडे मजबूत आणि सातत्यपूर्ण फंड कामगिरीचा इतिहास आहे आणि ग्राहकांपर्यंत त्यांचा फायदा पोहोचवण्यासाठी आमच्या युलिपची पुनर्रचना करणे व त्यात नाविन्य आणणे महत्त्वाचे होते. आरओएमसी आणि रिटर्न एनहान्सरसारखी वैशिष्ट्ये या क्षेत्रात पहिल्यांदाच लाँच केल्यानंतर आमचे युलिप अधिक आकर्षक आणि ग्राहकांसाठी मजबूत मूल्य देणारे झाले आहे. विशिषअट निधी उभारण्याचे आणि इक्विटी बाजारपेठेद्वारे जीवन ध्येय साकारण्याचे लक्ष्य ठेवणाऱ्यांसाठी हे उत्पादन सर्वोत्तम आहे.

रिटर्न ऑफ मोर्टेलिटी चार्जेस – स्पष्टीकरण

जीवन विमा कंत्राटाचे मुख्य उद्दिष्ट हे लवकर मृत्यू पावण्याच्या जोखीमेविरोधात सुरक्षाकवच पुरवणे हे असते. म्हणूनच जीवन विमा कंपनी या नात्याने वेगवेगळ्या जोखमींचे उदा. जीवन सुरक्षा किंवा मृत्यूचे व्यवस्थापन करतो. प्रत्येक जीवन विमा कंपनीसाठी मृत्यूविरोधात सुरक्षा कवच पुरवण्यासाठी एक किंमत सहन करावी लागते. थोडक्यात सांगायचे, तर मोर्टेलिटी चार्जेस म्हणजे ग्राहकाने जीवन विमा कंपनीच्या पहिल्या सेवेसाठी अर्थात जीवन सुरक्षा कवच पुरवण्यासाठी दिलेली रक्कम. युलिपमध्ये अशाप्रकारच्या जीवन सुरक्षा कवचाला मोर्टेलिटी चार्ज म्हटले जाते आणि आणि पॉलिसी टर्ममधून ते वजा केले जाते.

 

मोर्टेलिटी चार्ज विमाधारकाचे वय, लिंग आणि जोखमीसाठीच्या किंमतीवरून काढले जाते. जीवन सुरक्षा कवच शुल्क परत देणारी पहिली जीवन विमा कंपनी या नात्याने बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स ही रक्कम ग्राहकाच्या परिपक्वता रकमेमध्ये जोडेल तसेच त्यांना विमा योजनेत गुंतवणूक कायम ठेवण्यास प्रोत्साहन देईल, कारण ही रक्कम योजना परिपक्व झाल्यानंतर त्यांना मिळेल.

 

बजाज अलियान्झ लाइफ ही देशातील पहिली जीवन विमा कंपनी आहे, जी जीवन सुरक्षा कवच पुरवण्यासाठी वजा करण्या आलेली रक्कम परत देते. हे वैशिष्ट्य या क्षेत्रातील युलिप्सचा मापदंड उंचावेल आणि ग्राहकासाठी युलिप अधिक आकर्षक व किफायतशीर बनवेल.

सरप्राईज पाहून पुष्करचे अश्रू झाले अनावर…

या विकेंडला बिगबॉसच्या घरात रंगलेल्या नाट्यात पुष्करचा गट विजयी
ठरल्याने त्याला येत्या आठवड्यात चांगलंच सप्राईज मिळणार असल्याचं या
शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनी म्हटलं होतं. आठवडा सुरू झाला… आणि
एकापाठोपाठ एक सगळ्याच स्पर्धकांसाठी सप्राईजेसची रांग लागली…. पुष्कर
मात्र आपल्या सप्राईजची वाट बघत असताना अखेर त्याची पत्नी जास्मिन या
घरात शिरली आणि पुष्करचा चेहरा खुलला… फेलिशा (पुष्करची मुलगी) च्या
आयुष्यातले काही महत्त्वाचे क्षण बिग बॉसमुळे पुष्करच्या हातातून निसटले
असले तरी याची भरपाई आपण तिघांनीही करण्याचं आश्वासन यावेळी
जास्मिनने पुष्करला दिलं त्याशिवाय आई, ती आणि फेलिशा अशा तिघींनाही
पुष्करचा अभिमान असल्याचं तिने म्हटलं आहे.
फेलिशा खूप लहान असल्याने तिला बिग बॉसच्या घरात आणण्याची परवानगी
नसल्याचं म्हणत जास्मिनने काही वेळासाठी ती गोष्ट टाळली तर काही
क्षणांतच फेलिशाच्या बिग बॉसच्या घरातील प्रवाशाने पुष्करचा पहिला फादर्स डे
अगदी धमाल साजरा झाला. आपल्या चार महिन्यांच्या चिमुरडीला सोडून बिग
बॉसच्या घरात शिरलेला पुष्कर आपल्या छकुलीला दोन महिन्यांतर पाहून
अतिशय भावूक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. तर नावांतच आनंद
दडलेल्या फेलिशाच्या प्रवेशाने बिग बॉसचं घर खऱ्या अर्थी आनंदून गेलं.
स्त्री दाक्षिण्याचं सतत समर्थन करण्यासाठी महेश मांजरेकरांकडून कौतुक होत
असलेला पुष्कर, जास्मिन-फेलिशाच्या येण्याने भलताच आनंदला आहे. हा आनंद
पुष्करला बिग बॉसच्या पुढील प्रवासात किती बळ देतो… हे पाहणं औत्सुक्याचं
ठरणार आहे.

मालिकेसाठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड शिकली घोडेस्वारी आणि तलवारबाजी

0

 

झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ हि मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील संभाजी महाराज आणि इतर महत्वाच्या पात्रांसोबतच येसूबाईंचे पात्रं देखील अतिशय प्रभावी आणि लोकप्रिय ठरले. या मालिकेत येसूबाईंचे पात्र हे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारत आहे. मालिकेच्या चित्रीकरणासाठी प्राजक्ताने घोडेस्वारीचं आणि तालवारबाजीचं प्रशिक्षण घेतलं. चित्रीकरणाच्या १५ दिवस आधी प्राजक्ताला घोडेस्वारीचं योग्य प्रशिक्षण देण्यात आलं, तसेच प्राजक्ता तिच्या लूकटेस्टनंतर जेव्हा पुण्याला गेली तेव्हा तिने जवळपास ८ दिवसातच तालवारबाजीचं प्रशिक्षण घेतलं.

तिच्या या अनुभवाबद्दल बोलताना ती म्हणाली, “जसं की सर्वांना माहिती आहे की मी साकारत असलेलं येसूबाईंचं पात्र हे घोडेस्वारी आणि तलवारबाजी मध्ये तरबेज आहे, येसूबाईंना या कला फक्त अवगतच नव्हत्या तर त्या त्याच्यात तल्लख होत्या. त्यामुळे माझ्यावर या कला उत्तमप्रकारे छोट्या पडद्यावर साकारण्याची मोठी जबाबदारी होती. तशी मी प्राण्यांना खूप घाबरायचे आणि माझी मालिकेत एन्ट्रीच घोड्यावरून होती. पहिल्या दिवशी जेव्हा मी ट्रेनिंगसाठी गेले तेव्हा मी घोड्याला हात लावायलासुद्धा घाबरत होते कारण ते सर्व घोडे खूप उंच होते पण हळू हळू मी शिकत गेले आणि पहिल्याच सिनमध्ये मी घोडा पळवला. हे घोडे प्रशिक्षित असतात त्यामुळे त्यांना कुठून कुठपर्यंत जायचंय हे माहिती असतं पण इकडे मोकळी जागा दिसल्यावर ते पळत सुटतात अख्क युनिट त्या घोडयांना थांबवण्यासाठी फिल्डिंग लावून असायचं. तसेच एका सिनमध्ये शंभूराजे आणि येसूबाई रपेटीला आलेले असतात येसूबाई शंभू राजांवर रुसतात आणि त्यामुळे त्या भर वेगाने घोड्यावरून पुढे निघून जातात. त्यावेळी माझ्या घोड्याने आऊट ऑफ द फ्रेम जाऊन त्या संपूर्ण जागेची चक्कर मारली. माझ्या लूकटेस्ट नंतर मी अवघ्या ८ दिवसात तालवारबाजीचे सर्व पैलू शिकले. येसूबाईंचे तलवारबाजी करतानाचे हावभाव, बॉडी लॅंग्वेज हे सर्व हळूहळू शिकत गेले. तलवारबाजी करताना देखील खूप छोट्या छोट्या दुखापती होतात पण संपूर्ण युनिट आमची काळजी घेण्यासाठी तत्पर असतं आणि टेक ओके झाल्यानंतर आम्हाला त्या गोष्टीचा खूप हेवा वाटतो की काहीतरी छान सिन पाहायला मिळणार.”

थुकरट वाडीतील पोस्टमन काकांचा बाहुला

0

व्हॉटसअॅप आणि इमेलच्या जमान्यात पत्र खूप मागे पडलं असलं तरीही पत्रव्यवहाराची जादू काही औरच असते आणि पोस्टमनच्या येण्याचं आजही तितकंच अप्रूप वाटतं. एक पोस्टमन तर टीव्हीच्या पडद्यावरुन आज घराघरांत पोहोचलाय आणि तो आपला वाटणारा पोस्टमन काका म्हणजे झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ मधील विनोदवीर, अभिनेता सागर कारंडे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील पोस्टमन काकांची पत्रं नेहमीच बरंच काही सांगून जातात. कधी कधी चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात अश्रू आणत ही पत्रं अनेक सामाजिक संदेश देऊन जातात. अलीकडेच थुकरट वाडीतील पोस्टमन काका म्हणजे अभिनेता सागर कारंडेने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असता अनेक चाहत्यांनी तो लाईक केला. त्या फोटोतील पोस्टमन काकांचा हा बाहुला त्याला नक्की दिला कोणी असावा असा प्रश्न अनेकांना पडला. तर एका चाहत्यानंच सागरला हा बाहुला भेट म्हणून दिला. आपल्या आवडत्या भूमिकेमुळे हा बाहुला सागरलाही खूप आवडला.

पूर्वी घराघरात सगळे जण पोस्टमन काकांची वाट पाहायचे. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात पत्रं इतिहासजमा झाली आहेत. त्यामुळे लहानपणी घरी येणाऱ्या पोस्टमन काकांची जागा आता व्हॉट्सअॅप, फेसबुकनं घेतली आहे. ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून सागर कारंडेनं साकारलेल्या पोस्टमन काकांमुळे पुन्हा एकदा पोस्टमन काका घरोघरी पोहोचले. त्याची पोस्टमन काकांची भूमिका लोकप्रिय झाली आहे. अलीकडेच एका चाहत्याने पोस्टमन काकांचा हा खास बाहुला त्याला भेट म्हणून दिला. सागर त्याबद्दल म्हणाला की, ‘गेल्या आठवड्यात चित्रीकरण सुरू असताना मला हा बाहुला मिळाला. माझ्या एका चाहत्यानं खास माझ्यासाठी हा बाहुला दुकानातून विकत घेतला. पोस्टमन काकांची ही भूमिका माझ्या फार जवळची आहे. आपल्या भूमिकेचा बाहुला आज बाजारात मिळतोय हे बघून आनंद झाला. तो बाहुला बाजारात पाहून आज लोकांना माझी आठवण येतेय ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पोस्टमन काकांचा हा बाहुला मला आजपर्यंत मिळालेलं खास गिफ्ट आहे’, असं तो आवर्जून सांगतो.

संगीत सम्राट पर्व २ पसरवणार सुरांची जादू

0

झी युवावरील ‘संगीत सम्राट’ या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचे प्रेम लाभले आणि त्यांच्या उदंड प्रतिसादानेच झी युवा संगीत सम्राट पर्व २ प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. नवे पर्व अधिक रंजक बनवण्यासाठी या कार्यक्रमाच्या रूपरेषेत काही बदल करण्यात आले आहेत त्यामुळे हे पर्व एका वेगळ्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. संगीत सम्राट पर्व दुसरे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. या पर्वामधील एक प्रमुख रंजक बदल म्हणजे या वेळी स्पर्धक हे काही टीम्सचा भाग असणार आहेत आणि या टीम्सचे कॅप्टन्स असणार आहे. कॅप्टन म्हणजे दुसरे कोणी नसून स्पर्धकांचे मार्गदर्शकच असणार आहेत आणि ते या स्पर्धकांना स्पर्धेसाठी अधिक सक्षम बनवण्यासाठी मदत करणार आहेत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऑडिशन, स्पर्धकांची निवड आणि त्यांचं टीम मध्ये केलेलं सिलेक्शन या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. कॅप्टन्सना त्यांच्या टीममध्ये स्पर्धक निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. कार्यक्रमाची नवीन रूपरेषा हे या पर्वाचे मुख्य आकर्षण आहे. शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यात पारंगत असलेले लोकप्रिय गायक राहुल देशपांडे आणि आदर्श शिंदे यासारख्या परीक्षांमुळे स्पर्धकांना संगीताचे विद्यापीठच उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रातील ६ शहरांतून पारखून संगीत सम्राट पर्व २ च्या मंचावर उत्तम टॅलेंट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धकांना कार्यक्रमातील कॅप्टन्स म्हणजेच हरहुन्नरी गायक सावनी रवींद्र, अभिजीत कोसंबी, राहुल सक्सेना आणि जुईली जोगळेकर योग्य मार्गदर्शन देणार आहेत जेणेकरून स्पर्धेच्या पुढील वाटचालीत स्पर्धक त्यांचं १०० टक्के देऊ शकतील.

संगीत सम्राट पर्व प्रत्येक बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता  झी युवा वर!!!