Home Blog Page 3091

क्राऊडस्ट्राईक’चा भारतात आणखी विस्तार, पहिले संशोधन केंद्र पुण्यात स्थापन

0

पुणे : क्लाऊड-डिलीव्हर्ड एन्डपॉईंट या दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्याबाबत आंतरराष्ट्रीय ख्याती लाभलेल्या क्राऊडस्ट्राईक या कंपनीने पुण्यात संशोधन व विकास विभाग सुरू केला आहे. आशिया-पॅसिफिक व जपान या भूप्रदेशात उलाढाल वाढविण्याच्या दृष्टीने कंपनीने भारताची, त्यातही पुण्याची निवड केली आहे. क्राऊडस्ट्राईक कंपनीने भारत, आग्नेय आशिया व उत्तर आशिया या विभागांसाठी जगदीश महापात्रा यांची व्यवस्थापकीय संचालक या पदावर नियुक्ती केली आहे.

क्राऊडस्ट्राईकने ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे आपले कामकाज 2015 मध्ये सुरू केल्यानंतर या कंपनीला आशिया-पॅसिफिक क्षेत्रात चांगला प्रतिसाद मिळाला व नवीन ग्राहक मिळण्याबरोबरच कंपनीची वाढ शंभर टक्क्यांहून अधिक झाली. त्यामुळे या भूप्रदेशातील कारभाराबद्दल आत्मविश्वास वाढून क्राऊडस्ट्राईकने भारतात विस्तार करण्याचे ठरविले आहे. क्राऊडस्ट्राईक फाल्कन प्लॅटफॉर्म’, ‘थ्रेट इन्टेलिजन्स ही उत्पादने आणि इतर सेवा यांचा विस्तार या भागात करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

क्राऊडस्ट्राईक कंपनीने आशिया खंडासाठी जगदीश महापात्रा यांची व्यवस्थापकीय संचालक या पदावर नियुक्ती केली आहे. कंपनीचा पाया या भूप्रदेशात मजबूत करण्याची व नवीन संधी शोधण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. क्राऊडस्ट्राईकमध्ये येण्यापूर्वी महापात्रा हे मॅकफी या कंपनीत आशिया-पॅसिफिक विभागाचे प्रमुख या पदावर कार्यरत होते. त्यांनी तेथे चांगली कामगिरी बजावली होती. त्यापूर्वी ते मॅकफीचे भारत व सार्क सदस्य देशांसाठीचे व्यवस्थापकीय संचालक होते. मॅकफीच्या अगोदर महापात्रा दहा वर्षे सिस्कोमध्ये कार्यरत होते.

महापात्रा या प्रसंगी म्हणाले, ‘’सायबर सुरक्षेसाठीची बाजारपेठ आता बदलली आहे. अशा वेळी एन्डपॉईंट सुरक्षा क्षेत्रात नवीन मानके तयार करण्यात आघाडीवर असणाऱ्या कंपनीत काम करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी अतिशय उत्साहीत आहे. एन्डपॉईंट सुरक्षा साधण्यासाठीक्लाऊड-नेटीव्ह पध्दत  अधिक प्रभावी आणि कार्यक्षम आहे, तसेच ती वापरण्यास बाजारपेठ सज्ज आहे, हे क्राऊडस्ट्राईक कंपनीला मिळालेल्या यशावरून सहज दिसून येते. क्राऊडस्ट्राईकला भारतात व सार्क देशांमध्ये कारभार वाढवायचा आहे व याकामी मी सतत गतीशील राहणार आहे.’’

सायबर सुरक्षितता क्षेत्रात प्रतिभावान मनुष्यबळाची टंचाई ओळखून स्थानिक विद्यापीठांबरोबर भागीदारी वाढवण्यासाठी क्राऊडस्ट्राईकने पुणे शहराची निवड केली आहे. क्राऊडस्ट्राईकचे मुख्य उत्पादन अधिकारी, अमोल कुलकर्णी हे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे (सीईओपी) येथील पदवीधारक आहेत. ते या प्रसंगी म्हणाले, ‘‘क्राऊडस्ट्राईकचे संशोधन केंद्र पुण्यात स्थापन होत आहे. ही कंपनी सीओईपी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सायबर सुरक्षा विभागाला सायबर शिक्षण व प्रशिक्षणार्थी उपलब्ध करून देणार आहे. त्यात मला सहभागी होता येत आहे, ही मोठीच अभिमानाची बाब आहे.’’

पुण्यात नावीन्यपूर्ण संशोधनाचे केंद्राची उभारणी करण्याबरोबरच आशियामध्ये नवीन ग्राहक मिळवणे व त्यांना सेवा देणे याची यंत्रणाही क्राऊडस्ट्राईक कंपनी येथूनच उभारणार आहे.

एका जलद वाढणाऱ्या उद्योगातील आघाडीची कंपनी म्हणून, क्राउडस्ट्राईकचा व्यवसाय आशिया-पॅसिफिक भागात सतत विस्तारत आहे. सर्वात जास्त उत्पन्न देणाऱ्या प्रादेशिक बाजारांमध्ये ही कंपनी संसाधने उभी करत आहे. यापेक्षाही जास्त यश कंपनीला मिळवून देण्याचा मी व माझे सहकारी मिळून प्रयत्न करणार आहोत. भारत आणि सार्क देशांतील बाजारांमध्ये आमच्या व्यवसायास प्रचंड वाव आहे. ही आमच्यासाठी मोठी संधी आहे’’, असे क्राऊडस्ट्राईकचे आशिया-पॅसिफिक आणि जपान विभागाचे उपाध्यक्ष अॅन्ड्र्यू लिट्लप्राऊड म्हणाले.

अॅन्टी व्हायरस (एव्ही), एन्डपॉईंट डिटेक्शन आणि प्रतिसाद (एडीआर) आणि व्हायरस शोधण्याची चोवीस तास चालणारी यंत्रणा या सर्वांचा एकमेव व एकत्रित तोडगा क्राऊडस्ट्राईक फाल्कन या सॉफ्टवेअरमधून ग्राहकाला मिळतो. क्राऊडस्ट्राईक फाल्कनच्या माध्यमातून ग्राहकाला व्हल्नरॅबिलिटी मॅनेजमेंट, आयटी हायजिन, थ्रेट इंटेलिजन्स ऑटोमेशन, डिव्हाईस कंट्रोल आणि बऱ्याच गोष्टी एकत्रित मिळतात. 

क्राऊडस्ट्राईक कंपनीच्या क्लाऊड-नेटिव्ह नेटवर्क्ससाठी सध्या बरीच मोठी मागणी आहे. अनेक कंपन्या सध्या वापरत असलेली अॅन्टी व्हायरस सॉफ्टवेअर्स बदलून टाकण्याचा विचार करीत आहेत. त्यांना प्रगत एंडपॉईंट डिटेक्शन आणि रिस्पॉन्स क्षमता केवळ क्राऊडस्ट्राईकच देऊ शकते.

जगभरात दररोज 150 अब्ज इतक्या सुरक्षा यंत्रणांचा आढावा सध्या क्राऊडस्ट्राईककडून घेतला जातो. क्राऊडस्ट्राईक फाल्कन या सॉफ्टवेअरची ही क्षमता वाढवण्याचा  कंपनीचा विचार आहे. म्हणूनच नवीन ग्राहक व त्यांच्यासाठीचे क्लाऊड-नेटीव्ह मॉड्यूल्स यांचा विस्तार करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

आय एम ई डी च्या व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थींनीकडून वाहतूक पोलिसांना राखी !

0
पुणे :‘भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट’ (आय.एम..डी.)  च्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागाच्या विद्यार्थींनीनी वाहतूक पोलिसांना राखी बांधून अनोख्या पद्धतीची ‘राखी पौर्णिमा’ साजरी केली.
रक्षाबंधनाच्या दिवशी रविवारी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील सिग्नल्सवर जे वाहतूक पोलीस कार्यरत होते त्यांना या विद्यार्थींनीनी राखी बांधली.
या उपक्रमात सहभागी विद्यार्थिनींना ‘भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड मॅनेजमेंट डेव्हलपमेंट’ (आयएमडी) चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर, प्रा. विजय फाळके (कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना) यांचे मार्गदर्शन लाभले.

भाजपवासी प्रसन्न जगताप नाराज …

0

पुणे- बीडीपी मधील एका बांधकामाच्या पाडापाडी वरून माजी उपमहापौर आणि सध्याचे भाजप नगरसेवक प्रसन्न जगताप यांनी काल झालेल्या पालिकेतील भाजपच्या बैठकीत स्पष्ट नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे .

महापालिकेत भाजपा या पक्षाला स्वतंत्र कार्यालय देण्यात आले आहे .या ठिकाणी भाजप नगरसेवकांच्या बैठका होत असतात . आज होणाऱ्या मुख्य सभेच्या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी भाजप नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या वेळी प्रसन्न जगताप यांनी थेट हि तक्रार करत नाराजी व्यक्त केली .  महापौर ,सभागृहनेते ,आणि भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यावेळी उपस्थित होते . या बैठकीत आपल्याला आपल्या व्यथा मांडायच्या होत्या पण त्या मांडू दिल्या जात नाहीत ,सभागृहात बोलायचे असते पण बोलू दिले जात नाही . अशा तक्रारी आज सकाळी भाजपच्या काही नगरसेवकांनी नावे न सांगण्याच्या अटीवर माध्यमांकडे केल्या .

गंगाधर बधेंच्या १० एकरावर आरक्षणे …

0
पुणे- एकीकडे निवडणुकांच्या तोंडावर जातीय आरक्षणांच्या विषयाने राज्यात गदारोळ माजला असताना दुसरीकडे जमिनीवरच्या आरक्षणांचा कुटील कारभार महापलिकेच्या पातळीवरून मोठ्या रंजक पद्धतीने खेळला गेल्याचे चित्र पुढे येते आहे .
येवलेवाडी विकास आराखडा करताना २ ते ३ ठिकाणी असलेल्या गंगाधर बढे यांच्या सुमारे १० एकर जागेवर कचरा डेपो ,दफनभूमी ,आणि इडब्ल्यूएस चे आरक्षण टाकल्याचे वृत्त हाती आले आहे . 
हे आरक्षण राजकीय वैमनस्यातून टाकले आहे कि आणखी कसे यावर आता विचारमंथन होत आहे . बधे शिवसेनेचे  असून त्यांनी महापालिका निवडणूक लढविली होती .आता ते विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे समजते .

पीएमआरडीएकडून अनधिकृत बांधकाम तपासणीची धडक मोहीम हाती

0

पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए)च्या हदीतील अनधिकृत
बांधकामांची अचानक तपासणी करून कारवाईची धडक मोहीम अतिक्रमण विभागाने हाती घेतली आहे. या
मोहिमेच्या माध्यामतून अनधिकृत बांधकामे प्रत्यक्ष पाहून कारवाई करणे सोपे जाणार आहे.
या अनधिकृत बांधकाम तपासणीची सुरुवात मांजरी बुद्रुक सर्व्हे नंबर १२७/१३२ मधून करण्यात आली आहे.
अतिक्रमण विभागाचे प्रमुख पोलीस अधीक्षक सारंग आवाड, अपर जिल्हाधिकारी मिलिंद पाठक,
उपजिल्हाधिकारी सुहास मापारी या अधिकाऱ्यांसह अभियंते व कर्मचाऱ्यांनी ही धडक मोहीम राबविण्यास
सुरुवात केली आहे. या कारवाईकरिता पीएमआरडीए हद्दीतील काही परिसरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
अनधिकृत बांधकाम तपासणी दरम्यान आढळून आलेल्या बांधकामांचा सर्व्हे करून तात्काळ बांधकाम
थांबविण्याचे आदेश नोटिशीद्वारे देण्यात येणार आहेत. ज्या भागात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात आहेत
अशा भागात ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार आहे. हाती घेण्यात आलेल्या मोहिमेतून बांधकाम
करतेवेळी घेण्यात येणारी दक्षता तसेच बांधकाम परवानगी व नागरिकांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे.
मा. आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले की, अनधिकृत बांधकामे ताबडतोब बंद करावीत, अन्यथा गुन्हे दाखल
करून लवकरच बांधकाम निष्कासनाची कारवाई केली जाईल. ही मोहीम अत्यंत कडकपणे राबविली जाणार
आहे. अनधिकृत बांधकामास वचक बसण्यासाठी ही मोहीम प्रभावी ठरेल. काही प्रमाणात अशा बांधकामांना
आळा बसेल. जी बांधकामे नियमनाकुल असतील ती बांधकाम परवानगी घेऊन नियमित करण्यात यावीत.

LFW मध्ये सई ताम्हणकरचा ग्लॅमरस अंदाज

0

फॅशनच्या दूनियेत सध्या सई ताम्हणकर सर्वाधिक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. लव सोनिया सिनेमामूळे तर आता सई ताम्हणकर ग्लोबली प्रसिध्द झाली आहे. त्यामूळे अर्थातच यंदा लॅक्मे फॅशन वीकमध्ये सई ताम्हणकरला एक नाही, दोन नाही तर तीन-तीन डिझाइनर्सकडून आमंत्रण आले होते.

पुनीत बलाना, दिशा पाटील आणि ज्युली शाह ह्या तीन डिझाइनर्सच्या रविवारी झालेल्या फॅशन शोजना सईला विशेष आमंत्रण होते. आणि ह्या तीन डिझाइनर्सच्या तीन वेगवेगळ्या शोजना सईचे तीन ग्लॅमरस अंदाज दिसून आले.

पुनीत बलानाच्या शोमध्ये सई मोनोक्रोमॅटिक ग्राफिक शॉर्ट ड्रेसमध्ये आली होती. मोनोक्रोमॅटिक ड्रेससोबत पोनीटेल आणि ब्लू आयलाइनरमूळे तिचा एलिगन्ट लूक दिसून येत होता. सईच्या ह्या बोहो-चीक लूकमूळे ती फॅशन शोला आलेल्या प्रत्येकाचेच लक्ष वेधून घेत होती.

पुनीत बलानानंतर सईने दिशा पाटीलचाही फॅशन शो अटेंड केला. ह्या शोला सई थ्री पीस लुक मध्ये दिसली. ज्यामध्ये सईने  लव्हेंडर कलरचा  क्रॉप टॉप, पलाझो पँट्स आणि एम्ब्रॉडरी केलेलं जॅकेट घातलं होतं. सईच्या ह्या लुकला खूप प्रशंसा मिळाली. अशावेळी पॅपराझी झाली नसती तरच नवलं. लॅक्मे फॅशन शोच्या रेडकार्पेटवर सईचा हा लूक हिट असल्याचं फॅशन फोटोग्राफर्सच्या न थांबणा-या क्लिक-क्लिकने दिसून आले.

जुली शाहच्या ‘अबजीनी’ कलेक्शन असलेल्या फॅशन शोला येताना सईने पेस्टल पींक कलरचा धोतीकट जम्पसूट घातला होता. न्यूड लिपस्टिक, न्यूड हिल्स आणि फक्त गोल्डन बँगल्समूळे ह्या लूकला एक वेगळंच ग्लॅमर आलं. सईच्या ह्या स्टनिंग इव्हिनिंग लूकमूळे ती फॅशन ब्लोगर्सच्या आकर्षणाचे केंद्र बनली.

थायलंड रॅलीत संजय संयुक्त तिसरा

0

पुणेपुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने थायलंड प्री-रॅली मालिकेच्या दुसऱ्या फेरीत गटात संयुक्त तिसरे, तर एकूण क्रमवारीत चौथे स्थान मिळविले. मुसळधार पावसामुळे निसरडा झालेला मार्ग तसेच क्लचमध्ये बिघाड होऊनही संजयने ही कामगिरी नोंदविली.लोपबुरीमध्ये शनिवारी-रविवारी ही रॅली पार पडली. संजयने थायलंडच्या डेलो स्पोर्टसने सुसज्ज केलेली इसुझू डीमॅक्स कार चालविली. थायलंडचा मिनील थान्याफात त्याचा नॅव्हीगेटर होता. संजय आणि थायलंडचा ड्रायव्हर अम्नुआय यांची एकूण वेळ 33 मिनिटे 28 सेकंद अशी समान वेळ झाली.

सात स्टेजेसच्या रॅलीत पहिल्या आणि सहाव्या स्टेजचा अपवाद वगळता इतर सर्व स्टेजेसमध्ये संजयची वेळ सरस होती, पण एफआयए (फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल अॅटोमोबाईल) नियमानुसार (क्रमांक 54.3) पहिल्या स्टेजमधील वेळेचा निकष लावण्यात येतो. त्यानुसार संजयची वेळ 4 मिनीटे 44 सेकंद, तर अम्नुआयची 4.35 सेकंद होती. संजयने दुसऱ्या स्टेजमध्ये 4.02-4.01, चौथ्यात  3.52-3.56, पाचव्यात 3.39-3.42, सातव्यात 3.38-3.50तर आठव्यात 3.40-3.32 अशी सरस वेळ नोंदविली होती. सहाव्या स्टेजमध्ये त्याची 10.02, तर अम्नुआयची 9.43  सेकंद अशी वेळ होती.
संजयने सांगितले की, गुरुवारी थायलंडमध्ये दाखल झाल्यानंतर मला दोन दिवस कारचा तांत्रिक तयारीत घालवावे लागले. त्यानंतरही क्लचचे सेटींग मनासारखे झाले नव्हते. पावसामुळे मार्गात खड्डे झाले होते. त्यामुळे मला सावध सुरवात करावी लागली. पहिल्या स्टेजमधील सावध ड्रायव्हिंगमुळे मी थोडा मागे पडलो. नंतर पावसामुळे तिसरी आणि नववी स्टेज रद्द झाली. पावसात टोयोटा आणि मित्सुबिशी अशा कमी वजनाच्या कार सरस ठरल्या. माझी कार चार दरवाजांची, तर इतर कार दोन दरवाजांच्या होत्या. इतर कार बॅलन्सिंग करण्यात तुलनेने सोप्या होत्या. पहिल्या सर्व्हिसला आम्ही क्लचप्लेट्स बदलून घेऊ शकलो नाही. त्यामुळे मला जास्त वेग वाढवून चालणार नव्हते. अशावेळी गिअर बदलताना कार इंजिनवर ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी लागली. सरळ मार्ग असल्यावर वेग वाढविणे आणि वळणांच्यावेळी क्लच न वापरणे असे माझे धोरण होते. हा अनुभव वेगळाच ठरला.
ही रॅली थायलंडच्या अत्तुयातने जिंकली. संजयचा सहकारी विचावत दुसरा आला. संजयला चौथ्या क्रमांकाचे गुण मिळाले.
या रॅलीत भारताचा अश्विन नाईक सहभागी झाला होता. भारताचाच चिबोरलांग वाहलांग त्याचा नॅव्हीगेटर होता. 33.58 सेकंद वेळेसह ही जोडी पाचवी आली.

विद्या बाळ यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान

0

पुणे- महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा सावित्रीबाई फुले  पुरस्कार स्त्री चळवळीतील कार्यकर्त्या व लेखिका विद्या बाळ यांना महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी आमदार दीप्ती चवधरी,नगरसेविका नंदा लोणकर,माधुरी सहस्रबुध्दे,  मंजुश्री खर्डेकर, स्मिता वस्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या ,’विद्या बाळ यांनी स्त्री चळवळीत ठसा उमटवला. स्त्रियांच्या शोषणाविरुध्द आंदोलने केली. परंतु ही चळवळ केवळ स्त्री मुक्तीची न होता स्त्री वादी कशी होईल यासाठी सातत्याने प्रयत्न केला. स्त्रियांचे मूलभूत हक्क, अधिकार आणि महिलांच्या शोषणाविरोधात त्यांनी लढा दिला. विद्याताईंनी तमाशा कलावंतांच्या प्रश्‍नांपासून सर्वसामान्य महिलांचे प्रश्‍न अभ्यास करून समाजासमोर मांडले. स्त्रियांना स्वत्वाची जाणीव करुन देण्याचे काम त्यांनी केले. स्त्री शिक्षित झाली पाहिजे यासाठी विद्याताईंचा आग्रह  होता असे गौरवोद्गार महापौर मुक्ता टिळक यांनी यावेळी काढले.
विद्या बाळ म्हणाल्या ,‘आनंद, संकोच, कृतज्ञतेने स्वीकारते. समृध्द शहरात जन्मलो व काम करू शकलो अशा शहराच्या महापालिकेने पुरस्कार दिला ही महत्वाची गोष्ट आहे. ज्या नावाने हा पुरस्कार दिला ते लाखमोलाचे आहे. सावित्री आणि ज्योतीबा फुले  माझ्या चळवळीतील मायबाप आहेत. ज्यांना मी आई-वडिल मानले त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याचा मनापासून आनंद झाला. हा पुरस्कार लाखमोलाचा आहे. पुरस्कार कधीच एकट्या व्यक्तीचा नसतो. आजवरच्या वाटचालीत छोट्या मोठ्या कामात बरोबर असणार्‍या सर्वांचा हा पुरस्कार आहे.
आमच्याकडे स्त्रीला स्थान आहे, आमच्याकडे स्त्री मुक्ती चळवळीची गरज नाही असे काही संस्कृती रक्षकांचे मत आहे. परंतु पुरुषांच्याबरोबरचा सन्मान तिच्या वाट्याला आलेला नाही. महिलांना माणसासारखे जगता येत नाही. त्यासाठी शिक्षण देणे महत्वाचे हे ज्योतिबांचे विचार आहेत. अजूनही बाई माणूस आहे असे अजूनही काही जणांना वाटत नाही. पुरुषांसारखे विकास शोधत चालता आले पाहिजे हे बायांना पटलेले नाही. पुरुषांना पण कळले नाही.
फुले,, शाहू, आंबेडकर नाव घेतली जातात. पण सावित्रीबाई यांचे जीवन माहिती नाही. स्त्रियांना खूप काही मिळाले पण सर्व काही मिळाले नाही ते पुरुषांनी द्यायचे नाही. स्त्रियांचे स्वातंत्र्य सर्वांनी मान्य करायचे आहे. स्त्री-पुरुष चळवळ पुढे नेणार्‍या विचाराला, तत्वाला मान्यता देणारा हा पुरस्कार आहे म्हणून आनंद आहे.
एक लाख रुपयांचा पुरस्कार असल्याचे जाहीर झाले. सरकारने असे ठरवले एक लाख रुपये नाही द्यायचे. आम्ही भांडणार नाही. हा विद्या बाळांचा अपमान नाही. पण सावित्रीबाईंचा अपमान आहे. त्याचा निषेध नोंदवावासा वाटतो. एक लाख रुपये मला नको होते. सभोवती काम करणार्‍या लोकांना वाटण्यासाठी या पैशाचा उपयोग झाला असता, अशी खंत व्यक्त केली. पुरुष नगरसेवकांनी या कार्यक्रमाला  मोठ्या संख्येने  हजर राहाणे आवश्यक होते असेही मत त्यांनी व्यक्त केले.
महापालिका वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांचे सत्कार करते. मीरा भाईंदर येथील एका नागरिकानं पीआयएल दाखल केली. त्यावर हायकोर्टाने अशा प्रकारचे खर्च करता येणार नाही. असे शासनाला आदेश दिले. त्यामुळे शासनाने अशाप्रकारचे आदेश दिले. पनवेल येथील महापालिका परिषद झाली. या परिषदेत शासनाला पत्र देणार आहोत. प्रत्येक शहराचे वैशिष्ट्य असते. सांस्कृतिकपण हे पुण्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे शासन व हायकोर्टाला तसे पत्र देणार आहोत. असे स्पष्टीकरण महापौरांनी केले.

डॉ. अनिल अवचट म्हणाले,
विद्या बाळ यांचा सत्कार तत्कालिक नसून, त्यांनी आजवर केलेल्या कामाचा सत्कार आहे. मला स्त्रियांच्या प्रश्‍नांशी अगत्य आहे. व्यसनमुक्तीच्या कार्यात पुरुष मारहाण करतात, शिव्या देतात हे सोसून संसार करते. वाईटपणापासून मुलांना वाचवते. तिने साठवलेले पैसे दारुसाठी वापरतो. उपचारासाठी मुला बाळांना घेऊन परत येते. इतके मोठे मन स्त्रिचे असते. खंबीरपणे उभ्या राहतात. फुले  दाम्पत्यांने केलेले कार्य अचाट आहे. हे काम आता कोठे आहे. ज्या बायका शिकल्या ते कोठे आहेत. आता काय परिस्थिती झाली. सर्व सुधारणा उपभोगवादाने गिळली की काय अशी शंका येते. नटवेपणाकडे आपण गेलो आहोत. ज्यांनी इतर स्त्रियांशी काम करायचे त्या कॅटवॉकवर चालत आहेत. वासनेला सिमा आहे का नाही. समाज नियंत्रण असते. उपभोग घेण्याची वाढत चालली आहे काय. आपल्या स्त्रिकडे आपण कसे पाहातो याचा विचार करावा. समान अधिकार, इज्जत देतो का हा विचार करावा. त्याबाबतीत आपण मागे आहोत. क‘ूर झालो आहोत. त्यामुळे विद्या बाळांसारखे स्त्री चळवळीतील काम महत्वाचे वाटते.
स्त्रिया व्यसनात नव्हत्या. समाजाचे बंधन आहे ते बरे आहे असे म्हणायचो. परंतु स्त्रियांच्या व्यसनाधिनतेसाठी आम्हाला वॉर्ड काढावा लागलो. आपण कोठे आहोत याचा विचार केला पाहिजे. विद्या बाळांची चळवळ स्त्रीवादी नसून अनुरूपवादी आहे. पुरुष व स्त्रियांनी एकमेकांच्या उणीवा भरून काढल्या पाहिजेत. प्रत्येकाने आपल्या स्त्रिच्या स्थानाकडे निर्भिडपणे पाहावे असे वाटते.
नगरसेविका माधुरी सहस्रबुध्दे यांनी परिचय व आभार प्रदर्शन केले. मंजुश्री खर्डेकर यांनी मानपत्राचे वाचन केले. नंदा लोणकर यांनी सूत्रसंचालन केले.

ऐतिहासिक मजकूर हटवून भाऊ रंगारींचा अवमान ?

0

पुणे- ज्या दिवशी महापालिकेत संध्याकाळी गणेश मंडळांची बैठक झाली, त्या बैठकीत भाऊ रंगारींच्या या ऐतिहासिक नोंदीबद्दल पालिकेचे आभार मानले गेले आणि  त्याच दिवशी काही तासातच तो मजकूर हटविला गेला …  भाऊ रंगारी यांनी गणेशोत्सव सुरु केला अशा ओळी हटवून ,भाऊ रंगारींचा अवमान करण्याची हिम्मत केली कोणी ?याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाऊ रंगारी गणेशोत्सव ट्रस्टच्या सुरज रेणुसे यांनी केली आहे ….पहा आणि ऐका ,नेमके त्यांनी काय म्हटले आहे ….

एनआयपीएम नॅशनल बिझनेस प्रश्नमंजुषा स्पर्धेत तामिळनाडूचा संघ विजयी

0

पुणे :नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल  मॅनेजमेंट म्हणजेच एनआयपीएम या मनुष्यबळ विकास क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील  संस्थेद्वारे  घेण्यात येणाऱ्या वर्ष २०१८ च्या   एनआयपीएम नॅशनल बिझनेस क्विझ अर्थात एनआयपीएम राष्ट्रीय बिझनेस प्रश्नमंजुषा स्पर्धेत तामिळनाडू  राज्यातील संघ विजयी ठरला आहे. एनआयपीएमच्या नयीवेली विभागाच्या या संघातील अण्णामलाई  विद्यापीठाच्या व्यवस्थापन शाखेचे विद्यार्थी  एम. गोबीनाथ व जी. कार्तिकेयन हे दोन विद्यार्थी विजयी ठरले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापन शाखेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात या विजयी संघाला   एनआयपीएमचे कार्यकारी संचालक एस. एन.सिंग यांच्या हस्ते रुपये वीस हजारचा धनादेश व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. तर  उपविजेता प्रथम संघ ठरलेल्या कर्नाटक राज्यातील क्रिश्तू जयंती स्कुल ऑफ मॅनेजमेंटचे विद्यार्थी एलेक्स एम. साजी व सान्या जोसेफ या दोघांना एनआयपीएमच्या राष्ट्रीय परिषदेचे पश्चिम विभागाचे सदस्य एस. जी.चव्हाण यांच्या हस्ते रुपये पंधरा हजारचा धनादेश व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच उपविजेता व्दितीय  संघ ठरलेल्या औरंगाबाद येथील एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थिनी अरुणिमा पुसदेकर व सुरभी आहेर यांना एनआयपीएमच्या राष्ट्रीय परिषदेचे उत्तर विभागाचे सदस्य कॅप्टन नरेश कक्कर यांच्या हस्ते रुपये दहा हजारचा धनादेश व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी  बोलताना इंडसर्च चे संचालक  डॉ. अशोक जोशी यांनी सांगितले  की, अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे प्रत्यक्ष उद्योगजगताशी संबंधित बाबींची माहिती विद्यार्थ्याना सहजगत्या होते. तसेच व्यवस्थापनविश्व किती व्यापक आहे याबाबतही विद्यार्थ्याना माहिती उपलब्ध होते. अशा स्पर्धांमधील सहभागामुळे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाला योग्य दिशा मिळण्यास मदत होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन  विभागाच्या शंतनुराव  किर्लोस्कर अध्यासनाचे प्रमुख डॉ. कॅप्टन. सी. एम.चितळे यांनी विद्यार्थ्याना एनआयपीएम संस्थेच्या उपक्रमांबाबत माहिती सांगितली.

याप्रसंगी कार्यक्रमाला एनआयपीएमचे  नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश  कुलकर्णी,  एनआयपीएम औरंगाबाद विभाग प्रमुख सुनिल  सुतावणे,एनआयपीएमचे कार्यवाह अजय कुलकर्णी, यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे संचालक डॉ. मिलिंद मराठे यांच्यासह पुम्बाचे प्राध्यापक, विद्यार्थी व विविध व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयांचे  विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केविन फिलिप्स यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अमितकुमार गिरी यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली. तर समारोपप्रसंगी सामूहिक राष्ट्रगीत गायन झाले.

येवलेवाडी डीपी घोटाळा-मनसे च्या वतीने सीबीआय चौकशीची मागणी (व्हिडीओ)

0

पुणे-येवलेवाडी विकास आराखडा करताना भाजपचे आमदार योगेश टिळेकर आणि बिल्डर त्यागी तसेच नियोजन सामीचे सदस्य आणि महापालिकेचे अधिकारी यांनी संगनमत करून मोठा घोटाळा केला आणि ५० एकर जागेवर निवासी झोन टाकला ..असा आरोप मनसे चे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी केला आहे .आज पत्रकार परिषद घेवून त्यांनी हा आरोप केला . उद्या येवलेवाडी चा विकास आराखडा महापालिकेच्या मुख्य सभेत मंजुरीसाठी येत आहे .या पार्श्वभूमीवर मोरे यांनी केलेल्या या आरोपांमुळे हा विकास आराखडा घोटाळ्यात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहे .
आमदार टिळेकर यांनी पदाचा गैरवापर करून डोंगरमाथा-डोंगरउतार असलेली सुमारे पन्नास एकर जागा संबंधित बिल्डरला निवासी झोन करून दिली आहे. येवलेवाडीचा विकास आराखड्याला अंतिम मान्यता देताना अनेक नियमबाह्य गोष्टी करण्यात आल्या आहेत. साडेसहा एकर मैदानाचे आरक्षण पूर्णपणे डोंगर असलेल्या ठिकाणी करण्यात आलेले आहे, असा आरोप नगरसेवक मोरे यांनी केला आहे.
भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील हडपसरचे आमदार योगेश टिळेकर कामकाजासाठी वापरत असलेली मर्सिडिस मोटार ही येवलेवाडीतील विकास आराखड्याबाबत एका बिल्डरला केलेल्या मदतीचे बक्षीस म्हणून मिळाल्याचा गंभीर आरोप नगरसेवक वसंत मोरे यांनी केला आहे. अशा प्रकारे सत्तेचा दुरूपयोग करणाऱ्या आमदार टिळेकर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मोरे यांनी केली आहे.
पहा आणि ऐका नेमके वसंत मोरे यांनी काय म्हटले आहे .

श्री कपर्दिकेश्वरला तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांचा महापूर

0

यात्रेनिमित्त दोन लाखावर भाविक जंगी कुस्त्यांचा आखाडा रंगला
ओतूर- दि२७ (संजोक काळदंते)-
श्री क्षेत्र ओतूरच्या श्री कपर्दिकेश्वर मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवार
निमित्त दूरदूरवरून आलेल्या लाखो भाविकांचा महापूर तांदळाच्या पिंडीचे दर्शन
घेण्यासाठी लोटला होता.आलेल्या भाविकांनी शिवलिंगावर बनवण्यात आलेल्या
तांदळाच्या कलात्मक पिंडींचे दर्शन घेतले.सकाळी शिवलिंगावर सौ व श्री
रत्नाकर धिरडे,विशाल पानसरे,अनिल गुंजाळ,किरण कुटे,सचिन तांबे,विलासशेठ दांगट,अनिलशेठ तांबे,संजय डुंबरे,वसंत पानसरे,गांधी पानसरे,वैभव तांबे,राजेंद्र डुंबरे,जितेंद्र डुंबरे,अमोल डुंबरे,सागर दाते,पांडुरंग
डुंबरे,पांडुरंग ताजने,नितीन तांबे,राजेंद्र हांडे सर,सतीश तांबे,प्रशांत
डुंबरे,स्मिता डुंबरे यांनी पुजा आरती केली तर श्री व सौ सुरेश कोंडीभाऊ
डुंबरे यांनी पुजा अभिषेक केला मंदिर सकाळी ६ वाजता भावीकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले असे येथिल पुजारी गोविंदकाका डुंबरे,अनिलकाका तांबे,दत्तात्रयकाका शिंदे यांनी सांगितले.


श्री कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे व
सचिव वसंत पानसरे यांनी अधिक माहीती देताना सांगितले कि,दरवर्षी श्रावणी
सोमवार निमित्त येथील शिवलिंगावर तांदळाच्या पिंडी तयार केल्या जातात या
कलात्मक पिंडीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण राज्यातून भाविक भक्त मोठ्या
श्रद्धेने येत असतात चालू आठवड्यात पावसाने उघडीप दिल्याने भाविकांना रांगेत
दर्शन घेण्यास सोपे झाले होते.सकाळी मंदिर दर्शनासाठी खुले केल्यावर गर्दीचा
ओघ कमी होता मात्र ११ वाजेनंतर गर्दी वाढत गेली. यात्रेनिमित्त गावामधून राम
कृष्ण हरी नामाची दिंडी काढण्यात आली होती यामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या
प्रमाणात सहभाग दर्शविला. श्रावणी सोमवार निमित्त मोठी यात्रा भरली असल्याने
ठिकठिकाणाहून आलेल्या भाविकांसह ग्रामस्थांनी देखील भरलेल्या यात्रेचा आनंद
घेतला यात्रेतील पाळणे,खेळणी,आणि लागलेल्या स्टॉलमधील खाद्य पदार्थाचा देखील
मनमुराद अस्वाद घेवून यात्रा साजरी केली. सकाळी सहा वाजल्यापासून मंदिर
भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. संपूर्ण श्रावण महिन्याच्या
प्रती सोमवारी भव्य यात्रा भरत असते या यात्रेचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी
मोठ्या संख्येने भाविक भक्त संपूर्ण महाराष्ट्रातून येत असल्याने उत्साहपूर्ण
वातावरणात यात्रा संपन्न होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून
कपर्दिकेश्वर देव धर्म संस्था,ग्रामस्थ,ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस
निरीक्षक सुरज बनसोडे आणि पोलीस स्टाफ,पोलीस ठाण्याच्या हद्दील पोलीस
पाटील,पोलीस नागरिक मित्र संघटनेचे स्वयंसेवक यात्रेत तैनात होते. भाविकांच्या आरोग्य सेवेकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूरचे आरोग्य सेवक यात्रेत आरोग्य सेवा देत होते,नारायणगाव वाहतूक नियंत्रण आगार यांच्यातर्फे भाविकांची ने आन करण्यासाठी जादा एस.टी.बसेसची सोय करण्यात आली असल्याचे वाहतूक नियंत्रक व्ही एस परदेशी यांनी सांगितले.तिसऱ्या श्रावणी सोमवारची यात्रा मोठ्या दिमाखात संपन्न झाली.
ऐतिहासिक परंपरा असणारा ओतुरचा आखाडा एवढा काही रंगला होता कि
संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या नामवंत मल्लांच्या कुस्त्या या आखाड्यात
चांगल्याच रंगतदार झाल्या कुस्ती शौकिनांनी तसेच ग्रामस्थांनी कुस्त्यांचा
मनमुराद आनंद लुटला.पहिली कुस्ती पन्नास रुपयाची झाली.लहान मोठ्या कुस्त्या झाल्या.आखाडा नियोजन शिवराम काळे,दिगंबर काळे आणि परीवाराने केले.आखाड्यात सुकाणू कमिटी मध्ये अनिल तांबे,भास्कर डुंबरे,जी.आर.डुंबरे,रघुनाथ तांबे,उल्हास गाढवे,वैभव तांबे,वसंत
पानसरे,बबनदादा तांबे,महेंद्र पानसरे,राजेंद्र डुंबरे,रामदास तांबे यांनी काम
केले कुस्त्या लावण्याचे काम प्रकाश डुंबरे,अविनाश ताजने,अरविंद तांबे,पकानाना डुंबरे यांनी,पंच म्हणून छबुराव थोरात ,धनंजय डुंबरे,अशोक डुंबरे,रोहीदास घुले,ज्ञानेश्वर पानसरे,केरुभाऊ शिंगोटे यांनी काम पाहिले.
या आखाड्याचे आता स्टेडियम मध्ये रूपांतर होणार असून जुन्नरचे आमदार
शरददादा सोनावणे यांनी स्वनिधीतून ७५ लाख रुपये खर्चून येथे सुमारे पाच
ते सात हजार प्रेक्षक बसतील अशी भव्य व्यवस्था करण्यात आली आहे तसेच या
स्टेडीअमचा लोकार्पण सोहळा येत्या सोमवारी(दि.३) म.न.से.पक्षप्रमुख राज
ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे अध्यक्ष अनिलशेठ तांबे यांनी
सांगितले.

एल पी एफ च्या पीस अम्बॅसॅडर्स – ८ व्या बॅचच्या २४ मुली यूकेसाठी रवाना

0
पुणे-१९९६ साली पद्मश्री लीला पूनावाला यांनी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षित आणि सक्षम करण्यासाठी पहिले पाऊल उचलले. आपल्या २२ वर्षांच्या प्रवासाच्या कालावधीत फाऊंडेशनने  शिष्यवृत्तीसाठी पात्र अश्या कितीतरी मुलींना शिष्यवृत्ति देऊन त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार केले आहे.
 
प्रशिक्षणाचा भाग म्हणून  आशा सेंटर यूकेच्या सहयोगने लीला पूनावाला फाऊंडेशनने    २००८ पासुन पीस अॅम्बेसेडर प्रॉग्राम सुरू केला आहे. या अंतर्गत दर वर्षी्प्रमाणे या वर्षी देखील लीला पुनावाला फाऊंडशनने आपल्या आठव्या बॅचच्या  २४ विद्यार्थिनींना  यूकेस पाठविले आहे. ह्या मुली   नुकत्याच यूकेसाठी रवाना झाल्या आहेत. 
 
 समिना फाऊंडेशन यूके मागील ३ वर्षांपासून या प्रॉग्रामसाठी एलपीएफचे प्रायोजक आहे. या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे मुलींना जागतिक व्यासपीठ प्रदान करणे, जागतिक स्तरावर प्रतिनिधत्व करण्यास सक्षम असे लिडर तयार करने. आशा फाऊंडेशन आणि एलपीएफच्या एकत्रित प्रयत्नातुन आजतगायत १२०  मुलींनी ह्या तीन आठवड्याचा  प्रशिक्षण कार्यक्रम लाभ घेतला आहे.

मुख्य सभेत दाबला जातोय ..नगरसेवकांच्या लेखणीचा हि आवाज

0

पुणे- महापौर आमचा आवाज दाबू नका अशा तक्रारी अनेक नगरसेविकांनी आजवर मुख्य सभेत केला .पण तो सभागृहात उच्चारलेला तोंडी आवाज होता . आता विशाल तांबे यांनी … मुख्य सभेत नगरसेवकांनी विचारलेला ..उठवलेला लेखी आवाजही दाबला जातोय ते लेखी उघडकीस आणले आहे . नगरसेवकांकडून शहरांशी निगडित लेखी  प्रश्न उपस्थित करून प्रशासनाकडून खुलासा मागविण्यात येतो आणि त्या खुलाशाबाबत महापालिकेच्या मुख्य सभेत  चर्चा होत असते. मात्र, गेल्या सोळा महिन्यात नगरसेवकांनी  विचारलेल्या 490 लिखित प्रश्नोत्तरांपैकी केवळ तीन प्रश्नांची मुख्य सभेत  चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे यांनी लेखी प्रश्नोत्तरातून च  उजेडात आणली आहे .

नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी प्रशासनाची असते आणि त्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेत त्यावर चर्चा घडवून आणण्याची तितकीच जबाबदारी महापालिकेतील सत्ताधारी पक्षाची असते. महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर किती मुख्य सभा झाल्या ? या सभांमध्ये किती प्रश्न विचारण्यात आले ? किती प्रश्नांवर उत्तरे दिली ? किती प्रश्नांवरील उत्तरांवर सभागृहात चर्चा झाली ? किती प्रश्न शिल्लक आहेत ? अशी माहिती पालिका प्रशासनाला राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे यांनी विचारली होती.

त्याबाबत प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 1 फेब्रुवारी 2017 ते 31 जुलै 2018 या कालावधीत 187 मुख्य सभा झाल्या त्यामध्ये 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2017 या कालावधीत लेखी प्रश्‍न विचारले गेले नाहीत. त्यानंतर एप्रिल 2017 ते जुलै 2018 या कालावधीमध्ये 490 लिखित प्रश्न विचारले गेले.

त्यांपैकी केवळ तीन नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरांवर सभागृहात चर्चा झाली आहे यावेळी या प्रश्नांना संबंधित इतर दहा उपप्रश्न उपस्थित केले. कार्यक्रम पत्रिका संपल्यानंतर इतर 105 प्रश्नांचा यामध्ये समावेश यात होता. अशा प्रकारच्या कारभारामुळे प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

राहण्यायोग्य पुण्यातील …नगरसेवक हरवले आहेत…

0

पुणे- राहण्यायोग्य शहरातील म्हणजे पुणेकरांच्या पुणेरी पाट्या या जगप्रसिद्ध आहेत. अगदी शेलक्या शब्दात समोरच्याचा अपमान करणे हे फक्त पुणेकरच करू शकतात एरवी खास करून पेठ भागात आढळणाऱ्या या पाट्या आता शहराची ओळख बनल्या आहेत. या पाट्यांमधून पार्किंग पासून ते पुणेकरांच्या झोपेच्या वेळेपर्यंत सगळेच येते. मात्र, आता शहरातील प्रभाग 33 मधील नगरसेवकांना आपल्या कामाची आठवण करून देण्यासाठी नागरिकांनी ‘नगरसेवक हरवले आहेत’ असे फलक लावले आहेत.

वडगाव धायरी – सनसिटी या 33 नंबरच्या प्रभागात हरिदास चरवड, नीता दांगट, राजश्री नवले, राजू लायगुडे हे नगरसेवक आहेत. याच प्रभागातील डीएसके रोड ते डीएसके विश्व ( चव्हाण बाग ) या परिसरात रस्त्याची दुरवस्था झाली असून ड्रेनेजचे पाणी सुद्धा रस्त्यावर आले असल्याने या रस्त्यावर अपघात देखील होत आहेत. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी कानाडोळा केल्याने प्रभागातील नागरिकांनी

हरवले आहेत ! हरवले आहेत ! 
प्रभाग 33 मधील 
नगरसेवक हरवले आहेत ! 
रोडवर ड्रेनेज मैला पाणी…
रस्त्याची प्रचंड दुरवस्था…
अपघातांची मालिका सुरु…
अशा आशयाचे बॅनर लावून नगरसेवकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र, अशाप्रकारे रस्त्यावर जाणून बुजून मैला पाणी रस्त्यावर सोडण्यात येत असल्याचा दावा स्थानिक नगरसेवक राजू लायगुडे यांनी केला असून सबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे देखील लायगुडे यांनी सांगितले आहे. रत्यावर खड्डे पडले असून ते बुजवण्यासाठी मी स्वतः तिथे उपस्थित राहून कामाचा आढावा घेत आहे. पण विरोधकांनी अशा प्रकारचे कितीही बॅनर लावले तरी मला फरक पडत नसून मी माझे काम करत असल्याचे देखील लायगुडे म्हणाले. पाऊस सुरु असल्यामुळे कामात अडथळा येत आहे मात्र पाऊस उघडल्यास लगेचच काम पूर्ण करणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले