पुणे : उद्योजक शरद तांदळे लिखित आणि न्यू इरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित ‘रावण- राजा राक्षसांचा’ या कादंबरीचे प्रकाशन येत्या शनिवारी (दि. २९ सप्टेंबर २०१८) सायंकाळी ५.०० वाजता होणार आहे. जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिरात होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक व कवी नागराज मंजुळे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव, उद्योजक प्रवीण गायकवाड, विचारवंत राजकुमार घोगरे, चिंतन ग्रुपचे अभिनंदन थोरात आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आतापर्यंत रावणाला आपण सर्व खलनायक म्हणूनच ओळखतो. पण त्याची दुसरी बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. रावणाचे आयुष्य रोमहर्षक प्रसंगी आणि चित्तथराक कर्तृत्वाने भरलेले आहे. स्वतःच्या हिमतीवर देवाधिदेवाना पराभूत करून आणि सीतेचे अपहरण करूनही तिचा सन्मान ठेवणारा रावण खलनायक की महानायक हे या कादंबरीतून शोधण्याचा प्रयत्न केला असल्याचे लेखक शरद तांदळे यांनी सांगितले.
‘रावण- राजा राक्षसांचा’ कादंबरीचे मंजुळेंच्या हस्ते शनिवारी प्रकाशन
Date: