आमदार योगेश टिळेकर यांनी ५० लाखाची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्यावर तो दाखल करणाऱ्या पोलीस अधिकार्याची बदली झाली . त्यानंतर या बदली विरोधात मोरे यांनी मोर्चा काढला होता .आज एका हॉटेल मध्ये याप्रकरणातील तक्रारदार कंपनीचा रवी बराटे यांच्या टिळेकर हे पाया पडत असल्याची व्हिडीओक्लिप व्हायरल झाल्यानंतर वसंत मोरे यांनी हे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे आणि थोडी जरी लाज असेल तर आमदारकीचा आणि भाजयुमो अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन हे प्रकरण संपवा असे हि आवाहन त्यांनी टिळेकर यांना केले आहे . पहा आणि ऐका नेमके मोरे यांनी काय म्हटले आहे .
मुख्यमंत्री साहेब,कुठवर यांची पापं पोटात घालणार- आ. टिळेकर प्रकरणी वसंत मोरेंचा सवाल
वीजमंडळाच्या कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर – ऊर्जामंत्र्यांनी केली घोषणा
मुंबई- दिवाळीनिमित्त महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला असून सर्व कर्मचारी संघटनांच्या उपस्थितीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला.या तीन्ही कंपन्यातील विदद्युत सहायक यांना नऊ हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
ऊर्जामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एचएसबीसी फोर्ट येथे सानुग्रह अनुदानाबाबत बैठक झाली. यावेळी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन, सुत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन- एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन
पुणे- सरदार वल्लभभाई पटेल यांची 31 ऑक्टोबर रोजी जयंती आहे. हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून तसेच इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता एकता दौड कार्यक्रम विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी पुणे यांच्या उपस्थितीत विधानभवन, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे- सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे व राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेणे 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 वाजता उपस्थिती, एकता दौड प्रारंभ स्थळ – विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन, पुणे, एकता दौड प्रारंभ सकाळी 8.05 वाजता, एकता दौड मार्ग- विधानभवन-फर्स्ट चर्च रोड- साधु वासवानी चौक-अलंकार टॉकीज-जनरल वैदय मार्ग-विधानभवन परिसर असा आहे.
वैरण पिकांचे बियाणे व खते वितरण योजनेकरीता पशुपालक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत
सन २०१८-१९ या वर्षात राज्यात सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले असून पुणे जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये आंबेगाव, बारामती, भोर,दौंड, हवेली, इंदापूर,मुळशी, पुरंदर, शिरुर आणि वेल्हे चारा टंचाईची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. दुष्काळ सदृष्य परिस्थितीमध्ये वैरण पिकांचे बियाणे व खते वितरण ही योजना पशुसंवर्धन खात्यामार्फत १०० टक्के अनुदानावर पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
सदर योजनेकरिता पुणे जिल्ह्यासाठी एकूण रक्कम रु. ७० लाख इतक्या रकमेस शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. चारा टंचाईग्रस्त तालुक्यातील ज्या पशुपालक/शेतकरी यांच्याकडे किमान १० गुंठे जमीन उपलब्ध आहे. तसेच सिंचनसुविधा उपलब्ध आहे. त्यांना १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे व खते प्रती १० गुंठे रक्कम व ४६०/- च्या मर्यादेत अनुदान अनुज्ञेय असेल.
सदर योजनेचे अर्ज स्विकारण्याचा कालावधी २९ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर २०१८ असा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालक /शेतकरी यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पंचायत समिती येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय खडकी पुणे-3 यांचेमार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन खात्याचा टोलफ्री क्र. १८००२३३०४१८ ह्यावर संपर्क साधावा.
‘स्वास्थ भारत यात्रे’ अंतर्गतच्या सायकल रॅलीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करा-डॉ.जयश्री कटारे
पुणे – स्वास्थ भारत यात्रे अंतर्गत सायकल रॅली पुणे जिल्हयातुन भोर, पुणे व शिरुर दिनांक 4 ते 10 डिसेंबर 2018 या कालावधीत मार्गक्रमण करणार असून या कालावधीत सबंधित विभागांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.कटारे यांच्या अध्यक्षतेखाली स्वास्थ भारत यात्रेच्या आयोजनाबाबत बैठक घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त एस.पी.शिंदे, ए.जी.भुजबळ, पुणे ग्रामीणचे पोलीस उप अधीक्षक ए.एन.लांभाते, पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग (प्राथमिक) क्रिडा विभाग प्रमुख राजेंद्र दुमगे, जिल्हा क्रिडा अधिकारी विजय संतान, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्र.शा.काकडे, मो.ह.इंगळे आदि उपस्थित होते.
स्वास्थ भारत यात्रे ही केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालय, स्वच्छ भारत मिशन, पोषण अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या सहयोगाने भारतीय अन्न व मानके प्राधिकरण, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रलाय व इतर विभागर राबवत असतात. या स्वास्थ भारत यात्रे अंतर्गत सायकल रॅली पुणे जिल्हयातुन (भोर, पुणे व शिरुर) दिनांक 4 ते 10 डिसेंबर 2018 या कालावधीत मार्गक्रमण करणार आहे. या कालावधीत जनजागृतीच्या दृष्टीने स्वास्था मेळावे, प्रभातफेरी, आरोग्यविषयक व्याख्याने, यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा,साधनसामुग्री,उपलब्ध करुन देण्यात याव्यात. याबाबत योग्य ती खबरदारी सर्व संबधित विभागाने घ्यावी, अशा सूचनाही निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिल्या.
यावेळी सबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यंदाच्या उत्सवांत खरेदी करा केवळ आयजीआय प्रमाणित नैसर्गिक हिरे
हिरे, रत्ने व दागिने यांचा कस ठरविणारी जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त संस्था, आयजीआय हिने नामवंत सराफांशी केली भागिदारी, ग्राहकांचा विश्वास व निष्ठा यांची जपणूक करण्याचा उद्देश
हिऱ्यांच्या संदर्भात कट, कलर, क्लॅरिटी, कॅरट या चार वैशिष्ट्यांबरोबर आता पाचवे ‘कॉन्फिडन्स’हे वैशिष्ट्य ‘आयजीआय’कडून लागू
‘आयजीआय’चे प्रमाणपत्र म्हणजे खरेदी केलेला प्रत्येक हिरा हा अब्जावधी वर्षे जुना असा निसर्गाचा आविष्कार असल्याची पावतीच
पुणे-यंदा सणासुदींच्या काळात केवळ प्रमाणित केलेले नैसर्गिक हिरेच ग्राहकांनी खरेदी करावेत, असे आवाहन द इंटरनॅशनल जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (आयजीआय) या जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या स्वायत्त अशा रत्नपारखी व प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थेने केले आहे. ‘आयजीआय’ने या करीता देशभरातील 24शहरांमधील अनेक नामवंत सराफांशी सहयोगी करार केला आहे. या करारान्वये,’ अब्जावधी वर्षे जुने हिरे खरेदी करा’, असे घोषवाक्य असणारी मोहीम 5 नोव्हेंबर 2018 पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. नवरात्री, दसरा, दुर्गाष्टमी, एकादशी, शरद पौर्णिमा, करवा चौथ, धनत्रयोदशी आणि दिवाळी अशा सणांना ही मोहीम लागू असेल.
हिऱ्यांबाबत असलेला ग्राहकांचा विश्वास व त्यांची निष्ठा ही पुनर्प्रस्थापित व्हावी आणि नैसर्गिक हिऱ्यांचा वारसा पुन्हा उजळून निघावा, यासाठी ‘आयजीआय’ने मोहीम सुरू केली आहे. अब्जावधी वर्षांपासून उच्च तापमान व उच्च दाब यांखाली असलेले कार्बनचे कण एकत्र येऊन एक हिरा तयार होतो. त्याची गुणवत्ता उच्च कोटीची असते. हे त्याचे मूल्य ग्राहकांना व्यवस्थित माहीत व्हावे व त्यांना हिऱ्याची महती कळावी, यासाठी आयजीआय व तिचे सहयोगी सराफ सदस्य प्रयत्नशील आहेत. पृथ्वीवर जीव निर्माण होण्यापूर्वीपासून येथे हिरा अस्तित्वात होता. तो अजूनही त्याच अवस्थेत आपल्याला उपलब्ध होतो, हा निसर्गाचा चमत्कारच म्हणायला हवा.
‘आयजीआय इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक तेहमास्प प्रिंटर म्हणाले, ‘’नैसर्गिक हिऱ्याचे मूल्य हे त्याच्या मूळ उगमापासून सिध्द होते. हिऱ्याच्या या अब्जावधी वर्षांच्या या प्रवासाची आम्ही ‘आयजीआय’मध्ये दखल घेतो. नैसर्गिक हिऱ्याच्या वारशाला पर्याय नाही. त्यामुळेच आम्ही त्याचे हे थोरपण जगभरात प्रसारीत करीत आहोत.सणासुदीच्या काळात निसर्गाच्या या चमत्काराच्या वारशाचीच खरेदी करा, असा संदेश आम्ही देत आहोत. आयजीआय ही हिऱे, रत्ने व दागिने यांची पारख करणारी व त्यांच्या अस्सलपणाचे प्रमाणपत्र देणारी जागतिक स्तरावरील अधिकारी संस्था आहे. तिचे प्रमाणपत्र हे विश्वासाचे व खरेपणाचे प्रतिक असते. ‘आयजीआय’च्या रिपोर्टमधून व प्रमाणपत्रातून ग्राहकांना हा विश्वास मिळतो की त्यांनी खरेदी केलेला हिरा हा खरोखरच अब्जावधी वर्षांपासून पृथ्वीच्या अंतरंगात दडून राहिलेला निसर्गाचा चमत्कार आहे. या हिऱ्याचा उत्खननापासून बाजारपेठेपर्यंतचा प्रवास आयजीआयमध्ये नोंदविलेला असतो.’’
दागिन्याच्या कोंदणातील हिरा हा नीट पारखून घेतलेला आणि प्रमाणित केलेला असला, तरच त्या दागिन्याचे डिझाईन पूर्ण झाले असे म्हणता येते. कोणत्याही हिऱ्याची वैशिष्ट्ये ही चार निकषांवर मांडली जातात.. कट, क्लॅरिटी, कलर आणि कॅरट. या क अक्षरापासून सुरू होणाऱ्या चार वैशिष्ट्यांमध्ये आता आणखी एका वैशिष्ट्याची भर घातली जात आहे .. कॉन्फिडन्स. आपण परिधान करीत असलेला हिरा हा खराच अस्सल आहे, याचा आत्मविश्वास ग्राहकाला असायला हवा, यासाठी या वैशिष्ट्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळेच ग्राहकांनी खरेदी करताना आयजीआय प्रमाणित हिऱ्याचीच मागणी करायला हवी, असे ‘आयजीआय’चे आवाहन आहे.
इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (आयजीआय) विषयी ..
इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (आयजीआय) ही संस्था अॅन्टवर्प येथे 1975 मध्ये स्थापन करण्यात आली. रत्नांचे प्रमाणीकरण आणि मूल्यमापन करणारी ही जगातील सर्वात मोठी स्वायत्त संस्था आहे. अॅन्टवर्प, न्यूयॉर्क, हॉंगकॉंग, भारत, बॅंकॉक, टोकयो, दुबई, तेल अविव, कॅव्हेलीज, टोरंटो, लॉस एन्जेलीस आणि शांघाय येथे या संस्थेची कार्यालये आहेत. भारतात ‘आयजीआय’च्या मुंबईत तीन आणि कोलकता, नवी दिल्ली, त्रिसूर, सूरत, अहमदाबाद, हैदराबाद आणि जयपूरमध्ये प्रत्येकी एक इतक्या प्रयोगशाळा आहेत. आयजीआय ही चार देशांमध्ये ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅन्डर्डायझेशन’ (आयएसओ – 9001-2000) प्रमाणित संस्था आहे. जगभरात कोठेही रत्ने, हिरे व दागिने खरेदी करताना ती आयजीआय प्रमाणित असतील, तर ती अस्सल मानता येतात. ग्राहकाच्या मानसिकतेचा विचार करण्यास कटिबध्द असल्याने ‘आयजीआय’ने रत्नांचे विश्लेषण करून त्यांची प्रमाणपत्रे तयार केली आहेत. ‘आयजीआय’चे हे प्रमाणपत्र म्हणजे हिऱ्याची पाच वैशिष्ट्ये अबाधित आहेत, याची ग्वाही असते. हिरे, रत्ने व दागिन्यांचे प्रमाणीकरण आणि मूल्यमापन करणारी जगातील सर्वात मोठी स्वायत्त संस्था असल्याने‘आयजीआय’वर जगभरातील व्यावसायिकांचा व ग्राहकांचा अतूट विश्वास असतो.
लग्नाची तारीख जाहिर केल्यानंतर दीपिका-रणवीर बनले इन्टाग्राम वर नंबर वन !
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाविषयी सोशल मीडिया आणि वृत्तपत्रातून दिसणा-या तर्क-वितर्काच्या बातम्यांना पूर्णविराम लावत दीपिका-रणवीरने आपल्या लग्नाची तारीख इन्स्टाग्रामवरून जाहिर केली. ह्यामूळे दोघांचीही इंस्टाग्रामवर सध्या सर्वाधिक लोकप्रियता दिसून येते आहे
अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. ह्या आकडेवारीनूसार, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने 100 गुणांसह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अग्रणी स्थानी आपली वर्णी लावली आहे. बॉलीवूडमधल्या ह्या बहूचर्चित जोडीच्या लग्नाची वाट त्यांचे चाहते खूप काळापासून पाहत होते. आणि आपल्या चाहत्यांना इंस्टाग्रामवरून दीपिका-रणवीरने दिलेल्या सुखद वृत्तानंतर इंस्टावर दीपिका-रणवीरच्या लोकप्रियतेने उच्चांक गाठला.
स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “दीपिका-रणवीरने इंस्टाग्रावरून आपल्या लग्नाची घोषणा केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब-याच लोकांनी ही पोस्ट वाचली, लाइक आणि शेअर केली. ज्यामूळे त्यांच्या रँकिंगवर बराच फरक पडला आहे. “
अश्वनी कौल पूढे म्हणतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”
रणवीरच्याशिवाय अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शाहरुख खान आणि आमिर खानसुध्दा स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या इंस्टाग्राम रँकिंगमध्ये लोकप्रिय होते. तसेच, दीपिकाच्याशिवाय प्रियंका चोपड़ा, अनुष्का शर्मा,जैकलिन फर्नांडीज आणि सोनम कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या इंस्टाग्राम रँकिंगवर पहिल्या पाच लोकप्रिय तारकांमध्ये होत्या.
संगीत विश्वातील सुवर्ण रत्न यशवंत देव यांचे निधन
पुणे- मराठी संगीत विश्वावर आधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचे मंगळवारी पहाटेच्या सुमारास वयाच्या ९१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभंग, भावगीत, लोकगीत, युगलगीतांना त्यांनी संगीतबद्ध केले. आज (मंगळवार) सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अशक्तपणा आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांना चिकुनगुनियाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर त्यांना न्यूमोनियाही जडल्याचे निदान झाले होते. त्यादृष्टीने त्यांच्यावर उपचारही सुरू होते.
जेष्ठ संगीतकार यशवंत देव यांची माहिती.
जन्म. १ नोव्हेंबर १९२६
यशवंत देव म्हणजे शब्दप्रधान गायकी.
त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.
यशवंत देव यांचा प्रवास गाण्यातून कवितेकडे झाला. आजतागायत अनेक नाटके आणि चित्रपटासाठी गाणी लिहिली, संगीत दिले. त्याचप्रमाणे बालकविता, विडंबन, विनोदी काव्यप्रकारही लिहिले. यशवंत देवांनी हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज संगीतकार अनिल विश्वास यांना आपले गुरू मानले होते. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘ भावसरगम ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्या द्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. आचार्य रजनीश यांच्या लेखनाचा त्यांनी केलेला भावानुवादही रसिकांना आवडला.
यशवंत देव जसे एक संगीतकार आहेत तसेच ते एक उत्तम गायकही आहेत आणि त्याहीपुढे जाऊन ते एक अतिशय समर्थ असे कवीसुद्धा आहेत. त्यांनी रचलेली कैक गाणी ह्याची साक्ष देतील. जीवनात ही घडी अशीच राहू दे, श्रीरामाचे चरण धरावे दर्शन मात्रे पावन व्हावे, अशी धरा असे गगन कधी दिसेल का?, कोटि कोटि रूपे तूझी कोटी सूर्य चंद्र तारे, तू नजरेने हो म्हटले पण वाचेने वदणार कधी, प्रिया आज माझी नसे साथ द्याया, स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी, अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात, कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहा हात, अशी ही दोन फुलांची कथा, एक शिवाच्या पदी शोभते एक शवाच्या माथा….अशी एकाहून एक सरस गाणी देवांनी रचलेली आहेत. ह्यातील काही चित्रपटांसाठी, तर काही भावगीत-भक्तिगीत म्हणून रचलेली आहेत. यशवंत देवांनी कैक हिंदी मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. तसेच बावनखणी, चारचौघी, सख्खे शेजारी, घनश्याम नयनी आला अशासारख्या जवळपास ३०-४० नाटकांचेही त्यांनी संगीतदिग्दर्शन त्यांनी केले होते. ग.दि. माडगुळकरांचे गीतरामायण जसे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले, तसे माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या “कथा ही रामजानकीची” या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीत दिले होते. चिंतनशील कलाकार असणारे यशवंत देव एका फार मोठय़ा सांगीतिक कालखंडाचे साक्षीदार आहेत. स्वत:सोबत अनेकांची कारकीर्द घडताना त्यांनी जवळून पाहिली आहे. १९५१ मध्ये ते सतारवादक म्हणून एच. एम. व्ही.त नोकरीला लागले. लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम तसेच आशा भोसले यांची गाणी या काळात पुढे येत होती. हे सर्व देवांना जवळून बघायला मिळाले. एच. एम. व्ही. च्या नोकरीने देवांना अनुभवसमृद्ध केले.त्यांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिले. त्याबद्दल त्यांच्या मनात कोणतीही खंत नाही. आपल्याला चित्रपट क्षेत्रात संगीत दिग्दर्शक म्हणून कामे अर्थात ज्या काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले त्यातली त्यांची कामगिरी चोख होती. त्याचा आनंदही त्यांना लाभला होता. म्हणूनच ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ (‘कामापुरता मामा’- गीत व संगीत- यशवंत देव) हे लता मंगेशकरांच्या आवाजातलं अजरामर गीत जन्माला आलं. पुलंमुळे ते गीतकार झाले. ‘झालं-गेलं विसरून जा’ या चित्रपटाची गाणी विलक्षण गाजली.भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अशा गाण्यांच्या अप्रतिम संगीताची जादू अविस्मरणीय आणि अमर अशीच ठरली .
एच. एम. व्ही.ने स्टाफ कमी केल्यामुळे देवांची नोकरी सुटली. दरम्यान, त्यांनी गाण्याचा क्लास सुरू केला. ते स्वत: खऱ्या अर्थाने गायक नाहीत. तरुणपणात फुटलेला आवाज कधीच सांधता आला नाही, असं ते स्वत:च सांगतात. त्यावर मात करण्याचे प्रयत्नही त्यांनी केले. त्यांच्या शिष्यवर्गातील एक नामवंत नाव म्हणजे प्रख्यात पाश्र्वगायिका सुमन कल्याणपूर. (तेव्हाच्या सुमन हेमाडी!) त्यांची देवांच्या संगीत दिग्दर्शनाखालील ‘मधुवंतीच्या सुरासुरातून’, ‘श्रीरामाचे चरण धरावे’, ‘पक्षिणी प्रभाती चारियासी जाये’ ही गाजलेली गाणी त्यांनी गायली.
या गाण्यांना चाली लावताना आपली मन:स्थिती कशी होती, हेही देव विशद करताना म्हणतात, ‘गीताला सूर आपल्या डोक्यात शोधण्यापेक्षा त्या गीताच्या शब्दांतच ते दडलेले असतात हे जाणवलं. शब्दांतच सूर शोधायचे असतात हे सत्य विजेसारखं डोळ्यांसमोर आणि डोक्यात चमकलं!’’ म्हणूनच पुढच्या काळात देवांचं ‘जर कविता चांगली असेल तर त्यात चाल असतेच. मी ती फक्त शोधून काढतो!’ हे वाक्य फार गाजलं. ते नेहमी चांगल्या कवितेच्या शोधात असतात. यातूनच ‘शब्दप्रधान गायकीचे उद्गाते’ हे बिरूद त्यांना बहाल झालं. ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘पाऊस कधीचा पडतो’, ‘तिन्ही लोक आनंदाने’, ‘जीवनात ही घडी’, ‘क्षितिजावर खेळ विजेचा’ अशा अनेक भावगीतांचे / चित्रपट गीतांचे / नाट्यगीतांचे संगीतकार, ‘प्रिया आज माझी’, ‘स्वर आले दुरुनी’, इ. गीतांचे कवी, ‘शब्दप्रधान गायकी’, ‘रियाजाचा कानमंत्र’, ‘कृतज्ञतेच्या सरी’, ‘पत्नीची मुजोरी’ अशा अनेक पुस्तकांचे लेखक ‘प्रतिभावंत गीत-संगीतकार यशवंत देव’ हे अशोक चिटणीस यांनी पुस्तक लिहिले आहे. यशवंत देव यांना सलाम पुणे आणि माय मराठी डॉट नेट च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली …
गरीबांसाठी घरे नावाखाली बिल्डरांची तिजोरी भरण्याचे महापालिकेचे कारस्थान -अविनाश बागवे (व्हिडीओ)
पुणे- पंतप्रधान आवास योजनेतून ६७०० गरिबांना प्रत्येकी ३२२ चौरस फुटाचे घर देणाऱ्या १हजार ५० कोटी रुपयांच्या योजनेचा पुणे महापालिकेने केलेला प्रस्ताव म्हणजे गरिबांना घरे देण्याची कळकळ तर सोडाच पण या नावाने निव्वळ बिल्डरांच्या तिजोऱ्या कशा भरता येतील हेच पाहून केलेला प्रस्ताव असल्याची टीका आज कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी केली आहे . आज या संदर्भातल्या या वादग्रस्त प्रस्तावाला शहर सुधारणा समितीत शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने विरोध केला मात्र तो भाजपने बहुमताच्या जोरावर मंजूर केला .विशेष म्हणजे आयुक्त ,अतिरिक्त आयुक्त ,नगरअभियंता असे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित नसतानाही हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.गेल्या बैठकीत अधिकारी उपस्थित रहात नाहीत म्हणून शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षांनी तक्रार हि केली होती .
या संदर्भातील माहिती अशी कि , खराडी ,हडपसर आणि वडगाव या तीन ठिकाणी एकूण ८ प्रकल्पात ६७०० घरांच्या निर्मितीचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे. सुमारे अडीचशे कोटी मुल्याची एकूण २६ एकर जागा महापालिकेने बिल्डरला या घरांच्या बांधकामांसाठी मोफत द्यायची ,बिल्डरला विकसन शुल्कात ५० टक्के सूट म्हणजे २६ कोटी रुपयांची सूट द्यायची . आणि या ठिकाणी रस्ते ,पाणी,वीज ,ड्रेनेज अशा तदनुषंगिक सुविधा महापालिकेने स्वखर्चाने करवून द्यायच्या ,आणि प्रत्येक घरामागे केंद्र व राज्य शासन अनुदान या प्रमाणे प्रत्येकी अडीच लाख रुपये खर्च करायचे आहेत .हे सर्व झाल्यावर एका गरीब कुटुंबाला येथे ३२२ चौरस फुटाचे घर 9 लाख रुपयांना देण्यात येणार आहे .महापालिकेने या ठिकाणी रस्ते ,पाणी, वीज ,ड्रेनेज साठी किती खर्च करावा लागेल याची माहिती दिलेली नाही.
प्रत्यक्षात ३३०० रुपये चौरस फुट या दराने गरिबांना हि घरे देण्यात येणार असली तरी या घरांसाठी शासन आणि महापालिका यांच्या खर्चाचा विचार करता हि घरे एकूण नेमकी किती किमतीला पडतील याचा विचार प्रशासनाने दूरवरच ठेवला आहे .
एवढेच नव्हे तर ज्या २६ एकरावर हे ८ प्रकल्प राबविणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे ,त्यातील २० एकर जमीन अद्यापही महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही केवळ 6 एकर जमीनच महापालिकेच्या आजमितीला तरी ताब्यात आहे.विशेष म्हणजे ,आज २९ ऑक्टोबर रोजी हा प्रशासनाचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीकडे मंजुरीसाठी आला .मात्र त्यापूर्वीच 1 ऑगस्ट रोजीच या घरांच्या बांधकामांसाठी ५२० कोटी रुपये खर्चाची निविदा प्रशासनाने मागविली आहे. ज्या उद्या उघडल्या जाणार आहेत .
शहर सुधारणा समितीने आज हा प्रस्ताव मंजूर करवून तो आता स्थायी समितीच्या मंजुरी साठी पाठविला आहे . उद्याच स्थायी समितीची बैठक आहे . या बैठकीत त्यावर निर्णय होईल आणि त्यांनतर हा प्रस्ताव मुख्य सभे पुढे मंजुरी साठी जाईल .
ज्या भागात हि घरे बांधली जाणार आहेत तेथे ३२२ चौरस फुटाचे घर आज हि घ्यायचे म्हटले तर १० लाखाच्या वर त्यांची किंमत जात नाही .इथे मात्र २२५ कोटीची जमीन मोफत, कोट्यावधीची विकास कामे म्हणजे रस्ते,ड्रेनेज लाईन ,पाणी -पाण्याची लाईन मोफत ,वीज पुरवठ्याची सोय मोफत आणि वर अडीच लाखाचे अनुदान देवून गरिबांना हे घर ज्या किमतीत दिले जाणार आहे ते पाहता हि जनतेची आणि जनतेच्या शासनाकडील तिजोरीची बिल्डर साठी चालविलेली लुट च म्हणावी लागेल असा हा प्रस्ताव असल्याचा थेट आरोप केला जातो आहे .
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत मोफत घरे एकीकडे दिली जातात .दुसरीकडे या प्रकल्पात प्रत्येकाला घर देताना त्याचे नावे अडीच लाखाचे अनुदान बिल्डरला देवून वर सुमारे 9 लाखाचे कर्ज त्यांना बँकाकडून करवून घ्यावे लागणार आहे . हि कर्ज प्रकरणे होणार काय ?असा प्रश्न असताना महापालिकेच्या ताब्यात अजून २० एकर जागा देखील यायची आहे .
सध्या महापालिकेच्या ताब्यात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षणाच्या नावाने ताब्यात असलेली ११०० घरे मोकळी पडून आहेत . हि घरे तातडीने गरजूंना देता येणे शक्य आहे .या कडे मात्र अद्याप कोणी लक्ष देत नसल्याचे स्पष्ट चित्र आहे .
या संपूर्ण पार्श्वभूमीवर पंतप्रधान आवास योजनेतील गरिबांसाठी घरे या अंतर्गत पुणे महापालिका राबवीत असलेली योजना -आणि तिचा प्रस्ताव एकूणच बिल्डर धार्जिणा असून तो गरिबांची थट्टा करणारा आणि निव्वळ बिल्डरांची तिजोरी भरणारा आहे असाही स्पष्ट आरोप होतो आहे.
५१ शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
पुणे :’सैनिकांच्या योगदानासाठी शासन त्यांच्या नियमानुसार सैनिकांना आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करतच असते. पण, ज्या जवानांच्या सीमेवरील उपस्थितीने, बहादुरिने आणि बलिदानाने देशाचे, देशातील बांधवांचे रक्षण होते.
अशा जवानांच्या प्रती समाजाचेही काही कर्तव्य आहे. या जवानांच्या प्रति आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी उपक्रमांची आवश्यकता आहे’, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
निमित्त होते ‘जय महाराष्ट्र तरुण मंडळ’ (भवानी पेठ) आणि भाजप नगरसेविका सुलोचना तेजेंद्र कोंढरे यांच्या संयुक्त विद्यमाने, सीमेवर लढताना हौतात्म्य पत्करणार्या शहीद कुटुंबियांसाठी कृतज्ञता सोहळ्याचे.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ५१ शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. याप्रसंगी १२ कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये किशोर नारंग, संभाजी शिर्के, सुरेश भेंगडे यांचा समावेश होता.
१५ ज्येष्ठ समाजसेवकांचा देखील सन्मान करण्यात आला. युद्धात अपंगत्व आलेल्या जवानांना व्हीलचेअरचे वाटप गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले.
‘देशावर आक्रमण होऊ नये म्हणून छातीवर शत्रुची गोळी झेलणाऱ्या कुटुंबियांना सलाम करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष होते’, असे तेजेंद्र कोंढरे यांनी प्रास्ताविकात बोलताना सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजेंद्र कोंढरे आणि सूत्रसंचालन जतिन पांडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश गोगावले (भारतीय जनता पार्टी, पुणे शहर) होते. पोलीस अधिकारी स्वाती चितलकर, नगरसेवक राजेश येनपुरे, महेश लडकत तसेच ‘फाईट’ चित्रपट फेम सायली आणि जीत हे कलाकार उपस्थित होते.
झी मराठी अवॉर्ड्स २०१८च्या विजेत्यांची नावे पहा …
झी मराठीच्या मालिका प्रेक्षकांमध्ये कमालीच्या लोकप्रिय आहेत. सायंकाळची साडेसहाची वेळ झाली की ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमापासून झी मराठी ही वाहिनी घराघरात सुरु होते आणि ‘रात्री जागो मोहन प्यारे’ मालिकेपर्यंत प्रेक्षक मनोभावे हे कार्यक्रम बघतात. ‘लागिरं झालं जी’, ‘तुला पाहते रे’ असो की ‘तुझ्यात जीव रंगला’ यातील सर्व व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. ‘माझ्या नव-याची बायको’मधील राधिकाच्या समस्या प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. ‘चला हवा येऊ द्या’ ची मंडळी प्रेक्षकांना खळखळून हसवतात तर ‘गाव गाता गजालीची’ मालवणी मंडळी प्रेक्षकांना रोज नव्या नव्या गजाल सांगून त्यांचं मनोरंजन करतात. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या भव्यतेने प्रेक्षकांचे डोळे दिपून गेले आहेत.
झी मराठीवरील याच मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अॅवॉर्ड्स. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो. नुकताच हा गौरव सोहळा झी मराठी वाहिनीवर प्रसारित झाला आणि त्याचसोबत प्रेक्षकांनी भरभरून मत दिलेले त्यांचे लाडके कलाकार विजयी ठरले.
ही आहेत झी मराठी अवॉर्ड्स २०१८च्या विजेत्यांची नावे
सर्वोत्कृष्ट मालिका – तुला पाहते रे
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम – चला हवा येऊ द्या
सर्वोत्कृष्ट नायिका – राधिका (माझ्या नवऱ्याची बायको)
सर्वोत्कृष्ट नायक – विक्रांत सरंजामे (तुला पाहते रे)
सर्वोत्कृष्ट जोडी – राणा-अंजली (तुझ्यात जीव रंगला)
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (पुरुष) – ईशाचे वडील (तुला पाहते रे)
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (महिला) – राधिका (माझ्या नवऱ्याची बायको)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (पुरुष) – बरकत (तुझ्यात जीव रंगला)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (महिला) – रेवती (माझ्या नवऱ्याची बायको)
सर्वोत्कृष्ट भावंडं – राणा-सुरज (तुझ्यात जीव रंगला)
सर्वोत्कृष्ट सून – अंजली (तुझ्यात जीव रंगला)
सर्वोत्कृष्ट सासू – राधिकाची सासू (माझ्या नवऱ्याची बायको)
सर्वोत्कृष्ट सासरे – राधिकाचे सासरे (माझ्या नवऱ्याची बायको)
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा – राहुल्या (लगीरं झालं जी)
सर्वोत्कृष्ट आई – ईशाची आई (तुला पाहते रे)
सर्वोत्कृष्ट वडील – ईशाचे बाबा (तुला पाहते रे)
सर्वोत्कृष्ट कुटुंब – निमकर कुटुंब (तुला पाहते रे)
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक – संकर्षण कऱ्हाडे (आम्ही सारे खवय्ये)
सर्वोत्कृष्ट खलनायिका – नंदिता (तुझ्यात जीव रंगला)
सर्वोत्कृष्ट खलनायक – हर्षवर्धन (लगीरं झालं जी)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार – लाडू (तुझ्यात जीव रंगला)
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत – तुला पाहते रे
याच सोबत या सोहळ्यात झी मराठीवरील अनेक लोकप्रिय मालिकांना श्रवणीय आणि अजरामर शीर्षकगीतं देणाऱ्या संगीतकार अशोक पत्की यांना देखील जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अॅक्रुअल ओरिएंटेड फंडांकडे वळण्यासाठी आदर्श वेळ
भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली असल्याने, गुंतवणूकदार कमी कालावधी विचारात घेता उत्पन्नातील स्थिरता व उच्च अॅक्रुअल यातून फायदा मिळण्यासाठी शॉर्ट टर्म इन्कम फंडांचा विचार करत आहेत.
असाच एक फंड म्हणजे यूटीआय शॉर्ट टर्म इन्कम फंड. या फंडाचे उद्दिष्ट, सरासरी मुदतपूर्ती 4 वर्षे असलेल्या मनी मार्केट सिक्युरिटीज व हाय क्वालिटी डेट् पोर्टफोलिओतून कमी जोखीम व उच्च रोखता याद्वारे चांगले उत्पन्न मिळवणे, हे आहे. हा फंड उच्च क्रेडिट गुणवत्ता व पोर्टफोलिओचे वैविध्यीकरण यांना महत्त्व देतो.
यूटीआय शॉर्ट टर्म इन्कम फंडाचे फंड मॅनेजर सुधीर अग्रवाल म्हणाले, “आगामी आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सीपीआय महागाई 5% च्या दिशेने जाण्याची अपेक्षा असताना, महागाई विशिष्ट प्रमाणापर्यंत नियंत्रित करण्याचा दबाव आरबीआयवर असू शकतो. तसेच, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने आयातीचा खर्च वाढला असल्याने, येत्या काही तिमाहींत सीपीआयसंबंधी जोखीम वाढू शकते. अशा स्थितीत, गुंतवणूकदारांनी शॉर्ट टर्म इन्कम फंडांकडे वळण्यास सुरुवात करावी. कारण, हे फंड हाय अॅक्रुअल व कमी चढ-उतार असणारे आहेत. गुंतवणूकदारांनी 1 ते 3 वर्षे गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवून, आमच्या शॉर्ट टर्म इन्कम फंडांचा विचार करावा.”
यूटीआय शॉर्ट टर्म इन्कम फंडाने सातत्याने क्रिसिल शॉर्ट-टर्म बाँड फंड इंडेक्स या बेंचमार्कपेक्षा सरस कामगिरी केली आहे. फंडाने स्थापनेपासून 8.57% परतावा दिला आहे, तर बेंचमार्कने दिलेला परतावा 7.56% आहे (सप्टेंबर 30, 2018 पर्यंत).
आयआयएफएल होम फायनान्स परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात हरित इमारतींना चालना देणार
आघाडीची गृहवित्त कंपनी असलेल्या आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेडने परवडणाऱ्या दरातील गृहवित्त आणि शाश्वत राहणीमानाच्या दिशेने कुटुंब या खास उपक्रमाद्वारे पाऊल टाकले आहे. या द्वारे परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात हरित इमारतींना चालना दिली जाते. या योजनेला उद्योगातील तज्ज्ञ आणि रिअल इस्टेट विकासकांच्या भागीदारीत सुरुवात केली असून त्यातून ते हरित इमारतींसाठी साधनसुविधा आणि ज्ञानाधारित मॉडेलचा विकास करत आहेत.
नॅशनल हाऊसिंग बँक (एनएचबी), इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (आयएफसी), ग्रीन बिझनेस सर्टिफिकेशन आयएनसी (जीबीसीएल), सीडीसी ग्रुप यूके आणि अशोक बी लाल आर्किटेक्ट्स यांनी या खास उपक्रमाचा भाग होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सर्वोच्च राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून या उपक्रमाला सहकार्य आणि गौरव प्राप्त होत आहे.
प्राधिकरण क्षेत्रात सुविधा पुरविण्यासाठी पीएमारडीएचे वडगाव मावळ येथे क्षेत्रीय कार्यालय
पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(पीएमारडीए)च्या माध्यमातून ग्रामीण भागात नागरी
सुविधा पुरविण्यासाठी वडगाव मावळ येथे दुसरे क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे. अन्न आणि
औषध प्रशासन, संसदीय कार्य तथा पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते क्षेत्रीय कार्यालयाचे उदघाटन
करण्यात आले.
सोमवारी दि. २९ ऑक्टोबर रोजी हवेली तालुक्यातील वडगाव पंचायत समिती येथे हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमास मा. ना. पालकमंत्री गिरीष बापट, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे,
आमदार बाळा भेगडे, पीसीएनटीडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे, महानगर आयुक्त किरण गित्ते, सभापती
गुलाब म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्य अर्चना ढोरे,
उपजिल्हाधिकारी सुहास मापारी, अधीक्षक अभियंता मिलिंद बोंगाळे, कार्यकारी अभियंता भरत कुमार
बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
मा. पालकमंत्री गिरीष बापट म्हणाले की,’पुणे विभागाबरोबरच ग्रामीण भागाच्या विकासासाठी
पीएमआरडीए आहे. भविष्यात तिसरी मुंबई व्हायची असेल तर तळेगाव हा विकासाचा केंद्र बिंदू असणार
आहे. रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज या मूलभूत सुविधा पीएमारडीएच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत.
एमआयडीसीला जोडणारे सर्वात तीन मोठ्या रस्त्याचे काम पीएमआरडीएच्या माध्यमातून हाती घेतले जाणार
आहे. नागरिकांना कामकाज सोईचे पडेल अशा दृष्टीने सदरचे कार्यालय आहे.’
आमदार बाळा भेगडे म्हणाले, ‘पीएमारडीएच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला गती मिळणार आहे. जांभूळ
ते सांगवी, कोठुरने ते मळवंडी ठुले, सोमटणे फाटा ते तळेगाव हे 10 किलोमीटरच्या रस्त्यांचे कामकाज
पीएमारडीएच्या करणार आहे. तसेच अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे काम या स्थानिक
कार्यालयातून होणार असल्याने आम्हांला दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागाला खऱ्या अर्थाने कायापालट
करण्याचे काम पीएमआरडीए करत आहे.
महानगर आयुक्त किरण गित्ते म्हणाले, ‘पुणे व पिंपरी चिंचवडचा मोठ्या प्रमाणात विकास होत असताना
पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पीएमारडीएची स्थापना झाली आहे. नागरिकांना सर्व कामकाज
सोईच्या दृष्टीने व्हावे याकरिता चार कार्यालय स्थापन करण्यात आले आहे.
मावळ व खेड तालुक्यासाठी बांधकाम परवानगी व झोन दाखला, अनधिकृत बांधकाम तक्रारी निवारण
यासारख्या अनेक कामकाजासाठी पीएमारडीएच्या औंध कार्यालयात जावे लागणार नाही. सर्व पायाभूत
सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायती सोबत राहून पीएमारडीए काम करणार आहे. नागरिकांचा वेळ
वाचण्यास मदत होणार आहे. या उद्देशाने वडगाव मावळ येथील प्रादेशिक कार्यालय सुरू करण्यात आले
आहे.’
ब्राम्हण समाजाला आरक्षण नको संरक्षण द्या
आ. मेधा कुलकर्णींना सणसणीत चपराक -ग्रामीण तरुणीची …
पुणे- ग्रामीण भागातून राष्ट्रवादीच्या संविधान बचाव कार्यक्रमाला आलेल्या एका युवतीने अस्सल पुणेकर म्हणता येईल अशा कोथरूडच्या भाजप आमदार मेधा कुलकर्णींना सणसणीत चपराक ‘राष्ट्रवादीच्या संविधान बचावो ‘ कार्यक्रमातून बोलताना खुद्द शरद पवार ,अजित पवार ,सुप्रिया सुळे आदी नेत्यांच्या समक्ष लगावली . ब्राम्हणांनी देशाचे नेतृत्व केले आणि करतील असे वक्तव्य आ. कुलकर्णी यांनी केले होते या वक्तव्याचा समाचार घेत तिने हि चपराक लगावली.महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीमाई फुले होत्या म्हणून ..तुम्ही इथपर्यंत पोहोचल्या .आणि आमदार झाल्या . नाहीतर तुमच्यासह तुमच्या सारख्या घरात भाकऱ्या थापत बसल्या असत्या . अशा वाक्यात हि चपराक दिली .
भाजपमधील वाचाळनेत्यांचा हि तिने आपल्या भाषणात समाचार घेतला .सक्षणा सलगर असे या युवतीचे नाव असून ती राष्ट्रवादीच्या प्रदेश युवती विभागाची अध्यक्ष आहे .खा. वंदना चव्हाण ,फौजिया खान,दिलीप वळसे पा.,चेतन तुपे पाटील ,सुभाष जगताप ,राजलक्ष्मी भोसले,नंदा लोणकर,अश्विनी कदम,मनाली भिलारे आदी असंख्य मान्यवर नेते मंडळी यावेळी उपस्थित होती.


