‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित

Date:

उत्तम आशय-विषयासाठी मराठी सिनेमा ओळखला जातो. याच आशयाच्या प्रेमात हिंदीतले अनेक बडे स्टार्स असून अनेक जण मराठी चित्रपटाची निर्मिती करताहेत. या यादीत आता अभिनेता जॉन अब्राहम यांचे नाव दाखल झाले असून त्याची पहिली निर्मिती असलेल्या सविता दामोदर परांजपे या मराठी चित्रपटाची पहिली झलक नुकतीच एका शानदार सोहळ्यात प्रकाशित करण्यात आली.

गेल्या काही वर्षांत मराठीत उत्तमोत्तम आशयाचे चित्रपट बनत आहेत. त्यामुळे मी स्वतःही एका मराठी चित्रपटाची निर्मिती करतोय याचा मला आनंद आहे. प्रादेशिक सिनेमांचं आशयावर भर देऊन काम करणं मला आवडतं. एका चांगल्या संकल्पनेसोबतच ताकदीचे कलाकार आणि उत्तम दिग्दर्शक या सगळ्यांमुळे वेगळ्या धाटणीचा सविता दामोदर परांजपे प्रेक्षकांनाही आवडेल, असा विश्वास जॉन अब्राहम यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

सविता दामोदर परांजपेया गाजलेल्या नाटकावर चित्रपट करण्याचे बरेच दिवसांपासून मनात होते. सगळे योग जुळून येत हा चित्रपट साकारल्याचे, दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी सांगतात. या निर्मितीदरम्यान जॉनचा सहभागही तितकाच महत्त्वपूर्ण ठरल्याचा त्या आवर्जून सांगतात. ‘एका उत्तम संहितेवर बेतलेल्या या चित्रपटाचा भाग होण्याची संधी मला मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो’, अशी भावना अभिनेता सुबोध भावे यांनी व्यक्त केली तर सविता दामोदर परांजपेही रीमाताईंनी अजरामर केलेली भूमिका मला साकारायला मिळाल्याने एकाचवेळी आनंद आणि जबाबदारी अशी दुहेरी भावना माझ्या मनामध्ये आहे; असे प्रतिपादन अभिनेत्री तृप्ती तोरडमल यांनी केले. ‘माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी व आव्हानात्मक भूमिका मी या चित्रपटामध्ये साकारल्याचे अभिनेता राकेश बापट यांनी सांगितले.

अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांची निर्मिती व वितरण करणारे ‘पॅनोरमा स्टुडिओज’चे कुमार मंगत पाठक यांनी जॉन अब्राहम यांच्या कंपनीसोबत काम करायला मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना चांगल्या निर्मिती मूल्यांमुळे मराठी चित्रपटांचाही निर्मिती व वितरणाचा कॅनव्हास मोठा होईल, असा विश्वास व्यक्त केला.

जे.ए.एन्टरटेन्मेंट आणि पॅनोरमा स्टुडिओजसविता दामोदर परांजपे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून स्वप्ना वाघमारे जोशी या दिग्दर्शिका आहेत. सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. चित्रपटाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून लेखन व संवाद शिरीष लाटकर यांचे आहेत. योगेंद्र मोगरे, तृप्ती मधुकर तोरडमल सहनिर्माते आहेत. मंदार चोळकर व वैभव जोशी लिखित गीतांना निलेश मोहरीर आणि अमित राज यांचं सुश्राव्य संगीत लाभले आहे. छायांकन प्रसाद भेंडे तर संकलन क्षितिजा खंडागळे यांचे आहे. कलादिग्दर्शन संतोष फुटाणे, ध्वनी संयोजन प्रणाम पानसरे यांचे आहे. वेशभूषा मालविका बजाज यांनी तर मेकअप विनोद सरोदे यांनी केला आहे.

येत्या ३१ ऑगस्टला सविता दामोदर परांजपेप्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आता कंबोडियामध्येही भारतीय पर्यटकांना यूपीआय (UPI) पेमेंटची सोय

मुंबई: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची आंतरराष्ट्रीय शाखा असलेल्या NPCI इंटरनॅशनल...

पुण्यातील एयूएम तीन वर्षांत दुप्पट; महाराष्ट्राच्या म्युच्युअल फंड वाढीच्या प्रवासात पुणे ठरले महत्त्वाचे केंद्र:ए. बालसुब्रमण्यन

पुणे- आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्‍टर आणि सीईओ ए. बालसुब्रमण्यन पुणे दौऱ्यादरम्यान म्‍हणाले की, पुणे देशातील सर्वात वेगाने वाढणारी म्युच्युअल फंड बाजारपेठ म्हणून समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत या शहरातील एकूण एयूएम (व्यवस्थापनाखालील मालमत्ता) दुप्पट झाले आहे. बालसुब्रमण्यन यांनी महाराष्ट्रातील गुंतवणूक क्षेत्रात पुण्याची वाढती भूमिका आणि म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून दीर्घकालीन संपत्ती निर्मितीमध्ये गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग निदर्शनास आणले. पुण्यात नेहमी एक मजबूत इक्विटी संस्कृती राहिली आहे, जिथे गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणूक, संपत्ती निर्मिती आणि चक्रवाढ व्याजाची ताकद या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेत आहेत. "ऐतिहासिकदृष्ट्या पुणे नेहमी उच्च वाढ देणारी बाजारपेठ राहिली आहे. याउलट, मी म्हणेन की, पुण्यातील इक्विटी संस्कृती इतर बाजारपेठांपेक्षा खूप जास्त आहे, कारण येथील व्‍यक्तींना दीर्घकालीन बचतीचे महत्त्व आणि चक्रवाढ व्याजाची ताकद चांगली समजते. पुणे सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ राहिली आहे आणि माझ्या मते, भविष्यातही अशीच वेगाने वाढणारी बाजारपेठ राहील," असे बालसुब्रमण्यन म्हणाले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडसाठी महाराष्ट्र नेहमी अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे. उर्वरित महाराष्ट्र आणि गोवा (आरओएमजी) मधील म्युच्युअल फंडाची मालमत्ता आज जवळपास ५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कंपनी सध्या देशभरात अंदाजे ४.७४ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करत आहे, तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातील जवळपास १.२ कोटी ग्राहकांच्या पोर्टफोलिओला सेवा प्रदान करत आहे. बालसुब्रमण्यन यांच्या मते, हा विकासाचा प्रवास आता राज्यातील केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित न राहता त्यापलीकडे वेगाने विस्तारत आहे. वाढती आर्थिक घोडदौड, पायाभूत सुविधांचा विकास, एसएमईचा वाढता विस्तार आणि कौटुंबिक उत्पन्नातील वाढ यामुळे इतर उदयोन्मुख केंद्रांमध्येही गुंतवणूकदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गुंतवणूकदारांच्या वर्तनाबाबत मत व्‍यक्त करत या म्युच्युअल फंड क्षेत्रातील अनुभवी तज्ञ म्‍हणाले की, म्युच्युअल फंड व एसआयपीबद्दल वाढणारी जागरूकता पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांना शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. भारत आता जवळपास ४ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडून १० ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना ते म्‍हणाले की, योग्य आर्थिक नियोजन आणि बाजारपेठेशी जोडलेल्या गुंतवणुकीतील सातत्यपूर्ण सहभाग हाच दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी मुख्य आधार ठरेल.

पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

पुणे, दि. १२: पुणे शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा...