एम.ए.रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च’च्या वतीने ‘कारगील विजय दिवस’ साजरा
पुणे:
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलटिन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘एम.ए.रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च’च्या वतीने 19 वा ‘कारगील विजय दिवस’ साजरा करण्यात आला. कारगील युद्धात विजय मिळवून देणार्या वीरांचा सन्मान करण्यात आला. ‘राष्ट्रीय सेवा योजना’ आणि ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी कारगील युद्धातील वीर कर्नल विजय सिंग जाधव (निवृत्त) आणि कर्नल किरण वझे (निवृत्त) यांना सन्मानित करण्यात आले. त्यांनी आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले.
प्राचार्य अनिता फ्रांत्झ (एम. ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्च सेंटर’) यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
आझम कॅम्पसच्या हाय टेक हॉलमध्ये ‘एम.ए.रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च’च्या प्रथम आणि तृतीय वर्ष अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.