पुणे-तिसाव्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन १४ सप्टेंबर रोजी होत असून त्याची संपूर्ण रंगीत तालीम आज श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न झाली. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हल चे अध्यक्ष सुरेश कलमाडी,मुख्य संयाजक कृष्णकांत कुदळे,पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे,सर्व कमिट्यांचे प्रमुख व सुमारे ५०० कार्यकर्ते उपस्थित होते.याप्रसंगी आसनव्यवस्था,पार्किंग,व्ही आय पी व परदेशी पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था ,सुरक्षा आदींची रंगीत तालीम घेण्यात आली.याप्रसंगी उद्घाटन सोहोळ्यात सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची देखील रंगीत तालीम घेण्यात आली.पुणे फेस्टिव्हलच्या या रंगीत तालमीचा प्रारंभ प्रख्यात कथ्थक नृत्यांगना ऋजुता सोमण व भरतनाट्यम् नृत्यांगना अरुंधती पटवर्धन सहकलावंतांसमवेत गणेशवंदनेनेझाला.. यानंतर महाराष्ट्र मंडळाची 15 मुले व मुली यांनी आकर्षक योगा प्रात्यक्षिके सादर केली. स्त्री शक्तीचा जागर असणाऱ्या 18 महिला कलावंतांनी सादर केलेले ’पोवाडा फ्युजन’ला मोठा प्रतिसाद मिळाला.. राजनीश कलावंत यांची संकल्पना, संहिता व संगीत असणार्या पोवाडा फ्युजनचे नृत्यदिग्दर्शन कोरिओग्राफर तेजश्री अडिगे यांनी केले आहे. ‘फेस्टिवल्स ऑफ इंडिया‘ हा होळी नृत्य, पंजाबी भांगडा नृत्य, गुजराती गरबा नृत्य, महाराष्ट्राचे कोळी नृत्य व नारळी पौर्णिमा यांचा समावेश असलेला नृत्याविष्कार गाण्यांसह सादर झाला. प्रख्यात कथ्थक नृत्यांगना ऋजुता सोमण, नृत्यदिग्दर्शक कुणाल फडके व शिल्पा जोशी यांनी याचे नृत्यदिग्दर्शन केले असून त्यांच्या ’डान्स मंत्रा ग्रुप’च्या 11 मुले व 11 मुली आणि ऋजुता सोमण कल्चरल अॅकॅडमीच्या 7 मुलींनी याचे सादरीकरण केले. यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र, नौशाद व जयदेव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ’ट्रीब्यूट टू बॉलीवूड म्युझिक लिजंडस्’ हा विशेष नृत्य व संगीताचा कार्यक्रम सादर झाला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठीतून योगेश देशपांडे व इंग्रजी मधून दूरिया शिप चांडलर यांनी केले.
पीएमआरडीएच्या अग्निशमन जवानांकडून आग आटोक्यात
पुणे- महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) नांदेड सिटी व मारुंजी येथील
अग्निशमन केंद्रातील जवानांनी नांदेडगाव येथील लिंबानी कंपनी व वाघोली लोणीकंद येथील युनिक वेअर
हाऊस सर्व्हे नंबर ११ येथील बॅटरी सेलच्या साठवणूक वेअर हाऊसला लागलेली आग आटोक्यात आणली.
पीएमआरडीएच्या नांदेड सिटी व मारुंजी येथील अग्निशमन जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आग विझवल्याने
जीवित व वित्त हानी टळता आली आहे. आग विझविण्यासाठी दोन गाड्या पाचारण करण्यात आल्या होत्या तर
१५ जवान आग विझविण्यासाठी होते. किरकटवाडी येथील लागलेल्या आगीत ट्रान्सफार्मर जळून खाक झाला
आहे. तर वेअरहाऊस कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. दि. १० ला सोमवारी लागलेल्या आगीच्या घटनेत
जवळपास १० लाखांपेक्षा अधिक नुकसान सदर मालकाचे झाले असले तरी अग्निशमन दलाच्या जवानांमुळे
मोठी जीवित व वित्त हानी टळली आहे.
प्राधिकरण क्षेत्रात कोणत्याही आपातकालीन परिस्थितीत अग्नीशमनदलाची मदत लागल्यास नागरिकांनी
दूरध्वनीवर क्रमांकावर संपर्क साधावा. नांदेड सिटी येथील अग्निशमन केंद्राचा दूरध्वनी क्रमांक 020-
६752000१ व 020-67520002 आहे. तर लाईफ रिपब्लिक सिटी अग्निशमन केंद्राचा दूरध्वनी क्रमांक ०२०-
३८३०४०५०, ०२०-३८३०४०४० आहे. पीएमआरडीएच्या अग्निशमन सेवेमुळे होणारी वित्त व जीवित
हानी टळण्यास मदत झाली आहे, असे अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणाधीशांची प्रतिष्ठापनेपूर्वी मिरवणूक (व्हिडीओ)
पुणे- पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे उभ्या महाराष्ट्राचे श्रद्धा स्थान.. प्रतिष्ठापने पूर्वी या गणराजांच्या मूर्तीची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली .. Unity Services
‘होम स्वीट होम’ चा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न
घर ही प्रत्येकाच्या आयुष्यातील मोहक आणि आपलीशी संकल्पना आहे. घराचा आणि त्याच्याशी निगडीत नातेसंबंधांचा प्रवास अतिशय अनोख्या पद्धतीने विषद करणाऱ्या ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटाचा नुकताच ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात सर्व कलाकारांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडला.
फ्रेम्स प्रॉडक्शन्स कंपनी प्रा. लि. निर्मित आणि प्रोऍक्टिव्ह प्रस्तुत ‘होम स्वीट होम’ या चित्रपटातून लेखक अभिनेता अशी ओळख असलेले हृषीकेश जोशी दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत.
घर हे केवळ चार भिंती आणि दोन खिडक्यांपर्यंत मर्यादित न राहता कुटुंबाचे सदस्य बनण्याची क्षमता असणारी वास्तू आहे, असे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वैभव जोशी यांची कविता सांगून जाते. तसेच रीमा आणि मोहन जोशी या दांपत्यामधील निखळ आणि विनोदीकिस्से मनाला भावतात. शहराच्या मध्यवर्ती भागात असललेल्या घराच्या विक्रीतून मोठी रक्कम मिळेल हे कळताच रीमा यांची उतारवयात सर्वसुखसुविधायुक्त अशा उच्चभ्रू इमारतीतील घर घेण्याची इच्छा होते; पण घराविषयी जिव्हाळा बाळगणारे मोहन जोशी घर विकण्यास कदाचित तयार नाहीत. स्पृहा जोशी साकारात असलेली अवखळ देवीका आणि हृषिकेश जोशी यांचा साधा, मध्यमवर्गीय सोपान सुद्धा मनाला भावणारा आहे. येतो. शिवाय विभावरी देशपांडे, प्रसाद ओक, क्षिती जोग, सुमित राघवन आणि मृणाल कुलकर्णी यांची झलक दिसते, यामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण होते.
‘होम स्वीट होम’ ची कथा हृषीकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांची आहे, संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. अजय गोगावले यांच्या आवाजातील ‘इकडून तिकडे तिकडून तिकडे’ हे गीत लक्षवेधून घेते. तर सचिन पिळगांवकर यांच्या आवाजत ‘हाय काय नाय काय’ ऐकायला मज्जा येते. या चित्रपटाचे निर्माते हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर आहेत, तर आकाश पेंढारकर, विनोद सातव प्रस्तुतकर्ते आहेत.
या चित्रपटाचे स्वीट होम पार्टनर ‘हावरे प्रॉपर्टीज’ असून या ट्रेलर लॉंच प्रसंगी हावरे प्रॉपर्टीजचे सीईओ अमित हावरे आणि सीएफओ अमर हावरे उपस्थित होते. घराविषयीची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असली तरी घर हे प्रत्येकाला हवं असतं आणि सर्वांचं आपलं घर हे ‘होम स्वीट होम’ असतं, असं सांगणारा ‘होम स्वीट होम’ येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
‘तू तिथे असावे’ संगीत अनावरण सोहळा संपन्न
संघर्ष माणसाला त्याच्या स्वप्नांपर्यंत, ध्येयापर्यंत नेऊ शकतो….संघर्ष करणारी माणसंच नेहमी यशस्वी होतात. या आशयाचा संदेश देणाऱ्या ‘तू तिथे असावे‘ या आगामी प्रेरणादायी मराठी चित्रपटाचा म्युझिक आणि ट्रेलर लाँण्च सोहळा नुकताच मुंबईत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या चित्रपटाच्या ट्रेलर सोबतच सिनेमातील गाणी प्रेक्षकांना नक्कीच रोमांचित करणारी आहेत.
गणेश पाटील ‘तू तिथे असावे‘ या चित्रपटाचे निर्माते आहेत. आकाश कांडुरवार, शरद अनिल शर्मा, प्रशांतजी ढोमणे, संदेश बुरबुरे, सुरभी बुजाडे हे सह-निर्माते आहेत. भूषण प्रधान, पल्लवी पाटील, विजय पाटकर, समीर धर्माधिकारी, अरूण नलावडे, मोहन जोशी, जयवंत वाडकर, श्रीकांत वट्टमवार, अभिलाषा पाटील, विशाखा घुबे, मास्टर तेजस पाटील या कलाकारांच्या भूमिका ‘तू तिथे असावे‘ या चित्रपटात आहेत.
वेगवेगळ्या पठड्यातील सहा गाणी ‘तू तिथे असावे‘ या चित्रपटात आहेत. दिनेश अर्जुना हे या चित्रपटाचे संगीतकार आहेत तर गीतकार मंदार चोळकर, डॉ. श्रीकृष्ण राऊत, पार्वस जाधव, दौर सैफ हे आहेत. या गीतांना आदर्श शिंदे, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, जसराज जोशी, नेहा राजपाल, धनश्री बुरबुरे, गणेश पाटील यांचा सुमधूर आवाज लाभला आहे.
चित्रपटाची कथा आणि पटकथा आशिष विरकर यांनी लिहिली आहे. संवाद आशिष विरकर आणि दिपक अंगेवार यांचे आहेत. छायांकन बाशालाल सय्यद यांचे असून संकलन मन्सूर आझमी यांचे आहे. कलादिग्दर्शन महेंद्र राऊत आणि गजानन फुलारी यांचे आहे. ध्वनी अनुप देव यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन जीत सींग यांनी केले आहे. वेशभुषा कैलाश ब्राम्हणकर तर रंगभूषा अभय मोहिते यांची आहे. पोस्ट प्रोडक्शनची जबबदारी विक्रांत स्टुडिओनी सांभाळली आहे. रोहितोष सरदारे कार्यकारी निर्माते आहेत.
‘जी कुमार पाटील एन्टरटेन्मेंट’ प्रस्तुत ‘तू तिथे असावे‘ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘मिसेस इंडिया – एम्प्रेस ऑफ द नेशन २०१८’ सौंदर्य स्पर्धेची महाअंतिम फेरी पुण्यात संपन्न
पुणे-‘विनय अरान्हा प्रेझेंट्स मिसेस इंडिया – एम्प्रेस ऑफ द नेशन २०१८, पॉवर्ड बाय हयात’ या सौंदर्य स्पर्धेची महाअंतिम फेरी नुकतीच येथे शानदार वातावरणात शानदार सोहळ्याने संपन्न झाली. संगीत, नृत्य व प्रेक्षकांची भरभरुन दाद अशा वातावरणात एकूण ३२ स्पर्धकांनी प्रतिष्ठेच्या सन्मानांसाठी चुरशीने स्पर्धा लढवली. हयात पुणे हॉटेलमध्ये झालेल्या या महाअंतिम फेरीसाठी बॉलिवूडमधील नामवंत आणि शहरातील ख्यातनाम व्यक्ती उपस्थित होत्या.
या सौंदर्य़ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून युक्ता मुखी, अदिती गोवित्रीकर, शिबानी कश्यप, सोनल चौहान, शरहान सिंग यांनी काम पाहिले व त्यांना विनय अरान्हा, सपना आनंद छाजेड, डॉ. अक्षया जैन व कार्ल मस्कारेन्हास यांचीही साथ लाभली. प्रसिद्ध दूरचित्रवाणी अभिनेता अमन वर्मा याने दिमाखदार व मंत्रमुग्ध करणाऱ्या शैलीत या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. शिबानी कश्यपने आपल्या मधुर आवाजात तिची देशभर प्रसिद्ध झालेली गाणी सादर करुन प्रेक्षकांना डोलायला लावले.
डिवा सौंदर्य स्पर्धेतील चैतन्यशील जोडी असलेल्या अंजना व कार्ल मस्कारेन्हास यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात सिल्व्हर (वय २० ते ३४) व गोल्ड (वय ३५ व पुढे) अशा दोन श्रेणींमध्ये उपांत्य फेरी गाठलेल्या १२ स्पर्धकांतून ६ सर्वोत्तम विजेते निवडण्याचे आव्हान सन्माननीय परीक्षकांपुढे होते.
अंतिम फेरीत पोचलेल्या स्पर्धकांना दिवा सौंदर्य स्पर्धेतील विजेत्यांकडून आधीचे ३ दिवस मार्गदर्शन मिळाले. त्याच्या बळावर या स्पर्धकांनी आत्मविश्वासाने सौंदर्य, शैली व बुद्धिमत्तेचे प्रदर्शन घडवत विजेतेपदाचा मुकूट पटकावला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
टायटल विजेते
मिसेस इंडिया – एम्प्रेस ऑफ द नेशन २०१८ – सिल्व्हर : गौरांगी श्रावत
मिसेस इंडिया – एम्प्रेस ऑफ द नेशन २०१८ – गोल्ड : रुपाली सावंत
सब-टायटल विजेते :
फर्स्ट रनर-अप – सिल्व्हर : वृषाली तायाडे
फर्स्ट रनर-अप – गोल्ड : सिमरन गोधवानी
सेकंड रनर-अप – सिल्व्हर : पिया पावानी
सेकंड रनर-अप – गोल्ड : शुभांगी जोशी
याखेरीज देशाच्या चार भागांतून चार क्वीन्सही निवडण्यात आल्या. यामध्ये क्वीन ऑफ नॉर्थ म्हणून कनिका श्रीवास्तव, क्वीन ऑफ वेस्ट म्हणून शुभांगिनी सांगळे, क्वीन ऑफ साऊथ म्हणून हेमलता शर्मा, क्वीन ऑफ सेंट्रल इंडिया म्हणून अंशुली भांड यांची निवड झाली.
विजेत्यांना मानाचा मुकूट, रोख पारितोषिके (खुशबू कारवातर्फे) व अलंकार (मोदसूत्रतर्फे) देऊन गौरवण्यात आले.
मिसेस युनायटेड नेशन इंटरनॅशनल २०१८ स्पर्धेतील फर्स्ट रनर अप विजेत्या फरहा अन्वर या सौंदर्य स्पर्धेचा ब्रँड चेहरा होत्या. सोहळ्यातील नृत्यांचे संयोजन पूजा सिंग यांनी केले.
आता ॲपवर मिळवा भाड्याने बाईक, मोबिक्विक आणि ओएनएन बाईक्सची भागीदारी
नवी दिल्ली- मोबिक्विक, भारतातील सर्वांत मोठ्या डिजिटल वित्तीय सेवा मंचने आज लोकांचा दैनंदिन प्रवास सुखकर बनवणाऱ्या ‘ओएनएन बाईक्स’ या बाईक रेंटल प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी करत ट्रॅव्हल क्षेत्रातील प्रवेशाची घोषणा केली आहे. मोबिक्विक यूजर मोबिक्विक अॅपद्वारे बाईक, स्कूटर किंवा स्कूटी भाड्याने घेऊ शकतात. शहरांतर्गत प्रवास त्रासमुक्त, परवडणारा आणि सोयीचा बनवणे हा या भागीदारीमागचा उद्देश आहे. सध्या ही सेवा बंगळुरू, हैदराबाद, जयपूर, कोटा, मैसूर आणि उदयपूर या 6 प्रमुख शहरांमध्ये सुरू होणार असून पुढील काळात आणखी काही शहरांमध्ये या सेवेचा विस्तार केला जाणार आहे.
वाढती वाहतूक कोंडी, प्रदूषण पातळीत होणारी वाढ, जागेची मर्यादा या विविध कारणांमुळे भारतातील टियर 1, 2 आणि 3 नगरे आणि शहरांत दुचाकी हा प्राधान्य दिला जाणारा पर्याय आहे. आजच्या काळात स्वत:ची वाहने खरेदी करण्यापेक्षा भाडे तत्त्वावर वाहने घेण्यास पसंती देण्याचे प्रमाण वाढत आहे. प्रारंभिक ऑफर म्हणून, मोबिक्विक यूजर सुपरकॅश मूल्याच्या 5% पर्यंत सूट मिळवण्यासाठी सुपरकॅशचा वापर करू शकतात.
या नवीन क्षेत्रातील प्रवेशाविषयी बोलताना, श्री. बिक्रम बिर सिंह, वरिष्ठ संचालक आणि व्यवसाय प्रमुख, मोबिक्विक म्हणाले की, “आमच्या अंतर्गत संशोधनानुसार टियर 1/2 आणि 3 शहरांत महिला आणि तरुणांसह सर्वच युजरची रेंटल क्षेत्रात दुचाकीला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. आम्ही अधिकाधिक कृती आणि जेथे दुचाकी रेंटल एक आशादायी श्रेणी ठरू शकते अशा टियर-1 नगरे आणि शहरांपलीकडे असलेल्या असंख्य भारतीयांसाठी आर्थिक समावेशनाचा समतोल साधण्यास वचनबद्ध आहोत. आम्ही ओएनएन बाईक्सच्या सहयोगाने ही श्रेणी सुरू करीत आहोत आणि भविष्यात या श्रेणीमध्ये प्रभावी वाढ दिसून येईल याचा आम्हाला विश्वास आहे.”
श्री. आकाशदीप सिंघल, मुख्य विपणन अधिकारी आणि सह-संस्थापक, ओएनएन बाईक्स, म्हणाले, “मोबिक्विकसोबत आमच्या भागीदारीबद्दल आम्ही फार उत्सुक आहोत. हे भारताचे दुसरे सर्वांत मोठे मोबाईल वॉलेट आहे आणि ही भागीदारी शहरांमधील लाखो नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल. तसेच, ही भागीदारी प्रवास करणार्यांना बाईक भाड्याने घेण्याची आणि मोबिक्विक ॲपद्वारे पेमेंट करण्याची सोय प्रदान करेल. आम्हाला भारतातील प्रमुख 10 शहरांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असलेल्या आमच्या 3500+ बाईक्सच्या मजबूत ताफ्याचा अभिमान वाटतो. मोबाईल वॉलेट क्षेत्रामध्ये ‘पसंतीचा भागीदार’ म्हणून मोबिक्विकसोबत, आम्ही अधिकाधिक युजरपर्यंत पोहोचणे आणि भारतीयांसाठी त्यांच्या पहिल्या आणि अंतिम स्थानाच्या कनेक्टिव्हिटी समस्येबद्दल संबोधण्याची आशा करीत आहोत.”
भारत सरकारने वर्तमान आर्थिक वर्षात 30 अब्ज व्यवहारांचे भव्य लक्ष साधण्याचा मानस बाळगला आहे ज्यात मोबाईल वॉलेट कंपनीद्वारे 6.3 अब्ज व्यवहारांच्या अपेक्षांचा समावेश आहे. अशा प्रकारच्या भागीदारीमुळे देशात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होते. अमेरिका आणि चीन या देशांपाठोपाठ ग्राहकांना डॉक-लेस सेवांचा लाभ देऊन विलक्षण अनुभव प्राप्त करण्यावर आपला भारत देश भर देत आहे.
मोबिक्विकविषयी
मोबिक्विक हे भारतातील सर्वात मोठा डिजिटल वित्तीय सेवा मंच, एक प्रमुख मोबाईल वॉलेट आणि आघाडीचे पेमेंट गेटवे आहे. मोबिक्विक ॲप हा सुमारे 3 दशलक्ष थेट व्यापारी आणि 260 दशलक्षपेक्षा अधिक युजरचे विस्तृत जाळे असलेले आघाडीचा मोबाईल पेमेंट मंच आहे. बिपिन प्रीत सिंह आणि उपासना टाकू यांनी सन 2009 मध्ये कंपनीची स्थापना केली असून कंपनीने सेक्वाया कॅपिटल, अमेरिकन एक्स्प्रेस, ट्री लाईन एशिया, मीडिया टेक, जीएमओ पेमेंट गेटवे, सिस्को इन्व्हेस्टमेंट्स नेट1 आणि बजाज फायनान्स यांकडून चार फेरींचा निधी उभारला आहे. कंपनीची नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे आणि कोलकाता येथे कार्यालये आहेत. मोबिक्विक भारतातल्या डिजिटल व्यवहाराचा सर्वात मोठा स्त्रोत बनण्याचे आणि सन 2022 पर्यंत अब्जावधी भारतीयांना डिजिटल पेमेंट, कर्ज, विमा आणि गुंतवणूकीसाठी एकच मंच उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवून आहे
ओएनएन बाईक्सविषयी
ओएनएन बाईक्स हे एक रेंटल प्लॅटफॉर्म जेथे तुम्हाला बाईक भाड्याने मिळू शकते आणि रोजच्या प्रवासाला अधिक सोपे बनवण्यास, प्रवासाचा वेळ सार्थक, त्रास-मुक्त आणि अधिक परवडणारा बनवण्यास मदत करते! कंपनीकडे सुमारे 3500+ बाईक्सची क्षमता असून बंगळुरू, हैदराबाद, मौसूर, दिल्ली एनसीआर, अहमदाबाद, मुंबई, पुणे, जयपूर, कोटा आणि उदयपूर सारख्या प्रमुख शहरांमध्ये प्रत्यक्ष सेवा पुरविण्यात येते. या सेवांमध्ये शहरांतर्गत, दोन शहरांतर्गत, कमी आणि अधिक अंतराच्या राईडसाठी भाडेपट्ट्यावरील मॉडेलचा समावेश होतो. भारतामध्ये डॉक-लेस स्कूटर शेअरिंगसाठी हे अग्रक्रमी आहेत. ॲमेझॉन, उबर, ओला, स्विग्गी, फूडपांडा, फ्यूचर ग्रुप, इलास्टिक रन, चाय पॉईंट, फासूस, गोझेफो, फार्मईझी, निन्जाकार्ट, उर्बन लॅडर इ. प्रमुख ब्रँड्सने यांच्या उपास आणि सेवांचा लाभ घेतला आहे. ओएनएन बाईक्स हे बी2बी मध्ये विभिन्नता आणणारे पहिले रेंटल स्टार्ट-अप आहे
गणपती आरती संग्रहाचे प्रकाशन
गणेशोत्सवानिमित्त सोनी मराठीची हास्यजत्रा
आनंद, उत्साह आणि जल्लोष यांनी नटलेला क्षण म्हणजे आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन… या
गणेशाच्या आगमनाचा जल्लोष नुकताच साजरा झाला सोनी मराठीच्या ‘उत्सव गणरायाचा, महोत्सव हास्यजत्रेचा’
या पहिल्यावहिल्या दणदणीत कार्यक्रमात… प्रसाद ओक आणि प्राजक्ता माळी यांनी विघ्नहर्त्याच्या साक्षीनी या
कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर नम्रता आवटे–संभेराव, समीर चौघुले, विशाखा सुभेदार आणि प्रसाद खांडेकर
यांच्या साथीनी फुलली हास्यजत्रा… या चौघांच्या जुगलबंदीनी ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर सभागृहात हास्यस्फोट
झाला. या कार्यक्रमाला चार चांद लावले आनंद शिंदे यांच्या गायकीनी…. आपल्या रांगड्या आवाजात सादर केलेल्या
सदाबहार गीतांनी त्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यानंतर वस्त्रहरण नाटकाचा सादर झालेला अंश प्रेक्षकांच्या
डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला, तर सोनी मराठीवर सध्या गाजत असलेली मालिका ‘ह्रदयात वाजे समथिंग’ याचे
कलाकार निखील दामले, स्नेहा चव्हाण आणि ऐश्वर्या पवार यांनी सादर केलेला नृत्याविष्कार पाहून प्रेक्षकांच्या
ह्रदयात समथिंग नक्कीच वाजलं.
प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या या कार्यक्रमात पुढे ‘नाद करायचा नाय’ म्हणत संतोष जुवेकर यानी
रंगमंचावर प्रवेश केला आणि प्रेक्षकांनी एकच कल्ला केला. त्यानंतर संतोष जुवेकर सोबत ’इयर डाऊन’ या सोनी
मराठीवरील मालिकेत असणारी प्रणाली घोगरे हिनी सुंदर नृत्याविष्कार केला आणि याच कार्यक्रमाची थेट झलक
प्रेक्षकांसमोर सादर झाली.
हास्याचा विस्फोट होत असतानाच रंगमंचावर अचानक भरत जाधव यांच्या रूपात मोरूची मावशी आली
आणि प्रेक्षकांचे डोळे पाणावले. हास्यजत्रा भरलेली असताना मोरूच्या मावशीची आठवण न काढणं शक्यच नव्हतं.
विजय चव्हाण…. एक असा कलाकार ज्यानी आपलं आयुष्य प्रेक्षकांना हसवण्यात घालवलं अशा सच्च्या कलाकाराच्या
जाण्यानी निर्माण झालेल्या पोकळीची पुन्हा एकदा जाणीव झाली. भरत जाधव यांनी ‘टांग टिंग टिंगाक’ करत विजय
चव्हाण यांना आदरांजली वाहिली.हा कार्यक्रम येत्या १९ आणि २० सप्टेंबर रोजी रात्रौ ९.०० वा सोनी मराठीवरप्रक्षेपित
होणार आहे.
सॅमसंगने बंगळुरूतील वैशिष्ट्यपूर्ण ऑपेरा हाउसमध्ये सुरू केले जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटर
बंगळुरू, – सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने बेंगळुरू या भारतातील टेक कॅपिटलमध्ये आज जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटर सुरू केल्याची घोषणा केली आहे. कंपनीचे सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटर जेथे असणार आहे त्या ब्रिगेड रोडवरील वौशिष्ट्यपूर्ण ऑपेरा हाउसचे नूतनीकरण करण्यात आले आहे व आर्किटेक्चरचा एक भव्य नमुना म्हणून जतन करण्यात आले आहे. सॅमसंग ऑपेरा हाउस लोकांना विशेष अनुभव देण्यासाठी तंत्रज्ञान, जीवनशैली व नावीन्य एकत्र आणणार आहे.
देशातील पहिल्यावहिल्या असलेल्या सॅमसंग ऑपेरा हाउसमध्ये, सॅमसंगच्या #DiscoverTomorrowToday या विचारसरणीवर आधारित असलेल्या वैविध्यपूर्ण उत्पादनांचे दर्शन घडवले जाईल. उत्पादनांचे हे अनुभव सॅमसंग जगभर प्रवर्तक असलेल्या व्हर्च्युअल रिअलिटी (व्हीआर), आर्टिफिशिअल इंटलिजन्स (एआय) व इंटनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) या परिवर्तनशील तंत्रज्ञानांवर आधारित असतील.
तंत्रज्ञानाशी संबंधित असलेले विविध अनुभव व मनोरंजन यांचा आनंद घेण्यासाठी इच्छुक असलेल्या शहरातील तरुणांसाठी सॅमसंग ऑपेरा हाउस हे हक्काचे ठिकाण असणार आहे. तेथे 360 डिग्री त्रीमितीय हालचाली करणारे 4डी स्वे चेअर किंवा व्हिपलॅश पल्सर 4डी चेअर असे व्हीआर अनुभव घेता येतील. एखाद्याला फायटर पायलटच्या भूमिकेमध्ये जाऊन एअरक्राफ्ट स्टंट करता येऊ शकतात किंवा स्पेस बॅटल किंवा रोलर कोस्टर राइड अनुभवता येऊ शकते.
केकेइंग किंवा रोइंगचा थरार आवडणाऱ्यांसाठी व्हीआर अनुभव वाट बघत आहे. फिटनेसप्रेमींना मित्राबरोबर शर्यत लावत, अप्रतिम युरोपमध्ये सायकल चालवण्याचा आनंद घेता येऊ शकतो.
कुटुंबीयांबरोबर सिनेमा व शो पाहण्यासाठी ग्राहकांना सेंटरचे होम थिएटर अगोदर बुक करता येऊ शकते.
बेंगळुरूतील नावीन्य, जीवनशैली, मनोरंजन व संस्कृती यांचे केंद्र बनण्याचे सॅमसंग ऑपेरा हाउसचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्लाझा क्षेत्रामध्ये वर्षभर फिटनेस, फोटोग्राफी, गेमिंग, संगीत, सिनेमा, फूड, स्टँड-अप कॉमेडी, तंत्रज्ञान व स्टार्ट-प यासंबंधीचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
सॅमसंगने शहरात नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणामध्ये आढळले की, भारतातील काम किंवा लिजर जीवन यामध्ये परिवर्तन आणेल अशी किमान एक तरी कल्पना आपल्याकडे असल्याचे बंगळूरूतील बहुसंख्य रहिवाशांनी (81%) सांगितले. परंतु, समविचारी व्यक्ती व मार्गदर्शक यांच्याशी संपर्क निर्माण करता येईल व आपल्या कल्पना जोपासता येतील, असे शहरातील एकही ठिकाण माहीत नसल्याचे तीनपैकी एकाने नमूद केले.
“आजच्या ग्राहकांना, विशेषतः तरुणांना, खास अनुभव अपेक्षित सतात. त्यांना ब्रँडशी संवाद साधायचा असतो, स्पर्श, अनुभव हवा असतो व ब्रँड निर्माण करायचा असतो. सॅमसंग ऑपेरा हाउसमध्ये हेच साकारले आहे. सर्व वयोगटांना आवडेल, असा अपूर्व अनुभव आम्ही देणार आहोत. ऑपेरा हाउस सॅमसंगचे नावीन्य व लोकांची पॅशन यांची सांगड घालत कार्यशाळा, उपक्रम व कार्यक्रम यांचे आयोजन करणार आहे. या जागेने आजवर पाहिलेले परिवर्तन अभिमानास्पद असे आहे,” असे सॅमसंग साउथवेस्ट आशियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी एच. सी. होंग यांनी सांगितले.
सॅमसंगने या वर्षी जुलैमध्ये नोएडा येथे जगातील सर्वात मोठा मोबाइल कारखान्याचे उद्घाटन केल्यानंतर दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत भारतात जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटर सुरू करण्यात आले आहे. यातून, कंपनीची भारताबद्दलची बांधिलकी अधोरेखित होते.
ब्रिटिशांच्या काळात नाटके व ऑपेरा यांचे आयोजन केलेल्या 33,000 फुटांच्या स्टँडअलोन मालमत्तेचे दोन वर्षांपूर्वी जतन करण्यात आले व त्याला मूळ रूपाप्रमाणे भव्य रंगरूप व थाट देण्यात आला आहे. आतील बाजूने, आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करून आधुनक प्रायोगिक जागा तयार करण्यात आली आहे.
सॅमसंग क्यूएलईडी टीव्ही, स्मार्ट टीव्ही, द फ्रेम, फॅमिली हब रेफ्रिजरेटर्स अशा प्रमुख कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांबरोबरच, एक्स्पिरिअन्स सेंटरमध्ये सर्व स्मार्टफोन व वेअरेबल डिव्हाइसेसही ठेवणार आहे. होम अप्लायन्सेस विभागामध्ये किचन सेट अप असेल व तेथे शेफ सॅमसंग स्मार्ट ओव्हन वापरून प्रत्यक्ष स्वयंपाकाची प्रात्यक्षिके देणार आहे.
सॅमसंगच्या जगातील सर्वात मोठ्या मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटरमध्ये 24 फुटांच्या भिंतीवर केसेससह अॅक्सेसरीजचे सर्वात मोठे प्रदर्शन असणार आहे. तेथे, ग्राहकांना अॅक्सेसरीजसाठी विशेष कस्टमायझेशन पर्याय उपलब्ध केले जातील, जसे स्क्रीनच्या संरक्षणासाठी मिलिटरी स्ट्रेंथ स्किन बसवणे व 360 डिग्री बॉडी प्रोटेक्शन. त्यांना मोबाइल कव्हरवर त्यांच्या आवडीचे कोणतेही डिझाइन किंवा मजकूर यांचे लेसर कोरीवकाम करून घेता येईल. तेथे विविध प्रकारची हर्मन कार्डन, जेबीएल व सॅमसंग ऑडिओ उत्पादनेही उपलब्ध असतील.
सॅमसंग ऑपेरा हाउसमध्ये पूर्णतः कार्यान्वित असलेले सेवा केंद्र असेल व त्यामध्ये वेगवान सार्वजनिक वाय-फाय असेल.
सॅमसंग लोकांना काय हवे आहे, याच्या सखोल आकलनाद्वारे उज्ज्वल भविष्याची निर्मिती करण्यासाठी आज तंत्रज्ञानाच्या मदतीने नावीन्य साधण्यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या वर्षी कंपनीने जगभर संशोधन व विकास करण्यासाठी 15 अब्ज डॉलर खर्च केले आणि आता लोकांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी आयओटी, एआय व 5जी अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर कार्यरत आहे.
भारतात सॅमसंगचे दोन उत्पादन प्रकल्प, पाच संशोधन व विकास केंद्रे व एक डिझाइन सेंटर आहे. सॅमसंगचे पहिले संशोधन व विकास केंद्र सन 1996 मध्ये बंगळुरू येथे सुरू करण्यात आले. आज, सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट, बंगळुरू (एसआरआय-बी) हे कंपनीचे कोरियाबाहेरचे जगातील सर्वात मोठे संशोधन व विकास केंद्र आहे. एसआरआय-बी हे सॅमसंगच्या ‘मेक फॉर इंडिया’ उपक्रमाच्या अंतर्गत, जागतिक उत्पादने व स्थानिक नावीन्य यामध्ये योगदान देत आहे.
180,000 रिटेल पार्टनर व 2,100 सॅमसंग ब्रँड स्टोअर असे सॅमसंगचे देशभर सर्वात मोठे रिटेल व वितरण जाळे आहे.
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी 3 ऑक्टोबरला पोटनिवडणूक
मुंबई-राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या 3 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने सोमवारी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या 3 ऑक्टोबर रोजी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या 14 सप्टेंबरला या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. 22 सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून,24 सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी करण्यात येईल. तर 26 सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून,बुधवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान घेण्यात येवून, त्याच दिवशी 5 वाजता मतमोजणी करण्यात येईल.फुंडकर यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ 2020 पर्यंत होता. विधानसभेत भाजपचे सदस्य सर्वात जास्त असल्यामुळे इतर कोणताही पक्ष या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार देण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचीच शक्यता जास्त आहे. पर्यायाने भाजपमध्ये आता तिकीट मिळविण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. फुंडकर ग्रामीण भागाचे प्रतिनिधीत्व करत होते. त्यामुळे विदर्भातील ग्रामीण भागातूनच उमेदवार द्यावा, असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरी भागातील कार्यकर्त्याला संधी द्यावी, असाही विचार पुढे येत आहे.
वाघोली व मुळशीत अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीएकडून कारवाई
पुणे- महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए)वतीने ता. हवेलीतील वाघोली येथे
सर्व्हेनंबर १४२७ व मुळशी तालुक्यातील नेरे दत्तवाडी येथील सर्व्हेनंबर ५४ मधील एकूण दोन ठिकाणी एकाच दिवशी
११ सप्टेंबर २०१८ रोजी १९.००० चौरस फूट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. या सर्व अनधिकृत दुमजली
जागांचा वापर व्यवसाईक व रहिवाशी वापरासाठी केला जात होता.
महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३ (१) अन्वये संबधिताना प्रत्येकी दोनदा नोटीसा देऊनही
त्यांनी अनधिकृत बांधकामे सुरु ठेवली होती. ३ एप्रिल २०१८ ला बांधकाम निष्कासन कारवाई प्रस्तावित होती.मात्र
बांधकाम धारकाने उच्च न्यायालयात धाव घेतली. पीएमआरडीए कडील ठोस कागदपत्राच्या आधारे ६ सप्टेंबर २०१८
ला उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर तत्काळ ११ सप्टेंबर २०१८ला पीएमआरडीएने अनधिकृत
बांधकामधारकावर कारवाई केली आहे. पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निष्कासन पथक क्रमांक एक व दोन
मार्फत ही कारवाई पार पडली.
अनधिकृत बांधकाम प्रमुख पोलीस अधीक्षक सारंग आवाड व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद पाठक,
उपजिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पीएमआरडीएचे पोलीस निरीक्षक
राजकुमार शेरे, उपअभियंता तथा तहसीलदार राजेंद्र मेदनकर, उपअभियंता सुर्यकांत कापसे, उपभियंता श्रीधर फणसे,
सह्यक अभियंता राजेश्वर मंडगे, एम. आय. शेख, भानुदास शिंदे, कनिष्ठ अभियंता योगेश दिघे, कनिष्ठ अभियंता कृष्णा
मुंढे, कनिष्ठ अभियंता सचिन झुरुंगे, कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता सुजय पाटील, लोणीकंद व हिंजवडी पोलीस
स्टेशनचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांच्या बंदोबस्ताच्या नियंत्रणाखाली सदरील कारवाई पार पाडण्यात आली.
पीएमआरडीए क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम धारकांना MRTP कायद्याअंतर्गत नोटीसा दिलेल्या आहेत. तसेच
अनधिकृत बांधकाम धारकांची यादी pmrda.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. शासन निर्णय
०३ मे २०१८ नुसार अनधिकृत बांधकामांची नोंदणी होऊ शकत नाही. याबाबत दुय्यम निबंधकाना देखील अनधिकृत
बांधकामांची यादी देण्यात आली आहे. अनधिकृत सदनिका या स्वस्त दरात नागरिकांना उपलब्ध करून आमिष
दाखविण्यात येते व पर्यायाने त्यांची फसवणूक होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, अनधिकृत
सदनिका व गाळे खरेदी करू नयेत. तरी सदनिका खरेदी करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पीएमआरडीए
महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी केले आहे.
पिंपरी ते स्वारगेट रखडलेल्या मेट्रो प्रकल्पाचे काम त्वरीत सुरू न झाल्यास काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन.
पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिड वर्षांपूर्वी मोठ्या गाजावाजाने पुण्यातील मेट्रो रेल प्रकल्पाचा
शुभारंभ केला. पिंपरी ते स्वारगेट मेट्रो रेल काम गेल्या १० महिन्यांपासून रखडले आहे. पिंपरी ते
स्वारगेट मार्गावरची मेट्रो रेल खडकी वरून जाणार आहे. खडकी येथील १० एकरची जमिन
महामेट्रोने संरक्षण खात्याकडून मागीतली आहे. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे व मनुष्यबळ
विकास मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांनी पुणेकरांना आश्वासन दिले होते की, हा प्रश्न लवकरात
लवकर सोडविणार. परंतु आज १० महिने होवून गेल्यावर सुध्दा प्रश्न सुटलेला नाही. राज्यात आणि
केंद्रात भाजपाचे सरकार आहे. संरक्षण मंत्री व त्या खात्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्वरीत
प्रश्न सोडविणे त्यांच्याकडून अपेक्षित होते परंतु खासदार शिरोळे व मनुष्यबळ विकास
मंत्री जावडेकर काम मार्गी लावण्यास अपयशी ठरले. संबंधित महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना
१० एकरची जागा संरक्षण खात्याकडून मिळण्याबाबतीत सरकारने हिरवा कंदील दाखविलेला नाही
आणि काम करण्याचीही अनुमती दिलेली नाही. त्या मार्गावर काम दिलेल्या ठेकेदाराला दुसरे काम
करण्याचे आदेश दिलेले आहेत. या परिस्थितीमध्ये २०२१ पर्यंत मेट्रोचे काम पूर्ण होणार नाही असे
दिसते. याचा दुजोरा मेट्रेच्या अधिकाऱ्यांनीही दिलेला आहे. विकासाच्या कामांचा डिंडोरा पिटविणारे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा होती की, संरक्षण मंत्री व त्या
खात्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून काम त्वरीत मार्गी लावतील, परंतु त्यांनी पुणेकरांची अपेक्षा
भंग केली. भारतीय जनता पक्ष विकासाचे नाव घेवून जनतेची दिशाभुल करून सत्तेवर आली परंतु
विकासाच्या कामात वेग आणण्यास अपयशी ठरली आहे. पुण्याचे खासदार शिरोळे व
मनुष्यबळ विकास मंत्री जावडेकर यांनी हा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा अन्यथा काँग्रेस
पक्षातर्फे पुणे शहराचा विकास व पुणेकरांच्या हितासाठी त्यांच्या घराबाहेर तीव्र आंदोलन करणार.
असे या पत्रकाद्वारे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी जाहिर केले आहे.
पुण्याच्या सात नगरसेवकांचे पद रद्द करण्याची आयुक्त सौरव राव यांची शिफारस
पुणे- जात पडताळणी दाखल्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी राज्य शासनाकडे राष्ट्रवादीच्या 2 आणि भाजपच्या 5 नगरसेवकांची पदे रद्द करावीत अशी शिफारस करणारा अहवाल पाठविला आहे
हा अहवाल नगरविकास खात्याला पाठविला आहे. यामध्ये भाजपाचे किरण जठार, आरती कोंढरे, फर्जाना शेख, कविता वैरागे, वर्षा साठे अशा पाच नगरसेवकांचा तर राष्ट्रवादीच्या बाळा धनकवडे, रूखसाना इनामदार या दोन नगरसेवकांचा समावेश आहे.सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका कोल्हापूरच्या प्रकरणात दिलेल्या निकालानुसार पुणे महापालिकेला याबाबत अहवाल पाठविण्याचे आदेश देण्यात आले होते. या सात हि जणांनी निवडणूक लढविली आणि जिंकली पण जात पडताळणी दाखला वेळेत सादर केला नव्हता .
पुणे महापालिकेत भाजपचे पूर्ण बहुमत आहे. त्यांचे संख्याबळ 97 वरून 92 वर येणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संख्याबळ 42 वरून 40 वर येईल. एकाच वेळी इतक्या नगरसेवकांचे पद रद्द होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने याबाबत महापालिका आयुक्तांना अशा नगरसेवकांवर कारवाई करण्याचा आदेश दिला होता.
वीजचोरी-अक्कलकोट येथील उद्योजकास एक वर्षाची कैद व 2 लाखांचा दंड
मुंबई, दि. 10 सप्टेंबर 2018 : वीजचोरीप्रकरणी अक्कलकोट (जि. सोलापूर) येथील उद्योजक रवींद्र मोहन भंडारे यास एक वर्षाची कैद आणि दोन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सोलापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने नुकताच हा निकाल दिला.
याबाबत माहिती अशी, अक्कलकोट एमआयडीसीमधील रवींद्र भंडारे या वीजग्राहकाच्या कारखान्याची महावितरणच्या फिरत्या पथकाने एप्रिल 2014 मध्ये तपासणी केली होती. यामध्ये वीजमीटरचे सील तोडून त्यात फेरफार केल्याचे दिसून आले. तसेच मीटरची गती 68.02 टक्के संथ केल्याचेही चाचणी अहवालातून स्पष्ट झाले. त्यानुसार एकूण 46,860 रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी पोलीसांनी विद्युत कायदा 2003 चे कलम 135 अन्वये वीजग्राहक भंडारेविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रवीष्ट केले. दरम्यान या वीजग्राहकाने वीजचोरीच्या देयकाचे 46,860 रुपयांचा भरणा केला. मात्र 20 एचपीप्रमाणे तडजोडीसाठी आकारलेल्या 2 लाख रुपयांची रक्कम संधी देऊनही भरली नाही.
सोलापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये वीजचोरीप्रकरणी रवींद्र भंडारे दोषी असल्याचे सिद्ध झाले व त्यास न्यायालयाने एक वर्षाची साधी कैद तसेच 2 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारी पक्षाकडून अॅड. प्रेमलता व्यास यांनी बाजू मांडली.

