पुणे :डॉ. कुमार सप्तर्षी (संस्थापक युवक क्रांती दल) लिखित ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ या पुस्तकाच्या तिसर्या आवृत्तीचे प्रकाशन येत्या 9 ऑगस्ट क्रांती दिनी ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या हस्ते होणार आहे.
‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’, ‘युवक क्रांती दल’ आणि ‘प्रफुल्लता प्रकाशन’ यांच्या संयुक्तविद्यमाने होणार्या या प्रकाशन कार्यक्रमाबाबत डॉ.कुमार सप्तर्षी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
ही पत्रकार परिषद शुक्रवारी दुपारी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झाली.
प्रकाशन सभारंभ गुरुवारी, ९ ऑगस्ट क्रांती दिनी, सायंकाळी ६ वाजता टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे. तिसरी आवृत्ती ‘प्रफुल्लता प्रकाशन’ यांनी प्रकाशित केली आहे.
१९७० च्या दशकात डॉ.कुमार सप्तर्षी यांना अनेक सामाजिक आंदोलनानंतर तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगवास ही इष्टापत्ती मानून डॉ. सप्तर्षी यांनी तुरुंगात घेतलेले अनुभव, वाचन, चर्चा आणि त्यांचा आयुष्यावर झालेला परिणाम याबाबत चे लेखन ‘ येरवडा विद्यापीठातील दिवस ‘ या पुस्तकात आहे.
क्रांती दिन आणि युवक क्रांती दलाच्या १७ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ पुस्तकाबाबत आपले विचार व्यक्त करणार आहेत.
बापूजींच्या पावन स्थळांना भेट देण्यासाठी यात्रेचे आयोजन
२ ऑक्टोबर २०१८ पासून गांधीजींच्या जन्माला १५० वर्ष होत आहेत. त्यानिमित्त भारतीय स्वातंत्र्यलढा आणि गांधीजींच्या कार्याशी संबंधित ठिकाणांना भेट देणारी यात्रा काढली जाणार आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे यात्रेचे आयोजन केले जाणार आहे,अशी माहिती देखील या पत्रकार परिषदेत देण्यात आली
पत्रकार परिषदेला अन्वर राजन (महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव), रवी लाटे, आणि नितीन शास्त्री उपस्थित होते