Home Blog Page 3104

५०० विद्रोही साहित्य ग्रंथाचे मोफत वाटप

0

पुणे-अखिल बोपोडी मातंग समाजाच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त फकिरा २०१८ पुरस्कार वितरण व ५०० विद्रोही साहित्य ग्रंथाचे मोफत वाटप माजी आमदार एल. टी. सावंत व माजी महापौर सुरेश शेवाळे यांच्याहस्ते करण्यात आले . बोपोडी येथील सिग्नल चौक येथे झालेल्या या कार्यक्रमास खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक मनीष आनंद , कार्यक्रमाचे संयोजक अखिल बोपोडी मातंग युवक संघटनेचे अध्यक्ष  अंकुश साठे , नगरसेवक प्रकाश ढोरे , नगरसेवक विजय शेवाळे , नगरसेविका सुनीता वाडेकर , माजी नागरसेविका शैलजा खेडेकर माजी नगरसेवक आनंद छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते .

      यावेळी  नवोदित लेखक व साहित्यिक  मोहनराव म्हस्के याना  “ विशेष पुरस्काराने “  सन्मानित करण्यात आले . तसेच शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या पुरोगामी विचाराचा युवा नेर्तृत्व दत्ता पोळ याना  “ फकिरा २०१८  पुरस्काराने  “ सन्मानित  करण्यात आले .

या कार्यक्रमास धोंडीराम गायकवाड , संजीवनी देवकुळे , सूर्यकांत सकट , राजेश शेंडगे , सुरेश पवार , संदिप शेंडगे , उत्तम शेंडगे , छोटू पिल्ले , शामराव गायकवाड , धनंजय जगताप , सुरेश ससाणे , सादिक शेख , रवी गायकवाड , पांडुरंग गायकवाड , बापू घेडे , जीवन घोंगडे , सुभाष पाडळे , राहुल शिंदे , रणजित गायकवाड , सिताराम गंगावणे , प्रकाश म्हस्के , दत्ता सूर्यवंशी , अशोक गायकवाड , उत्तम दिवटे , लहू भालेराव , काका कांबळे , अण्णा आठवले , विशाल कांबळे , अमर खंडागळे , आदींनी विशेष परिश्रम घेतले .

यावेळी माजी आमदार एल. टी. सावंत यांनी सांगितले कि , मातंग समाजामध्ये योग्य प्रकारचे परिवर्तन घडत असून इतर समाज बांधवानी अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करावी असे आवाहन त्यांनी  केले . यावेळी फकिरा पुरस्काराचे पुरस्कार्थी दत्ता पोळ यांनी सांगितले कि , या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली असून मला ती जबाबदारी पेलण्यास प्रोत्साहन मिळणार आहे .

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक गायकवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अखिल बोपोडी मातंग युवक संघटनेचे अध्यक्ष अंकुश साठे यांनी मानले .

डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन 9 ऑगस्ट क्रांती दिनी यशवंत सिन्हा यांच्या हस्ते

0
पुणे :डॉ. कुमार सप्तर्षी (संस्थापक युवक क्रांती दल) लिखित ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ या पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन येत्या 9 ऑगस्ट क्रांती दिनी ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या हस्ते होणार आहे.
‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’, ‘युवक क्रांती दल’ आणि ‘प्रफुल्लता प्रकाशन’ यांच्या संयुक्तविद्यमाने होणार्‍या या प्रकाशन कार्यक्रमाबाबत डॉ.कुमार सप्तर्षी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
ही पत्रकार परिषद शुक्रवारी दुपारी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झाली.
प्रकाशन सभारंभ गुरुवारी, ९ ऑगस्ट क्रांती दिनी, सायंकाळी ६ वाजता टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे. तिसरी आवृत्ती ‘प्रफुल्लता प्रकाशन’ यांनी प्रकाशित केली आहे.
१९७० च्या दशकात डॉ.कुमार सप्तर्षी यांना अनेक सामाजिक आंदोलनानंतर तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगवास ही इष्टापत्ती मानून डॉ. सप्तर्षी यांनी तुरुंगात घेतलेले अनुभव, वाचन, चर्चा आणि त्यांचा आयुष्यावर झालेला परिणाम याबाबत चे लेखन ‘ येरवडा विद्यापीठातील दिवस ‘ या पुस्तकात आहे.
क्रांती दिन आणि युवक क्रांती दलाच्या १७ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ पुस्तकाबाबत आपले विचार व्यक्त करणार आहेत.
बापूजींच्या पावन स्थळांना भेट देण्यासाठी यात्रेचे आयोजन 
२ ऑक्टोबर २०१८ पासून गांधीजींच्या जन्माला १५० वर्ष होत आहेत. त्यानिमित्त भारतीय स्वातंत्र्यलढा आणि गांधीजींच्या कार्याशी संबंधित ठिकाणांना भेट देणारी यात्रा काढली जाणार आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे यात्रेचे आयोजन केले जाणार आहे,अशी माहिती देखील या पत्रकार परिषदेत देण्यात आली
पत्रकार परिषदेला अन्वर राजन (महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव), रवी लाटे, आणि नितीन शास्त्री उपस्थित होते

स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो चा सुधारित आराखडा लवकरच – भिमाले

0

पुणे-स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो चा सुधारित आराखडा लवकरच करण्यात येईल असे येथे महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले आहे .काल त्यांनी स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गासाठी मेट्रो च्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्षात पाहणी केली .

यावेळी मेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रामाण्याम, प्रोजेक्ट डायरेक्टर सल्लागार हुकूमसिंग चौधरी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.प्रथम स्वारगेट तेथून उत्सव बिल्डींग (सिटी प्राईड सिनेमा जवळ ),मार्केट यार्ड ,गंगाधाम चौक ,केके मार्केट ,बालाजी नगर कात्रज असा मार्ग ठरविण्यात आला होता .पण मार्केट यार्ड येथील प्रस्तावित उड्डाण पुल, पुढे अप्पर झोपडपट्टी अशा अडथळ्यांमुळे अशा पद्धतीने मेट्रो होणे अवघड ठरल्याने स्वारगेट ते कात्रज मेट्रो भुयारी पद्धतीनेच व्हावी असे मत मेट्रोच्या अधिकाऱ्यांनीच नोंदविले .आणि त्याच अनुषंगाने थांबे कुठे असावेत याबाबत हि पाहणी करण्यात आली .

 

लोकमान्य टिळकांचे कार्य अनुकरनीय ….. नितीन पाटील

0
ओतुर – दि.४
लोकमान्य टिळक व साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे कार्य अनुकरनीय असल्याचे मत
श्री संत गाडगे महाराज मिशनचे संचालक नितीन पाटील यांनी विद्यालय येथे थोर स्वातंत्र्यसेनानी  लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच थोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
श्री.गाडगे महाराज विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती  उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली असल्याचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंगल साबळे यांनी सांगितले.

 या प्रसंगी श्री गाडगे महाराज मिशन ओतुर शाखेचे संचालक नितीन पाटील मुख्याध्यापिका मंगल साबळे पर्यवेक्षक डी.आर.चौधरी,ज्येष्ठ शिक्षक एस. एम. कडाळे, वाय. एन. कोटकर उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विद्यालयातील बालवक्त्यांनी आपल्या भाषणातून लोकमान्य टिळक व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली व त्यांच्या विचार कार्यातून आपण प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे सांगितले याप्रसंगी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची गाजलेली छक्कड ” माझीपण मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली ” !  सादर करून शिक्षक ए. बी. सोनोने यांनी उपस्थितांची मनं जिंकली संचालक नितीन पाटील यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील लोकमान्य टिळकांचे कार्य याविषयी अनमोल माहिती दिली तर मुख्याध्यापिका यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती देऊन त्यांचे विचार नव्या पिढीने आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते क्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत बोंबटकार यांनी केले तर कैलास महाजन यांनी आभार मानले.

आमदार मेधा कुलकर्णींच्या वक्तव्याबाबत खासदार काकडेंनी मागितली माफी

0

पुणे :आमदार मेधा कुलकर्णी यांनी मराठा आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आजही उमटले. खासदार संजय काकडे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु असताना मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोलन ही स्टंटबाजी असल्याचे वक्तव्य आमदार मेधा कुलकर्णी यांनी केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यावर खासदार संजय काकडे यांनी जर, आमदार मेधा कुलकर्णी असे बोलल्या असतील तर, त्यांच्या वतीने व भाजपच्या वतीने मी मराठा समाजाची माफी मागतो असे जाहीरपणे सांगितले. त्यावर मेधा कुलकर्णी यांनीच माफी मागितली पाहिजे. आपण माफी मागण्याची आवश्यकता नाही, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या लढ्यात मी शेवटपर्यंत आपल्यासोबत – खासदार संजय काकडे

आत्महत्या व अनुचित प्रकार न करण्याचे खासदार काकडेंचे भावनिक आवाहन

मराठा समाजात आर्थिकदृष्ट्या गरीब लोकांची संख्या मोठी आहे. त्यांना आरक्षणाची गरज आहे. आरक्षण मिळावे हीच माझी स्पष्ट भूमिका आहे. मराठा समाजाबरोबरच धनगर, मातंग समाजाचीही आरक्षणासंदर्भात मागणी आहे. सर्व समाजाला न्याय मिळालाच पाहिजे अशी माझी भूमिका आहे. या सर्व प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी पाठपुरावा केला असून यासाठीच्या लढ्यात मी शेवटपर्यंत आपल्याबरोबर असल्याचा विश्वास राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांना दिला. तसेच, आरक्षणासाठी मराठा बंधु-भगिनींपैकी कोणीही अनुचित प्रकार आणि आत्महत्या करू नये, असे भावनिक आवाहनही खासदार काकडे यांनी यावेळी केले.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी खासदार संजय काकडे यांच्या शिरोळे रस्त्यावरील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. घंटानाद व घोषणा सुरु असतानाच खासदार काकडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत ते आंदोलनात सहभागी झाले. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले.

मराठा समाजात आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांचे प्रमाण मोठे आहे. या कुटुंबातील लोकांसमोर रोजगार, शिक्षण असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे. कायदेशीर लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे हिंसा, जाळपोळ, आत्महत्यासारखे प्रकार मराठा समाजातील बंधु-भगिनींनी करू नयेत. शांततेत व अहिंसेच्या मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनास माझा पाठिंबा आहे. या लढाईत मी आपणासोबत शेवटपर्यंत असेन, असेही खासदार काकडे यांनी यावेळी सांगितले.

डॉ. के व्यंकटेशम यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला

0

पुणे-डॉ. के व्यंकटेशम यांनी आज (शुक्रवार) पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. मावळत्या पोलीस उपायुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडून पदभार स्विकारला.  

पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची बदली अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) म्हणून नियुक्ती करण्यात आली.  गृह विभागाने राज्यातील अकरा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश सोमवारी दुपारी दिले. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची बदली अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत येण्याची व कामाची संधी मिळाल्याने खूप आनंदी आहे़. त्याबरोबरच ही खूप मोठी जबाबदारी असल्याची जाणीव आहे, असे मत पोलीस आयुक्त डॉ़. के़.व्यंकटेशम यांनी व्यक्त केले़
डॉ़. व्यंकटेशम म्हणाले, पुणे शहरात शुक्ला यांनी खूप चांगले उपक्रम राबवत उल्लेखनीय काम केले आहे़. त्यांनी सुरु केलेले सर्व उपक्रम यापुढेही चालू ठेवण्यात येणार आहे. पुण्यातील बडी कॉप उपक्रम मी नागपूरमध्ये राबविला़ त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे़. पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी मी सदैैव तत्पर असेल. तसेच गुन्हेगारांनी त्यांचा रस्ता सोडावा, असे माझे आवाहन आहे़.
रश्मी शुक्ला म्हणाल्या, माझ्यासाठी आजचा दिवस संस्मरणीय आहे. कारण या समारंभाच्या निमित्ताने एक योगायोग जुळुन आला आहे़. व्यंकटेशम यांच्याकडून मी लॉ अँड आॅर्डरच्या पोलीस उपनिरीक्षक या पदाचा कार्यभार स्वीकारला होता़. आज पुणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यानंतर डॉ़. व्यंकटेशम यांचे सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी स्वागत केले. तसेच रश्मी शुक्ला यांना नव्या पदासाठी शुभेच्छा दिल्या़.

 

पुणे येथे हास्य-विनोद-आनंद महोत्सवाचे आयोजन

0

पुणे : हास्य-विनोद-आनंद महोत्सवाचे 7 ते 13 ऑगस्ट 2018 या कालावधीत दररोज 5.30 वाजता  आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान, विनोद विद्यापीठ, 1118-अ-1, लकाकी रोड, केदारनाथ मंदिरासमोर, शिवाजीनगर, येथे अयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष ॲड.बाबुराव कानडे यांनी केले आहे.

सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे: मंगळवार दि.7 ऑगस्ट  रोजी सायंकाळी 6.30 वाजता उद्घाटन व दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे योगेश मुळीक व श्रीमती मंगला गोडबोले यांच्या हस्ते होईल, बुधवार दि.8 ऑगस्ट रोजी सु.ल. खुटवड, गुरुवार दि. 9 ऑगस्ट रोजी श्रीमती सरोज देशपांडे, शुक्रवार दि.10 ऑगस्ट रोजी  मुकुंद टांकसाळे, शनिवार दि.11 ऑगस्ट रोजी  श्रीकांत बोजेवार, रविवार दि.12 ऑगस्ट रोजी डॉ.आनंद देशपांडे यांचे व्याख्यान दररोज सायंकाळी 6.30 वाजता होईल. सोमवार दि.13 ऑगस्ट  रोजी सायंकाळी 5.30 वाजता श्रीपाद ब्रम्हे यांचे व्याख्यान व त्यानंतर न्या. प्रमोद कोदे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होईल.

या महोत्सवात प्रत्येक दिवशी निरनिराळे सुप्रसिध्द विनोदी लेखक सहभागी होणार आहेत आणि त्यांची विनोदी पुस्तके विक्रीस उपलब्ध असून ग्राहकांस विनोदी लेखकाची स्वाक्षरी देखील मिळविण्याची एक संधी लाभणार आहे, असेही श्री. कानडे यांनी कळविले आहे.

शासनाच्या चालढकलीच्या निषेधार्थ दीड लाख राजपत्रित अधिकारी 7 ऑगस्‍ट पासून तीन दिवस संपावर……. पुणे जिल्हयातील दहा हजार अधिकारी सहभागी होणार…….

0

 पुणे-  प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाच्या वतीने सातत्याने होत असलेल्या चालढकलीच्या निषेधार्थ राज्‍यातील  राजपत्रित अधिकारी 7 ऑगस्‍ट पासून तीन दिवस संपावरजाणार असून पुणे जिल्हयातील दहा हजार अधिकारी सहभागी होणार असल्‍याची माहिती पुणे जिल्‍हा महाराष्ट्र राज्य, राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्‍यक्ष एन.पी.मित्रगोत्री तसेच     पुणे जिल्हा समन्वय समितीचे      सरचिटणीस इंजि. विनायक लहाडे यांनी दिली.

याबाबत अधिक असे की, सातत्याने व अभ्यासपूर्वक निवेदने पाठवून, तसेच  मुख्यमंत्री व  मुख्य सचिव यांच्याबरोबर झालेल्या अनेक बैठकीत आग्रही मागणी केल्यानंतरही सातवा वेतन आयोग लांबतच आहे, महागाई भत्ता वेळेवर मिळत नाही, महागाई भत्त्याची थकबाकी वाढतच आहे. 45 मिनिटे अधिक काम करण्याची तयारी दर्शवून देखील केंद्र शासनाच्या धर्तीवर तसेच आठ राज्यात लागू असलेल्या पाच दिवसांच्या आठवडयाची मागणी मान्य होत नाही, केंद्रात व 23 राज्यात सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे असतांना (दोन राज्यात तर 62 वर्षे), तसेच आपल्याच राज्यात काही संवर्गांना 62-65 वय असताना, राज्य शासकीय सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे हेच ठेवले आहे. सेवाभरतीसाठी वय 38 व 43 वर्षे असतांना सेवानिवृत्तीच्या वयात वाढ होत नाही, हा विरोधाभास आहे, रिक्त पदे जवळपास दोन लाखांपर्यंत आहेत आणि विविध मार्गांनी खाजगी भरती मात्र सुरु आहे. अशावेळी गप्प राहून अन्याय सहन करणे थांबवले पाहिजे. “अन्याय करणा-यांपेक्षा अन्याय सहन करणारे अधिक दोषी असतात’’ दमबाजी मारहाण करणा-या लोकप्रतिधिींचे प्रतिनिधीत्व रद्द करण्याची संबंधित कायदयात तरतूद झाली पाहिजे. “गणपती / दिवाळी या सणासुदीस 7 वा वेतन आयोग मिळणार’’ या शासनाकडून होणा-या फसव्या व दिशाभूल करणा-या घोषणा निराधार आहेत, याबाबत महासंघाची पूर्ण खात्री पटली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर, सातवा वेतन आयोग व  अन्य प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाच्या वतीने सातत्याने होत असलेल्या चालढकलीच्या निषेधार्थ  आंदोलन करणे क्रमप्राप्त झाले आहे. आंदोलनाबाबत चर्चाविनिमय करुन ठोस निर्णय घेण्यासाठी अधिकारी महासंघाने 31 जुलै पूर्वी चर्चेस बोलवावे असे आवाहन  मुख्यमंत्री यांना केले होते मात्र शासनाने त्यास प्रतिसाद दिला नाही. कार्यकारिणीची बैठक दि. 2 ऑगस्ट 2018 रोजी संपन्न झाली. या बैठकीमध्ये, शासनाच्या वेळकाढू धोरणाबाबत सर्व संघटनांच्या पदाधिका-यांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन तीन दिवस संप करण्याबाबत आग्रही भूमिका घेतली. त्या अनुषंगाने, 72 राजपत्रित अधिकारी संघटनांच्या महासंघाने एकमताने दि. 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2018 या तीन दिवसांच्या संपाचा निर्णय घेतला आहे.  सर्व अधिका-यांना संपात सहभागी व्हावे, असे आवाहनही    पुणे जिल्‍हा महाराष्ट्र राज्य, राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्‍यक्ष एन.पी.मित्रगोत्री तसेच   पुणे जिल्हा समन्वय समितीचे      सरचिटणीस इंजि. विनायक लहाडे यांनी केले  आहे.  

राज्यातील औद्योगिक वीजदर इतर राज्यांच्या समतूल्यच-महावितरण

0

कृषी ग्राहकांचाही वीजदर पुरवठा आकाराच्या 50 टक्केच

पुणे : राज्यातील महावितरणचे औद्योगिक वीजदर हे इतर राज्यांच्या समतूल्य असून कृषी ग्राहकांचे वीजदर सुद्घा सरासरी पुरवठा आकाराच्या 50 टक्केच आहे. वीजदर वाढीच्या प्रस्तावात औद्योगिक ग्राहकांसाठी फक्त 2 टक्क्यांपर्यंत दरवाढ तसेच औद्योगीक व वाणिज्यिक ग्राहकांच्या वाढीव वीजवापरावर 1 रुंपये प्रतियुनिट सवलत प्रस्तावित केली आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

दरवाढीच्या प्रस्तावानुसार नवीन औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांसाठी मूळ वर्गवारीपेक्षा 1 रुपये प्रतियुनिट कमी वीजदर प्रस्तावित असून 0.5 दशलक्ष युनिटपेक्षा अधिक वीजवापर करणाऱ्या ग्राहकांना वीजदरात 1 ते 10 टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर अधिक असल्याच्या आरोपांचे खंडन करीत महावितरणने इतर राज्याच्या तुलनेत हे दर कमीच असल्याचे स्पष्ट केले आहे. सन 2017-18 मध्ये उच्चदाब औद्योगिक वर्गवारीसाठी उपलब्ध सर्व सवलतींचा लाभ घेतल्यानंतर प्रत्यक्ष आकारणी अंती या ग्राहकांसाठी महावितरणचा सरासरी देयक दर 7.20 रुपये इतका आलेला आहे. या तुलनेत इतर राज्यातील उच्चदाब औद्योगिक वर्गवारीतील सरासरी देयक दर हे गुजरातमध्ये 7.22 रुपये, कर्नाटक – 7.73 रुपये, छत्तीसगड – 7.71 रुपये, तामीळनाडू – 8.37 रुपये, मध्यप्रदेश 7.69 रुपये आणि आंध्रप्रदेशमध्ये 7.30 रुपये असे आहेत. त्यामुळे महावितरणचे औद्योगिक दर हे इतर राज्याच्या समतुल्यच आहेत.

राज्य शासनाने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच डी व डी-प्लस क्षेत्रातील औद्योगिक ग्राहकांना वीजदरात विविध सवलती दिलेल्या आहेत. त्यानुसार विदर्भातील औद्योगिक ग्राहकांना 70 ते 192 पैसे, मराठवाड्यात 55 ते 130 पैसे, उत्तर महाराष्ट्रात 30 ते 60 पैसे तर डी व डी-प्लस मधील औद्योगिक ग्राहकांना 5 ते 25 पैसे प्रतियुनिट सवलत उपलब्ध आहे. या सवलतींमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर हे इतर राज्यांच्या तुलनेत कमी असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

यासोबतच राज्यातील कृषी ग्राहकांचे वीजदर हे सरासरी पुरवठा आकाराच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी आहेत. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात क्रॉस सबसिडी सर्वात जास्त आहेत. राष्ट्रीय वीजदर धोरण 2016 मधील मुख्य तरतुदीनुसार (सर्व वर्गवारीचे वीजदर हे सरासरी पुरवठा आकाराच्या +/- 20 टक्क्यांपर्यंत आणणे) क्रॉस सबसिडीचा भार कमी करण्यासाठी कृषी वर्गवारीच्या वीजदरात वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. सन 2017-18 मधील कृषी वर्गवारीसाठी सरासरी पुरवठा आकार व क्रॉस सबसिडीची तुलना केल्यास महाराष्ट्रातील कृषी वीजदर हे इतर राज्यांच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रात कृषी वीजदराची क्रॉस सबसिडी ही 3.65 रुपये आहे तर सरासरी पुरवठा आकार 6.61 रुपये आहे. इतर राज्यांमध्ये (कंसात सरासरी पुरवठा आकार) क्रॉस सबसिडी ही गुजरातमध्ये 2.45 (5.69) रुपये, तामिळनाडूमध्ये 2.97 (5.85) रुपये, पंजाबमध्ये 1.18 (6.24) रुपये, कर्नाटकमध्ये 1.45 (6.40) रुपये तर मध्यप्रदेशमध्ये 88 पैसे (6.25 रुपये) आहे.

महावितरणने सन 2018-19 साठी दाखल केलेला वीजदरवाढीचा प्रस्ताव योग्य व वस्तुस्थितीनुसार आहे. तसेच पुढील वर्षासाठी म्हणजे सन 2019-20 वर्षासाठी कोणतीही दरवाढ प्रस्तावित केलेली नाही असेही महावितरणकडून सांगण्यात आले.

तूट म्हणजे तोटा नाही अन्‌

थकबाकीसाठी दरवाढ नाही – वार्षिक महसुलाची गरज व अपेक्षीत महसूल यातील तफावत भरुन काढण्यासाठी विविध वर्गवारीसाठी वीजदर वाढीचा प्रस्ताव दिला जातो. परंतु महसुलाची गरज व अपेक्षीत महसुल यातील तफावतीला महसुली तूट असे संबोधले जात असले तरी ही तूट म्हणजे तोटा नाही. तसेच बिलिंग केलेली संपूर्ण रक्कम (प्रत्यक्ष वसुली झाली नसली तरीही) महसूल म्हणून महावितरणच्या लेखांमध्ये विचारात घेण्यात येते. त्याप्रमाणे बिलिंग केलेली संपूर्ण रक्कम महसुलामध्ये विचारात घेण्यात आली असल्याने थकबाकीचा महसुली तुटीवर किंवा वीजदर वाढीवर कुठलाही परिणाम होत नाही. त्यामुळे थकबाकीचा व दरवाढीचा कोणताही संबंध नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

सुजाता शिंदे यांच्या स्मृती प्रित्यर्थ अनाथ आश्रमास धान्य वाटप

0

पुणे-सुजाता शिंदे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दुचाकी वाहनासाठी मोफत प्रदुर्षण चाचणी शिबीर घेण्यात आले . यावेळी मोफत पी. यु. सी. प्रमाणपत्र वाटप करण्यात आले . तसेच स्पर्श या  अनाथ आश्रमास धान्य वाटप करण्यात आले . तसेच अनाथ आश्रमातील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले .

         कोथरूडमधील महर्षी धोंडो केशव कर्वे पुतळा चौकात झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय मायनॉरिटी सुरक्षा महासंघ पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख संघटक निलेश थोरात , संयोजक महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष कल्याण अडागळे यांनी केले होते . या कार्यक्रमास कोथरूड वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी , गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली जाधव , पुणे वृत्तपत्र संघाचे अध्यक्ष विजय पारगे , उपाध्यक्ष दत्ता पिसे , भारतीय मायनॉरिटी सुरक्षा महासंघ पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मारुती कदम , राष्ट्रीय उपाध्यक्ष अमित कांबळे , महाराष्ट्र प्रदेश  महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा रंजना पेडणेकर , महिला प्रदेश उपाध्यक्ष वंदना अडागळे ,सामाजिक कार्यकर्त्या  सुनिता उरणकर , पुणे शहर अध्यक्षा माधुरी शिंदे ,पुणे जिल्हा अध्यक्षा पूनम सुपेकर ,  पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमिर शेख , महेंद्र उभे , सचिन लोखंडे , तुषार भगत , सचिन थोरात , व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

0

पुणे-भवानी ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ  व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला . भवानी पेठमधील राजेवाडीमध्ये झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अविनाश बागवे , नगरसेवक प्रदीप गायकवाड , नगरसेविका सुजाता शेट्टी , नगरसेविका लता राजगुरू , कार्यक्रमाचे संयोजक भवानी ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अक्षय अवचिते यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साहिल चव्हाण , अशितोष काळोखे , सोहेल खान , देवेंद्र गोरखे व किशोर काळोखे  आदींनी विशेष परिश्रम घेतले .

      कार्यक्रमाचे प्रास्तविक व उपस्थितांचे स्वागत अक्षय अवचिते ,  सूत्रसंचालन रविंद्र साळुंके यांनी केले तर आभार स्वप्नील सकट यांनी मानले . या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .

पालिकेच्या आवारातच नगरसेवकाला हिसका (व्हिडीओ)

0

पुणे -न्यायाधीशांच्या मोटारीसाठी असलेल्या आरक्षित पार्किंगच्या जागेत नगरसेवकाची मोटार लावण्यात आली .आणि नंतर या मोटारीला जामर लावून कारवाई करण्यात आली .
हा प्रकार खुद्द महापालिकेच्या आवारातच घडला. पार्किंगच्या समस्येने महापालिकेच्या दारातच उग्र स्वरूप धारण केलेले आहे .महापालिकेच्या मुख्य भवनासमोर आणि इमारतीलगत नो पार्किंग चे फलक लावून २० वर्षाहून अधिक काळ ते झुगारून येथे वाहनचालकांना नाईलाजाने पार्किंग करावे लागते आहे . वाहने उभी करण्यास जागाच उरत नाही अशी परिस्थिती आहे . अशा स्थितीत महापालिकेच्या इमारतीत असलेल्या न्यायालयाच्या न्यायमुर्तींसाठी राखीव असलेल्या पार्किंगच्या जागेवर  नगरसेवकाची मोटार दिसली आणि त्यावर कारवाई करण्यात आल्याचे दिसून आले आहे …..हि मोटार कोणत्या नगरसेवकाची आहे .कारवाई कशी आणि कोणी केली याबाबतची माहिती मात्र जागेवर उपलब्ध होऊ शकली नाही …..

नगर-कल्याण महामार्गावर झालेल्या अपघातात एक जण ठार

0
ओतुर – (sanjok kaldante)
 नगर – कल्याण महामार्गावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार अशोक हरिभाऊ गांगड (वय २२ रा.लागाचा घाट,ब्राम्हणवाडा,ता.अकोले,जि.अहमदनगर) हा युवक जागीच ठार झाला असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार के. एम. पाटोळे यांनी दिली
हा अपघात शुक्रवारी(दि.३) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झाला याबाबत अधिक माहिती अशी की अशोक गांगड हा युवक दुचाकी क्र एम.एच.१७ वाय११०२ वरून ओतुर कडून आळेफाटा बाजूकडे जात असताना समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम.एच.१२ के.पी. ९००७ ची डुंबरवाडी टोल नाक्याजवळ समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील अशोक हरिभाऊ गांगड हा युवक जागीच ठार झाला.

याबाबत अधिक तपास ओतुर पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार विकास गोसावी करीत आहेत.

जातीच्या निर्मूलनासाठी आंतरजातीय विवाह महत्वाचे

0

पुणे,- घटनेने दिलेले स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही त्रिसूत्री पुढे नेण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक उन्नतीसाठी आंतरजातीय विवाह महत्वाचे आहेत. त्यामुळे समाजातून जातीचे निर्मूलन होण्यास होईल व मानवता निर्माण होईल असे मत आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांच्या मुलाखतीतून उलगडले.
सावित्रीबाई ङ्गुले पुणे विद्यापीठाचे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ङ्गर्ग्युसन महाविद्यालय यांच्या वतीने ‘जातिभेदमुक्त विकसित भारत अभियानांतर्गत’ ‘आधी केले मग सांगितले’ हा आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार व मुलाखतीचा कार्यक‘म आयोजित करण्यात आला होता.
पद्मश्री मिलिंद कांबळे व सीमा डॉ. राजेंद्र हिरेमठ व लता, ज्योतीराव ङ्गुले यांचा एकपात्री प्रयोग सादर करणारे कुमार आहेर व तेजल आणि रंगभूषाकार करण थत्ते व स्वराली यांच्या डॉ. जयंत कुलकर्णी यांनी मुलाखती घेतल्या. विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी, अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी होते.
समाज व्यवस्थेला जातीय आवरण आहे, लग्न करताना जातीचा अडसर न आणता खर्‍या प्रेमाचा विचार व्हावा, एकमेकांची साथ व विश्‍वास महत्वाचा, मुलींना तडजोडी स्वीकाराव्या लागतात, समजावून घ्यायला बराच काळ जावा लागतो, तेव्हा संसार सुरू होतो, पालकांचा विरोध कशासाठी हे समजावून घेणे महत्वाचे असते, स्वभाव, प्रतिष्ठा व अहंकारातून झालेला विचार तारतम्य दाखवला तर कमी करता येतो आणि घाई न करता परिस्थिती समजावून घेतली पाहिजे. या सर्व गोष्टी चांगल्या पध्दतीने स्वीकारुन आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिल्यास जागतीकरणात जातीला थारा नाही असेही विचार या मुलाखतीतून व्यक्त करण्यात आले.
डॉ. सुनील भंडगे यांनी प्रास्ताविक भाषण केले, डॉ. प्रशांत साठे यांनी सूत्रसंचालन केले, डॉ. ज्ञानेश्‍वर कुंभार यांनी आभार मानले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त या कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले होते.

शेकडो टन मासे ,मटण, कोंबड्या फस्त;पण कचराविल्हेवाटीसाठी पालिकेचे नियोजन शून्य !

0
स्वतंत्र यंत्रणा विकसित करा :मा. उपमहापौर आबा बागुल  यांची  प्रशासनाला सूचना 
पुणे –
सध्या आषाढ महिन्यामुळे दररोज मोठ्याप्रमाणावर कोंबड्या ,मासे आणि मटणाची उलाढाल वाढली आहे मात्र त्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची स्वतंत्र यंत्रणाच पालिकेकडे  नसल्याची वस्तुस्थिती उघडकीस आली आहे. परिणामी दुर्गंधी, रोगराईमुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी तातडीने स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याची मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. 
यासंदर्भात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,  सध्या आषाढ महिना सुरु आहे आणि मटण ,मासे ,कोंबड्यांची आवक वाढली आहे .  त्यामुळे दररोज कित्येक  टन कोंबड्या, मासे , मटण पुणेकर फस्त करीत आहेत. केवळ आखाड नव्हे तर वर्षभर  कोंबड्या, मासे , मटण याची उलाढाल मोठी असते मात्र त्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाटीबाबत स्वतंत्र अशी यंत्रणा पालिकेची नाही. परिणामी या कचऱ्यामुळे रोगराई आणि दुर्गंधीचे प्रमाणही वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. 
मासे ,मटण , कोंबड्यांची विक्री करणारे व्यावसायिक निर्माण होणारा कचरा सरसकट कचरापेटीत टाकतात . साहजिकच कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्याने कधी कधी आंदोलनाला सामोरे जाण्याची स्थिती शहरावर  ओढवते. वास्तविक यासाठी बंदिस्त वाहनांची यंत्रणा असणे आवश्यक आहे आणि मटण ,मासे ,कोंबड्या यातून निर्माण होणाऱ्या शेकडो टन कचऱ्याचा वापर मत्सालय किंवा अन्य ठिकाणी  होणे सहजशक्य आहे. त्यामुळे  दररोज निर्माण होणाऱ्या शेकडो टन कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी तातडीने   बंदिस्त वाहने घेऊन स्वतंत्र यंत्रणा विकसित करावी अशी सूचना  आबा बागुल यांनी प्रशासनाला केली आहे.