पुणे, दि. १७ नोव्हेंबर: विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी तत्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळा व जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा समारोप ‘श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’, विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे दुपारी १२ वा. वारकर्यांच्या उपस्थितीत पार पडला.
इंद्रायणीत वारकर्यांच्या गुलाल, बुक्का व फुलांची ओंजळ वाहून ज्ञानेश्वर माऊलीचे भावपूर्ण स्मरण केले. भजन करून नामस्मरणाचा गरज केला. यावेळी विश्वरूप दर्शन मंचावर घंटानाद करण्यात आला. विश्वशांती केंद्राच्या वतीने वारकर्यांना महाप्रसाद देण्यात आला.
तत्पूर्वी हभप डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांनी काल्याचे कीर्तन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. याद्वारे शेकडो वर्षांची परंपरा जपण्यात आली. इंद्रायणीच्या घाटावर वारकर्यांनी या समाधी सोहळ्याच्या काल्याच्या महाप्रसादाचा लाभ घेतला.
या समारंभासाठी विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, हभप तुळशीराम दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, हभप तुळशीराम दा कराड, डॉ. उमेश नागरे, माइर्स एमआयटीचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, संचालक डॉ. महेश थोरवे उपस्थित होते.
या सप्ताहात हभप अर्जुन महाराज लाड, हरिहर महाराज दिवेगावकर, उद्धव महाराज मंडलिक, यशोधन महाराज साखरे, चिन्मय महाराज सातारकर या सारख्या नामवंत कीर्तनकारांनी कीर्तनरुपी सेवा सादर केली.
तसेच प्रा. सुशांत दिवेकर, चैत्राली अभ्यंकर, पंडित रघुनाथ खंडाळकर, सुरंजन व शुभम खंडाळकर, गायत्री गुल्याने, कार्तिकी व सुपुत्र कौस्तुभ कैवल्य गायकवाड, पुनम ताई नळकांडे व विश्वशांती संगीत कला अकादमीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी विश्वशांती दर्शन हा अभंगवाणी व भक्तीसंगीताचे कार्यक्रम सादर केले.
हभप बापूसाहेब मोरे देहूकर म्हणाले,”सृष्टीवर संताच्या वचनामुळे मानवाचे कल्याण होते. संत हे वात्सल्य मूर्ती असून त्यांची महिमा शब्दात सांगता येत नाही. संत दुसर्यांचे दुःख सावरण्यास पुढे येऊन त्यांना सुख व शांतीचा मार्ग दाखवतात.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” या सप्ताहात प्रवचन, कीर्तन, गायन व भजन या मार्गाने नामवंतांनी माऊलीचरणी सेवा रूजू केली. पुढील वर्षभर लोकशिक्षणाचे विविध कार्यक्रम व विश्वरूप दर्शन मंचावर होणार आहेत. रामेश्वर येथे विश्वधर्मी मानवता तीर्थभवनाची निर्मिती करून संपूर्ण जगात संत ज्ञानेश्वर माऊली आणि शांतीचा संदेश पोचविला जाईल. पवित्र तीर्थ क्षेत्रांचे खर्या अर्थाने ज्ञान तीर्थ क्षेत्रामध्ये परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्ञान, कर्म आणि भक्तीतून ईश्वर दर्शन होते. त्याग आणि समर्पणाचा संतानी दिलेला संदेश व त्यांची शिकवण आत्मसात करून या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा.”
हभप शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.
एक्सेलसॉफ्ट टेक्नोलॉजीज लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री बुधवार 19 नोव्हेंबर पासून
· एक्सेलसॉफ्ट टेक्नोलॉजीज लिमिटेड (“Company”) च्या प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 114 रुपये ते प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 120 रुपये (“इक्विटी शेअर्स”) पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.
· प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार 18 नोव्हेंबर 2025 आहे
· बोली/ऑफर बुधवार 19 नोव्हेंबर 2025 रोजी खुली होईल आणि बोली/ऑफर शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025रोजी बंद होईल.
· बोली किमान 125 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 125 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
· 11 नोव्हेंबर 2025 रोजीची रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“RHP”) लिंक:
https://www.anandrathiib.com/pdf/documents/Excelsoft-Technologies-Limited-RHP.pdf
पुणे–: एक्सेलसॉफ्ट टेक्नोलॉजीज लिमिटेड (“Company”) प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्ससाठी (“इक्विटी शेअर्स”) प्राथमिक समभाग विक्री (“Offer”) बुधवार 19 नोव्हेंबर 2025 रोजी सुरू करत आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक बोली/ऑफर सुरु होण्याच्या एक कार्यालयीन दिवस आधी म्हणजेच मंगळवार 18 नोव्हेंबर 2025 आहे. बोली/ऑफर शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025रोजी बंद होईल.
प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 114 रुपये ते प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 120 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या किमान 125 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या 125 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
प्राथमिक समभाग विक्री ऑफरमध्ये 1,800 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि पेदांता टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (विक्री समभागधारक) यांच्याद्वारे 3,200 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे.
कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE“) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) (BSE आणि NSE एकत्रितपणे “Stock Exchanges”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.
आनंद राठीॲडव्हायर्स लिमिटेड हे या ऑफरचे एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर (“BRLM”) आहेत.
द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडने विश्वसनीय हायब्रिड मल्टी अॅसेट अलोकेशन फंड लाँच केला
वैविध्य आणि महागाईविरोधी संरक्षणासाठी सोनं आणि चांदीसारख्या धातूंचे, संभाव्य स्थिरतेसाठी निश्चित उत्पन्नाचे आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी इक्विटीचे एकत्रीकरण करत
फंडातर्फे एका सक्रिय ॲलोकेशन चौकटीचा अवलंब
मुंबई: पँटोमाथ फायनान्शियल सर्व्हिसेस ग्रुप अंतर्गत भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या एएमसींपैकी एक द वेल्थ कंपनी अॅसेट मॅनेजमेंट होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडतर्फे ‘द वेल्थ कंपनी मल्टी अॅसेट अलोकेशन फंड’ सादर करण्यात येत आहे. हा ट्रू-टू-लेबल हायब्रिड, कमॉडिटी-अॅकर केलेला मल्टी-अॅसेट फंड इक्विटी, डेब्ट आणि कमॉडिटीज यांचे सक्रिय संतुलन राखेल. त्यामुळे हा फंड बाजारातील विविध चक्रांमध्ये लवचिक आणि चांगले वैविध्य राखलेले पोर्टफोलिओ तयार करत गुंतवणूकदारांना दीर्घकालीन संपत्ती निर्मितीस मदत करतो. न्यू फंड ऑफर (एनएफओ) 19 नोव्हेंबर 2025 रोजी खुली होईल आणि 3 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल.हा फंड वैविध्य आणि महागाईविरोधी संरक्षणासाठी विविधीकरण आणि सोनं आणि चांदीसारख्या धातूंचे, संभाव्य स्थिरतेसाठी निश्चित उत्पन्नाचे आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी इक्विटीचे मिश्रण करत एक सक्रिय अलोकेशन चौकटीचा अवलंब करतो. प्रत्येक अॅसेट क्लास वाढ, संभाव्य स्थिरता आणि जोखीम समायोजित परतावा निर्माण करण्यामध्ये स्वतंत्र भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न करतो.
या फंडाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे त्याची हायब्रिड रचना. ती अॅसेट क्लासेसमध्ये गतिमान हालचाल करण्यासाठी व्यापक लवचिकता प्रदान करते आणि अनुकूल कर संरचनेचा लाभ देते. द वेल्थ कंपनी मल्टी अॅसेट अलोकेशन फंड त्याचे अॅसेट मिक्स इन्कम टॅक्स अॅक्ट अंतर्गत हायब्रिड टॅक्सेशनच्या आवश्यकता पूर्ण करण्याच्या दृष्टीने राखण्याचा प्रयत्न करतो.
कमॉडिटीजमध्ये 50% पर्यंत गुंतवणूक करण्याची क्षमता असल्यामुळे हा फंड मॅनेजर्सना बदलत्या मॅक्रो आणि बाजाराच्या परिस्थितीनुसार पोझिशनिंग समायोजित करण्यासाठी अधिक स्वातंत्र्य सादर करतो. त्यामुळे पोर्टफोलिओ पर्यायी अॅसेट्सचा फक्त शिल्लक धारक न राहता चक्रांमधील संधी पकडण्यासाठी आणि कालांतराने अधिक सुलभ जोखीम-समायोजित परतावा देण्यासाठी डिझाइन केलेला एक सक्रिय, दूरदृष्टी असलेला अलोकेटर ठरतो.एनएफओच्या सादरीकरणाबाबत सविस्तर सांगताना द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडच्या इक्विटीच्या सीआयओ सुश्री. अपर्णा शंकर म्हणाल्या, “वेल्थ कंपनी म्युच्युअल फंड मध्ये अॅसेट अलोकेशन हा दीर्घकालीन संपत्ती निर्मिती आणि संरक्षणाचा आधारस्तंभ आहे अशी आमची धारणा आहे. भारतीय म्हणून आपण नेहमीच स्वाभाविक बचत करणारे आहोत. आपल्या लॉकरमध्ये सोनं, कुटुंबात जमीन असते. आमचा मल्टी-अलोकेशन फंड याच कालातीत अॅसेट्समध्ये गुंतवणूक करतो. त्यात इक्विटी आणि डेब्टचा समावेश आहे आणि आता व्यावसायिक रिअल इस्टेटद्वारे अधिक सक्षम केले गेले आहे. त्याचा उद्देश आधुनिक लिक्विडिटी म्हणजेच तरलतेसह स्थिर परतावा देणे आहे. आधुनिकता आणि सुलभता यांनी नव्याने कल्पना केलेले हे पारंपरिक संतुलन आहे.”
त्यात भर घालत द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंड डेब्टचे सीआयओ श्री. उमेश शर्मा म्हणाले,
“कमॉडिटीजना इक्विटी आणि डेब्टसह योग्य स्थान देऊन आम्ही केवळ कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात काम करणारे वैविध्य निर्माण करत आहोत. फंडच्या मँडेटमधील अॅसेट अलोकेशन लवचिकता आम्हाला डेब्टच्या संभाव्य स्थिरतेचा, कमॉडिटीजचा जोखीमविरोधी संरक्षणात्मक गुणधर्म आणि इक्विटीच्या दीर्घकालीन वाढीचा लाभ अधिक चांगल्या जोखीम-समायोजित परिणामांसह घेण्याची संधी देते. विविध चक्रांमध्ये सक्रियतेसह कार्यक्षम राहतील अशा पोर्टफोलिओंची रचना करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
एकत्रितपणे, ते “भारताची उभारणी करणारे सातत्य” असे एएमसी ज्या गोष्टीला म्हणतात त्याचे प्रतिनिधित्व करतात. भारताच्या पुढील वाढीचा टप्पा बाजार आणि नाविन्यपूर्णता याद्वारे वास्तविक अॅसेट्स आणि उत्पादनक्षमतेने प्रेरित असेल असे यातून अधोरेखित होते.
महात्मा फुले मराठी साहित्य संमेलनाच्याअध्यक्षपदी प्रशांत देशमुख यांची निवड,स्वागताध्यक्षपदी गौरव कोलते
दशऱथ यादव यांची माहिती
सासवड : अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद आयोजित १८ वे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी (ता. पुरंदर) येथे दि.२७ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रशांत देशमुख यांची तर स्वागताध्यक्ष पदी गौरव कोलते यांची निवड करण्यात आली आहे.
अशी माहिती संमेलनांचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.

महात्मा फुले यांचे मूळ गाव असलेल्या कऱ्हा नदीच्या काठावरील खानवडी येथे दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. संमेलनात उद्घाटन समारंभ, कथाकथन, ग्रंथदिंडी, नाट्यप्रयोग, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाला प्रमुख पाहूणे म्हणून प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण, आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विजय कोलते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे, भाजपचे नेते बाबाराजे जाधवराव, ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर आदी उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाध्यक्ष प्रशांत देशमुख हे शिव व्याख्याते असून त्यांनी शेकडो व्याख्यानातून समाजाचे प्रबोधन केले आहे. गुड मॉर्निंग, जय शिवराय या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे. श्री गौरव कोलते हे गेली पंधरा वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करीत असून आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे संचालक आहे . प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात ते काम करीत आहेत. ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता.
संमेलनाच्या संयोजन बैठकीला मराठा महासंघ पश्चीम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ जगताप, साहित्य परिषदेचे तालुका अध्यक्ष श्यामकुमार मेमाणे, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धीवार, खानवडीचे माजी सरपंच रवींद्र फुले, रमेश बोरावके, दत्तात्रय होले, दत्तात्रय कड, भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय
सोनवणे, सचिव दीपक पवार, प्रसिध्दी प्रमुख अमोल भोसले, सुनील लोणकर, गंगाराम जाधव, प्रफुल्ल देशमुख, छायाताई नानगुडे, जगदीप वनशिव आदी उपस्थित होते.
या संमेलनात राज्यभऱातूनदरवर्षी मोठ्या संख्येने लेखक, कवी, कलावंत सहभागी होतात. सहभागी होऊ इच्छिणा-या लेखक,कवींनी मो.९८८१०९८४८१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन श्री यादव यांनी केले आहे.


NB0I.jpg)

