Home Blog Page 3054

व्यंगचित्रांच्या माध्यमातून वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन….स्नेह्यांनी जागविल्या मंगेश तेंडुलकरांच्या स्मृती….

0
पुणे-आपल्या व्यंगचित्रांचे वाटप करून त्याद्वारे वाहतूक नियमांबाबत जागृती चे कार्य दरवर्षी करणाऱ्या  मंगेश तेंडूलकर यांच्या नंतरही त्यांचा उपक्रम राबवून ..आणि पुढे तसाच चालू ठेवण्याचा निर्धार करत तेंडूलकरांच्या  स्नेह्यांनी आज त्यांच्या आठवणींना उजाळाही दिला .
ज्येष्ठ व्यंगचित्रकार व समीक्षक मंगेश तेंडुलकर हे सामाजिक कार्यात ही अग्रेसर होते.विशेषतः पुण्यातील वाहतूक समस्येबाबत ते खूपच संवेदनशील होते व नागरिकांनी वाहतूकीचे नियम पाळले तर रस्ते अपघातात कोणाचा जीव जाणार नाही असे त्यांचे मत होते.मार्मिक व्यंगचित्रांच्या माध्यमातून नागरिकांना वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन ते करत असत.यासाठी त्यांनी ऐन दिवाळीत नागरिकांना शुभेच्छा देणारे व्यंगचित्र आणि त्यातून वाहतूक नियम पालनाचे आवाहन करणारे भेटकार्ड वाटण्याचा उपक्रम नळस्टॉप चौकात सुरु केला होता.दर वर्षी दिवाळीत चार दिवस ते आपल्या सहकाऱ्यांसह असे हजारो व्यंगचित्र वाटत असत.
त्यांच्या निधनानंतर ही त्यांचा हा उपक्रम सुरु रहावा आणि त्यांच्या स्मृती जागृत रहाव्यात यासाठी त्यांच्या कन्या वंदना तेंडुलकर ढवळे,नात श्रावणी ढवळे,शुभंकर ढवळे यांनी पुढाकार घेतला आणि आज सकाळपासून नळस्टॉप चौकात ह्या उपक्रमाला सुरुवात झाली.तब्बल दहा हजार कार्ड वाटणार असल्याचे वंदनाताई म्हणाल्या.या वेळी पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी,ह्या उपक्रमात सुरुवातीपासून सहभागी होणारे क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,आपला मुलगा रस्ते अपघातात गमावणारे गुरुसिद्ध्य्या स्वामी आणि सौ शशी स्वामी हे दांपत्य,आपली मुलगी अपघातात गमावणाऱ्या सुनंदा जप्तीवाले,तेंडुलकरांचे स्नेही सौ दीपा देशपांडे आणि श्री किरण देखणे सहभागी झाले होते.
उद्या सकाळी ९:३० वाजता नळस्टॉप चौकात पुन्हा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्राचे 59 मिनिटात कर्जाच्या योजनेला प्रोत्साहन

0

पुणे: आज पुण्यामध्ये केंद्र सरकारच्या लघु उद्योग आणि नव-उद्योजकांच्या सहाय्यार्थ प्रारंभ केलेली योजना मोदी सरकारचा लघु उद्योगांना करत असलेल्या प्रोत्साहनाचा एक भाग असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री हंसराज अहिर यांनी केले. ते पुढे म्हणाले की, या योजनेमुळे व्यापार आणि उद्योगांना मोठी चालना आणि विश्वास प्राप्त होणार आहे. राज्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात बँक ऑफ महाराष्ट्राने लघु उद्योजकांना केलेय आर्थिक मदतीचा विशेष उल्लेख करून सांगितले बँकेने या क्षेत्रात केलेले काम स्पृहरणीय आहे.

गणेश क्रीडा मंडळ येथे आयोजित या कार्यक्रमामध्ये खासदार श्री अनिल शितोळे, जिल्हाधिकारी श्री नवल किशोर राम यांच्यासह बँक ऑफ महाराष्ट्रचे सरव्यवस्थापक यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे जाहीर प्रक्षेपणाची जिल्ह्याची अग्रणी बँक, बँक ऑफ महाराष्ट्राने इतर बँकांच्या सहकार्याने आयोजिली होती. यावेळी सदानंद दाते, आय पी एस एम एच – सह सचिव, एस डी लोकेश जे डी विदेश व्यापार हे देखील उपस्थित होते.

बँक ऑफ महाराष्ट्रचे सरव्यवस्थापक श्री दत्ता डोके यांनी या योजनेचे पोर्टल www.psbloansin59minutes.com बाबत माहिती दिली आणि त्याचे महत्व विशद केले. पोर्टलच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या नोंदणी, सादरीकरण, अवधि आणि वैधता यासह शासनाने घेतलेल्या पुढाकाराबाबत सविस्तर माहिती दिली. नवोद्योजकांना बँकेच्या योजना, संबंधित योजना आणि आर्थिक सहाय्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. शासनाच्या पीएमइजीपी, स्टँड अप इंडिया तसेच पीएमएमवाय योजनांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राने घेतलेल्या पुढाकाराची माहिती दिली.

यावेळी लघु उद्योगांना केलेल्या सहाय्याची तसेच विविध नवोद्योजकांसाठीच्या योजनांची माहितीचे सादरीकरण केले गेले. या राष्ट्रीय कार्यक्रमास उत्तेजन देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राने जोमदार पुढाकार घेतला असून कर्ज प्रकरणे मंजूर केली असल्याची माहिती दिली गेली.

एमएसएमई यांच्या सहाय्यर्थ असलेल्या योजनांची माहिती इतर बँका तसेच डीजीएफटी, बीआयएस यांनी दिली. या कार्यक्रमाचे उद्दीष्ट लघु उद्योजकांना प्रगतिच्या जलद गतीचा मार्ग निर्माण करणे हा आहे.

या योजनेचा मुख्य कार्यक्रम दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेकडो नवोद्योजकांना मार्गदर्शनाने झाला. कार्यक्रमास देतील अनेक बँकांचे प्रतींनिधी, हितचिंतक यांच्या उपस्थितीत झाला आणि त्याचे प्रक्षेपण 80 विविध जिल्ह्यात झाले.

महाराष्ट्राला मोहवणाऱ्या त्रयींनी सुगंधी झाली ‘ पुण्यभूषण ‘ ची दिवाळी पहाट !

0
पुणे :गदिमांची शब्दांची लय, पुलंचा अजरामर विनोद आणि सुधीर फडके  यांच्या अवीट चाली दिवाळीच्या पहाटे भेटीला आल्या… अन् पुणेकर रसिकांना दिवाळी सार्थकी लागल्याची अनुभूती आली !
निमित्त होते त्रिदल, पुणे , पुण्यभूषण फाऊंडेशन, लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २, तसेच कोहिनूर ग्रुप यांनी आयोजित केलेल्या ‘दिवाळी पहाट ‘ कार्यक्रमाचे !
महाराष्ट्राला मोहवणाऱ्या गदिमा, बाबूजी, पु.ल. या त्रयींच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘तिहाई ‘ हा सांस्कृतिक कार्यक्रम या ‘दिवाळी पहाट ‘ मध्ये सादर करण्यात आला.
या  कार्यक्रमातील सांस्कृतिक कार्यक्रम ‘ आशय सांस्कृतिक ‘ ने प्रस्तुत केले.
गदिमा यांचे सुपुत्र आनंद माडगूळकर, पुलंचे भाचे दिनेश ठाकूर, सुधीर फडके यांचे मानसपुत्र मानले जाणारे सूर्यकांत पाठक यांनी आभाळाइतक्या उंचीच्या त्रयींच्या ह्रदयस्पर्शि आठवणी सांगून तो मंतरलेला काळच जणू जागा केला !
शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या ५ संस्थांचा ‘ पक्के पुणेकर सन्मान ‘ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यात
पुणे नगर वाचन मंडळ,डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स, आर्य संगीत प्रसारक मंडळ, ( श्रीनिवास जोशी ), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी,अखिल मंडई मंडळ, ( अण्णा थोरात ), डेक्कन कॉलेज या संस्थांचा समावेश होता.
कृष्णकुमार गोयल, वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, लायन्स क्लब चे रमेश शहा उपस्थित होते.
मधुरा वेलणकर , प्रवीण जोशी यांनी निवेदन केले. गदिमा,पुल, बाबुजी या त्रयींची दुर्मीळ ध्वनीचित्रफिती दाखवण्यात आल्या.बाबूजींच्या आवाजातील ‘ ने मजसी ने परत मातृभूमीला ‘ गीत ऐकविण्यात आले.
‘ माझे जीवनगाणे ‘ संजीव मेहेंदळे , स्वरदा गोखले, मंजिरी जोशी यांनी गीते गायली.
सांग तू माझा होशील का ? तुझे गीत गाण्यासाठी,’त्या तिथे , पलिकडे ‘   विकत घेतला श्याम, का रे दुरावा,    जाळीमंदी पिकली करवंद ‘ ही लावणी, कौसल्येचा राम , एका तळ्यात होते ‘ अशा अनेक सुरेल गीतांची बरसात रसिकांवर झाली.
संजीव मेहेंदळे व स्वरदा गोखले,यांनी गीतरामायणातील ‘ राम जन्मला ‘, ‘ पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ‘  ही गीतेही सादर केली.रमाकांत परांजपे , राजू जावळकर, काटे, माधवी करंदीकर, मंदार यांनी साथसंगत् केली.
नेहा मुथीयान यांच्या ‘कथक पाठशाला ‘च्या विद्यार्थिनींनी ‘ ज्योती कलश छलके ,’ ‘इथेच टाकू तंबू ‘ या गीतावर नृत्य सादर केले
डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले.काका धर्मावत यांनी सूत्रसंचालन केले.

शालेयस्तरावर चांगले विज्ञान शिक्षक निर्माण व्हावेत- डॉ. गोविंद स्वरूप

0

पुणे : “विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी शालेय स्तरावर चांगले विज्ञान शिक्षक निर्माण व्हायला हवेत. भारतीयांकडे विज्ञानाची दूरदृष्टी आहे. मात्र, अंमलबजावणीत आपण मागे पडतो. त्यासाठी शाळा-महाविद्यालयांत विज्ञान कार्यशाळा व्हावयाला हव्यात,” अशी अपेक्षा ज्येष्ठ रेडिओ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांनी व्यक्त केली.

‘उचित माध्यम’ प्रकाशित ‘संवाद…सर्जनशील मनाशी’ विज्ञान-तंत्रज्ञान विशेषांकाच्या प्रकाशनावेळी डॉ. गोविंद स्वरूप यांची नितीन शास्त्री यांनी मुलाखत घेतली. विद्यार्थी सहायक समितीच्या आपटे वसतिगृहातील मोडक सभागृहात रंगलेल्या या मुलाखतीवेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चचे (आयसर) डॉ. अरविंद नातू, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, ‘संवाद’चे कार्यकारी संपादक जीवराज चोले, उचित माध्यमच्या रेश्मा चोले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

डॉ. गोविंद स्वरूप म्हणाले, “डॉ. होमीबाबा यांच्याबरोबर मला काम करता आले. त्यांची दूरदृष्टी अफाट होती. उटी आणि खोडद येथील जीएमआरटी महाकाय दुर्बिणीची निर्मिती करण्याचे भाग्य मला मिळाले. विज्ञान प्रसाराचे कार्य अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने करीत आहेत. विज्ञान संस्थाही ‘ओपन डे’ ठेवून मुलांना विज्ञानाविषयी आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत. मात्र, शालेय वयातच विज्ञानाची गोडी विद्यार्थ्यांना लागायची असेल, तर आपल्याला चांगले आणि प्रयोगशील विज्ञान शिक्षक घडवायला हवेत. विज्ञान लहान मुलांपर्यत पोहोचणे गरजेचे आहे, त्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न झाले पाहिजे विज्ञानाची ओळख लहान वयात झाली तरच भविष्यात शास्त्रज्ञ निर्माण करु शकतो.”

डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, “विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मानवाचे जीवन अधिक सुखकर झाले आहे आणि प्रगतीही वेगाने होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान हा माणसाच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग झाला आहे. तंत्रज्ञानाचे प्रवाह कायम बदलत असून त्यानुसार माणसाला बदलणे गरजेचे आहे कारण त्याला स्पर्धेमध्ये राहणे गरजेचे आहे. यंत्रमानवामुळे माणसाचे जगणे अधिक सोपे होणार असले तरी त्याच्यासोबतच माणसाचे भविष्यामध्ये मोठे संघर्ष होणार आहेत.”

डॉ. अरविंद नातू म्हणाले, “विज्ञानाच्या माध्यमातूनही करिअर करता येते ही माहिती तरुण मुले आणि त्यांच्या पालकांपर्यत पोहोचविणे गरजेचे आहे. विज्ञानाचा ज्ञानाबरोबरच संपत्ती निर्माण करण्यासाठीही उपयोग होऊ शकतो हे तरुणांना पटवून दिले तर विज्ञानाचा अधिक प्रचार आणि प्रसार होऊ शकेल.”

डॉ. रवींद्रकुमार सोमण व डॉ. कमालकांत वडेलकर यांनीही मनोगते व्यक्त केली. स्वागत-प्रास्ताविक जीवराज चोले यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मण जाधव यांनी केले.

नोटबंदी चूक कि बरोबर हे काळच ठरवेल – पालकमंत्री (व्हिडीओ)

0

पुणे- नोट बंदी च्या निर्णयावर अनेकांनी आपापली वेगवेगळी मते जरी व्यक्त केली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटबंदी चा निर्णय चूक होता कि बरोबर होता हे काळच ठरवेल ,काळच या निर्णयाचे मूल्यमापन करेल असे वक्तव्य आज येथे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले .
‘सही है नोटबंदी ‘या चित्रपटाच्या पोस्टर चे अनावरण आज धनत्रयोदशी च्या मुहूर्तावर बापट यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेवक योगेश समेळ ,दीपक पोटे आणि चित्रपटाचे दिग्दर्शक बाळासाहेब गोरे तसेच कलावंत आणि सहायक उपस्थित होते .
पहा आणि ऐका यावेळी पालकमंत्री काय म्हणाले ….

दिवाळी निमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची सजावट (व्हिडीओ)

0

पुणे-सण आणि श्रद्धा यांचा अनोखा मिलाप भारतीय संस्कृतीत अजूनही घरोघरी अनुभवायला मिळतो .हल्ली दिवाळीत पर्यटनस्थळे गजबजवून टाकणारी मंडळी दिसू लागली तरीही अपरंपार श्रद्धा येथे चिरकाल राहणार असल्याची ग्वाही पावलोपावली मिळते . दिवाळीचा सण आणि ईश्वराचे मनोभावे स्मरण या दोन्ही गोष्टींची घरात,मनात  आणि देवळात देखील आनंदाने उधळण होत आली आहे . एकादशी, वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा आणि भाऊबीज असा आठवडाभर चालणारा  मनात रेंगाळणारा हा प्रकाशाचा उत्सव. पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणाधीशाच्या मंदिरात हि आनंदाची आणि भक्तिभावाची उधळण करतो आहे . या निमित्त या मंदिराची करण्यात आलेली हि सजावट पहा …..

महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी हिंदकेसरी योगेश दोडके यांच्यासह राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष टकले यांच्यावर गुन्हा दाखल

0

पुणे- महापालिकेची आर्थिक फसवणूक आणि खोटी बिले सादर करुन ५० लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर लक्ष्मण टकले व विश्वस्त हिंदकेसरी योगेश दोडके यांच्या विरुद्ध  फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आऱ आऱ भळगट यांनी नुकताच याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार गोरखनाथ सोमनाथ भिकुले(रा़ भवानी पेठ) यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.
राष्टीय तालीम संघचे अध्यक्ष दामोदर दोडके असून योगेश दोडके विश्वस्त आहेत़. राष्ट्रीय तालीम संघाने पुणे महापालिकेच्या सहकार्याने महापौर कुस्ती स्पर्धेचे २०१६ मध्ये आयोजन केले होते़. ही स्पर्धा खराडी येथे पार पडली होती़ या स्पर्धेसाठी महापालिकेने १ कोटी ८३ लाख ४ हजार २१४ रुपये खर्च केला होता़. त्यातील १ कोटी २६ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश पुणे महापालिकेने राष्ट्रीय तालीम संघाला निधी स्वरुपात दिला होता़. त्या रक्कमेपैकी तालीम संघाच्या विश्वस्तांनी संगनमत करून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी तालीम संघाच्या कुठल्याही सभासदांना विश्वासात न घेता तसेच कुठलीही सर्वसाधारण सभा न घेता, कुठलाही ठराव न करता बेकायदेशीरपणे परस्पर आपापसात संगनमत करून बनावट बिले तयार करून लाखो रुपयांची रक्कम काढली आहे.

याबाबतची लेखी तक्रार पुणे मनपा आयुक्तांना देखील करण्यात आली होती. हे प्रकरण तालीम संघाचे माजी सरचिटणीस गोरखनाथ भिकुले यांनी समोर आणले आणि कारवाई करण्याची मागणी केली. परंतु कारवाई होत नसल्याने अखेर तालीम संघाच्या सभासदांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के करीत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कचरावेचक कामगारांचा सन्मान

0
पिंपरी । प्रतिनिधी : 
पिंपळे गुरव-सांगवी प्रभाग क्र. 29, 31 आणि 32 मधील महापालिकेच्या सर्व सफाई महिला कामगारांचा साडी, मिठाई देऊन; तर पुरुष कामगारांचा संपूर्ण पोशाख देऊन सन्मान करण्यात आला. सोबतीला मिठाईचा गोडवा आणि ’सांज स्वरांची : अभंगवाणी- मंगलगाणी’ या कार्यक्रमाचा आस्वादही कामगारांना घेता आला. यामध्ये आणखी भरीस भर म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री चंदा (दीप्ती सोनावणे)ची सोबत कामगारांसाठी खूपच आनंददायी ठरली.
पिंपळे गुरवमधील नटसम्राट निळू फुले नाट्यग्रहात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कचरावेचक कामगारांच्या यथोचित सन्मान सोहळ्याचे, तसेच ‘सांज स्वरांची : अभंगवाणी-मंगलगाणी’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी नगरसेविका शोभा आदियाल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजूअण्णा जगताप, तृप्ती जवळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष श्याम जगताप, अमरसिंग आदियाल, शिवाजी पाडुळे, तानाजी जवळकर, गौरव टण्णू, सामाजिक कार्यकर्ते हुसेन मुलाणी आदींनी केले होते.
‘सांज स्वरांची : अभंगवाणी-मंगलगाणी’ कार्यक्रमाची सुरुवात ‘ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था’ या गाण्याने गायक नितीन कदम यांनी केली. या पहिल्याच गाण्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यानंतर गायिका अर्चना सुतार यांनी ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ हे गीत गात वातावरण दिवाळीमय करून टाकले. त्याला रसिकांची टाळ्यांची दाद मिळाली. माजी स्वीकृत नगरसेवक शिवाजी पाडुळे यांनी ‘विठ्ठल आवडी’ गात सर्वांनाच अचंबित केले. ‘मनाच्या धुंदीत लहरीत येना’ या गीताला उत्स्फूर्त दाद मिळाली. अवघ्या 12 वर्षे वयाच्या यशश्री निकाळजे या उभरत्या गायिकेने गायलेले ‘दिपावली मनाये सुहानी’ रसिकांची वाहवा मिळवून गेले. तसेच अस्मिता देशमुख हिने गायलेल्या ‘मन बसिया’ या गीतालाही रसिकांनी चांगली दाद दिली. त्यानंतर शिवाजी पाडुळे यांनी गायलेले ‘गं साजनी’ गाण्याने वातावरणात चैतन्य आले. तर पाडुळे यांनी सहगायकाच्या साथीत गायलेल्या ‘राजा सर्जाची हनाम जोडी’ या गाण्याने वन्समोअर मिळवला. ‘माऊली…. माऊली’ आणि ‘साई बाबा आला’ या गाण्यात रसिक तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. एकंदरीत अनेक स्वरांच्या सादरीकरणातून गायकांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले. तर आभार अमरसिंग आदियाल यांनी मानले.
चंदाने जिंकली रसिकांची मने
 
 ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री चंदा (दीप्ती सोनावणे) व्यासपीठावर येताच सर्वांनी टाळ्याच्या कडकडाटात तिचे स्वागत केले. तिनेही त्याला तेवढ्याच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. चंदा उर्फ दीप्तीसोबत सेल्फी, फोटो काढण्यासाठी सफाई कामगार महिलांनी एकच गराडा घातला होता. आपले मनोगत व्यक्त करताना दीप्ती यांनी सांगितले, की आपल्या हातून सफाई कामगारांचा सन्मान होत आहे, ही माझ्यासाठी मोलाची गोष्ट आहे. दिवाळीच्या शुभेच्छा दीप्ती म्हणाल्या, गेली दोन वर्षे मालिकेच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने कोल्हापूरमध्येच असते. त्यामुळे दिवाळीलाही येता आले नव्हते. यंदा मात्र आवर्जून दिवाळीसाठी पुण्यात आपल्या घरी आले आहे. माझे आई-बा, सासू-सासरे, पती यांच्यासोबत यंदाच्या दिवाळीचा आनंद लुटायला मिळतो आहे, ही माझ्यासाठी खूप आनंददायी गोष्ट आहे.

लाव्हाने Z81 च्या निमित्ताने स्मार्टफोनमध्ये उपलब्ध केली स्टुडिओ फोटोग्राफी

0
  • उत्कृष्ट फोटो टिपण्यासाठी नव्या Z81 मध्ये आर्टिफिशिअल इंटलिजन्सच्या (एआय) वापराने स्टुडिओ फोटोग्राफीचा समावेश
  • Z81 ने डीएसएलआरमधील स्प्लॅश मोड हा पर्याय स्मार्टफोनमध्ये समाविष्ट करून स्मार्टफोन फोटोग्राफीमध्ये आणली क्रांती
  • फ्रंट व रिअर कॅमेरा या दोन्हींमध्ये स्टुडिओ मोड – 13 मेगापिक्सल फ्रंट व 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा
  • सर्वसाधारण वापर केल्यास 1.5 दिवस चालणारी शक्तिशाली 3000 mAh लि-पॉलिमर बॅटरी*

 

नवी दिल्लीयंदा सणासुदीला लाव्हा Z81 स्मार्टफोनमुळे स्वतःचे वेगळेपण दाखवून द्या. लाव्हा इंटरनॅशनलने, अप्रतिम इमेज टिपण्यासाठी तयार केलेल्या स्टुडिओ मोड फोटोग्राफीचा समावेश असलेला Z81 आज दाखल केला. अचूक इमेज काढण्याच्या दृष्टीने डेप्थ-ऑफ-फिल्ड परिणाम देण्यासाठी स्टुडिओ मोडमध्ये आर्टिफिशिअल इंटलिजन्सचा वापर केला जातो. हे उत्कृष्ट कॅमेरा वैशिष्ट्य असलेला, परवडणाऱ्या स्मार्टफोन श्रेणीतील Z81 हा एकमेव स्मार्टफोन आहे.

 

ग्राहकांना आता इमेजला सहा आकर्षक, स्टुडिओ दर्जाचे लायटिंग इफेक्ट देण्यासाठी आता स्टुडिओ मोड हे वैशिष्ट्य वापरता येऊ शकते.

 

  • स्प्लॅश – सब्जेट रंगीत राहील व सुंदर बोकेह बॅकग्राउंड दिसेल, असा फोटो काढला जातो.
  • स्टेज लाइट – सब्जेट रंगीत राहील व बॅकग्राउंड पूर्णपणे काळी दिसेल, असा फोटो काढला जातो.
  • स्टेज लाइट मोनो – सब्जेट मोनोक्रोममध्ये व काळी बॅकग्राउंड, असा उत्तम व आकर्षक इफेक्ट पिक्चरला दिला जातो.
  • नॅचरल – सब्जेक्टचा स्किन टोन नैसर्गिक दिसतो व बोकेह बॅकग्राउंड दिसते.
  • व्हायब्रंट – सब्जेक्टला ग्लोइंग इफेक्ट देण्यासाठी फेशिअल फीचर्स ब्राइट केले जातात.
  • काँटूर बोकेह बॅकग्राउंड आणि फेशिअल फीचर्स उठून दिसण्यासाठी डायरेक्शनल लायटिंग उपलब्ध आहे.

 

Z81च्या 13 मेगापिक्सल रिअर कॅमेऱ्यामध्ये (फ्लॅशलह) नॅचरल, व्हायब्रंट, काँटूर व स्प्लॅश मोड यांचा समावेश आहे, तर 13 मेगामिक्सल फ्रंट कॅमेऱ्यामध्ये (फ्लॅशलह) सर्व सहाचा समावेश आहे.

 नवा लाव्हा Z81 दोन प्रकारांत मिळेल – 2GB व 3GB. 3GB प्रकाराची किंमत 9499 रुपये आहे आणि तो ब्लॅक व गोल्डर कलर या पर्यायांत देशभर रिटेल आउटलेटमध्ये व फ्लिपकार्ट, अॅमेझॉन व स्नॅपडील या प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइटवर मिळेल. कंपनी 2GB प्रकार लवकरच दाखल करणार आहे.  

याविषयी बोलताना, लाव्हा इंटरनॅशनलचे अध्यक्ष सुनील रैना यांनी सांगितले, आमच्या ग्राहकांसाठी लाव्हाकडून आणखी एक पहिलेवहिले वैशिष्ट्य सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे – अत्यंत आकर्षक व शक्तिशाली Z81. प्रचंड आवाज व गर्दीच्या काळात, सर्वांपासून आपले वेगळेपण दाखवणे गरजेचे आहे; आणि आमचा Z81 स्टुडिओ मोडद्वारे नेमके हेच करतो. आमच्या ग्राहकांना हे वैशिष्ट्य अतिशय उपयुक्त वाटेल व त्यांना आधुनिक स्मार्टफोन फोटोग्राफीचा अनुभव घेता येईल. Z81 हे उपयुक्त तंत्रज्ञान उपलब्ध करण्याच्या आमच्या उद्दिष्टाचे प्रतिक आहे”.

लाव्हा Z81 अँड्रॉइड 8.1 + स्टार OS 5.0 यावर चालेल व त्यास 3GB RAM व 32GB ROM यांचे पाठबळ आहे – ग्राहकांना स्मार्टफोनचा उत्तम अनुभव मिळेल आमि म्युझिक, व्हीडिओ, पिक्चर्स, अॅप्लिकेशन व अन्य डाटासाठी भरपूर स्टोअरेज मिळेल.

केवळ 7.99 मिमी थिक, लाव्हा Z81 मध्ये 5.7” HD+ IPS (कॉर्निंग गोरिला ग्लास 3चे संरक्षण) स्क्रीन असून, त्यामुळे अखंडित व उत्तम पद्धतीने फोटो-व्हीडिओ पाहता येतात. त्यास 2.0 GHz क्वाड कोर हेलिओ A22 चिपसेटचे पाठबळ असून, हा या श्रेणीतील सर्वात वेगवान व सर्वात कार्यक्षम प्रोसेसर आहे. त्यामुळे Z81 युजरना एआय तंत्रज्ञानाचा वापर करता येतो – त्यामध्ये या श्रेणीतील सर्वोत्तम कॅमेरा व सेफ्टी फीचर्स, सिम्प्लिफाइड व सोयीचे ब्राउजिंग व जास्तीत जास्त बॅटरी लाइफ आहे.

3000 mAh बॅटरी एकदा चार्ज केल्यावर 1.5 दिवसांपर्यंत टिकते. बॅटरीला एआय तंत्रज्ञानाचे पाठबळ आहे – यामुळे फोन बॅटरीच्या वापराची पाहणी केली जातेच, शिवाय युजरने बराच वेळ न वापरलेले व बॅकग्राउंडला सुरू असलेले अॅप आपोआप बंद केले जातात. तसेच, त्यामध्ये बॅटरीची कामगिरी उंचावण्यासाठी पॉवर सेव्हर मोड, सुपरपॉवर सेव्हर मोड, अॅप इंटलिजंट पॉवर सेव्हर मोड व स्मार्ट क्लीन फीचर अशी शक्तिशाली वैशिष्ट्ये आहेत.

 हा स्मार्टफोन युजरना 15 भारतीय भाषांमध्ये एसएमएस वाचण्याचा पर्यायही देतो.

लाव्हाने Z81 कीबोर्ड अॅप अपग्रेड करून स्विफ्टकी कीबोर्ड देण्यासाठी मायक्रोसॉफ्टशी भागीदारी केली आहे. युजरना पर्सनल वर्ड प्रेडिक्शन व करेक्शन सुविधा देण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या स्विफ्टकीमध्ये आर्टिफिशिअल इंटलिजन्सचा वापर केला जातो. तसेच, स्विफ्टकीमुळे युजरना कीबोर्ड सेटिंग न बदलता, एकाच वेळी पाचपर्यंत भाषांमध्ये टाइप करता येते आणि स्थानिक भारतीय लिपी एकत्र करता येतात.

स्मार्टफोनबरोबर मोफत वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट ही विशेष लाँच ऑफर दिली जाणार आहे. ही ऑफर जानेवारी 31, 2019 पर्यंत खरेदी करण्यात येणाऱ्या लाव्हा Z81 साठी लागू आहे.

*इंटर्नल टेस्ट रिझल्ट

दिवाळीतही पर्यटनासाठी गोवा ठरले पर्यटकांचे सर्वात पसंतीचे ठिकाण – ओयो

0
  • गोव्याने सर्वात पसंतीचे हॉलिडे ठिकाण म्हणून मारली बाजी, त्यानंतर जयपूर, दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू, नैनिताल व उदयपूर यांचा क्रमांक
  • गोव्यातील वार्षिक बुकिंगमध्ये 179%* वाढ (फूटर पाहा)
  • गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीच्या कालावधीत एकंदर बुकिंगमध्ये 190% वाढ झाल्याचे ओयोचे निरीक्षण* (फूटर पाहा)
  • यंदाच्या सणासुदीसाठी कलंगुट व बागा यांनी नोंदवली सर्वाधिक पर्यटक संख्या
  • साऊथ गोव्याच्या तुलनेत नॉर्थ गोव्याला पर्यटकांची अधिक पसंती

पणजी -दिवाळी दारात असताना  संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कालावधीमध्ये, लोक घरामध्ये लज्जतदार पदार्थ व मिठाई आणतात, त्याशिवाय कार्ड पार्टी व अन्य अनेक उपक्रमांचा आनंद घेतात. दिवाळी हा भारतातील अतिशय लोकप्रिय सण आहे, हे वेगळे सांगायला नको. पारंपरिक पद्धतीने, हा दिव्यांचा सण कुटुंबीयांना व मित्रमंडळींना एकत्र आणणारा असला तरी आता कालानुरूप त्याचे स्वरूप बदलते आहे. या वर्षी सणासुदीचा आनंद घेत असताना जोडपी व व्यक्ती यांच्यामध्ये नवा ट्रेंड दिसून येत असून, ते हॉलिडचा बेत आखण्यास पसंती देत आहेत.

घरी थांबण्याऐवजी कुटुंबाबरोबर किंवा एकट्याने प्रवास करण्यासाठी लोकांचा कल वाढत असल्याचे आढळले आहे. हा ट्रेंड सुरू होण्याची विविध कारणे आहेत. त्यातील एक कारण म्हणजे, सुटीसाठी बरेच दिवस उपलब्ध असल्याचे लोकांच्या लक्षात आल्यावर प्रवासाची तीव्र इच्छा निर्माण होते. अशा वेळी, अनेक पर्यटनप्रेमी बॅग भरतात आणि आराम करण्यासाठी व ताजेतवाने होण्यासाठी एखाद्या ठिकाणाची निवड करतात. दुसरे कारण म्हणजे, राहण्याची दर्जेदार, सुंदर सोय सहज उपलब्ध असल्याने, नवनवीन साहस अनुभवण्यासाठी पर्यटक सरसावतात.

ओयोने केलेल्या विश्लेषणानुसार, गोव्यामध्ये दिवाळीच्या कालावधीदरम्यान प्री-बुकिंगमध्ये वार्षिक 179% वाढ झाली आहे. पर्यटकांची सर्वाधिक पसंती गोव्याला असून तेथे सर्वाधिक बुकिंग केले जात आहे, तर त्यानंतर जयपूर, दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू, नैनिताल व उदयपूर यांचा क्रमांक लागतो. कलंगुट व बागा या ठिकाणांनी बाजी मारली असून, अधिकाधिक पर्यटकांनी तेथे यंदाची दिवाळी साजरी करण्याचे नियोजन केले आहे. तसेच, साऊथ गोव्याच्या तुलनेत नॉर्थ गोव्याला पर्यटकांची अधिक पसंती आहे, असे आढळले आहे.

याचबरोबर, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीच्या कालावधीसाठी एकंदर प्री-बुकिंगमध्ये 190% वाढ झाल्याचे ओयोचे निरीक्षण आहे. दिवाळी जवळ येत असल्याने हे प्रमाण अंदाजे 250% पर्यंत वाढू शकते, असे ओयोचे मत आहे. एकंदर बुकिंग ट्रेंड पाहता, सोलो ट्रॅव्हलमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे आढळत आहे. दक्षिणय आशियातील या सर्वात मोठ्या हॉटेल साखळीने स्वतंत्र बुकिंगमध्ये तब्बल 110% वाढ झाल्याची माहिती दिली आहे, तर कपल बुकिंगमध्ये वार्षिक 96% वाढ झाली आहे. चौथ्या तिमाहीच्या संपूर्ण कालावधीमध्ये, पर्यटकांची राहण्यासाठी पसंती अधोरेखित करत, ओयोने बुकिंगमध्ये तब्बल 180% वाढ झाल्याचे स्पष्ट केले आहे.

सर्वात आकर्षक मुद्दा म्हणजे – हॉस्पिटॅलिटी कंपन्या प्रवाशांचे स्वागत करत आहेत आणि ग्राहकांना त्यांच्या घराप्रमाणे वाटावे, यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ओयो या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या व जगातील झपाट्याने वाढत्या हॉटेल साखळीने ओयो होम व ओयो टाउनहाउस असे पर्याय उपलब्ध केले आहेत आणि कुटुंबीय व मित्रमंडळी यांच्याबरोबर सणाचा आनंद घेत असताना खासगीपणाही राखला जाईल, याची काळजी घेतली आहे.

नगरसेविका प्रा. सौ. ज्योत्स्ना गजानन एकबोटे यांच्या वतीने दिवाळी निमित्त गौरव सोहळ्याचे आयोजन

0

पुणे-

नगरसेविका प्रा. सौ. ज्योत्स्ना गजानन एकबोटे यांच्या वतीने दिवाळी निमित्त  पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचारी यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन आज करण्यात आले होते . मॉडेल कॉलनी डेक्कन जिमखाना परिसरातील स्वच्छता, विदयुत, किटक प्रतिबंधक, व सर्व आरोग्य कर्मचारीवर्ग, यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. या वेळी नगरसेविका प्रा. सौ. ज्योत्स्ना गजानन एकबोटे यांनी आपल्या मनोगतात या पुढील काळात महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी व  त्याचे कुटुंबिय यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी लवकरच आरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात येणार आहे अशी घोषणा यावेळी त्यांनी केली. स्वच्छता हीच सेवा मानून काम करण्यासाठी योगदान देणा-या  पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचार्यांचे योगदान मोठे आहे .

 भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियाना संदर्भातील  माहिती यावेळी नगरसेविका प्रा.सौ. ज्योत्स्ना गजानन एकबोटे यांनी  दिली. आपल्या सर्व कर्मचारी वर्गाच्या योगदानामुळे भारत एक दिवस स्वच्छ भारत म्हणून ओळखला जाईल याची मला खात्री आहे. आपण दैनंदिन रित्या प्रभाग स्वच्छ करत आहात त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होत आहे. माझ्या प्रभागातील प्रत्येक स्वच्छता कर्मचारी हा माझा रियल हिरो आहे त्याचप्रमाणे माझ्या परिवाराचा सदस्य आहे. असे त्यांनी आपल्या मनोगतात मत व्यक्त केले .

 या कार्यक्रमास प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे , तसेच प्रभागातील कार्यकर्ते, योगेश सावरकर, देवेंद्र साठे, विलास लाड ,ॠषीकेश कोंढाळकर ,महेश गायकवाड , प्रकाश साबळे , हेमंत शेवाळे , विवेकानंद भरगुडे,  व महापालिकेचे प्रमुख आरोग्य निरीक्षक आय.एस.इनामदार , तसेच प्रभागातील सर्व आरोग्य निरीक्षक शिवाजी गायकवाड , निलीमा काकडे , कविता खरात , किरण  मांडेकर , शिवाजी नलावडे  यावेळी उपस्थित होते.

कोकणी माणसाच्या हातून मुंबई निसटतेय ! उद्योजकतेची कास धरा ! :खा . आढळराव पाटील

0
७ व्या ‘ ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’ चा समारोप 
पुणे :’मुंबई घडविण्यात कोकणवासियांचा खूप मोठा वाटा असला तरी आज कोकणी माणसाची जागा बिहारी ,राजस्थानी माणसांनी घेतली आहे . मराठी माणूस छोटी कामे करण्यास कमीपणा वाटून घेत असल्यास तो कमीपणा न मानल्यास भविष्यात त्यातूनच मोठा उद्योजक घडू शकतो ‘ असे मत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले .
७ व्या ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल ‘ चा समारोप खासदार शिवाजीराव आढळराव -पाटील यांच्या उपस्थितीत झाला . यावेळी ते बोलत होते . अध्यक्षस्थानी ग्लोबल कोकण फेस्टिव्हल चे संयोजक आणि कोकण भूमी प्रतिष्ठान चे प्रमुख संजय यादवराव हे होते .
हा समारोप कार्यक्रम मेस्से ग्लोबल एक्झिबिशन सेंटर (लक्ष्मी लाँन ,मगरपट्टा सिटी ,पुणे ) येथे रविवारी सायंकाळी झाला . यावेळी माजी महापौर राजलक्ष्मी भोसले ,’वनराई ‘चे अध्यक्ष  रवींद्र धारिया , ‘हिरवळ प्रतिष्ठान’ चे अध्यक्ष किशोर धारिया ,फेस्टिव्हल चे सहसंयोजक ‘एक्झिकोन ग्रुप ‘चे प्रमुख एम . क्यू . सय्यद ,उद्योजक रामदास माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
हा फेस्टिव्हल १ ते  ४ नोव्हेंबर २०१४ च्या दरम्यान झाला . कोकणचे उद्योग ,पर्यटन ,कला ,संस्कृती ,स्वयंरोजगार ,कृषी विषयक प्रदर्शन -चर्चासत्रे ,फॅशन शो या फेस्टीव्हल मध्ये आयोजित करण्यात आले होते
समारोप कार्यक्रमात बोलताना खा . आढळराव म्हणाले ,’कोकणातील सर्व उद्योजकांना एकत्र करून आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल भरवून मोठे ग्लोबल मार्केट संयोजकांनी उपलब्ध करून दिले आहे . हा उल्लेखनीय प्रयत्न आहे . प्रथमपासून भारताची औद्योगिक राजधानी मुंबई वर कोकणी माणसाचे प्राबल्य होते . आता मात्र ही पकड निसटत असून बिहारी ,राजस्थानी माणसाची संख्या वाढत आहे . मराठी माणूस छोटी कामे करण्यास कमीपणा वाटून घेत असल्यास तो न मानल्यास भविष्यात त्यातूनच मोठा उद्योजक घडू शकतो. त्यामुळे आता उद्योजकतेची कास धरली पाहिजे . ‘
‘कोकणाचा विकास होताना शहरात आलेले कोकणवासीय पुन्हा कोकणात जाऊन आपला आणि प्रदेशाचा उत्कर्ष साधतील तो खरा सुदिन म्हणावा लागेल ‘असे प्रतिपादन वनराई ‘ चे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी यावेळी बोलताना केले .
‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल ‘ च्या निमित्ताने पुण्यात कोकणविषयक काम करणाऱ्या ३०० संस्था एकत्र आल्या ,हे मोठे यश आहे . येत्या मार्च मध्ये १ हजार कोकणी उद्योजकांची परिषद पुण्यात आयोजित केली जाणार आहे ‘ अशी माहिती संजय यादवराव यांनी यावेळी बोलताना दिली .
फेस्टिव्हल मध्ये सहभागी उद्योजक ,कलाकार ,हितचिंतकांच्या सत्कार खा . आढळराव -पाटील यांच्या हस्ते करण्यात आला . एम . क्यू . सय्यद यांनी आभार मानले

24 नोव्हेंबरला एसयूव्हीचा नवा धमाका , Y400 चे नाव अल्तुरास G4

0

ठळक वैशिष्ट्ये

·        24 नोव्हेंबर 2018 रोजी दाखल होणार

·        हाय एंड एसयूव्ही श्रेणीमध्ये स्पर्धा करणार

·        डीलरशिपमध्ये आजपासून प्री-बुकिंग सुरू

 मुंबई-: महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम) या 20.7 अब्ज डॉलर उलाढालीचा भाग असलेल्या कंपनीने आपल्या अत्यंत प्रतीक्षेच्या व कोडनेम Y400 असणाऱ्या हाय-एंड एसयूव्हीचे नाव अल्तुरास G4 हे असल्याचे आज जाहीर केले आहे

 अल्तुरास G4 विषयी बोलताना, एमअँडएम लि.चे सेल्स व मार्केटिंग प्रमुख वीजय नाकरा म्हणाले, अल्तुरास याचा अर्थउंचीकिंवाशिखर’. आयुष्यामध्ये यशाचे शिखर गाठलेल्या व्यक्तींना लक्झरीमध्ये प्रवेश करण्याच्या द्वाराचे प्रतिनिधित्व अल्तुरास G4 करते. हे वाहन अतिशय लक्झरिअस असल्याने, त्याचे डिझाइन व निर्मिती उत्कृष्ट असल्याने, त्याचे अल्तुरास G4 हे नाव या वाहनाची वैशिष्ट्ये अचूकपणे स्पष्ट करते, असे आम्हाला वाटते.”

 हाय एंड एसयूव्ही सेग्मेंटमध्ये समाविष्ट असलेली अल्तुरास G4    30+ लाख रुपये (एक्सशोरूम) किंमत असणाऱ्या वाहनांशी स्पर्धा करणार आहे. अल्तुरास G4 च्या ठसठशीत व आकर्षक डिझाइन व लक्झरिअस अंतर्भागामध्ये लक्झरी व वैशिष्ट्यपूर्णता समाविष्ट आहे. उल्लेखनीय कामगिरी व ऑफ-रोड क्षमता, अतिशय सुरक्षितता व या श्रेणीतील सर्वोत्तम वैशिष्ट्ये यामुळे अल्तुरास G4 अधिक आकर्षक ठरते.

अल्तुरास G4 ची निर्मिती महाराष्ट्रातील चाकण येथील कंपनीच्या उत्दन प्रकल्पामध्ये केली जाणार आहे आणि ती 24 नोव्हेंबर 2018 रोजी दाखल केली जाणार आहे. अल्तुरास G4 साठी डीलरशिपमध्ये आजपासून प्री-बुकिंग सुरू होणार आहे.

जलयुक्त शिवार अभियानामुळे वाफगांव झाले हिरवेगार

0

पुणे :-  खेड शहरापासून सुमारे 15 किमी. अंतरावर वसले आहे ऐतिहासिक वाफगांव. पूर्णत: पावसाच्या पाण्यावर येथील ग्रामस्थ शेती करीत होते. वर्षामध्ये जेमतेम एकवेळा ज्वारीपीक, पावसाळयात घेता येत होते. मात्र जलयुकत्‍ शिवार अभियानात येथे दोन के.टी.वेअर बंधारे बांधण्यात आले आणि त्यामुळे या परिसराचा कायापालटच झाला. जिल्हा प्रशासनाने  लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियानात दोन के.टी.वेअर बंधारे बांधले. यामुळे गावामध्ये शाश्वत पाणीसाठा उपलब्ध झाला. शाश्वत पाणीसाठी उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थांनी पारंपरिक पिकांबरोबरच नगदी पिके घेण्यास सुरुवात केली. भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाल्याने, विहीरीच्या पाणी पातळीत 1 ते 1.50  मी.पर्यत वाढ झाली. यामुळे आता गावाला बारमाही संरक्षित पाणी उपलब्ध झाले आहे. ठीबक सिंचनाचा वापर करुन आता टोमॅटो, फुलकोबी, मका, भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात झाली आहे. तसेच चारापिके घेतल्यामुळे जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्नही निकाली निघाला.

विविध नगदी पिके घेतल्यामुळे, ग्रामस्थांच्या उत्पन्नात वाढ झाली, त्यामुळे शासनाने अजून के.टी.वेअर बंधारे बांधवयास हवे, अशी प्रतिक्रिया येथील शेतकरी यशवंतराव बबनराव सुर्वे यांनी भेटीप्रसंगी दिली. त्यांचे स्वत:चे शेतीतील उत्पन्न गेल्या दोन वर्षात दुप्पट झाले असल्याची माहितीसुध्दा त्यांनी दिली. जलयुक्त शिवार अभियानातील कामांपूर्वी, गावामध्ये नोव्हेंबरनंतर पाण्याचा प्रश्न निर्माण होत असे. आता मात्र जवळपास वर्षभर पाणी उपलब्ध होते, अशी माहिती त्यांनी दिली. शेतीमधील उत्पादनाला मंचर, खेड व पुणे येथे मोठी बाजारपेठ उपलब्ध असल्यामुळे, उत्पादित केलेल्या शेतमालाच्या विक्रीचाही प्रश्न सुटला असल्याचे त्यांनी आनंदाने सांगितले.

“गावात पाणी वाढले, त्यामुळ शेतीचे उत्पन्न वाढले व त्यामुळे जीवन वाढले”,अशी भावना शेतकरी जयेश वसंतराव जवळेकर यांनी व्यक्त केली. गावात भरपूर पाणी उपलब्ध झाल्यामुळे, ग्रामस्थांचे स्थलांतर कमी झाले. सुमारे 4000 लोकवस्तीच्या गावाला पिण्यासाठी, शेतीसाठी व जनावरासाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे टँकर बंद झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

पावसाळयातील पाण्यावर पूर्वी फक्त ज्वारी पिक घेत होतो, पाण्याच्या उपलब्धतेमुळेआता मका, कांदा, बटाटा अशी कमी पाण्यात येणारी नगरी पिके घेत असल्याचे, ग्रामस्थ गणेश हनमंत थीटे यांनी सांगितले. त्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे घरामध्ये आनंदी वातावरण असल्याचे म्हणाले.

अरुण सिताराम क्षिरसागर यांनी जलयुक्त शिवार अभियानातील कामामुळे त्यांच्या विहीरीला पाणी वाढल्याचे सांगितले. यामुळे मका व भाजीपाला पिकांसह जनावरांसाठी चारा उपलब्ध झाल्याची माहिती दिली.

रमेश मनोहर कऱ्हाळे यांनी शेततळयातील गाळ जलयुक्त शिवार अभियानामधील कामामध्ये काढल्यामुळे, पाणी साठवण क्षमता वाढून, दोन हंगामामध्ये विविध पिके घेता येणे शक्य झाल्याची भावना व्यक्त केली. या शेततळयामुळे वारुडे, वाफगांव, गुळाणी व पारगांव या गावामधील ग्रामस्थांना ड्रीपद्वारे पिकांना पाणी उपलब्ध झाले आहे. त्यांनासुध्दा विविध नगदी पिके घेणे शक्य झाल्याची माहिती दिली. या कामामध्ये समस्त गांवकरी, युवक, महिला वर्ग व विद्यार्थी यांचा सहभाग लाभल्यामुळे जलयुक्त शिवार अभियान यशस्वी झाल्याचे दिसून येते.

शासनाची मदत व लोकसहभाग यामुळे परिसराचा कायापालट होतो, याचे वाफगांव उत्तम उदाहरण आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचे अनुकरण करण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले.

‘कोकण विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट, आराखडा करावा

0
‘जगातील अर्थसत्तेचा केंद्रबिंदू : कोकण ‘परिसंवादाला चांगला प्रतिसाद 
पुणे : मुंबईचा केंद्रबिंदू कोकणाकडे सरकत असल्याने कोकण विकास सुनियोजित होण्यासाठी कोकण विकासाचे, कोकण विभागाचे व्हिजन डॉक्युमेंट, विकास आराखडा आणि विभागीय आराखडा (रिजनल प्लॅन) तयार करावा, त्या प्रक्रियेत तज्ज्ञांना समजून घ्यावे, असा सूर ‘जगातील अर्थसत्तेचा केंद्रबिंदू : कोकण ‘  परिसंवादात उमटला.
ग्लोबल कोकण फेस्टिवल च्या पूर्वसंध्येला ‘जागतिक अर्थसत्तेचा केंद्रबिंदू भारत, भारतीय अर्थसत्तेचा केंद्रबिंदू कोकण ‘ या परिसंवादात अनेक अपेक्षा व्यक्त झाल्या.
अध्यक्षस्थानी ‘ ग्लोबल कोकण फेस्टिवल ‘चे अध्यक्ष संजय यादवराव होते. या परिसंवादात नवी मुंबई, सिडको चे नगररचनाकार  दिनकर सामंत, वसई -विरार चे पहिले महापौर राजीव पाटील, अमेरिकेतून खास महोत्सवाला आलेले उद्योजक ललित महाडेश्वर, संजय यादवराव, उद्योजक किशोर धारिया अनेक मान्यवर यांनी सहभाग घेतला.
हा कार्यक्रम मेस्से ग्लोबल एक्झिबिशन सेंटर, लक्ष्मी लॉन्स, मगरपट्टा सिटी , हडपसर येथे ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झाला त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
दिनकर सामंत म्हणाले, ‘बंदरे, रस्ते, विमानतळ, रेल्वे ने कोकण जोडले जात आहे. खनिजे, निसर्ग, शेती, पर्यटन, वारसा याने कोकण समृद्ध आहे. मगर नगर रचनाशास्त्राच्या दृष्टीने सुनियोजित विकास झाला पाहिजे. रोजगार, पर्यटन वाढवले पाहिजे. विस्थापन रोखले पाहिजे.
संजय यादवराव म्हणाले,’भारत महासत्ता होताना , मुंबई- कोकण चे महत्व वाढत आहे. विकासाचा केंद्रबिंदू कोकणात सरकत आहे. आता चाकरमानी मानसिकतेतून कोकण वासियांना बाहेर काढून उद्योजकतेकडे नेले पाहिजे. ग्लोबल कोकण त्यासाठी व्यासपीठ उभे करेल.
वसई -विरार चे पहिले महापौर राजीव पाटील म्हणाले, ‘नैसर्गिक साधन संपत्ती जपून पर्यटन वाढवले पाहिजे. कोकणच्या खादयसंस्कृतीला उत्तेजन द्यावे. एकाच प्रकारचा उद्योग सर्वांनी करण्यापेक्षा वैविध्यपूर्ण व्यवसाय करावे.
अमेरिकास्थित उद्योजक ललीत महाडेश्वर म्हणाले,’सिलिकॉन व्हॅली, बोस्टन सिंगापूर , दुबई प्रमाणे मुंबई – कोकण पट्टा अर्थसत्तेचे केंद्र व्हावे, हे सुंदर स्वप्न आहे. त्यासाठी वेगवेगळी उत्पादने- सेवा उद्योग तयार झाले पाहिजेत. संपत्ती निर्मितीसाठी बौद्धिक क्षमता वृद्धिंगत केल्या पाहिजेत.
धारिया म्हणाले, ‘ कोकणाकडे रिव्हर्स मायग्रेशन ‘ झाले पाहिजे. त्यासाठी पुण्यातील जनरेशन नेक्स्टने पुढाकार घ्यावा.