Home Blog Page 3093

अधिकारी मस्तवाल ;सत्ताधाऱ्यांचा नाही उरला धाक – अरविंद शिंदेंचा घणाघात


पुणे- महापालिकेतील अधिकारी हे निवडून आलेल्या नगरसेवकांनाच नाही तर महापौरांना आणि पदाधिकाऱ्यांना देखील जुमानीत नसल्याचा आरोप करत ,अधिकारी मनमानी कारभार करू लागले आहेत गेल्या सव्वा वर्षात आधिकाऱ्यांची मनमानी वाढली आहे  महापौरांचा त्यांच्यावर धाक उरला नाही असा आरोप आज महापालिकेच्या मुख्य सभेत कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला . …

विरोधीपक्षनेताच काय महापालिकेतील कोणतेही पद घेणार नाही -प्रशांत जगताप

पुणे- मी महापौर असताना २३ फेब्रुवारीला पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आलो आहे .आणि २७ फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांना पत्र दिले आहे त्यात म्हटले आहे ‘ मी महापालिकेतील सर्वोच्च पदावर काम केले आहे  आता यापुढे मी विरोधी पक्ष नेता ,स्थायी समिती अध्यक्ष ,प्रभाग समिती अध्यक्ष ,वा कोणतेही पद घेणार नाही असे आज सभागृहात …बोलताना माजी महापौर प्रशांत जगताप यांनी स्पस्त केले एवढेच नव्हेतर त्यांनी जर दत्ता धनकवडे विपक्ष नेते पद साठी इच्छुक असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छ्या आहेत असे हि ते म्हणाले .
वास्तविक पाहता प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध कॉंग्रेस आणि भाजप चे नगरसेवकांनी सभागृहात रान पेटविले असताना प्रशांत जगताप यांनी प्रशासनाची बाजू मांडण्याचा आभास निर्माण केला यावेळी त्यांना त्याप्सून दूर नेण्यासाठी गोपाळ चिंतल यांनी ..तुम्ही आता विरोधीपक्षनेते होणार असा टोमणा मारत विषयापासून त्यांना वळविण्याचा प्रयत्न केला त्यावेळी जगताप यांनी वळून हा खुलासा केला … पहा हा व्हिडीओ….

11 वर्षाच्या प्रयत्नानंतर ‘धनसई लॅबोरेटरी’ च्या धनंजय केळकर यांना भारतीय व्यक्तींच्या पायाच्या मानकासह फुटवेअर बनविण्याचे पेटंट

0
भारतीय पायांचे वेगळेपण अधोरेखित
पुणे :‘धनसई लॅबोरेटरी’चे प्रमुख संशोधक धनंजय केळकर यांना भारतीय व्यक्तींच्या पायाच्या मानकासह फुटवेअर बनविण्याचे पेटंट मिळाले आहे. या फुटवेअरचा लाभ मुख्यतः मधुमेही, संधीवात आणि गुडघेदुखीच्या, टाचदुखीच्या रुग्णांना होणार आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत. ‘धनसई लॅबोरेटरी’चे प्रमुख संशोधक धनंजय केळकर यांनी ही माहिती दिली.
हे पेटंट भारत सरकारच्या पेटंट कार्यालय या मानक संस्थेने 2 मे 2018 या दिवशी दिले आहे.
भारतात तीन, चार प्रमुख आणि दोन तुरळक असे पायांचे आकार आहेत. तसेच भारतीय पाय बर्‍यापैकी रुंद असतात आणि परदेशी मानकांवर आधारित फुटवेअर हे एकाच आकाराच्या पायांवर बेतलेले असते. त्यामुळे बहुतेक भारतीयांना ही पादत्राणे सोयीस्कर नाहीत. मधुमेही मज्जा र्‍हास आणि संधिवात यामुळे पायांचे आकार बदलले तर आधीच सोयीस्कर नसलेली पादत्राणे अधिकच त्रासदायक होतात. त्यामुळे पाय दुखणे आणि मधुमेहात पायांना जखमा होण्याचे प्रमाण वाढते.
हे महत्वपूर्ण निरिक्षण व्यापक पाहणीनंतर नोंदणार्‍या ‘धनसई लँबोरेटरीज’च्या धनंजय केळकर यांना, पायाच्या मानकासह फुटवेअर बनवण्यासाठीचे पेटंट मिळाले आहे. हे फुटवेअरचे नाही, तर पायांचे मानक आहे. या पेटंट प्रमाणे प्रत्येक पायाला एका अनेक आकडी नंबरने प्रमाणित केले जाते.
मधुमेही रुग्णाला डायबेटिक फुट अल्सर झाल्यास ते अत्यंत खर्चिक आणि त्रासदायक असते. बरेचदा त्यामुळे पाय कापावाही लागू शकतो. हे टाळण्यासाठी सुयोग्य फुटवेअर घालणे आवश्यक असते. या फुटवेअरमध्ये पावलांवर पडणारा जास्तीचा दाब सगळीकडे सारखा पसरवण्यासाठी ‘प्रेशर सॉक’ असतो. पण बाजारात मिळणार्‍या फुटवेअरमध्ये त्यासाठी पुरेशी जागा नसते. आणि त्यात सगळे पाउल न दाबता मावतही नाही.
पूर्वी भारतात पायाची मापे घेऊन चपला-बूट बनवले जात असत. पण तयार फुटवेअर बाजारात येऊ लागल्यावर मापाने बूट-चपला बनवून देणार्‍यांचा व्यवसाय मागे पडला. उष्ण प्रदेशात पाय उघडे राहणारी पादत्राणेच जास्त बनवली जातात, तेथील लोकांचे पाय खूपच रुंद असतात. भारतीय आणि परदेशी मानकांपेक्षा भारतीय पाय हे -2  ते 50 मिलीमीटर रुंद असतात. याउलट थंड प्रदेशात शूज अधिक वापरले जातात. अशा परदेशी मानकांवर आधारित बनलेले शूज भारतीय पायात घालत असताना पाय त्यात कोंबावे लागतात.
परदेशात 10-12  नंबरचेच शूज मिळतात. प्रस्थापित मानकांप्रमाणे लांबी रुंदी आकार प्रकार या प्रमाणे दुकानात एकाच डिझाईनचे दहा हजार प्रकारचे फुटवेअर ठेवावे लागेल, इतकी विविधता भारतीय पायांत आहे. मापाप्रमाणे फुटवेअर बनवायला अतिकुशल कारागीर लागतात. त्यामुळे ते बनवणे खर्चिक होते.
धनंजय केळकर यांनी त्यांच्याकडून तयार झालेल्या फूटवेअरला ‘सेफ्फशू’ असे नाव दिले आहे.
धनंजय केळकरांच्या ‘सेफ्फशू’ फुटवेअर कंपनीत बहुतांश लागणार्‍या सतराशे फुटवेअरचे आकृतिबंध तयार असतात. त्यात पायाच्या मापांबरोबरच उभे राहणे, चालणे, पायातील दोष याचाही विचार केला जातो. पाय, टाचा, गुडघे दुखण्याची कारणे यातच दडलेली असतात. त्यावरून पायाचा नंबर ठरतो व फुटवेअर बनवले जाते. त्यामुळे चालण्यात सहजता तर येतेच, पण पायाच्या कुठल्याही भागावर अनावश्यक दाब पडत नाही.
‘धनसई लँबोरेटरीज’ने याआधी सेन्सिटोमीटर व्हीपीटी, एचसीपी आदि उपकरणे बनवली असून, त्याच्या आधाराने न्यूरोपँथीचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून येते. सेन्सिटोमीटर, एचसीपी ही मधुमेही जगाला, भारताने दिलेली भेट मानली जाते.
त्यांच्या काही प्रसिध्द ग्राहकांमध्ये डॉ. एस. डी. भांडारकर (फार्माकोलोजी पुस्तकाचे सहलेखक), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार गजानन किर्तीकर, आसाममधील अत्तराचे उत्पादक आणि खासदार श्री अजमल, आमदार पराग अळवणी इत्यादींचा आणि सुमारे साठ हजार भारतीयांचा समावेश आहे.

२३ गावांमधील रस्ता रुंदीसाठी आता आमरण उपोषण: आबा बागुल

0
पुणे
महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील अरुंद रस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून शेकडो नागरिकांचे अपघातात बळी जात आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून सर्वांनी सकारात्मक निर्णय घ्यावा ;अन्यथा २ ऑकटोबरपासून पालिका आवारात आमरण उपोषणास बसण्याचा इशारा  माजी उपमहापौर व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी दिला आहे.
 याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल यांनी महापौरांसह सभागृहनेता, स्थायी समिती अध्यक्ष  व सर्व पक्षनेत्यांना  निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे कि,  ज्यावेळी २३ गावे महापालिकेत समाविष्ट झाली त्यावेळी या गावांमधील रस्ते दीडपट रुंद करण्याची मागणी भविष्यातील वाढत्या लोकसंख्या आणि नियोजनाच्यादृष्टीने करण्यात आली होती.  त्यानुसार तसा ठरावही दिला होता .  या गावांचा विकास आराखडा करताना रस्तारुंदी कमी दर्शविण्यात आली होती.त्यामुळे नियोजित रस्ता रुंदीसंदर्भांत  विषय  मांडण्यात आला होता मात्र स्थायी समितीने तो खाससभेकडे वर्ग केला होता. मात्र  प्रशासनाने रस्तारुंदी आवश्यक असल्याचा  प्रस्ताव सादर केलेला असताना तो फेरअभिप्रायाला पाठविण्याचा स्थायी समितीने घेतलेला निर्णय दुर्दैवी  आहे.  वास्तविक  गेली नऊ  वर्षे नियोजित रस्ता रुंदी आणि गावांचा विकास यासाठी पाठपुरावा करीत  असताना अरुंद रस्ते ,वाढणाऱ्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनक बनले आहे अनेकांचे नाहक बळी गेले आहेत. सद्यस्थितीत समाविष्ट २३ गावांमध्ये पुणे महानगरपालिकेकडून जुन्या विकास आराखड्याप्रमाणे बांधकामांना परवानगी दिली जात आहे,वास्तविक हा प्रकार चुकीचा आहे . त्यामुळे संपूर्ण प्रस्ताव पाहून आणि राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून  महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९चे कलम २१० [ १]  [ब] अन्वये २३ गावांमधील रस्ता रुंदी करण्यात यावी अशी मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केली आहे. 

असे का वागतात महापौर मुक्ता टिळक -अश्विनी कदम व्यथित (व्हिडीओ)

पुणे- मला माझ्या वार्डातील समस्या मांडू द्यायच्या नाहीत ,मला  सभागृहात बोलण्याची परवानगी द्यायची कि नाही याबाबत भाजपच्या नगरसेवकाला विचारून मला सातत्याने टाळायचे ..असे राजकारण एक स्त्री महापौर असूनही माझ्याबाबत केले जात आहे असा आरोप आज राष्ट्रवादीच्या नगरसेविका, माजी स्थायी समिती अध्यक्ष  अश्विनी कदम यांनी केला आहे .
सभागृहात आपल्याला जाणूनबुजून बोलू देत नाहीत असा आरोप त्यांनी केला आहे .आज सभागृहात प्रशासनाच्या कारभारावर कॉंग्रेस भाजपचे सदस्य टीका करणारी भाषणे करत असताना कदम यांनी  याबाबत हात वर करून बोलण्याची परवानगी महापौरांकडे मागितली होती मात्र त्याबाबत काहीही न बोलता महापौरांनी पुढील नेत्यांची नावे पुकारल्याने आज व्यथित होवून अश्विनी कदम बाहेर पडल्या , त्यानंतर माध्यमांशी बोलताना पहा आणि ऐका त्या काय म्हणाल्या ….

केरळमधील आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पुण्यातील स्वयंसेवकांची धाव

0
पुणे-दादा जे. पी. वासवानीं च्या कोमल हृदयाने कधीच कोणाच्या दुःखाकडे दुर्लक्ष केले नाही.  कोणत्याही आपत्तीमध्ये ते साधू वासवानी मिशन च्या कार्यकर्त्यांसोबत उभे असायचे आणि आपल्या प्रयत्नांनी आपत्तीग्रस्तांना मदत पुरवायचे. 
दादाजींची हीच शिकवण घेऊन साधू वासवानी मिशन ची एक टीम केरळ येथे पोचली आहे. 
मिशन च्या स्वयंसेवकांची एक टीम केरळ येथील थ्रिसूर या ठिकाणी १८ ऑगस्ट रोजी रवाना झाली आहे. त्याठिकाणी स्वयंसेवक अन्न शिजवून एका ट्रकच्या माध्यमातून परवूर येथे दुष्काळग्रस्त लोकांना पोहोचवत आहेत. तेथील परिस्थिती खूप भीषण आहे. लोकांनी त्यांचे सर्व काही गमावले आहे. 
मिशन मधून आणखी एक टीम केरळ मध्ये गेली आहे, जी अधिक जास्त पूरग्रस्त भागात जाऊन त्यांना मदत करतील. अन्नाचे उत्पादन ४००० पॅकेट्स पर्यंत वाढले आहे. 
एका स्वयंसेवकाने सांगितले आहे, “जेव्हा आम्ही तिथे मदतीसाठी गेलो तेव्हा आम्हाला तिथल्या एका चहावाल्याने चहा दिला आणि त्याचे पैसे सुद्धा घेतले नाहीत. इथली स्थानिक लोकं आम्हाला खूप मदत करत आहेत.”
एक्साइस अधीक्षक श्री. रामकृष्णन म्हणाले, “दादाजींच्या आशीर्वादाने आम्ही चांगली मदत देऊ शकू.”
मिशन समर्थकांचे आणि स्वयंसेवकांचे या कार्याला हातभार लावल्याबद्दल खूप आभार मानत आहे. 

‘टायटन’च्या सोबतीने रक्षाबंधन साजरे करा

0

टायटन सादर करत आहे, खास भेट देण्यासाठी निवडक उत्पादने: घड्याळे, साड्या, परफ्युम्स, फिटनेस बँड्स, सनग्लासेस, बॅग्ज आणि बरेच काही

प्रेम आणि संरक्षणाचा अनुबंध असलेले रक्षाबंधन ही भारताने अवघ्या जगाला दिलेली एक अनोखी भेट आहे. हा तो खास दिवस असतो, जेव्हा भाऊ आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे व्रत स्वीकारतो आणि बहिण या व्रताच्या बंधाचे प्रतिक म्हणून भावाच्या मनगटावर पवित्र धागा बांधते. यंदाच्या वर्षी या गोष्टी दोन्ही प्रकारे होतील असे बघूया. तुमचे रक्षण करण्याची शपथ भाऊ जशी घेतो तशी तुम्ही देखील भावाचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करा. त्याचवेळी जसे बहिण तुमच्या मनगटावर राखी बांधते तशी तुम्ही देखील तिच्या मनगटावर बांधा. आणि अनोख्या भेटवस्तू एकमेकांना देऊन तुम्हांला एकमेकांबद्दल वाटणारी खरी भावना प्रकट करून दाखवा.

या राखीपौर्णिमेला आपल्या प्रियजनांना अनपेक्षित भेट देऊन चकित करा; एवढा भावनिक आणि आदरणीय सण अगदी समीप येऊन ठेपला असल्याने टायटनतर्फे चित्ताकर्षक भेटवस्तूंचे विविध पर्याय देणारी व्‍यापक मालिका सादर करण्यात आली आहे, ज्याद्वारे तुमच्या मनातील प्रेमाची गुंफण आणि स्नेहभावाचे प्रतिक व्यक्त करता येणार आहे. टायटनकडून या निमित्ताने सर्वोत्कृष्ट पर्यायांची मालिका सादर झाली असून त्यापैकी आपल्या भावंडाप्रती तुमच्या प्रेमाचा आणि स्नेहाचा प्रतिध्वनी ठरेल आणि ते प्रेम दशगुणीत होईल, अशा पर्यायाची निवड करा. ‘स्कीन’चे अक्षरशः मंत्रमुग्ध करणारे फ्रेंच परफ्युम, ‘तानेयरा’च्या बॅगसह मिळणाऱ्या सुंदर साड्या, ‘फास्ट्रॅक’ची घड्याळे आणि अॅक्सेसरीज अशा टायटनच्या मुग्ध करणाऱ्या अनोख्या कालातीत निवडक वस्तूंपैकी तुमच्या आवडीची वस्तू घ्या. उत्पादनांच्या अधिक माहितीसाठी www.titan.co.in येथे भेट द्या, कारण टायटनतर्फे सनग्लासेस, फिटनेस बॅंडस आणि अन्य कित्येक अशी उत्पादने उपलब्ध करून देण्यात आली आहेत की, एक उत्कृष्ट भेटवस्तू ठरू शकतात.

घड्याळे

टायटनच्या घड्याळ विभागातर्फे विविध ब्रँडस सादर केले जातात, टायटन घड्याळे, ‘फास्ट्रॅक’ आणि सोनाटा यांच्या माध्यमातून टायटनमध्ये प्रत्येकासाठी काही ना काही उपलब्ध आहेच.

टायटन घड्याळे

प्राचीन स्थापत्यशास्त्रापासून प्रेरणा घेऊन घडविलेले अलंकृत स्तंभ आजच्या युगातील मोहक अभिरुचीसंपन्न तरीही आधुनिक महिलांसाठी खास निर्माण करण्यात आलेल्या आरेखनाने सजलेले आहेत. टायटन रागा मालिकेतील हे उत्पादन अतिशय विचारपूर्वक घडविलेले आणि स्टायलिश असे राखी गिफ्ट आहे. याच्या कडेला जडवलेले मोतीसारखे आकार मनगटावर बिलगून बसतात आणि एक डोळ्यात भरणारा आधुनिक मोहक लूक बहाल करतात. येथे चित्रात दर्शविण्यात आलेला अनोखा टाईमपीस रागाएक्समसाबा या खास कलेक्शनमधील आहे. घड्याळ मध्यवर्ती पॉईंटवर असून यातील गुलाबी पॉप पोल्का ठिपका आणि कमळ मुख्य निर्देशांक आहेत. यातील जाळीदार डिझाईनची डायल, शंखाकृती आणि ‘मसाबा’ चार्म यामुळे या घड्याळाला एक अतुलनीय व्यक्तिमत्व बहाल झालेले आहे.

किंमत रुपये १४,९९५ असलेले हे ट्रायबल हग दोन रंगांत उपलब्ध आहे!

सोनाटा

ब्लश कलेक्शनमधील हा खास टाईमपीस सोनाटातर्फे सादर करण्यात आला असून याचे वेळेचे निर्देशांक अनोख्या डिझाईनमध्ये रचण्यात आले आहेत. ब्लश पिंक रंगाची सूर्यतबकडीसारखी डायल गुलाबी सोनेरी (रोझ गोल्ड) असून त्यावर तासांच्या खुणा दाखविणारी नक्षी आहे. टायटनतर्फे सादर करण्यात आलेले पहिलेवहिले रोझ गोल्ड कलेक्शन असलेली ही घड्याळे फॅशनेबल आणि ट्रेंडी युवा स्त्रियांना डोळ्यासमोर ठेवून घडविण्यात आली आहेत. परिधान करणारीच्या व्यक्तिमत्वाला अधिक उठावदार बनवणारी ही घड्याळे संपूर्णपणे पॉलिश केलेल्या रोझ गोल्ड केसमध्ये असून त्याला स्वरोव्हस्की क्रिस्टल जडवण्यात आली आहेत, तसेच संपूर्णपणे पॉलिश केलेले गोल्ड ब्रेसलेट बसविण्यात आले आहे. कोणत्याही प्रसंगासाठी अत्यंत अनुरूप अॅक्सेसरी असलेली ही नितांत सुंदर घड्याळे कोणत्याही पोषाखासोबत चपखल उठून दिसतात आणि यंदाच्या राखीपौर्णिमेला तुमच्या बहिणीसाठी ही एक सुयोग्य भेटवस्तू आहे.

कलेक्शनची किंमत रुपये १५९९ पासून पुढे आहे.

फास्ट्रॅक

युवा पिढीला लक्ष्य करणाऱ्या फास्ट्रॅकतर्फे घड्याळांच्या जोडीला सनग्लासेस, फ्रेम्स, बॅग्ज, बेल्ट्स, वॉलेट्स आणि फिटनेस बॅंड्स अशी विविध श्रेणीतील उत्पादने सादर केली जातात.

फास्ट्रॅकतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेले रिफ्लेक्स २.० या नव्या पिढीच्या रिफ्लेक्समध्ये अशी कित्येक वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत, जी वापरकर्त्यांना सतत कनेक्टेड राहण्यास आणि निरोगी राहण्यास उपयुक्त ठरतात, तसेच कायम कोणत्या-ना-कोणत्या अॅक्शनसाठी सज्ज ठेवतात. या वैशिष्ट्यांच्या जोडीला रिफ्लेक्समध्ये अत्यंत आकर्षक ओ-एलईडी डिस्प्ले असून त्यामुळे इनकमिंग कॉल्स, टेक्स्ट मेसेज, व्हॉट्सअॅप मेसेज, फिटनेस ट्रॅकर आणि अन्य कित्येक गोष्टी सुस्पष्टपणे बघता येतात. रिफ्लेक्स २.० मध्ये एक अतिरिक्त वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्णपणे पाण्याला प्रतिरोध करणारे (IPX6) असून, छायाचित्रे काढण्यासाठी, तुमचा फोन शोधण्यासाठी यामध्ये नियंत्रित कॅमेरा देखील आहे; शिवाय हे उपकरण त्याच्या प्रियजनांना सतत कनेक्टेड राहण्यासाठी आणि त्यांच्या फिटनेसवर नजर ठेवण्यासाठी देखील सहाय्य करते. या कलेक्शनची किंमत १९९५ रुपये ठेवण्यात आली आहे.

स्कीन

टायटनतर्फे सादर करण्यात येणाऱ्या स्कीन (SKINN) या पुरस्कारविजेत्या मास्टर परफ्युमद्वारा पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी उत्कृष्ट फ्रेंच परफ्युम सुगंधाची मालिका सादर करण्यात आली असून ती भारतीय हवामानाला साजेसी अशीच आहे. ५० मिलीसाठी किंमत १३९५ रुपये आणि १०० मिलीसाठी किंमत १९९५ रुपये असून हे सुगंध देशभरातील सर्व वर्ल्ड ऑफ टायटन दालने, मल्टी ब्रँड दालने आणि अधिकृत डीलर आऊटलेट्समधून तसेच ई-कॉमर्स संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.

एयू दे परफ्युम सेलेस्टे फॉर विमेन ,
एयू दे परफ्युम स्टील फॉर मेन

तानेयरा

केवळ अतिशय शुद्ध आणि नैसर्गिक धाग्यांपासून बनलेल्याच साड्या पुरविणाऱ्या ‘तानेयरा’तर्फे भारतातील ५० प्रांतातील आपल्या प्रत्येक दालनात जवळपास ३००० साड्यांचे पर्याय उपलब्ध करून दिले जातात. याची डिझाईन ही अतिशय मेहनतीने परिश्रमपूर्वक एक-एक करून निवडलेली असल्याने ‘तानेयरा’चे हरएक वस्त्र अतिशय खास, निवडक, एकमेवाद्वितीय असण्याची खात्री देणारे तसेच स्टाईलची एक निर्मम अनुभूती मिळवून देणारे असते. पुढील पर्याय हे अत्यंत विचारपूर्वक बनविण्यात आले असून एक उत्कृष्ट भेट ठरू शकतात:

भागलपूर टसर्स – अस्सल स्थानिक भारतीय रेशमापासून बनविलेल्या या भागलपूर येथील टसर सिल्क साड्या बहुआयामी असून फॉर्मल किंवा उत्सवी निमित्ताने वापरता येऊ शकतात. यांची किंमत ४००० रुपयांपासून सुरु होत असून या साड्या अनेकविध रंगाच्या विपुल पर्यायांमध्ये स्मार्ट, साध्या पल्लू (पदर) आणि कॉन्ट्रास ब्लाउजपीससह येतात.

चंदेरी आणि माहेश्वरी – चंदेरी आणि माहेश्वर येथील हलक्या आणि नजाकतपूर्ण सिल्क-कॉटनच्या या साड्यांवर संपूर्ण अंगभर तसेच काठावर जरीकाम विखुरलेले असून आगामी उत्सवी आणि सणांच्या दिवसांसाठी त्या अत्यंत चपखल आहेत. ४००० रुपये किंमतीपासून पुढे उपलब्ध असलेल्या या साड्यांमधील निवडीचे प्रचंड बहुविध पर्याय बघून तुम्ही अगदी स्तिमित होऊन जाल.

स्टोल्स/दुपट्टा – कोणत्याही पोषाखामध्ये उठाव आणणारी एक भर म्हणून ‘तानेयरा’चे रंगीबेरंगी स्टोल्स आणि दुपट्टे ही खरोखर चित्तवेधक भेट आहे. १००० रुपयांपासून पुढे किंमत असलेले हे स्टोल्स पाश्चिमात्य किंवा भारतीय वस्त्रप्रावरणांना हमखास साजेसे ठरतील, असे आहेत.

आयवेअर

सनग्लासेस

प्रामुख्याने शहरी युवा पिढीला लक्ष्य करून बनविण्यात आलेल्या फास्ट्रॅकच्या युनीलेन्स कलेक्शनमध्ये पुढील बाजूच्या फ्रेममध्ये एकच सिंगल लेन्स बसविण्यात आलेली आहे. “सिंगल फ्रेम्ड सनग्लासेस फॉर सिंगल फ्रेम ऑफ माइंड” असे बोधवाक्य आजच्या टेक सॅव्ही आणि दुचाकीप्रेमी युवा पिढीला अगदी आपलेसे वाटणारे आहे. फास्ट्रॅक सनग्लासेस तुमचा आधुनिक, काळाशी सुसंगत, औपचारिक आणि तरीही किफायतशीर किंमत असलेल्‍या आपल्या मित्रांसोबत आखलेल्या खास दिवसाशी किंवा अगदी रोजच्या दिनक्रमाशी सुसंगत सनग्लासेसची जोडी प्राप्त करण्याचा शोध पूर्णत्वास नेणाऱ्या आहेत. एंड-टू-एंड चौरस फ्रेम निळसर झोत टाकणाऱ्या युनीलेन्स असलेल्या या चित्रातील सनग्लासेस फास्ट्रॅकतर्फे उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यांना चमकदार निळ्या धातूच्या काड्या जडविण्यात आल्या आहेत. फॅशनवेड्या असणाऱ्या प्रत्येकाला या मोसमातील सर्वोत्तम स्टाईल देणाऱ्या या सनग्लासेस राखीसाठीची एक सुयोग्य भेटवस्तू आहेत, कारण एक ऐटबाजपणा बहाल करतेवेळीच हे अत्यंत ट्रेंडी असे उत्पादन खूपच स्पर्धात्मक किंमतीला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
किंमत २४९९ रुपये

फ्रेम्स

या सणासुदीला तुमच्या बहिणीची स्टाईल वाढवा टायटन आयप्लसने महिलांसाठी आणलेल्या खास विमेन कलेक्शनच्या साथीने. आजच्या महत्वाकांक्षी आणि चैतन्यपूर्ण, जोमदार अशा भारतीय नारीपासून प्रेरित होऊन निर्माण करण्यात आलेले हे कलेक्शन टायटन आयप्लसच्या अन्य कलेक्शनप्रमाणेच खरोखर अतिशय दीर्घकाळपर्यंत चालते. टायटन आयप्लसच्या या स्टायलिश फ्रेम्स ६९५ रुपयांपासून उपलब्ध असून यंदाच्या राखीसाठी उत्कृष्ट भेट आहेत.

टायटन कंपनी लिमिटेड विषयी:

टायटन कंपनी लिमिटेड (आधीची टायटन इंडस्‍ट्रीज लिमिटेड) हा तामिळनाडू इंडस्‍ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (टीआयडीसीओ) आणि टाटा ग्रुप यांमधील संयुक्‍त उद्यम आहे. कंपनीची सुरुवात टाटा वॉचेस लिमिटेड या नावांतर्गत १९८७ मध्‍ये करण्‍यात आली. १९९४ मध्ये टायटनने दागिन्‍यांच्‍या व्‍यवसायात प्रवेश केला आणि त्‍यानंतर टायटन आयप्‍लस सह आयवेअरमध्‍ये प्रवेश केला. २०१३ मध्‍ये, टायटनने स्किन नावासह फ्रेग्रन्सेस विभागामध्‍ये प्रवेश केला. आज, टायटन कंपनी लिमिटेड घड्याळे, दागिने आणि आयवेअरमध्‍ये निर्विवादपणे अग्रेसर आहे, ज्‍याचे श्रेय या सर्व इंडस्‍ट्रीच्‍या बदलत्‍या रुपाला जाते. स्टँडअलोन पातळीवर कंपनीने २०१७-१८ या आर्थिक वर्षात २०.४ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. ३१ मार्च २०१८ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात टायटन कंपनी लिमिटेडने १५,६५६ कोटींचा महसूल नोंदवला आहे.

..तर उत्तम करिअर घडू शकेल -प्रा. डॉ. किरण रणदिवे

0
पुणे-प्रत्येक विद्यार्थ्यांमधे विशेष गुणवत्ता नक्कीच असते.मात्र स्वत:वर अढळ विश्वास व नैसर्गिक आवड यांच्याआधारे अंगभूत कौशल्याची जोपासना केल्यास उत्तम करिअर घडू शकेल ” असा विश्वास बुरशी वनस्पती क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार विजेते पहिले भारतीय व आंतरराष्ट्रीय बुरशी तज्ञ प्रा. डॉ. किरण रणदिवे यांनी व्यक्त केला.
          वंदनीय महामानव सामजिक संस्था व महाराष्ट्र झोपड़पट्टी सुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेतील ‘ विद्यार्थी करिअर मार्गदर्शन-एक निरंतर उपक्रम या कार्यक्रमात ते बोलत होते.
       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र झोपड़पट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक भगवान  वैराट हे होते या  उपक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष चेतन तूपे यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर निलेश मगर, यांच्यासह हड़पसर/ मुंढवा प्रभाग समिति अध्यक्षा हेमलता मगर, नगरसेविका पूजा कोद्रे ,स्वीकृत नगरसेवक दत्तात्रय तूपे, निमिर्ती अकादमी चे संचालक सचिन गुळीग, दत्ता कांबळे, गणेश ससाणे, सुनील गोगावले,संतोष खरात, बच्चूसिंग टाक, सुरेखा भालेराव, ईश्वर लोखंडे, विश्वास कांबळे, संस्थेचे संस्थापक बाळासाहेब सुपेकर, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
       निमिर्ती अकादमी चे संचालक सचिन गुळीग यांनी प्रशासकीय सेवेतील संधी याविषयी सविस्तर माहिती देताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील होतकरू विद्यार्थी- विद्यार्थिनी साठी प्रशासकीय सेवा क्षेत्रातील विविध स्पर्धा परीक्षांविषयी अभ्यासक्रम व कार्यशाळा मोफत घेण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले.
        विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वत:मधील कला- कौशल्याच्या आधारे उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक संधी स्विकाराव्यात असे आवाहन निलेश मगर यांनी केले.
       संस्थेचे अध्यक्ष अनिल खरात यांनी प्रस्ताविक केले. सुनील गोगावले, दत्ता कांबळे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
         ”अशा स्वयंसेवी संस्था तळागाळातील होतकरू विद्यार्थ्यांच्या उज्वल  भविष्यासाठी रचनात्मक उपक्रम राबविणार असतील तर त्यांना विविध शासकीय पातळीवरून मदत मिळवून देण्याकरिता महाराष्ट्र झोपड़पट्टी सुरक्षा दल पुढाकार घेईल असे आश्वासन सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवान वैराट यांनी यावेळी दिले.”
         ”साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अमुल्य योगदानाबद्दल त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारने गौरविण्यात यावे, यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस पुणे शहराच्या वतीने महानगर पालिकेत आग्रही राहून प्रसंगी जनआंदोलन उभारण्यात येईल” असे प्रतिपादन चेतन तूपे  यांनी केले.राज्यघटना हा भारतातील नागरिकांचा मानबिंदु असून त्याचा अवमान करणाऱ्याविरोधात संघर्ष केला जाईल असा इशाराही तुपे यांनी दिला.
      संस्थेचे उपाध्यक्ष नितिन बोराडे, स्वप्निल रासकर, प्रताप कांबळे, गणेश जाधव, शिवाजी वाव्हूळ, संतोष पठारे,दादा गायकवाड़, दीपक गायकवाड़,सचिन भोरे, महादेव भोवाळ,गणेश घोड़के, बाळासाहेब गायकवाड़, यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

वृद्धापकाळात आनंदानेच जगले पाहिले – मुनिश्री पुलकसागर महाराज

0

पुणे-

“वृद्धत्व एक न एक दिवस सर्वांनाच येणार आहे. लहानपण ज्ञानार्जनासाठी, तरूणपण धनार्जनासाठी आणि वृद्धत्व पुण्यार्जनासाठी असते. मात्र काही जण वृद्ध झालो आहोत या विचारानेच जगण्यातील उत्साह गमावून बसतात. वृद्धापकाळात आपण काहीच करू शकत नाही, असा विचार करणे चूकीचे आहे. वृद्धत्व तर जीवनातील सोनेरी अध्याय असतो. या काळातदेखील तुम्ही अधिक चांगले काम करू शकता. व्यक्ती वयाने नव्हे, तर विचाराने वृद्ध होतो. वय कितीही असो आयुष्य उत्साहाने, आनंदाने, सन्मानाने जगावे,” असा संदेश मुनिश्री प. पु. १०८ पुलकसागर महाराज यांनी गुरूवारी दिला. अनेकदा वय वाढते त्यानुसार भिती, अविश्वासही देखील वाढतो. त्यातुन लहानांवर निर्बंध लावण्याचे, त्यांची हेटाळणी करण्याचे प्रकार मोठ्यांकडून घडतात. तुमच्या अशा व्यवहारामुळेच मुले तुमच्या जवळ येण्यापेक्षा, तुम्हाला टाळण्याचे प्रयत्न होतात. मुलांना त्यांच्या मनाप्रमाने निर्णय घेण्याची मोकळीक वृद्धपकाळात आपण दिली पाहिजे. त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. व्यवहारांमधील लुडबुड कमी करावी, असेही मुनिश्री यांनी सांगितले.

सकल जैन वर्षायोग समितीतर्फे मुनिश्रींच्या चातुर्मासाचे आयोजन धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे सुरू आहे. यावेळी ज्ञानगंगा महोत्सवात प्रवचनाचे बारावे पुष्प गुंफतांना ‘वृद्धापकाळी कसे जगावे’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, अजित पाटील, सुजाता शहा, जितेंद्र शहा, वीरकुमार शहा, संजीव नाईक, सुदिन खोत, उत्कर्ष गांधी, आदी मंचावर उपस्थित होते. तसेच पुण्याच्या माजी महापौर व माजी आमदार दीप्ती चवधरी, सिंहगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एम. एन.नवले, सुर्यदत्ता इन्स्टिट्युटचे संचालक संजय चोरडिया, जैन बंधुता संमेलनाचे अध्यक्ष अशोक पगारिया, जैन महिला जागृती मंचच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा निम्मी जैन यांनी याप्रसंगी उपस्थित राहुन मुनिश्रींच्या प्रवचनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या सुरवातीस श्रीकांत पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते कलशस्थापना करण्यात आली. त्यानंतर पिंपरी येथील एकता ग्रुपतर्फे मंगलाचरण सादर करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक  कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले.

मुनिश्रींना श्रीफळ अर्पण करून आशिर्वाद घेतल्या नंतर माजी आमदार दीप्ती चौधरी म्हणाल्या, “हल्लीच्या धकाधकीच्या, अशांत जीवनात अध्यात्मिक विचारांचे महत्व वाढले आहे. आजची पिढी ही सतत कोणत्या न कोणत्या गोष्टीसाठी धडपडत असते. प्रसंगी ती भरकटतही असते. अशा पिढीसाठी मुनिश्री हे योग्य मार्ग दाखविणारे दीपस्तंभ आहेत. मुनिश्रींची मधूर वाणी, मौलिक विचार, नागरिकांना प्रेरणादायी आहेत. पुणेकरांना त्यांचे विचार ऐकावयास मिळत आहेत, ही एक आनंदाची बाब आहे. कै. रसिकलाल धारिवाल यांनी समाजासाठी सदैव मोठे योगदान दिले, त्यांचे नाव चार्तुमास मंडपास देऊन त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करण्यात आले. ही समाधानाची बाब आहे” असे त्या म्हणाल्या.

सिंहगड संस्थेचे अध्यक्ष एम.एन नवले म्हणाले, शालेय शिक्षण जैन शाळेमध्ये झाले आहे. त्यामुळे लहानपणापासून जैन समाजातील उत्सव पाहत आलो आहे. विशेषत: चातुर्मास काळात जेव्हा गुरू महाराज येत त्यांचे आशीर्वाद आवर्जून घेत असत. आजही मी आवर्जून चातुर्मास कार्यक्रमात महाराजांचे दर्शन घेत असतो. या चातुर्मासानिमित्त मुनिश्रींना ऐकायची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.”

यावेळी मुनिश्रींचे पाद्प्रक्षालन करण्यात आले. उपस्थित मान्यवर पाहुण्यांना मुनिश्रींनी पुस्तके भेट दिली. प्रवचनास भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उपाध्यक्ष अजित पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

….नवऱ्याची बायको’ झाली २ वर्षांची

0

‘गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं’ असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, ‘स्वावलंबी’ राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी ‘नखरेल’ शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. सबंध महाराष्ट्रातील तमाम जनतेने डोक्यावर उचलून धरलेल्या या लोकप्रिय मालिकेने नुकतंच २ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला.

या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर मालिकेच्या २ वर्षपूर्तीसाठी एक स्पेशल पोस्ट शेअर केला. मालिकेतील कलाकार ऑफस्क्रीन देखील तितकीच धमाल करतात. त्यांनी हा आनंद केक कापून साजरा केला. त्यांची ऑनस्क्रीन मस्ती चाहते त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंट्सवर पाहतात. गुरुनाथ, रेवती आणि गुप्ते यांचे म्यूजिकली व्हिडीओजना देखील चाहते तितकेच आवडीने बघतात. सध्या मालिकेत राधिकाने ए.एल.एफ. कंपनीला टेकओव्हर करून कंपनीची सर्व सूत्र स्वतःच्या हातात घेतली आहेत. गुरुनाथ आणि शनाया त्याच कंपनीत काम करत असून राधिका त्यांना चांगलाच धारेवर धरत आहे. आता राधिका गुरुनाथ आणि शनायाला धडा शिकवण्यासाठी त्यांना कसं तिच्या तालावर नाचवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. या मालिकेने २ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आणि अजून पुढे देखील अशीच करत राहील यात शंकाच नाही.

पद्मावती ला २० तासाहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित

0

पुणे- उद्या गुरुवार आहे म्हणून बहुधा काल संध्याकाळीच म्हणजे बुधवारीच सातारा रस्त्यावरील चव्हाण नगर ,पद्मावती परिसरात बत्ती गुल झाली ..ती आज दुपारी 3 वाजेपर्यंत देखील पुन्हा प्रगट झाली नव्हती .
पद्मावती परिसरात ठराविक भागात कायमच होणाऱ्या विद्युत पुरवठ्याबाबत च्या अनियमित पणा मुळे या भागात यूपीएस आणि इनव्हरटरचा धंदा तेजीत आला आहे .मात्र यामुळे मध्यमवर्गीयांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे .

अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश दर्शनासाठी पुण्यात

0

पुणे- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचा कलश (गुरुवार, ता. २३ ऑगस्ट) सकाळी साडेदहा ते दुपारी ३ या वेळेत जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सन्मान, भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. पुणेकरांनी दर्शन घेऊन आदरांजली वाहिली.

 

मुख्यमंत्री तसेच प्रदेश अध्यक्षांच्याकडून काल पालकमंत्री गिरीश बापट यांनी पंतप्रधान श्रध्येय अटल बिहारी वाजपेयीजीं यांचा अस्थिकलश स्वीकारला. हा अस्थिकलश पुणेकरांच्या दर्शनासाठी आज सकाळ पासून ठेवण्यात आला. दुपारी ३ वाजेपर्यंत हॉटेल सन्मान येथील भाजप कार्यालयात या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यात आले.त्यानंतर आळंदी नगरपरिषदेजवळ काही काळ दर्शनासाठी ठेऊन इंद्रायणी नदीत अटलजींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे. शहर अध्यक्ष योगेश गोगावले, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे,महापौर मुक्ता टिळक, सरचिटणीस उज्वल केसरकर,उपाध्यक्ष दत्ता खाडे, कोषाध्यक्ष विनायक आंबेकर, कार्यालय मंत्री उदय जोशी, जिल्हा सरचिटणीस सचिन सदावर्ते,संजय मयेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अस्थीकलशाचे पूजन करून अटलजींना अभिवादन करण्यात आले.

‘मायानगरी मुंबईमध्ये चित्रीकरण करण्याचा अनुभव भन्नाट’ – हार्दिक जोशी

0

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने सध्या लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस,निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेने नुकतेच ५०० भागांचा टप्पा पार केला. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. ऑनस्क्रीन भोळा तसेच रांगडा दिसणारा पेहलवान पठ्ठा राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष देतो. सध्या मालिकेत राणा मॅटवरील कुस्तीचा सराव करत आहे आणि त्यासाठी त्याचा पल्ला एका लेडी मॅनेजरशी पडलाय.

कोल्हापुरात वाढलेल्या राणाचा मुंबईमध्ये निभाव लागणार नाही असं ठाम मत सखी अंजलीकडे व्यक्त करते पण तिच्या बोलण्याला न जुमानत अंजली तिचं हे आव्हान स्वीकारते आणि राणाला मुंबईमध्ये घेऊन येते. सखी आणि अंजली राणाला या स्वप्ननगरी मुंबईमध्ये एकट्याने प्रवास करून बालसरा यांच्या ऑफिसला यायला सांगतात. बावरलेला राणा मुंबईमध्ये पहिल्यांदाच येतो आणि त्याचं स्वागत मुंबईच्या पाकिटमाराने होतं जो त्याचं पाकीट मारतो. लोकल ट्रेनच्या लेडीज कंपार्टमेंटमध्ये चुकून चढणे, भूक लागलेली असताताना पैसे नसल्यामुळे डबेवाल्याचं जेवण खाणे या सगळ्या प्रसंगांना सामोरं जाऊन राणा मुंबईची एक वेगळीच बाजू अनुभवतो.

कोल्हापूरच्या रांगड्या मातीत चित्रीकरण होणाऱ्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचं पहिल्यांदाच धकाधकीचं जीवन असलेल्या मुंबईमध्ये चित्रीकरण झालं आणि त्याबद्दलचा अनुभव शेअर करताना राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी म्हणाला, “मायानगरी मुंबईमध्ये चित्रीकरण करण्याचा अनुभव भन्नाट होता. आपण असं म्हणतो कि मुंबईमध्ये कोणाला वेळ नसतो, सगळे घडाळ्याच्या काट्यावर चालतात पण जेव्हा आम्ही चित्रीकरण करत होतो तेव्हा पाऊस असताना देखील सर्व जण थांबून शूटिंग पाहत होते. अनेक चाहते भेटले, त्यांनी आमच्या कामाचं कौतुक केलं. लोकल व रेल्वे प्लॅटफॉर्मवर शूट करताना देखील तेथील प्रेक्षकांना एक सुखद धक्काच मिळाला. खुद्द राणाला समोर बघून सगळे स्थिरावले. मला पहिल्यांदा कॅन्डीड शूटचा अनुभव घ्यायला मिळाला. चाहत्यांची रेलचेल चालूच होती पण त्यांना चित्रीकरणाचं गांभीर्य समजावल्यावर त्यांनी देखील सहकार्य केलं.”

काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन

0

नवी दिल्ली- काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे 63 वर्ष वय होते. आज (ता.22) सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, दिल्लीतल्या प्रायमस रुग्णालयात त्यांचे निधन झाले. ते कामानिमित्त दिल्लीला गेले असता, त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

मुंबई काँग्रेसमधील वादामुळे त्यांनी आपल्या पदांचा गेल्या वर्षी राजीनामा दिला होता. कामत यांना गांधी कुटुंबियांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जायचे. 5 ऑक्टोबर 1954 रोजी कामत यांचा कर्नाटकातील अंकोला येथे जन्म झाला होता. ते पुढे मुंबईतील कुर्ल्यात राहत होते. त्यांचे वडील आनंदराव कामत हे ऑटोमोबाईल्समध्ये काम करायचे.

कामत हे 1984 पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. पाचवेळा ते ईशान्य मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये 2009 ते 2011 या काळात केंद्रिय गृहराज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.

दरम्यान, काँग्रेसमधील अभ्यासू नेते म्हणून ते ओळखले जायचे. काँग्रेसमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पडत संघटनकौशल्य सिद्ध केले होते. त्यांच्या निधनाने मुंबई आणि महाराष्ट्र काँग्रेसचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

15 व्या वित्त आयोग सदस्यांची लाईट हाऊस प्रकल्पास भेट

0

पुणे :- स्वत:च्या कौशल्य विकासातून युवक व युवतींचे करिअर विषयक स्वप्न साकार व्हावे
यासाठी आणि त्यातून उपजीविकेचे साधन मिळवून आर्थिकदृष्टया सक्षम होण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने
महानगरपालिका आणि पुणे सिटी कनेक्ट यांच्यावतीने महानगपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी लाईट हाऊस
प्रकल्प राबविण्यात येत आहे. पंधराव्या वित्त आयोगाचे सदस्य शक्तिकांता दास, डॉ.अशोक लहेरी, डॉ.अनुप
सिंग, सचिव अरविंद मेहता यांनी आज औंध येथील लाईट हाऊस प्रकल्पाला भेट देऊन, तेथे राबविण्यात
येणाऱ्या उपक्रमांची माहिती जाणून घेतली. महापौर मुक्ता टिळक, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल
देवरा, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यावेळी उपस्थित होते.
या प्रकल्पाची माहिती आयोगातील सदस्यांना देताना, महानगरपालिका आयुक्त सौरभ राव
यांनी, वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवक युवतींना, 20 दिवसांच्या फाऊंडेशन कोर्सद्वारे प्रशिक्षणाची सुरुवात
करण्यात येते, असे सांगितले. लॅपटॉप, व्हिडिओ वॉल यासारख्या साधनांचा वापर करतानाच
प्रशिक्षणार्थ्यांमधील कौशल्य विकासाला चालना मिळेल अशा अभ्यासक्रमांचा समावेश प्रशिक्षणात केल्याचे
त्यांनी सांगितले.
लाईट हाऊस प्रकल्पामध्ये चालू असलेल्या अभ्यासक्रमांची आणि नियोजित उपक्रमांची माहिती ऋची
माथूर, गणेश नटराजन व अमृता बहुलेकर यांनी आयोगातील सदस्यांनी दिली. आयोगातील सदस्यांनी प्रशिक्षण
घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून, प्रशिक्षणामुळे त्यांच्या आयुष्यात झालेल्या बदलाविषयी माहिती
जाणून घेतली. विद्यार्थ्यांना डिजीटल तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणाऱ्या फिरत्या वाहनाची पाहणी आयोगाच्या
सदस्यांनी केली.
महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शितल उगले, सहायक आयुक्त संदीप कदम, नोडल अधिकारी गणेश
सोनुने, तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व विद्यार्थींनी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.