पुणे- राष्ट्रीय तपास संस्थेच्या अहवालात असे म्हटले आहे की भारतातील प्रत्येक सहावा सायबर गुन्हा हा सोशल मीडियाद्वारे केला जातो. सायबर गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण 2014
मध्ये 9,622,- 2015 मध्ये 11,592 आणि 2016 मध्ये 12, 317 होते आणि उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्ये या आकडेवारीमध्ये आघाडीवर होती. सायबर गुन्हे अहवालानुसार बहुतेक प्रकरणांमध्ये स्त्रियांच्या अवमान,
बेकायदेशीरपणे फायदा घेणे,, बदला आणि अपमान या प्रकारांचा समावेश होता. 2016 मध्ये केलेल्या जूनिपर यांच्या एका संशोधन अभ्यासाच्या आधारे व अंदाजाप्रमाणे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण हे 2019 पर्यंत 2.1 ट्रिलियन इतके
असू शकते.
तांत्रिक प्रगतीमुळे/ तंत्रज्ञानामुळे लोकांचे सामाजिक जीवन अधिक चैतन्यपूर्ण झाले आहे पण त्याचप्रमाणे ते आव्हानात्मक तसेच धोक्यात देखील आले आहे. इंटरनेटमुळे जगात लोकांची जवळीकता वाढली आहे. ते एकमेकांना
जवळ असल्याचे दिसून येते. सोशल नेटवर्किंग, ऑनलाइन शॉपिंग, डेटा संग्रहित करणे, गेमिंग, ऑनलाइन अभ्यास करणे, ऑनलाइन नोकऱ्या शोधणे,,या व अशा अनेक गोष्टी लोकांना सहजपणे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, सोशल मीडिया आणि
इंटरनेटच्या वापराच्या माध्यमातून मिळत आहेत,. इंटरनेट जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात वापरले जाते.
माध्यमांची सुलभ उपलब्धता व परवडणारा खर्च यामुळे त्याचा व्यापक वापर वाढला आहे. अशातच माध्यम वापरकर्त्यांना आकर्षक आर्थिक, भावनिक आणि सामाजिक प्रलोभने दिली जातात व त्यांचा अज्ञानपणामुळे त्यांचा बळी जातो. सध्याची तरुण पिढी ही खूप “टेक्नो सावी “/ तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणारी पिढी आहे आणि सोशल मिडीयाचा वापर करण्यासाठी जणू उतावीळ असते व त्यामुळेच त्यांना सहज ट्रॅप करून फसविने सोपे जाते.
सायबर गुन्हे ही सामान्य संज्ञा आहे ज्यामध्ये संगणक, इलेक्ट्रॉनिक गॅझेट, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा याचा समावेश आहे. सायबर गुन्हेगारीच्या पद्धतींमध्ये सोशल मिडीया वापरकर्त्याच्या अकौंट मध्ये अनधिकृत प्रवेश करणे,
हॅकिंग करणे, वेब अपहरण, सेक्सटोर्षण, पोर्नोग्राफी, एपिओनेज, सायबर-दहशतवाद, सायबर स्कॉलिंग, व्हायरस हल्ला, सायबर गुंडगिरी, बेकायदेशीर लेखांची विक्री, जुगार, ईमेल हॅकिंग चोरी, सायबर लूटमार आदींचा समावेश होतो..
सायबर गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून यामध्ये भारत देखील पाठीमागे नाही. अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की बहुतेक तरुण हे दु:ख व त्यासबंधीच्या हिंसेसारख्या मानसिक आजारांना सहज बळी पडत आहेत. तरुणांमध्ये तंत्रज्ञान, सोशल मीडियाचा अतिरेकी वापर/ अतिरेक होत असल्याने त्यांच्या भविष्यातील पिढ्या देखील नकारात्मक विचार, नैराश्य, चिंता, आक्रमकता, असहिष्णुता, तणाव, व्यसन, विकार आणि इतर अनेक मानसिक आजारांना आमंत्रण देतील आणि या मानसिक आजारांचे प्रमाण तरुणांमध्ये पिढ्यान-पिढ्या वाढतच राहील अशी भीती व्यक्त केली जात आहे.
यात शंका नाही की, सोशल मीडियाच्या वापरला काही प्रमाणात चांगली बाजू देखील आहे आणि ते एक वरदान देखील आहे. मनुष्याच्या विकासामध्ये सोशल मीडियाची प्रमुख भूमिका आहे. सोशल मीडियामुळे सामाजिककरण, सोशल
नेटवर्किंग आणि संवाद्द सोपा करण्यासाठी मदत होते.. तथापि, सोशल मीडियामध्ये बर्याच नकारात्मक गुणधर्मआहेत जे समाजातल्या तरुणांच्या आरोग्य व मानसिक आरोग्यावर परिणाम करीत आहेत. शारीरिक आजार,मानसिक आरोग्य समस्या, भावनिक – मनो सामाजिक समस्या, लैंगिक अत्याचार, बलात्कार, आत्महत्या, आणि इतर दुर्घटना हे मीडिया व्यसनांचे परिणाम आहेत. उदयोन्मुख संज्ञानात्मक वर्तनात्मक समस्या, मानसिक असंतुलन, शक्ती संघर्ष, किशोरवयीन आवेश या व अशा अनेक गोष्टी किशोरवयीन मुलांच्या व तरुणाच्या जीवनावर तसेच त्यांच्या जीवन
कौशल्याचे व्यवस्थापन, आकांक्षा व त्यांना समाजात कायद्याचे पालन करणारा नागरिक म्हणून पार पाडावयाच्या सामाजिक जबाबदाऱ्या यामध्ये अडथळा निर्माण करतात.
आणि यामुळेच या घटकाची गरक म्हणून कर्वे समाज सेवा संस्था , आणि रोटरी सारख्या स्वयंसेवी संस्था, पोलिस, मानसिक आरोग्य व्यावसायिक, प्रॅक्टिशनर्स, सामजिक कार्यकर्ते, आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी एकत्रित येऊन सोशल
मीडिया आणि सायबर गुन्हे याबाबत तरुणांच्या मानसिक आरोग्याशी निगडीत जागरूकता निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. कर्वे समाज सेवा संस्था आणि रोटरी क्लब
ऑफ पूना वेस्ट यामध्ये मुख्य संस्था म्हणून भूमिका पार पाडत आहेत..
सायबर सुरक्षा आणि मानसिक आरोग्य जागरूकता अभियानाच्या दृष्टीने ही परिषद / हा सेमिनार हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे.
सोशल मीडिया, सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांबद्दल तरुण व मानसिक आरोग्य व्यावसायिकांमध्ये माहिती आणि ज्ञान प्रसारित करणे, सोशल मीडियाच्या वापराविषयी जागरुकता निर्माण करणे, सोशल मिडीयाचा मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम आणि प्रभाव. व त्यासंबंधित समस्या सोडविण्यासाठी व त्यांच्या उत्तम मानसिक आरोग्याच्या दृष्टीचे धोरण याविषयी स्वयंसेवी संस्था/ एनजीओ, माध्यमे/ मीडिया, पोलिस आणि मानसिक आरोग्य व्यावसायिकांची भूमिका, तसेच गुणवत्तापूर्ण जीवन सुनिश्चित करण्यासाठी आव्हाने आदी या
परिषदेची / सेमिनारची प्रमुख उद्दिष्ट्ये असणार आहेत. या परिषदेमध्ये सुमारे 100 – महाविद्यालयीन युवक, शिक्षक, रोटरियन, व्यावसायिक सल्लागार, प्रॅक्टिशनर्स, मानसशास्त्रज्ञ, मनोचिकित्सक, सामाजिक कार्यकर्ते आणि
मध्यम माध्यम / प्रतिनिधी भाग घेत आहेत.दि. शनिवार २९ सप्टेंबर २०१८ वेळ- सकाळी १०.०० ते साय. ५.०० वाजेपर्यंत बी डी कर्वे कॉन्फरन्स हॉल( 18, Hill Side, Karvenagar, Pune-52)येथे हि परिषद आयोजित करण्यात आली आहे.
डॉ. दीपक वालोकर यांनी सांगितले की पुणे शहर सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त श्रीमती ज्योति प्रिया सिंह या परिषदेच्या उद्घाटक व मुख्य पाहुण्या असतील आणि दैनिक सकाळ चे संपादक श्री. माधव गोखले, तसेच
रोटरी चे जिल्हा राज्यपाल शैलेश पालेकर यांची प्रमुख उपस्थिती असेल तर कर्वे समाज सेवा संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सदानंद देशपांडे हे उद्घाटन समारोहाचे अध्यक्षथान भूषवतील. रांची इंस्टीट्यूट ऑफ न्युरो सायकोट्रेट्री अॅण्ड अलायड सायन्सेस, झारखंड, चे माजी संचालक डॉ. सुप्रकाश चौधरी, ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एजुकेशन चे राष्ट्रीय बोर्ड सदस्य (आयटी) डॉ दीपक शिकरपूर, सायबर सुरक्षा विशेषज्ञ आणि सीडीएलएम रोटरी जिल्हा -3131 अध्यक्ष अॅड. वैशाली भागवत, गुड नाईट टेक केअर या सायबर गुन्ह्यावर आधारित मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. गिरीश जोशी (विषय- सायबर गुन्हे आणि सायबर सिक्योरिटी, संशोधन आणि चित्रपट निर्मिती अनुभव), लेखक श्री. अतुल कहाटे, पुणे पोलिस सायबर सेलच्या वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक सुश्री राधिका फडके, विख्यात वरिष्ठ मनोवैज्ञानिक आणि मानसिक आरोग्य व्यावसायिक डॉ वासुदेव पारळीकर, सायबर सिक्योरिटी ट्रेनर रोटरीयन कल्याणी गोखले, कर्वे समाज सेवा संस्थेच्या सीएसआर सेलचे मानद संचालक, सामाजिक कार्यकर्ते आणि परिषदेचे संयोजक डॉ. महेश ठाकूर हे विविध विषयांवर सायबर गुन्हे प्रतिबंधक जागरुकता, सायबर सुरक्षा सुनिश्चित करणे आणि चांगले मानसिक आरोग्य ‘याविषयी उपस्थिताना मार्गदर्शन करतील
परिषदेच्या संयोजन समितीमध्ये कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक व मास्वे संघटनेचे अध्यक्ष डॉ दीपक वलोकर, परिषदेचे संयोजक डॉ. महेश ठाकूर, परिषदेचे समन्वयक प्रा. चेतन दिवाण, रोटारी क्लब ऑफ पुणे वेस्ट चे अध्यक्ष
रोटरीयन श्री चारू श्रोत्री व रोटरीयन सुश्री कल्याणी गोखले यांचा समावेश आहे.