पुणे- मी महापौर असताना २३ फेब्रुवारीला पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आलो आहे .आणि २७ फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांना पत्र दिले आहे त्यात म्हटले आहे ‘ मी महापालिकेतील सर्वोच्च पदावर काम केले आहे आता यापुढे मी विरोधी पक्ष नेता ,स्थायी समिती अध्यक्ष ,प्रभाग समिती अध्यक्ष ,वा कोणतेही पद घेणार नाही असे आज सभागृहात …बोलताना माजी महापौर प्रशांत जगताप यांनी स्पस्त केले एवढेच नव्हेतर त्यांनी जर दत्ता धनकवडे विपक्ष नेते पद साठी इच्छुक असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छ्या आहेत असे हि ते म्हणाले .
वास्तविक पाहता प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध कॉंग्रेस आणि भाजप चे नगरसेवकांनी सभागृहात रान पेटविले असताना प्रशांत जगताप यांनी प्रशासनाची बाजू मांडण्याचा आभास निर्माण केला यावेळी त्यांना त्याप्सून दूर नेण्यासाठी गोपाळ चिंतल यांनी ..तुम्ही आता विरोधीपक्षनेते होणार असा टोमणा मारत विषयापासून त्यांना वळविण्याचा प्रयत्न केला त्यावेळी जगताप यांनी वळून हा खुलासा केला … पहा हा व्हिडीओ….