पुणे : हास्य-विनोद-आनंद महोत्सवाचे 7 ते 13 ऑगस्ट 2018 या कालावधीत दररोज 5.30 वाजता आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान, विनोद विद्यापीठ, 1118-अ-1, लकाकी रोड, केदारनाथ मंदिरासमोर, शिवाजीनगर, येथे अयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष ॲड.बाबुराव कानडे यांनी केले आहे.
सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे: मंगळवार दि.7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वाजता उद्घाटन व दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे योगेश मुळीक व श्रीमती मंगला गोडबोले यांच्या हस्ते होईल, बुधवार दि.8 ऑगस्ट रोजी सु.ल. खुटवड, गुरुवार दि. 9 ऑगस्ट रोजी श्रीमती सरोज देशपांडे, शुक्रवार दि.10 ऑगस्ट रोजी मुकुंद टांकसाळे, शनिवार दि.11 ऑगस्ट रोजी श्रीकांत बोजेवार, रविवार दि.12 ऑगस्ट रोजी डॉ.आनंद देशपांडे यांचे व्याख्यान दररोज सायंकाळी 6.30 वाजता होईल. सोमवार दि.13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजता श्रीपाद ब्रम्हे यांचे व्याख्यान व त्यानंतर न्या. प्रमोद कोदे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होईल.
या महोत्सवात प्रत्येक दिवशी निरनिराळे सुप्रसिध्द विनोदी लेखक सहभागी होणार आहेत आणि त्यांची विनोदी पुस्तके विक्रीस उपलब्ध असून ग्राहकांस विनोदी लेखकाची स्वाक्षरी देखील मिळविण्याची एक संधी लाभणार आहे, असेही श्री. कानडे यांनी कळविले आहे.