पुणे, 8 ऑगस्ट 2018-पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत पुणे ओपन स्ट्राईकिंग जॅगवार्स संघाने बीआयपीएल रायजिंग ईगल्स संघाचा पराभव करत बाद फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पुणे ओपन स्ट्राईकिंग जॅगवार्स संघाने बीआयपीएल रायजिंग ईगल्स संघाचा 43-27 असा मोठा पराभव करत स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. सिया प्रसादे, सुर्या काकडे, पुर्वा भुजबळ, मधुरीमा सावंत, अनर्घ गांगुली, मृण्मयी भागवत, अन्या जेकब व अमोद सबनिस यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून देत बाद फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
पुणे ओपन स्ट्राईकिंग जॅगवार्स वि.वि बीआयपीएल रायजिंग ईगल्स- 43-27
( एकेरी: 10वर्षाखालील मुली: सिया प्रसादे वि.वि आहना कुलकर्णी 4-0, 10वर्षाखालील मुले: सुर्या काकडे वि.वि निव कोठारी 4-2, 12वर्षाखालील मुली: पुर्वा भुजबळ वि.वि क्षिरीन वाकणकर 6-1, 12वर्षाखालील मुले: देवेन चौधरी पराभुत वि अर्णव पापरकर 0-6, 14वर्षाखालील मुली: मधुरीमा सावंत वि.वि माही शिंदे 6-0, 14वर्षाखालील मुले: अनर्घ गांगुली वि.वि आर्यन देवकर 6-1, 16वर्षाखालील मुली: मृण्मयी भागवत वि.वि मोहिनी घुले 6-1, 16वर्षाखालील मुले: इंद्रजीत बोराडे पराभुत वि दक्ष अगरवाल 1-6, मिश्र दुहेरी- अन्या जेकब/ अमोद सबनिस वि.वि रिया वाशिमकर/केयुर म्हेत्रे 6-4, मिश्र दुहेरी- अर्जुन अभ्यंकर/ मृण्मयी भागवत पराभुत वि दक्ष अगरवाल/ मोहिनी घुले 4-6)