Home Blog Page 3102

बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत पुणे ओपन स्ट्राईकिंग जॅगवार्स संघाचा बाद फेरीत प्रवेश

0

पुणे, 8 ऑगस्ट 2018-पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना  (पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत   पुणे ओपन  स्ट्राईकिंग जॅगवार्स संघाने  बीआयपीएल रायजिंग ईगल्स संघाचा पराभव करत बाद फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत  पुणे ओपन  स्ट्राईकिंग जॅगवार्स संघाने बीआयपीएल रायजिंग ईगल्स संघाचा  43-27 असा मोठा पराभव करत स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला.  सिया प्रसादे,  सुर्या काकडे,  पुर्वा भुजबळ,  मधुरीमा सावंत,  अनर्घ गांगुली,  मृण्मयी भागवत,  अन्या जेकब व अमोद सबनिस यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून देत बाद फेरीत प्रवेश केला. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी

पुणे ओपन  स्ट्राईकिंग जॅगवार्स  वि.वि बीआयपीएल रायजिंग ईगल्स- 43-27

( एकेरी: 10वर्षाखालील मुली: सिया प्रसादे वि.वि आहना कुलकर्णी 4-0,  10वर्षाखालील मुले: सुर्या काकडे वि.वि निव कोठारी 4-2,  12वर्षाखालील मुली: पुर्वा भुजबळ वि.वि क्षिरीन वाकणकर 6-1,  12वर्षाखालील मुले:  देवेन चौधरी पराभुत वि अर्णव पापरकर 0-6,  14वर्षाखालील मुली:  मधुरीमा सावंत वि.वि माही शिंदे 6-0,  14वर्षाखालील मुले: अनर्घ गांगुली वि.वि आर्यन देवकर 6-1,  16वर्षाखालील मुली: मृण्मयी भागवत वि.वि मोहिनी घुले 6-1,  16वर्षाखालील मुले: इंद्रजीत बोराडे पराभुत वि दक्ष अगरवाल 1-6, मिश्र दुहेरी- अन्या जेकब/ अमोद सबनिस वि.वि रिया वाशिमकर/केयुर म्हेत्रे 6-4, मिश्र दुहेरी- अर्जुन अभ्यंकर/ मृण्मयी भागवत पराभुत वि दक्ष अगरवाल/ मोहिनी घुले 4-6)

टाटा पॉवर झाले व्होडाफोन मिनी स्टोअर्समध्ये वीजबिल भरण्याची सुविधा देऊ करणारे पहिले वीजकेंद्र

पुणे-टाटा पॉवर या भारतातील सर्वांत मोठ्या एकात्मिक वीजकंपनीचा आपल्या ग्राहकांना मूल्यवर्धित लाभ देण्यासाठी नवकल्पना व तंत्रज्ञानाच्या उपयोग करण्यात नेहमीच पहिला क्रमांक राहिला आहे. या वचनबद्धतेशी सुसंगती राखत टाटा पॉवरने व्होडाफोनशी भागीदारी करून आपल्या ग्राहकांना व्होडाफोन एम-पेसा ई-वॉलेटच्या माध्यमातून बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या अनोख्या सुविधेमुळे टाटा पॉवरच्या ग्राहकांना वीजबिले तत्काळ व सुलभ पद्धतीने भरणे शक्य होईल. ही सुविधा मुंबईभर सोयीस्कर ठिकाणी असलेल्या १५०हून अधिक सर्व व्होडाफोन मिनी स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे.

 भारत सरकारच्या डिजिटल इंडिया या उपक्रमाशी सुसंगती राखत टाटा पॉवरने मुंबईत व्होडाफोनशी भागीदारी केली आहे. यामुळे ग्राहक त्यांच्या सोयीने घर/कार्यालय आदी मार्गांवरील प्रवासादरम्यान व्यवहार करत, विजेचे बिल भरू शकतील आणि त्यायोगे डिजिटल पेमेंटला उत्तेजन मिळेल. स्मार्टफोन्सव्यतिरिक्त ई-वॉलेट फीचर उपलब्ध असलेल्या नॉन-स्मार्टफोन्सद्वारेही डिजिटल पद्धतीने बिल भरले जाऊ शकेल. टाटा पॉवरचे उपभोक्ते मुंबईभर पसरलेल्या व्होडाफोन मिनी स्टोअर्सपैकी कोणत्याही स्टोअरमध्ये प्रत्यक्ष जाऊन, काउंटरवर आपले बिल दाखवून, रोख भरणाही करू शकतात.

या सुविधेबद्दल टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रवीर सिन्हा म्हणाले,  “आम्ही, टाटा पॉवरमध्ये, एकंदर ग्राहकसेवा आणि ग्राहकांचा अनुभव यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर सतत काम करत असतो. या सुविधेच्या मदतीने ग्राहकांच्या सोयीसाठी पैसे भरण्याचे अतिरिक्त मार्ग उपलब्ध करून देऊन टाटा पॉवर शहरातील वीज बिले भरण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणणार आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना बिल भरण्याचे अधिक सुरक्षित पर्याय उपलब्ध होतील आणि त्यामुळे देशातील आर्थिक समावेशनातही योगदान दिले जाईल. टाटा पॉवरच्या भागधारकांच्या एकूण अनुभवात यामुळे मोठी भर पडेल याबद्दल टाटा पॉवरला आत्मविश्वास आहे. टाटा पॉवरशी व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही यापुढेही बांधील राहू.”

वीजदर निश्चितीकरणासाठी पुण्यात गुरुवारी जाहीर सुनावणी

0

पुणे : एकूण महसुली गरज व वीजदराच्या निश्चितीकरणासाठी दाखल केलेल्या मध्यावधी आढावा याचिकेवर मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या वतीने गुरुवारी (ता. 9 ऑगस्ट) कौन्सील हॉलमध्ये जाहीर सुनावणी होणार आहे. या सुनावणीला सकाळी 10 वाजता प्रारंभ होईल.

महावितरणने आर्थिक वर्ष 2015-16 व 2016-17 चे अंतिम समायोजन, आर्थिक वर्ष 2017-18 चे तात्पुरते समायोजन आणि आर्थिक वर्ष 2018-19 व 2019-20 करिता सुधारीत एकूण महसुली गरज आणि वीजदराच्या निश्चितीकरणासाठी मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे मध्यावधी आढावा याचिका दाखल केली आहे. या याचिकेसंदर्भात जाहीर सुनावणी होणार आहे.

मुनीश्री पुलकसागरजी महाराज यांच्या प्रवचनांचा ज्ञानगंगा महोत्सव

0

पुणे-आपल्या प्रखर वाणीने आणि तेजस्वी विचारांनी देशभर पायी अनवाणी फिरून धर्म जागरण व समाज प्रबोधन करणारे दिगंबर जैन मुनीश्री प.पू.१०८ पुलकसागरजी महाराज यांचा चातुर्मास पुण्यात सुरु झाला आहे. ‘ज्ञानयज्ञ का मंगल सोहळा – संस्कारो का शंखनाद’ अशा शब्दात गौरवल्या जाणाऱ्या त्यांच्या प्रखर प्रवचनांचा ‘ज्ञानगंगा महोत्सव’ दि.१२ ऑगस्टपासून धर्मानुरागी रसिकलाल एम धारीवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलानजीक, पुणे येथे सुरु होत आहे. धर्मजागरण व समाजप्रबोधन यावर विशेष भर असणारी प्रवचनांची ही मालिका सलग २३ दिवस म्हणजे ३ सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी ८:१५ ते १०:०० या वेळेत संपन्न होईल. ‘जिनवाणी’ वाहिनीवरून याचे रोज थेट प्रक्षेपण केले जाणार आहे अशी माहिती सकल जैन वर्षायोग समितीच्या अध्यक्षा श्रीमती शोभा धारीवाल व कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी समितीचे उपाध्यक्ष चकोर गांधी, उपाध्यक्ष सुजाता शहा,सचिव जितेंद्र शहा,सचिव शमा अजमेरा,खजिनदार उत्कर्ष गांधी, खजिनदार विरकुमार शहा आदी उपस्थित होते.

    ज्ञानगंगा महोत्सवाचे उद्घाटन मुनीश्रींच्या उपस्थितीत १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८:१५ वाजता होईल. त्यावेळी मुनीश्रींची एकूण १६ पुस्तकेही प्रकाशित केली जातील. तसेच मुनिश्रींच्या पुण्यातील चातुर्मासानिमित्त आयोजित विविध घटना व उपक्रमांवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटनही यावेळी होईल. या प्रवचनांसाठी रोज ५००० हजारहून अधिक भाविक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. त्यासाठी पुणे व परिसर आणि महाराष्ट्र व देशातूनही अनेक जैन भाविक येणे अपेक्षित आहे. पुणे व परिसरातील जैन व जैनेतर भाविकांना मुनिश्रींच्या प्रवचनांचा लाभ मिळावा यासाठी संयोजकांतर्फे विविध ठिकाणाहून विनामूल्य बसेसची सोय करण्यात आली आहे.त्यामध्ये निगडी,आकुर्डी,पिंपरी-चिंचवड,वाकड,हिंजेवाडी,सुस,हडपसर,पिंपळे सौदागर,खराडी,विमाननगर आदी भागातून बसेस सोडण्यात येतील.आणि याच बसेस द्वारा त्यांना परत जाण्याचीही सोय करण्यात आली आहे.सर्व भाविकांची विनामूल्य भोजनाची सोय करण्यात आली आहे. अशी माहिती श्रीमती शोभा धारीवाल आणि मिलिंद फडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

      या पत्रकार परिषदेनंतर मुनीश्री पुलक सागर जी महाराज यांची पत्रकारांनी भेट घेतली.या वेळी पत्रकारांना आपली पुस्तके भेट देऊन मुनीश्री म्हणाले की,माणसा माणसा मधील स्नेह वाढला पाहिजे,नैतिकता आणि माणुसकी ही अध्यात्मिक शांतीच्या दृष्टीने आवश्यक आहे.राष्ट्रप्रेमानी तरुणानी भारुन गेले पाहिजे त्यासाठी सत्संगाची गरज आहे.असे सांगून मराठी ही भाषा देखील अतिशय गोड आहे असे सांगत त्यांनी समारोप केला.

    या चातुर्मासानिमित्य अनेक मान्यवर मुनिश्रींची भेट घेणार असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी येण्याचे मान्य केले आहे.असे सांगून मिलिंद फडे व शोभा धारिवाल म्हणाल्या की,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुनिश्रींची भेट घेतली असून प्रवचनांसाठी पुन्हा     येणार असल्याचे सांगितले आहे.याशिवाय आर एम धारिवाल फाउंडेशनतर्फे शिष्यवृत्ती दिलेल्या ज्या जैनेतर विद्यार्थ्यांनी मांसाहाराचा त्याग करून शाकाहाराची शपथ घेतली अशा सुमारे १५० ते २०० विद्यार्थ्यांचा सत्कार १५ ऑगस्ट रोजी सकळी चातुर्मास स्थळी होणार आहे.दि.१७ ऑगस्ट रोजी भगवान पार्श्वनाथ महानिर्वाण दिन साजरा केला जाणार असून त्यानिमित्त्य सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग दिगंबर जैन मंदिर येथून भव्य शोभायात्रा निघून राजाराम पुलानाजीकच्या चातुर्मास मंडपात येईल.दि.१८ ऑगस्ट रोजी महिलांचे कॅन्सर निदान शिबीर आयोजित करण्यात आले असून दि २० ऑगस्ट रोजी राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा केला जाणार आहे. दि २५ ऑगस्ट रोजी फेलीसिनियावर तज्ञ डॉक्टरांकडून विशेष मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.   

      मुनीश्री पुलकसागरजी महाराज यांची ही २३ प्रवचने सामाजिक, पारिवारिक ,राष्ट्रप्रेम अशा विविध गटांमध्ये विभागली असून त्यांचे विषय पुढीलप्रमाणे- आईशिवाय कोणी मोठा नाही, भाऊ नसता तर, मुलीचे घर, स्वातंत्र्याचा महोत्सव, मित्र कसा असावा, म.पार्श्वनाथ निर्वाशोत्सव, प्रेम म्हणजे जीवनाचा महामंत्र, मुली वाचवा, उत्तम करियर, असे बोलावे, रागावर नियंत्रण कसे मिळवावे, वृद्धत्वात कसे जगावे, यमराजाची चिठ्ठी, आम्ही उद्याची चिंता करीत नाही, वात्सल्य दिवस, गुजराण कशी करावी, नम्रपणे जगण्याची कला, एक थेंब पाणी, वसियतनाम, मांसाहार हा अपराध, समाज निर्वाण, बाटलीचे तुफान.

     अशा विविध विषयांवर होणारी मुनिश्रींची ही प्रवचने हिंदी भाषेतून होतील. ‘सिर्फ जैनों का ही नही जन जन का आमंत्रण है’ अशा शब्दात मुनिश्रींच्या या प्रवचनांचे महत्व श्रीमती शोभा धारीवाल आणि मिलिंद फडे यांनी विशद केले. या कालावधीत आर एम धारीवाल फाऊंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचेही रोज दिवसभर आयोजन होणार आहे. रोज सायंकाळी भगवान व मुनिश्रींची आरती होईल.

हास्‍य-विनोद-आनंदमहोत्‍सवाचे मंगला गोडबोले यांच्‍या हस्‍ते उद्घाटन

0

पुणे-आचार्य अत्रे यांनी ज्‍या-ज्या क्षेत्रात पाऊल ठेवले तिथे-तिथे स्‍वत:चे वेगळे स्‍थान निर्माण केले, अशा शब्‍दात सुप्रसिध्‍द लेखिका मंगला गोडबोले यांनी आचार्य अत्रे यांच्‍या कार्याचा गौरव केला. आचार्य अत्रे स्‍मृति प्रतिष्‍ठानच्‍यावतीने हास्‍य-विनोद-आनंदमहोत्‍सवाच्‍या  उद्घाटन प्रसंगी त्‍या बोलत होत्‍या.  यावेळी प्रतिष्‍ठानचे संस्‍थापक अध्‍यक्ष अॅड. बाबूराव कानडे, राजश्री दवणी, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग उपस्थित होते.

श्रीमती गोडबोले  यांनी मराठी साहित्यातील विनोद परंपरेचा व्‍यापक आढावा सादर केला. लिळा चरित्रातही विनोदाचे स्‍थान आढळून येते. संत काव्‍यात, संस्‍कृत नाटकातही विनोद आढळून येतो.  बाईने चेष्‍टा करणे तत्‍कालिन समाजाला मान्‍य नसल्‍याने संस्‍कृत नाटकात  विदुषक हा पुरुषच दिसून येतो.  लोकसाहित्यातील उखाणे, जात्‍यावरील गाणी हे विनोदाचेच एक अंग आहे. विनोदी परंपरा प्राचीन असल्‍याचे सांगून  विनोदासाठी उत्‍स्फूर्तता आणि बुध्‍दीमत्‍ता लागत असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यकत केले.  शि. म. परांजपे, ह.ना.आपटे, श्री.कृ. कोल्‍हटकर, रा. ग. गडकरी, चिं.वि. जोशी, दत्‍तू बांदेकर, पु.ल. देशपांडे आणि आचार्य अत्रे यांनी  विनोदी साहित्याला दिलेल्या योगदानाचा त्‍यांनी  गौरवाने उल्‍लेख केला. यावेळी गोडबोले यांनी विनोदी प्रसंग, किस्‍से सांगून विनोदाचे प्रकार सोदाहरण स्‍पष्‍ट केले.

अॅड कानडे यांनी प्रास्‍ताविकात  हास्‍य-विनोद-आनंदमहोत्‍सवाच्‍या आयोजनामागचा हेतू सांगितला. आचार्य अत्रे म्‍हणजे प्रज्ञा आणि प्रतिभेची गरुडझेपच होती. त्‍यांचा जन्‍म दिन 13 ऑगस्‍ट हा अखिल भारतीय मराठी विनोद दिन म्‍हणून साजरा करण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. प्रारंभी आचार्य अत्रे यांच्‍या प्रतिमेस पुष्‍पहार अर्पण करण्‍यात आला.  कार्यक्रमास अनेक रसिक उपस्थित होते.

मराठा समाजाला आरक्षण देण्‍याच्‍या मागणीबाबत प्रशासन सकारात्‍मक – जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

0

पुणे- मराठा समाजाला आरक्षण देण्‍याच्‍या मागणीबाबत प्रशासन सकारात्‍मक असून आपणही आंदोलन शांततेने करावे, खाजगी किंवा शासकीय मालमत्‍तेचे नुकसान टाळावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम आणि जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी केले.

             मराठा क्रांती मोर्चाच्‍या वतीने 9 ऑगस्‍ट रोजी आयोजित करण्‍यात आलेल्‍या आंदोलनाच्‍या पार्श्‍वभूमीवर जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उप जिल्‍हाधिकारी विजयसिंह देशमुख, राजेंद्र कोंढरे, बाळासाहेब अमराळे, राहूल पोकळे, विराज तावरे, रघुनाथ चित्रे, तुषार काकडे, युवराज दिसले, हर्षल लोहकरे आदींसह महिला उपस्थित होत्‍या.

            प्रारंभी नवल किशोर राम आणि जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी संबंधितांच्‍या भावना जाणून घेतल्‍या. आंदोलकांवर दाखल झालेले गुन्‍हे, आण्‍णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्‍या कर्जयोजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्‍यवृत्‍ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्‍ता योजना, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्‍था (सारथी)  आदींबाबत आपापली मते मांडली.  9 ऑगस्‍ट रोजीचे आंदोलन शांततापूर्ण असेल तसेच रास्‍ता रोको करण्‍याचे कोणत्‍याही प्रकारचे नियोजन नसल्‍याचे यावेळी सांगण्‍यात आले.

            जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्वांच्‍या भावना समजावून घेतल्‍या. मराठा आरक्षण प्रश्‍नी आत्‍महत्‍या करण्‍याचे प्रकार दुर्दैवी आहे. मृत्‍यूमुळे होणारे नुकसान कोणीही भरुन काढू शकत नाही,त्‍यामुळे विद्यार्थी तसेच तरुणांना असे चुकीचे पाऊल न उचलण्‍याबाबत समाजातील व्‍यक्‍तींनी आवाहन करावे, असेही ते म्‍हणाले. सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले होते, तथापि त्यास उच्‍च न्‍यायालयाने स्‍थगिती दिली. मा. उच्‍च न्‍यायालयाच्‍या स्‍थगितीविरुध्‍द सर्वोच्‍च न्‍यायालयात दाद मागण्‍यात आली होती, मात्र तेथे रिलीफ मिळाला नाही. मा. उच्‍च न्‍यायालयाने या संदर्भात मागासवर्ग आयोगाची स्‍थापना करुन त्यांच्‍यामार्फत अहवाल सादर करण्‍याची भूमिका मांडली. शासनाने  राज्‍य मागासवर्ग आयोगाची स्‍थापना केली असून सध्‍या न्‍या. गायकवाड यांच्‍या अध्‍यक्षतेखाली राज्‍य मागासवर्ग आयोगाचे कामकाज सुरु आहे. आयोगाकडे 1 लक्ष 86 हजारपेक्षा जास्‍त निवेदने-पुरावे प्राप्‍त झाले आहेत. मराठा आरक्षणाबाबतची सर्व वैधानिक प्रक्रिया नोव्‍हेंबरपर्यंत पूर्ण  करण्‍यात येईल, याशिवाय मराठा समाजाच्‍या आरक्षणाचा प्रश्‍न सुटेपर्यंत 72 हजार जागांच्‍या मेगा भरतीलाही स्‍थगिती देण्‍यात येईल, असे मा. मुख्‍यमंत्री महोदयांनी आश्‍वासन दिले असल्याचे  जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी लक्षात आणून दिले.

            आण्‍णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्‍या कर्जयोजनेच्‍या प्रकरणांबाबत बँकेच्‍या काही अडचणी होत्‍या, त्‍यासंदर्भात जिल्‍हा अग्रणी बँकेच्‍या अधिका-यांबरोबर बैठक घेऊन मार्ग काढण्‍यात येईल. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्‍यवृत्‍ती योजना लागू करण्‍यात आली आहे.  डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्‍ता योजना राबविण्‍यात येत आहे.  50 मुली आणि 100 मुलांसाठी औंध येथील आयटीआयमध्‍ये ही सुविधा उपलबध करुन दिली जात असल्‍याचे जिल्‍हाधिकारी राम यांनी सांगितले. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्‍थेच्‍या (सारथी) प्रश्‍नांबाबत 15 ऑगस्‍टनंतर बैठक घेवू, असेही त्‍यांनी सांगितले.

            महाराष्‍ट्र हे पुरोगामी राज्‍य म्‍हणून देशातच नव्‍हे तर राज्यात ओळखले जाते. राज्याची आर्थिक, सामाजिक, सांस्‍कृतिक प्रगती होण्‍यामध्‍ये मराठा समाजाचे मोठे योगदान आहे. राज्‍यातील सर्वधर्मसमभाव, शांतता, एकोपा कायम ठेवण्‍याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे. ग्रामीण तसेच मध्‍यमवर्गीय समाजातील परिस्थितीची मला जाणीव असून, या तरुणांच्‍या भावनांकडे मी दुर्लक्ष करु शकत नाही, असेही जिल्‍हाधिकारी राम यांनी सांगितले.

गुरु देणार का नोकरीचा राजीनामा?

0

‘गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं’ असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावरअक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, ‘स्वावलंबी’ राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी ‘नखरेल’ शनाया आणि राधिका-

शनायाच्या कचाट्यात सापडलेला ‘बिचारा’ गुरुनाथ, या तिघांची अफलातूनकेमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. नवनवीन ट्विस्ट्स आणि टर्नयामुळे दिवसेंदिवस रोमांचक आणि रंजक बनत चाललेल्या या मालिकेने आता घेतलंय एक नव वळण!

‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका आता खरी रंगात आली आहे. राधिका गुरुनाथच्या घटस्फोटाचा महासंग्राम आता कोर्टात चांगलाच रंगत आहे. जवळजवळकेस राधिकाच्या बाजूने झुकत असताना पण गुरु आजारी पडल्याचं खोटं नाटक करून कोर्टाची पुढची तारीख घेतो. आईला त्याची काळजी आहे हे तो चांगलाचजाणून आहे आणि त्यामुळे कपटी, खोटा गुरुनाथ अजूनही हार मनात नसून आईचे मन आपल्याबाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे. आईच्या मदतीवर गुरु हीकेस जिंकणार का? कि तोंडावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्याचबरोबर गुरूच्या ऑफिसमध्ये त्याचे दोन्ही बॉस चांगलेच संतापले असून तेत्याला धारेवर धरतात. या सगळ्या काटकटीत गुरु राजीनामा देणार असे बोलतो पण त्याच्या या बोलण्याला न जुमानता त्याचे बॉस त्याला नुकसान भरपाईकरण्याची चेतावनी देतात. मग गुरु खरंच राजीनामा देणार का? आणि दिला तर मग शनाया गुरुसोबत राहणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.

9 ऑगस्टला ठिय्या आंदोलन,त्यानंतर हि आंदोलन सुरूच राहील -मराठा क्रांती मोर्चा (पत्रकार परिषद व्हिडीओ)

पुणे-राज्यभरात मराठा आरक्षण प्रश्न चांगलाच पेटला आहे. परळीमध्ये सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाने आता राज्यभर आक्रमक रूप धारण केल आहे. अनेक ठिकाणी हिंसेचा आगडोंब उडाला असताना आता या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणजे लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या घर, कार्यालयासमोर मराठा आंदोलन ठिय्या देऊन घोषणाबाजी करत आहेत.

दरम्यान, 9 ऑगस्ट ला मराठा क्रांती मोर्चाला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज ( 7 ऑगस्ट ) पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक पार पडली . या बैठकीत येत्या 9 तारखेला होणाऱ्या मोर्चाची दिशा ठरवण्यात आली.

पुणे शहरातील सर्व मराठा समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यलयावर 2 ते 3 तास ठिय्या आंदोलन करणार आहेत, तर तालुका पातळीवर सर्व आंदोलकांनी तहसील कार्यलयावर ठिय्या आंदोलन करणार आहेत.

याप्रसंगी समन्वयक समितीद्वारे आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन केलं आहे. तर 9 ऑगस्ट ला राज्यात कोणताही बंद करण्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी केलेली नाही. मात्र , जनभावना लक्षात घेता या दिवशी अघोषित बंद होण्याची शक्यता असल्याच देखील यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

वर्गणीसाठी त्रास दिल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा – ज्योती गडकरी

0

पुणे-वर्गणी हा ऐच्छिक विषय आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात वर्गणीसाठी कोणी त्रास दिल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधाअसे आवाहन सिंहगड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी केले आहे. तसेच, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हांना आळा बसतो. शिवाय गुन्ह्यांच्या तपासात त्याची मोठी मदत होते. त्यामुळे सर्व दुकानदार व विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने धायरी येथे आयोजित करण्यात आलेल्या व्यापारी बैठकीत  मांडली.

वर्गणीचा त्रास व्यापाऱ्यांना सर्वाधिक होत असतो. त्याविषयी पोलिसांनी व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी केली.

2 ऑक्टोबरनंतर प्लास्टिकबंदीची कारवाई ‘कडक’ होणार – उपायुक्त सुरेश जगताप

0

पुणे : प्लास्टिक बंदीवरील कारवाई सध्या थंडावली असली तरीयेत्या ऑक्टोबरनंतर मात्र ती पुन्हा सुरु होणार आहे. तुमच्याकडे प्रक्रिया होऊ न शकणाऱ्या प्लास्टिक पिशव्या आढळल्या तरतुम्हाला कडक कारवाईला सामोरे जावे लागेल. आणि यामध्ये दोषी आढळणाऱ्यांना हजार, 10 हजार व 25 हजार रुपयांचा दंड आणि प्रसंगी कारावासदेखील होऊ शकतो, अशी माहिती पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सुरेश जगताप यांनी आज दिली.

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने धायरी येथे आयोजित करण्यात आलेल्या व्यापारी बैठकीत त्यांनी प्लास्टिकबंदी विषयी व्यापाऱ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. याप्रसंगी सिंहगड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, उपाध्यक्ष सोमाराम राठोड, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, नगरसेवक हरिदास चरवड, नगरसेविका राजश्री नवले, विलास पोकळे, नवनाथ सोमसे, उमेश यादव, अमोल काशीद, हुकमाराम चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. 

प्रक्रिया होऊ न शकणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या ग्राहकांनी त्यांच्याजवळील किरकोळ विक्रेत्यांकडे जमा कराव्यात आणि विक्रेत्यांनी त्यांच्याकडील प्लास्टिक पिशव्या ऑक्टोबरपूर्वीच महापालिकेकडे जमा कराव्यातअसे आवाहन उपायुक्त जगताप यांनी यावेळी केले. तसेचदुधाच्या पिशव्या आणि इतर प्लास्टिक पिशव्या पुन्हा परत मिळविण्यासाठी यंत्रणा उभारण्यासंदर्भात काय करता येईल याचाही विचार सर्व दुकानदारांनी करावा, असेही उपायुक्त जगताप यांनी यावेळी सांगितले.

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने प्लास्टिक जमा करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली असून जमा झालेल्या प्लास्टिकमधून ड्रमसारख्या वस्तु तयार केल्या जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी यावेळी दिली.

प्लास्टिकबंदीवरील कारवाईपूर्वी अशा प्रकारचे जनजागृतीपर कार्यक्रम उपयुक्त असल्याचे मत नगरसेवक राजाभाऊ लायगुडे व नगरसेविका राजश्री नवले यांनी सांगितले.

समाज कल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा प्रचार व प्रसार समतादूतांमार्फत 2 ऑगस्ट पासून सरु

0

पुणे दि. 7- समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे प्रमुख कार्य बार्टीतील समतादूत दि. 2 ऑगस्ट पासून सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणेचे महासंचालक कैलास कणसे यांनी दिली.

सामाजिक न्याय मंत्री, राजकुमार बडोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाधार योजनेचा प्रचार व प्रसार व लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे व  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणेचे महासंचालक कैलास कणसे यांच्या प्रेरणेने, योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.  समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे प्रमुख कार्य बार्टीतील समतादूतांनी दि. 2 ऑगस्ट पासून सुरु केले आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याती सहायक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण यांच्या उपस्थितीत व प्रज्ञा वाघमारे, मुख्य प्रकल्प संचालिका, (समतादूत, बार्टी) यांच्या संनियंत्रणाखाली एकाच दिवशी, एकाच वेळी सर्व जिल्ह्यामध्ये या उपक्रमाची सुरुवात झाली आहे.

दि.2 ते 31 ऑगस्ट 2018 या कालवधीत जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत समतादूत प्रत्येक दिवशी 2 महाविद्यालयामध्ये जाऊन प्रचार व प्रसार करतील. असे एकूण 150 समतादूत हे काम करणार असुन प्रतिदिन 300 कार्यक्रम घेतले जातील. एकूण 26 दिवसांमध्ये 7800 कार्यक्रम घेण्याचे लक्षांक आहे.

दि. 1 सप्टेंबर 2018 पासून 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत समतादूत स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनांचा लाभ घेणाऱ्या उमेदवारास आवश्यक कागदपत्रे घेऊन फॉर्म भरुन देतील. सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीतर्फे करण्यात आले आहे.

 

‘पद्मदर्शन सोसायटी’च्या घनकचरा निर्मुलन प्रकल्पाचे उद्घाटन

0

पुणे-पद्मदर्शन सोसायटीचा आदर्शव्रत घनकचरा निर्मुलनप्रकल्प उद्घाटन अनावरण सोहळा  पद्मदर्शन सोसायटीमध्ये घनकचरा विभाग प्रमुख सह आयुक्त .सुरेश जगताप यांचे हस्ते करण्यात आला


नगरसेविका अश्र्विनी नितीन कदम  तसेचदिग्विजय राठोड निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. याअनावरण सोहळा प्रसंगी सुरेश जगताप यांनी घन कचरा बाबत पुणे महानगर पालिका योजत
असलेल्या उपाय बाबात विस्तृत माहिती दिली व २००० टन कचरा पुणे शहर मध्ये होत असूनउपलब्ध जागा याचा विचार पाहता आता या पैकी organic कचरा आपण आपल्या वसुंधरे कडेजिरवू शकतो याकरिता संस्थेने आपण होऊन प्रकल्पाचे स्वागत केले  दिग्विजय राठोड यांनीसंस्थेने सौरउर्जा प्रकल्पाचा पाठ पुरावा करावा तसेच इतर सहकारी रहिवासी संस्था यांना याप्रकल्पाचे माहिती देण्याचा प्रयत्न निश्चित करू असे सांगितले अश्विनी नितीन कदम यांनी आपल्या प्रभाग क्र-३५ च्या नावलौकीकात भर पडली असूनस्व:संकल्पनेतून व स्व:खर्चातून सर्व सभासदांच्या एक विचार व अथक प्रयत्नांतून घरातील ओलाव सुका कचरा एका 6HP पॉवर असलेल्या Fully Automatic Machine द्वारे दिवसाला १००किलोपर्यंत कचऱ्याचे विभाजन करून तो सोसायटीच्या आवारातच जिरवून त्यातून खत निर्मितीकरणे असा एक अनोखा व सर्व मोठ्या सोसायटयांनी आत्मसात करून प्रत्यक्षात राबवावे असे उत्कृष्ट उदाहरण आपल्या सर्वांसमोर ठेवले आहे व शेजारील व आसपासच्या संस्थेने त्याचेअनुकरण करावे असे सांगितले ‘पद्मदर्शन सोसायटी’ने एक आदर्शव्रत प्रकल्प केला असून त्यांनीसभासदाचे कौतुक केले व प्रभाग समस्या मध्ये कचरा समस्याचे येणाऱ्या समस्याजगताप याचे सहाय्याने निराकरण करू असे जाहीर केले अश्या प्रकल्पांना मनपा ने हे आर्थिकसहाय्य देण्याचा प्रयत्न करू असे जाहीर केले आणि सन्मानाची बाब म्हणजे ह्या प्रकल्पाचे उद्घाटनास नितीन कदम ,राहुल माने वस्वच्छ संस्था व आसपास सोसायटी पदाधिकारी हि उपस्थित होते, संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत शालगरयांनी पाहुण्याचे स्वागत केले व जेष्ठ सभासद याचे मार्गदर्शनाखाली हे करू शकलो असे सांगितले सूत्र संचालनडॉ अनिल पानसे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन करून केले

चैतन्य विद्यालयाच्या अकरा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

0
ओतुर – दि.७ (संजोक काळदंते)
ग्राम विकास मंडळ ओतूर ,संचलित चैतन्य विद्यालय ओतूर मधील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक
(ई.५वी) व पूर्व माध्यमिक (ई.८वी) शिष्यवृत्ती परीक्षेत अकरा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाल्याची माहिती मुख्याध्यापक गोरक्षनाथ फापाळे यांनी दिली.
पूर्व उच्च प्राथमिक(५वी) शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी
१) सानिका बिपीन गायकर
२) संस्कार मुकेश अरगडे
पूर्व माध्यमिक(८वी) शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी
१) अभिषेक शशिकांत गायकर
२) अनुष्का अभिजित डुंबरे
३) आर्यन संजय हिरे
४)चैत्राली ज्ञानदेव गायकर
५) गिरीष संभाजीराव शिंदे
६) जाई संपत पन्हाळे
७) प्रणित हिरामण शिंगोटे
८) साक्षी राजेंद्र तांबे
९) वैष्णवी कृष्णा घाटकर
 यशस्वी विद्यार्थ्यांना किसन भूतांबरे, संतोष कांबळे, विशाल चौधरी, लक्ष्मण दुडे, प्रमोद जाधव, विठ्ठ्ल डुंबरे, मंगेश तांबे, ब्रम्हदेव घोडके, अजित डांगे, राजश्री भालेकर, सोनाली माळवे, शिल्पा भालेराव, सोनाली कांबळे , वैभव देशमुख या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे,उपाध्यक्ष-प्रभाकर तांबे,राजेंद्र डुंबरे, रघूनाथ तांबे, सचिव- प्रदिप गाढवे, सहसचिव – पंकज घोलप, ज्ञानेश्वर पानसरे, संजय ढमढेरे, विठ्ठल डुंबरे, भाऊसाहेब खाडे यांनी अभिनंदन केले.

मल्टीप्लेक्समधील लुटमारी विरोधात पालकमंत्र्यांची मोहीम

0

पुणे- मल्टीप्लेक्स  व अन्य चित्रपटगृहातील शीतपेये व पाण्याच्या बाटल्या यांच्या किंमती तपासण्याची जोरदार मोहीम अन्न व नागरी पुरवठा विभागाने उघडली असून दिवसात ‘सिटी प्राईड’ कोथरूड, ‘अॅमेनोरा’ हडपसर यांसह शहरातील मॉल मधील सात हून अधिक मल्टीप्लेक्स मध्ये निरीक्षकांनी मोहीम राबवली.अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी हि माहिती दिली. ते म्हणाले, पुण्यातील वेस्टइंड मॉल औंध, सिटी प्राईड कोथरूड, केएफसी, साफिरे फूड्स औंध, सिजन मॉल हडपसर,इनऑरबीट मॉल नगर रोड येथील पीव्हीआर सिनेमाज येथे अचानक भेटी देवून हि तपासणी करण्यात आली.

या मोहिमेत पॅकबंद वस्तूंच्या वेस्टनावरील,  आवेष्टित वस्तूंचे नाव, उत्पादक किंवा आवेष्टक  यांचे नाव व पत्ता, कमल

किरकोळ विक्रीची (सर्व करांसह) किंमत, उत्पादनाची तारीख,निव्वळ वजन इत्यादी  बाबींची तपसणी करण्यात आली. पुणे

जिल्ह्याचे सहाय्यक नियंत्रक, वैध मापन शास्त्र, नितीन उदमले, यांच्या मार्गदर्शनाखाली वैध मापन शास्त्रनिरीक्षक राजेंद्र आखरे, गिरीधर वाघमारे, प्रवीण जोशी, प्रमोद कुडाळकर, संगमेश्वर रघोरी, सोमनाथ महाजन यांनी मोहिमेत सहभाग घेतला.

बापट पुढे म्हणाले कि, छापील दरापेक्षा अधिक दराने खाद्यपदार्थ व शीतपेये यांची विक्री होत असल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले  आहेत. एकाच वजनाची एकाच वस्तू वेगवेगळ्या दराने विकण्यास मज्जाव करण्यात आला असून प्रत्येक वस्तूच्या कमाल किरकोळ विक्रीच्या (सर्व करांसह) किंन्तींवर शासन लक्ष ठेवून आहे. किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेवून नियमात बदल करण्याचा प्रस्ताव अलीकडेच केंद्राकडे पाठविला होता. केंद्राने नुकतीच या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने अन्न व नागरी पुरवठा विभागाने कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या संदर्भातील तक्रारी नोंदवून घेण्यासठी स्वतंत्र्य कक्ष उघडला आहे. त्यासाठी ग्राहकांनी ०२०-२६१३७११४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्व साधावा किंवा  aclmpune@yahoo.in या ईमेल पत्यावर तक्रार करावी

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सर्व कर्जमाफी प्रकरणी सखोल सी . बी . आय . चौकशी करा :मागणी साठी आंदोलन

0

पुणे-केंद्र सरकारने कर्जमाफी सन २००८ मध्ये तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या काळातील  कर्जमाफी खरी कि खोटी ?असा सवाल उपस्थित करत  याबाबतच्या कॅग अहवाल संसदेत सादर प्रमाणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्व कर्जमाफी प्रकरणी पात्र , अपात्र , निकष , कर्जमाफी खरी किंवा फसवी /खोटी , एकूण व प्रकरण परत्वे रक्कम याची सखोल सी . बी . आय . चौकशी व्हावी व अहवाल मिळावा या मागणीसाठी पुणे विकास आघाडीचे अध्यक्ष चंदन सोंडेकर यांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले .

केंद्र सरकारने कर्जमाफी सन २००८ मध्ये तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी कर्जमाफी खरी कि खोटी ? असा सवाल उपस्थित करून पुणे जिल्हा मध्यवर्ती  बँकेची कृषी कर्जमाफीची सी . बी . आय . चौकशी व्हावी व अहवाल मिळावा . विविध कार्यकारी सोसायटी शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील गैरकारभार , अतिक्रमण , गैरव्यवहार , लेखापरीक्षण न करणे , राजकीय , गावगुंडी  असभ्य व कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन , खाजगी सावकार प्रमाणे नियम डावलून व नियमाप्रमाणे अर्ज न स्वीकारणे , एन ओ सी न देणे गलथान कारभारामुळे तात्काळ बरखास्त करून प्रशासक नेमणूक करावी . पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोरेगाव भिमा संपूर्ण कर्ज प्रकरण , दप्तर तपासणी , सर्व कर्ज खाते , बँक खाते तपासणी व चौकशी करावी . थकबाकीदार यादीत नाव नसताना व कोणतीही कार्यवाही न करता लेखी मागणी करूनही थकबाकी नसल्याचा दाखल न दिल्याने नुकसान भरपाई संबंधिताकडून वसुली करून मिळावी . या मागण्या पूर्ण होईपर्यंत पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन चालूच राहील असे पुणे विकास आघाडीचे अध्यक्ष चंदन सोंडेकर यांनी  सांगितले .