पुणे- महापालिकेच्या मुख्य सभेत महापौर आणि नगरसचिव यांनी मराठा आरक्षणावर बोलू द्यायचे नाही हा चंग बांधला आहे , ते जो पर्यंत बोलू देणार नाही,तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही असा इशारा आज महापालिकेतील शिवसेनेचे गट नेते संजय भोसले यांनी मुख्य सभेतील गोंधळा नंतर माध्यमांशी बोलताना सांगितले …पहा आणि ऐका नेमके ते काय म्हणाले ….
मराठा आरक्षण :महापालिकेत भाजप सेनेची धुमश्चक्री-(व्हिडीओ)
पुणे- मराठा आरक्षणावरून शिवसेनेने महापालिकेच्या मुख्य सभेत ‘आमची मते मांडू द्या’ या मागणीसाठी घोषणाबाजी करणाऱ्या शिवसेनेला कॉंग्रेस राष्ट्रवादी ने हि जोरदार साथ दिली आणि या सर्वाचे पर्यवसान सभागृहात भाजपा आणि सेने मध्ये जोरदार धुमश्चक्री होण्यात झाले .मराठा आरक्षणावर आम्हाला बोलू द्या या मागणीसाठी शिवसेनेचे संजय भोसले ,नाना भानगिरे ,बाळासाहेब ओसवाल, पल्लवी जावळे या नगरसेवकांनी सुरु केलेल्या आंदोलनात राष्ट्रवादीचे विरोधी पक्ष नेते चेतन तुपे पाटील,प्रकाश कदम, मनसे चे वसंत मोरे,कॉंग्रेस चे अरविंद शिंदे हे देखील सहभागी झाले आणि या सर्वात भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि शिळीमकर, पोटे,भावे असे नगरसेवक यांच्यात नेमके काय झाले . आबा बागुलांनी प्रथम तहकुबी मांडली त्यानंतर नगरसचिव सुनील पारखी यांच्यावर आज पुन्हा सभेत दोन तहकुबींचे कसे आरीष्ट्य ओढवले .. हे ..जसेच्या तसे पहा … हातच्या कंकणाला आरसा कशाला …
प्रधानमंत्री उज्ज्वला प्लस योजने अंतर्गत गॅस वाटप
‘परी हुँ मैं’ या मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज
– ग्लॅमरस दुनियेची अत्यंत हटके सफर घडविणारा चित्रपट
– ७ सप्टेबर रोजी होणार प्रदर्शित
स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि योगायतन फिल्मस निर्मित ‘परी हुँ मैं’ या मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर रिलीज करण्यात आले. उर्जा, पोर्ट, रिअल इस्टेट, निर्यात, टाउनशीप आदी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या योगायतन ग्रुपचे प्रमुख डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि शिला सिंह हे या चित्रपटाचे निर्माते असून संजय गुजर हे सहनिर्माते आहेत तर रोहित शिलवंत यांनी ‘परी हुँ मैं’ चे दिग्दर्शन केले आहे.
‘परी हुँ मैं’च्या मोशन पोस्टर मध्ये एका खिडकीतून घरात विसावलेले दिघे कुटुंब टि.व्ही. बघताना दिसतेय, त्या कुटुंबाची इवलीशी सदस्य साजरी दिघे आपल्याशी संवाद साधत तिला आवडणारा समुद्र, गोष्टी सांगणे आणि तिचे जगातील बेस्ट बाबा म्हणजेच माधव दिघे यांच्या आणि तिच्या आईबद्दल म्हणजेच कल्पना दिघे यांच्या विषयी तिच्या मनात असणारी थोडीशी भीती आणि प्रेमही ती बोलताना व्यक्त करते. तसेच सर्व प्रेक्षकांना ही गोड साजरी तिच्या कुटुंबाची गोष्ट अर्थात ‘परी हूँ मैं’ हा चित्रपट बघण्यासाठी निमंत्रित करत आहे. ही छोटी साजिरी नेमकी काय गोष्ट घेउन येणार याची प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे.
चित्रपट, टीव्ही मालिका, रियालीटी शो या चंदेरी दुनियेचा विषय लेखिका इरावती कर्णिक यांनी ‘वेगे वेगे धावू’ या एकांकिकेमधून मांडला होता,त्यावर आधारीत हा चित्रपट आहे. त्या एकांकिकेचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केले होते. तर ‘परी हुँ मैं’ या चित्रपटाची पटकथा मच्छिंद्र बुगडे, रोहित शिलवंत आणि संकेत माने यांची असून संवाद योगेश मार्कंडे यांचे आहेत. अभिनेते नंदू माधव, देविका दफ्तरदार, बालकलाकार श्रुती निगडे, फ्लोरा सैनी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘परी हुँ मैं’ या चित्रपटातील अभिषेक खणकर आणि सचिन पाठक यांच्या गीतांना संगीतकार समीर सप्तीसकर यांनी संगीतबद्ध केले असून शंकर महादेवन, अमृता फडणवीस, जिया वाडकर आणि मंदार पिलवलकर यांचा स्वर गीतांना लाभला आहे. चित्रपटाला पार्श्वसंगीत अनुराग गोडबोले यांनी दिले आहे, ग्लॅमरस दुनियेची अत्यंत हटके सफर घडविणारा बहुचर्चित ‘परी हुँ मैं’ हा मराठी चित्रपट येत्या ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
संजय टकलेच्या जोडीला गिनेस विक्रमवीर नॅव्हीगेटर जागतिक रॅली मालिकेच्या मोहीमेला रेकीने प्रारंभ
पुणे,
पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने जागतिक रॅली मालिकेतील (डब्ल्यूआरसी) पदार्पणात ठिकाण म्हणून रॅलीची पंढरी फिनलंड, तर नॅव्हीगेटर म्हणून गिनेस बुकमधील विक्रमवीर नॅव्हीगेटर असा दुहेरी योग साधला आहे.
फिनलंडमधील जायवस्कीला परिसरात या रॅलीची गुरुवारी रेकी झाली. या मालिकेतील तिसऱ्या श्रेणीच्या (डब्ल्यूआरसी 3) मालिकेत संजय भाग घेईल. टू व्हाई ड्राईव्ह कारचा हा गट आहे. बाल्टिक मोटरस्पोर्टस प्रमोशनने सुसज्ज केलेली फोर्ड फिएस्टा आर2 कार तो चालवेल.
संजयने रेकीच्या अनुभवाविषयी सांगितले की, आशिया-पॅसिफिक रॅली मालिकेत (एपीआरसी) आम्ही रेकीसाठी वेगळी कार वापरतो. डब्ल्यूआरसीसाठी मात्र प्रशिक्षक-मेंटॉर ग्रॅहॅम मिडीलटन यांच्या सल्यानुसार मी फोर्ड फिएस्टा आर2 ही नेहमीसारखीच कार वापरली. रॅलीची कार वेगळी असली तरी तीच कार रेकीसाठी वापरणे संयुक्तिक आणि उपयुक्त ठरेल अशी त्यांची भूमिका होती. डब्ल्यूआरसीचे वेळापत्रक अगदी भरगच्च असते. मला केवळ पाच तास झोपायला म्हणजे खरे तर तेवढाच ब्रेक असेल.
गिनेस विक्रमवीर नॅव्हीगेटर
गॅरॉडने येथे येण्यापूर्वी रुमानियात गिनेस बुक विक्रम केला. ब्रिटनच्या मार्क हिगीन्स याच्या साथीत त्याने ही कामगिरी केली. याविषयी संजयने माहिती दिली. त्याने सांगितले की, या जोडीने सुबारू डब्ल्यूआरएक्स एसटीआय कारसह जे काही केले ते ऐकून मी थक्क झालो. 52.4 मैल अंतराच्या मार्गावर तब्बल 624 वक्र भाग होते. तीव्र चढाचा मार्ग 1607 फुटांपासून 6699 फुटांपर्यंत वाढत होता. हवामानाची साथ त्यांना मिळालीच नाही, उलट पाऊस आणि धुक्यामुळे काही ठिकाणी कोरडा, तर काही ठिकाणी ओला भाग होता. अशा मार्गावर साधी कार ताशी कमाल 25 मैल वेगाने जाऊ शकते, पण या जोडीने 40 मिनिटे 58.8 सेकंद वेळेत हा टप्पा पूर्ण केला. त्यांनी ताशी 76.69 मैल वेग राखला.
पहिला नोंदणीकृत स्पर्धक
संजय या गटात सहभागी होणारा पहिला अधिकृत नोंदणीकृत भारतीय स्पर्धक असेल. संजयने सांगितले की, टू-व्हील ड्राईव्ह गटात मी एपीआरसी मालिकेत प्रॉडक्शन करंडक जिंकला. डब्ल्यूआरसी मध्ये मी टू व्हील ड्राईव्ह गटातच भाग घेईन, पण येथील स्पर्धेची पातळी फार वरची आहे. 23 स्पेशल स्टेजेसचे एकूण अंतर 317 किलोमीटर 26 मीटर असेल. एकूण वाहतुकीचा मार्ग धरून तब्बल दीड हजार किलोमीटरच्या घरात ड्रायव्हिंग करावे लागेल. येथे उन्हाळा असल्यामुळे हवामान कोरडे राहील. बारीक खडीचा मार्ग वेगवान असेल.
ओलाने प्रवास करा व एसओटीसीतर्फे मॉरिशसला जायची संधी जिंका
पुणे एसओटीसी ट्रॅव्हलने 20 जुलै ते 4 ऑगस्ट 2018 या कालावधीतील दोन आठवड्यांच्या स्पर्धेसाठी ओला या भारतातील आघाडीच्या व जगातील एकासर्वात मोठ्या राइड-शेअरिंग कंपनीशी सहयोग केला आहे. ही स्पर्धा ओला अॅपवर घेतली जाणार असून ती केवळ मुंबई व पुणे येथील युजर्ससाठीअसणार आहे. जे ओला युजर दोन आठवड्यांमध्ये जास्तीत जास्त वेळा प्रवास करतील व कोड एसओटीसी वापरतील, त्यांना 6 रात्री/7 दिवसमॉरिशसला विनामूल्य ट्रिप जिंकण्याची संधी मिळू शकते. हा कोड ओला मायक्रो, मिनी व प्राइम राइडसाठी लागू असेल.
या सहयोगाविषयी बोलताना, एसओटीसी ट्रॅव्हलचे भारत, एनआरआय मार्केट्स व ई–कॉमर्सचे सेल्स हेड डॅनिएल डिसोझा म्हणाले, “ओला हीदेशातील आघाडीची राइड–शेअरिंग कंपनी आहे आणि कंपनीच्या युजरची संख्या प्रचंड आहे. प्रामुख्याने मेट्रोमध्ये ही संख्या अधिक आहे. ओलाशीसहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. प्रायोगिक हॉलिडेबद्दलच्या ट्रेंडबद्दल आम्ही आशादायी आहोत. मॉरिशसला जाणाऱ्या भारतीयपर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. प्रवाशांना विविध प्रकारच्या संस्कृतींचा अनुभव घेता येऊ शकतो, तसेच त्यांना मॉरिशसमध्ये मासेमारी,स्कुबा–डायव्हिंग व खरेदी यांचा आनंद घेता येईल. दोन ग्राहक–केंद्री ब्रँडदरम्यानची ही विशेष भागीदारी आमच्या ग्राहकांसाठी फायद्याची ठरणारआहे आणि आम्हाला मुंबई व पुणे येथील ओला युजर्सप्यंत पोहोचण्यासाठीही उपयोगी ठरणार आहे.”
ओलाचे मुंबई सिटी हेड शेखर दत्ता म्हणाले, “आम्ही ग्राहकांसाठी नेहमीच विशेष वाहतूक सुविधा देण्याचा प्रयत्न करतो; हा उपक्रम मुंबई व पुणेयेथे दाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. देशातील आघाडीची स्मार्ट मोबिलिटी सुविधा म्हणून, आम्ही ग्राहकांच्या रोजच्या पॉइंट–टू–पॉइंट प्रवासाच्या पलीकडच्या वाहतुकीच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यावर नेहमी भर देतो; आणि एसओटीसीबरोबरची ही भागीदारी या दिशेने योग्यपाऊल आहे.
एसओटीसी ट्रॅव्हल लिमिटेडविषयी
एसओटीसी ट्रॅव्हल लिमिटेड (अगोदरचे नाव एसओटीसी ट्रॅव्हल प्रा. लि.) ही फेअरफॅक्स फिनान्शिअल होल्डिंग्स ग्रुपच्या थॉमस कुक (इंडिया)लिमिटेड (टीसीआयएल) या भारतीय नोंदणीकृत उपकंपनीकडे असलेली स्टेप-डाउन उपकंपनी आहे. एसओटीसी इंडिया ही लिजर ट्रॅव्हल, इन्सेन्टिव्हट्रॅव्हल व बिझनेस ट्रॅव्हल अशा विविध श्रेणींमध्ये कार्यरत असलेली आघाडीची ट्रॅव्हल व टुरिझम कंपनी आहे. एसओटीसीची स्थापना सन 1949मध्ये करण्यात आली. तेव्हापासून, कंपनीने 68 हून अधिक वर्षे जगातील लाखो प्रवाशांना जगभरातील विविध ठिकाणी जाण्यासाठी सेवा दिली आहे.कंपनी एस्कॉर्टेड ग्रुप टूर्स, कस्टमाइज्ड हॉलिडेज, हॉलिडेज ऑफ इंडिया व इन्सेन्टिव्ह ट्रॅव्हल अशा श्रेणींमध्ये आघाडीवर आहे. अत्याधुनिक,नावीन्यपूर्ण हॉलिडे कंपनी असलेली एसओटीसी प्रत्येक भारतीयाला हॉलिडेंना प्राधान्य देण्यासाठी उत्तेजन देते. ‘आम्ही हॉलिडेंसाठी आहोत’ आणिभारतीयांनी त्यांच्या हॉलिडेंना प्राधान्य द्यावे, असे आम्हाला वाटते.
एम.ए.रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च’च्या वतीने ‘कारगील विजय दिवस’ साजरा
टाटा समूहाचा दुर्मिळ चित्र खजिना पाहण्याची सुवर्णसंधी
पुण्यातील टाटा सेन्ट्रल अर्काईव्ज् मध्ये समूहाच्या ‘विंटेज प्रिंट’ जाहिरातींचे प्रदर्शन
पुणे, २५ जुलै २०१८: असं म्हणतात कि एखादे जुने मुद्रण तुम्हाला अगदी सहज भूतकाळात घेवून जाते. आणि याची प्रचिती देण्यासाठीच पुण्यातील ‘टाटा सेन्ट्रल अर्काईव्ज्’ खास पुणेकरांसाठी घेवून येत आहे एक खास चित्र प्रदर्शन – ‘विंटेज अॅडव्हर्टायजिंग अँड पब्लिसिटी’. टाटा समूहाच्या अगदी दुर्मिळ जाहिरात मुद्रणांपासून ते अलीकडच्या १९९० पर्यंतच्या जाहिरातींचा खजिना या निमित्ताने पुणेकरांना पहायला मिळणार आहे.
या प्रदर्शनातील अनेक साध्या परंतु संस्मरणीय जाहिराती तुम्हाला गतकाळात घेवून जातील. बदलते तंत्रज्ञान, स्पर्धात्मक दबाव, बाजारातील किरकोळ मागणी आणि या सगळ्याबरोबर ‘राष्ट्र उभारणीची’ मार्गदर्शक तत्वे कायमच हृदयात जपत तयार केलेल्या या जाहिराती टाटा समूहाची वाटचाल तुम्हाला उलगडवून दाखवतील.
प्रदर्शनातील काही जाहिराती या समाजाचे देणे दर्शविणाऱ्या, काही ‘राष्ट्र उभारणीची’ मार्गदर्शक तत्वे जपणाऱ्या, तर काही जाहिराती या बदलत्या फॅशन दाखविणाऱ्या आहेत. याशिवाय इंडियन हॉटेल्स च्या जाहिराती या सर्वोत्तम भव्यता प्रतीत करणाऱ्या, टाटा एअरलाईन आणि एअर इंडियाच्या जाहिराती आकाशात भरारी घेणाऱ्या, टाटा मोटर्सच्या जाहिराती या यशस्वी मार्गक्रमण करणाऱ्या तर टाटा स्टीलच्या जाहिराती या मजबुती दाखविणाऱ्या आहेत.
हे विनामुल्य प्रदर्शन सोमवार, दिनांक ३० जुलै ते सोमवार, ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत सर्वांसाठी खुले असेल. प्रदर्शनाची वेळ सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० अशी असून, अधिक माहितीसाठी नागरिकांनी 020- 66092054 या क्रमांकावर संपर्क करावा.
दोस्तीगिरी सिनेमाचा झाला दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा !
पुणे-महाविद्यालयातल्या नि:स्वार्थ, निरागस आणि निखळ मैत्रीच्या सुंदर नात्याविषयी असलेल्या ‘दोस्तीगिरी’ ह्या सिनेमाचा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा नुकताच मुंबईत आयोजित करण्यात आला होता. ह्या ट्रेलर आणि म्युझिक लाँचसाठी सिनेमाचा नायक संकेत पाठकचे ऑनस्क्रीन आई-वडील उपस्थित होते. दुहेरी मालिकेतली संकेतची आई, अभिनेत्री निवेदिता सराफ, आणि छत्रीवाली मालिकेत संकेत पाठकच्या वडिलांच्या भूमिकेत असलेले अभिनेते अशोक शिंदे ह्यांच्या हस्ते सिनेमाचे संगीत अनावरण झाले.
ह्यावेळेस भावूक झालेला अभिनेता संकेत पाठक म्हणाला, “माझ्या पहिल्या सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा आणि त्यात माझे ऑनस्क्रिन आई-वडिल आशिर्वाद द्यायला आले, हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. दोस्तीगिरी सिनेमाचे चित्रीकरणही माझ्यासाठी आठवणीतले होते. कारण ह्या सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी मला अक्षय वाघमारे, विजय गीते, पुजा जयस्वाल, पुजा मळेकर असे जिवाभावाचे फ्रेंड्स मिळाले.”
दोस्तीगिरी सिनेमाच्या ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळ्यासाठी संकेत पाठक, पुजा मळेकर, विजय गिते, पुजा जयस्वाल, शुभांगी लाटकर आणि अक्षय वाघमारे ह्या कलाकारांसह संगीत दिग्दर्शक रोहन-रोहन, प्राजक्ता शुक्रे, मिनल जैन, आणि कविता राम ही म्युझिक टीमही उपस्थित होती.
अभिनेत्री निवेदिता सराफ ह्यावेळी म्हणाल्या, “जशी दोस्तीगिरी सिनेमात घट्ट मैत्री दाखवली गेलीय, तशीच अशोक शिंदे आणि माझीही गेल्या तीस वर्षांची घट्ट मैत्री आहे. त्यामूळे माझ्या जुन्या मित्रासोबत दोस्तीगिरी सिनेमाचा ट्रेलर लाँच करणं माझ्यासाठी खूप खास आहे. तसेच संकेत पाठकची मी ऑनस्क्रिन आई झाले होते. आणि तेव्हापासूनच माझी संकेतशीही दोस्तीगिरी सुरू झाली आहे.”
संतोष पानकर निर्मित, विजय शिंदे दिग्दर्शित दोस्तीगिरी सिनेमाचे लेखन मनोज वाडकर ह्यांनी केले आहे. रोहन-रोहन ह्यांच्या संगीताने सजलेल्या ह्या सिनेमात संकेत पाठक, अक्षय वाघमारे, विजय गिते, पुजा मळेकर, पुजा जयस्वाल हे मुख्य भूमिकेत दिसतील. ‘अरिहंत मुव्हिज क्रिएशन्स’ प्रस्तूत ‘मोरया मुव्हिज क्रिएशन्स’ निर्मित “दोस्तीगिरी” 24 ऑगस्ट 2018ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
भारतीय दलित कोब्राचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
पुणे-भारतीय दलित कोब्रा या सामाजिक संघटनेच्यावतीने विविध मागण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला . मोर्चाची सुरुवात पुणे स्टेशन समोरील महात्मा गांधी पूर्णाकृती पुतळ्यापासून करण्यात आली . भारतीय दलित कोब्रा या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष ऍड. भाई विवेक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला .
यावेळी पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले . यावेळी शासकीय अध्यादेश पाहून आपल्या मागण्या पूर्ण करू असे आश्वासन मोर्चाच्या शिष्टमंडळाला दिले . या मोर्चामध्ये गोविंद गायकवाड , रामदास पवार , सुरेश जाधव , शंकर पवार , शिवाजी गायकवाड , भाऊसाहेब चवधरी , शांताराम पवार , प्रकाश पवार , रामदास पवार , रामभाऊ गायकवाड , प्रताप पवार , संपत पवार , रामा पवार , सुदाम निंबाळकर , सचिन भालेराव , लता देठे , शांता काळे , अजय शिंदे , मेहबूब शेख आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते .
यावेळी ऍड. भाई विवेक चव्हाण यांनी सांगितले कि ,पुण्यातील ग्रामीण भागात वर्षानुवर्षे ३० वर्षापेक्षा अधिक काळ भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांनी गायरान , इतर सरकारी विभागाच्या जागांवर निवाऱ्यासाठी छोटी झोपडी बांधतात . शासन नियमाप्रमाणे त्यांच्या घरांना निवासाची कायदेशीर मान्यता मिळाली पाहिजे . त्यांना या मान्यतेनंतर शासकीय योजनांचा लाभ घेता येईल . या झोपडपट्टी वासियांना त्यांच्या नावावर मालकी पट्टे करून द्यावीत . भटक्या विमुक्त समाज सतत डोक्यावर संसार घेऊन पोट भरण्यासाठी गावोगावी फिरत असतो . रस्त्याच्या कडेला नाल्याच्या कडेला , डोंगरावर माळरानावर तात्पुरता निवारा करत जगत असतो .परंतु , स्थानिक नागरिक त्यांना मारहाण करत असतात . अशाच घटनेत नागपंथीय डवरी गोसावी समाजाच्या पाच जणांचा मृत्यू झाला . राज्यात व पुणे जिल्ह्यात अशा शकेडो घटना घडत असतात तरी या लोकांना पूर्ण पणे जिल्ह्यात संरक्षण देण्यात यावे . भटक्या विमुक्त जाती जमातीचे लोक उदारनिर्वाहासाठी सतत भटकत असतात . त्यामुळे शासनाच्या सहकार्यामुळे शिकण्यास सुरुवात झाली आहे . दौंड , बारामती व पुरंदर या तालुक्यात शासन दरबार भरवून त्या जातीचा दाखला देण्याचे आदेश द्यावेत . दौंड तालुक्यातील वरवंड , दापोडी , केडगाव लिंगमाळ , बाटी आदी पट्टघाम नंदीवाले , मरीआई देववाले आदी लोक शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने शासकीय योजनेपासून वंचित आहे . अशा मागण्या निवेदनात देण्यात आल्या .
सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या सभासदांचे प्रशिक्षण आवश्यक -दिग्वीजय राठोड
‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
उत्तम आशय-विषयासाठी मराठी सिनेमा ओळखला जातो. याच आशयाच्या प्रेमात हिंदीतले अनेक बडे स्टार्स असून अनेक जण मराठी चित्रपटांची निर्मिती करताहेत. या यादीत आता अभिनेता जॉन अब्राहम यांचे नाव दाखल झाले असून त्यांची पहिली निर्मिती असलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ या मराठी चित्रपटाची पहिली झलक नुकतीच एका शानदार सोहळ्यात प्रकाशित करण्यात आली.
‘गेल्या काही वर्षांत मराठीत उत्तमोत्तम आशयाचे चित्रपट बनत आहेत. त्यामुळे मी स्वतःही एका मराठी चित्रपटाची निर्मिती करतोय याचा मला आनंद आहे. प्रादेशिक सिनेमांचं आशयावर भर देऊन काम करणं मला आवडतं. एका चांगल्या संकल्पनेसोबतच ताकदीचे कलाकार आणि उत्तम दिग्दर्शक या सगळ्यांमुळे वेगळ्या धाटणीचा ‘सविता दामोदर परांजपे’ प्रेक्षकांनाही आवडेल, असा विश्वास जॉन अब्राहम यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
‘सविता दामोदर परांजपे’ या गाजलेल्या नाटकावर चित्रपट करण्याचे बरेच दिवसांपासून मनात होते. सगळे योग जुळून येत हा चित्रपट साकारल्याचे, दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी सांगतात. या निर्मितीदरम्यान जॉनचा सहभागही तितकाच महत्त्वपूर्ण ठरल्याचा त्या आवर्जून सांगतात. ‘एका उत्तम संहितेवर बेतलेल्या या चित्रपटाचा भाग होण्याची संधी मला मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो’, अशी भावना अभिनेता सुबोध भावे यांनी व्यक्त केली तर ‘सविता दामोदर परांजपे’ ही रीमाताईंनी अजरामर केलेली भूमिका मला साकारायला मिळाल्याने एकाचवेळी आनंद आणि जबाबदारी अशी दुहेरी भावना माझ्या मनामध्ये आहे; असे प्रतिपादन अभिनेत्री तृप्ती तोरडमल यांनी केले. ‘माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी व आव्हानात्मक भूमिका मी या चित्रपटामध्ये साकारल्याचे अभिनेता राकेश बापट यांनी सांगितले.
अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांची निर्मिती व वितरण करणारे ‘पॅनोरमा स्टुडिओज’चे कुमार मंगत पाठक यांनी जॉन अब्राहम यांच्या कंपनीसोबत काम करायला मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना चांगल्या निर्मिती मूल्यांमुळे मराठी चित्रपटांचाही निर्मिती व वितरणाचा कॅनव्हास मोठा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
‘जे.ए.एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून स्वप्ना वाघमारे जोशी या दिग्दर्शिका आहेत. सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. चित्रपटाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून लेखन व संवाद शिरीष लाटकर यांचे आहेत. योगेंद्र मोगरे, तृप्ती मधुकर तोरडमल सहनिर्माते आहेत. मंदार चोळकर व वैभव जोशी लिखित गीतांना निलेश मोहरीर आणि अमित राज यांचं सुश्राव्य संगीत लाभले आहे. छायांकन प्रसाद भेंडे तर संकलन क्षितिजा खंडागळे यांचे आहे. कलादिग्दर्शन संतोष फुटाणे, ध्वनी संयोजन प्रणाम पानसरे यांचे आहे. वेशभूषा मालविका बजाज यांनी तर मेकअप विनोद सरोदे यांनी केला आहे.
मराठा हुतात्म्यांना श्रद्धांजलीची तहकुबीसमयी नगरसचिवांचे काम चुकीचे – अरविंद शिंदे
पुणे- महापालिकेच्या मुख्य सभागृहात -मराठा आरक्षण हुतात्म्यांना श्रद्धांजली ची तहकुबी मांडण्यात आली .या वेळी ,या प्रकरणी जे कामकाज नगरसचिवांनी केले ते नियमबाह्य होते असा आक्षेप महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी घेतला आहे .पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे …..
मराठा हुतात्म्यांना श्रद्धांजलीची तहकुबी -नगरसचिव होते दबावाखाली …
पुणे-मराठा आरक्षण हुतात्म्यांना श्रद्धांजली ची तहकुबी मांडल्यानंतर आम्हाला बोलायचे होते . नगरसचिव यांनी कायदा नियम यावेळी महापौरांना सांगणे गरजेचे होते . पण ते दबावाखाली काम करत होते असा आरोप महापालिकेतील विरोधी पक्ष नेते चेतन तुपे पाटील यांनी केला आहे.
आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान दिलेल्या शिंदे आणि सोनवणे या 2 तरुणांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करावी अशी तहकुबी आमच्या वतीने मांडण्यात आल्यानंतर त्यावर तहकुबी मांडलेल्या ना बोलू देणे , आणि तहकुबीला कोणाचा विरोध आहे काय हे विचारणे असल्यास मतदान घेणे हे नगरसचिवांनी टाळले .सत्ता बदल झाल्यापासून ते कायदेशीर जबाबदारी पार पाडत नाहीत . असे तुपे पाटील म्हणाले .
बराच काळ हि तहकुबी प्रलंबित ठेवून त्यावर खलबते करत अखेर या तहकुबीला विरोध करणे मुश्कील झाल्याने भाजपला आपल्याही नगरसेवकांच्या त्यावर सह्या घेवून ती संमत करणे भाग पडले असे ते म्हणाले …..
मराठा आरक्षण हुतात्म्यांना श्रद्धांजली-राष्ट्रगीत वाजवून दाबला विरोधकांचा आवाज (व्हिडीओ)
पुणे- आज पुणे महापालिकेत 2 सभा होत्या .पहिली पर्यावरण अहवाल सदर करण्यासाठी तर दुसरी जुलै कार्यपत्रीकेवरील विषयांच्या निर्णयासाठी … पहिली सभा सुरु होताच राष्ट्रवादीच्या दिलीप बराटे यांनी ‘ मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरुणांना श्रद्धांजली बाहुन सभा तहकुबी मांडण्यासाठी ..आमची तहकुबी आहे असे सांगत तहकुबी मांडण्याचा प्रयत्न केला पण .. त्यांना तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि हि सभा आकाशवाणी च्या सुधा नरवणे ,तसेच सामाजिक कार्यकर्ते अशोक पवार ,आणि भांडारकरचे विनायक अभ्यंकर यांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आली .
त्यानंतर दुसरी सभा सुरु होताच, अरविंद शिंदे, दिलीप बराटे यांच्या सह कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरुणांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करावी अशी तहकुबी मांडली .मात्र बराटे हि तहकुबी मांडत असतानाच भाजपच्या एक नगरसेविका अतिक्रमणावर आपला प्रश्न उपस्थित करत राहिल्या…. त्यानंतर … हि तहकुबी नागर्साची सुनील पारखी यांनी वाचून दाखवावी म्हणून कित्येक वेळ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आग्रह धरला जात होता . आणि महापौरांच्या भोवती तह्कुबीवर काय करायचे याबाबत खल सुरु होता . बराच वेळ सभागृहाचा यात गेला .अखेर या तहकुबीवर भाजपच्या नगरसेवकांना व्यासपीठावर पाचारण करून त्यांच्याही सह्या घेण्यात आल्या . आणि हि तहकुबी स्वीकारण्यात आली मात्र यावेळी राष्ट्रवादी च्या नगरसेवकांना तहकूबीवर बोलायचे होते … पण घाईने सभा तहकूब करताना घाईने राष्ट्रगीत वाजवून सभा संपवून तात्काळ महापौर आणि सत्ताधारी सभागृहातून निघून गेले . आणि कॉंग्रेस ,राष्ट्रवादीने ..एक मराठा ..लाख मराठा .. च्या घोषणा देवून सभागृह दणाणून सोडले .
