तब्बल ३७ वर्षांनी वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांची घेतली हजेरी ….
आव्हाडांच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास जबाबदारी सरकारची, मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून जाब विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा का कमी केली ? असा प्रश्न मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. हे पत्र त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुनही शेअर करत मुख्यमंत्र्यांना जबावदो या हॅशटॅगने मेंशन केले आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाला धोका असून त्यांच्या घराची रेकीही करण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांचाही तसा अहवाल आहे. त्यामुळे मी आव्हाड यांच्या घराची सुरक्षा वाढविण्याची मागणी आपणाकडे केली होती. मात्र, आव्हाड यांच्या घराची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. आमदार आव्हाड हे हीटलिस्टवर आहेत, असे एटीएसने सांगितले आहे. पण, सरकारने त्यांची सुरक्षा कमी केल्याने संशय निर्माण होत आहे. सरकारचा हा गलथानपणा आहे की, सनातनी प्रवृत्तींना मदत करणे हा उद्देश आहे, याबाबत मनात संशय येतो, असेही मुंडे यांनी म्हटले आहे. यापूर्वी सांगली व पुणे येथे आव्हाड यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले आहेत. तर एटीएसनेही ते हीटलिस्टवर असल्याचे सांगितले आहे. मात्र, सरकार याबाबत निष्काळजी असल्याचे दिसते. तसेच एक विधानसभा सदस्य या नात्याने त्यांची साधी चौकशीही करण्यात आली नाही. त्यामुळे सरकारच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत आव्हान यांच्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास, त्याची जबाबदारी सरकारकडे राहिल, असेही मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
‘इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी (डिप्लोमा) आयोजित राज्यस्तरीय ‘पेपर प्रेझेंटेशन’ स्पधेत आरती रजपूत आणि श्वेता कदम प्रथम
हृदयात समथिंग समथिंग सिनेमाचा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा !
पुणे ते पंढरपूर दुतर्फा झाडी स्वखर्चाने लावण्याचा संकल्प-असंख्य सामाजिक उपक्रमांनी नगरसेवक प्रकाश कदम यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा संपन्न
असंख्य सामाजिक उपक्रमांनी नगरसेवक प्रकाश कदम यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा संपन्न
पुणे- पुणे ते पंढरपूर या रस्त्याचे काम पूर्ण होताच दुतर्फा स्वखर्चाने लोखंडी जाळ्याच्या कुंपणासह पिंपळ,उंबर ,वडाची अशी शिवकालीन झाडी लाऊन देईल .. असा संकल्प आज एकसष्टी त पदार्पण केलेल्या नगरसेवक प्रकाश कदम यांनी केला . आणि त्यांच्या या संकल्पावर अजित दादा जाम खुश झाले . त्यांनी आज येथे प्रकाश कदम यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती समारंभास उपस्थित राहून कदम आणि त्यांच्या परिवाराच्या आजवरच्या कामाचे भरभरून कौतुक करत त्यांना शुभेच्छ्या दिल्या .
कदम यांनी आज त्यांच्या वाढ दिवसानिमित्त पूरग्रस्त केरळ ला 6 हजार १०० किलो धान्य दिले .६१ महिलांना शिलाई च्या प्रशिक्षणासह नव्या शिलाई मशीन देण्याच्या कामाचा शुभारंभ केला . या शिवाय आपल्या प्रभागात मॅरेथोन स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना भरभरून बक्षिसे दिली . या सोहळ्यासमयी महापौर मुक्ता टिळक ,खासदार वंदना चव्हाण ,मनसे गट नेते वसंत मोरे ,नगरसेवक युवराज बेलदरे ,माजी महापौर दत्ता धनकवडे ,नगरसेविका राणी रायबा भोसले ,माऊली जंगले यांच्यासह असंख्य नागरिकांनी कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छ्या देण्यासाठी गर्दी केली होती.
स्वामी अग्निवेशांच्या केसाला धक्का लावाल तर …खबरदार .. ब्रिगेडचा इशारा (व्हिडीओ)
पुणे-स्वामी अग्निवेश यांना विरोध करून पुण्यात त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न कोणी केला तर लक्षात ठेवा गाठ संभाजी ब्रिगेड शी आहे असा इशारा आज येथे ब्रिगेड चे शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ यांनी दिला आहे यासंदर्भात त्यांनी आणि संतोष शिंदे यांनी आज पुणे पोलिसांना निवेदन देवून कायदा सुव्यस्था राखण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्याची विनंती केली आहे .

धुमाळ यांनी या प्रकरणी म्हटले आहे कि ,शहरात पुरोगामी विचारांचे जेष्ठ हिंदू धर्मगुरू स्वामी अग्नीवेश रविवार दि. ९ सप्टेंबर रोजी अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या साने गुरूजी स्मारक येथे… कार्यक्रमास येत आहेत. एक विद्रोही संत म्हणून देशाला त्यांची ओळख आहे. सर्व धर्मातील चुकीच्या अंधश्रध्दा, रूढी पंरपरा… चांगला बदल करण्याठी, व समाज सुधरण्यासाठी… अंधश्रध्दे विरोधात ते नेहमी भुमिका आपल्या कार्यातुन मांडत असतात. मात्र धर्मद्रोह्यांना हे नेहमी खुपते. ‘कर्मकांडातुन समाजाला बाहेर काढण्याचे प्रबोधनात्मक काम उल्लेखनीय आहे. म्हणून एकटे पाहून देशद्रोही मारहाण करतात.परंतु, धर्मांध व सनातनी जातियवादी शक्ती त्यांना नेहमी विरोध करतात… म्हणून पुण्यातील ब्राम्हणवादी लोकांनी आपले बंद पडलेले दुकान चालवण्यासाठी… ‘धर्माची सुपारी घेऊन स्वामी अग्नीवेश यांना पुण्यात कार्यक्रमासाठी विरोध करत आहेत.’ या देशात घटनात्मक लोकशाही आहे.
आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज व जगत् गुरू संत तुकाराम महाराज… व फुले – शाहू – आंबेडकर… यांच्या पुरोगामी व परिवर्तनवादी विचारांचा विद्रोही महाराष्ट्र आहे. या क्रांतिकारी महापुरूषांच्या महाराष्ट्रात… स्वामी अग्नीवेश यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर… ‘गाठ’ संभाजी ब्रिगेड’शी असेल…’ संभाजी ब्रिगेड त्यांना संरक्षण संरक्षण देईल .आणि
पुणे पोलिसांना विनंती की, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून त्यांना संरक्षण द्यावे… अन्यथा सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल.
याबाबतचा पूर्व इतिहासहि धुमाळ यांनी सांगितला आहे, ते म्हणाले ,
एक काळ होता याच पुण्यातील ब्राह्मण मंडळींनी आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांना प्रचंड विरोध केला होता, त्यांना जीवे मारण्यासाठी धमक्या ही दिल्या होत्या.
पण स्वामी दयानंद सरस्वती यांची पुण्यातील सुधारक लोकांनी हत्ती वरून मिरवणूक काढायची ठरवली ज्याचे संरक्षण करण्यासाठी आमचा आजा महात्मा जोतीबा फुले रस्त्यावर उतरला होता.
ते पुढे म्हणाले ,ब्राह्मण महासंघाने हा इतिहास विसरू नये आणि कार्यक्रमात गोंधळ घालण्याचे धाडस ही करू नये .
स्व .यशवंतराव भिमाले स्मृतीप्रित्यर्थ गुरुजनांचा सन्मान सोहळा संपन्न
पुणे-स्व. प्रा. यशवंतराव भिमाले यांच्या द्वितीय पुण्यस्मृती दिनानिमित्त सभागृहनेता श्रीनाथ भिमाले यांच्या वतीने गुरुजनांचा गौरव व गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा मनपा शाळा क्र १०५ संदेशनगर येथे संपन्न झाला.
कार्यक्रमास अशोक कामत ,शिक्षण अधिकारी शिवाजी दौंडकर,दिपक माळी, सौ.वंदना भिमाले,वबिबवेवाडी परिसरातील शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
दातृत्व आणि कर्तुत्वाचा संगम म्हणजेच शिवाजीराव डुंबरे -आमदार शरद सोनवणे
मोदी-अंबानींमधील संबंधांची चौकशी करावी-कॉंग्रेस पक्षाची मागणी
पुणे: राफेल विमानांच्या खरेदीत शंकास्पद असे बरेच काही आहे. खरेदीच्या आधी पंतप्रधान नरेंद मोदी व उद्योगपती अंबानी यांच्यात एक बैठक झाली. डील करताना सर्व कायदेशीर संसदीय प्रक्रिया टाळल्या गेल्या असा आरोप करत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते, माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांनी मोदी-अंबानींमधील संबंधांची चौकशी करावी-
केला. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
काँग्रेस भवन येथे रेड्डी आले होते. शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी त्यांचे स्वागत केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण ,हर्षवर्धन पाटील माजी आमदार मोहन जोशी,आमदार अनंत गाडगीळ, अॅड अभय छाजेड,अविनाश बागवे,अजित दरेकर काँग्रेसच्या विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी उपस्थित होते.
रेड्डी म्हणाले, राफेल खरेदीआधीची ती गुप्त बैठक व त्यानंतर झालेले डील संशयास्पद आहे. फक्त बारा दिवस आधी एक कंपनी स्थापन होते व या खरेदी व्यवहारात सहभागी होते. विमानांची पूर्वी निश्चित केलेली किंमत काही पटींनी वाढते. 136 विमाने घ्यायची असताना 36 विमाने घेतली जातात. ज्यांना विमाने द्यायची आहेत ती कंपनी मध्यस्थीसाठी बारा दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या कंपनीचा आग्रह धरते. हे सगळेच शंकास्पद आहे.
काँग्रेसने या व्यवहारावर काही प्रश्न उपस्थित केले. मोदी त्या प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार नाहीत. ते संसदेत बोलत नाहीत, देशात बोलत नाहीत, परदेशात जातात व राफेल विमाने कशी आहेत ते सांगतात. विमानांच्या गुणवत्तेचा प्रश्नच काँग्रेसने विचारलेला नाही, तरीही त्याबाबत सांगण्यात येते आहे. ती बैठक, झालेले डील, याबद्धल संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांना काहीही माहिती नाही. त्या वेगळेच काही सांगतात. मनोहर पर्रीकर आजारी होते. ते मी मोदींनी केलेल्या कराराच्या मागे थांबलो असे म्हणतात. अरूण जेटली काही वेगळेच बोलतात. या सरकारमध्ये वजनदार माहितगार लोक घरी व माहिती नसलेले अनुभव नसलेले पहिल्या रांगेत असे करण्यात आले आहे. त्यामुळेच वन मॅन गव्हर्रमेंट अशी अवस्था सरकारची आहे, असा आरोपही त्यांनी केला.
राफेलच्या सर्व खरेदी प्रक्रियेची चौकशी व्हावी अशी काँग्रेसची मागणी असल्याचे स्पष्ट करून रेड्डी म्हणाले, असे करार करताना काही पद्धत आहे, संसदीय प्रक्रिया आहे. ते सगळेच या व्यवहारात टाळण्यात आले आहे.जॉइंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन करून चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी आहे. अशा समितीत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांचीच संख्या जास्त असते. मात्र, तरीही मोदी ही मागणी मान्य करायला तयार नाहीत. याचा अर्थ यात मोठा घोटाळा झाला आहे असाच होतो.
देशातील जनतेने हे समजावून घ्यावे असे आवाहन रेड्डी यांनी केले.
भाजपच्या महिला आमदार ,राम कदमांच्या विधानाशी सहमत आहेत काय ? पृथ्वीराज चव्हाण (व्हिडीओ)
पुणे- मुख्यमंत्री आणि भाजपच्या महिला आमदार या , राम कदमांनी केलेल्या विधानांशी सहमत आहेत काय ? त्यांनी हि बोललं पाहिजे ,आपापल्या मतदार संघात जाऊन आपली ठाम भूमिका सांगितली पाहिजे ..असे टोले लगावत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना ,राम कदमांवर गुन्हा दाखल झाला पाहीजे आणि त्यांना निलंबित केलं पाहिजे अशी मागणी केली .त्याचबरोबर कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हि ,केवळ माफी मागून असे प्रश्न सुटले तर ..काय होईल ? असा सवाल करत राम कदमा चे निलंबन मुख्यमंत्र्यांनी करावे अशी मागणी केली ..
वटपौर्णिमेदिवशी दागिने चोरणारे दोघेजण पोलिसांच्या ताब्यात
पुणे-वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या पुजेसाठी नटून-थटून निघालेल्या 14 महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळवणा-या दोन चोरटयांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. बुधवारी (दि.27 जून) सकाळी 8 ते दुपारी 4च्या दरम्यान या 14 चो-या झालेल्या होत्या.
मुज्जमिल माजीद खान ( वय 24,रा.गंजपेठ, पुणे) व मोसीन अब्बास शेख (वय 30, रा.गंजपेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वटपौर्णिमेच्या दिवशी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात एका पाठोपाठ एक अशा तब्बल 14 सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या.महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरटे फरार झाले होते. एवढेच नाहीतर पोलिस कर्मचा-यांना धक्के देऊन ते पळून गेले होते.
या चोरीच्या अगोदर त्या दोघांनी एक दूचाकी चोरी केली होती. त्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दूचाकी चोरीच्या तपासादरम्यान त्या दोघांना पकडण्यात आले. पोलिसांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता वटपौर्णिमेच्या दिवशी दागिने चोरणारे सराईत तेच दोघे असल्याचे उघडकीस आले. लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेली सोनसाखळी चोरी करताना वापरण्यात आलेल्या दुचाकीचा क्रमांक सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता.
वटपौर्णिमेच्या दिवशी केलेल्या 14 चो-यांची त्यांनी कबुली दिली. चोरीच्या दागिन्यांचे एकमेकांत वाटप करण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्याने ते दागिने विकले नव्हते त्यामुळे चोरीचे शंभर टक्के दागिने पोलिसांनी चोरटयांकडून हस्तगत केले आहेत. यापुर्वी मुज्जमिलवर 8 तर मोसीनवर 4 गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त रविंद्र सेनगावकर, पोलिस उप आयुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी,पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे,सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पवार, पोलीस कर्मचारी विनोद जाधव, प्रमोद नेवसे,संदिप कांबळे, समीर माळवदकर, राकेश क्षीरसागर, इम्रान नदाफ, हिंमत होळकर यांनी केली आहे.
राम कदम यांचा निषेध करण्यासाठी “ जोडे मारो आंदोलन “
पुणे-सीख समाज पुणे शहराच्यावतीने आमदार राम कदम यांचा निषेध करण्यासाठी क्वार्टर गेटचौकात राम कदम यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले . राम कदम हाय हाय … राम कदम दो जुते मारो … अशा घोषणा शीख समाजबांधवांनी दिल्या . राम कदम यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले .
या आंदोलनात भोलासिंग अरोरा , रणजितसिंग अरोरा , हरपालसिंग राजपाल , देवेंद्र चावला , परमजितसिंग सलुजा , सुरेंद्रसिंग गुरुदत्ता , सुखमीतकौर अरोरा , निलोफर मुल्ला , गुरुविंदरसिंग राजपाल , फतेहसिंग व्होरा , इंदरजितसिंग टूटेजा , हरजितसिंग अरोरा , हरपीतसिंग सूरी , नईमबाबा शेख , अयुब खान , सनमितसिंग गुरुदत्ता व कुलदीपसिंग टूटेजा आदी मान्यवर व शीख बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
यावेळी भोलासिंग अरोरा यांनी सांगितले कि , आमदार राम कदम यांनी मुलींबाबत केलेले विधान माता-भगिनींचा अपमान आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे . अन्यथा राम कदम यांना काळे फासण्याचा इशारा शीख समाजबांधवांनी दिला आहे . अफगाणिस्थान सीमेपासून कन्याकुमारीपर्यंत महिलांवर झालेल्या अत्याचाराविरुध्द शीख बांधवानी आपली कुर्बानी देऊन महिलांना संरक्षण दिले . हा इतिहास लक्षात घेऊन महिलांची सुरक्षा घेण्यात पुढाकार घेतला आहे .
यावेळी रणजितसिंग अरोरा यांनी सांगितले कि , मानवी हक्कांवर अन्याय होत असेल तर शीख समाज अन्यायाविरोधात आवाज उठवेल . महिला भगिनींच्या पाठीशी उभे राहील . राम कदम यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदेशीर कारवाई करावी . त्यामुळे भविष्यकाळात असे बेताल वक्तव्य कुणी करणार नाही .
पुणे परिमंडलातील 26.25 लाख वीजग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे सेवा
पुणे, दि. 6 : वीजबिलांचा तपशील व मीटर रिडींगसह इतर माहिती वीजग्राहकांच्या मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे महावितरणकडून पाठविण्यात येत आहे. पुणे परिमंडलातील मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या 26 लाख 25 हजार वीजग्राहकांना ही सेवा सुरु करण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे वीजग्राहकांच्या मागणीनुसार मराठी भाषेतून सुद्धा ‘एसएमएस’ उपलब्ध आहे.
पुणे परिमंडलात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिकसह इतर वर्गवारीत 27 लाख 24 हजार वीजग्राहक आहेत. त्यापैकी 25 लाख 26 हजार वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केलेली आहे. तसेच 1 लाख 14 हजारांपैकी 98,404 कृषीपंपधारकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली आहे.
सद्यस्थितीत ‘एसएमएस’द्वारे ग्राहक क्रमांक व बिलाची रक्कम, देय दिनांक आदींचा तपशील, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व एकूण युनिटचा वापर तसेच तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठ्याचा कालावधी वीजग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येत आहे. यासोबतच ‘एसएमएस’द्वारे मिळालेल्या वीजबिलाच्या तपशिलावरून वीजग्राहकांना देयकाचा भरणा करणे शक्य झाले आहे. महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्गात ‘एसएमएस’ दाखवून वीजबिलाचा भरणा करण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. विशेष म्हणजे ‘एसएमएस’ची सेवा मराठी भाषेतूनही सुरु करण्यात आली आहे. ‘एसएमएस’ची भाषा बदलण्यासाठी मराठीसाठी MLANG (ग्राहक क्रमांक) 1 तर इंग्रजीसाठी MLANG (ग्राहक क्रमांक) 2 असे टाईप करून 9225592255 या क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठवावा लागेल.
महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे वीजग्राहकांना स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर (स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय 24×7 सुरु असणार्या कॉल सेंटरचे 1912 किंवा 18001023435 आणि 18002333435 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अॅपद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.
पुणे परिमंडलातील सर्व वर्गवारीतील ज्या वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे नोंदणी केलेली नाही त्यांनी नोंदणी करण्यास सहकार्य करावे व ग्राहकसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
लोकराज्य अंकाचे नियमित वाचन ही यशाची गुरुकिल्ली – प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे
पुणे दि. ६- माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने लोकराज्य हे मासिक प्रकाशित करण्यात येते. तरुणांनी हे मासिक आवर्जून वाचावे. लोकराज्य मासिक करीयर घडवण्यासाठी गरजेचे असून ती यशाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन वाघीरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले.
वाचन संस्कृती वाढावी यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे सप्टेंबर महिन्यात विविध ठिकाणी लोकराज्य वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सासवड येथील वाघीरे महाविद्यालयात लोकराज्य वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य नितीन घोरपडे बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, प्रा. डॉ. एस. एस. जगताप,डॉ. किरण रणदिवे, प्रा. पल्लवी लोळे आदी उपस्थित होते.
डॉ. घोरपडे म्हणाले, आजच्या पिढीत समाज माध्यमांचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे वाचनाची सवय मात्र नष्ट होतांना दिसत आहे. लोकराज्य वाचक मेळाव्यातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यसाठी मदत होणार आहे. लोकराज्य या अंकातील प्रत्येक पान वाचनीय आहे. जसा हा अंक स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा आहे तसाच तो आयुष्यात यशस्वी होण्यासाठी गरजेचा आहे. वाचन हा विद्यार्थ्याचा आत्मा आहे, त्यामुळे वाचनाकडे लक्ष देऊन लोकराज्य अंक नियमित घेण्याचे आवाहन देखील यावेळी डॉ. घोरपडे यांनी केले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी लोकराज्य मासिकाचे महत्व सांगीतले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, लोकराज्य मासिक हे स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. वाचनाने विचारांची कक्षा रुंदावते. या मासिकातील प्रत्येक पान आपणास विचारांनी समृद्ध करेल. देशाची भावी पिढी वाचनातून प्रगल्भ होण्यासाठी लोकराज्य वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे देखील श्री.सरग म्हणाले. लोकराज्य वाचक मेळाव्याची संकल्पना तसेच उद्देश याबाबत ज्ञानेश भुकेले यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनिता कोलते, यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.संजय लांडगे यांनी मानले. कार्यक्रमाला विलास कसबे, नीलिमा आहेरकर, वैशाली रांगणेकर, विशाल कार्लेकर, संतोष मोरे,दिलीप गांगुर्डे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्यने उपस्थित होते.
५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
वाघिरे महाविद्यालयाच्या वतीने लोकराज्य वाचक मेळाव्याच्या निमित्ताने लोकराज्य अंकावर आधारित परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या परीक्षेस भरघोस प्रतिसाद दिला. ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला होता.
लोकराज्य वाचक अभियानांतर्गत महाविद्यालयात लोकराज्य च्या विविध अंकाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी प्रदर्शनास भेट देवून अंकांची पहाणी केली. तसेच वर्गणीदार म्हणून नावनोंदणीही केली.
जिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नव्याने प्राप्त एमथ्री-इव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणेचे प्रात्यक्षीक
पुणे,दि.6 :- मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने यशदा येथे निवडणूक विषयक इव्हीएम व व्हीव्हीपॅट याबाबत आज राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत सर्व जिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी सहभागी झाले होते. श्री.अश्विन कुमार, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत यावेळी सर्व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांना नव्याने प्राप्त झालेल्या एमथ्री-इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन संदर्भात “फर्स्ट लेव्हल चेकिंग” (एफएलसी) ची तांत्रिक माहिती देण्यात आली. भारत निवडणूक आयोगाकडील तज्ञ अधिकारी तसेच बीईएल, बेंगळूरु येथील तज्ञांनी जिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना, ही यंत्रणा नेमकी कशी कार्य करते यांची माहिती दिली. तसेच तज्ञ अभियंत्यांमार्फत प्रात्याक्षिक दाखविण्यात आले आणि सखोल माहिती देण्यात आली.
4 व 5 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व उपजिल्हा निवडणूक अधिकारी व निवडक मतदार नोंदणी अधिकारी यांना निवडणूक आयोगातर्फे यशदा येथे आयोजित कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले. नवतरुण मतदारांमध्ये निवडणूक विषयक जागरुकता निर्माण होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली माहिती पुस्तिका देऊन, इयत्ता नववी ते बारावीपर्यतच्या तरुण मतदारांना निवडणूक विषयक माहिती सहज व सोप्या पध्दतीने उपलब्ध व्हावी यासाठी विविध प्रकारच्या खेळांच्या माध्यमातून माहिती कशी देता येईल तसेच मतदार साक्षरता क्लब याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले. अपंग कल्याण आयुक्त यांच्या सहकार्याने दिव्यांग व्यक्तींना निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी निवडणक अधिकाऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण यावेळी देण्यात आले असे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी कळविले आहे.


