मुनीश्री पुलकसागरजी महाराजांचा चातुर्मास पुण्यात दिनांक २२ जुलै रोजी शोभायात्रा व मंगलप्रवेश

Date:

पुणे- आपल्या ओघवत्या वाणीने आणि तेजस्वी विचारांनी संपूर्ण देशभर पायी फिरून धर्मजागरण व समाज प्रबोधन करणारे मुनीश्री प.पु १०८ पुलकसागरजी महाराज यांचा चातुर्मास यंदा पुण्यात संपन्न होणार असून, रविवार दि,२२ जुलै रोजी भव्य शोभायात्रेद्वारा सकल जैन समाजातर्फे त्यांचे स्वागत केले जाणार आहे.धर्मानुरागी रसिकलाल एम धारिवाल नगरी महालक्ष्मी लॉन्स,राजाराम पुलानजीक कर्वेनगर पुणे येथे चातुर्मास काळात त्यांचा मुक्काम राहणार असून प्रवचने,सत्संग,दर्शन,ग्रंथ व विशेषांक प्रकाशन,ज्ञानगंगा महोत्सव,सर्वधर्मीय चर्चासत्र,वृक्षारोपण,रक्तदान,बाल संस्कार शिबीर,आरोग्य शिबीर,प्रसाद असा भरगच्च कार्यक्रम या कालावधीत संपन्न होणार आहे.पुणे शहर,जिल्हा व महाराष्ट्रातून सुमारे २ लाखहून अधिक जैन भाविक या चातुर्मास काळात पुण्यात महाराजांच्या दर्शनासाठी येतील अशी अपेक्षा आहे.जिनवाणी वाहिनी वरून सर्व महत्वाचे कार्यक्रम व  रोजची प्रवचने यांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे याचे आयोजन पुणे व परिसरातील सकल जैन समाज व संस्था यांनी केले आहे अशी माहिती सकल जैन वर्षायोग समितीच्या अध्यक्षा श्रीमती शोभा धारिवाल व कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    रविवार दि.२२ जुलै रोजी.दुपारी २.०० वाजता सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग जैन मंदिर येथे प.पु १०८ पुलकसागरजी महाराज यांचे पादप्रक्षालन होणार असून तेथून सिंहगड रस्ता मार्गे राजाराम पुल अशी भव्य शोभायात्रा कार्यक्रमस्थळी येईल.या शोभायात्रेत ३००० हून अधिक जैन भाविक सहभागी होणार असून आग्रभागी सनई-चौघडा,बॅन्ड ढोल लेझीम याबरोबरच महिलांचे लेझीम पथकही असेल.शोभायात्रेत श्रवणबेळगोळ येथे झालेल्या श्री गोमटेश्वर महामस्तकाभिषेक सोहोळ्याची प्रतिकृती उभारण्यात आली असून २ चांदीचे रथही शोभायात्रेत असतील त्यामध्ये मुनिश्रींच्या प्रतिमा ठेवल्या जातील.धर्मानुरागी रसिकलाल एम धारिवाल नगरी,महालक्ष्मी लॉन्स येथे महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री मा.गिरीश बापट व पुण्याच्या महापौर सौ.मुक्ता टिळक शोभायात्रेला सामोरे जाऊन मुनिश्रींचे स्वागत करतील.

    या चातुर्मासानिमित्त्य महालक्ष्मी लौन्स येथे ६६००० चौरस फुटाचा भव्य आच्चादीत  मंडप उभारण्यात आला असून त्याचे धर्मानुरागी रसिकलाल एम धारिवाल नगरी असे नामकरण करण्यात आले आहे.या भव्य सुशोभित मंडपात ५००० हून अधिक खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली असून ५६*२० आणि ५०*२० असे २ मोठे स्टेज उभारण्यात आले आहेत.मंदिर देखाव्याचा भव्य बॅकड्रोप स्टेजवर लावण्यात आलेला आहे. तसेच मंदिर प्रतिकृती असणारे आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे.अत्याधुनिक ध्वनी व्यवस्था,पंखे,ट्युब,एल इडी स्क्रिन,यासह सुसज्ज अशा या मंडपात १०,०००चौरस फुटाचा स्वतंत्र भोजन कक्षही उभारण्यात आला आहे.येथे प्रत्येकास नाश्ता ,दुपारचे व सायंकाळचे भोजन प्रसाद म्हणून निशुल्क दिले जाईल.   प .पु.१०८ पुलकसागरजी महाराज यांचे या चातुर्मास काळात सकाळी ८ ते १० व सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत दर्शन असून रोज सायंकाळी भगवंताची आरती व मुनिश्रींची आरती संपन्न होईल.

    शुक्रवार दिनांक २७ जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ८.३० वाजता मुनिश्रींचे प्रवचन होणार असून त्यांच्या  जीवनावर आधारित चित्रावलीचे प्रकाशन समारंभपूर्वक करण्यात येईल. या प्रसंगी महाराष्ट्रातील भाविकांसमवेतच   दिल्ली,भोपळ,ग्वाल्हेर,इंदोर,जयपूर,उदयपुर,जबलपूर आदी शहरांतूनही भाविक पुण्यास येणार आहेत.रविवार दि.२९ जुलै रोजी चातुर्मास मंगल कलशाची प्रतिष्ठापना होऊन चातुर्मास पर्वास सुरुवात होईल.या प्रसंगी मुनिश्रींचे जीवन व त्यांचे विचार यावर आधारित जेष्ठ विचारवंत डॉ रावसाहेब पाटील संपादित ‘पंचरंग प्रबोधिनी’ विशेषांकाचे प्रकाशन केले जाणार आहे.

चातुर्मास काळात मुनीश्री प .पु.१०८ पुलकसागरजी महाराज भांडारकर प्रचविद्या संशोधन संस्था ,पुणे विद्यापीठ आणि आचार्य रजनीश आश्रम येथे भेट देऊन विद्वानांशी चर्चा करतील.१२ ऑगस्ट पासून २ सप्टेंबर पर्यंत ज्ञानगंगा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक १२ ऑगस्ट रोजी मुनिश्रीनी लिहिलेल्या १६ पुस्तकांचे प्रकाशन एकाचवेळी संपन्न होईल.ज्ञानगंगा महोत्सवात रोज सकाळी ८.३० ते १०.०० या वेळेत धर्मजागृती व समाज प्रबोधन यावर त्यांची प्रवचने होतील.

  या चातुर्मास काळात बाल संस्कार शिबीर, ,रक्तदान महायज्ञ ,वृक्षारोपण,आरोग्य शिबीर आदींचे आयोजन करण्यात आले आहे.मंडपात १० *१२ फुट आकाराचे १२ स्टॉल्स असून स्वतंत्र हायटेक कार्यालय उभारण्यात आले आहे.संपूर्ण शहरभर होर्डींग्स व कमानी उभारण्यात आल्या असून कार्यक्रम स्थळी सुमारे ८० फुट उंचीवर जाणारा बलुनही सोडला जात आहे

   ५ सप्टेंबरनंतर मुनीश्री निगडी प्राधिकरण येथील भगवान महावीर मंदिर  येथे जाणार असून ७ नोव्हेंबर रोजी पुण्यातील चातुर्मास पर्व संपेल.या सर्व कालावधीत जैन तसेच जैनेतर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने मुनिश्रींच्या दर्शनासाठी येऊन सत्संगाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती शोभा धारिवाल व मिलिंद फडे यांनी केले.या पत्रकार परिषद प्रसंगी अरविंद जैन, चकोर गांधी, आनंद गांधी ,जितेंद्र शहा ,अजित पाटील, सुदिन खोत, सुजाता शहा , उत्कर्ष गांधी, विरकुमार शहा  आदी प्रमुख पदाधिकारी  उपस्थित होते.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सेवाव्रती महिलांचा राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरव

महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने आयोजन पुणे : कर्तृत्वाने स्त्री आपल्या...

सहकारी गृहरचना संस्था आणि अपार्टमेंट्साठी महाअधिवेशन पुण्यात 

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त दि. २२ व २३ मार्च रोजी...

अल्पवयीन मुलाने केल्या चार वाहनचोऱ्या अन एक घरफोडी

पुणे- एका अल्पवयीन मुलाने केलेल्या चार वाहनचोऱ्या अन एक...