पुणे- बराच कालावधी पासून महापालिकेच्या सभागृहात दबून राहिलेला आवाज अखेर आज नगरसेवक अविनाश बागवेंच्या मुखातून उद्विगतेने बाहेर पडला आणि त्यांनी .. महापौरांना फैलावर घेत … पक्षनेत्यांच्याच सभा घ्या , आणि तिथेच निर्णय घ्या … मुख्य सभेचे नाटक कशाला … असा आशय व्यक्त होणारी वक्तव्ये आज पालिकेच्या मुख्य सभेत केली .
बरेचसे चौकशी अहवाल आयुक्तांनी आठवड्यात देतो ,महिनाभरात देतो असे सांगून वेळ मारून नेलेली आहे . हे अहवाल प्रत्यक्षात सभागृहात कधी आणलेले नाहीत ,. या शिवाय प्रत्येक महिन्याच्या मुख्य सभेत नगरसेवकांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांना लेखी उत्तरे आणि त्यावरील पुन्हा संबधित नगरसेवक आणि अधिकारी यांच्यात सवाल जवाब होत आले आहेत . पण गेली दीड वर्षांपासून अधिक वेळा अशी प्रश्नोत्तरे घेण्याचे टाळण्यात आले आहेत .
या अशाच त्राग्यातून आज पहा अविनाश बागवे यांनी सभागृहात व्यक्त केलेली काही वाक्ये त्यांच्याच तोंडून ऐका व पहा ….
पक्षनेत्यांच्याच बैठका घ्या , मुख्य सभा घेता तरी कशाला ? बागवेंचा जळजळीत सवाल
विठ्ठलनामात रंगला ‘रंग पांडुरंग’ हा अभंग, भक्तीगीतांचा कार्यक्रम
पं. रघुनाथ पणशीकर, आनंद भाटे, चारुदत्त आफळे, मंजुषा पाटील, किशोर कौशल आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या गायनाने पुणेकर मंत्रमुग्ध
पुणे –आषाढी वारीमुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे, याच भक्तीमय वातावरणात दिग्गज गायकांनी विठूनामाचा गजर करत ‘रंग पांडुरंग’ या अभंग, भाक्तीगीताच्या कार्यक्रमात रसिकांना मंत्रमुग्ध केले, निमित्त होते संगीतकार प्रसाद जोशी यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘रंग पांडूरंग’ या विशेष कार्यक्रमाचे.
इ.एम.एस. सभागृह बाल शिक्षण मंदिर, कोथरूड पुणे येथे आयोजित ‘रंग पांडुरंग’ या कार्यक्रमात ध्वनिफितीतील अभंग, भक्तिगीते सादर करण्यात आली. या प्रसंगी ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. रघुनाथ पणशीकर, आनंद भाटे, चारुदत्त आफळे, मंजुषा पाटील, किशोर कौशल आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांनी आपल्या सुमधुर गायनाने रसिकांना भक्तीरसात मंत्रमुग्ध केले. यावेळी संगीत दिग्दर्शक प्रसाद जोशी, कवी मकरंद वळे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेष्ठ गायक, पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे शिष्य किशोर कौशल यांच्या ‘अधीर अधीर मन’ या भक्तीगीताने झाली. त्यानंतर पं. रघुनंदन पळशीकर यांनी ‘एकच ध्यास लागे ‘ हा अभंग सादर केला, ज्ञानेश्वर मेश्राम यांनी ‘पांडुरंग भेटायला वारकरी हा चालला’ आणि मंजुषा पाटील यांनी ‘तुझ्या भेटी लागी जीव होई कासावीस’ ही भक्तिगीते सादर केली. सुश्राव्य संगीत आणि भक्तिमय वातावरणाने सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. तसेच या प्रसंगी ‘रंग पांडुरंग’ या ध्वनिफितीचेही प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आनंद भाटे यांनी ‘वैष्णवांचे माहेर’ ही रचना सादर करत रसिकांची मने जिंकली, तर मंजुषा पाटील यांनी ‘नको नको कान्हा’ ही गवळण सादर करत आपल्या गायकीने उपस्थितांना मोहित केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी ‘अवघा रंग झाला रंग पांडुरंग’ ही पांडुरंगाची आरती सादर करून केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
रॅलीच्या पंढरीत पुणेकर फडकाविणार तिरंगा ,जागतिक रॅली मालिकेतील फिनलंड रॅलीसाठी संजय टकले सज्ज
याविषयी संजयने गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. संजय डब्ल्यूआरसी 3 विभागात सहभागी होईल. ब्रिटनचा डॅरेन गॅरॉड त्याचा नॅव्हीगेटर असेल. तो बाल्टीक मोटरस्पोर्टस प्रमोशनने सुसज्ज केलेली फोर्ड फिएस्टा आर 2 ही कार चालवेल.
फिनलंड रॅलीविषयी क्रिकेटमध्ये लॉर्डस, टेनिसमध्ये विंबल्डन, यानुसार रॅलीत फिनलंडचा उल्लेख केला जातो. मार्गाचे स्वरुप टणक आणि रुंद, तसेच तांत्रिक भागांतील मार्ग मात्र अरुंद असल्यामुळे ही रॅली स्पर्धकांचे कौशल्य, एकाग्रता आणि दमसास पणास लावते.
पोटात गोळा आणणाऱ्या असंख्य जम्प फिनलंड रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे जोरदार जम्प. या जम्प पोटात गोळा आणणाऱ्या असतात. यातील औनीनपोजा स्टेज डब्ल्यूआरसी जगतात प्रसिद्ध आहे. यावेळी काकारिस्टो येथील स्टेजमध्ये हा मार्ग समाविष्ट आहे. याशिवाव लौक आणि रुहीमाकी या स्टेजेसमध्ये मोठ्या जम्प्स आहेत.
रविवारी सुद्धा जोरदार जम्प्सचे आव्हान असेल. यात रुहीमाकी येथील स्टेजला टीव्ही पॉवर स्टेज असे नाव देण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत तेथे शेकडाऊनची स्टेज व्हायची. यावेळी या स्टेजचा संयोजकांनी रॅलीच्या मार्गात समावेश केला आहे. त्यात पारंपरिक मार्गाचाही समावेश आहे.
मोटोक्रॉसचा अनुभव उपयुक्त जम्प्सच्या आव्हानाविषयी संजयने सांगितले की, वेग खुपच जास्त असल्यास कारचे वायुगतीशास्त्र (एरोडायनॅमिक्स) लागू होते. परिणामी कारचा मागील भाग खाली, तर पुढील भाग वर जातो. अशावेळी जम्पसाठी टेक-ऑफ करताना ब्रेकींग आणि त्यानंतर वेग कमाल वाढविणे (फुल थ्रॉटल) योग्य ठरते.
प्रेस नोट्स महत्त्व वेगवान मार्गाच्या रॅलीत पेस नोट््सला कमालीचे महत्त्व असते. आतापर्यंत एपीआरसी पातळीवर संजयचे नॅव्हीगेटर्स तपशीलवार पेस नोट्स काढायचे. त्यामुळे कॉल्सची संख्या जास्त असायची. आता वेगवान मार्गामुळे कॉल्स कमी करणे क्रमप्राप्त ठरते. याबद्दल संजयने सांगितले की, डाव्या आणि उजव्या वळणांची तीव्रता, चढ किंवा उताराचे स्वरुप, सरळ मार्ग असल्यास त्याचे वर्णन, मार्गावरील वाळू, माती किंवा खडीचे प्रमाण यानुसार रेकीच्या वेळी पेस नोट्स काढल्या जातात. तीव्रतेनुसार त्याला क्रमांक दिले जातात. त्याशिवाय अनेक ठिकाणी सावध ड्रायव्हिंग करणे आवश्यक असते. त्यास कॉशन म्हणतात. या कॉशनलाही क्रमांक दिले जातात. जेवढे क्रमांक जास्त तेवढे कॉल्स जास्त होतात. डब्ल्यूआरसीमध्ये मात्र वेगवान मार्गामुळे इतके कॉल्स देण्यास नॅव्हीगेटरला आणि ते ऐकून कार चालवायला ड्रायव्हरना वेळ नसतो. साहजिकच पेस नोट्सचे स्वरुप बदलण्यात आले. मिडीलटन यांच्या सुचनेनुसार इस्टोनिया आणि लॅट्विया येथील रॅलींमध्ये मी त्यानुसारच ड्रायव्हिंग केले. मी दोन्ही रॅली पूर्ण करू शकलो. त्यामुळे मला मोलाचा अनुभव मिळाला आहे. वेगवान मार्गामुळे तसेच संक्षिप्त पेसनोट्समुळे एखाद्या सेकंदाची चुकही महागात पडू शकते. मार्गात अनेक ठिकाणी उंचवटे असतात. प्रामुख्याने ते वळणांवर असतात. तेथे जाताना पुढील मार्ग दिसत नसतो. अशा ठिकाणांना क्रेस्ट असे संबोधले जाते. त्याच्या पुढेही वळण असू शकते. त्यामुळे टेक-ऑफपूर्वी कारची पोझीशन अचूक ठवावी लागते. त्यामुळे कमाल वेग साधता येतो.
- रॅलीचा कार्यक्रम
- – गुरुवारी वेसाला येथे चार किलोमीटर 26 मीटरच्या मार्गावर शेकडाऊन
- – रात्री मध्य जायवस्कीला परिसरातली हार्जू स्ट्रीटवर हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने आकर्षक तसेच संमिश्र स्वरुपाच्या मार्गावरील पहिल्या स्टेजसर पहिला लेग पुर्ण
- – शुक्रवारी मोक्सी, युरीआ, असामाकी, अनेकोस्की, या परिसरातील अनेक नव्या मार्गांवर प्रत्येकी दोन स्टेजेस. ओट्टीला व हार्जू येथे प्रत्येकी एक अशा एकूण दहा स्टेजेस
- – पहिल्या लेगचे एकूण अंतर 128.68 किलोमीटर
- शनिवार (ता. 28 जुलै)
- पैजाला, पिहालाजाकोस्की, काकारिस्टो, टुओहीकोटानन या चार ठिकाणी प्रत्येकी दोन अशा एकूण आठ स्टेजेस
- – एकूण अंतर 142.86 किलोमीटर
- रविवार (ता. 29 जुलै)
- – लौका, रुहिमाकी येथे प्रत्येकी दोन अशा एकूण चार स्टेजेस
- तिसऱ्या लेगचे एकूण अंतर 45.72 किलोमीटर
- रॅलीचे एकूण अंतर 317.26 किमी
पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकानी वेळेत पूर्ण करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 19:- खरीप हंगामासाठी निर्धारित करण्यात आलेले पीककर्ज वाटप बँकांनी विहित मुदतीत पूर्ण करावे. भंडारा जिल्ह्यातील पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना दिले.
विधान भवनाच्या मंत्रीमंडळ सभागृहात आयोजित भंडारा जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सर्वश्री डॉ. परिणय फुके, चरण वाघमारे, राजेश काशीवार, ॲड रामचंद्र अवसरे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी शांतनु गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, पोलीस अधीक्षक विनिता साहू व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
खरीप हंगामासाठी भंडारा जिल्ह्याला 550 कोटी 66 लाख ऐवढा लक्षांक प्राप्त झाला आहे. यापैकी 50 हजार 406 सभासदांना 250 कोटी 87लाखांचे वाटप बँकातर्फे करण्यात आले. यात सर्वाधिक 70 टक्के वाटप जिल्हा मध्यवर्ती बँकेने केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांची टक्केवारी कमी असून बँकांनी उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
रेती वाहतुकीसंदर्भात मॉडेल टेंडर पद्धती विकसित करा. ज्या घाटांवरून ओव्हरलोड गाडी भरली जाईल, अशा गाड्यांवर कारवाई करा. शासनाच्या घरकूल योजनेसाठी पाच ब्रास रेती मोफत देण्यासाठी नियोजन करण्यात यावे, असेही ते म्हणाले. रेती घाट लिलावातून जो निधी प्राप्त होईल त्याच्या25 टक्के निधी ग्रामपंचायतीला देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.
पंतप्रधान शहरी आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता संबंधित नगर पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे व यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा. यासोबतच शबरी व रमाई घरकूल योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. अपूर्ण जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच साकोली – लाखनी पाणीपुरवठा योजना निर्धारित वेळेत पूर्ण करावी,असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत बाधित गावांच्या पुनर्वसनासंदर्भात आदर्श पुनर्वसन कार्यप्रणाली अंमलात आणण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. खापरी रेहेपाडे, नेरला, सुरबोडी, पिंडकेपार, दवडीपार बेला या गावांचे पुनर्वसन संदर्भात तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. वैनगंगा नदीच्या प्रदूषणाबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, नागपूर येथील नागनदीच्या शुध्दीकरणाचा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर वैनगंगेचे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
या बैठकीत आमदार डॉ. परिणय फुके, चरण वाघमारे, राजेश काशीवार, ॲड रामचंद्र अवसरे यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्न व समस्या मांडल्या. पोलीस गृहनिर्माण योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण 15 प्रस्ताव गृहनिर्माण महामंडळाकडे सादर करण्यात आले. त्यापैकी तीन प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून उर्वरित प्रस्तावाच्या मंजुरीकरिता पाठपुरावा करण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
या बैठकीत मागेल त्याला शेततळे, धडक सिंचन विहीर, जलयुक्त शिवार, अपूर्ण जलसिंचन प्रकल्प, कृषी पंपासाठी पुरेसा वीज पुरवठा उपलब्ध करून देणे, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, मुख्यमंत्री पेयजल योजना, पोलीस गृहनिर्माण, खरीप पीककर्ज वाटप, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व जिल्ह्यातील विशेष प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
केंद्राच्या घसघशीत पॅकेजमुळे राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला मिळणार जलसंजीवनी
91 प्रकल्पांसाठी 13 हजार 651 कोटींचा निधी
मुंबई, दि.19 : दुष्काळग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयांतील 91 जलसिंचन प्रकल्पांसाठी केंद्र शासनाने तब्बल साडेतेरा हजार कोटी रूपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाचा कायापालट होणार आहे.
केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत या सर्व प्रकल्पांचे काम पूर्ण झाल्यानंतर राज्यात अतिरिक्त 3 लाख 76 हजार 915 हेक्टर एवढी मोठी सिंचन क्षमता निर्माण होणार आहे, असे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील अनेक सिंचन प्रकल्प निधी अभावी रखडले होते. मात्र अलिकडच्या काळात शासनाने रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती देऊन राज्यात 50 लाख हेक्टर विक्रमी सिंचन क्षमता निर्माण केली आहे. शासनाच्या या कामाची दखल केद्र शासनाने घेतली आहे. यासाठी राज्याला गेल्यावर्षीचा विशेष पुरस्कारही देण्यात आला होता.राज्यातील एकुण 33 टक्के प्रकल्प पूर्ण होण्याचा मार्ग निधीमुळे सुकर झाला आहे. सिंचन क्षेत्रात भरीव वाढ झाल्याने मराठवाडयातील कृषी क्षेत्राचे चित्र पालटणार आहे.
दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य शासन ‘बळीराजा जलसंजीवनी’योजना राबवित आहे. या अंतर्गत राज्य शासनाने 83 लघुपाटबंधारे व 8 मोठ्या व मध्यम प्रकल्प अशा 91 प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसहाय्य मागणीचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठविला होता. या प्रकल्पांची 1 जुलै 2017 रोजीची उर्वरित किंमत 15 हजार 325 कोटी रुपये इतकी आहे. यातील 1 हजार 674 कोटी रुपयांची कामे यापूर्वीच करण्यात आली आहेत. या कामांच्या रक्कमेसह उर्वरित 13 हजार 651 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला केंद्र शासनाने मंजुरी दिली असून त्यापैकी 25 टक्के इतक्या केंद्र हिश्श्यापोटी 3 हजार 831 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यास मंजुरी दिली आहे.
91 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी उर्वरीत 9 हजार 820 कोटी रुपये नाबार्ड कडून कर्ज स्वरूपात उपलब्ध होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विदर्भात 1 लाख 72 हजार 936 हेक्टर, मराठवाड्यात 11 हजार 304 हेक्टर तर उर्वरित महाराष्ट्रात 1 लाख 92 हजार 648 हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.
- चौदा जिल्ह्यांतील 91 प्रकल्पांसाठी 13 हजार 651 कोटींचा निधी
- विदर्भातील6 जिल्ह्यातील 66 प्रकल्पांसाठी 3 हजार 106 कोटी 85 लाख रुपये.
- अमरावती, वाशिम जिल्हयातील प्रत्येकी 18 प्रकल्प.
- यवतमाळ जिल्ह्यातील 14,बुलडाणा जिल्ह्यातील 8 प्रकल्प.
- अकोला जिल्ह्यातील 7, वर्धा जिल्हयातील 1 प्रकल्प
- मराठवाड्यातील5 जिल्ह्यातील 17 प्रकल्पांसाठी 1 हजार 23 कोटी 63 लाख रुपये
- औरंगाबाद जिल्ह्यातील 5,जालना जिल्ह्यातील 6 प्रकल्प
- नांदेड जिल्हयातील 2, लातूर 3 आणि बीड जिल्हयातील 1 प्रकल्प
- राज्यातील 8मोठे व मध्यम प्रकल्पांसाठी 9 हजार 521 कोटी
- सांगली जिल्ह्यातील टेंभू प्रकल्प,सातारा जिल्ह्यातील उरमोडी
- धुळे जिल्हयातील सुलवाडे-जांफळ.
- जळगाव जिल्हयातील शेळगाव आणि वरखेड-लोंढे.
- अकोला जिल्हयातील घुंगशीआणि पुर्णा बरेज.
- बुलडाणा जिल्ह्यातील जीगाव जल सिंचन प्रकल्प
महापौर जातीभेद करत असल्याचा राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा आरोप
पुणे-“मी ओबीसी असल्यामुळे मला सभागृहात बोलू दिले जात नाही” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी केला. गुरुवारी (दि.19) पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना महापौरांनी ससाणे यांना बोलण्याची संधी न दिल्याने ,’महापौर मी हाथ वर करूनही आपण मला बोलू का देत नाही ,आपण कायम असे का वागता ,त्यापेक्षा मी निषेध करून सभात्याग करतो असे सांगत ससाणे यांनी सभात्याग केला.
पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 मधून ससाणे निवडून आले आहेत. आज पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभेत शहरातील खड्ड्यावर चर्चा सुरू होती. त्यावर बोलण्यासाठी ससाने यांनी वारंवार हात वर करूनही त्यांना बोलण्याची संधी नाकारली. त्यामुळे त्यांनी सभागृहाबाहेर जाणे पसंत केले.
त्यानानातर त्यांनी तातडीने महापौर मुक्ता टिळक यांना नगरसचिव कार्यालयामार्फत पत्र दिले ,’मी ओबीसी असल्यामुळेच मला बोलू दिले जात नसल्याचे त्यात म्हटले आहे . सभागृहात मला बोलू दिले जात नाही, त्यामुळे माझ्या प्रभागातील समस्या सोडवण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी त्यात नमूद केले आहे .काय आहे हे पत्र पहा …
मुनीश्री पुलकसागरजी महाराजांचा चातुर्मास पुण्यात दिनांक २२ जुलै रोजी शोभायात्रा व मंगलप्रवेश
पुणे- आपल्या ओघवत्या वाणीने आणि तेजस्वी विचारांनी संपूर्ण देशभर पायी फिरून धर्मजागरण व समाज प्रबोधन करणारे मुनीश्री प.पु १०८ पुलकसागरजी महाराज यांचा चातुर्मास यंदा पुण्यात संपन्न होणार असून, रविवार दि,२२ जुलै रोजी भव्य शोभायात्रेद्वारा सकल जैन समाजातर्फे त्यांचे स्वागत केले जाणार आहे.धर्मानुरागी रसिकलाल एम धारिवाल नगरी महालक्ष्मी लॉन्स,राजाराम पुलानजीक कर्वेनगर पुणे येथे चातुर्मास काळात त्यांचा मुक्काम राहणार असून प्रवचने,सत्संग,दर्शन,ग्रंथ व विशेषांक प्रकाशन,ज्ञानगंगा महोत्सव,सर्वधर्मीय चर्चासत्र,वृक्षारोपण,रक्तदान,
रविवार दि.२२ जुलै रोजी.दुपारी २.०० वाजता सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग जैन मंदिर येथे प.पु १०८ पुलकसागरजी महाराज यांचे पादप्रक्षालन होणार असून तेथून सिंहगड रस्ता मार्गे राजाराम पुल अशी भव्य शोभायात्रा कार्यक्रमस्थळी येईल.या शोभायात्रेत ३००० हून अधिक जैन भाविक सहभागी होणार असून आग्रभागी सनई-चौघडा,बॅन्ड ढोल लेझीम याबरोबरच महिलांचे लेझीम पथकही असेल.शोभायात्रेत श्रवणबेळगोळ येथे झालेल्या श्री गोमटेश्वर महामस्तकाभिषेक सोहोळ्याची प्रतिकृती उभारण्यात आली असून २ चांदीचे रथही शोभायात्रेत असतील त्यामध्ये मुनिश्रींच्या प्रतिमा ठेवल्या जातील.धर्मानुरागी रसिकलाल एम धारिवाल नगरी,महालक्ष्मी लॉन्स येथे महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री मा.गिरीश बापट व पुण्याच्या महापौर सौ.मुक्ता टिळक शोभायात्रेला सामोरे जाऊन मुनिश्रींचे स्वागत करतील.
या चातुर्मासानिमित्त्य महालक्ष्मी लौन्स येथे ६६००० चौरस फुटाचा भव्य आच्चादीत मंडप उभारण्यात आला असून त्याचे धर्मानुरागी रसिकलाल एम धारिवाल नगरी असे नामकरण करण्यात आले आहे.या भव्य सुशोभित मंडपात ५००० हून अधिक खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली असून ५६*२० आणि ५०*२० असे २ मोठे स्टेज उभारण्यात आले आहेत.मंदिर देखाव्याचा भव्य बॅकड्रोप स्टेजवर लावण्यात आलेला आहे. तसेच मंदिर प्रतिकृती असणारे आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे.अत्याधुनिक ध्वनी व्यवस्था,पंखे,ट्युब,एल इडी स्क्रिन,यासह सुसज्ज अशा या मंडपात १०,०००चौरस फुटाचा स्वतंत्र भोजन कक्षही उभारण्यात आला आहे.येथे प्रत्येकास नाश्ता ,दुपारचे व सायंकाळचे भोजन प्रसाद म्हणून निशुल्क दिले जाईल. प .पु.१०८ पुलकसागरजी महाराज यांचे या चातुर्मास काळात सकाळी ८ ते १० व सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत दर्शन असून रोज सायंकाळी भगवंताची आरती व मुनिश्रींची आरती संपन्न होईल.
शुक्रवार दिनांक २७ जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ८.३० वाजता मुनिश्रींचे प्रवचन होणार असून त्यांच्या जीवनावर आधारित चित्रावलीचे प्रकाशन समारंभपूर्वक करण्यात येईल. या प्रसंगी महाराष्ट्रातील भाविकांसमवेतच दिल्ली,भोपळ,ग्वाल्हेर,इंदोर,
चातुर्मास काळात मुनीश्री प .पु.१०८ पुलकसागरजी महाराज भांडारकर प्रचविद्या संशोधन संस्था ,पुणे विद्यापीठ आणि आचार्य रजनीश आश्रम येथे भेट देऊन विद्वानांशी चर्चा करतील.१२ ऑगस्ट पासून २ सप्टेंबर पर्यंत ज्ञानगंगा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक १२ ऑगस्ट रोजी मुनिश्रीनी लिहिलेल्या १६ पुस्तकांचे प्रकाशन एकाचवेळी संपन्न होईल.ज्ञानगंगा महोत्सवात रोज सकाळी ८.३० ते १०.०० या वेळेत धर्मजागृती व समाज प्रबोधन यावर त्यांची प्रवचने होतील.
या चातुर्मास काळात बाल संस्कार शिबीर, ,रक्तदान महायज्ञ ,वृक्षारोपण,आरोग्य शिबीर आदींचे आयोजन करण्यात आले आहे.मंडपात १० *१२ फुट आकाराचे १२ स्टॉल्स असून स्वतंत्र हायटेक कार्यालय उभारण्यात आले आहे.संपूर्ण शहरभर होर्डींग्स व कमानी उभारण्यात आल्या असून कार्यक्रम स्थळी सुमारे ८० फुट उंचीवर जाणारा बलुनही सोडला जात आहे
५ सप्टेंबरनंतर मुनीश्री निगडी प्राधिकरण येथील भगवान महावीर मंदिर येथे जाणार असून ७ नोव्हेंबर रोजी पुण्यातील चातुर्मास पर्व संपेल.या सर्व कालावधीत जैन तसेच जैनेतर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने मुनिश्रींच्या दर्शनासाठी येऊन सत्संगाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती शोभा धारिवाल व मिलिंद फडे यांनी केले.या पत्रकार परिषद प्रसंगी अरविंद जैन, चकोर गांधी, आनंद गांधी ,जितेंद्र शहा ,अजित पाटील, सुदिन खोत, सुजाता शहा , उत्कर्ष गांधी, विरकुमार शहा आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पीएन गाडगीळ अँड सन्सला आयपीओसाठी सेबीची मंजुरी
मुंबई, 19 जुलै 2018: पीएन गाडगीळ अँड सन्स या रिटेल जेम्स व ज्वेलरी कंपनीला प्रारंभी समभाग विक्री करण्यासाठी बाजार नियंत्रक सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. पीएन गाडगीळ अँड सन्स या पुण्यातील रिटेल ज्वेलरी चेनने मे महिन्यामध्ये भांडवल बाजार नियामक सेबीकडे आयपीओसंबंधी कागदपत्र सादर केली..
आयपीओ कागदपत्रांनुसार, पीएन गाडगीळ अँड सन्सच्या खुल्या विक्रीमध्ये 500 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली जाणार आहे.
कंपनीच्या शेअर्सची नोंदणी एनएसई व बीएसई येथे केली जाईल.
एचडीएफसी बँक लिमिटेड आणि येस सिक्युरिटीज (इंडिया) लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“बीआरएलएम”) आहेत आणि लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रार आहे.
पीएन गाडगीळ अँड सन्सच्या उत्पादनांमध्ये सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, मूर्ती व अन्य सिल्व्हरवेअर, हिरे व हिऱ्यांचे दागिने आणि अन्य जेमस्टोन्स ज्वेलरी व संबंधित भेटवस्तू यांचा समावेश आहे. ठिकठिकाणच्या प्रदेशातील ग्राहकांच्या पसंतीनुसार उत्पादने तयार करण्याची आमची क्षमता आहे.
कंपनी हाय-एंड मार्केट, मिड-मार्केट व व्हॅल्यू मार्केट सेग्मेंटमधील विविध ग्राहकांना सेवा देते आणि त्यासाठीची उत्पादने इन-हाउस क्रिएटिव्ह डिझाइनर टीमने तयार केलेली असतात. त्यामुळे अनेक व निरनिराळ्या प्रकारची डिझाइन उपलब्ध करणे शक्य होते. कंपनीकडे विशेष डिझाइन टीम असून ही टीम ग्राहकांच्या गरजा पूर्ण करतील अशी नवी उत्पादने व डिझाइन तयार करते.
कंपनीची महाराष्ट्रात 23 स्टोअर आहेत आणि गुजरात व कर्नाटक येथे प्रत्येकी एक स्टोअर आहे.
संविधानाचे वाचन करा; राष्ट्रवादी युवककडून शिक्षण आयुक्तांना संविधान भेट
नोकरदारांनी बचतीचे रुपांतर गुंतवणूकीत करावे : नंदकुमार काकिर्डे
पुणे :नोकरदारांनी आपल्या गुंतवणूकीचा प्लान तयार ठेवला पाहिजे. सेव्हिंगचे रुपांतर गुंतवणुकीत झाले पाहिजे. चांगल्या गुंतवणुकीसाठी नोकरदारांनी अभ्यास केला पाहिजे, ‘ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी केले.
‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज ‘ ,सिनर्जी फाऊंडेशन आयोजित ‘ सिनर्जी संवाद ‘ या उपक्रमात ते बोलत होते. सिनर्जी सभागृह , एरंडवणे येथे हा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी झाला.
सिनर्जी हॉलिडे व्हिलेज चे संचालक राजेंद्र आवटे, मंदार देवगावकर, अमृता देवगावकर, गणेश जाधव यांच्या हस्ते नंदकुमार काकिर्डे यांच्या अर्थसाक्षरता विषयातील योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
काकिर्डे म्हणाले , ‘सध्याच्या काळात पगारात भागत नाही, मग बचत कशी करायची हा प्रश्न पडतो. बचत, सेव्हींग, इन्व्हेस्टमेंट या तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, हे समजून घेतले पाहिजे. बँकेतील सेव्हिंग वर ४ टक्क्याहून अधिक पैसे व्याज म्हणून मिळत नाही. शिवाय त्या पैशाची पर्चेसिंग व्हॅल्यू कमी होते.
सोन्यात कधीही गुंतवणूक करू नये.ती मृत गुंतवणूक ठरते. नोकरदारांनी आपल्या गुंतवणूकीचा प्लान तयार ठेवला पाहिजे. सेव्हिंगचे रुपांतर गुंतवणुकीत झाले पाहिजे. चांगल्या गुंतवणुकीसाठी नोकरदारांनी अभ्यास केला पाहिजे.
तरुण वयात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान, इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स कडे आधी लक्ष द्यावे. शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे नंतर लक्ष द्यावे. रिअल इस्टेट गुंतवणूक धोकादायक ठरू शकते, म्हणून काळजीपूर्वक विचार करावा, असे काकिर्डे यांनी सांगितले.
इन्शुरन्स ही गुंतवणूक नाही, तर आपत्कालिन व्यवस्था आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच गुंतवणूक करताना जोडीदाराबरोबर सल्लामसलत केली पाहिजे.
राजेंद्र आवटे यांनी स्वागत केले. दीपक बीडकर यांनी आभार मानले.
संजय जाधव ह्यांच्या वाढदिवसाला लाँच झाली त्यांची वेबसाइट !
सुप्रसिध्द फिल्ममेकर संजय जाधव ह्यांचा 18 जुलैला वाढदिवस असतो. वाढदिवसाच्या दिवशी संजय जाधव ह्यांना त्यांच्या मित्र-मंडळी आणि चाहत्यांकडून भरपूर गिफ्ट्स येतात. यंदा मात्र संजय जाधव ह्यांच्या वाढदिवशी त्यांच्या चाहत्यांनाच एक आगळं गिफ्ट मिळालंय. संजय जाधव ह्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेणारी imsanjayjadhav.com ही वेबसाइट लाँच झाली आहे.
संजय जाधव ह्यांच्या टिमने ही वेबसाइट त्यांना वाढदिवसाची भेट दिली आहे. ह्याविषयी संजय जाधव ह्यांच्या दुनियादारी, तूहिरे, प्यारवाली लव्हस्टोरी आणि गुरू ह्या सिनेमाचे निर्माते आणि बिजनेस पार्टनर दिपक राणे म्हणतात, “दादांचा (संजय जाधव) वाढदिवस हा आमच्या पूर्ण टिमसाठी खूप मोठा सण असतो. त्यामूळे त्यांच्यासाठी काहीतरी खास आम्ही करू इच्छितो. म्हणूनच यंदा टिमने त्यांना ही वेबसाइट भेट दिली आहे. आम्हांला आशा आहे की, त्यांच्या चाहत्यांनाही ही वेबसाइट खूप आवडेल.”
संजय जाधव म्हणतात, “ही वेबसाइट हे माझ्यासाठी सरप्राइज होतं. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी उठल्यावर हा सुखद आश्चर्याचा धक्का मिळाला. सध्या आनंद व्यक्त करायला मला शब्द अपूरे पडत आहेत.”
संजय जाधव ह्यांच्या टीमने आणि त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक सरप्राइज बर्थ डे पार्टी 17 जुलैला रात्री ठेवली होती. ह्या बर्थडे पार्टीत संजय जाधव ह्यांचे स्वागतही आगळ्या पध्दतीने करण्यात आले.
27 जुलैला प्रदर्शित होणार ‘बे एके बे’
काही सिनेमे केवळ मनोरंजन करतात, तर काही मनोरंजनासोबतच समाजातील दाहक वास्तवही दाखवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना वेध घेणारे असे सिनेमे एक प्रकारे प्रेक्षकांच्या डोळयांत अंजन घालण्याचंही काम करतात. २७ जुलै संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा ‘बे एके बे’ हा मराठी सिनेमा शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करीत आजच्या समाजव्यवस्थेकडेही लक्ष वेधणारा आहे.
थ्री स्टार एंटरटेनमेंट आणि नमस्ते एंटरटेनमेंट फिल्म्स या निर्मिती संस्थांनी ‘बे एके बे’ या सिनेमाची निर्मिती केली आहे. विकास भगेरीया आणि पूर्णिमा वाव्हळ-यादव या सिनेमाचे निर्माते आहेत. हेमा फाऊंडेशनचे महेंद्र काबरा आणि अनिता महेश्वरी यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची सहनिर्मिती प्रविण गरजे आणि चिंतामणी पंडित यांनी केली आहे. वर्तमान काळातील शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या या सिनेमाद्वारे दिग्दर्शक संचित यादव यांनी समाजातील सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दिग्दर्शनासोबतच या सिनेमाची कथा-पटकथाही संचित यादव यांनीलिहिली आहे. त्यावर अभिजीत कुलकणीं यांनी अर्थपूर्ण संवादलेखन केलं आहे.
समाजातील शिक्षणव्यवस्था आणि शिक्षकांची स्थिती दर्शवणारे काही सिनेमे आजवर प्रदर्शित झाले असलेतरी अद्याप दुर्लक्षित राहिलेल्या पैलूंवर प्रकाश टाकण्याचं काम ‘बे एके बे’ हा सिनेमा करणार असल्याचं दिग्दर्शक यादव यांचं म्हणणं आहे. ते म्हणाले की, शहरातील शिक्षणपद्धती काय आहे ती सर्वांनाच ठाऊक आहे. पण खेडोपाडयांतील शिक्षणव्यवस्थेकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. एखादा शिक्षक जर प्रामाणिकपणे आपलं काम करण्यासाठी झटत असेल तर त्याला कशाप्रकारे नाना समस्यांना सामोरं जावं लागतं हे चित्र देशाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात आजही पाहायला मिळत आहे. हेच चित्र आम्ही ‘बे एके बे’च्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
आशयघन कथानकाला अर्थपूर्ण संवाद आणि प्रसंगानुरूप सादरीकरणाची जोड देण्यात आली आहे. सुमधुरगीत-संगीताद्वारे ‘बे एके बे’चा प्रवास सुरेल बनवण्यात आला आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये, सहजसुंदर अभिनय आणि दूरदृष्टी ठेऊन केलेलं दिग्दर्शन यामुळे सिनेमा प्रेक्षकांवर प्रभाव पाडण्यात नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास निर्मात्यांना वाटतो. या सिनेमातील चित्र केवळ महाराष्ट्रातील एका गावातील नसून शिक्षणापासून दुर्लक्षित राहिलेल्या अनेक खेडयांचं ते प्रतिनिधीत्व करणारं आहे. केवळ उपदेशाचे डोस न पाजता मनोरंजनाच्या माध्यमातून एक कटू सत्यजनतेसमोर मांडण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न आहे.
संजय खापरेसारखा कसलेला कलावंत या सिनेमातील मुख्य भूमिकेत असणं ही ‘बे एके बे’ची सर्वात मोठीजमेची बाजू आहे. आपल्या अभिनय कौशल्याद्वारे संजयने या सिनेमात साकारलेल्या माधव गुरूजी या व्यक्तिरेखेतीलपैलू सादर करण्याचं काम प्रामाणिकपणे केलं आहे. त्याच्या जोडीला जयवंत वाडकर, संचित यादव, पूर्णिमा वाव्हळ-यादव, संतोष आंब्रे, अतुल मर्चंडे आणि अरूण नलावडे यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका असून साहिल सितारे, प्रथम सितारे, वैदेही ओव्हाळ, स्नेहल भाताडे, सागर गुरव, संचित निर्मळे, पार्थ देशपांडे, अथर्व खारवरकर, साईराज कामेतकर, स्वप्नजा जाधव, समिषा स्लपे, प्राची मेस्त्री, पूजा पोटफाडे, नेहा पावसकर, अविष्कार शेडये आदि बालकलाकारांच्याही या सिनेमात भूमिका आहेत. ‘बे एके बे’चं गीतलेखन संचित यादव यांनी अभिजीत कुलकर्णा यांच्या साथीने केलं आहे. या गीतरचना संगीतकार विलास गुरव यांनी संगीतबद्ध केल्या आहेत. अतुल जगदाळे यांचं छायालेखन आणि कमल सैगल व विनोद चौरसिया या जोडीचं संकलन लाभलं आहे. देवेंद्र तावडे यांनी कला दिग्दर्शन, व्हिएफक्स शेखर माघाडे, तर संतोष आंब्रे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. अतुल मर्चंडे या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.
झी स्टुडिओज् प्रस्तुत आणि सुबोध भावे लिखित ‘पुष्पक विमान’ येत्या ३ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला
आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त. नंतर लाख आले तरी पहिल्या दोस्तांची सर नाही आणि नातू आजोबाचा शेवटचा दोस्त. तो असल्यावर दुसऱ्या दोस्तांची गरजच नाही. अशाच आजोबा आणि नातवाची म्हणजेच तात्या आणि विलासची गोष्ट येत्या ३ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वर्षाच्या सुरुवातीला ह्या वर्षात ये रे ये रे पैसा, गुलाबजाम आणि न्यूड सारखे चित्रपट देणाऱ्या झी स्टुडिओज् ची प्रस्तुती असलेल्या सुबोध भावे लिखित आणि वैभव चिंचाळकर दिग्दर्शित चित्रपट ‘पुष्पक विमान‘, ३ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला असून या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे आणि मोहन जोशी हे कलाकार रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री गौरी किरण या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत हे विशेष. या चित्रपटाची पत्रकार परिषद नुकतीच पुण्यात पार पडली यावेळी चित्रपटातील सर्व कलाकार, झी स्टुडिओज् चे शारिक पटेल, मंगेश कुलकर्णी उपस्थित होते.
चित्रपटाची कथा आहे विष्णुदास वाणी म्हणजेच तात्यांची. तात्या जळगाव मध्ये राहणारे वयाची ८३ गाठलेले व्यक्तिमत्व. कीर्तन, भजन आणि शेती ह्यात आयुष्य वेचलेल्या तात्यांना तुकाराम महाराजांची वैकुंठ गमन हि कथा नेहमीच भुरळ घालत असे. हेच तात्या आपल्या एकुलत्या एक नातवाच्या म्हणजेच विलासच्या आग्रहाखातर जेव्हा मुंबई गाठतात तेव्हा मुंबईतील घुसमट त्यांना सहन होत नाही. कधी एकदा मुंबई सोडतो असे झालेले असताना, तात्या पहिल्यांदा अगदी जवळून उडणारे विमान पाहुन भारावून जातात. आयुष्यभर कीर्तनातून ‘तुकाराम महाराजांचा पुष्पक प्रवास’ आनंदाने सांगणाऱ्या तात्यांसाठी हि घटना कलाटणी देणारी ठरते. त्यांच्या इरसाल पण निरागस विश्वात कल्लोळ माजतो. भावनिक गुंतागुंतीच्या छटेला स्पर्शून जाणारी एक गाथा म्हणजेच ‘पुष्पक विमान’
मंजिरी सुबोध भावे, अरुण जोशी, मीनल श्रीपत इंदुलकर, सुनिल फडतरे आणि वर्षा पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून झी स्टुडिओज् ची प्रस्तुती आहे. चित्रपटातील संवाद आणि पटकथा चेतन सैंदाणे यांचे असून, कथा सुबोध भावे यांची आहे. पटकथा व दिग्दर्शन वैभव रा. चिंचाळकर यांचे आहे. चित्रपटाचं संकलन केलंय आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले सहाय यांनी तसेच धावणाऱ्या मुंबईला आपल्या छायाचित्रणात सुरेखपणे टिपलंय राष्ट्रीय पुरस्कार विजेते छायालेखक महेश आणे यांनी. संतोष फुटाणे यांचे कला दिग्दर्शन असून चित्रपटाला संतोष मुळेकरयांचे पार्श्वसंगीत आहे. या चित्रपटात एकूण सहा गाणी आहेत. नरेंद्र भिडे आणि संतोष मुळेकर यांची संगीतबद्ध केली असून शौनक अभिषेकी, आनंद भाटे, जयतीर्थ मेवुंडी, विनय मांडके आणिनकाश अझीझ यांनी स्वरबद्ध केली आहेत तर समीर सामंत आणि चेतन सैंदाणे यांनी शब्दबद्ध केली आहेत. कार्यकारी निर्मात्याची धुरा रत्नकांत जगताप यांनी सांभाळली आहे. चित्रपटात मोहन जोशी, सुबोध भावे, गौरी किरण आणि सुयश झुंझूरके हे कलाकार आहेत तसेच राहुल देशपांडे एका खास भूमिकेत दिसणार आहेत.
लोकप्रियतेमध्ये सलमानला संजय दत्तने मागे टाकले, स्कोर ट्रेंड्सवर बनला सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी!
स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या लोकप्रियतेच्या चार्टवर संजय दत्त सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता बनला आहे. संजय दत्तच्या जीवनावर बनलेल्या संजू चित्रपटामूळे त्याच्या लोकप्रियतेत ही लक्षणीय वाढ झालेली आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडत असेल की, एखादा अभिनेता एखाद्या चित्रपटाचा भाग नसतानाही त्या चित्रपटाच्या लोकप्रियतेमूळे अभिनेता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचावा.
संजय दत्तची आत्मकथा संजू सिनेमाव्दारे सिल्व्हर स्क्रिनवर झळकल्यावर चित्रपटाने अभूतपूर्व बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. आणि मग जादूची कांडी फिरवल्यासारखी संजय दत्तचीही लोकप्रियता वाढली. 61 गुणांसह सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता बनलेल्या संजय दत्तने प्रसिध्दीत आपला मित्र सलमान खानला मागे टाकले आहे. संजय दत्त प्रमाणेच संजू चित्रपटाचा अभिनेता रणबीर कपूरला ही सिनेमाच्या प्रसिध्दीचा फायदा झाला. रणबीर कपूर 44 गुणांसह तिसर-या स्थानी पोहोचला आहे. रणबीरने लोकप्रियतेमध्ये अक्षय कुमार आणि बिग बींनाही मागे टाकले आहे.
स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “संजू चित्रपटाच्या प्रमोशनमूळे संजय दत्तविषयी गेल्या काही दिवसांमध्ये न्यूज प्रिंट, आणि डिजीटल विश्वात भरपूर लिहीलं गेले आहे. सोशल मीडियावर सुध्दा संजय दत्तविषयी भरपूर चर्चा झाली. संजू चित्रपटाच्या लोकप्रियतेमूळे संजयची लोकप्रियताही एवढी वाढली की गेल्या काही आठवड्यांपासून लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या सलमान खानला मागे टाकत, संजय दत्त सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता बनला.”
अश्वनी कौल पूढे म्हणतात, ” 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून आम्ही डेटा गोळा करतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”
थॉमस कूक इंडियाची उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर नजर
– विद्यार्थ्यांचा परदेशात जाण्याच्या मोसमाचा लाभ घेण्याच्या दृष्टीने`स्टडी बडी` योजना
मुंबई, १८ जुलै २०१८ : उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढत असल्याचे ध्यानी घेऊन एकात्मिक ट्रॅव्हल आणि प्रवासाशी संबंधित वित्तीय सेवा पुरविणाऱ्या थॉमस कूक (इंडिया) लि. या आघाडीच्या कंपनीने `स्टडी बडी` या योजना आणली आहे. पूर्णपणे विद्यार्थी केंद्रीत विदेशी चलन विनिमयाला चालना देणारी ही योजना पुढील तीन महिने म्हणजे ३० सप्टेंबर २०१८ तारखेपर्यंत थॉमस कूक इंडियाच्या सर्व ओम्नी चॅनल नेटवर्कसह भारतभरातील सुमारे १५० फॉरेन एक्स्चेंज आऊटलेट्समध्ये उपलब्ध आहे.
पदवी आणि पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत असून थॉमस कूक इंडियाने गेल्या ३-४ वर्षांत विद्यार्थ्यांसाठीच्या विदेशी चलन व्यवसायात लक्षणीय अशी २० ते २५ टक्क्यांची वर्षागणिक वाढ नोंदवली आहे. चांगल्या वाढीची संभाव्यता आणि वाढत्या मागणीचा लाभ घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या विदेशी चलन विनिमयातील बाजारहिस्सा वाढविण्याच्या दृष्टीने थॉमस कूक इंडियाने `स्टडी बडी` हे धोरणात्मक तीन महिन्यांसाठी आणले आहे. हा कालावधी विद्यार्थ्यांच्या परदेश प्रवासासाठीच्या बुकिंगचा असल्याने त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. `स्टडी बडी`अंतर्गत विद्यार्थ्यांना विदेशी चलन विनिमयासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आकर्षक ऑफर्स आणि डील्स कंपनीने देऊ केले आहेत. त्यात २० टक्के सवलत असलेले मैंत्रा गिफ्ट व्हाऊचर. स्कायबॅग्जवर १० टक्के सवलत आणि दररोज भाग्यवान विजेत्याला लॅपटॉप अशा खात्रीशीर बक्षीस योजानही लागू करण्यात आली आहे.
स्टडी बडी ऑफर्सच्या व्यतिरिक्त थॉमस कूक इंडियाच्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या लाभाच्या विविध योजनाही आहेत:
· विदेशी चलन खरेदीचा आकर्षक दर
· घरपोच सेवा
· विद्यापीठ/ ट्युशन फी आणि राहण्याच्या खर्चासाठी पैसै पाठवण्यावर कोणतेही शुल्क नाही
· थॉमस कूक इंडियाच्या बॉर्डरलेस आणि वन करन्सी प्रीपेड कार्डाची सुविधा आणि सुरक्षितता
· एटीएममधून नि:शुल्क पैसे काढण्याची सुविधा
· जगभरातील चलनांतील चलनी नोटा आणि डिमांड ड्राफ्ट्स
· विद्यार्थ्यासाठी विशेष विमान प्रवासभाडे; मूळ भाड्यावर १० टक्के सवलत
· निवडक एअरलाइन्सवर ज्यादा सामान भत्ता
· परदेश प्रवासाचा विमा
थॉमस कूक (इंडिया) लि.चे वरिष्ठ उपाध्यक्ष, फॉरेन एक्स्चेंज – सेल्स आणि रिलेशनशिप मॅनेजमेन्ट, श्री. दीपेश वर्मा म्हणाले की, `विद्यार्थी प्रवासाची भारतातील बाजारपेठ ही लक्षणीय संधी असून थॉमस कूक इंडियाने वर्षागणिक २०-२५ टक्के वाढ नोंदवल्याचे आम्ही पाहिले आहे. म्हणूनच मागणीचा लाभ जास्तीत जास्त व्यवहार करण्यासाठी आणि `स्टडी बडी` ही संकल्पना आणली असून विद्यार्थ्यांच्या परदेश प्रवासाच्या मोसमाचा कालावधी यासाठी निवडला आहे. `स्टडी बडी`च्या आकर्षक ऑफर्स आणि खात्रीशीर भेटवस्तू या योग्य मोल मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थीवर्गाला समाधान देणाऱ्या आहेत.`
ते पुढे म्हणाले, `विदेशी चलन विनिमयातील तज्ज्ञ म्हणून विद्यापीठ/ ट्युशन फीसाठी नि:शुल्क पैसै पाठवणे, फॉरेक्स प्रीपेड कार्ड्स आणि चलनी नोटा उपलब्ध करून देणे या आमच्या प्रमुख सेवा व उत्पादने आहेत. तसेच अनेक वर्षांच्या अनुभवाच्या आधारे विद्यार्थी आणि पालकांना विदेशी चलनाबाबतचे बदलणारे नियम परदेशात विदेशी चलन घेऊन जाण्याचा सुरक्षित मार्ग याबाबत आम्ही मार्गदर्शन करतो. याच्या जोडीला `स्टडी बडी` उपलब्ध करून दिल्यामुळे विदेशी चलन मिळवू पाहणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना एक परिपूर्ण सेवा आमच्या माध्यमातून उपलब्ध झाली असून आमच्या ओम्नी-चॅनल नेटवर्कमुळे ती अधिक सुलभ झाली आहे.`


