असंख्य सामाजिक उपक्रमांनी नगरसेवक प्रकाश कदम यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा संपन्न
पुणे- पुणे ते पंढरपूर या रस्त्याचे काम पूर्ण होताच दुतर्फा स्वखर्चाने लोखंडी जाळ्याच्या कुंपणासह पिंपळ,उंबर ,वडाची अशी शिवकालीन झाडी लाऊन देईल .. असा संकल्प आज एकसष्टी त पदार्पण केलेल्या नगरसेवक प्रकाश कदम यांनी केला . आणि त्यांच्या या संकल्पावर अजित दादा जाम खुश झाले . त्यांनी आज येथे प्रकाश कदम यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती समारंभास उपस्थित राहून कदम आणि त्यांच्या परिवाराच्या आजवरच्या कामाचे भरभरून कौतुक करत त्यांना शुभेच्छ्या दिल्या .
कदम यांनी आज त्यांच्या वाढ दिवसानिमित्त पूरग्रस्त केरळ ला 6 हजार १०० किलो धान्य दिले .६१ महिलांना शिलाई च्या प्रशिक्षणासह नव्या शिलाई मशीन देण्याच्या कामाचा शुभारंभ केला . या शिवाय आपल्या प्रभागात मॅरेथोन स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना भरभरून बक्षिसे दिली . या सोहळ्यासमयी महापौर मुक्ता टिळक ,खासदार वंदना चव्हाण ,मनसे गट नेते वसंत मोरे ,नगरसेवक युवराज बेलदरे ,माजी महापौर दत्ता धनकवडे ,नगरसेविका राणी रायबा भोसले ,माऊली जंगले यांच्यासह असंख्य नागरिकांनी कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छ्या देण्यासाठी गर्दी केली होती.