Home Blog Page 3081

गोव्याला गेल्या वर्षात ७ लाख पर्यटकांनी भेट दिली

0

देशाच्या पर्यटन क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्यासाठी गोवा टुरिझमचे योगदान

मुंबई – तंत्रज्ञान सातत्यने प्रगती करत आहे आणि प्रत्येक क्षेत्रावर सकारात्मक परिणाम घडवून आणत आहे. पर्यटन क्षेत्रही त्याला अपवाद नाही. बिग डेटापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑग्युमेंटेड आणि व्हर्च्युअल रिअलिटीपर्यंत तंत्रज्ञान क्षेत्रातले सध्याचे ट्रेंड या क्षेत्रातील ग्राहकांच्या अपेक्षा आणि वागणुकीनुसार बदलत आहेत. देशाच्या पर्यटन क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्यासाठी गोवा टुरिझम महत्त्वाचे योगदान देत आहे. उदा. गोवा टुरिझमने राज्यभरातील पर्यटन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाद्वारे (जीटीडीसी) गोवामाइल्स ही ऍप वर आधारित टॅक्सी सेवा नुकतीच लाँच केली. या उपक्रमामुळे पर्यटक तसेच स्थानिक गोवन नागरिकांना परवडणाऱ्या, मान्यताप्राप्त दरात व त्याच सोयीनुसार टॅक्सी उपलब्ध होते.

जीटीडीसीने ई- कॉमर्स पोर्टल आणि अँड्रॉइड व आयओएस प्लॅटफॉर्मवर मोबाइल अप्लिकेशनही लाँच केले आहे.  जे पर्यटकांना गोव्याचा डिजिटल अनुभव देतात. या वेब पोर्टलद्वारे देशांतर्गत आणि परदेशी पर्यटकांना हॉलिडे पॅकेजेस, हॉटेलचे आरक्षण, साहसी सहली, मसाल्याच्या बागा आणि वॉटर पार्क्ससारख्या ठिकाणे जाणून घेता येतात. लाँच झाल्यापासून गोवा टुरिझमला गोव्यातील पर्यटन उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांना आपल्या उत्पादनांचे एकाच सर्वसमावेशक व्यासपीठावर विपणन करणे शक्य झाले आहे. या वेब पोर्टलला आता १२ तास सुरू राहाणाऱ्या कॉल सेंटरचीही जोड देण्यात आली आहे.

गोव्याची ‘मस्ट व्हिजिट’ अशी प्रसिद्धी करण्यासाठी गोवा टुरिझमने नुकतेच डिजिटल व सोशल मीडिया व्यासपीठावर ‘टुरिझम बाय टुरिस्ट’ हे अभियान लाँच केले. ते लाँच करण्यासाठी गोवा टुरिझमने ५०० हौशी फोटोग्राफर्स (क्राउड सोर्सर्ड इन्स्टाग्राम अक्टिव्हिटी #PickMyGoaPic), १०० पेक्षा जास्त ब्लॉगर्स आणि ३० युट्यूब कंटेट क्रिएटर्सबरोबर गोव्यात फिरून व्हिडिओज, पिक्चर्स, ब्लॉग्ज असा विविध प्रकारचा कंटेंट तयार करण्यासाठी भागिदारी केली. गोव्याची ‘मस्ट व्हिजिट डेस्टिनेशन’ अशी प्रसिद्धी करण्यासाठी हा सर्व कंटेट एका आकर्षक व्हिडिओमध्ये रुपांतरित करण्यात आला. या अभियामानामुळे पेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फॉलोअर्स कितीतरी पटींनी वाढले आहेत. या अभियानाला २०१७ मध्ये राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार सोहळा, पर्यटन मंत्रालय, भारताद्वारे बेस्ट युज ऑफ सोशल मीडिया इन प्रमोशन ऑफ अ टुरिझम बोर्डचा गोल्ड पुरस्कारही देण्यात आला होता. या डिजिटल अभियानाला कम्युनिकेशन क्षेत्रातील इतरही बरेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

पर्यटन विभाग, गोवा सरकारने संपूर्ण पर्यटन व्यवसाय ई- नोंदणीअंतर्गत आणला असून त्यामुळे नोंदणी आणि परवाना नूतनीकरण प्रक्रिया जास्त पद्धतशीर झाली आहे. स्थआनिक पर्यटन भागधारकांना आता त्यांच्या अर्जाची प्रगती ऑनलाइन तपासता येते आणि एसएमएसद्वारे त्याची अद्यावत माहिती मिळवता येते. जीटीडीटी रेसिडन्सीज विशेषतः पणजी रेसिडेन्सीने टेकसॅव्ही पर्यटकांसाठी नव्या सुधारित सुविधाही उपलब्ध केल्या असून त्यात ई- बुकिंग आणि ई- पेमेंट सुविधांचा समावेश आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांत ब्रोशरव्यतिरिक्त ई- साहित्याद्वारे पर्यटनाचा प्रसार करण्यासाठी गोवा टुरिझमने जीआयएस मॅपिंगचा प्रस्तावही मांडला आहे.

जागतिक पर्यटनाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना माननीय पर्यटन मंत्री श्री. मनोहर आजगांवकर म्हणाले, ‘डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने आणि विपणन आणि प्रचार उपक्रमांमध्ये मोठा बदल केल्याने एकंदरीतच गोवा टुरिझममध्ये लक्षणीय बदल घडून आल्याचे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. इतर पर्यटन महामंडळांकडून तीव्र स्पर्धा असताना गोवा टुरिझम जगभरात सर्वत्र पोहोचण्यासाठी आपली व्याप्ती वाढवत असून या प्रयत्नांना यश मिळत आहे. अंतर्गत प्रक्रियेपासून पर्यटन सेवांपर्यंत सर्व बाबींचे डिजिटायझेशन करत गोवा टुरिझमने डिजिटल रुपांतरणाचा मोठा पल्ला पूर्ण केला आहे. आमचे पर्यटन भागीदार आणि घटकधारक तसेच गोव्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांला गोवा टुरिझमचा सुखद अनुभव मिळेल अशी मी आशा करतो.  त्याचबरोबर या डिजिटल प्रवासात महत्त्वाचे टप्पे गाठण्यासाठी पर्यटन विभाग आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाचे त्यांनी केलेले पूर्ण सहकार्य, मेहनत आणि उत्साहासाठी मी अभिनंदन करतो.’

उर्जा मंत्री, गोवा सरकार आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) अध्यक्ष श्री. निलेश काब्राल म्हणाले, ‘टुरिझम व डिजिटल रुपांतरण क्षेत्रात गोवा पर्यटन विकास महामंडळ चांगली कामगिरी करत असून त्यांची नवीन, ऍप आधारित टॅक्सी सेवा याची प्रचिती देणारी आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचा अनुभव उंचावण्यासाठी बांधील असलेल्या महामंडळाने पर्यटकांना गोव्यात फिरण्यासाठी वाहतुकीचा सोयीस्कर व स्वस्त पर्याय मिळावा यासाठी प्रचंड मेहनत करून ऍप आधारित टॅक्सी सेवा लाँच केली आहे. पर्यटन व्यवसायाला सेवा देण्यासाठी गोवामाइल्स सज्ज असून ही नवी सेवा पर्यटकांना गोव्याला भेट देण्यासाठी आणि हे राज्य बघण्यासाठी प्रोत्साहन देईल. डिजिटल व्यासपीठांद्वारे प्रचलित करण्यात आलेली आमची इतर उत्पादने आणि सेवाही यशस्वी ठरल्या असून जागतिक पातळीवर गोवा टुरिझमचा प्रसार करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा कशाप्रकारे योग्य वापर करता येईल हे दर्शवणारी आहेत. हे सर्व बदल चांगले परिणाम साधत असून गोव्याला गेल्या वर्षात ७ लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. मला खात्री वाटते, की पर्यटनाचा नवा हंगाम सुरू होत असताना नवा अनुभव देणाऱ्या या सर्व सेवांचा पर्यटक लाभ घेतील. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने मी सर्व पर्यटन भागधारक आणि अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि गोवा टुरिझमचा झेंडा असाच उंच ठेवण्यासाठी चांगले काम करत राहाण्याची विनंती करतो.’

जलाभिषेक परिषदेचे आयोजन

0
पुणे- आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्राणांच्या आहुती दिल्या. १८५७ पासून इंग्रजी राजसत्तेने अनेक राजबंद्यांना जन्मठेपेसाठी अंदमानला काळ्यापाण्यावर पाठविले. अमानुष छळ आणि रोगट हवामान यामुळे असंख्य क्रांतीवीर अंदमानात हुतात्मे झाले. त्यांचे अंत्यविधी कोणी केले नाहीत मृत्यूसमयी भारत भूमीच्या पवित्र नद्यांचे जल कोणी त्यांच्या मुखांत पाजले नाही. अशा असंख्य क्रांतीवीरांचे ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही. तथापी या ऋणांतून अल्पांशाने का होईना उतराई व्हावे या भावनेतून कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे संस्थेच्या विद्यमाने अंदमानात जलाभिषेक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतातील विविध नद्यांचे पवित्र जल आम्ही अंदमानला घेऊन जात आहोत. या जलाचा अभिषेक अंदमानातील सेल्युलर कारागृहात, स्मारकांवर, तेथील पिंपळवृक्षाला आम्ही करणार आहोत.
जलाभिषेक कार्यक्रम २७ सप्टेंबर २०१८ रोजी होणार आहे.
जलाभिषेक परिषद ३० सप्टेंबर २०१८ रोजी होणार आहे.
भारतीय संस्कृतीत पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी पितृपंधरवडा पाळला जातो. याचे औचित्य साधून हा कार्यक्रम पितृपंधरवड्यात करण्याचे योजिले आहे.
जलाभिषेक परिषदेच्या अध्यक्षपदी कुमारी तेजाली शहासने, पत्रकार बी.बी.सी नवी दिल्ली यांची निवड केलेली आहे.
जलाभिषेक परिषद व जलाभिषेक हे कार्यक्रम प्रमुख अतिथी ह.भ.प.सौ. उर्मिलाताई कराड, कवयित्री यांच्या शुभहस्ते व उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या जलाभिषेकासाठी पुणे येथील विश्‍वशांती केंद्र – आळंदी चे सर्वेसर्वा प्रा.डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी ५५ पवित्र नद्या-सरोवरांचे जल संस्थेकडे सुपूर्द केले आहे. यात परदेशातील मक्का-मदिना येथील जलाचाही समावेश आहे.
या पवित्र जलाचा जलकुंभ प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या उपस्थितीत संस्थेकडे सुपूर्द केला.

सोशल मीडिया, सायबर सुरक्षा ,गुन्हे आणि मानसिक आरोग्य यावर राज्यस्तरीय परिषद

0

पुणे- राष्ट्रीय तपास संस्थेच्या अहवालात असे म्हटले आहे की भारतातील प्रत्येक सहावा सायबर गुन्हा हा सोशल मीडियाद्वारे केला जातो. सायबर गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण 2014
मध्ये 9,622,-  2015 मध्ये 11,592 आणि 2016 मध्ये 12, 317 होते आणि उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्ये या आकडेवारीमध्ये आघाडीवर होती. सायबर गुन्हे अहवालानुसार बहुतेक प्रकरणांमध्ये स्त्रियांच्या अवमान,
बेकायदेशीरपणे फायदा घेणे,, बदला आणि अपमान या प्रकारांचा समावेश होता. 2016 मध्ये केलेल्या जूनिपर यांच्या एका संशोधन अभ्यासाच्या आधारे व अंदाजाप्रमाणे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण हे 2019 पर्यंत 2.1 ट्रिलियन इतके
असू शकते.
तांत्रिक प्रगतीमुळे/ तंत्रज्ञानामुळे लोकांचे सामाजिक जीवन अधिक चैतन्यपूर्ण झाले आहे पण त्याचप्रमाणे ते आव्हानात्मक तसेच धोक्यात देखील आले आहे. इंटरनेटमुळे जगात लोकांची जवळीकता वाढली आहे. ते एकमेकांना
जवळ असल्याचे दिसून येते. सोशल नेटवर्किंग, ऑनलाइन शॉपिंग, डेटा संग्रहित करणे, गेमिंग, ऑनलाइन अभ्यास करणे, ऑनलाइन नोकऱ्या शोधणे,,या व अशा अनेक गोष्टी लोकांना सहजपणे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, सोशल मीडिया आणि
इंटरनेटच्या वापराच्या माध्यमातून मिळत आहेत,. इंटरनेट जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात वापरले जाते.
माध्यमांची सुलभ उपलब्धता व परवडणारा खर्च यामुळे त्याचा व्यापक वापर वाढला आहे. अशातच माध्यम वापरकर्त्यांना आकर्षक आर्थिक, भावनिक आणि सामाजिक प्रलोभने दिली जातात व त्यांचा अज्ञानपणामुळे त्यांचा बळी जातो. सध्याची तरुण पिढी ही खूप “टेक्नो सावी “/ तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणारी पिढी आहे आणि सोशल मिडीयाचा वापर करण्यासाठी जणू उतावीळ असते व त्यामुळेच त्यांना सहज ट्रॅप करून फसविने सोपे जाते.

सायबर गुन्हे ही सामान्य संज्ञा आहे ज्यामध्ये संगणक, इलेक्ट्रॉनिक गॅझेट, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा याचा समावेश आहे. सायबर गुन्हेगारीच्या पद्धतींमध्ये सोशल मिडीया वापरकर्त्याच्या अकौंट मध्ये अनधिकृत प्रवेश करणे,
हॅकिंग करणे, वेब अपहरण, सेक्सटोर्षण, पोर्नोग्राफी, एपिओनेज, सायबर-दहशतवाद, सायबर स्कॉलिंग, व्हायरस हल्ला, सायबर गुंडगिरी, बेकायदेशीर लेखांची विक्री, जुगार, ईमेल हॅकिंग चोरी, सायबर लूटमार आदींचा समावेश होतो..
सायबर गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून यामध्ये भारत देखील पाठीमागे नाही. अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की बहुतेक तरुण हे दु:ख व त्यासबंधीच्या हिंसेसारख्या मानसिक आजारांना सहज बळी पडत आहेत. तरुणांमध्ये तंत्रज्ञान, सोशल मीडियाचा अतिरेकी वापर/ अतिरेक होत असल्याने त्यांच्या भविष्यातील पिढ्या देखील नकारात्मक विचार, नैराश्य, चिंता, आक्रमकता, असहिष्णुता, तणाव, व्यसन, विकार आणि इतर अनेक मानसिक आजारांना आमंत्रण देतील आणि या मानसिक आजारांचे प्रमाण तरुणांमध्ये पिढ्यान-पिढ्या वाढतच राहील अशी भीती व्यक्त केली जात आहे.
यात शंका नाही की, सोशल मीडियाच्या वापरला काही प्रमाणात चांगली बाजू देखील आहे आणि ते एक वरदान देखील आहे. मनुष्याच्या विकासामध्ये सोशल मीडियाची प्रमुख भूमिका आहे. सोशल मीडियामुळे सामाजिककरण, सोशल
नेटवर्किंग आणि संवाद्द सोपा करण्यासाठी मदत होते.. तथापि, सोशल मीडियामध्ये बर्याच नकारात्मक गुणधर्मआहेत जे समाजातल्या तरुणांच्या आरोग्य व मानसिक आरोग्यावर परिणाम करीत आहेत. शारीरिक आजार,मानसिक आरोग्य समस्या, भावनिक – मनो सामाजिक समस्या, लैंगिक अत्याचार, बलात्कार, आत्महत्या, आणि इतर दुर्घटना हे मीडिया व्यसनांचे परिणाम आहेत. उदयोन्मुख संज्ञानात्मक वर्तनात्मक समस्या, मानसिक असंतुलन, शक्ती संघर्ष, किशोरवयीन आवेश या व अशा अनेक गोष्टी किशोरवयीन मुलांच्या व तरुणाच्या जीवनावर तसेच त्यांच्या जीवन
कौशल्याचे व्यवस्थापन, आकांक्षा व त्यांना समाजात कायद्याचे पालन करणारा नागरिक म्हणून पार पाडावयाच्या सामाजिक जबाबदाऱ्या यामध्ये अडथळा निर्माण करतात.

आणि यामुळेच या घटकाची गरक म्हणून कर्वे समाज सेवा संस्था , आणि रोटरी सारख्या स्वयंसेवी संस्था, पोलिस, मानसिक आरोग्य व्यावसायिक, प्रॅक्टिशनर्स, सामजिक कार्यकर्ते, आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी एकत्रित येऊन सोशल
मीडिया आणि सायबर गुन्हे याबाबत तरुणांच्या मानसिक आरोग्याशी निगडीत जागरूकता निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. कर्वे समाज सेवा संस्था आणि रोटरी क्लब
ऑफ पूना वेस्ट यामध्ये मुख्य संस्था म्हणून भूमिका पार पाडत आहेत..
सायबर सुरक्षा आणि मानसिक आरोग्य जागरूकता अभियानाच्या दृष्टीने ही परिषद / हा सेमिनार हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे.

सोशल मीडिया, सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांबद्दल तरुण व मानसिक आरोग्य व्यावसायिकांमध्ये माहिती आणि ज्ञान प्रसारित करणे, सोशल मीडियाच्या वापराविषयी जागरुकता निर्माण करणे, सोशल मिडीयाचा मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम आणि प्रभाव. व त्यासंबंधित समस्या सोडविण्यासाठी व त्यांच्या उत्तम मानसिक आरोग्याच्या दृष्टीचे धोरण याविषयी स्वयंसेवी संस्था/ एनजीओ, माध्यमे/ मीडिया, पोलिस आणि मानसिक आरोग्य व्यावसायिकांची भूमिका, तसेच गुणवत्तापूर्ण जीवन सुनिश्चित करण्यासाठी आव्हाने आदी या
परिषदेची / सेमिनारची प्रमुख उद्दिष्ट्ये असणार आहेत. या परिषदेमध्ये सुमारे 100 – महाविद्यालयीन युवक, शिक्षक, रोटरियन, व्यावसायिक सल्लागार, प्रॅक्टिशनर्स, मानसशास्त्रज्ञ, मनोचिकित्सक, सामाजिक कार्यकर्ते आणि
मध्यम माध्यम / प्रतिनिधी भाग घेत आहेत.दि. शनिवार २९ सप्टेंबर २०१८  वेळ- सकाळी १०.०० ते साय. ५.०० वाजेपर्यंत बी डी कर्वे कॉन्फरन्स हॉल( 18, Hill Side, Karvenagar, Pune-52)येथे हि परिषद आयोजित करण्यात आली आहे. 

डॉ. दीपक वालोकर यांनी सांगितले की पुणे शहर सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त श्रीमती ज्योति प्रिया सिंह या परिषदेच्या उद्घाटक व मुख्य पाहुण्या असतील आणि दैनिक सकाळ चे संपादक श्री. माधव गोखले, तसेच
रोटरी चे जिल्हा राज्यपाल शैलेश पालेकर यांची प्रमुख उपस्थिती असेल तर कर्वे समाज सेवा संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सदानंद देशपांडे हे उद्घाटन समारोहाचे अध्यक्षथान भूषवतील. रांची इंस्टीट्यूट ऑफ न्युरो सायकोट्रेट्री अॅण्ड अलायड सायन्सेस, झारखंड, चे माजी संचालक डॉ. सुप्रकाश चौधरी, ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एजुकेशन चे राष्ट्रीय बोर्ड सदस्य (आयटी) डॉ दीपक शिकरपूर, सायबर सुरक्षा विशेषज्ञ आणि सीडीएलएम रोटरी जिल्हा -3131 अध्यक्ष अॅड. वैशाली भागवत, गुड नाईट टेक केअर या सायबर गुन्ह्यावर आधारित मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. गिरीश जोशी (विषय- सायबर गुन्हे आणि सायबर सिक्योरिटी, संशोधन आणि चित्रपट निर्मिती अनुभव), लेखक श्री. अतुल कहाटे, पुणे पोलिस सायबर सेलच्या वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक सुश्री राधिका फडके, विख्यात वरिष्ठ मनोवैज्ञानिक आणि मानसिक आरोग्य व्यावसायिक डॉ वासुदेव पारळीकर, सायबर सिक्योरिटी ट्रेनर रोटरीयन कल्याणी गोखले, कर्वे समाज सेवा संस्थेच्या सीएसआर सेलचे मानद संचालक, सामाजिक कार्यकर्ते आणि परिषदेचे संयोजक डॉ. महेश ठाकूर हे विविध विषयांवर सायबर गुन्हे प्रतिबंधक जागरुकता, सायबर सुरक्षा सुनिश्चित करणे आणि चांगले मानसिक आरोग्य ‘याविषयी उपस्थिताना मार्गदर्शन करतील
परिषदेच्या संयोजन समितीमध्ये कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक व मास्वे संघटनेचे अध्यक्ष डॉ दीपक वलोकर, परिषदेचे संयोजक डॉ. महेश ठाकूर, परिषदेचे समन्वयक प्रा. चेतन दिवाण, रोटारी क्लब ऑफ पुणे वेस्ट चे अध्यक्ष
रोटरीयन श्री चारू श्रोत्री व रोटरीयन सुश्री कल्याणी गोखले यांचा समावेश आहे.

हैदराबाद मेट्रो रेलला तेलंगण व आंध्र प्रदेश या राज्यांचे राज्यपाल नरसिंहन यांनी आज दाखवला हिरवा झेंडा

0

हैदराबाद-अमीरपेट ते एलबी नगर या भागातील व्यावसायिक कार्याला सुरुवात झाल्याचे जाहीर करताना एलअँडटी मेट्रो रेल (हैदराबाद) लिमिटेडलाअतिशय आनंद होत आहे. तेलंगण व आंध्र प्रदेश या राज्यांचे राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांच्या हस्ते, तेलंगणचे एम व यूडी मंत्री केटीराम राव, तेलंगण सरकारचे मुख्य सचिव, आयएएस डॉएसके जोशी, एचएमआरएलचे व्यवस्थापकीय संचालक, आयआरएएस एनव्हीएसरेड्डी, एलअँडटी मेट्रो रेल (हैदराबाद) लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हीबी रेड्डी व अन्य मान्यवरांच्याउपस्थितीत हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सर्व मान्यवरांनी अमीरपेट ते एलबी नगर असा 16 किमीचा प्रवास केला.

हा भाग कॉरिडॉर 1 – मियापूर ते एलबी नगर (रेड लाइन) मार्गाचा भाग आहे. अमीरपेट ते एलबी नगर या भागामध्ये 16 स्थानके असून, त्याने नोव्हेंबर 2017 मध्ये दाखल झालेल्या व सध्या कार्यरत असलेल्या 30 किमीच्या (मियापूर – अमीरपेट – नागोले) मार्गामध्ये 16 किमीची भर घातली आहे. हा 16 किमीचा भाग मियापूर ते एलबी नगर असा 27 स्थानकांचा 29 किमीचा कॉरिडॉर 1 – रेड लाइन हा मार्गपूर्ण करतो.

16 स्थानके – पंजागुत्ता, इरुमंझिल, खैरताबाद, लकडी-का-पूल, असेम्ब्ली, नामपल्ली, गांधी भवन, उस्मानिया मेडिकल कॉलेज, एमजीबीएस, मलकपेट, न्यू मार्केट, मूसरामबाग, दिलखुषनगर, चैतन्यपुरी, व्हिक्टोरिया मेमोरिअल व एलबी नगर.

राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांनी नमूद केले, मी जगभरातील अनेक मेट्रोंतून प्रवास केला आहे आणि हैदराबाद मेट्रो ही जगातीलसर्वोत्तम मेट्रोंपैकी एक आहेहैदराबादकर या जगातिक दर्जाच्या सुविधेचा पूर्णतः वापर करतील आणि येत्या काही वर्षांत हैदराबाद मोठीझेप घेईलअशी अपेक्षा आहे.”

 या प्रकल्पाबद्दल आनंद व्यक्त करततेलंगणचे एम व यूडी मंत्री केटी राम राव यांनीअमीरपेट – एलबी नगर मेट्रोचे उद्घाटन केल्याबद्दल या समारंभासाठी आवर्जून वेळ दिल्याबद्दल राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांचे आभार मानले

 या निमित्ताने, एनव्हीएस रेड्डी यांनी नमूद केले, दिल्लीनंतरचे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लांब मेट्रो नेटवर्क असलेली हैदराबादमेट्रो हा पीपीपी तत्त्वावरील जगातील सर्वात मोठा मेट्रो रेल प्रकल्प आहेही सक्षम मास ट्रान्झिट सिस्टीम आहे आणि त्यामुळे भारतीयशहराचे रुपांतर एका सोयीच्याहरित शहरामध्ये करण्याची संधीही मिळणार आहेया प्रकल्पामुळे मोठे परिवर्तन येणार असूनहैदराबादच्या विकासाला चालना मिळणार आहे.”

या वेळी बोलताना, एलअँडटी मेट्रो रेल (हैदराबाद) लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हीबी रेड्डी यांनीसांगितले, हैदराबादकर या मेट्रोच्या उद्घाटनाची आतुरतेने वाट पाहत होते आणि आज अमीरपेट ते एलबी नगर या भागात मेट्रो सुरूझाल्याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतोलोकांनी हैदराबाद मेट्रो रेल सेवेचा सहर्ष स्वागत केले आहे आणि त्यासाठी आम्ही प्रत्येकाचेआभारी आहोतएलअँडटी वैशिष्ट्यपूर्ण असलेल्यातसेच राष्ट्रनिर्मितासाठी योगदान देणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील पायाभूत सुविधाप्रकल्पांसाठी प्रसिद्ध आहे.”

आजया प्रतिष्ठित प्रकल्पाच्या आणखी 16 किमी मार्गाचे उद्घाटन केल्यानेहैदराबादसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माणकरण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये आणखी एक मैलाचा टप्पा साध्य केला आहेहैदराबादचे रूपांतर एका आधुनिक  प्रवाशांसाठी सोयीच्याशहरामध्ये करण्यासाठी या प्रकल्पाला इतके महत्त्व दिल्याबद्दल आम्ही राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांचे आभारी आहोतहैदराबाद मेट्रोरेलमुळे हैदराबादमधील प्रवास सुरळीत  विनासायास होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पार्श्वभूमी:

एलअँडटी मेट्रो रेल (हैदराबाद) लिमिटेड ही तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, बांधकाम, उत्पादन व वित्तीय सेवा अशा क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व 18 अब्ज डॉलरहून अधिक उलाढाल असलेल्या भारतीय बहुराष्ट्रीय समूहाची उपकंपनी आहे.  कंपनी जगातील 30 हून अधिक देशांत कार्यरतआहे. ग्राहक-केंद्री दृष्टिकोन व सातत्याने दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न यामुळे एलअँडटीला गेली सात दशके आपल्या प्रमुख उद्योगांमध्येआघाडीचे स्थान मिळवणे व टिकवणे शक्य झाले आहे.

कात्रज कोंढवा रस्त्याचं श्रेय आ.टिळेकरांना नाहीच, हे काम राष्ट्रवादीचे -प्रकाश कदम

0

पुणे-कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम लवकरच सुरु होत असून याचे श्रेय राष्ट्रवादीचेच आहे . भाजपचे आ. टिळेकर यांनी या साठी काहीही केले नाही ते निव्वळ श्रेय लाटू पाहत आहेत असे सांगत टिळेकर यांनी या रस्त्याच्या कामासाठी काही केले नसल्याचा आरोप या भागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक प्रकाश कदम यांनी केला आहे .
कदम यांनी कात्रज येथे माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले कि,कात्रज कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसनेच पहिले आंदोलन केले ,बजेट मध्ये पहिली आर्थिक तरतूद केली.सत्तांतरानंतर तातडीने  रुंदीकरण सुरु व्हायला  हवे होते तर ते भाजपच्या कारभारामुळे टेंडर पे टेंडर प्रकरणात रखडले आणि अखेर आता स्थायी समितीत रुंदीकरणाचे टेंडर मंजूर झाले आहे मुख्य सभेतही ते होईल आणि लवकरच या रस्त्याच्या कामाला प्रारंभ होईल . मात्र हे सारे राष्ट्रवादीच्याच  प्रयत्नाने होते आहे .असे असतानाही भाजपचे आ. टिळेकर हे मात्र निव्वळ श्रेय लाटण्यासाठी दिशाभूल करत आहेत .पण कात्रजकरांना  खरी परिस्थिती ठाऊक आहे

बिबटे निघाले घोळक्याने धास्ती धरली बळीराजाने

0
ओतुर(संजोक काळदंते)-
जुन्नर तालुक्यातील अनेक गावातील शिवारात आणि गावात देखील बिबट्याचा वावर असल्याबाबत जोरदार चर्चा आहे.मात्र हे शिवारांमध्ये फिरणारे बिबटे आता एक दोन नसुन चार चार बिबटे आढळुन येत असल्याने शेतकरी वर्गासह जनता त्रस्त झाली आहे.
ओतुर, अहीनवेवाडी, चारपडाळी,सारणी, तांबेमळा ,ढमालेमळा या भागात तर आता गेली काही दिवसांपासुन दिवसा ढवळ्या बिबट्यांचे दर्शन होत आहे तसेच हे बिबटे आता घोळक्याने शेतवस्तीवर फिरु लागल्याने शेतकरी वर्गासह नागरीकांमधे भितीचे वातावरण आहे.
 ओतुर परिसरातील अमिरघाट येथे गेल्या शुक्रवारी (दि.२२) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मेंढपाळ एका ऊसाशेजारील शेतात मेंढ्या चारत असताना अचानक बिबट्याने हल्ला करुन एक मेंढी जख्मी केली तर एक मेंढा ठार करुन  ऊचलुन नेला यावेळी आरडा ओरडा झाल्याने स्थानिक शेतकरी भरत शेटे आणि ईतर शेतक-यांनी घटनास्थळी जमा होऊन बिबट्या गेलेल्या दिशेने पाठलाग केला असता त्यांना बिबट्यांचा अक्षरशः घोळकाच दिसला कधीतरी एक दोन बिबट किंवा पिल्ले आढळुन येत होती मात्र आता हे बिबटे जर असे घोळक्याने फिरत असतील तर ही गंभीर बाब असुन या भागातील शेतकरी प्रचंड भयभीत झालेले आहेत.  शेतक-याला शेती करणे आता कठिण जात असुन कधीही कोठेही बिबट्यांचे दर्शन होत असल्याने अक्षरशः या भागात शेतीसाठी मजुर देखील सहजासहजी मिळत नाहीत असे या वेळी भरत शेटे या शेतक-याने सांगितले.
सदर घटना घडल्यावर येथिल शेतक-यांनी वनविभागाला हा प्रकार कळविला असता वनविभागाचे विशाल अडागळे , वनमजुर फुलचंद खंडागळे हे घटणास्थळी पोहोचले व पाहणी केली असता तेथे बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळुन आले असल्याचे अडागळे यांनी सांगितले.
पट्टेरी वाघ असल्याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होती मात्र या भागात पट्टेरी वाघ नाही जर असते तर त्यांनी बिबट्यांनाही आपली शिकार केले असते तसेच जर पट्टेरी वाघ बघीतला असे वाटत असेल तर तरस असण्याची शक्यता आहे असे वनविभागाकडुन सांगण्यात आले.मात्र चार चार बिबट्यांचे जर घोळके नागरी वस्ती जवळ वास्तव्य करीत असतील तर ही चिंतेची बाब आहे वनविभागाने यावर काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे.शेतकरी व नागरीकांना वनविभागाकडुन जनजागृतीपर सुचना देण्याबाबत देखील विचार व्हायला हवा असे मत जयप्रकाश डुंबरे यांनी व्यक्त केले आहे.

‘इग्नाइट ३.०’मध्ये ‘रायसोनी’चे विद्यार्थी चमकले

0

पुणे : नागपूर येथे आयोजिलेल्या ‘इग्नाइट ३.०’ या स्टार्टअप स्पर्धेत वाघोली येथील जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील मयूर आंबेगावकर व मंगेश अंबुरे यांनी चमकदार कामगिरी केली. ‘थायफ़ॅबेल्स’ या विषयावर विद्यार्थ्यांनी स्टार्टअपचे सादरीकरण केले. या स्पर्धेच्या परीक्षणासाठी आयआयएम नागपूर आणि आयआयटी खरगपूर येथील तज्ज्ञ आले होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्टार्टअपची सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या स्टार्टअपला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संचालक डॉ. के के पळीवाल, उपसंचालक डॉ. पी. बी. नगरनाईक, अधिष्ठाता डॉ. वैभव हेंद्रे, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख सिमरन खियानी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

जुने एटीएम कार्ड नि:शुल्क बदलून घ्या – बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहकांना आवाहन

0

पुणे-बँक ग्राहकांचे जुने मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड, नव्याईएमव्ही चिप आधारित एटीएम कम डेबिट कार्डाने बदलून देण्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना सूचना दिल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या परिपत्रकाप्रमाणे दिनांक 31 डिसेंबर 2018 पूर्वी जुनी मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कार्ड नवे ईएमव्ही चिप आधारित एटीएम कम डेबिट कार्डाद्वारे बदलून द्यावेत असे कळविले आहे. या नव्या ईएमव्ही चिप आधारित एटीएम कम डेबिट कार्डाच्या दर्शनी भागाच्या डाव्या बाजूस चिप बसवली गेलेली आहे.

दिनांक 31 डिसेंबर 2018 नंतर सर्व जुनी मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड निष्क्रिय केली जाणार असल्याने त्याचा वापर ग्राहकांना करता येणार नाही.

रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचे पालन करण्याच्या अनुषंगाने बँक ऑफ महाराष्ट्र त्यांच्या सर्व सन्माननीय ग्राहकांना त्यांचे जुने मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड बँकेत जमा करून त्या बदल्यात ईएमव्ही चिप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड घेण्याची विनंती करत आहे. हे नवे कार्ड ग्राहकांना नि:शुल्क बदलून दिले जाईल. नवे चिप आधारित कार्ड घेण्यासाठी ग्राहक बँक ऑफ महाराष्ट्रच्या कोणत्याही सोईस्कर शाखेत जाऊन नवे कार्ड प्राप्त करू शकतात त्यामुळे ग्राहकांना त्यांचे खाते असणार्‍या शाखेतच जाण्याची आवश्यकता नाही.

नवे ईएमव्ही चिप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड जुन्या मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कम डेबिट कार्डाच्या बदल्यात घेण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने त्यांच्या ग्राहकांना एसएमएसद्वारे तसेच एटीएममध्ये पोस्टर्सच्या प्रदर्शनाने आणि एटीएम स्क्रिन्सवरील संदेशाद्वारे कळविले आहे.     

निर्माल्यनिर्मित खताचे ‘रोटरी’तर्फे मोफत वाटप

0
पुणे : गणेशोत्सवात संकलित झालेल्या निर्माल्यापासून बनवलेल्या खताचे मोफत वाटप रोटरी क्लबतर्फे करण्यात येणार आहे. गणेशोत्सवादरम्यान गणेश पूजनासाठी मोठ्या प्रमाणावर फुले,फळे,नारळ यांचा वापर होतो व याचे निर्माल्य होते. या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याचा उपक्रम रोटरी क्लब युवा, ओपेल पोस्क्रो व वेस्ट वुड इस्टेट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला होता. पटवर्धनबाग येथील टँकर पॉईन्ट राबविलेल्या या उपक्रमात जवळपास १३५ टन निर्माल्याचे खत बनवण्यात आले आहे. १ ऑक्टोबरनंतर नागरिकांना हे खत घेऊन जाता येणार आहे.
रोटरी युवाचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, माजी प्रांतपाल अभय गाडगीळ, मनोज धारप, माजी अध्यक्ष अजय कुलकर्णी, सचिव गोपाळ निर्मल, नगरसेवक जयंत भावे, नगरसेवक माधुरी सहस्रबुद्धे यांच्यासह अनेकानी या उपक्रमात सहभाग घेतला. प्रा. मेधा कुलकर्णी यांनी उपक्रमाचे कौतुक करतानाच हा उपक्रम अतिशय उपयुक्त असून तो केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित न ठेवता वर्षभर राबवावा, असे सांगितले. श्रीकांत जोशी म्हणाले, रोटरी युवा गेली अनेक वर्ष हा उपक्रम राबवत असून, तासाला दोन टन अशी या श्रेडींग मशीनची क्षमता आहे. यातून निर्माण झालेले खत व्यवस्थित पॅकींग करून नागरिकांना मोफत वाटण्यात येते.

‘रावण- राजा राक्षसांचा’ कादंबरीचे मंजुळेंच्या हस्ते शनिवारी प्रकाशन

0

पुणे : उद्योजक शरद तांदळे लिखित आणि न्यू इरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित ‘रावण- राजा राक्षसांचा’ या कादंबरीचे प्रकाशन येत्या शनिवारी (दि. २९ सप्टेंबर २०१८) सायंकाळी ५.०० वाजता होणार आहे. जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिरात होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक व कवी नागराज मंजुळे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव, उद्योजक प्रवीण गायकवाड, विचारवंत राजकुमार घोगरे, चिंतन ग्रुपचे अभिनंदन थोरात आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आतापर्यंत रावणाला आपण सर्व खलनायक म्हणूनच ओळखतो. पण त्याची दुसरी बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. रावणाचे आयुष्य रोमहर्षक प्रसंगी आणि चित्तथराक कर्तृत्वाने भरलेले आहे. स्वतःच्या हिमतीवर देवाधिदेवाना पराभूत करून आणि सीतेचे अपहरण करूनही तिचा सन्मान ठेवणारा रावण खलनायक की महानायक हे या कादंबरीतून शोधण्याचा प्रयत्न केला असल्याचे लेखक शरद तांदळे यांनी सांगितले.

प्रजनन अक्षमतेविषयीच्या गैरसमजांचे निराकरण

0

पुणे- प्रजनन अक्षमता ही जगभरात वाढत चाललेली समस्या आहे. भारतात सुमारे 10 ते 15 टक्के विवाहित दाम्पत्यांना नैसर्गिकरित्या मूल होत नाही. त्यांच्यापैकी केवळ 1 टक्का इतकेच इनव्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) किंवा अन्य उपचारांकडे वळतात. गर्भधारणेसाठी असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी – आर्ट)यासारख्या एखाद्या तंत्राची मदत घेण्याचे हे प्रमाण आता मात्र वाढत चालले आहे.

इनव्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) या पध्दतीत स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचा प्रयोगशाळेत संयोग घडवून आणतात आणि त्यातून निर्माण होणारे भ्रूण स्त्रीच्या गर्भाशयातरुजवले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये या आयव्हीएफ पध्दतीच्या यशाचे प्रमाण वाढत चाललेले आहे. असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (आर्ट) या तंत्रज्ञानामुळे हे साध्य झाले आहे. आयव्हीएफला मिळालेल्या यशाची अनेक उदाहरणे असली, तरी या पध्दतीविषयी अनेक गैरसमज आढळतात. त्यातील काहींचे निराकरण करण्याचा केलेला हा प्रयत्न ..

गैरसमज : गर्भधारणेच्या प्रक्रियेमध्ये पुरुषाचे वय कितीही असले, तरी चालते.

– केवळ स्त्रियांच्या शरीरातच जैविक बदल होत असतात, हा समज चुकीचा असल्याचे अभ्यासाअंती दिसून आले आहे. नैसर्गिकपणे वा आयव्हीएफद्वारे मूल हवे असले, तर स्त्रीच्याबरोबरीने पुरुषाचे वयदेखील महत्त्वाचे ठरते.

पुणे येथील नोव्हा आयव्हीआय फर्टिलिटी केंद्रातील फर्टिलिटी कन्सल्टंट डॉ. करिष्मा डफळे यांच्या म्हणण्यानुसार, प्रजनन अक्षमता वा अयशस्वी ठरलेल्या आयव्हीएफ प्रक्रियेमध्येपुरुषांच्या वयाचा संबंध असतो, हे संशोधनातून सिध्द झाले आहे. पुरुषांचे वय वाढते, तसे त्यांच्या शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते. वय वाढलेल्या पुरुषाकडून गर्भधारणा होण्यातबराच वेळ लागतो. स्त्रीचे वय कितीही असले, तरी पुरुषाचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त असल्यास गर्भपात होण्याचे प्रमाण वाढते, असे दिसून आले आहे. पुरुषांच्या वयाच्या वाढीबरोबरचत्यांच्यातील शुक्राणूंची संख्या कमी होते व त्यांची गुणवत्ताही कमी होते. आयव्हीएफ उपचार घेणाऱ्या दाम्पत्यामध्ये पुरुषाचे वय 41 किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर तो उपचारअयशस्वी होण्याचे प्रमाण पाच पटींनी वाढते, असा आमचा अनुभव आहे. प्रजनन अक्षमतेमध्ये पुरुषांमुळे लागू होणाऱ्या कारणांची टक्केवारी 40 ते 45 इतकी आहे.

गैरसमज : आयव्हीएफ पध्दतीने स्त्रियांना कोणत्याही वयात गर्भधारणा होऊ शकते.

– एन्डोमेट्रिओसिस किंवा प्रजनन अक्षमतेच्या अन्य कारणांमुळे गर्भधारणेमध्ये अडथळे येत असतील, तर ते आयव्हीएफ पध्दतीमध्येही येऊ शकतात. आयव्हीएफ उपचारांचे यश हेस्त्रीबीज आणि शुक्राणू यांच्या गुणवत्तेबरोबरच इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असते. संबंधित स्त्रीच्या गर्भाशयाची अवस्था किंवा एन्डोमेट्रियमची स्वीकृती, फॅलोपियन ट्यूब्जचीस्थिती आणि इतर जैविक व हार्मोन्सविषयक कारणे यामध्ये लागू होतात. स्त्रीचे वय वाढल्यावर यात गुंतागुंतही वाढते. त्यामुळे गर्भधारणा व्यवस्थित झाली तरी गरोदरपणातजोखीम वाढलेली राहते. त्यामुळेच स्त्रीने गरोदरपणाचे नियोजन शक्यतो लवकर करणे महत्त्वाचे आहे. प्रजनन अक्षमता असल्याचे निदान झाल्यावर दाम्पत्याने उपचार घेण्यातदिरंगाई करू नये.

 गैरसमज : आयव्हीएफमुळे शंभर टक्के यश मिळते, मात्र एकदा अपयश आल्यास पुन्हा आशेला स्थान नाही.

– 35 वर्षाखालील वय असलेल्या स्त्रियांना आयव्हीएफ उपचारामुळे येश मिळण्याचे प्रमाण 50 ते 60 टक्के आहे. वय वाढते, तशी यशाची शक्यता कमी होत जाते. उपचार घेऊइच्छिणाऱ्या दाम्पत्याची काटेकोर तपासणी केल्यावर त्याला कोणते उपचार कसे द्यायचे हे ठरविण्यात येते. नेमक्या कोणत्या कारणांमुळे या दाम्पत्याला प्रजनन अक्षमतेला तोंडद्यावे लागत आहे, हे समजून घेण्यात येते. जितकी जास्त माहिती मिळेल, तितकी आयव्हीएफ उपचाराच्या यशाची जास्त हमी मिळते.

आयव्हीएफच्या यशाबद्दल डॉ. करिश्मा डफळे म्हणाल्या, आयव्हीएफ उपचार घेण्यास आलेल्या दाम्पत्याशी अगोदर चर्चा करून संपूर्ण प्रक्रिया समजावून दिली जाते. तसेच यापध्दतीतील यशापयशाची शक्यता दाखवून दिली जाते. त्यामुळे दाम्पत्याला आयव्हीएफ उपचाराची संपूर्ण माहिती मिळते. काही वेळा आयव्हीएफचा प्रयत्न पहिल्यांदाफसल्यानंतर दाम्पत्य निराश होते व या उपचाराचा नाद सोडून देते. हे टाळण्यासाठी या समुपदेशनाचा उपयोग होतो. दाम्पत्याचे वय, त्यांच्या स्त्रीबीजाची वा शुक्राणूंची गुणवत्ता, गर्भाशयाचे आरोग्य ही आयव्हीएफ उपचार यशस्वी वा अयशस्वी होण्यामागची कारणे लक्षात घेतली व ती अयोग्य असल्यास त्यांवर उपचार घेतले, तर नंतर आयव्हीएफ उपचारयशस्वी होण्याची शक्यता जास्त राहते.

गैरसमज : आयव्हीएफ उपचारांमध्ये केवळ दात्यांचीच बिजे वापरली जातात

– आयव्हीएफ उपचारांमध्ये सर्वसाधारणपणे पत्नीचे स्त्रीबीज आणि पतीचे शुक्राणू यांचाच संयोग घडवून आणला जातो. अपवादात्मक परिस्थितीत दात्यांचा उपयोग केला जातो. स्त्रीबीजाचे अथवा शुक्राणूंचे प्रमाण कमी असेल, तरीही काही वेळेस त्या स्त्रीला गर्भधारणा होऊ शकते. त्यामुळे ती संधीही घेण्यात येते. दाम्पत्याचे वय जास्तच उलटून गेलेले असेल, गर्भाशयाचे आरोग्य ठीक नसेल, स्त्रीची रजोनिवृत्ती झालेली असेल, अथवा पुरुषावर काही विशेष शस्त्रक्रिया केल्यानंतरही त्याच्या वीर्यामध्ये शुक्राणू नसतील, तरच अशापरिस्थितीत स्त्रीबीज वा शुक्राणू यांचे दान करणाऱ्या परक्या व्यक्तीचा विचार करण्यात येतो. याचा निर्णय घेण्याअगोदर अर्थातच संबंधित दाम्पत्याचे समुपदेशन करण्यात येते वत्यांची संमती मिळवण्यात येते.

गैरसमज : गोठवलेल्या भ्रुणापेक्षा नवीन भ्रूण अधिक परिणामकारक असते व ते चांगले रुजते.

– प्रजननात आवश्यक असणाऱ्या घटकांबाबत अनेक गैरसमज समाजात आढळतात. यातील एक सर्वसाधारणपणे आढळणारा गैरसमज म्हणजे स्त्रीबीज व शुक्राणू यांच्या संयोगझाल्यानंतरचे भ्रूण हे गोठवून ठेवले तर त्याची गुणवत्ता कमी होते, ते गर्भाशयात रुजणे कठीण असते. वास्तविकतः, गोठवलेले भ्रूण आणि नव्यानेच निर्माण झालेले भ्रूण ही दोन्हीगर्भाशयात रुजण्यात सारखीच असतात, असे डॉ. करिष्मा डफळे यांनी सांगितले.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे, गोठवलेल्या भ्रुणाची गुणवत्ता ही संबंधित दाम्पत्याचे वय, त्यांच्या बिजांचा दर्जा यांवर अवलंबून असते. भ्रूण सुरक्षित राहण्याकरीता तेव्हिट्रिफिकेशन या प्रक्रियेतून गोठवून ठेवण्यात येते. ते तसे काही वर्षे राहू शकते. सामाजिक वा वैद्यकीय कारणांमुळे एखाद्या दाम्पत्याला बाळ लगेच जन्माला घालायचे नसेल, तरत्यांना त्यांचे स्त्रीबीज व शुक्राणू ही बिजे गोठवून ठेवण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यांच्या नंतरच्या आयुष्यात ही बिजे आयव्हीएफच्या माध्यमातून रुजवून त्या स्त्रीला मातृत्वाचाआनंद देणे शक्य असते. अशा गोठवलेल्या बिजांचे रुजणे बऱ्याचदा यशस्वी ठरत असते.

गैरसमज : आयव्हीएफमुळे नेहमी जुळीच जन्माला येतात.

– नैसर्गिक बाळंतपणात जेवढी जुळी मुले जन्माला येतात, त्यापेक्षा आयव्हीएफ उपचारामधून जुळी जन्माला येण्याचे प्रमाण जास्त आहे, हे खरे. तथापि आर्ट या तंत्रज्ञानामुळे हेप्रमाण कमी करण्यात येश आले आहे, हेही खरे.

या संदर्भात डॉ. करिष्मा डफळे म्हणाल्या, प्रजनन अक्षमता यासाठी एखादे दाम्पत्य उपचार घेत असेल, तर त्यांना जुळी मुले होण्याची शक्यता 25 ते 30 टक्के असते. याचे कारण, आयव्हीएफ या उपचारामध्ये मल्टीपल ओव्ह्युलेशन हे तंत्र वापरले जाते. यात साधारणतः तीन निरोगी भ्रूण गर्भाशयात रुजविली जातात. या तीनपैकी कोणतीही दोन व्यवस्थितरुजतील अशी आशा असते. अनेकदा दोन्ही रुजून जुळी मुले जन्म घेतात. मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे

एकच निरोगी भ्रूण रुजविणे शक्य झाले आहे. त्यामुळे जुळी जन्माला येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.

 गैरसमज : आयव्हीएफमधून जन्मलेल्या मुलांमध्ये जम्नजात दोष वा विकृती असते.

– उलटपक्षी, अत्याधुनिक आर्ट या तंत्रज्ञानातील प्रीइम्प्लॅन्टेशन जेनेटिक स्क्रीनिंग (पीजीएस) आणि प्रीइम्प्लॅन्टेशन जेनेटिक डायग्नोसिस (पीजीडी) या तंत्रांच्या माध्यमातूनबिजांची तपासणी करून अनुवंशिक दोष वा विकृती शोधून काढण्याची चांगली सोय झाली आहे. त्यामुळे भ्रूण गर्भाशयात रुजवण्याअगोदरच त्यातील दोषांचे निदान करणे व त्यायोगेकेवळ चांगले, निरोगी भ्रूण रुजविणे शक्य झाले आहे. त्यामुळे निरोगी व जन्मजात दोष नसलेली मुले जन्माला येण्याची जास्त शक्यता निर्माण झाली आहे. खरे तर गुणसूत्रांमध्येदोष असल्याने 50 टक्के गर्भपात होतात. तसेच सदोष गुणसूत्रांमुळे बाळांमध्ये जन्मजात दोष निर्माण होतात. हे गुणसुत्रांमधील दोष अगोदरच ओळखण्याचे तंत्र विकसीत करण्याचेप्रयत्न वैद्यकीय तज्ज्ञ करीत आहेत. याकामी पीजीएस आणि पीजीडी या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे.

गैरसमज : प्रजनन अक्षमता ही एक स्वतंत्र, एकटी समस्या असते.

– प्रजनन अक्षमता ही समस्या आरोग्याशी संबंधित इतर अनेक कारणांमुळेही उदभवते. लठ्ठपणा, मधुमेह आणि कर्करोग यांच्याशी प्रजनन अक्षमतेचा जवळचा संबंध असतो. कर्करोगावरील उपचारांमुळे स्त्रियांमध्ये प्रजनन अक्षमता वाढते. कर्करोगविरोधी औषधांमुळे शुक्राणू व स्त्रीबीज यांची गुणवत्ता व संख्याही कमी होते. त्यामुळे स्त्री व पुरुष यांच्याप्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. स्त्रियांच्या शरीरात मुळातच स्त्रीबीज ठराविक प्रमाणातच निर्माण होते. त्यात केमोथेरपी व रेडिओथेरपीमुळे या स्त्रीबीजाचे थोडे वा संपूर्णनुकसान होते.

मूल जन्माला घालण्याच्या वयातील तरुण स्त्रियांना जेव्हा कर्करोगाचे निदान होते, त्यावेळी त्यांना वेळीच अंडी (जोडीदार नसलेल्या स्त्रियांसाठी) किंवा भ्रूण (विवाहित महिलांसाठी) गोठविण्याचा सल्ला द्यायला हवा. त्यायोगे कर्करोगावरील उपचार घेतल्यानंतर त्यांना आपण प्रजननासाठी अक्षमअसल्याचे समजल्यास या गोठवलेल्या बिजांचा उपयोग करूनघेऊन मातृत्वाचा आनंद घेता येईल. पुरुषांमध्ये कर्करोगावरील उपचार घेऊन झाल्यानंतर शुक्राणू निर्मितीची प्रक्रिया पुन्हा सुरळीत होते. अर्थात काही पुरुषांमध्ये शुक्राणुंचीगुणवत्ता घसरते. अशावेळी कर्करोगावरील उपचारांपूर्वी त्यांचे शुक्राणू गोठवून ठेवल्यास त्यांना नंतर त्याचा लाभ घेता येईल. ही शुक्राणू वा स्त्रीबीज गोठववून ठेवण्याची प्रक्रिया फारखर्चिकही नसते. तसेच केवळ कर्करोगावरील उपचार घेणाऱ्यांपुरताच हा मार्ग लागू नाही, तर इतरही आजारांवर उपचार घेणाऱ्यांना हा मार्ग अनुसरता येईल.

नोव्हा आयव्हीआय फर्टिलिटीविषयी ..

नोव्हा आयव्हीआय फर्टिलिटी (एनआयएफ) ही भारतात प्रजनन क्षमता निर्मिती क्षेत्रात सर्वात मोठी सेवा देणारी संस्था आहे. असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (एआयटी – आर्ट) हेअत्याधुनिक तंत्रज्ञान स्पेनमधील आयव्हीआय या संस्थेच्या सहकार्याने भारतात आणण्याचे एनआयएफचे उद्दीष्ट आहे. या भागीदारीमुळे नोव्हाच्या आयव्हीएफ सेवांमध्ये वतंत्रज्ञानामध्ये मोलाची भर पडणार आहे. या तंत्रज्ञानाच्या सॉफ्टवेअरवरील स्वामित्व, प्रशिक्षण व गुणवत्ता व्यवस्थापन यांचा लाभही एनआयएफला होणार आहे. आयव्हीआयकडील नैपुण्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रचंड अनुभव यांच्या सहयोगाने एनआयएफ भारतात तशीच जागतिक दर्जाची सेवा व धोरणे यांचा अवलंब करणारआहे.

आययूआय, आयव्हीएफ आणि अॅन्ड्रॉलॉजी या सेवा देण्याबरोबरच एनआयएफ ही संस्था भ्रूण व बीज साठवणुकीसाठीचे व्हिट्रिफिकेशन हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरते. तसेच भ्रूणस्वीकृत करण्यासाठी गर्भाशयाची क्षमता व योग्य वेळ आहे, हे तपासण्यासाठीचे इआरए तंत्रज्ञान, त्याचबरोबर भ्रूण गर्भाशयात रुजवण्यासाठीची पीजीएस व पीजीडी ही तंत्रेएनआयएफ उपयोगात आणते. ज्या रुग्णांमध्ये आयव्हीएफचे उपचार यापूर्वीअयशस्वी झाले आहेत, त्यांच्यासाठीही लाभदायक ठरू शकतील, अशा या प्रक्रिया आहेत. एनआयएफची सध्या देशात 20 केंद्रे आहेत. बंगळूरमध्ये 3, मुंबई, अहमदाबाद, नवी दिल्ली येथे प्रत्येकी 2 आणि चेन्नई, कोईमतूर, हिस्सार, हैदराबाद, इंदूर, जालंधर, कोलकता, लखनौ, पुणे, सूरत व विजयवाडा येथे प्रत्येकी 1 अशी ही केंद्रे सुरू आहेत.

एन्जिओप्लास्टी साठी भारतीय बनावटीचा ‘सुप्राफ्लेक्स स्टेंट’ क्लिनिकली सुरक्षित

0

भारतात दरवर्षी ५००००० हून अधिक स्टेंट वापरले जातात

मुंबई-:- सुप्राफ्लेक्स हा भारतात डिझाइन व निर्मिती केलेला कार्डिअॅक ड्रग एल्युटिंग स्टेंट अॅबॉटच्या झाएन्सच्या तोडीचा असल्याचे ‘टॅलेण्ट’ या तपास-आधारित पाहणीमध्ये स्पष्ट झाले आहे. जगातील नामवंत कार्डिऑलॉजिस्ट डॉ. पॅट्रिक सेरूइस हे टॅलेण्ट चाचणीसाठीच्या अभ्यासाचे अध्यक्ष होते. टॅलेण्ट चाचणीतील निष्कर्ष ट्रान्सकॅथेटर कार्डिओव्हस्क्युलर थेरपेटिक्स २०१८ (टीसीटी) या अमेरिकेतील सॅनडिएगो येथे सध्या सुरू असलेल्या सर्वात मोठ्या जागतिक कार्डिऑलॉजी परिषदेतील ‘लेट ब्रेकिंग ट्रायल सेशन’ मध्ये सादर करण्यात आले. ही चाचणी यूके, नेदरलँड्स, पोलंड, स्पेन, इटली, हंगेरी व बल्गेरिया या सात युरोपीय देशांमधील २३ नामांकित केंद्रांवर घेण्यात आली व त्यासाठी नमुन्याची संख्या १४३५ रुग्ण इतकी होती. ड्रग एल्युटिंग स्टेंटसाठी सुरक्षित जागितक प्रमाण म्हणून झाएन्सकडे पाहिले जाते.

भारतात दरवर्षी ५००००० हून अधिक स्टेंट वापरले जातात. कार्डिअॅक स्टेंट हे धमन्यांमध्ये निर्माण झालेला अडथळा दूर करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण आहे. करेक्टिव्ह सर्जरीनंतर धमनी पुन्हा अरुंद होण्याची घटना गडण्याची शक्यता कमी करण्यासाठी मदत करेल, अशा औषधाचे आवरण ड्रग एल्युटिंग स्टेंटना दिलेले असते.

टॅलेण्ट चाचणीचे निष्कर्ष सादर करत असताना डॉ. पॅट्रिक सेरूइस म्हणाले, “ऑल-कॉमर्स पॉप्युलेशनच्या संदर्भात, अल्ट्रा-थिन स्ट्रट्स व बायोडिग्रेडेबल पॉलिमर या बाबतीत सुप्राफ्लेक्स एसईएसची सुरक्षितता व परिणामकारकता यांची तुलना झाएन्स ईईएसशी करण्यात आली. ऑल-कॉमर्स पॉप्युलेशनच्या संदर्भात, १२ महिन्यांतील डीओडीसी (डिव्हाइस ओरिएंटेड एंड पॉइंट्स) या बाबतीत सुप्राफ्लेक्स हे झाएन्सच्या तुलनेत निकृष्ट नसल्याचे आढळले व प्रत्येक प्रोटोकॉल अॅनालिसिसमध्ये सीआय-टीएलआर चे प्रमाण कमी आढळले.”

भारतातील एक प्रख्यात कार्डिऑलॉजिस्ट पद्मश्री डॉ. उपेंद्र कौल हे अभ्यासाचे सह-अध्यक्ष होते. पाहणीविषयी बोलताना ते म्हणाले, ‘’भारतात निर्माण केल्या जाणाऱ्या स्टेंटच्या तुलनेत परदेशातील स्टेंट दर्जेदार असतात असा समज होता. आपली उपकरणे अन्य कोठेही तयार झालेल्या उपकरणांच्या तोडीची असल्याचे क्लिनिकल चाचण्यांमधून सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान भारतीय उत्पादकांपुढे होते. सकारात्मक निष्कर्ष दाखवणारी व स्पर्धकांच्या तुलनेत उत्तम परिणामकारकता असल्याने वैशिष्ट्यपूर्ण ठरणारी टॅलेण्ट ही पहिली चाचणी ठरली आहे.’’

टॅलेण्ट चाचणीसाठी प्रमुख प्रा. आर.दे विंटर, व्यवस्थापकीय संचालक, अॅकाडेमिश्च मेडिश्च सेंट्रम, अॅम्स्टरडॅम, द नेदरलँड्स; आणि ए. झामन, व्यवस्थापकीय संचालक, कार्डिअॅक कॅथेटर लॅबोरेटरीज, रॉयल फ्रीमॅन, न्यूकॅसल, यूके हे होते. टॅलेण्ट चाचणीमध्ये रुग्णाचे सरासरी वय ६५ वर्षे होते आणि पाऊण रुग्ण पुरुष होते, अंदाजे ४० टक्के  रुग्णांमध्ये स्टेबल अँजिना व ६० टक्के रुग्णांमध्ये अॅक्युट कोरोनरी सिंड्रोम्स (एसीएस) होते. १२ महिन्यांतील कार्डिअॅक मृत्यूंचा डिव्हाइस-ओरिएंटेड कम्पोझिट एंडपॉइंट, टार्गेट-व्हेसल एमआय व क्लिनिकली इंडिकेटेड टीएलआर यांचे प्रमाण सुप्राफ्लेक्सच्या बाबतीत ४.९ टक्के  होते आणि झाएन्सच्या बाबतीत ५.३ टक्के होते, या तफावतीमुळे, तुल्यबळ असणे हा निकष पूर्ण झाला.

एसएमटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश सबत  यांनी सांगितले, “ कोरोनरी स्टेंट उद्योगासाठी टॅलेण्ट पाहणीचे निकाल अतिशय महत्त्वाचे आहेत. या पाहणीचे यश मेक इन इंडियाशी सुसंगत आहे. गुंतागुंतीच्या व आधुनिक जीवनरक्षक तंत्रज्ञान उद्योगामध्ये भारताचे नाव निर्माण करू शकल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. कोरोनरी स्टेंट उद्योगातील आघाडीची जागतिक कंपनी बनण्याचे आमचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही आता अधिक सक्षम झालो आहोत.”

सुप्राफ्लेक्स जगभरातील ६५ हून अधिक देशांत उपलब्ध आहे आणि ते एसएमटी (सहजानंद मेडिकल टेक्नालॉजिज) या भरतातील सर्वात मोठ्या स्टेंट उत्पादकाचे सर्वाधिक विकले जाणारे ड्रग एल्युटिंग स्टेंट आहे. सुप्राफ्लेक्समध्ये आधुनिक वैशिष्ट्ये आहेत, जसे जैवविघटनशील पॉलिमर व अल्ट्राथिन स्ट्रट (60µm) थिकनेस, या तुलनेत झाएन्सचे 81 µm स्ट्रट थिकनेस व बायोस्टेबल पॉलिमर कोटिंग. टॅलेण्ट क्लिनिकल स्टडीचे निकाल प्रकाशित मेटा-अॅनालिसिसशी जुळणारे, तसेच लोअर स्ट्रट थिकनेसचे फायदे अधोरेखित करणारे आहेत.

बहुजन समाज पार्टीच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रामधील कार्यकर्ता मेळावा संपन्न

0

पुणे-बहुजन समाज पार्टीची ताकद मजबूत तयार करून जास्तीत जास्त आमदार खासदार निवडून आणाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला समाजाचा विकास आपण बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून पुढे चालवू या असे आवाहन बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी सुरेश साखरे यांनी केले .

पुणे स्टेशनजवळील रमाई आंबेडकर रोड (ताडीवाला रोड)येथे सभागृहात बहुजन समाज पार्टीच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रामधील कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला . त्यावेळी ते बोलत होते .या मेळाव्यास बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी प्रमोद रैना ना. तू. खंदारे ऍड. संजीव सदाफुले महाराष्ट्र प्रदेश  सचिव संजय वाघमारे काळुराम चौधरी पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी बापूसाहेब कुदळे महाराष्ट्र प्रदेश सचिव किरण आल्हाट पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब आवारे पुणे शहर अध्यक्ष सुदीप गायकवाड सातारा जिल्हा अध्यक्ष आनंद थोरवडे सांगली जिल्हा अध्यक्ष शंकर माने कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अजय कुरणे ,अहमदनगर जिल्हा अध्यक्ष उमाशंकर यादव आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते . बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी सुरेश साखरे यांनी सांगितले किदेशाचे संविधान बदलण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत परंतु हे प्रयत्न अयशस्वी करण्यासाठी बहन मायावती यांना पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वानी एकजूटीने बहुजन समाज पार्टीचे काम एकदिलाने केले पाहिजे . बहुजन समाज पार्टीने स्वाभिमानी नेर्तृत्व तयार केले . परंतु आपले काही लोक अन्य राजकीय पक्षाचे चमचे झाले तेव्हापासून समाज हा विकासापासून वंचित राहिला . त्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सेक्टर बूथ जोमाने तयार करा . ज्याचे खाऊ मटण त्याचे दाबू बटण अशी चूक बहुजनांनी करू नये . त्यासाठी पुण्यातून बहुजन समाज पार्टीचा खासदार व आमदार निवडून आणण्यासाठी कामाला  लागावे.असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी प्रमोद रैना यांनी देखील मार्गदर्शन केले . मेळाव्याचे प्रास्ताविक बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव किरण आल्हाट यांनी केले  तर सूत्रसंचालन  पुणे शहर अध्यक्ष सुदीप गायकवाड यांनी केले आभार पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब आवारे यांनी मानले .

आनंदवनाचा ‘विकास’चे शनिवारी होणार प्रकाशन

0
पुणे : बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी उभारलेल्या ‘आनंदवना’ला पुढे नेण्याचे काम डॉ. विकास बाबा आमटे यांनी केले. त्यांच्यासह आमटेंची तिसरी पिढी आता आनंदवनात कार्यरत आहे. आनंदवनातील त्यांचे कार्य व त्यांनी राबवलेल्या विविध प्रयोगांची कहाणी डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी ‘आनंदवनाचा ‘विकास” या पुस्तकात मांडली असून, विश्वकर्मा पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलमध्ये शनिवार, दि. २९ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५.०० वाजता बाणेर रस्त्यावरील यशदा येथे डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात विकास आमटे यांच्यासह डॉ. भारती आमटे (पत्नी) व डॉ. शीतल आमटे (कन्या) यांच्याशी संवाद साधण्यात येणार असून, डॉ. मंदार परांजपे त्यांच्याशी संवाद साधतील. तसेच डॉ. जयश्री तोडकर आणि संतोष शेणई लिखित ‘ओबेसिटी मंत्रा’ याही पुस्तकाचे प्रकाशन यावेळी होणार आहे, अशी माहिती पब्लिकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी दिली आहे.

ऊदयनराजे यांच्या उमेदवारीला कोणाचाही विरोध नाही : शरद पवार

0

पुणे- राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. या आमदारांनी माझी भेट घेतल्यानंतर ज्या बातम्या आल्या, त्याचे मला आश्चर्य वाटले, असेही पवार यांनी सांगितले.

उदयनराजे यांच्या उमेदवारीचा विषय गेले तीन दिवस गाजतो आहे. साताऱ्यातील आमदारांनी काल पवार यांची बारामती येथे भेट घेतली होती. त्यानंतर उदयनराजे यांनीही पवार यांची आज पुन्हा पुण्यात भेट घेतली. त्यावर विविध तर्क मांडण्यात आले.

याबाबत पुण्यात बोलताना पवार म्हणाले की उदयनराजे यांच्या उमेदवारीला एकाही आमदाराने विरोध केलेला नाही. सर्वजण मिळून पुढील आठ दिवसांत यावर निर्णय घेऊ. त्यासाठी सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष यांच्यासह लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या खेळीमेळीच्या वातावरणात या बैठका घेऊ आणि निर्णय करू असेही त्यांनी नमूद केले.