पुणे- मला माझ्या वार्डातील समस्या मांडू द्यायच्या नाहीत ,मला सभागृहात बोलण्याची परवानगी द्यायची कि नाही याबाबत भाजपच्या नगरसेवकाला विचारून मला सातत्याने टाळायचे ..असे राजकारण एक स्त्री महापौर असूनही माझ्याबाबत केले जात आहे असा आरोप आज राष्ट्रवादीच्या नगरसेविका, माजी स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांनी केला आहे .
सभागृहात आपल्याला जाणूनबुजून बोलू देत नाहीत असा आरोप त्यांनी केला आहे .आज सभागृहात प्रशासनाच्या कारभारावर कॉंग्रेस भाजपचे सदस्य टीका करणारी भाषणे करत असताना कदम यांनी याबाबत हात वर करून बोलण्याची परवानगी महापौरांकडे मागितली होती मात्र त्याबाबत काहीही न बोलता महापौरांनी पुढील नेत्यांची नावे पुकारल्याने आज व्यथित होवून अश्विनी कदम बाहेर पडल्या , त्यानंतर माध्यमांशी बोलताना पहा आणि ऐका त्या काय म्हणाल्या ….