Home Blog Page 309

बिहारच्या निकालाने मतदान मोजणीत घोळ होतो यावर शिक्कामोर्तब- रोहित पवार

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे मतमोजणीत घोळ होत असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा केला आहे. सरकारचे बुजगावणे झालेली यंत्रणा व निवडणूक आयोग यामुळे लोकशाही व पर्यायाने आरक्षण व संविधान धोक्यात आले आहे, असे ते म्हणालेत.

बिहार विधानसभा निवडणुकीत राजद व काँग्रेसच्या महाआघाडीचा पार धु्व्वा उडाला आहे. तिथे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, हरियाणा, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल होता. हे चित्र पोस्टल मतदानात देखील स्पष्ट झाले होते. EVM व्होटिंगदरम्यान पहिला एक तास हा कल पोस्टलप्रमाणेच राहिला. परंतु पुढच्या एक दीड तासात सर्व चित्र पालटले. भाजपा आश्चर्यकारक रित्या पुढे गेली आणि धक्कादायक निकाल समोर आला.

आज सेम-टू-सेम याच पद्धतीचे चित्र बिहार निवडणुकीचे निकाल येताना दिसत आहे. येणाऱ्या निकालाने मतदान मोजणीत घोळ होतो यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सरकारचं बुजगावणं झालेल्या यंत्रणा, निवडणूक आयोग यामुळे एकंदरीतच लोकशाही आणि पर्यायाने आरक्षण व संविधान धोक्यात आलंय हे नक्की!

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा गुवाहाटी व्हाया सुरत जसा प्रवास झाला तसाच निवडणूक निकाल लावण्याचा आयोगाचा प्रवास हरियाणा टू बिहार व्हाया महाराष्ट्र असा दिसून येतो. असो,
हि निवडणूक थेट बिहारची जनता विरुद्ध इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यात आहे. तेजस्वी यादव यांना मिळालेला प्रतिसाद त्यांच्या सभांमध्ये उसळलेला जनसागर आणि त्यांनी युवांचे, शेतकऱ्यांचे मांडलेले प्रश्न बघता आजचा निकाल काहीही लागला, तरी जनतेची खरी पसंद आणि जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मात्र तेजस्वी यादव आहेत यात तिळमात्र शंका नाही, असे ते म्हणालेत.

शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनीही भाजपवर बिहार निवडणूक महिला मतदारांना तब्बल 10 हजारांची उघड लाच देऊन जिंकल्याचा आरोप केला आहे. महिला मतदारांना अधिकृत उघडपणे दहा हजार प्रत्येकी लाच, पाहिजे ते करून देणारा गुलाम निवडणूक आयोग, वाट्टेल त्यात मदत करणारी लाचार सरकारी यंत्रणा, विरोधकांना ब्लॅकमेल करणारी ईडी, सीबीआय, सर्वबाजूंनी कमावलेला निवडणूकीत बेशरमपणे वापरलेला अफाट काळा पैसा, गुंडगिरी, चोरटेपणा सर्वकाही, असे अनेक मुद्दे बिहार निवडणुकीवर बोलण्यासारखे आहेत. भारतात मतपेटीतून राजकीय परिवर्तन होते वगैरे हा इतिहास झाला, ते वर्तमान नाही, असे ते म्हणालते.

दिपोत्सावाने आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन

पुणे- सालाबाद प्रमाणे यंदाही आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला दिपोत्सावाने अभिवादन करण्यात आले क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान व मातंग एकता आंदोलन यांनी याक्रय्क्रामाचे आयोजन केले होते .
पुणे शहर यांच्या वतीने दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत्या या वेळी माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या हस्ते दिप प्रज्वलंन करुन दिप उत्सवाला सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित या भागातील माजी नगरसेवक अविनाश बागवे , सौ इंदिरा अविनाश बागवे, विठ्ठल थोरात , आरुण गायकवाड , यासेरबागवे , राजश्री अडसूळ ,लहुजी समता परिषद अध्यक्ष अनिल हातागळे, रवीअप्पा पाटोळे , जेधे फाउंडेशनचे कान्होजी जेधे नाना करपे , सुनील बावकर , गोविंद जाधव , हुसेन शेख , मारुती कसबे, अदित्य गायकवाड , सुनील साळवे , जयदीप शेलार , कुमार आडगळे , श्रावण पाटोळे , राहुल चिदम, मोसिन शेख व मोठ्या संख्येने महिला भगिनी व प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
.

जे सत्तेवर येणार होते त्यांना EVM ने ५० च्या आत संपवले

मुंबई- उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज लागलेल्या बिहार निवडणूक निकालावर त्यांनी भाष्य केले आहे. बिहारमध्ये जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती, त्यांना 50च्या आत संपवले असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

या संदर्भात संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग आणि भाजप यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या ठिकाणी एकदम महाराष्ट्र पॅटर्न दिसत असल्याचा दावा देखील राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी केलेली पोस्ट देखील पहा…

या संदर्भात आपल्या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी म्हटले की, बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते! एकदम महाराष्ट्र पॅटर्न! जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना ५० च्या आत संपवले!

बिहार निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत. 243 जागांसाठीच्या कलांमधून एनडीएला स्पष्ट यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. एनडीए 198 जागांवर आघाडीवर आहे आणि महाआघाडी 39 जागांवर आघाडीवर आहे. 2020 च्या तुलनेत एनडीएला 65 पेक्षा जास्त जागा मिळत आहेत, तर महाआघाडीला जवळजवळ तितक्याच जागांचे नुकसान होत आहे. गेल्या वेळी 43 जागांपर्यंत मर्यादित असलेले जेडीयू यावेळी 75+ जागांवर आघाडीवर आहे. याचा अर्थ नितीशकुमार सरकार पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे आणि नितीशकुमार दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. दरम्यान, 90 जागांवर आघाडी घेऊन भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. महाआघाडीत, राजद 29 जागांवर आघाडीवर आहे, तर 61 जागांवर निवडणूक लढवणारा काँग्रेस फक्त 4 जागांवर आघाडीवर आहे. 243 जागांवर निवडणूक लढवणारा प्रशांत किशोर यांचा पक्ष, जनसुराज, आपले खाते उघडू शकलेला दिसत नाही.

अपघात टाळण्यासाठी 6 हजार कोटींचा उन्नत मार्ग लवकरच कार्यान्वित होणार

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवले पूल परिसराला भेट देत केली पाहणी

आपत्काकालीन उपायांबाबत उद्या बैठक,नऱ्हे ते रावेत उन्नत मार्गाचाही करणार पाठपुरावा

पुणे (प्रतिनिधी) नवले पूल परिसरात गुरुवारी रात्री झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी आपत्काकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल. आपत्कालीन उपाययोजनांसंदर्भात उद्या (शनिवारी) संबंधित यंत्रणांसोबत बैठक घेतली जाईल.6 हजार कोटींचा उन्नत मार्ग – नऱ्हे ते रावेत व्हाया सुतारवाडी या उन्नत मार्गाचा विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) मंजूर झाला असून त्याला गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल,’अशी माहिती पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी दिली.

नवले पूल येथे गुरुवारी झालेल्या अपघातानंतर शुक्रवारी सकाळी मोहोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या वेळी खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम आदी उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, ‘२०२२ मध्ये येथे मोठा अपघात झाला होता. त्यानंतर जांभूळवाडी ते वडगावपर्यंत सातत्याने होणारे अपघात थांबविण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. त्यातील रम्बलर्सची संख्या वाढवणे, स्पीड गन्स वाढवणे, पंक्चर्स बंद करणे यासारख्या काही अल्पकालीन उपाययोजना अमलातही आणल्या गेल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन तीन वर्षात अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु,​ गुरुवारच्या दुर्दैवी अपघातात आठ जणांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे कायमस्वरूपीच्या उपाययोजनांना गती देणे आवश्यक आहे,’.

‘मागील अपघातानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत पुण्यात तसेच दिल्लीतही बैठक झाली होती. त्यात जांभूळवाडी ते सुतारवाडी व सुतारवाडी ते रावेत या ३२ किलोमीटर लांबीच्या व सुमारे सहा हजार कोटी रुपये खर्चाच्या उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रोड) करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा ‘डीपीआर’ही मंजूर झाला आहे. त्यामुळे येथील अपघात थांबविण्यासाठीच्या या दीर्घकालीन उपाययोजनेला गती देण्यासंदर्भात गडकरीजींची भेट घेऊन पाठपुरावा केला जाईल, असे मोहोळ यांनी नमूद केले.

‘अल्पकालीन उपाययोजनांमध्ये या मार्गावरून येणाऱ्या ट्रक्सची खेड शिवापूर टोल नाक्याजवळच लोड व ब्रेक तपासणी करणे, स्पीड गन्स वाढवून कारवाई करणे, रम्बलर्स वाढवणे आणि सेवा रस्ते पूर्ण क्षमतेने विकसित करणे आदींचा समावेश आहे. तसेच अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने पुढे पाठवता येण्याविषयी चाचपणी केली जाईल. यासंदर्भात पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन आणि पीएमआरडीए या सर्व घटकांची एकत्रित बैठक शनिवारी घेण्यात येईल. या सर्व यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव दिसल्यास कारवाई केली जाईल, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

बिहारमध्ये NDA सरकार, मोदी म्हणाले- सुशासनाचा विजय

बिहार निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. एनडीए २४३ पैकी २०२ जागांसह विक्रमी विजयाकडे वाटचाल करत आहे, तर महाआघाडीला ३४ जागा मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी एक्स वर लिहिले आहे की हा सुशासनाचा विजय आहे.

२०२० च्या तुलनेत एनडीए ७० पेक्षा जास्त जागा मिळवत आहे, तर महाआघाडी जवळजवळ तितक्याच जागा गमावत आहे. प्रचंड विजयादरम्यान, सम्राट चौधरी आणि ललन सिंह यांनी नितीश कुमार यांची भेट घेतली.

गेल्या वेळी ४३ जागांपर्यंत मर्यादित असलेल्या जेडीयूकडे आता ८०+ जागा आहेत. भाजप ९१ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे.

प्रमुख उमेदवारांमध्ये, तेजस्वी यादव यांनी राघोपूरमध्ये सुमारे १२,००० मतांनी विजय मिळवला. त्यांचे मोठे भाऊ तेज प्रताप यांचा महुआमध्ये पराभव जवळजवळ निश्चित आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री जिंकण्याची शक्यता आहे.

महाआघाडीत, आरजेडीकडे २६ जागा आहेत, तर काँग्रेसला चार जागा मिळण्याची शक्यता आहे. पीके यांचा पक्ष, जन सुराज आणि व्हीआयपी यांना त्यांचे खाते उघडता आले नाही. इतरांसह अपक्ष सहा जागांवर आघाडीवर आहेत.

अमित शाह यांनी X वर पोस्ट करून पक्षाचे विजयाबद्दल अभिनंदन केले आणि घुसखोरांना संरक्षण देणाऱ्यांना जनतेकडून “योग्य उत्तर” असे म्हटले. पंतप्रधान मोदी संध्याकाळी ६ वाजता दिल्लीतील भाजप कार्यालयाला भेट देतील.


गेल्या निवडणुकीपेक्षा एनडीएला ६० पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत.
२०२० पासून जेडीयूला ४०+ जागा मिळाल्याने त्यांचा सर्वात मोठा फायदा होत असल्याचे दिसून येते.
२८ जागांवर निवडणूक लढवणारा लोजपा २१ जागांवर आघाडीवर आहे.
सर्व २९ मंत्र्यांमध्ये एनडीए आघाडीवर
जेजेडीचे तेजप्रताप महुआमधून पिछाडीवर आहेत
रघुनाथपूरमधून आरजेडीचे ओसामा शहाब आघाडीवर आहेत
सरायरंजनमधून जेडीयूचे विजय चौधरी आघाडीवर आहेत
बाहुबली आणि आरजेडीचे उमेदवार रीतलाल यादव दानापूरमधून आघाडीवर आहेत
भोजपुरी अभिनेते आणि आरजेडीचे उमेदवार खेसारी लाल छपरातून पिछाडीवर आहेत.
भोजपुरी गायिका आणि भाजपच्या उमेदवार मैथिली ठाकूर अलीनगरमधून आघाडीवर आहेत.

वाचनाअभावी मुलांमध्ये मुक-कर्णबधिरता तर शिक्षकांमध्ये गतीमंदता : गिरीश प्रभुणे

बालकुमार सुवर्णगाथा स्मरणिकेचे प्रकाशन

पुणे : पालकांनीच वाचन सोडल्यामुळे आणि दृकश्राव्य माध्यमांमुळे मुलांना पुस्तके वाचनाची आवड आणि गोष्टी ऐकण्याची सवय राहिलेली नाही. अशा मुलांमध्ये मुक-कर्णबधिरता वाढीस लागल्याचे जाणवत आहे. शालेय मुलांना कविता वाचून, गाऊन दाखविल्या जात नसल्यामुळे शिक्षकही गतीमंद झाले आहेत, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. लहान मुलांची कल्पनाशक्ती वाढीस लागण्याच्या दृष्टीने, मुलांपर्यंत पुस्तके पोहोचविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभ आणि बालकुमार सुवर्णगाथा स्मरणिकेचा प्रकाशन समारंभ आज (दि. 14) आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी गिरीश प्रभुणे अध्यक्षपदावरून बोलत होते. स्मरणिकेचे प्रकाशन राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते तर लेखकांचा सन्मान अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, कार्यवाह प्रसाद भडसावळे, कोषाध्यक्ष संजय ऐलवाड मंचावर होते. बालकुमार साहित्य संस्थेच्या कार्यात सहभागी असलेले रामकृष्ण बेटावदकर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमास महाराष्ट्रातील संस्थेचे पदाधिकारी तसेच बालसाहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुले वाचत नाहीत असे म्हणणे खोटे आहे. मुलांना वाचायला दिल्यास ती आवडीने वाचतात याविषयीची उदाहरणे सांगून गिरीश प्रभुणे पुढे म्हणाले, मुलांचे वाचन वाढल्यास त्यांची कल्पनाशक्तीही वाढीस लागेल. उद्याच्या भारतापुढील समस्या जाणून घेण्यासाठी मुले आभासी, स्वप्नवत जगात राहून चालणार नाही. ग्रामीण, समाजातील मागास घटकांचे भावविश्व समजण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. 

मुलांमध्ये अकाली प्रौढत्व येऊ नये : प्रा. मिलिंद जोशी..

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, सध्या बालकुमारांसाठीचे उत्तम साहित्य देखण्या रुपात प्रसिद्ध होत आहे; पण या बालकुमारांना वाचनासाठी कसे प्रवृत्त करायचे हा मोठा प्रश्न आहे. कोरोना काळात लागलेले मोबाईलच्या वापराचे व्यसन उग्र रूप धारण करताना दिसत आहे. मुलांच्या धावपळीच्या जीवनशैलीत वाचन आणि खेळ या महत्वाच्या गोष्टींना स्थान राहिलेले नाही. पालक आणि शिक्षक पुस्तक वाचताना दिसले तरच मुले पुस्तके वाचणार आहेत. आपल्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता मुलांनी करावी अशी अपेक्षा पालक बागळून आहेत. त्यांच्या अपेक्षेत गैर काहीच नाही पण ती ठेवताना मुलांचे भावविश्व समजून घ्यायला हवे. अस्वस्थ वर्तमानाचे पडसाद मुलांच्या भावविश्वावर पडून त्यांचे  बालपण कोमेजून जाऊ नये आणि परिकथेत रमण्याच्या वयात त्यांना अकाली प्रौढत्व येऊ नये याची खबरदारी पालक आणि शिक्षक यांनी घ्यायला हवी.

सध्याची पिढी व्हर्च्युअल रिॲलिटीत : डॉ. सदानंद मोरे..

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, पूर्वीची पिढी साहस, अद्भुत, रम्य अशा रंगांत रंगलेली होती; पण सध्याची पिढी व्हर्च्युअल रिॲलिटीत रमलेली दिसून येत आहे. हे पालकांसमोरील मोठे आव्हान आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत सध्या बरीच चर्चा आहे, पण या मुद्द्याकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे. साहित्याच्या माध्यमातून वास्तवतेची जाणीव कशी करून देता येईल या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे. मुले वाचनाच्या दृष्टीने संस्कारीत होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. बालकुमार सुवर्णगाथा ही स्मरणिका मराठी साहित्य संस्कृतीतील प्रतिक ठरेल अशा शब्दात डॉ. मोरे यांनी स्मरणिकेचा गौरव केला.

बालकुमार सुवर्णगाथा या स्मरणिकेविषयी संपादक अनिल कुलकर्णी यांनी तर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखकांच्या सत्काराविषयी माधव राजगुरू यांनी माहिती दिली.

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखकांचा या वेळी सत्कार करण्यात आला. सत्कारार्थींच्या वतीने भारत सासणे आणि ल. म. कडू यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामीण भागातील शाळांना या प्रसंगी पुस्तक संच भेट देण्यात आला. या उपक्रमाची माहिती विश्वस्त राजेंद्र कुलकर्णी यांनी सांगितली. कार्यक्रमाची सुरुवात विमलाबाई गरवारे शाळेतील विद्यार्थिनींनी गायलेल्या महाराष्ट्र गीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रसाद भडसावळे यांनी मानले.

विश्वनाथाच्या रूपाने ‘मानवतेची ज्योत’ प्रज्वलीत-भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचे सुपूत्र सुनील शास्त्री यांचे विचार

विश्वधर्मी रामेश्वर (रूई) येथे ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवना’चे लोकार्पण

पुणे, १४ नोव्हेंबरः ” जगाला एका सूत्रात ठेवायचे असेल तर मानवता  आवश्यक आहे. मानवते शिवाय कोणताही देश जीवंत राहू शकत नाही. देशाच्या उन्नतीसाठी मानवता आणि व्यक्तीचे शुद्ध आचरण अत्यंत महत्वाचे आहे. आज रामेश्वर (रूई) येथे विश्वनाथाच्या रुपाने मानवतेची ज्योत पेटविण्यात आली आहे. जी संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आहे.” असे विचार भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचे सुपूत्र व माजी खासदार सुनील शास्त्री यांनी व्यक्त केले.
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारत व मानवता तीर्थ रामेश्वर (रूई)  यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात मोठ्या आणि विस्तीर्ण दालन असलेल्या ‘विश्वधर्मी मानवता तीर्थ भवनाचे’ लोकर्पण लातूर येथील विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रूई) या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
सत्य, शांती, अहिंसा, प्रेम आणि मानवतेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या, मानवी इतिहासातील काही उत्तुंग व पथदर्शी व्यक्तिमत्वांच्या चैतन्यदायी प्रतिकांची या ठिकाणी प्रतिष्ठापना, पूजन आणि कोनशिलेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच मानवतेची ज्योत प्रज्वलित ठेवणारे डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा विशेष सत्कार जपान येथून आलेले इसो कोईतोमियो व पेजावर मठाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस व रामविलास वेदांती हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संत वृत्तीचे शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर होते. तसेच या वास्तूचे संकल्पक, संरचना, नियोजक व निर्मितीकार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे उपस्थित होते.
तसेच आमदार रमेश कराड, माईर्स एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. राहुल वि. कराड, अध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड, माईर्स एमआयटीचे विश्वस्त हभप तुळशीराम दा. कराड, प्रगतिशील शेतकरी हभप काशीराम दा. कराड, रामेश्वर (रूई) चे सरपंच सचिन कराड व राजेश कराड उपस्थित होते.
सुनील शास्त्री म्हणाले,” भारतरत्न लाल बहाद्दू शास्त्री यांनी दिलेल्या जय जवान, जय किसन या संदेशाच्या पुढे वर्तमानकाळात जय इंसान जोडणे गरजेचे आहे. लाल बहादूर शास्त्री यांनी मानवतेचे स्वप्न मला दाखविले होते परंतू प्रत्यक्षात डॉ. कराड यांनी ते साकार केले आहे.”
डॉ.विजय भटकर म्हणाले,” मानवतेचा संदेश मांडणारे डॉ. विश्वनाथ कराड हे विश्वासमोर एक आदर्श आहेत. यातूनच समाजात एक उच्च संस्कृती उदयास येईल. या विचारातूनच एक आदर्श समाज निर्माण होईल. तसेच समरसतेचा संदेश खेड्या खेड्यातून जगापुढे जाणे गरजेचे आहे.”

प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” संपूर्ण जगाला विश्वशांती आणि विश्व कल्याणाचा संदेश विश्वधर्मी मानवता तीर्थ भवनातून जाईल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील भारत देशाचे खरे रुप रामेश्वर येथे दिसून येते आहे. हा मानवता भवनच संपूर्ण जगाची दिशा दर्शविणारा आहे. येथून भारतीय चिंतन, परंपरेचा संदेश विश्वात पोहोचणार असून सर्वांनी त्याचे अनुकरण करावे. भगवान गौतम बुद्धांचे पंचशील आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांचे पसायदान हे मानव उध्दारासाठी आहे.”
डॉ. राहुल दा. कराड म्हणाले,” संस्थेच्या माध्यमातून डॉ. कराड यांनी माइलस्टोन कार्य केले आहे. विश्व शांती हेच या संस्थेचे लक्ष्य असून त्या आधारेच मानवता तीर्थ भवनाची निर्मिती झाली. या भवनातूनच संपूर्ण जगात लोकशाही बळकट करणे, अध्यात्म आणि खिलाडूवृत्ती रूजविण या तीन गोष्टीं साकार होतील.”
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले,” विश्वात सुरू झालेल्या संघर्षाच्या वातावरणात मानव भयभीत झाला आहे. अशा वेळेस मानवधर्मा संदर्भात विचार करतांना एकात्मता, विज्ञान आणि अध्यात्माचा सारांश, संतांचे संतत्व आणि धर्माची पुण्याई या सर्वांचा मेळ म्हणजेच मानवता येथे दिसून येते आहे. सर्व धर्मांचा गाभा हा मानवतेचा आहे. येथूनच सात्विकतेचा आणि अहिंसेचा विचार विश्वाला तारणारा आहे. या वास्तूत मानवधर्माचे तीर्थ क्षेत्र दिसून येत आहे. येथे धार्मिकतेची देवाण घेवाण घडतांना दिसत आहे.”
डॉ. राम विलास वेदांती म्हणाले,” विश्वाला शांती आणि मानवतेचे रक्षण करण्यासाठी डॉ कराड यांचे मानवतेचे विचार महत्वाचे आहे. सामाजिक सदभावसाठी राष्ट्रीय एकतेचे सर्वात मोठे कार्य केले आहे. डॉ. कराड यांनी बनविलेले विश्वधर्मी मानवता भवनात सर्व जाती, धर्मांचे लोक विराजमान आहेत. रामेश्वर येथे सामाजिक एकतेचे दृष्य पहावयास मिळणे हे दुर्लभ क्षण आहेत.”
यावेळी फादर फेलिक्स मच्याडो, राहुल भन्ते बोधी, एडिसन सामराज, डॉ. मेहर मास्टर मूस, इझिकेल मळेकर, सरदार सुरजीत सिंह खालसा, डॉ. फिरोज बख्त अहमद, डॉ. लेसन आझादी, योगी अमरनाथ, मौलाना अन्सारी चतुर्वेदी, महंत रामदास, बि.के. बिन्नी सरीन, कमलाताई गवई, पुष्पा बोंडे, मायकेल गनेल, इंद्रजीत भालेराव या सर्वांनी डॉ. कराड यांच्या विश्वशांती कार्याला हातभार लावण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांच्या कार्याला पाहुन भारत सरकार कडून भारतरत्न देण्याची मागणी केली. ते सर्व गुण संपन्न आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे उत्तुंग कार्य पाहता त्यांना नोबल पुरस्काराने गौरवान्वित करण्यात यावे.
तसेच माजी केंद्रीय मंत्री डॉ. करण सिंग, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर आणि अमेरिकेतून डॉ. अशोक जोशी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून संदेश दिला.
यावेळी लेखक लक्ष्मण घुगे लिखित विश्वशांतीची महागाथा या कादंबरीचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते झाले. तसेच वास्तू रचनाकार विभीषण शेप यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. मिलिंद पात्रे यांनी ओमकार ध्यान साधना केली. डॉ. मंगेश तु. कराड यांनी स्वागतपर भाषण केले. डॉ. गौतम बापट व प्रा.अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुचित्रा कराड-नागरे यांनी आभार मानले.

बांधकाम कामगारांच्या मुलांनी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा-सहाय्यक कामगार आयुक्त दत्तात्रेय पवार

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे बांधकाम कामगारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा

पुणे: “राज्याच्या कामगार विभागाअंतर्गत कल्याणकारी मंडळ कार्यरत आहे. कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत कामगारांसाठी आणि त्यांच्या पाल्यांसाठी विविध कल्याणकारी योजना आहेत. त्या योजनांचे लाभार्थी होण्यासाठी बांधकाम कामगारांनी कल्याणकारी मंडळात नोंदणी करावी आणि योजनांचा लाभ घ्यावा,” असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त दत्तात्रेय पवार यांनी केले. याच कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रसिद्ध क्रिकेटपटू केदार जाधव यांनी जिद्द, परिश्रम, सातत्य, संगत आणि शिस्त पाळण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटरतर्फे बांधकाम कामगारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. शनिवार पेठेतील विष्णुकृपा हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात क्रिकेटपटू केदार जाधव, सहायक कामगार आयुक्त दत्तात्रेय पवार, प्रेरक वक्ते समृद्धी जाधव, बीएआयचे महाराष्ट्र अध्यक्ष जगन्नाथ जाधव, सचिव मनोज देशमुख, ‘बीएआय’चे अध्यक्ष अजय गुजर, उपाध्यक्ष राजाराम हजारे, कोषाध्यक्ष महेश राठी, माजी अध्यक्ष सुनील मते आदी मान्यवर उपस्थित होते.

दत्तात्रेय पवार म्हणाले, “कामगारांच्या पुढच्या पिढ्यानी उत्तम शिक्षण घेऊन करिअर घडवण्यासाठी प्रोत्साहन देणारा हा कौतुक सोहळा स्तुत्य आहे. कामगारांनी आपल्या नावाची पुराव्यासह नोंदणी कामगार विभागाच्या कल्याणकारी मंडळात केल्यास, अनेक योजनांचा लाभ त्यांना मिळू शकेल. विशेषतः कामगारांच्या पाल्यांसाठी, शिक्षणासाठी अनेक योजना आहेत. मात्र, कामगार नोंदणी करत नसल्याने त्याचा निधी शिल्लक राहतो. हे चित्र बदलले पाहिजे. कामगारांनी स्वतःची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करून स्मार्ट कार्ड घ्यावे आणि योजनांचा लाभ मिळवावा. पाल्यांनी आपल्या पालकांनी केलेल्या आणि करत असलेल्या कष्टांची जाणीव ठेवावी.”

केदार जाधव यांनी आपल्या जडणघडणीत कुटुंबीय, आसपासचे लोक, शाळा, शिक्षक या सर्वांचा परिणाम होत असल्याने संगत उत्तम ठेवण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. ज्यांचे सुरवातीचे संघर्ष तीव्र असतात, ते अधिक सक्षमपणे पुढे जातात. मोठी आव्हाने पेलू शकतात. मात्र, यशस्वी होण्यासाठी जिद्द, परिश्रम, चिकाटी, संयम, सातत्य आणि सराव, हे जपले पाहिजे. यशस्वी, मोठी माणसे कशी वागतात, बोलतात, त्यांची देहबोली कशी असते, ते कशी भाषा वापरतात, याचे निरीक्षणही विद्यार्थ्यांनी केले पाहिजे, त्यातून शिकले पाहिजे. स्वतःवर, स्वतःच्या अनुभवांवर विश्वास ठेवा. जे कराल त्याची जबाबदारी स्वीकारा, असा सल्लाही केदार जाधव यांनी दिला.

प्रेरक वक्ते समृद्धी जाधव यांनी विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणांतून, ध्येय, संयम, विवेक यांचे महत्त्व उलगडून सांगितले. आपल्या वर्तनाने आपल्या पालकांची मान खाली जाणार नाही, याची काळजी घ्या आणि कोणत्याही परिस्थितीत माय आणि मातीला विसरू नका, असा सल्ला दिला.

जगन्नाथ जाधव यांनी आत्मविश्वास, शब्द आणि वेळ पाळण्याचे महत्त्व आणि सातत्य जपण्याचे आवाहन केले. अजय गुजर यांनी स्वागतपर प्रास्ताविक करताना, कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका सांगितली. राजाराम हजारे यांनी असोसिएशनच्या कार्याची माहिती दिली. संजय आपटे यांनी सूत्रसंचालन केले. महेश राठी यांनी आभार मानले.

मातोश्री वृद्धाश्रम समोरील चौकात उड्डाणपूल, काळाची गरज!

पुणे-मातोश्री वृद्धाश्रम समोरील चौकात उड्डाणपूल ही काळाची गरज असून उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास जाण्याआधी सदर १०० फुटी डीपी रोडचे काम पूर्ण होणे, आवश्यक आहे. असे शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोथरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष स्वप्निल लक्ष्मी देवराम दुधाने यांनी म्हटले आहे आणि तसा आग्रह त्यांनी महापालिका प्रशासनाकडे धरला आहे .

स्वप्नील दुधाने म्हणाले,’ याबद्दल काल गुरुवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी पुणे मनपाचे आयुक्त श्री. नवलकिशोर राम यांची प्रत्यक्ष भेट घेतली असून निवेदन देत त्यांच्याकडे व्हिजिट देण्याची मागणी केली होती. यावेळी पत्रावर त्यांनी पथ विभागाचे मुख्य अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांना सूचना केली आणि त्या अनुषंगाने आज त्वरित सकाळी १० वाजता पथविभाग, प्रकल्प विभाग या पुणे महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी यांच्या सोबत प्रत्यक्ष मातोश्री वृद्धाश्रम येथे पाहणी करून याबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी माजी नगरसेविका सौ लक्ष्मी दुधाने, पथ विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भूतडा , प्रकल्प विभागाचे श्रीकांत गायकवाड , पथ विभागाचे उपअभियंता केदार वझे , पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता पियुष भोंडे यांच्यासह प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी केली आणि समस्येचे गांभीर्य लक्षात आणून दिले. आज पुणे महापालिकेत जाऊन निवेदन आणि नकाशा देत याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला असून अधिकारी वर्गानेही यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच यावर विचारविनिमय केला जाईल, असा शब्द दिला आहे. यामुळे भविष्यात वाहतूक कोंडीचा निचरा होऊन नागरिकांची गैरसोय दूर होईल, असा विश्वास वाटतो. आमच्या प्रभागातील मातोश्री वृद्धाश्रमाच्या समोरील राजाराम पूल चौकात गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतूक कोंडीचे चित्र दिसून येत असून यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. या चौकात दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू असणारे चार मुख्य रस्ते एकत्र येत असून सकाळ आणि सायंकाळच्या वेळी या ठिकाणी गर्दीचा महापूर अनुभवायला मिळत आहे.

पुणे महापालिका आणि वाहतूक पोलीस प्रशासन यांनी आजवर अनेकदा या समस्येवर तात्पुरती उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला असून हा प्रयत्न साफ अयशस्वी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी लोकप्रतिनिधी या नात्याने आपण कर्वेनगर आणि परिसरातील नागरिकांशी संवाद साधत सदर विषयावर सविस्तर चर्चा केली. नागरिकांशी चर्चा आणि विकास आराखड्याचा अभ्यास केला असता दुधाने लॉन्स, महालक्ष्मी लॉन्सकडून येणारा १०० फुटी डीपी रस्ता म्हात्रे पुलाकडे जाताना मातोश्री वृद्धाश्रमाच्या समोरील राजाराम पूल चौकात वाहतूक कोंडी होऊ नये तसेच ही वाहतूक सुरळीतपणे म्हात्रे पुलाकडे जाण्याकरिता उड्डाणपूल करण्याची आवश्यकता भासत आहे. याचसह कर्वेनगर ते सनसिटी सिंहगड रोड या दोन उपनगरांना जोडणाऱ्या मुठा नदीवरील उड्डाणपुलाचे काम सद्यस्थितीला ७०% पूर्ण झाले असून सदर रस्त्यावरील वाहतूक याच १०० फुटी डीपी रोडने अर्थात राजाराम पुलाकडे जाणार आहे. यामुळे उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास जाण्याआधी सदर १०० फुटी डीपी रोडचे काम पूर्ण होणे, आवश्यक आहे.भविष्यात वाहनांची संख्या आणखी वाढणार असून सदर मातोश्री वृद्धाश्रम चौकामध्ये वाहतूक कोंडीचा ताण वाढतच जाणार आहे. भविष्यातील हा ताण आणि यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी महालक्ष्मी लॉन्स समोरुन जाणाऱ्या या १००फुटी डीपी रस्त्यावरून म्हात्रे पुलाकडे जाण्याकरिता उड्डाणपूलाची आवश्यकता अधोरेखित होत आहे.

‘संघर्षगाथा माझ्या आयुष्याची’ आत्मकथनाचे प्रकाशन

पुणे: “पश्चिम बंगालसारख्या दुसऱ्या राज्यातून येऊन अमितकुमार बॅनर्जी यांनी संपर्क संस्थेच्या माध्यमातून बालग्रामसारखा उपक्रम राबविला. महाराष्ट्रात वंचित घटकांसाठी, अनाथ मुलांसाठी संस्थेच्या माध्यमातून इतके मोठे काम उभे केले, ही खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे. देश, समाजसेवेसाठी जाती-धर्म, प्रांत, भाषा यापलीकडे जाऊन कार्य करायला हवे,” असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे माजी सचिव आणि माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांनी केले.

अमितकुमार बॅनर्जी यांच्या जीवन आणि कार्यावर आधारीत ‘संघर्षगाथा माझ्या आयुष्याची’ या आत्मकथनपर पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी देवधर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, माजी शिक्षणाधिकारी व साहित्यिक डॉ. अनिल गुंजाळ, साहित्यिक प्रसाद मिरासदार, अमितकुमार बॅनर्जी, रत्ना बॅनर्जी, उत्कर्ष प्रकाशनाचे सु. वा. जोशी, सुधीर राशिनकर, अण्णा कातळे आदी उपस्थित होते.

सुनील देवधर म्हणाले, “संपर्क संस्थेच्या बालग्राम या उपक्रमाचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी हे महाराष्ट्राचा अभिमान आहेत. बॅनर्जी यांच्या रुपाने महाराष्ट्रातील असंख्य अनाथ मुलांना ममता मिळाली आहे. निराधार मुलांसाठी ते देवापेक्षा कमी नाहीत. प्रत्येक व्यक्तीला समाजाकडून खूप गोष्टी आयुष्यभर मिळत असतात, सेवाभावातून आपण प्रत्येकाने त्याची परतफेड करायला हवी. मात्र जे लोक समाजासाठी काही करत नाहीत, ते कृतघ्न असतात. तसेच आपण करत असलेले सेवाकार्य हे निरपेक्ष, पवित्र असायला हवे, त्यामध्ये भ्रष्टाचार नको आणि त्याचा व्यवसाय होणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी.”

अमितकुमार बॅनर्जी म्हणाले, “जवळपास ३५ वर्षापूर्वी ७ अनाथ मुलांसह मातीच्या घरातून संस्थेच्या कामाला सुरुवात केली होती. आज देशभरात संस्थेची ११ केंद्रे आहेत. केवळ भावनिक होऊन सामाजिक काम केले नाही, तर सगळी गणिते योग्य पद्धतीने सांभाळत हे काम उभे केले. माझ्यासोबत असलेल्या असंख्य जणांनी प्रत्येक टप्प्यावर मला मदत केली त्यामुळे मी हे काम करु शकलो. पुस्तक म्हणजे माझे आंदोलन नाही, तर माझ्या कामाचा प्रवास सांगण्याचा प्रयत्न आहे.”

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, “अमितकुमार बॅनर्जी यांच्यासारख्या व्यक्तीचे काम हे राष्ट्रीय एकात्मतेचे उत्तम उदाहरण आहे. दुसऱ्या राज्यात येऊन संघर्ष करणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे. त्यांनी केलेल्या कामाने महाराष्ट्र समृद्ध होईल आणि या आत्मकथनाने अनेकांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळेल.”

यावेळी डॉ. अनिल गुंजाळ, प्रसाद मिराजदार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रशांत पुराणिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर चेतन देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्थेच्या कार्यात विविध टप्प्यांवर मदतीचा हात देणाऱ्या अनेकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सीईओ अनुज सिंग, परेश खाडिलकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

गंमत जत्रेत बालवीरांनी घेतला भारतीय खेळांचा निखळ आनंद

श्री शिवाजी कुल, पुणे तर्फे बालदिनाच्या निमित्ताने आयोजन
पुणे : हत्तीला शेपूट लावणे…विटांवरून चालणे… डोक्यावर पुस्तक ठेवून चालणे… दोरीच्या उड्या… यांसारख्या पारंपरिक भारतीय खेळांचा आनंद बालवीरांनी गंमत जत्रेत घेतला. लिटिल सिंघमच्या वेशातील कलाकाराने केलेले स्वागत आणि तितक्याच जोशात मुला-मुलींनी केलेला स्काऊट सॅल्यूट असे बालमय झालेले वातावरण सदाशिव पेठेतील स्काऊट क्रीडांगणावर पाहायला मिळाले.

भारत स्काऊट गाईड स्थापना दिन आणि बालदिनाचे औचित्य साधून श्री शिवाजी कुल, पुणे या स्काऊट गाईड खुल्या पथकाच्या वतीने सदाशिव पेठेतील पंतसचिव स्काऊट क्रीडांगणावर बालवीर गंमत जत्रा २०२५ चे आयोजन करण्यात आले. यामध्ये  ज्यू.केजी ते ९ वी तील मुले-मुली, त्यांचे आई-वडील, आजी-आजोबा यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

गंमत जत्रेमध्ये १५ ते १८ विविध प्रकारचे बेस ठेवण्यात आले होते. त्या प्रत्येक ठिकाणी गमतीचे खेळ आयोजित करण्यात आले. यामध्ये एकाग्रता, शारीरिक क्षमता, संयम, अंदाज अशा गुणांची कसोटी लावणाऱ्या खेळांचा समावेश होता. श्री शिवाजी कुल संस्थेचे १०८ वे वर्ष असून यावेळी संस्थेतील आजी व माजी कुलवीर देखील मोठया संख्येने उपस्थित होते.

गोदरेज ऍग्रोव्हेट आणि आंध्र प्रदेश सरकारमध्ये ७० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसाठी सामंजस्य करार!

या करारामुळे डेअरी उत्पादन व्यवसायाला चालना मिळेल तसेच पामतेलची निर्मिती करण्या-या शेतक-यांसाठी समाधान केंद्रे उभारली जातील

मुंबई, विशाखापट्टनम : गोदरेज ऍग्रोवेट लिमिटेड कृषी खाद्य व्यवसायातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेड कंपनीने आंध्र सरकारसोबत स्थानिक आर्थिक गुंतवणुकीसाठी करार केला आहे. गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेड कंपनी आंध्र सरकारसोबत ७० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गोदरेज ऍग्रोव्हेटची ही गुंतवणूक आंध्र प्रदेशातील डेअरी क्षेत्राला चालना देईल. पामतेलचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ‘समाधान केंद्र’ नामक एक खिडकी केंद्राची उभारणी करेल. यामुळे कृषी उत्पादकता आणि मूल्यवर्धन वाढवण्यास मदत होईल. हा करार कंपनीकरिता बंधनकारक नसेल. 

हा सामंजस्य करार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. नारा चंद्राबाबू नायडू गारू यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया आणि गोदरेज इंडस्ट्रीज समूहाचे समूह अध्यक्ष, कॉर्पोरेट अफेअर्स राकेश स्वामी उपस्थित होते.  

या कार्यक्रमाप्रसंगी आंध्र प्रदेशातील मुख्यमंत्री श्री. नारा चंद्राबाबू नायडू यांनी राज्यात आर्थिक वृद्धी होत यानिमित्ताने शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होईलअशी आशा व्यक्त केली. “आमच्या भूमीतील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी कृषी खाद्य प्रक्रिया क्षेत्राचे बळकटीकरण व्हायला हवे. याच धोरणाशी सुसंगत राहून आम्ही गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेडसारख्या सशक्त आणि विश्वासार्ह कंपनीसोबत भागीदारी करत आहोत. ही भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद आहे. आमच्या कृषी परिसंस्थेचे सशक्तीकरण होईल. मोठ्या प्रमाणात सामुदायिक स्तरावर शाश्वत उपजीविका निर्माण करेल. शिवाय आर्थिक विकासालाही चालना मिळेल.”, असे ते म्हणाले. 

गोदरेज ॲग्रोवेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सुनील कटारिया म्हणाले,” आम्ही उद्योग व्यवसायांना पाठिंबा देणाऱ्या आणि समुदायांचा विकास घडवणाऱ्या परिसंस्थेचे पालन पोषण केल्याबद्दल आंध्रप्रदेश सरकारचे आभारी आहोत. या सामंजस्य करारातून शेतकऱ्यांचे बळकटीकरण करण्यावर आमचा भर राहील. हा करार आमच्या कृषी खाद्य प्रक्रिया क्षमतेला बळकट करण्याच्या आमच्या उद्देशाची साक्ष येतो. आमचा खाद्य प्रक्रियेत मोठा वारसा आहे. कृषी भूमीचे पोषण व्हावे याकरिता आवश्यक सुधारणा घडवून आणणे, कृषी आर्थिक व्यवस्थेचा विकास घडवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. या गुंतवणुकीकरिता गोदरेज ॲग्रोवेटची उपकंपनी असलेल्या क्रीमलाईन डेअरी प्रोडक्टस सहभागी होईल. ही कंपनी ‘गोदरेज जर्सी’ या ब्रँड अंतर्गत आपली उत्पादने विकते. क्रीमलाईन डेअरी प्रोडक्टस तीन टप्प्यांमध्ये आपली डेअरी प्रक्रिया आणि मूल्यावरतीत उत्पादनाची क्षमता वाढवण्यावर भर देईल. 

गोदरेज ॲग्रोवेटकडून देशातील सर्वात जास्त पाम तेल प्रक्रियेचे उत्पादन केले जाते. हा व्यवसाय शेतकऱ्यांसोबत राबवला जातो. या व्यवसायाकरिता आंध्र प्रदेशातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी समाधान केंद्रे उभारली जातील. पाम तेलाच्या निर्मिती प्रक्रियेत सहभागी असणारा शेतकऱ्यांना पुरेशी माहिती आणि आवश्यक साधने समाधान केंद्रातून पुरवली जातील. उत्पादनाच्या वाढीकरता आवश्यक सर्व समावेशक योजना आणि उपाययोजना पुरवल्या जातील. हे केंद्र शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. या सहकार्यामुळे शेतकऱ्यांचे काम अधिक सुलभ होईल. 

गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे ग्रुप अध्यक्षकॉर्पोरेट अफेअर्सराकेश स्वामी म्हणाले, ‘‘आंध्र प्रदेश हे गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपसाठी महत्त्वाचे राज्य ठरले आहे. या राज्याने आमच्या विविध क्षेत्रांतील वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणे, राज्याच्या व्यवसायिक गती आणि भागीदारी आधारित दृष्टीकोन दर्शवते. आंध्र प्रदेश सरकराने आवश्यक मंजुरी प्रक्रिया व्यवस्थित राबवल्यने तसेच गुंतवणूकदार अनुकूल धोरणांमुळे हा करार यशस्वीरित्या पार पडला. आम्ही आंध्र प्रदेशच्या विकासात योगदान देण्यास इच्छुक आहोत. आमच्या समूहाच्या विस्तार ग्राहक उत्पादने, स्थावर मालमत्ता आणि वित्त व्यवसाय या तिन्ही क्षेत्रांमध्ये विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत.’’

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सची ‘हंगर फ्री वर्ल्ड’ मोहीम आता जागतिक स्तरावर

मलाबार गोल्ड अँड डायमंड्स, जगातील पाचव्या क्रमांकाची दागिन्यांची रिटेल कंपनी आणि भारतातील सर्वात आघाडीची सामाजिक जबाबदारी जपणारी संस्था, यांनी त्यांच्या प्रमुख ‘हंगर फ्री वर्ल्ड’ उपक्रमाचा विस्तार इथिओपियापर्यंत केल्याची घोषणा केली आहे. भारतात आणि झांबियामध्ये उल्लेखनीय परिवर्तन घडवल्यानंतर आता हा उपक्रम आफ्रिका खंडातील पुढच्या टप्प्यात प्रवेश करतो.

भारताच्या करुणा, सहकार्य आणि सामूहिक प्रगतीच्या विचारांवर आधारित हा उपक्रम जागतिक स्तरावर भारतीय व्यवसायांच्या प्रभावाचे उत्तम उदाहरण ठरत आहे. भारतात सिद्ध झालेला हा मॉडेल आता उपासमार आणि शैक्षणिक विषमता दूर करण्याच्या जागतिक चळवळीत रूपांतरित होत आहे. मलाबार आपल्या निव्वळ नफ्याच्या 5% रक्कम सातत्याने सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करते. हे प्रमाण भारतातील अनिवार्य सीएसआर नियमांपेक्षा दुपटीहून अधिक आहे. या माध्यमातून कंपनी सामाजिक जबाबदारीची व्याप्ती आणि प्रामाणिकता नव्याने परिभाषित करत आहे आणि भारतात यशस्वी ठरलेली ही संकल्पना जगभर पोहोचवत आहे.

दुबई गोल्ड सूकमधील मलाबार इंटरनॅशनल हब येथे आयोजित कार्यक्रमात हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. या वेळी मलाबार ग्रुपचे उपाध्यक्ष श्री. अब्दुल सलाम के.पी. यांनी इथिओपियाचे दुबईतील कॉन्सुल जनरल हि.ई. अस्मेलाश बेकेले यांना अधिकृत लेटर ऑफ इंटेंट सुपूर्द केले. मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या वरिष्ठ व्यवस्थापन टीमनेही या समारंभात उपस्थिती लावली. ‘हंगर फ्री वर्ल्ड’ हा मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचा सर्वाधिक प्रभावी ईएसजी (Environmental, Social & Governance) उपक्रमांपैकी एक आहे. सध्या हा उपक्रम जगभरातील 119 ठिकाणी दररोज 115,000 हून अधिक जेवणे उपलब्ध करून देतो. इथिओपियामधील विस्तार हा झांबियातील उल्लेखनीय यशानंतरचा पुढचा टप्पा आहे, जिथे मे 2024 पासून आजपर्यंत तीन शाळांमध्ये 900,000 पेक्षा जास्त जेवण पुरवण्यात आली आहेत.

मलाबार ग्रुपचे चेअरमन श्री. एम. पी. अहमद म्हणाले:  “हंगर फ्री वर्ल्ड हा मलाबार ग्रुपने राबवलेला सर्वात अर्थपूर्ण ईएसजी उपक्रम आहे. एक जबाबदार ज्वेलर म्हणून, आमची बांधिलकी केवळ व्यवसायापुरती मर्यादित नाही—तर आम्ही ज्या समुदायांची सेवा करतो, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. या उपक्रमामुळे सकारात्मक बदललेले लाखो जीवन, आमच्या शाश्वत आणि समावेशक विकासाच्या ध्येयाची साक्ष देतात. इथिओपिया सरकारसोबत भागीदारी करताना, पुढील दोन वर्षांत 8,64,000 अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक करण्यात येईल. आमचे उद्दिष्ट 2026 च्या अखेरीस 10.000 मुलांना दररोज पोषणमूल्ययुक्त जेवण उपलब्ध करून देणे तसेच उत्कृष्ट शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करणे आहे.”

मलाबार ग्रुपचे उपाध्यक्ष श्री. अब्दुल सलाम के.पी. म्हणाले:  “आपल्या स्थापनेपासूनच समुदाय विकास हा मलाबारच्या ब्रँड डीएनएचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. हंगर फ्री वर्ल्ड उपक्रमातून आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे की रोजचे पौष्टिक आहार मिळाल्याने केवळ व्यक्तीचे नाही, तर संपूर्ण समुदायांचे आयुष्य बदलू शकतो. हा उपक्रम इथिओपियापर्यंत विस्तारण्याचे आमचे पाऊल म्हणजे उपासमार संपवणे आणि शिक्षणातील समानता निर्माण करण्याच्या जागतिक ध्येयाकडे वाटचाल करण्याचा आणखी एक टप्पा आहे. ज्या मुलांना आणि कुटुंबांना सर्वाधिक गरज आहे, त्यांच्या जीवनात दीर्घकालीन आणि स्पष्ट बदल घडवण्याची आमची बांधिलकी आहे.”

हंगर फ्री वर्ल्ड उपक्रमाचा विस्तार हा संयुक्त राष्ट्रांच्या चिरंतन विकासाच्या उद्दिष्टांशी (SDGs) विशेषतः उपासमार मुक्ती, दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता आणि जागतिक भागीदारी या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. इथिओपियातील या प्रकल्पासाठी कम्युनिटी-सेंट्रिक पद्धत अवलंबली जाईल — ज्यामध्ये पालक, शिक्षक, स्थानिक प्रशासन, तसेच स्थानिक शाळा, पुरवठादार आणि इतर भागधारक यांना सक्रियपणे सहभागी केले जाईल. यामुळे स्थानिक रोजगारनिर्मिती, सहभागींची जवाबदारी आणि दीर्घकाळ टिकणारे स्थानिक स्वामित्व सुनिश्चित होईल.

“इथिओपियामध्ये हंगर फ्री वर्ल्ड उपक्रमाचा विस्तार करण्यामागे प्रत्येक मुलाला, त्याची आर्थिक किंवा सामाजिक परिस्थिती काहीही असो, पौष्टिक आहार आणि दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे हे आमचे उद्दिष्ट आहे. हाच उज्ज्वल भविष्यातला पाया आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात आम्ही ओरोमिया प्रदेशातील अदामा सिटी येथील 5 शाळांबरोबर काम करणार आहोत, जिथे सुमारे 11,000 मुले शिक्षण घेतात. शालेय पोषण कार्यक्रमाबरोबरच आम्ही इथिओपियामध्ये शिष्यवृत्ती, मेंटॉरशिप, डिजिटल साक्षरता, ग्रंथालय विकास आणि अशा अनेक उपक्रमांची अंमलबजावणी करू. इथिओपियाच्या सरकारच्या अमूल्य सहकार्याने, हा उपक्रम सर्वांगीण विकास आणि शाश्वत परिणाम देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिक आहे,” असे मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे श्री. शामलाल अहमदव्यवस्थापकीय संचालक – आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्सयांनी सांगितले.

ईसीजी (पर्यावरण, सामाजिक उत्तरदायित्व आणि सुशासन) हे 1993 पासून मलाबार ग्रुपचे प्रमुख ध्येय राहिले आहे. ज्या-त्या देशात कंपनी कार्यरत आहे, तिथे हे मूल्य प्रत्यक्ष कृतीतून दाखवले जाते. आरोग्य, हंगर फ्री वर्ल्ड, घरे, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संरक्षण ही या उपक्रमांची मुख्य लक्षवेधी क्षेत्रे आहेत. सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि संवेदनशील संस्था राहण्यासाठी मलाबार ग्रुप आपली ईसीजी उद्दिष्टे वेळोवेळी अधिक मजबूत करत आहे.

आमदार बापू पठारे आणि खासदार मेधा कुलकर्णी यांची भूमिका मराठी मायबोलीला मारक!

पुणे- आम आदमी पार्टी चे मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे कि,’ त्रिभाषा धोरण समितीसमोर एक लोकप्रतिनिधी बापू पठारे यांनी मात्र त्यांच्या मतदारसंघात म्हणजे वडगाव शेरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय असल्यामुळे त्यांच्या सोयीसाठी हिंदी ही सुरुवातीपासून सक्तीची करावी अशा पद्धतीची भूमिका घेतली.आम आदमी पार्टी अशा पद्धतीच्या बोटचेपेपणाच्या भूमिके चा निषेध करत आहे . आमच्या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय व इतर निमित्ताने येणाऱ्या इतर राज्यातील नागरिकांनी निश्चितपणे मराठीचा अवलंब आणि अंगीकार करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे उत्तर भारतीयांच्या हिंदीच्या बुलडोझरला बळी पडण्याच्या या भूमिके चा आम आदमी पार्टी निषेध करते.
त्याचबरोबर पुण्याच्या मराठी भागातील म्हणजे कोथरूड मधून आलेल्या आणि खासदार झालेल्या मेधा कुलकर्णी यांनी सुद्धा हिंदी पहिलीपासून सक्तीची करावी अशी भूमिका मांडली. ही भूमिका पालकांवरती आणि मुलांवरती अतिरिक्त ओझ निर्माण करणारी असून एखाद्या विषयाची आवड म्हणून मुलांनी तिसरी, चौथी भाषा शिकणे वेगळे आणि त्याची सक्ती करणे हे वेगळे हे त्यांनी समजून घ्यायला हवे. केंद्र सरकारच्या भाजपच्या या एकसुरी आणि सांस्कृतिक सपाटीकरण करणाऱ्या भूमिकेचा आम आदमी पार्टी विरोध करते. हिंदी संस्कृतीचा बालवयात मारा हा मायबोली मराठीला मारक ठरेल अशी आम्हाला रास्त भीती आहे.
त्यामुळे आम आदमी पार्टी तर्फे आम्ही पहिलीपासून तिसरी भाषा म्हणजे हिंदी भाषेच्या अप्रत्यक्ष सक्तीला विरोध करीत असल्याचे डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या त्रिभाषा धोरण समिती पुढे मांडले आहे.

सेडेमॅक मेकॅट्रॉनिक्स लिमिटेडतर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर

0

पुणे-

सेडेमॅक मेकॅट्रॉनिक्स लिमिटेड (“कंपनी”) ने बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) सादर केला आहे. 

कंपनी भारत, अमेरिका आणि युरोपमधील मोबिलिटी आणि औद्योगिक बाजारपेठांमध्ये अग्रगण्य ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (OEMs) साठी नियंत्रण पूरक, उपयोजनांसाठी अत्यावश्यक इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स (“ECUs”) चे डिझाईन आणि पुरवठा करते. संपूर्णपणे इन-हाऊस तयार केलेल्या आणि विकसित केलेल्या नवीन नियंत्रण तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या उत्पादनांमधून कंपनीला कामकाजातून येणाऱ्या महसुलातील मोठा हिस्सा मिळतो. त्यामुळे कंपनीला अंतिम वापरकर्त्यांना किंवा OEM ग्राहकांना वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण मूल्य देणारी अनन्य उपाययोजना सादर करता येते.

डीआरएचपी नुसार, कंपनी प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) द्वारे निधी उभारण्याची योजना आखत आहे. संपूर्ण ऑफरमध्ये 8,043,300 पर्यतच्या इक्विटी शेअर्सच्या 100% ऑफर फॉर सेल चा समावेश (“Total Offer Size”) आहे. या ऑफर फॉर सेल मधून कंपनीला कोणतेही उत्पन्न मिळणार नाही.

कंपनीचा 30 जून 2025 रोजी संपलेल्या तीन महिन्यांसाठी आर्थिक वर्ष 2025, आर्थिक वर्ष 2024 आणि आर्थिक वर्ष 2023 साठी कामकाजामधून मिळणारा महसूल अनुक्रमे 2,173.57 दशलक्ष रु., 6,583.63 दशलक्ष रु., 5,306.53 दशलक्ष रु. आणि 4,230.28 दशलक्ष रु. इतका होता. त्या कालावधीत/वर्षात नफा अनुक्रमे 170.69 दशलक्ष रु., 470.45 दशलक्ष रु., 58.78 दशलक्ष रु. आणि 85.73 दशलक्ष रु. इतका होता.

भारतामध्ये सेडेमॅक मेकॅट्रॉनिक्स लिमिटेड ही सेन्सरलेस कम्युटेशन (“SLC”) आधारित इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर्स (“ISG”) दोन आणि तीन चाकी (“2/3Ws”) अंतर्गत कंबशन इंजिन (“ICE”) वाहनांसाठी ECUs विकसित, डिझाईन आणि उत्पादन करणारी पहिली कंपनी आहे (स्रोत: CRISIL अहवाल). व्होल्यूमच्या अनुषंगाने कंपनीकडे देशांतर्गत ISG ECU बाजारपेठेचा (2W आणि 3W एकत्र) सुमारे 30% बाजारपेठीय हिस्सा आहे आणि ती आर्थिक वर्ष 2025 मध्ये अग्रणी 4 कंपन्यांमध्ये गणली जाते. कंपनी भारतातील जेनसेट कंट्रोलर्स (“GC”) साठीही आघाडीवर असून तिचा आर्थिक वर्ष 2025 मध्ये बाजारपेठीय हिस्सा 75% पेक्षा जास्त आहे. तसेच कंपनी जागतिक स्तरावर जेनसेट कंट्रोलर्स आणि EFI ECUs ऑफरिंगसह सुमारे 14% जागतिक बाजार हिस्स्यासह अग्रगण्य जागतिक कंपन्यांमध्ये समाविष्ट आहे (स्रोत: CRISIL रिपोर्ट).

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, अवेंडस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि अ‍ॅक्सिस कॅपिटल लिमिटेड या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) आहेत.