पुणे-अखिल बोपोडी मातंग समाजाच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त फकिरा २०१८ पुरस्कार वितरण व ५०० विद्रोही साहित्य ग्रंथाचे मोफत वाटप माजी आमदार एल. टी. सावंत व माजी महापौर सुरेश शेवाळे यांच्याहस्ते करण्यात आले . बोपोडी येथील सिग्नल चौक येथे झालेल्या या कार्यक्रमास खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक मनीष आनंद , कार्यक्रमाचे संयोजक अखिल बोपोडी मातंग युवक संघटनेचे अध्यक्ष अंकुश साठे , नगरसेवक प्रकाश ढोरे , नगरसेवक विजय शेवाळे , नगरसेविका सुनीता वाडेकर , माजी नागरसेविका शैलजा खेडेकर माजी नगरसेवक आनंद छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी नवोदित लेखक व साहित्यिक मोहनराव म्हस्के याना “ विशेष पुरस्काराने “ सन्मानित करण्यात आले . तसेच शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या पुरोगामी विचाराचा युवा नेर्तृत्व दत्ता पोळ याना “ फकिरा २०१८ पुरस्काराने “ सन्मानित करण्यात आले .
या कार्यक्रमास धोंडीराम गायकवाड , संजीवनी देवकुळे , सूर्यकांत सकट , राजेश शेंडगे , सुरेश पवार , संदिप शेंडगे , उत्तम शेंडगे , छोटू पिल्ले , शामराव गायकवाड , धनंजय जगताप , सुरेश ससाणे , सादिक शेख , रवी गायकवाड , पांडुरंग गायकवाड , बापू घेडे , जीवन घोंगडे , सुभाष पाडळे , राहुल शिंदे , रणजित गायकवाड , सिताराम गंगावणे , प्रकाश म्हस्के , दत्ता सूर्यवंशी , अशोक गायकवाड , उत्तम दिवटे , लहू भालेराव , काका कांबळे , अण्णा आठवले , विशाल कांबळे , अमर खंडागळे , आदींनी विशेष परिश्रम घेतले .
यावेळी माजी आमदार एल. टी. सावंत यांनी सांगितले कि , मातंग समाजामध्ये योग्य प्रकारचे परिवर्तन घडत असून इतर समाज बांधवानी अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करावी असे आवाहन त्यांनी केले . यावेळी फकिरा पुरस्काराचे पुरस्कार्थी दत्ता पोळ यांनी सांगितले कि , या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली असून मला ती जबाबदारी पेलण्यास प्रोत्साहन मिळणार आहे .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक गायकवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अखिल बोपोडी मातंग युवक संघटनेचे अध्यक्ष अंकुश साठे यांनी मानले .