केरळमधील आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पुण्यातील स्वयंसेवकांची धाव
पुणे-दादा जे. पी. वासवानीं च्या कोमल हृदयाने कधीच कोणाच्या दुःखाकडे दुर्लक्ष केले नाही. कोणत्याही आपत्तीमध्ये ते साधू वासवानी मिशन च्या कार्यकर्त्यांसोबत उभे असायचे आणि आपल्या प्रयत्नांनी आपत्तीग्रस्तांना मदत पुरवायचे.
दादाजींची हीच शिकवण घेऊन साधू वासवानी मिशन ची एक टीम केरळ येथे पोचली आहे.
मिशन च्या स्वयंसेवकांची एक टीम केरळ येथील थ्रिसूर या ठिकाणी १८ ऑगस्ट रोजी रवाना झाली आहे. त्याठिकाणी स्वयंसेवक अन्न शिजवून एका ट्रकच्या माध्यमातून परवूर येथे दुष्काळग्रस्त लोकांना पोहोचवत आहेत. तेथील परिस्थिती खूप भीषण आहे. लोकांनी त्यांचे सर्व काही गमावले आहे.
मिशन मधून आणखी एक टीम केरळ मध्ये गेली आहे, जी अधिक जास्त पूरग्रस्त भागात जाऊन त्यांना मदत करतील. अन्नाचे उत्पादन ४००० पॅकेट्स पर्यंत वाढले आहे.
एका स्वयंसेवकाने सांगितले आहे, “जेव्हा आम्ही तिथे मदतीसाठी गेलो तेव्हा आम्हाला तिथल्या एका चहावाल्याने चहा दिला आणि त्याचे पैसे सुद्धा घेतले नाहीत. इथली स्थानिक लोकं आम्हाला खूप मदत करत आहेत.”
एक्साइस अधीक्षक श्री. रामकृष्णन म्हणाले, “दादाजींच्या आशीर्वादाने आम्ही चांगली मदत देऊ शकू.”
मिशन समर्थकांचे आणि स्वयंसेवकांचे या कार्याला हातभार लावल्याबद्दल खूप आभार मानत आहे.