‘इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी (डिप्लोमा) आयोजित राज्यस्तरीय ‘पेपर प्रेझेंटेशन’ स्पधेत आरती रजपूत आणि श्वेता कदम प्रथम

Date:

देशभरातून ३३ संघाचा सहभाग
पुणे :’महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्नीकल एज्युकेशन’ (एम एस बी टी, मुंबई) च्या राज्यस्तरीय ‘स्टुडंट टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा २०१८-१९’ मध्ये आरती अनुसिंग रजपूत आणि श्वेता संजय कदम (‘अनिल मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज’, शिरोळ, कोल्हापूर) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी (डिप्लोमा) आयोजित स्पर्धा आझम कॅम्पस येथे नुकतीच झाली.
ही स्पर्धा ‘फार्मा व्हिजन टेक्निकल’विषयावर आधारित होती. देशभरातून ३३ संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण विजय कोल्हे (उप सचिव एम एस बी टी, पुणे) यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी लतीफ मगदूम (सचिव, एम सी ई सोसायटी), इरफान शेख (सह सचिव, एम सी ई सोसायटी) व्यासपीठावर उपस्थित होते.
शिवम रवींद्र अंधोळकर आणि ऋषिकेश ज्ञानेश्वर आरू (लोकसेवा कॉलेज फार्मसी )यांनी व्दितीय तर काजल किसन कुमठेकर आणि मोनिका सुरेश गुंजाळ (संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे आण्णा साहेब डांगे कॉलेज, आष्टा, सांगली) यांनी उत्तेजनार्थ चे पारितोषिक मिळविले.
विविध कॉलेज मधून ज्युरी मेम्बर्स उपस्थित होते.  यामध्ये डॉ . अमोल शाह (प्राचार्य, श्री सीताबाई थिटे कॉलेज, शिरूर, पुणे), डॉ. एस. व्ही. देशपांडे (प्राचार्य, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट, आकुर्डी, पुणे), जी. स्वामी (प्राचार्य, आर.एम पी चे भालचंद्र इन्स्टिट्यूट पुणें), डॉ आर. आर. वाके (प्राचार्य, लोकसेवा कॉलेज, पुणे), प्रा . एम बी जोगरा (एस शंकरराव कॉलेज), प्रवीण जावळे (भारती विद्यापीठ इन्स्टिटयूट , एरंडवणे), अनिरुद्ध दडके, पी पी हंबर (जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ) यांचा सहभाग होता.
डॉ. व्ही. एन जगताप (प्राचार्य, ‘इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी डिप्लोमा) यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सबा शेख यांनी केले. तसलीम कुरेशी यांनी आभार मानले.
विजय कोल्हे म्हणाले,  ‘एमएसबीटीने प्रस्तावित केलेल्या विविध स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित करणे आणि कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सबळ करणे या उद्देशाने आयोजित केल्या जातात. ‘
‘डिप्लोमा स्तरावरील तांत्रिक शिक्षण हे उद्योगातील तंत्रज्ञानाच्या  नवीनतम गरजांशी सांगड घालणारे असेल, हा एमएसबीटी चा दृष्टीकोन आहे.’
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात पहिली ‘रोबोटिक-आसिस्टेड’ हृदय शस्त्रक्रिया यशस्वी.पारंपारिक ‘ओपन-हार्ट’ सर्जरीला आधुनिक पर्याय

पिंपरी,पुणे दि २५ मे, २०२६- पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी झाली आहे. पिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने पुण्यात पहिली अत्याधुनिक रोबोटिक पद्धतीने हृदयाच्या झडपेची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. पारंपारिक ओपन-हार्ट सर्जरीला (Open-Heart Surgery) हा एक सुरक्षित, जलद आणि आधुनिक पर्याय ठरला आहे. पिंपरी-चिंचवड येथील एका ४६ वर्षीय महिलेला 'रुमॅटिक हार्ट डिसीज' (Rheumatic Heart Disease - RHD) म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर हृदयाच्या झडपांना (व्हॉल्व्हला) होणारा आजार झाला होता, ज्यामुळे त्यांच्या हृदयाचा मिट्रल व्हॉल्व्ह म्हणजे 'रक्तप्रवाह नियंत्रित करणारा पडदा खराब झाला होता. हा व्हॉल्व्ह बदलण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज होती. पारंपारिक पद्धतीनुसार, अशा शस्त्रक्रियेसाठी छातीचे हाड (Breastbone) मधोमध कापून 'ओपन-हार्ट सर्जरी' करावी लागते. यामध्ये रुग्णाला खूप जास्त वेदना होतात, बरे होण्यास अनेक महिने लागतात आणि छातीवर मोठी जखम (डाग) राहते. पारंपारिक पद्धतीला फाटा देत डीपीयूच्या डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला. यामध्ये छातीचे मुख्य हाड न कापता, बरगड्यांच्या मधून लहान छिद्र पाडून ही शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षितपणे पार पाडण्यात आली. हाडांना कोणतीही इजा न झाल्यामुळे पारंपारिक ओपन-हार्ट सर्जरीच्या तुलनेत रुग्णाचा त्रास आणि वेदना खूपच कमी झाल्या. या आधुनिक उपचार पद्धतीमुळे रुग्णामध्ये अतिशय जलद सुधारणा झाली आणि ती अवघ्या काही दिवसांतच स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभी राहिली. या शस्त्रक्रियेनंतर छातीवर कोणताही मोठा किंवा विद्रूप डाग राहिला नाही, एकंदरीत, कमीत कमी त्रासाच्या या सुरक्षित उपचारामुळे रुग्ण अवघ्या अवघ्या दोन आठवड्यांतच आपल्या नेहमीच्या कामावर परतणे सहज शक्य झाले. "डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदय शस्त्रक्रिया विभागातील तज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉ. आशिष बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात पहिली ऐतिहासिक रोबोटिक हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. भूलतज्ज्ञ डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. वेणूराज वारके आणि यांच्या बहुविभागीय तज्ज्ञ टीमने यशस्वीरीत्या ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती अतिशय वेगाने सुधारली. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी रुग्ण स्वतःहून चालण्या-बोलण्यास आणि दैनंदिन हालचाली करण्यास सक्षम झाला. तिसऱ्या दिवशी रुग्णाने हॉस्पिटलच्या जिममधील पुनर्वसन (Rehabilitation) सुविधेतही सहभाग घेतला. महिन्यांऐवजी अवघ्या काही दिवसांतच रुग्ण पूर्णपणे निरोगी व्यक्तीसारखा धावपळ करू लागला. "पुण्यातील पहिली अत्याधुनिक रोबोटिक पद्धतीने करण्यात आलेली हृदयाच्या झडपेची शस्त्रक्रिया यशस्वी करणे हा आमच्यासाठी एक अभिमानाचा टप्पा आहे. डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने नेहमीच अत्याधुनिक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि वैद्यकीय उत्कृष्टतेचा मेळ घालून रुग्णांना सुरक्षित आणि जागतिक दर्जाचे उपचार देण्यासाठी कटिबद्ध आहे." – मा. डॉ. पी. डी. पाटील (कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे) "हा टप्पा आमच्या रुग्णांना जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या ध्येयाची साक्ष देतो. आम्ही हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण, ECMO अशा सर्व प्रगत कार्डिओ-थोरॅसिक शस्त्रक्रिया करत आहोत. आता रोबोटिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांच्या सेवेचा दर्जा आणखी उंचावला आहे."...

एआयचा रंगभूमीवर विपरीत परिणाम होणार नाही:नसिरुद्दीन शाह, परेश रावल यांनी व्यक्त केला विश्वास

पुणे-ज्येष्ठ रंगकर्मी नसिरुद्दीन शाह आणि परेश रावल यांनी कृत्रिम...

बड्यांची बडी हॉटेल्स ,पब रात्री दीड वाजेपर्यंत अन..खाद्यपदार्थांच्या टपऱ्या, ठेले रात्री १० च्या आत बंद

पुणे- शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते, हॉकर्स,...