महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी हिंदकेसरी योगेश दोडके यांच्यासह राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष टकले यांच्यावर गुन्हा दाखल

Date:

पुणे- महापालिकेची आर्थिक फसवणूक आणि खोटी बिले सादर करुन ५० लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर लक्ष्मण टकले व विश्वस्त हिंदकेसरी योगेश दोडके यांच्या विरुद्ध  फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आऱ आऱ भळगट यांनी नुकताच याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार गोरखनाथ सोमनाथ भिकुले(रा़ भवानी पेठ) यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.
राष्टीय तालीम संघचे अध्यक्ष दामोदर दोडके असून योगेश दोडके विश्वस्त आहेत़. राष्ट्रीय तालीम संघाने पुणे महापालिकेच्या सहकार्याने महापौर कुस्ती स्पर्धेचे २०१६ मध्ये आयोजन केले होते़. ही स्पर्धा खराडी येथे पार पडली होती़ या स्पर्धेसाठी महापालिकेने १ कोटी ८३ लाख ४ हजार २१४ रुपये खर्च केला होता़. त्यातील १ कोटी २६ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश पुणे महापालिकेने राष्ट्रीय तालीम संघाला निधी स्वरुपात दिला होता़. त्या रक्कमेपैकी तालीम संघाच्या विश्वस्तांनी संगनमत करून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी तालीम संघाच्या कुठल्याही सभासदांना विश्वासात न घेता तसेच कुठलीही सर्वसाधारण सभा न घेता, कुठलाही ठराव न करता बेकायदेशीरपणे परस्पर आपापसात संगनमत करून बनावट बिले तयार करून लाखो रुपयांची रक्कम काढली आहे.

याबाबतची लेखी तक्रार पुणे मनपा आयुक्तांना देखील करण्यात आली होती. हे प्रकरण तालीम संघाचे माजी सरचिटणीस गोरखनाथ भिकुले यांनी समोर आणले आणि कारवाई करण्याची मागणी केली. परंतु कारवाई होत नसल्याने अखेर तालीम संघाच्या सभासदांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के करीत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उत्पादन, वितरण अन् बाजारपेठेची साखळी निर्माण करून महिला बचत गटांनी आर्थिक क्रांती करावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

​लातूर जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या ऑनलाईन बैठकीत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन ​बँकांच्या...

पुण्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडा-वसंत मोरे

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधानपरिषदेची निवडणूक अनेक नाट्यमय...