पुणे : बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी उभारलेल्या ‘आनंदवना’ला पुढे नेण्याचे काम डॉ. विकास बाबा आमटे यांनी केले. त्यांच्यासह आमटेंची तिसरी पिढी आता आनंदवनात कार्यरत आहे. आनंदवनातील त्यांचे कार्य व त्यांनी राबवलेल्या विविध प्रयोगांची कहाणी डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी ‘आनंदवनाचा ‘विकास” या पुस्तकात मांडली असून, विश्वकर्मा पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलमध्ये शनिवार, दि. २९ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५.०० वाजता बाणेर रस्त्यावरील यशदा येथे डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात विकास आमटे यांच्यासह डॉ. भारती आमटे (पत्नी) व डॉ. शीतल आमटे (कन्या) यांच्याशी संवाद साधण्यात येणार असून, डॉ. मंदार परांजपे त्यांच्याशी संवाद साधतील. तसेच डॉ. जयश्री तोडकर आणि संतोष शेणई लिखित ‘ओबेसिटी मंत्रा’ याही पुस्तकाचे प्रकाशन यावेळी होणार आहे, अशी माहिती पब्लिकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी दिली आहे.