पुणे -न्यायाधीशांच्या मोटारीसाठी असलेल्या आरक्षित पार्किंगच्या जागेत नगरसेवकाची मोटार लावण्यात आली .आणि नंतर या मोटारीला जामर लावून कारवाई करण्यात आली .
हा प्रकार खुद्द महापालिकेच्या आवारातच घडला. पार्किंगच्या समस्येने महापालिकेच्या दारातच उग्र स्वरूप धारण केलेले आहे .महापालिकेच्या मुख्य भवनासमोर आणि इमारतीलगत नो पार्किंग चे फलक लावून २० वर्षाहून अधिक काळ ते झुगारून येथे वाहनचालकांना नाईलाजाने पार्किंग करावे लागते आहे . वाहने उभी करण्यास जागाच उरत नाही अशी परिस्थिती आहे . अशा स्थितीत महापालिकेच्या इमारतीत असलेल्या न्यायालयाच्या न्यायमुर्तींसाठी राखीव असलेल्या पार्किंगच्या जागेवर नगरसेवकाची मोटार दिसली आणि त्यावर कारवाई करण्यात आल्याचे दिसून आले आहे …..हि मोटार कोणत्या नगरसेवकाची आहे .कारवाई कशी आणि कोणी केली याबाबतची माहिती मात्र जागेवर उपलब्ध होऊ शकली नाही …..
पालिकेच्या आवारातच नगरसेवकाला हिसका (व्हिडीओ)
Date: