पुणे-सिंहगड कॉलेज कॅम्पसमधीलपायगुडे इमारतीच्या पहील्या मजल्यावरील फ्लॅट नंबर २४ मध्येआणि ‘रुट २४ हॉटेल’च्या हुक्का पार्लर्सवर छापा मारून पोलिसांनी सौरभ प्रकाश फडके, वय २७ वर्षे, रा. आशावरी कुंज अपार्टमेन्ट, नवले पुलाशेजारी, फ्लॅट नंबर २०३, ए विंग, वडगाव, पुणे आणि प्रितम अरुण कोयले, वय ३२ वर्षे, रा. दत्तनगर, टेक्लो कॉलनी, पुणे.प्रतिक जयंत गोळे, वय ३४ वर्षे, धंदा हॉटेल व्यवसाय, रा. ८५८/८६१ गुरुवार पेठ, या हॉटेल मालकांना अटक केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’१५/११/२०२५ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक गणेश मोहीते, पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना गोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, सिंहगड कॉलेज कॅम्पसमधील पायगुडे इमारतीच्या पहील्या मजल्यावरील फ्लॅट नंबर २४ मध्ये इसम नामे १. सौरभ प्रकाश फडके, वय २७ वर्षे, रा. आशावरी कुंज अपार्टमेन्ट, नवले पुलाशेजारी, फ्लॅट नंबर २०३, ए विंग, वडगाव, पुणे २. प्रितम अरुण कोयले, वय ३२ वर्षे, रा. दत्तनगर, टेक्लो कॉलनी, पुणे. हे त्यांचे अर्थिक फायदयाकरता मानवी आरोग्यास धोकादायक अथवा अपायकारक असा हुक्का फ्लेवर्स धुम्रपानासाठी ग्राहकांना सेवन करण्यासाठी देत आहे. मिळालेल्या बातमीवरुन पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफ तात्काळ या ठिकाणी गेले असता सदर आरोपी मिळुन आले. तसेच इसम नामे प्रतिक जयंत गोळे, वय ३४ वर्षे, धंदा हॉटेल व्यवसाय, रा. ८५८/८६१ गुरुवार पेठ, पुणे हा त्याचे रुट २४ हॉटेल, सिंहगड कैम्पस, वडगाव, पुणे. या हॉटेलमध्ये त्यांचे अर्थिक फायदयाकरता मानवी आरोग्यास धोकादायक अथवा अपायकारक असा हुक्का फ्लेवर्स धुम्रपानासाठी ग्राहकांना सेवनाकरता ठेवला असताना मिळुन आला म्हणुन त्याचेविरुध्द सरकारतर्फे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. ५०८/२०२५ भा.न्या.सं.क.१२३, सिगारेट व अन्यतंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४-अ, २१-अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन दि.१५/११/२०२५ रोजी या आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर, मिलींद मोहीते, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर, राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सहा. पोलीस निरीक्षक गणेश मोहीते, पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार यांनी केली.
नवी दिल्ली-टॅरिफ वादादरम्यान भारत आणि अमेरिकेने त्यांचा पहिला करार केला आहे. या करारांतर्गत, भारत अमेरिकेकडून अंदाजे २.२ दशलक्ष टन (MTPA) LPG खरेदी करेल. हे भारताच्या वार्षिक गरजांच्या १०% प्रतिनिधित्व करते. हा करार फक्त एका वर्षासाठी, २०२६ पर्यंत वैध आहे.हा करार भारतातील सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL) यांनी अमेरिकन ऊर्जा पुरवठादार – शेवरॉन, फिलिप्स 66 आणि टोटल एनर्जी ट्रेडिंग सोबत केला आहे.या करारामुळे भारतात गॅस स्वस्त होऊ शकतो.
या करारामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत होईल. पारंपारिक स्रोतांवरील अवलंबित्व कमी होईल, ज्यामुळे पुरवठा साखळी अधिक स्थिर होईल. ग्रामीण आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना परवडणारे एलपीजी मिळू शकते. जगभरातील किमती बदलण्याचा परिणाम कमी होईल. यामुळे अमेरिकेसोबतचा व्यापार संतुलित होण्यास मदत होईल. पेट्रोलियम मंत्री म्हणाले – भारताची बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली आहे.
पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या कराराला ऐतिहासिक म्हटले. ते म्हणाले, “जगातील सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी एलपीजी बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली झाली आहे. आमच्या ऊर्जा पुरवठ्यात विविधता आणण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे.”
वाणिज्य मंत्री पीयूष गोयल म्हणाले, “ऊर्जा हे असे क्षेत्र आहे जिथे सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे. भारत हा एक प्रमुख ऊर्जा खेळाडू आहे आणि आम्ही अमेरिकेसह जगभरातून आयात करतो. येत्या काळात अमेरिकेसोबत ऊर्जा व्यापार वाढेल.”
“आम्ही जवळचे मित्र आणि नैसर्गिक भागीदार आहोत, त्यामुळे ऊर्जा सुरक्षेत अमेरिकेची भूमिका वाढेल.” अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला भारताचा प्रमुख तेल आणि वायू पुरवठादार बनवण्यावरही चर्चा केली आहे.
अमेरिकेने भारतावर ५०% कर लादला आहे.
रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प यांनी भारतावर एकूण ५०% कर लादला आहे. यामध्ये २५% परस्पर कर आणि रशियन तेल खरेदीवर २५% दंड समाविष्ट आहे. शिवाय, भारताचा अमेरिकेसोबत व्यापार अधिशेष आहे. आता, ऊर्जा खरेदी वाढवून व्यापार करार अंतिम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हा करार भारताच्या एलपीजी बाजारपेठेला पाठिंबा देईल.
पूर्वी, भारतातील बहुतेक एलपीजी सौदी अरेबिया, युएई, कतार आणि कुवेत सारख्या पश्चिम आशियाई देशांमधून आयात केले जात होते. या करारामुळे आमच्या तेल खरेदीची व्याप्ती वाढेल.
अमेरिकन उत्पादकांशी चर्चा केल्यानंतर भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या पथकांनी अलीकडेच हा करार अंतिम केला. भारताच्या वेगाने वाढणाऱ्या एलपीजी बाजारपेठेला पाठिंबा देण्यासाठी हा करार पुरेसा मोठा आहे, जिथे त्याच्या सुमारे ६०% गरजा आयातीद्वारे पूर्ण केल्या जातात.
पुणे, दि. 17: मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी प्रस्तावित कामांकरिता लागणारा निधी व त्याकरिता प्रस्तावाची मागणी तात्काळ सादर करावी, तसेच कृत्रीम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर व जागतिक स्तरावरील सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात, बिबट नसबंदीबाबत केंद्राची मान्यता प्राप्त झाली असून त्याबाबतची कार्यवाही करावी, अशा सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी दिल्या.
वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्या सभागृहात मानव-बिबट संघर्ष उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, मल्लिकार्जुन,मुख्य वनसंरक्षक, नाशिक, आशिष ठाकरे, वनसंरक्षक पुणे वनवृत्त महादेव मोहिते, उपवनसंरक्षक पुणे, प्रशांत खाडे, उपवनसंरक्षक जुन्नर, श्रीधर्मबीर सालचिठठल, उपवनसंरक्षक अहिल्यानगर, विवेक होशिंग, उपवनसंरक्षक वन्यजीव जयरामगौडा, उपवनसंरक्षक शिक्षण कुलराज सिंह, उपवनसंरक्षक सोलापूर सिध्देश सावडेकर उपवनसंरक्षक नाशिक, पंकज गर्ग उपवनसंरक्षक सामाजिक वनीकरण यांच्यासह वनअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री. नाईक यांनी नाशिक मधील वनकर्मचारी यांच्यावर झालेल्या बिबट हल्लाप्रकरणी संबंधित वनकर्मचारी यांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढविले. मानव-बिबट संघर्षाबाबत वनकर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत, त्यांना आवश्यक ते सर्व साहित्य पुरविण्यात यावे. जिल्हा योजनेमधून आकस्मिक निधी त्वरीत उपलब्ध करुन देण्याबाबतचा पाठपुरावा करण्यात येत आहे. बांबू लागवड करुन बिबटला अटकाव करता येईल किंवा कसे याबाबत अभ्यास करावा , अशा सूचना श्री. नाईक यांनी दिल्या.
श्री. खांडेकर यांनी बैठकीत ऊस शेती, बिबट अधिवास व त्याकरीता प्रभावी उपाययोजनांबाबत माहिती दिली. यामध्ये साखर कारखान्यांनी करावयाची कार्यवाही, टायगर फाऊंडेशनवर आधारित नियोजन तसेच बिबट्यांची गणना करणे, बिबट्यांचे मायक्रोमॅपिंग, पोल्ट्री वेस्ट तसेच हॉटेल वेस्टची विल्हेवाट, रेस्क्यू सदस्यांचा विमा काढणे, बेस कॅम्पचे सक्षमीकरण करणे, कुरण विकास करून बिबट्यांकरीता अधिवास तयार करणे, मेंढपाळ, ऊस कामगार आदीकरिता विविध उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
श्री. खाडे यांनी मानव-बिबट संघर्षाबाबत केलेल्या उपाययोजनाबाबतचे सादरीकरण केले. तर श्री. मोहिते यांनी टीटीसी बावधन मधील कामांबाबतची माहिती दिली. जून 2026 पर्यंत 80 पेक्षा अधिक बिबट्याकरिता उपचार उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले.
श्री. ठाकरे यांनी पिंपरखेड मधील शोध अभियान चालू ठेवण्याबाबत सूचना दिल्या आणि यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना केली. तसेच बिबट्यांच्या संख्या नियंत्रणासाठी इम्युनो-कॉन्ट्रासेप्टीव्ह पध्दतीची केंद्र शासनाची परवानगी प्राप्त झाली असल्याचे त्यांनी यावेळी म्हणाले.
पुणे नवी दिल्ली येथील श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाने ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये “हिंदुत्व के विमर्श : चुनौतियाँ,समाधान और भविष्य” या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते.या परिषदेत भारत आणि इतर देशातील अनेक विद्वान,संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञांनी भाग घेतला आणि हिंदुत्वाच्या तात्विक,सांस्कृतिक आणि सामाजिक परिमाणांवर तसेच त्याच्या समकालीन दृष्टिकोनावर विचारांची देवाणघेवाण केली. या आंतरराष्ट्रीय परिषदेत पुणे, महाराष्ट्र येथील सुनीता पेंढारकर यांनी “हिंदू धर्म आणि महिला” या विषयावर त्यांचा शोधनिबंध सादर केला.त्यांचा उद्देश असा होता की इसवी सन पूर्व काळापासून आपल्या हिंदू धर्मात महिलांना आदरणीय स्थान दिले गेले आहे. महिलांना अपमानित करण्याचा किंवा दडपण्याचा कधीही प्रयत्न झाला नाही.या शोधनिबंधात सुनीता यांनी हिंदू धर्म आणि इतर धर्मांमधील महिलांबाबतचा फरक सविस्तरपणे स्पष्ट केला आहे. पुरुष आणि महिलांच्या उत्पत्तीपासून,महिला शतकानुशतके विविध प्रकारची कामे करत आहेत.अत्यंत कठीण परिस्थितीत,प्रत्येक क्षेत्रात निर्भयपणे स्त्री शक्तीने संचार केला आहे. आपल्या नवीन पिढीला सुमारे २००० वर्षांचा इतिहास शिकवला पाहिजे,तरच प्रत्येक घरात दुर्गा आणि सरस्वती जन्माला येतील आणि भारत विश्व गुरु होईल. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अरुण कुमार हे प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते होते.समारोप सत्रात,प्रमुख पाहुणे आणि वक्ते,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ.कृष्ण गोपाल यांनी सांगितले की, हिंदू समाजाने हिंदुत्व समजून घेणे आवश्यक आहे.हिंदुत्व ही एक आध्यात्मिक भावना आहे जी मनाच्या आत राहते.अध्यात्म म्हणजे भेदभावांचा अंत. भेदभावांच्या दृष्टीचा अंत झाल्यामुळे अभेदभावाच्या दृष्टीचा उदय होतो. या परिषदेत दोन दिवस १६ समांतर सत्रे झाली,ज्यामध्ये १२० हून अधिक विद्वान आणि संशोधकांनी त्यांचे शोधनिबंध सादर केले.ब्रिटनमधील लुसी गेस्ट,बेल्जियममधील मार्टिन गुरविच आणि अमेरिकेतील क्रिस्टोफर शॅनन यांच्यासह विविध भारतीय राज्ये आणि विद्यापीठांमधील असंख्य संशोधकांनीही हिंदुत्व आणि त्याच्या प्रासंगिकतेबद्दल त्यांचे विचार मांडले. सुनीता पेंढारकर यांच्या शोधनिबंधाची प्रशंसा करताना सत्राचे अध्यक्ष जनार्दन चौहान म्हणाले की,असे शोधनिबंध लिहिले पाहिजेत आणि सुनीता यांनी महिला सक्षमीकरणाची जी तेजस्वी प्रतिमा सर्वांसमोर मांडली आहे ती लक्षात ठेवली पाहिजे तिचा आदर्श सर्वांनी आपल्या मध्ये अंगिकारला पाहिजे. हा कार्यक्रम श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, भारतीय तत्वज्ञान संशोधन परिषद (ICPR),विश्व संवाद केंद्र आणि दिल्ली विद्यापीठातील हिंदू अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
नवले पुलाच्या अपघाताची कारणे शोधून आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ करण्याचे निर्देश
पुणे, दि. १७: पुणे शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, अपघात कमी व्हावेत यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले. नवले पुलाच्या ठिकाणी झालेल्या गंभीर दुर्दैवी अपघाताची संबंधित यंत्रणांनी तात्काळ चौकशी करावी व या मार्गावर आवश्यक त्या लघुकालीन व दीर्घकालीन उपाययोजना तात्काळ कराव्यात, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
पुणे शहरातील वाहतूक सुधारणाबाबत विधानभवनात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे, पुणे शहरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते. सेव्ह लाईफ फाउंडेशनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष तिवारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
सेव्ह लाईफ फाउंडेशनने तीन-चार वर्षापूर्वी नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान होणाऱ्या अपघातांची कारणे शोधून त्यावर उपाययोजना सुचविण्याबाबत सविस्तर अहवाल सादर केला होता. त्याअनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तथापि, आता झालेला गंभीर अपघात पाहता पुन्हा या मार्गाचे पुन्हा सविस्तर अभ्यास सेव्ह लाईफ फाउंडेशनने सर्व संबंधित शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने करवा, अशा सूचना डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या. या अनुषंगाने आपला अहवाल दोन आठवड्यात सादर करू असे श्री. तिवारी यांनी सांगितले.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, शहरात वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकाला दंड केला जावा. तसेच तीनपेक्षा अधिक वेळा उल्लंघन झाल्यास संबंधिताचा वाहनचालन परवाना नियमानुसार निलंबित करणे व त्या उपरही उल्लंघन केले गेल्यास जप्त करण्याची कारवाई करावी.
रस्ते सुरक्षेच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी दरमहा जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी व आधीच्या बैठकांमध्ये सुचविलेल्या उपाययोजनांची कामे पूर्ण होतील याची खात्री करावी, असेही डॉ.पुलकुंडवार म्हणाले.
रस्त्याची मालकी असलेल्या यंत्रणेवर सदर रस्ता सुस्थितीत ठेवणे, आवश्यक त्या उपाययोजना करणे, वाहतूक सुरळीत होईल याची जबाबदारी राहील. रस्ता सुस्थितीत नसल्यास संबंधित यंत्रणेवर जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात येईल. महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी रम्बलर्स, वाहतूक चिन्हे, फलक, बॅरियर्स लावावेत. सेव्ह लाईफ फाउंडेशनने शहरात वाहतूक कोंडी, अपघात अधिक होणाऱ्या रस्ते, ठिकाणांविषयी अभ्यास करून रस्त्यांच्या डिझाईनमध्ये काही त्रुटी असल्यास उपाययोजना सुचवाव्यात. त्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी.
पुणे शहर वाहतूक शाखेने अतिरिक्त मनुष्यबळाच्या मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला असून त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. तोपर्यंत वाहतूक शाखेच्या मागणीनुसार संबंधित रस्त्याची मालकी असलेल्या यंत्रणेने वाहतूक नियमनासाठी ट्रॅफिक वार्डन देण्याची जबाबदारी राहील, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले.
मनपा आयुक्त श्री. राम म्हणाले, शहरात मोठ्या प्रमाणात रस्तांची, पुलांची कामे सुरू आहेत. या ठिकाणी वाहतूक नियमनासाठी पुणे महानगरपालिकेच्यावतीने ट्रॅफिक वार्डन देण्यात येत आहेत. वाहतूक नियमन कामात खासगी स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग घ्यावा.
वारंवार अपघात होणाऱ्या ब्लॅकस्पॉटच्या अनुषंगाने कार्यवाही तात्काळ करणे आवश्यक असल्याचे डॉ. म्हसे म्हणाले. पुणे शहरासाठी वाहतुकीच्या अनुषंगाने एकात्मिक नियंत्रण केंद्र आवश्यक असून त्या अनुषंगाने हैदराबाद येथील नियंत्रण केंद्राचा अभ्यास आवश्यक असल्याचे श्री. डूडी म्हणाले. यावर कार्यवाहीचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले. यावेळी श्री. तिवारी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
बैठकीला पीएमआरडीएच्या सह आयुक्त पूनम मेहता, पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता (रस्ते) अनिरुद्ध पावसकर, पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त हिम्मत जाधव, आदींसह राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस विभाग, सेव्ह लाईफ फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
घर हक्क परिषदेच्या माध्यमातून विविध ३१ संघटना एकत्र आल्या असून परवडणारी घरे मिळाली पाहिजेत यासाठी या संघटना लढा देत आहेत. भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काची घरे मुंबईतच मिळाली पाहिजे, मुंबई बाहेर शेलू वांगणी सारख्या दूर जागी जाणार नाही असा स्पष्ट इशारा देत बंद पडलेल्या गिरण्या व कारखान्यांच्या फक्त ३३ टक्के जागेवर नाही तर संपूर्ण जागेवर ही घरे द्यावीत. हक्कांच्या घरासाठी सर्व संघटना एकत्र येऊन तीव्र लढा येणार असून नागपुरच्या अधिवेशनावर भव्य मोर्चा काढून सरकारलाही जागे करु, असे घर हक्क परिषदेच्या वतीने विश्वास उटगी यांनी म्हटले आहे.
गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष विश्वास उटगी म्हणाले की, सरकार आम्हाला जमीन देत नाही मात्र काही उद्योगपतींना या जमिनी देत आहे. भाड्याच्या घरात राहणारे, पागडीवर राहणारे, झोपडपट्टीत राहणारे तसेच जुन्या इमारातींच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न आहे पण सरकार या लोकांचे हक्काच्या घराचे अधिकार दडपून टाकत आहे. या जागा बिल्डरांना देऊन मुळ भूमीपूत्रांना मात्र मुंबईच्या बाहेर घालवले जात आहे. १ लाख १० हजार गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी नोंदणी झालेली आहे पण मागील २५ वर्षात अवघी १५ हजार घरे देण्यात आली. आहेत. लाखो कामगारांना त्वरित घरे का मिळाली नाहीत? मुंबई बाहेरील धुळे, सोलापूर, इचलकरंजी, नागपूर अशा अनेक ठिकाणी बंद पडलेल्या NTC मिल कामगारांना न्याय कधी मिळणार? राज्य सरकारने १ ऑगस्ट २०१९ ला जीआर काढून शेलू, वांगणीला घरे देऊ असे म्हटले आहे. हा जीआर रद्द करण्याची मागणी असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारमधील मंत्र्यांना तसे निवेदन दिलेले आहे, जीआर बदलण्याचे आश्वासन दिले आहे पण अजून अंमलबजावणी मात्र झालेली नाही.
राज्य सरकारचे गृहनिर्माण धोरण हे परवडणारी हक्काची घरे नाकारणे आहे. या भूमिपुत्रांनी कुठे जायचे, या प्रश्नावर न्यायलयात लढा सुरु असून भूमिपुत्रांच्या बाजूने निकाल असतानाही त्याची अंमलबजावणी केली जात नाही म्हणून सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. २३ नोव्हेंबरला पहिली सभा शैलेंद्र विद्यालय दहिसर पूर्व येथे हेाईल तर दुसरी सभा कांजूर मार्ग/ भांडूप येथील वस्त्या मध्ये हेाईल, त्यानंतर ठाणे, पनवेलसह इतर भागातील वस्त्यांमध्ये या सभा घेतल्या जाणार आहेत. हक्कांच्या घरासाठी सर्व राजकीय पक्षांची मदत घेऊ तसेच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निवेदनही देणार आहोत असे विश्वास उटगी यांनी सांगितले. यावेळी धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, शिशिर ढवळे, दत्तात्रय अट्याळकर, आसिष मिश्रा आदी उपस्थित होते.
पुणे- पुण्यातील मुंबई-बंगळुरु महामार्गावरील नवले पुलाजवळ आज पुन्हा एकदा अपघात झाला. सोमवारी दुपारी एका भरधाव कंटेनरने पाच ते सहा वाहनांना धडक दिली. पण सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले.परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास नवले पुलाजवळील भुमकर चौकात घडला. कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने थार, एर्टिगा, निशाण, बोलेरो, पिकअप आणि इतर काही वाहनांना मागून जोरदार धडक दिली.या अपघातामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त कंटेनर ताब्यात घेतला असून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
“बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायद्यांची मागणी; आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी”
मुंबई, १७ नोव्हेंबर २०२५ : नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या प्रकरणावर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. २४ वर्षीय आरोपी विजय संजय खेरनार याने अत्याचारानंतर मुलीची हत्या केली व फरार झाला होता. पोलिसांनी तत्काळ शोध घेत त्याला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “अशा नराधम प्रवृत्तीच्या व्यक्तींना कायद्याची आणि समाजाची भीती राहिली नाही. अनेक कायदे असूनही दोषसिद्धीचे प्रमाण केवळ २४ टक्के आहे, हे अत्यंत चिंताजनक आहे. गुन्हा झाल्यानंतर आरोपीला शिक्षा निश्चित मिळाली पाहिजे, तेव्हाच समाजात संदेश जाईल की अशा विकृतीला जागा नाही. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी माझी स्पष्ट मागणी आहे आणि त्या दिशेने मी स्वतः पाठपुरावा करणार आहे.”
पुढे बोलताना त्यांनी अत्याचार पीडित मुलींच्या कुटुंबीयांना सुरक्षित वातावरण देण्यावर भर देत सांगितले की, “अत्याचाराची तक्रार पालकांनी ताबडतोब केली पाहिजे. पोलिसांनीही नवीन भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करताना आवश्यक माहिती देणे बंधनकारक असल्याने त्वरित कार्यवाही झाली पाहिजे. साक्षीदार संरक्षण कायद्याचा प्रभावी वापर झाला तर आरोपी दोषी सिद्ध होण्याची शक्यता वाढू शकते.”
डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणातही अत्यंत कठोर भूमिकेतून न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्य सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून आरोपीला तत्काळ कठोर शिक्षा व्हावी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी दोषसिद्धीचे प्रमाण आणि तपास प्रक्रिया मजबूत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मुंबई, १७ नोव्हेंबर २०२५ : “शब्दांनी मनाला भिडणारा संवाद, विचारांनी हक्क आणि स्वाभिमान जागवणारा नेता, धैर्य आणि परखड भूमिकेचे प्रतीक म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. त्यांनी हिंदुत्वाची जी व्यापक व्याख्या दिली – ‘जो स्वतःला भारतीय म्हणतो तो हिंदू’ – ती आजही सर्वसमावेशक राष्ट्रवादी विचारधारेची दिशा दाखवणारी ठरते,” असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करताना केले.
हिंदुहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विधानपरिषद उपसभापती कार्यालयात डॉ. गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण केली. या प्रसंगी त्यांनी बाळासाहेबांच्या प्रेरणादायी कार्याचा तसेच त्यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत भावनिक श्रद्धांजली व्यक्त केली.
“माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी माझा अनेक वर्षांचा परिचय होता. १९९८ पासून त्यांच्या वाढदिवसाला, विजयादशमीला, संक्रांतीला आम्ही भेटायला जात असे. माझी काही पुस्तक प्रकाशने देखील त्यांनी स्वतः केलेली आहेत. मराठी माणसाचा स्वाभिमान, ८०% समाजकारण आणि २०% राजकारण, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्याची भूमिका ते दक्षिणेकडचे राजकीय प्रश्न असोत किंवा राष्ट्रीय मुद्दे – बाळासाहेबांचे नेतृत्व सदैव प्रभावी आणि तेजस्वी राहिले,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
“राजकारणात मला संजीवनी देणारे, योग्य संधी आणि दिशा देणारे बाळासाहेब ठाकरे होते. मी त्यांची कायम ऋणी आहे. आजही प्रत्येक स्मृतिदिन, जयंती किंवा महत्त्वाच्या प्रसंगी मी त्यांना अभिवादन करून प्रार्थना करते. त्यांना माझे हजार प्रणाम”, अशी कृतज्ञतापूर्वक आदरांजली डॉ. गोऱ्हे यांनी वाहिली.
गेल्या वर्षभरात विविध विषयांवर अनेक मराठी नाटकं रंगभूमीवर आली. नवीन नाटकांसोबतच जुनी गाजलेली काही नाटकं रंगभूमीवर पुन्हा अवतरली. या नाटकांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. यामध्ये बालरंगभूमी सुद्धा मागे नाही. वेगवेगळ्या विषयांच्या बालनाट्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली असताना आता ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे जुनं गाजलेलंबालनाट्य रंगभूमीवर पुन्हा धमाल करायला सज्ज झालं आहे.
२ ऑगस्ट १९५९ रोजी स्थापन झालेली भारतातील पहिली बालनाट्य संस्था म्हणजेच सुधाताई करमरकर यांनी स्थापन केलेली ‘लिटिल थिएटर अर्थात बालरंगभूमी, नीळकंठ नांदुरकर लिखित ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे धम्माल विनोदी नाटक नव्या संचात रंगभूंमीवर लवकरच घेऊन येत आहे. पूर्वी या नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे, विजय केंकरे,विनोद हडप अशा दिग्गजांनी काम केले आहे. हे नाटक त्यांनी त्याकाळी खूप गाजवले.
आता सुधाताईंच्या पश्चात निर्माती नमिता वागळे-गिरकर हे नाटक पुन्हा घेऊन येत आहेत. या नाटकात प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे धम्माल पुजारी साकारणार आहेत त्यांच्यासोबत नीता दोंदे, सागर पवार, प्रकाश अय्याळ तसेच बालकलाकार आयुष टेंबे , किनारा पाटील , गोजिरी जगदाळे या कलाकारांच्या भूमिका आहेत.
मालिका-चित्रपट दिग्दर्शक प्रशांत गिरकर हे ‘अबब विठोबा बोलू लागला’ या नाटकाचे दिग्दर्शन करीत असूनया नाटकाचे पोस्टर अनावरण प्रसिद्ध अभिनेते श्री. दिलीप प्रभावळकर व ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक श्री. विजय केंकरे यांच्या हस्ते नुकतेच झाले. मोबाईलमध्ये अडकलेल्या मुलांना व पालकांना आपल्या संस्कार व संस्कृतीचे विनोदी अंगाने दर्शन देणारे हे नाटक डिसेंबर महिन्यात रंगभूमीवर येत आहे.
• कंपनीने सहा महिन्यांच्या आत पुण्यात दुसरे परवडणारी घरे देणारे वित्तीय केंद्र उभारुन कंपनीच्या सर्वसमावेशक विकासावर भर दिला आहे.
• .ही शाखा रांजणगाव, कात्रज, लोणीकंद, शिक्रापूर यांसह नजीकच्या परिसरातील गृहकर्ज प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरेल. शाखेतील महिला कर्मचा-यांच्या पुढाकाराने स्थानिकांना परवडणा-या गृहवित्त सेवांचा थेट लाभ घेणे सुलभ होईल.
पुणे – गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपची वित्तीय सेवा शाखा असलेल्या गोदरेज कॅपिटलने आज नवी घोषणा केली. गोदरेज हाऊसिंग फायनान्स या उपकंपनीच्या माध्यमातून गोदरेज कॅपिटल आरोही उपक्रम राबवते. आता या उपक्रमांतर्गत पुण्यातील पहिली सर्व महिला कर्मचारी असलेली गृह वित्त शाखा सुरु केली जाणार असल्याचे गोदरेज कॅपिटलने जाहीर केले. पुण्यातील खराडी येथे ही शाखा उभारण्यात आली आहे. गोदरेज हाऊसिंग कंपनीने पुण्यात अवघ्या सहा महिन्यांच्या आत दुसरी परवडणारी गृह वित्त शाखा उभारली आहे. कंपनीचा हा पुढाकार त्यांची शहरातील प्रमुख बाजारपेठेत त्यांची वाढती उपस्थिती तसेच सर्वसमावेशकता आणि सुलभता यावरील निरंतर भर दर्शवते.
नवीन शाखेचे संपूर्ण व्यवस्थापन, कामकाज, विक्री, कर्जविभाग आणि ऑपरेशन्स अशा विविध भागांमध्ये कार्य करणा-या दहा महिला व्यावसायिकांच्या टीमद्वारे केले जाईल. विविध प्रकारच्या ग्राहकांना सेवा देणारी ही शाखा आर्थिक क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यात कंपनीची बांधिलकी दर्शवते. येत्या काळात कंपनी या उपक्रमाचा विस्तार करुन बीएफएसआय क्षेत्रात सक्षम कौशल्यपूर्ण आणि भविष्यासाठी तयार अशा महिला व्यावसायिकांची मजबूत फळी तयार करण्याची योजना आखत आहे.
खराडी येथील शाखा नजीकच्या रांजणगाव, कात्रज, पीसीएमसी, लोणीकंद, शिक्रापूर, लोणी काळभोर, उरळी कांचन, शिरुर आणि नजीकच्या विकसनशील प्रदेशांसाठी उपयुक्त ठरेल. पगारदार तसेच स्वयंरोजगार असलेल्या अर्जदारांसाठी ५ लाखांपासून सुरु होणारे आणि ३० वर्षांपर्यंत कालावधी असलेले परवडणारे गृहनिर्माण कर्ज दिले जाईल. कंपनीच्या वितरण-केंद्रित कार्यपद्धतीला पुढे नते ही शाखा कनेक्टर्स, बिल्डर्स आणि चॅनेल पार्टनर्सचे जाळे अजून मजबूत करुन तुलनेने कमी सेवा मिळणा-या सूक्ष्म-बाजारांपर्यंत परवडणारे गृहवित्त सहज उपलब्ध देण्याकरिता प्रयत्नशील राहील. या उपक्रमाद्वारे विशेषतः महिलांसह सर्व इच्छुक गृहस्वाम्यांना त्यांच्या स्वतःच्या कायमस्वरुपी घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्षम करणे हा कंपनीचा मुख्य उददेश आहे. #PakkaPatta.
महिला नेतृत्वाच्या सेवा देण्याच्या उपक्रमामुळे ग्राहकांशी संवाद विकसित करण्याचे उद्दिष्ट साधले जाईल, कामकाजातील कार्यक्षमता वाढेल, परिणामी कर्जप्रक्रिया जलदगतीने पार पडेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला. या शाखेत ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार वैयक्तिक, अधिक काळजीपूर्वक सेवा उपलब्ध केली जाईल. महिला कर्जदारांसाठी विशेष व्याजदरांची सुविधा देऊन कंपनी सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठीची आपली बांधिलकी अधिक दृढ करत आहे.पुण्यात गृहनिर्माण क्षेत्रातील विकास लक्षात घेता ही नवी शाखा उभारली गेल्याची माहिती गोदरेज हाऊसिंग फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेहरनोष टाटा म्हणाले, “पुण्यात परवडणा-या घरांची मागणी वाढत आहे. ही मागणी ध्यानात घेत आम्ही अफोर्डेबल हाऊसिंग फायनान्सची दुसरी शाखा उभारली आहे. सहा महिन्यांच्या आत ही दुसरी शाखा उभारली गेली. नव्याने उदयास येणा-या मोठ्या बाजारपेठांमध्ये उपस्थिती मजबूत करण्याची आमचे प्रयत्न या पुढाकारातून दिसून येतात. आरोही उपक्रमांतर्गत पहिली शाखा असल्याने तसेच शाखेत सर्वच महिला कर्मचारी असल्याने या शाखेचे महत्त्व जास्त आहे. ही शाखा आमच्या उद्देशाकडे विकसित होणारी वृद्धी दर्शवते. आरोहीच्या माध्यमातून आम्ही महिलांना नेतृत्वाची आणि प्रगतीची अर्थपूर्ण संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात अधिकाधिक कुटुंबाना स्वतःचे घर विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण करता यावे याकरिता आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.”
आरोही हे गोदरेज कॅपिटलचे सर्वसमावेशक मुख्य व्यासपीठ मानले जाते. महिला या कर्जदार, कर्मचारी, भागीदारक तसेच समुदाय नेते म्हणून घडण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. आर्थिक समावेशन, समतोल पातळीवर रोजगाराच्या संधी, कौशल्यविकास आणि धोरणात्मक सहकार्य या चार मुख्य आधारस्तंभावर आरोही उपक्रमाचा पाया रोवला गेला आहे. या चार आधारस्तंभाच्या आधारे आर्थिक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा याकरिता कंपनीकडून विविध उपाययोजना राबवल्या जातात. आरोही उपक्रमाच्या सुरुवातीपासून महिलांसाठी १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्जाचे वितरण झाले आहे. येत्या पाच वर्षांच्या काळात कंपनी १ लाखांहून अधिक महिलांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवण्याचे उद्दिष्ट ठेवत असल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.
आर्थिक तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५मध्ये गृहकर्ज वितरणांपैकी २० टक्के कर्ज महिलांना दिली गेली. या आकडेवारीतून, महिलांचा आर्थिक घडामोडीतील आणि घरमालकीमिळवण्याची आवड स्पष्ट होते. देशपातळीवर, महाराष्ट्र राज्य महिलांना गृहकर्ज देण्यात आघाडीचे राज्य ठरले. महाराष्ट्रात आर्थिक वर्ष २०२४-२५मध्ये दिलेल्या एकूण कर्जांपैकी २८ टक्के वाटा महिलांचा दिसून आला. महाराष्ट्रात पुणे हे महत्त्वाचे शहर मानले जाते. पुण्यातील वाकड, बाणेर आणि खराडीसारख्या मध्यम उत्पन्न आणि आयटी केंद्रित भागांमध्ये महिला कर्जदारांचा सहभाग सातत्याने वाढत आहे. हा वाढता सहभाग लक्षात घेत पुण्यात आरोहीची नवी महिला केंद्रित शाखा सुरु करणे ही वेळ योग्य ठरल्याचे कंपनीने स्पष्ट केले. हा उपक्रम महिलांना गृहवित्त प्रक्रिया सुलभ करुन देतो. वित्तीय क्षेत्रात योगदान देण्याकरिता उत्तम नेतृत्वगुण आणि प्रगती साधण्याची संधीही देतो.
पुणे : मल्लिका ए गझल म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेगम अख्तर यांनी गाऊन अजरामर केलेल्या अनेक गझला, दादरा व ठुमरी ऐकण्याची संधी रसिकांना लाभली. निमित्त होते कलासक्त कल्चरल फाऊंडेशन आणि आयएमए आर्ट्स सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘याद-ए-बेगम अख्तर’ या अनोख्या सांगीतिक मैफलीचे!
आपल्या दिलखेचक आणि जादूई आवाजाने बेगम अख्तर यांनी गझल, ठुमरी आणि दादराच्या माध्यमातून रसिकांना मोहित केले होते. त्यांनी आपल्या गायनातून भारतीय शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीत क्षेत्रात ठसा उमटविला होता. या मैफलीच्या निमित्ताने सुप्रसिद्ध गायक कुमार करंदीकर, श्रुती करंदीकर, गायत्री सप्रे-ढवळे यांनी सादरीकरण केले. कलाकारांना अरुण गवई (तबला), कुमार करंदीकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली. आयएमए आर्ट्स सर्कल यांच्या सहकार्याने डॉ. नीतू मांडके सभागृह, टिळक रोड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘दिवाना बनाना है तो दिवाना बना दे’, ‘दूर है मंझिल राहे मुश्किल’, ‘इश्क मे गैरते’, ‘कुछ तो दुनिया की इनायत ने’, ‘करेजवा मे लागे कटार’, ‘बलमवा तुम क्या जानो’, ‘मेरे हमनफस मेरे हमनवा’, ‘हमरी अटरिया पे आवो सावरिया’ अशा सुप्रसिद्ध रचना ऐकविल्या.
गझल हे आंतरिक संगीत असून त्यात शब्दांची लयात्मकता, सौंदर्य महत्वाचे असते. गीतकार, गझलकार शकील बदायुनी, सुदर्शन फाकिर, अली अहमद जलिली अशा गझलकारांनी रचलेल्या रचना त्यातील वैशिष्ट्यपूर्ण शब्द त्यातून निर्माण झालेले भाव आणि ते गाताना योग्य उच्चारांचे महत्त्व असे विश्लेषण करत डॉ. सुनील देवधर यांनी अभ्यासपूर्ण निवेदनातून मैफलीत रंग भरले.
कलाकारांनी प्रभावीपणे सादर केलेल्या रचनांमधून शब्द, सूर आणि भावना यांचा अनोखा मेळ साधला गेला.
प्रेम, विरह, नैराश्य, दु:ख आदी भाव प्रकट करणाऱ्या रचनांमधील सूर, नाद आणि शब्द रसिकांच्या मनात गुंजत राहिले.
कलाकरांचा सत्कार श्रीरंग कुलकर्णी, डॉ. मोहन जोशी, डॉ. भुतकर यांनी केला तर डॉ. गीतांजली शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.
पुणे: गुन्हेगारीच्या घटनांमुळे सतत चर्चेत असणाऱ्या पुणे शहरात पुन्हा एकदा एका तरुणाची निर्घृण हत्या झाली आहे. सिंहगड कॉलेजजवळ एका 20 ते 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. दगडाने ठेचून आणि कोयत्याने वार करून तरुणाची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली असून, रात्री उशिरा किंवा पहाटे हा खून झाला असावा असा अंदाज आहे. हत्येचा पॅटर्न पाहता हा पूर्वनियोजित कट असल्याचा पोलिसांना संशय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या कडेला तरुणाचा मृतदेह पाहिल्यानंतर तातडीने सिंहगड रोड पोलीस स्टेशनला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, प्राथमिक पाहणीत तरुणाच्या डोक्यावर दगडाने मारल्याच्या खुणा आणि शरीरावर कोयत्याने वार केल्याचे दिसून आलं आहे. पोलिसांनी सांगितलं की, “एका 20 ते 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. दगडाने ठेचून आणि कोयत्याने वार करत तरुणाला मारलं असल्याचा संशय आहे.” दरम्यान, सध्या, मृत तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत, जेणेकरून खुनी कोण आहे याचा छडा लावता येईल. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
बांगलादेशच्या पायउतार झालेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना १७ नोव्हेंबर रोजी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. ५८ वर्षांपूर्वी (१७ नोव्हेंबर १९६८) याच दिवशी त्यांचे लग्न झाले होते, त्यामुळे त्यांच्यासाठी ही तारीख खूप वैयक्तिक महत्त्वाची आहे.निकालाच्या तारखेबाबत सोशल मीडियावर वादविवाद सुरू झाला आहे. काहींचा असा दावा आहे की, त्यांच्या लग्नाच्या वर्धापनदिनीच त्यांना दोषी ठरवता यावे, म्हणून निर्णय जाणूनबुजून १७ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला.निकाल सुरुवातीला १४ नोव्हेंबरला निश्चित करण्यात आला होता. तथापि, १३ नोव्हेंबर रोजी आयसीटीने १७ नोव्हेंबरला निकाल देण्याची घोषणा केली. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले, “युनुस खूप हुशार आहेत… हसीनांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने तारीख १७ नोव्हेंबर करण्यात आली.” तथापि, काही जण याला केवळ योगायोग म्हणत आहेत.
ढाका:बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सोमवारी दोन आरोपांवर मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली: हत्येला प्रवृत्त करणे आणि हत्येचे आदेश देणे, ढाका येथील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने.
जुलै २०२४ च्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान झालेल्या हत्याकांडांचा सूत्रधार म्हणून न्यायाधिकरणाने त्याला नाव दिले. न्यायाधिकरणाने आणखी एक आरोपी, माजी गृहमंत्री असदुज्जमान खान यांना १२ जणांच्या हत्येचा दोषी ठरवले आणि त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.
दरम्यान, तिसरा आरोपी, माजी आयजीपी अब्दुल्ला अल-मामुन याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. मामुन सध्या कोठडीत आहे आणि तो साक्षीदार बनला आहे. न्यायालयाने हसीना आणि असदुज्ज्झमान कमाल यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. शिक्षा जाहीर होताच, कोर्टरूममधील लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
५ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या सत्तापालटानंतर शेख हसीना आणि माजी गृहमंत्री असदुज्जमान यांनी देश सोडला. दोन्ही नेते गेल्या १५ महिन्यांपासून भारतात राहत आहेत. त्यांनीच आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाची स्थापना केली, ज्याने हसीनाला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान झालेल्या युद्ध गुन्ह्यांची आणि नरसंहाराची चौकशी करण्यासाठी आणि त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी २०१० मध्ये याची स्थापना करण्यात आली.
१९७३ मध्ये न्यायाधिकरण स्थापन करण्यासाठी कायदा मंजूर झाला असला तरी, ही प्रक्रिया अनेक दशके रखडली होती. हसीना यांनी २०१० मध्ये गुन्हेगारांवर खटला चालवण्यासाठी त्याची स्थापना केली.
भारत आता शेख हसीनांना बांगलादेशला परत सोपवेल का, नाही तर काय होईल, शेख हसीनांकडे कोणते पर्याय आहेत…
प्रश्न १: बांगलादेशी न्यायाधिकरणाचा निर्णय स्वीकारण्यास भारत कायदेशीररित्या बांधील आहे का?
उत्तर: भारत आणि बांगलादेशने २०१३ मध्ये प्रत्यार्पण करारावर स्वाक्षरी केली, ज्यामध्ये दोन्ही देशांमधील गुन्हेगारांची देवाणघेवाण करण्याची तरतूद आहे. या करारानुसार, एखाद्या गुन्हेगाराचे प्रत्यार्पण फक्त तेव्हाच केले जाईल, जेव्हा…
जर दोन्ही देशांमध्ये गुन्हा गुन्हा मानला गेला तर कमीत कमी १ वर्षाची शिक्षा आरोपीविरुद्ध अटक वॉरंट या आधारावर, भारताने २०२० मध्ये शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्येतील आरोपी असलेल्या दोन दोषींना बांगलादेशला हद्दपार केले. तथापि, या कराराला दोन प्रमुख बाहेर पडण्याचे दरवाजे देखील आहेत…
१. राजकीय गुन्ह्यांसाठी तरतूद
कराराच्या कलम ६ नुसार, जर गुन्हा राजकीय मानला गेला तर भारत प्रत्यार्पणास नकार देऊ शकतो. तथापि, खून, नरसंहार आणि मानवतेविरुद्धचे गुन्हे या कलमातून वगळण्यात आले आहेत. आयसीटीने या गंभीर आरोपांवर हसीना यांना दोषी ठरवले आहे. त्यामुळे, संपूर्ण प्रकरण राजकीय असल्याचा दावा भारत करू शकत नाही.
२. निष्पक्ष सुनावणी झाली नाही.
कराराच्या कलम ८ अंतर्गत, जर आरोपीच्या जीवाला धोका असेल, त्याला निष्पक्ष सुनावणी मिळाली नसेल किंवा न्यायाधिकरणाचा उद्देश न्यायालयीन नसून राजकीय असेल, तर भारत प्रत्यार्पणास नकार देऊ शकतो. भारत हे सहजपणे दाखवून देऊ शकतो, कारण…
संयुक्त राष्ट्रांनी आधीच न्यायाधिकरणाची रचना, न्यायाधीशांची नियुक्ती आणि प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. हसीना यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वकील सापडला नाही. अनेक अहवालांनुसार, न्यायाधीशांवर सरकारी दबाव होता. १,४०० मृत्यूंच्या चौकशीवर आंतरराष्ट्रीय संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. हसीना स्वतः सतत राजकीय सूडबुद्धीचा आरोप करत आहेत. माजी भारतीय राजदूत अजय बिसारिया यांच्या मते, “भारत कोणत्याही परिस्थितीत शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार नाही. भारताने त्यांना राजकीय आश्रय दिला आहे. आशियातील हसीना यांच्यासाठी भारत सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. जर भारताने त्यांना परत पाठवले, तर बांगलादेशमध्ये अस्थिरता वाढेल, जी आणखी धोकादायक असेल.” प्रश्न २: जर भारताने शेख हसीनांना परत करण्यास नकार दिला तर काय होईल?
उत्तर: यात, दोन परिस्थिती उद्भवू शकतात…
१. बांगलादेशशी संबंध बिघडतील, राजनैतिक दबाव कायम राहील.
भारत त्यांच्या न्यायालयीन निर्णयाचा आदर करत नाही, असा दावा ढाका करत राहू शकतो. राजनैतिक वक्तृत्व वाढेल. परंतु संबंध तोडणे कठीण आहे, कारण बांगलादेश व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यासह अनेक गोष्टींसाठी भारतावर अवलंबून आहे.
२. तणाव वाढून धोरणात्मक बदल होऊ शकतो.
जर ढाका चीन आणि पाकिस्तानशी आणखी जुळवून घेत असेल, तर भारतासाठी ही एक अतिशय धोकादायक परिस्थिती असेल. पाकिस्तानी युद्धनौका आधीच बांगलादेशात पोहोचल्या आहेत. युनूस “ग्रेटर बांगलादेश” नकाशा हातात धरलेले दिसले, ज्यामुळे भारत-बांगलादेश व्यापार युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली. यामुळे भारत ईशान्येपासून बंगालच्या उपसागरापर्यंत असुरक्षित होईल.
तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, भारतासाठी सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे शेख हसीनांना तिसऱ्या देशात पाठवणे. यामुळे हसीनांची सुरक्षितता सुनिश्चित होईल आणि थेट भारत-ढाका संघर्ष टाळता येईल. काही संभाव्य देशांमध्ये युएई, यूके, कॅनडा आणि नेदरलँड्स यांचा समावेश आहे. तथापि, प्रश्न कायम आहे: हे देश यावेळी शेख हसीनांना आश्रय देतील का?
प्रश्न ३: बांगलादेश परतण्याच्या प्रश्नावर शेख हसीना काय सूचित करत आहेत?
उत्तर: शेख हसीना ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेश सोडून भारतात आल्या. त्यांनी सांगितले की, एक हिंसक जमाव पंतप्रधानांच्या निवासस्थानी घुसला होता आणि त्यांच्या जीवाला धोका होता. अलीकडील मुलाखतींमधून तीन वेगळे सूर उघड होतात…
१. आयसीटी चाचणी एक बनावट
माध्यमांना दिलेल्या अनेक निवेदनांमध्ये, हसीना यांनी त्यांच्यावरील आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत आणि आयसीटीबद्दल म्हटले आहे की, ‘हे एक कांगारू ट्रिब्यूनल आहे, जे माझे विरोधक चालवत आहेत.’ दुसऱ्या एका मुलाखतीत, त्यांनी या कारवाईचे वर्णन राजकीय सूड म्हणून केले आणि म्हणाल्या, “माझ्याविरुद्धचा खटला हा एक बनावट आहे. तो पूर्णपणे राजकीय सूड आहे. मी खटल्यात माझा बचाव करू शकले नाही, किंवा मी वकीलही ठेवू शकले नाही.” न्यायाधिकरणाच्या निर्णयापूर्वी, हसीनांनी एक ऑडिओ संदेश प्रसिद्ध केला. ज्यामध्ये म्हटले होते की, “माझे जीवन अल्लाहने दिले आहे आणि तो ते घेईल. मी जिवंत आहे आणि मी जिवंत राहीन.” २. जर तुम्हाला आयसीसीमध्ये खटला चालवायचा असेल तर ते करा; मी तयार आहे.
शेख हसीना यांनी म्हटले आहे की, न्यायाधिकरणाची कार्यवाही निष्पक्ष नाही. त्यांनी युनूस सरकारला सांगितले, “जर सरकार खरोखर प्रामाणिक असेल तर माझ्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात किंवा आयसीसीमध्ये खटला दाखल करा.” ३. ‘मी परत येईन, पण लोकशाही परत येईल तेव्हाच’
हसीना म्हणाल्या आहेत की त्या बांगलादेशात परततील, पण काही अटींवर – बांगलादेशातील निवडणुका निष्पक्ष असाव्यात, अवामी लीगवरील बंदी उठवली पाहिजे आणि राजकीय सूडबुद्धी थांबली पाहिजे. याशिवाय, जर त्यांच्या पक्षाला निवडणुकीत सहभागी करून घेतले नाही, तर सरकार कोणीही बनवले तरी त्या बांगलादेशात परतणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. प्रश्न ४: हसीनांना शेवटी कोणत्या आरोपांवर शिक्षा झाली?
उत्तर: हसीनांवर ५ आरोपांखाली खटला सुरू होता…
आरोप १: खून, खुनाचा प्रयत्न, छळ. आरोपपत्रानुसार, हसीनांनी पोलिस आणि अवामी लीगला नागरिकांवर हल्ला करण्यास प्रवृत्त केले आणि हिंसाचार थांबवण्यात अयशस्वी ठरले.
आरोप २: विद्यार्थी निदर्शकांना दडपण्यासाठी हसीनांनी प्राणघातक शस्त्रे, हेलिकॉप्टर आणि ड्रोन वापरण्याचे आदेश दिले.
आरोप ३: १६ जुलै रोजी बेगम रोकेया विद्यापीठातील विद्यार्थी अबू सय्यदच्या हत्येशी संबंधित. आरोपात असा आरोप आहे की, हसीना आणि इतरांनी हत्येचे आदेश दिले, कट रचला आणि त्यात सहभागी झाले.
आरोप ४: ५ ऑगस्ट रोजी ढाक्यातील चांखरपुल येथे सहा नि:शस्त्र निदर्शकांची हत्या करण्यात आली. या हत्या थेट हसीना यांनीच केल्या होत्या, त्यांना चिथावणी दिली होती, त्यांना मदत केली होती आणि कट रचला होता, असा आरोप आहे.
आरोप ५: या आरोपात पाच निदर्शकांना गोळ्या घालून ठार मारण्याचा आणि एकाला जखमी करण्याचा आरोप आहे. त्या पाच बळींचे मृतदेह जाळण्यात आल्याचा आणि एका निदर्शकाला जिवंत जाळण्यात आल्याचा आरोप आहे.
ढाका येथील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने त्यांना हत्येसाठी चिथावणी देणे आणि हत्येचे आदेश देणे या आरोपाखाली दोषी ठरवले. जुलै २०२४ च्या विद्यार्थी निदर्शनांदरम्यान झालेल्या हत्याकांडांचा सूत्रधार त्यांना घोषित केले.
न्यायाधिकरणाने दुसरे आरोपी, माजी गृहमंत्री असदुज्जमान खान यांनाही १२ जणांच्या हत्येचा दोषी ठरवले आणि त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.
दरम्यान, तिसरा आरोपी, माजी आयजीपी अब्दुल्ला अल-मामुन याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. मामुन हा सरकारी साक्षीदार बनला आहे. न्यायालयाने हसीना आणि असदुज्ज्झमान कमाल यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. शिक्षा जाहीर होताच, कोर्टरूममध्ये उपस्थित असलेल्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
· केवळ 12 महिन्यांत 1 लाख ईव्ही विक्रीचा आकडा गाठला, जो मार्केटची मजबूत स्वीकृती दर्शवितो.
· या ईव्हींनी 5 अब्ज किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा प्रवास केला आहे, महत्त्वाचे म्हणजे यामुळे 185 किलो मेट्रिक टन पेक्षा जास्त CO₂ उत्सर्जनाची भरपाई केली आहे.
मुंबई, 17 नोव्हेंबर 2025: महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी लिमिटेडने (एमएलएमएमएल) आजपर्यंत 3 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करत भारतातील आघाडीची व्यावसायिक ईव्ही उत्पादक म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. एमएलएमएमएल ही भारतातील पहिली ओईएम आहे ज्याने हा टप्पा गाठला आहे. कंपनीच्या या कामगिरीमुळे व्यावसायिक ईव्ही क्षेत्रात पर्यावरणपूरक वाहतूक आणि नावीन्यपूर्णतेमध्ये नवीन बेंचमार्क स्थापित झाले आहेत. तसेच कंपनी भारतातील सर्वात विस्तृत इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन पोर्टफोलिओ ऑफर करते, ज्यामध्ये ट्रिओ श्रेणी, झोर ग्रँड, ई-अल्फा 3-व्हीलर्स आणि महिंद्रा झिओ फोर-व्हीलर यांचा समावेश आहे. या ईव्हींनी एकत्रितपणे 5 अब्ज किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा प्रवास केला आहे. यामुळे 185 किलो मेट्रिक टन पेक्षा जास्त CO₂ उत्सर्जनाची भरपाई केली आहे. दुसऱ्या शब्दात हे उत्सर्जन 4.3 दशलक्ष झाडे लावण्याच्या पर्यावरणीय फायद्याएवढे असल्याचा अंदाज आहे.
प्रामुख्याने ईव्हीवर लक्ष केंद्रित करून शेवटच्या टप्प्यापर्यंत हा प्रवास सुरळीत राहील यासाठी एमएलएमएमएल सातत्याने प्रयत्नशील आहे. तसेच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल अशी परिसंस्था विकसित करण्यासाठी अनेक भागीदारांसोबत एकत्रितपणे काम करत आहे.
कंपनीच्या प्रगतीने चांगलाच वेग पकडला आहे. गेल्या अवघ्या 12 महिन्यांत 1 लाख ईव्ही विकल्या गेल्या आहेत, ज्यामुळे महिंद्राच्या इलेक्ट्रिक वाहनांवरील ग्राहकांचा विश्वास आणि त्यांना मिळत असलेली पसंती अधोरेखित होते. नवोपक्रमांना प्राधान्य आणि ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाच्या आधारे, एमएलएमएमएलने गेल्या दोन वर्षांत नवीन तसेच अपग्रेडेड उत्पादने लाँच केली आहेत. यामध्ये ट्रिओ प्लस शीट मेटल, ई-अल्फा प्लस, झोर ग्रँड रेंज प्लस आणि महिंद्रा झिओ यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी 2 लाख ईव्हींचा टप्पा गाठल्यानंतर, एमएलएमएमएलने त्यांचा ग्राहक-केंद्रित उदय एनएक्सटी उपक्रम सादर केला जो ड्रायव्हरच्या सक्षमीकरणासाठी वचनबद्ध असल्याचे दर्शवतो. ज्यामध्ये 20 लाख रुपयांचे अपघाती विमा कव्हर आणि आर्थिक समुपदेशन असे फायदे मिळतात. 3 लाख ईव्हीच्या टप्प्यासाठी, एमएलएमएमएलने iOS, Android आणि वेबवर नवीनतम NEMO प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. ड्रायव्हर्स आणि फ्लीट मॅनेजर्सना त्यांच्या वाहनांचे दूरस्थपणे व्यवस्थापन आणि निरीक्षण करण्यास NEMO प्लॅटफॉर्म सक्षम करतो. प्रमुख नवीन वैशिष्ट्यांमध्ये एकाच ऍपमध्ये मल्टी-व्हेइकल व्यवस्थापन, जिओ-ट्रॅकिंग, सर्व्हिस बुकिंग, रोडसाईड असिस्टन्स (RSA), विस्तृत चार्जिंग नेटवर्क लोकेशन्स आणि अन्य बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. हे उपक्रम गतिशीलता वाढवण्याचे आणि वाहनाच्या पलीकडे अतुलनीय संधी देण्याचे महिंद्राचे सर्वसमावेशक ध्येय अधोरेखित करतात.
महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुमन मिश्रा म्हणाल्या, “पर्यावरणपूरक गतिशीलतेच्या दिशेने सुरू असलेल्या आमच्या प्रवासात 3 लाख ईव्हीचा टप्पा गाठणे हा एक अभिमानास्पद क्षण आहे. ग्राहकांनी आमच्या ईव्हीवर ठेवलेल्या विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे. महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटीमध्ये आम्ही केवळ ईव्हीचे उत्पादन करत नाही तर आम्ही रोजगार निर्मिती करतो आणि स्वच्छ भविष्याचा पाया रचतो आहोत. अशा नावीन्यपूर्ण उत्पादनांद्वारे आम्ही इलेक्ट्रिक मोबिलिटी व्यावहारिक आणि प्रत्येकासाठी उपलब्ध करून देण्याची आमची वचनबद्धता मजबूत करत आहोत.