Home Blog Page 305

यूकेतील श्रीमंतांच्या २०२५ मधील यादीत हिंदुजा कुटुंबाचे पहिले स्थान चौथ्या वर्षीही कायम

मुंबई: सुमारे ११० वर्षांचा वारसा असलेल्या बहुराष्ट्रीय स्वरुपाच्या हिंदुजा उद्योग समुहाचे अध्यक्ष गोपिचंद हिंदुजा यांच्या नेतृत्वाखालील हिंदुजा कुटुंबाने ‘संडे टाइम्स रिच लिस्ट-२०२५’मध्ये ३५.३ अब्ज पौंड्स मालमत्तेसह चौथ्या वर्षीही पहिले स्थान कायम राखले आहे. ‘संडे टाइम्स रिच लिस्ट’ हे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि कुटुंबांचे वार्षिक मानांकन आहे. या यादीच्या २०२५च्या आवृत्तीमध्ये ३५० नावे आहेत. जागतिक अडचणी आणि धोरणात्मक बदल या आव्हानांवर मात करीत हिंदुजा कुटुंबाने उल्लेखनीय व्यावसायिक सामर्थ्य आणि जागतिक नेतृत्व प्रदर्शित केले आहे.

ब्रिटनमध्ये स्थायिक असलेल्या या कुटुंबाच्या मालकीच्या समुहातील कंपन्यांचे अध्यक्ष जी.पी. हिंदुजा आहेत. हा उद्योगसमूह ३८ देशांमध्ये कार्यरत असून वाहन निर्मिती, डिजिटल तंत्रज्ञान, बँकिंग व आर्थिक सेवा, प्रसार माध्यम, प्रकल्प विकास, लुब्रिकंट्स व विशेष रसायने, ऊर्जा, रिअल इस्टेट, व्यापार आणि आरोग्यसेवा आदी क्षेत्रांमध्ये त्याची गुंतवणूक आहे.

विशेष म्हणजे, मागील वर्षभरात हिंदुजा समूहाने भारतात विद्युत वाहन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. विद्युत वाहनांच्या चार्जिंगसाठी समुहाने पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली आहे. शाश्वत स्वरुपाच्या, भविष्यकालीन नवोन्मेषाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

आपल्या व्यावसायिक साम्राज्याबाहेर हिंदुजा कुटुंबाने सामाजिक कार्यामध्येही आपले मोठे योगदान दिले आहे. हिंदुजा फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्यसेवा, शाश्वत ग्रामीण विकास आणि जल संवर्धन या क्षेत्रांमध्ये परिवर्तनात्मक उपक्रम हा समूह राबवितो. याचा प्रभाव विविध भौगोलिक क्षेत्रांमध्ये असणाऱ्या समुदायांवर पडत आहे.

‘संडे टाइम्स रिच लिस्ट २०२५’मध्ये इतरही उल्लेखनीय नावे आहेत. डेव्हिड आणि सायमन रुबेन कुटुंब (२६.८७३ अब्ज पौंड्स), सर लिओनार्ड ब्लावातनिक (२५.७२५ अब्ज पौंड्स), सर जेम्स डायसन आणि कुटुंब (२०.८ अब्ज पौंड्स), इदन ओफेर (२०.१२१ अब्ज पौंड्स), गाय, जॉर्ज, आलनाह आणि गॅलन वेस्टन कुटुंब (१७.७४६ अब्ज पौंड्स), सर जिम रॅटक्लिफ (१७.०४६ अब्ज पौंड्स), आणि लक्ष्मी मित्तल कुटुंब (१५.४४४ अब्ज पौंड्स) यांचा यात समावेश आहे.

रंगत-संगत प्रतिष्ठान, आम्ही एकपात्रीतर्फे पहिल्या वंदन राम नगरकर पुरस्काराचे वितरण

0

प्रतिसादातून कलाकारांचे जुळते रसिकांशी नाते : नितीन कुलकर्णी

पुणे : पुरस्कारातून कलाकाराला उत्साह आणि प्रेरणा मिळते. जो ‌‘पुरे साकार‌’ करतो त्याला पुरस्कार दिला जातो. मनोरंजन व विचारधारा रसिकांपर्यंत पोहोचविणे हे कलाकाराचे प्रथम कर्तव्य आहे. कलाकाराच्या सादरीकरणातून त्याचे विचार रसिकांच्या मनापर्यंत गेले की, रसिक उत्स्फूर्त प्रतिसाद देतात आणि त्यातूनच कलाकार आणि रसिक यांचे नाते जुळते, असे मत कोल्हापूर येथील एकपात्री कलावंत, सिने अभिनेते नितीन कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

रंगत-संगत प्रतिष्ठान आणि आम्ही एकपात्री यांच्या वतीने पहिल्या वंदन राम नगरकर स्मृती पुरस्काराने नितीन कुलकर्णी यांचा आज (दि. 18) गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना कुलकर्णी बोलत होते. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ रंगकर्मी बण्डा जोशी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास डॉ. वैजयंती वंदन नगरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, आम्ही एकपात्रीच्या अध्यक्षा अनुपमा खरे मंचावर होते. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, मानचिन्ह, ग्रंथ आणि पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बण्डा जोशी आणि नितीन कुलकर्णी यांनी ‌‘हास्यवंदन‌’ हा कार्यक्रम सादर केला. त्यास रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

सादरीकरण करताना विनोदी कलाकार माळेमध्ये फुले ओवल्याप्रमाणे प्रसंग ओवत जातो आणि सादरीकरण अधिक मनोरंजक करतो, असे सांगून नितीन कुलकर्णी म्हणाले, कलाकराला रसिकांची रंगत-संगत मिळत गेली की कलाकाराचा कार्यक्रम बहरत जातो. त्याला रंगदेवतेची प्रेरणा असणे आवश्यक असते.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बण्डा जोशी म्हणाले, माणूस खळखळून हसतो तेव्हा तो सुंदर दिसतो आणि हा सुंदर माणूस पाहण्याचे भाग्य आम्हा हास्य कलाकारांना लाभते. रसिकांना हसवायचे काम जरी आम्ही कलाकार सातत्याने करत असलो तरी आम्हा कलाकारांना या विषयी गंभीरपणे अभ्यास करावा लागतो. सगळ्या कलांचा संगम असलेला, विनोदाची पातळी सांभाळणारा एकपात्री कलाकार उत्तम ठरतो.

प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, वंदन राम नगरकर हे फक्त कलावंत नव्हे तर उत्तम माणूसही होते. त्यांनी आपल्या कलेची समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या नावे पुरस्कार देण्याचा निर्णय दोन्ही संस्थांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. सकारात्मक काम करण्याच्या ओढीने आम्ही सतत कार्यरत आहोत.

डॉ. वैजयंती नगरकर म्हणाल्या, हास्य कलाकार आपल्या सादरीकरणातून रसिकांच्या मेंदूमध्ये अशी रासायनिक प्रक्रिया निर्माण करतो की ज्यातून त्याचे मानसिक आरोग्य जपण्यास मदत होते. वंदन नगरकर यांचे पहिले प्रेम हे एकपात्री कलाच होते. त्यांनी रुजविलेले आम्ही एकपात्री संस्थेचे बीज आणि त्यातून निर्माण झालेला वृक्ष त्यांच्या पश्चात इतर कलाकार उत्तमरित्या सांभाळत आहेत याचा आनंद आहे.

मानपत्राचे वाचन अनुपमा खरे यांनी केले. सूत्रसंचालन आदिती कुलकर्णी यांनी तर आभार मिता मुधाळे यांनी मानले.

महाराष्ट्रातील 7 खासदारांना ‘संसदरत्न पुरस्कार’:देशभरातून 17 खासदारांचा गौरव, सुप्रिया सुळे यांचा विशेष सन्मान

देशभरातील 17 खासदारांना यंदाचा ‘संसदरत्न पुरस्कार 2025’ जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्राने या पुरस्कारासाठी बाजी मारली असून, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांच्यासह राज्याचे 7 खासदार पुरस्काराच्या मानकरी ठरले आहेत.
प्राइम पॉइंट फाउंडेशन या संस्थेने प्रत्येक वर्षी संसदेत उत्कृष्ट, सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खासदारांना हा पुरस्कार दिला जातो. या निवडीसाठी प्रश्न विचारणे, वादविवादात सहभाग, कायदेविषयक योगदान आणि समित्यांमध्ये केलेल्या कामांचा मूल्यांकन आधार ठरला. निवडीसाठी हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समितीने निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील संसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदारांची नावे:

सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट)

श्रीरंग बारणे (शिवसेना – शिंदे गट)

अरविंद सावंत (शिवसेना – उद्धव ठाकरे गट)

नरेश म्हस्के (शिवसेना – शिंदे गट)

स्मिता वाघ (भारतीय जनता पक्ष)

मेधा कुलकर्णी (भारतीय जनता पक्ष)

वर्षा गायकवाड (काँग्रेस)

सुप्रिया सुळे यांचा गौरव

सुप्रिया सुळे या 16वी आणि 17वी लोकसभेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांपैकी एक असून यंदाही त्यांचे संसदीय योगदान लक्षणीय ठरले आहे. त्यांच्या सोबतच श्रीरंग बारणे, भर्तृहरि महताब आणि एन. के. प्रेमचंद्रन यांनाही हा विशेष संसदरत्न सन्मान मिळाला आहे.

यांचाही होणार सन्मान

यावर्षी 4 खासदारांना त्यांच्या दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण योगदानासाठी विशेष संसदरत्न सन्मान देखील देण्यात आला आहे. यामध्ये भर्तृहरि महताब, सुप्रिया सुळे, एन. के. प्रेमचंद्रन, आणि श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. हे चार खासदार 16व्या आणि 17व्या लोकसभेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणारे ठरले असून, त्यांच्या कार्यकाळातही ते तितक्याच सक्रियतेने कार्यरत आहेत. प्रवीण पटेल (भाजप), रवि किशन (भाजप), निशिकांत दुबे (भाजप), विद्युत बरण महतो (भाजप), पी. पी. चौधरी (भाजप), मदन राठौर (भाजप), सी. एन. अन्नादुरई (द्रविड मुनेत्र कळघम) आणि दिलीप सैकिया (भाजप) यांचा समावेश आहे.

पीएमपीएमएल बसच्या दरवाढीस आम आदमी पार्टीचा विरोध

बस दरवाढीमुळे प्रवासी घटतील, वाहतूक कोंडी, प्रदूषण वाढेल.. आप चा दरवाढ विरोध

पुणे:

पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सांभाळणाऱ्या पीएमपीएमएल ने तिकीट दरात मोठी वाढ केली आहे. संचालक मंडळाने याबाबत ठराव करून बसचा किमान तिकीटदर ५ रुपये ऐवजी १० रुपये केला आहे. तसेच दैनंदिन पास ४० रुपये वरून वाढवून ७० रुपये केला आहे आणि मासिक पास मध्ये ९०० रुपयावरून तब्बल १५०० रुपये पर्यंत दरवाढ केली आहे. ही दरवाढ सामान्य पुणेकरांची कंबर मोडणारी आहे. असे सांगत आज रविवार रोजी सकाळी आम आदमी पार्टी तर्फे पुणे येथे स्वारगेट चौकामध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले.

प्रशासनाने वार्षिक तूट कमी करण्यासाठी आणि दर कीफायतशीर सुटसुटीत करण्यासाठी ही दरवाढ केल्याचे सांगितले होते. परंतु या दरवाढीमुळे मुख्यत्वे सामान्य माणूस व रोजंदारीवरील कामगारांना याचा फटका बसून खाजगी दुचाकी वाहने घेण्याकडे त्याचा कल राहील. त्यातून अधिकाधिक वाहतूक कोंडी व प्रदूषण होईल. पुणे शहराचा जागतिक वाहतूक कोंडीत चौथा नंबर आहे, असे असताना याविषयी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कार्यक्षम करणे व अधिकाधिक प्रवासी याचा वापर करतील यासाठी प्रयत्न करणे हे प्रशासनाचे धोरण असायला हवे. २०१४ पासून दैनिक प्रवाशांचा आकडा हा दहा ते अकरा लाखाच्या दरम्यानच रेंगाळला आहे.
तूट कमी करण्यासाठी उत्पन्नाचे इतर मार्ग अधिक कार्यक्षमतेने वापरायला हवेत. मेट्रो साठीची एंड माईल कनेक्टिव्हिटी म्हणजे शेवटच्या टप्प्यातील प्रवासाच्या सुविधा द्यायला हव्यात, त्या ऐवजी ती जबाबदारी टाळण्याकडे पीएमपीएमएल आणि मेट्रोचा ही कल आहे. प्रशासनाने भ्रष्टाचार व अकार्यक्षमता असणाऱ्या बाबी दूर करीत अधिक बसेस रस्त्यावर आणायला हव्यात. यातून पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊ शकते.

सध्या लक्झेमबर्ग, माल्टा, फ्रान्स इटली, ब्राझील आदी देशांमध्ये सार्वजनिक प्रवास हा मोफत करण्याकचे धोरण आहे. आपल्याकडे महानगरपालिका ही तूट भरून काढत असताना म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या सामान्य जनता याचे पैसे मोजत असताना प्रवाशांवर याचा बोजा देण्याची गरज नाही.

याबाबतीत जिल्हाधिकारी यांनी प्रवासी संघटना व प्रवासी, राजकीय पक्ष यांची मते घेऊन ही दरवाढ फेटाळावी अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे करण्यात आली आहे, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या वेळेस देण्यात आला.

या आंदोलनात आपचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, वाहतूक आघाडीचे सेंथिल अय्यर, निलेश वांजळे,नौशाद अंसारी, उमेश दीक्षित, सुभाष करांडे, सुनील सवदी, प्रशांत कांबळे, सतीश यादव, अली सय्यद, किरण कद्रे ,शंकर थोरात, अमित म्हस्के, निखिल खंदारे, मनोज शेट्टी, अक्षय म्हस्के, सत्यवान शेवाळे, सत्यम शिकर, शिवम शिंदे,ऋषिकेश मारणे, शीतल कांडेलकर, संजय रणधीर, शेखर ढगे,अशोक धुमाळ, संजय कटरनवरे, गणेश थरकुडे,अनिल कोंढाळकर, सुशील बोबडे आदी उपस्थित होते.

आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांमुळे पुढे जा, आरक्षण हे फक्त एक माध्यम” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

परभणीत शिवसेना महिला आघाडीचा मेळावा डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाने उत्साहात संपन्न

परभणी : “सशक्त महिला म्हणजे सक्षम समाजाचे बळ,” असे स्पष्ट मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी परभणीतील शिवसेना महिला आघाडीच्या मेळाव्यात मांडले. महिलांनी आता पुढाकार घेऊन इतरांसाठी आदर्श ठरावे, असे आवाहन करत त्यांनी महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठीच्या विविध योजनांचा आढावा घेतला.

शिवसेना महिला आघाडीच्या वतीने परभणीत आयोजित महिला मेळावा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या संयोजनातून उत्साहात पार पडला. विविध विभागातील महिला पदाधिकारी, लाडक्या बहिणी, शिवसेना कार्यकर्त्या आणि नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमात डॉ. गोऱ्हे यांनी महिलांना सामाजिक, आर्थिक व राजकीय पातळीवर सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. “आपल्यातील क्षमता सिद्ध करणे हेच खरे नेतृत्व असून, केवळ आरक्षणामुळे नव्हे तर आपल्या अंगभूत गुणवत्तेमुळे आपण पुढे येतो, हे प्रत्येक महिलेला दाखवून द्यावे लागेल,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देत, त्यांनी घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करून शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी महसूल विभागाच्या सहकार्याने शिबिरे आयोजित करण्याची तयारी असल्याचे सांगितले.

याशिवाय ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशा महिलांना घरमालकाच्या प्रमाणपत्राच्या आधारे ओळख निश्चितीची प्रक्रिया करून देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने २५ मेनंतर रक्त तपासणी, कॅल्शियम तपासणी, डोळे तपासणी, कॅन्सर तपासणी अशा मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत. शरीरात लोह व कॅल्शियमची कमतरता असणाऱ्या महिलांना औषध वाटप देखील केले जाणार आहे. प्रत्येक महिला कार्यकर्तीने आपल्या भागातील महिलांची नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सरकारी दाखल्यांसाठी महसूल शिबिरे आयोजित करून मोफत सेवा दिली जाणार आहे. ही संकल्पना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची असून तिच्या अंमलबजावणीबाबतही डॉ. गोऱ्हे यांनी सकारात्मक भूमिका मांडली.

“प्रत्येक महिला आदर्श ठरावी आणि समाजात परिवर्तन घडवावे,” असे म्हणत त्यांनी महिलांना नेतृत्वाची दिशा दिली.

या मेळाव्यात माजी खासदार सुरेश जाधव, जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, विशाल कदम, शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख राजू कापसे, सह संपर्कप्रमुख भास्करराव लंगोटे, युवा सेना प्रमुख आप्पाराव वावरे, संपर्कप्रमुख सखुबाई लटपटे, महिला प्रमुख गीता ताई सूर्यवंशी, तालुका प्रमुख प्रभू कदम, प्रल्हादराव होगे, माणिक पोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.

या महिला मेळाव्याच्या माध्यमातून परभणीत सशक्त, सजग व संघटित महिला नेतृत्व उभे राहण्याची सुरुवात झाली आहे, असे चित्र संपूर्ण कार्यक्रमातून दिसून आले.

दृढ, समाधानी वैवाहिक आयुष्याची सुरुवात पारदर्शक संवादातून- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन

0

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत पूर्व-विवाह समुपदेशन कार्यक्रम संपन्न

पुणे, १८: दृढ आणि समाधानी वैवाहिक आयुष्याची सुरुवात ही योग्य मार्गदर्शन आणि पारदर्शक संवादातून होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून तरुणांना या दिशा दाखविण्याचे काम करण्यात येत आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांनी केले.

तरुणांना पूर्व-विवाह सशक्त मार्गदर्शन मिळावे आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा पाया मजबूत व्हावा या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने गणेश क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे पूर्व-विवाह समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नामदेव समाजउन्नती परिषद, पुणे शहर यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याच्या निमित्ताने करण्यात आले. या कार्यक्रमाला १ हजार ६०० हून अधिक युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील म्हणाल्या, पूर्व-विवाह समुपदेशन उपक्रम म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाची दिशा आहे. समाजातील अधिकाधिक तरुणांपर्यंत हे मार्गदर्शन पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहोत. नामदेव समाजउन्नती परिषदेच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी ठरला, याबद्दल त्याचे श्रीमती पाटील यांनी आभार मानले.

सदरचा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने जनजागृती, समुपदेशकांचे नियोजन, कार्यक्रम स्थळ व्यवस्थापन, सहभागी तरुणांचे समायोजन आणि कार्यक्रमातील गुणवत्तेची खात्री आदी बाबीवर भर दिला.

प्री-मॅरिटल कौन्सेलिंग म्हणजे काय?

प्री-मॅरिटल कौन्सेलिंग म्हणजे विवाह-पूर्व जोडप्यांनी प्रशिक्षित समुपदेशकासोबत संवाद साधून परस्पर समज, संवाद कौशल्य, मतभेदांचे निराकरण, आर्थिक नियोजन, भावनिक समज आणि कुटुंब नियोजन या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन घेणे. या समुपदेशनातून नात्यात पारदर्शकता, विश्वास व परस्पर समज वाढवण्यास मदत होते.

युवा पिढीसाठी का आवश्यक आहे?
आजच्या तरुण पिढीसमोर करिअर, ताणतणाव, अपेक्षा आणि नात्यांतील गुंतागुंत यांसारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे विवाहपूर्व समुपदेशन त्यांना स्वतःला आणि आपल्या जोडीदाराला समजून घेण्यासाठी, वास्तववादी अपेक्षा ठेण्यासाठी आणि यशस्वी वैवाहिक जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणेच्या समुपदेशन केंद्रात मोफत सेवा उपलब्ध
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या समुपदेशन केंद्रात युवक-युवतींसाठी मोफत पूर्व-विवाह समुपदेशन सेवा उपलब्ध असून, ही सेवा सर्वांसाठी खुली आहे. विशेषतः ज्यांना विवाहपूर्व मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, अशा सर्वांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या केंद्रावर प्रशिक्षित समुपदेशकांच्या मार्गदर्शनाखाली संवाद, समज आणि विश्वास या गोष्टींवर भर दिला जातो.
0000

जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागा विकासासंदर्भात सादरीकरण..

पुणे:जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी . गजानन पाटील यांनी मार्केटयार्ड, पुणे व कोथरूड येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागा विकासित करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार,, महाराष्ट्र राज्य यांच्यासमोर सादरीकरण केले. यावेळी चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त, . अतुल चव्हाण, मुख्य अभियंता (सां.बा.) यांचीही उपस्थिती होती.

सादरीकरणात बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सदर जागांचा नियोजनबद्ध विकास, त्यातून निर्माण होणाऱ्या सुविधा, महसूलवाढीच्या संधी, आणि सार्वजनिक हिताच्या उपयोगांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

भीमनगरच्या रहिवाशांना आहे त्याच ठिकाणी घरे देऊन न्याय द्यावा  – ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर

0

पुणे:   झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पौड रस्ता येथील भीमनगरच्या रहिवाशांची सहमती नसताना देखील घरे खाली करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दिलेली नोटीस मागे घ्यावी. भीमनगरवासीयांना आहे त्याच ठिकाणी घरे देऊन योग्य न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जेष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी केली आहे.

भीमनगर वाचविण्यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केलेल्या आवाहनानुसार मेधा पाटकर यांनी भीमनगरला भेट देऊन भीमनगरवासीयांच्या भावना आणि अडचणी जाणून घेतल्या. न्यायासाठी त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाटकर यांनी पाठिंबा व्यक्त केला. यावेळी देविदास ओहाळ यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते. 

भीमनगरच्या पुनर्वसनासाठी भक्ती इंटरप्राईजेस या संस्थेने भीमनगर वासियांना मोठमोठी आश्वासने दिली. आहे त्याच जागेवर चांगली घरे देण्याचे मान्य केले. प्रत्यक्षात नियमाप्रमाणे वस्तीतील 70 टक्के कुटुंबांची सहमती मिळण्यापूर्वीच 50 कुटुंबांना वारजे येथे पाठवण्यात आले. त्यापैकी पंधरा कुटुंब भीम नगर मध्ये परत आली. या कुटुंबांना ज्या ठिकाणी पाठविण्यात आले, ती इमारत सदर विकासकाने नव्हे तर महापालिकेने बांधलेली असल्यामुळे उर्वरित 35 कुटुंबांना जागा खाली करण्याची नोटीस देण्यात आली. एक प्रकारे ही भीमनगरवासियांची फसवणूकच आहे, अशी टीका पाटकर यांनी केली.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये सर्वात मोठा घोटाळा हा विकास हक्क हस्तांतरणात केला जातो. विकास मोक्याच्या जागा ताब्यात घेऊन गरिबांना दूर कुठेतरी नेऊन टाकतात. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात घर मिळवण्यासाठी पात्र, अपात्र ठरवताना काही अपात्रांना पात्र तर पात्रांना अपात्र ठरविले जाते, याकडे पाटकर यांनी लक्ष वेधले. त्यावर, काही राजकीय नेते आणि महापालिका अधिकारी यांच्याशी संगणमत करून विकासकाने घरे न बांधताच शेकडो कोटीचा टीडीआर घोटाळा केल्याचे भीमनगरच्या रहिवाशांनी पाटकर यांच्या निदर्शनास आणून दिले.

ज्याप्रमाणे जुन्या गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकासाचा अधिकार आहे त्याचप्रमाणे नागरवस्त्यांना देखील स्वयंव विकासाचा हक्क आहे. मात्र, पुढारी, अधिकारी आणि विकासक यांची अभद्र युती हा हक्क झोपडवासियांना मिळू देत नाहीत, याकडे पाटकर यांनी लक्ष वेधले.

भीमनगरच्या आंदोलक आणि रहिवाशांना आपला पाठिंबा जाहीर करून पाटकर म्हणाल्या की, भीमनगरमधील रहिवाशांपैकी 90 टक्के रहिवासी दलित आणि कष्टकरी आहेत. ते संविधानाला अनुसरून न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करीत आहेत. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे महापालिका, तक्रार निवारण प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासनाचा नगर विकास विभाग यांच्याकडून त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी देखील मेधा पाटकर यांनी केली.

राहुल डंबाळे म्हणाले, भीमनगर ही राज्यातील एकमेव वस्ती अशी आहे की त्या जागेचा सात – बारा रहिवाशांच्या नावे आहे, तरीही स्थानिक पुढारी, एसआरए मधील भ्रष्ट अधिकारी आणि महापालिका प्रशासन संगणमताने ही जागा बिलडच्या घश्यात घालून स्थानिकांना विस्थापित करत आहेत. या प्रकरणात सर्व संबंधित अधिकारी, बिल्डरवर अॅट्रॉसिटी गुन्हा दखल करावा अशी मागणी डंबाळे यांनी केली. 

या प्रसंगी स्थानिक राहिवाश्यांनी आपल्या अडचणी मांडल्या, तसेच जे विस्थापित नवीन ठिकाणी राहायला गेले त्यांना येणाऱ्या समस्या ही यावेळी मांडण्यात आल्या.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती म्हणून लढवाव्या

दीर्घकाळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या आत पार पाडाव्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. या निवडणुका भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि आरपीआय यांनी महायुती म्हणून एकत्रित लढवाव्या, अशी आपल्या पक्षाची भूमिका आहे. महायुतीतील घटक पक्षाच्या प्रमुखांना भेटून आपण ही भूमिका मांडणार आहोत. या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी देखील आपली आग्रही मागणी आहे. पुणे महापालिका निवडणुकीत किमान 15 प्रभागात आपल्या पक्षाला उमेदवारी मिळावी, संपूर्ण पाच वर्षासाठी उपमहापौर पद मिळावे आणि मागास प्रवर्गाचे आरक्षण आल्यास महापौर पद मिळावे, अशा आपल्या मागण्या आहेत. त्यासंबंधी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी आपली चर्चा झाली असून आपल्या मागण्यांना योग्य प्रतिसाद मिळेल, अशी आशा देखील आठवले यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे आगामी काळात विविध महामंडळे, जिल्हा नियोजन मंडळ यावरील नियुक्तींमध्ये देखील आपल्या पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली.

नरकात जायचे की स्वर्गात ते आधी ठरवा

‘नरकात स्वर्ग’ निर्माण करणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला स्वर्गात जायचे की नरकात हे आधी ठरवावे. कारण एकाच वेळी दोन्ही ठिकाणी जाता येणार नाही, अशी कोपरखळी आठवले यांनी मारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा राऊत यांनी मागणी हास्यास्पद आहे. ही मागणी करण्याचा अधिकार त्यांना नाही. त्या ऐवजी त्यांनी सन 2029 च्या लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव करण्याची तयारी करावी, अशा शब्दात आठवले यांनी राऊत यांची खिल्ली उडवली.

मंत्रीपद नाहीतर समाज महत्त्वाचा

शरद पवार आणि अजित पवार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर प्रकाश आंबेडकर आणि मी देखील एकत्र येणे आवश्यक आहे, अशा आठवले यांच्या विधानाबद्दल विचारणा केली असता ते म्हणाले की, आंबेडकरी चळवळीतील सर्वच गटातटांनी एकत्र यावे ही भूमिका आपण कायमच मांडत आलो आहोत. माझ्यासाठी मंत्री पद महत्त्वाचे नाही तर समाजाची प्रगती महत्त्वाची आहे. समाजाची प्रगती साधण्यासाठी सर्व आंबेडकरी गट एकत्र येत असतील तर त्याचे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व आपण प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आनंदाने सोपवू, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाचा विकास आराखडा जिल्हाधिकारी आणि सामाजिक न्याय विभाग यांनी लवकरात लवकर सादर करावा. त्यासाठी किमान शंभर ते दीडशे एकर जागा ताब्यात घ्यावी. विजयस्तंभ परिसराच्या विकासासाठी आपण अधिकारी निधी मिळवून देण्यासाठी मदत करू, अशी ग्वाही देखील आठवले यांनी दिली.

पत्रकार परिषदेनंतर आठवले यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

पहेलगाम हल्ल्यातील शहीदांना अभिवादन आणि लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी पुण्यात ‘तिरंगा यात्रा’

राष्ट्रभक्तीची उत्स्फूर्त अभिव्यक्ती

पुणे – जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप हिंदू नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि भारतीय लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी आज रविवार, 18 मे रोजी पुण्यात ‘तिरंगा यात्रा’चे आयोजन करण्यात आले. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज स्मारक येथून ज्ञानेश्वर पादुका चौकात समारोप सभा झाली.

पावसाच्या सरींना न जुमानता, हातात तिरंगा घेऊन, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘दहशतवाद मुर्दाबाद’ अशा घोषणांनी पुणेकरांनी रस्ते गाजवले. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील नागरिकांनी कुटुंबासह उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

मोहोळ म्हणाले, “आता दहशतवाद सहन केला जाणार नाही. शहीदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारताची भूमी आणि अस्मिता सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिक सज्ज आहे. ज्या प्रकारे पाकिस्तानवर हल्ला करून सडेतोड उत्तर दिले त्याच प्रकारे या पुढील काळात दहशतवाद संपवला जाईल.”

घाटे म्हणाले की, “ही यात्रा केवळ एक विरोध नाही तर आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या शहीदांना श्रद्धांजली देण्याची सामूहिक भावना आहे. समाज म्हणून एकत्र येऊन आपले कर्तव्य बजावण्याचा हा प्रयत्न आहे.”

या यात्रेत सहभागी होताना गनबोटे आणि जगदाळे कुटुंबांनी स्वतःच्या दुःखावर मात करत समाजासाठी एकत्र उभे राहण्याचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला. त्यांच्या देशभक्तीने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू उभे केले.

एअर मार्शल बापट यांच्या प्रतिकात्मक संदेशात नमूद करण्यात आले की, “आत्मनिर्भर भारताच्या संरक्षण प्रणालीत ब्रह्मोस, आकाश आणि आकाश तीर क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे. देशाला हात लावणाऱ्यांना आता योग्य उत्तर मिळते.”
या तिरंगा यात्रेत केंद्रीय हवाई वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे , राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी , समाज कल्याण राज्य मंत्री माधुरी मिसाळ ,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार सिद्धार्थ शिरोळे,भीमराव तापकीर ,हेमंत रासने , सुनील कांबळे , योगेश टिळेकर ,माजी आमदार जगदीश मुळीक, श्रीनाथ भिमाले,संदीप खर्डेकर, सरचिटणीस पुनीत जोशी ,राघवेंद्र मानकर , सुभाष जंगले, राहुल भंडारे ,प्रमोद कोंढरे, वर्षा तापकिर,गणेश कळमकर रवींद्र साळेगावकर यांच्या सह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

आरपीआय काढणार दहशतवाद विरोधी रॅली

0

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची घोषणा

पुणे: प्रतिनिधी

दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने “भारत जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद’ रॅली काढण्यात येणार असल्याची घोषणा आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

यावेळी पक्षाचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष संजय सोनवणे,  गंगाधर आंबेडकर, सूर्यकांत वाघमारे असित गांगुर्डे , शैलेंद्र चव्हाण, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, मोहन जगताप, महिपाल वाघमारे, शाम सदफुले, संदीप धांडोरे, लियाकट शेख, रवी अवसरमल, अक्षय अवसरमल, उमेश कांबळे, आकाश बहुले आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

पुढे बोलताना राज्यमंत्री आठवले म्हणाले,  ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. काँग्रेसच्या वतीने ही याच धर्तीवर रॅली काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आरपीआयच्या वतीने देखील राज्यातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ‘भारत जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद’. रॅली आयोजित करण्यात येईल, असे आठवले यांनी सांगितले.

भारत आणि पाकिस्तान दरम्यान सध्या युद्धविराम असला तरी देखील ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे, याची जाणीव संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी करून दिली आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीर जोपर्यंत भारताच्या ताब्यात येत नाही आणि पाकपुरस्कृत दहशतवादी कारवाया थांबत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानची आरपारची लढाई सुरूच ठेवावी, अशी आपल्या पक्षाची भूमिका असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती म्हणून लढवाव्या

दीर्घकाळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या आत पार पाडाव्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. या निवडणुका भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि आरपीआय यांनी महायुती म्हणून एकत्रित लढवाव्या, अशी आपल्या पक्षाची भूमिका आहे. महायुतीतील घटक पक्षाच्या प्रमुखांना भेटून आपण ही भूमिका मांडणार आहोत. या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी देखील आपली आग्रही मागणी आहे. पुणे महापालिका निवडणुकीत किमान 15 प्रभागात आपल्या पक्षाला उमेदवारी मिळावी, संपूर्ण पाच वर्षासाठी उपमहापौर पद मिळावे आणि मागास प्रवर्गाचे आरक्षण आल्यास महापौर पद मिळावे, अशा आपल्या मागण्या आहेत. त्यासंबंधी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी आपली चर्चा झाली असून आपल्या मागण्यांना योग्य प्रतिसाद मिळेल, अशी आशा देखील आठवले यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे आगामी काळात विविध महामंडळे, जिल्हा नियोजन मंडळ यावरील नियुक्तींमध्ये देखील आपल्या पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली.

नरकात जायचे की स्वर्गात ते आधी ठरवा

‘नरकात स्वर्ग’ निर्माण करणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला स्वर्गात जायचे की नरकात हे आधी ठरवावे. कारण एकाच वेळी दोन्ही ठिकाणी जाता येणार नाही, अशी कोपरखळी आठवले यांनी मारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा राऊत यांनी मागणी हास्यास्पद आहे. ही मागणी करण्याचा अधिकार त्यांना नाही. त्या ऐवजी त्यांनी सन 2029 च्या लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव करण्याची तयारी करावी, अशा शब्दात आठवले यांनी राऊत यांची खिल्ली उडवली.

मंत्रीपद नाहीतर समाज महत्त्वाचा

शरद पवार आणि अजित पवार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर प्रकाश आंबेडकर आणि मी देखील एकत्र येणे आवश्यक आहे, अशा आठवले यांच्या विधानाबद्दल विचारणा केली असता ते म्हणाले की, आंबेडकरी चळवळीतील सर्वच गटातटांनी एकत्र यावे ही भूमिका आपण कायमच मांडत आलो आहोत. माझ्यासाठी मंत्री पद महत्त्वाचे नाही तर समाजाची प्रगती महत्त्वाची आहे. समाजाची प्रगती साधण्यासाठी सर्व आंबेडकरी गट एकत्र येत असतील तर त्याचे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व आपण प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आनंदाने सोपवू, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाचा विकास आराखडा जिल्हाधिकारी आणि सामाजिक न्याय विभाग यांनी लवकरात लवकर सादर करावा. त्यासाठी किमान शंभर ते दीडशे एकर जागा ताब्यात घ्यावी. विजयस्तंभ परिसराच्या विकासासाठी आपण अधिकारी निधी मिळवून देण्यासाठी मदत करू, अशी ग्वाही देखील आठवले यांनी दिली.

पत्रकार परिषदेनंतर आठवले यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

२० मे ला आरक्षणाच्या उप वर्गीकरणासाठी लाखोंच्या संख्येने मातंग समाजाचा मंत्रालयावर महाआक्रोश मोर्चा

0

20 मे च्या आंदोलनात मातंग समाजाने लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा — रमेश बागवे

पुणे : अनुसूचित जातींमधील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय मिळावा यासाठी आरक्षणाचे अबकड असे वर्गीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी मातंग समाज २० मे २०२५ रोजी लाखोंच्या संख्येने मुंबईवर महाआक्रोश मोर्चा काढणार आहे .या महा आक्रोश मोर्चाला मातंग समाजाने लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मातंग समाजातील सर्वपक्षीय व सर्व संघटनेच्या नेत्यांकडून आज पत्रकार परिषदेत करण्यात आले .


सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आक्रोश महाआंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हे आंदोलन २० मे २०२५ रोजी, मुंबईच्या आझाद मैदानात दुपारी १ ला* होणार आहे.
या आंदोलनाचा मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून ते येत्या जून २०२५ पासून लागू करवे .उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमधील दुर्लक्षित घटकांना शैक्षणिक संधी, शासकीय नोकरी व योजनांचा थेट लाभ मिळू शकेल.
तरी “राज्य शासनाच्या विविध योजनांपासून आणि आरक्षणाच्या थेट लाभापासून अनेक लहान लहान उपगट वंचित राहत आहेत. त्यामुळे हक्काचे आरक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपवर्गीकरण अत्यावश्यक झाले आहे अशी समाजाची मागणी आहे.
या आंदोलनात सर्व पक्षीय अनेक मान्यवर नेते व लोकप्रतिनिधी सहभागी होणार असून,या आंदोलनाचे नेतृत्व माजी गृहराज्यमंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे ,आमदार सुनील कांबळे,आमदार अमित गोरखे,आमदार जितेश अंतापूरकर,दलित महासंघाचे नेते प्रा.मच्छिंद्र सकटे,अखिल भारतीय कांग्रेस पक्षाचे सचिव रवींद्र दळवी,माजी आमदार मधुकरराव घाटे,
*माजी आमदार नामदेव जयराम ससाणे,माजी सभागृह नेते ,नगरसेवक सुभाष जगताप,विजय डाकले,अनिल हतागळे ,माजी नगरसेविका स्वाती लोखंडे ,उषा नेटके ,अँड.एकनाथ सुगावकर,
*माजी मंत्री दिलीप कांबळे,माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, पंडित सूर्यवंशी ,मारुती वाडेकर ,अशोक लोखंडे ,राम चव्हाणयांसारखे अनेक नेते आंदोलनात सहभागी होणार आहेत.
सरकारने लवकरात लवकर आरक्षणाचे उपवर्गीकरण करून न्याय द्यावा*, अन्यथा आंदोलन अजूनतीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे येणार्‍या मंगळवारी आझाद मैदानावर आयोजित केलेल्या आंदोलन सहभागी होण्याचे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले .
पुण्यातील या पत्रकार परिषदेस माजी गृहराज्यमंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे ,लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णूभाऊ कसबे,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाष जगताप ,माजी नगरसेवक अविनाश बागवे,अनिल हतागळे ,क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे ,माजी नगरसेविका स्वाती लोखंडे ,सुखदेव अडागळे ,राजश्रीताई अडसूळ,उषा नेटके ,यासह पुण्यातील विविध पक्ष संघटनाचे प्रमुख नेते उपस्थित होते .

डोंबिवलीत ‘भव्य तिरंगा यात्रा’ संपन्न

भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई, दि. १८ – पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या ३ डोंबिवलीकरांसह सर्व पीडितांना आपल्या भारतीय सशस्त्र दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला. या ऑपरेशनदरम्यान भारतमातेच्या वीरपुत्रांनी दाखविलेल्या शौर्य, संयम आणि बलिदानाच्या सन्मानार्थ डोंबिवलीत ‘भव्य तिरंगा यात्रा’ भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
श्री गणपती मंदिर संस्थान येथून गणरायाच्या आशीर्वादाने सुरू झालेली तिरंगा यात्रा इंदिरा चौक – पीपी चेंबर्स – सर्वेश हॉल – पारसमणी नाका करत छत्रपती शिवाजी महाराज चौक (घरडा सर्कल) येथे पोहोचली. डोंबिवलीचे वीरपुत्र कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारक येथे त्यांच्या पुण्यस्मृतींस अभिवादन करून यात्रेचा समारोप झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील नवा भारत प्रसंगी दहशतवादाविरुद्ध किती कठोर, कणखर होऊ शकतो; हे ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे जगाने पाहिले. यानिमित्ताने दिसलेल्या नव्या भारताच्या लष्करी सामर्थ्यासोबतच कोट्यवधी भारतीयांची एकजूट हे ‘ऑपरेशन सिंदूर’चे यश आहे, अशी ग्वाही यात्रा समारोपाप्रसंगी दिली.

या यात्रेदरम्यान आ. सुलभाताई गायकवाड, आ. राजेश मोरे, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, गुलाबराव कारंजुले, नरेंद्र पवार, नाना सूर्यवंशी, नंदू परब, नंदू जोशी यांच्यासह पवन पाटील, प्रियाताई जोशी, करण जाधव, धनाजी पाटील, मंदार टावरे, समीर भंडारे, रितेश फडके, सचिन काटे, अमित धात्रस, विजय उपाध्याय, नितेश म्हात्रे, संतोष शेलार, मितेश पेणकर आदी मंडल अध्यक्ष उपस्थित होते. तसेच डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमीमधील प्रशिक्षणार्थी आणि मोठ्या संख्येने कल्याण-डोंबिवलीकर या यात्रेत सहभागी झाले होते.

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा उद्घाटन समारंभ

पुणे : जागतिक, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि सहकारी बँका असे जाळे सर्वत्र पसरलेले आहे. काळ बदलला आहे. सायबर क्राईम खूप मोठ्या प्रमाणात वाढले असून हे अत्यंत भयानक आहे. सायबर क्राईम च्या माध्यमातून देशात ७० हजार कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. बँकांचे संचालक मंडळ हे मालक नसून विश्वस्त आहेत. सभासद हे खरे मालक असून त्यांचे हित जपणे गरजेचे आहे. त्याकरिता सहकारी बँकांनी ग्राहक व लोकाभिमुख व्हायला हवे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूचा कोनशिला उद्घाटन समारंभ बिबवेवाडीतील सुप्रिम प्लाझा सोसायटीतील बँकेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार चेतन तुपे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, रामराज्य बँकेचे संस्थापक विजयराव मोहिते, अँड सुभाष मोहिते, अध्यक्षा नंदा लोणकर, उपाध्यक्ष शिरीष मोहिते यांसह बँकेचे सर्व संचालक व व्यवस्थापकीय मंडळातील सदस्य उपस्थित होते.

बँकेचे सुहास पांगुळ, दिलीप सातकर, रामकृष्ण फुले, बाळासाहेब रायकर, दिनेश डांगी, दशरथ शितोळे, ऍड. विजय थोपटे, अशोक कदम, अँड. सुभाष मोहिते, हरिदास चव्हाण, राजेश नाईकरे, सुनील पवार, अविनाश मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी अमरसिंह राठौर यांसह व्यवस्थापकीय मंडळ अध्यक्ष विनोद शहा, सदस्य सीए अनिल शिंदे, ऍड. हेमंत झंझाड यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, सहकार आणि कायद्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. सहकार क्षेत्राबद्दल लोकांमध्ये आपलेपणाची भावना रुजणे गरजेचे आहे. राजकारण बाजूला ठेवून बँकिंगपलीकडे पाहण्याची आवश्यकता असून त्यामधील सुधारणांकरिता समिती स्थापन करून पुढे वाटचाल करू.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात सहकारी चळवळ वाढली आणि रुजविली गेली. त्यामध्ये अनेकांचे योगदान आहे. महायुतीमध्ये तीन पक्ष काम करीत आहेत. माझी जवळीक या क्षेत्राशी जास्त असल्याने मी सहकार खाते घेतले. कालानुरूप यामध्ये अनेक बदल करायचे आहेत. गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ वाढीला लागली आहे. यामध्ये विश्वासाहर्ता हा महत्वाचा घटक असून तो जपणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

अँड. सुभाष मोहिते म्हणाले, बँकेचे आजमितीस ११ हजार सभासद आहेत. समाजातील शेवटचा माणूस बँकिंगशी जोडला जावा, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेला संदेश आम्ही पूर्ण करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले. विजय मोहिते म्हणाले, ज्या भागात सुविधा नाहीत, तिथे बँकिंग करायचे हे आम्ही ठरविले होते. स्पर्धेपेक्षा लोकांना सेवा देण्याचे काम आम्ही करीत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे.

नंदा लोणकर म्हणाल्या, दिनांक ४ एप्रिल १९९८ साली बँकेच्या पहिल्या वास्तूचे उद्घाटन झाले. तळागाळातील लोकांना मदत व्हावी, या त्यामागील उद्देश होता. आज बँकेच्या ८ शाखा असून मार्च २०२५ अखेर १७० कोटी रुपयाच्या ठेवी आणि ९६ कोटी रुपयांची कर्ज बँकेने दिली आहेत. तब्बल ३ हजार ५०० चौरस फुटाची मालकीची वास्तू बँकेने घेतली असून मुख्य कचेरी आणि बिबवेवाडी शाखा येथे सुरु आहे. त्याचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले आहे. याचा आम्हाला आनंद आहे.

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडी (अंमलबजावणी संचालनालय) या तपास यंत्रणेच्या अधिकारांवर तीव्र शब्दांत भाष्य केले. यावेळी त्यांनी पीएमएलए कायद्यातील तरतुदीला का विरोध केला, याबाबतही सांगितले. कायद्याच्या तरतुदीला विरोध केला होता, पण ऐकले नाही, सरकार गेले आणि त्यानंतर पहिली कारवाई पी. चिदंबरम यांच्यावर झाली, अशी आठवण शरद पवार यांनी यावेळी सांगितली. तसेच संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती, त्यामुळे त्यांना पत्राचाळीच्या केसमध्ये संबंध नसताना गुंतवले गेले, असेही ते म्हणाले.

शरद पवार म्हणाले, ईडी ही जी यंत्रणा आहे, कशी वागते याचे उत्तम लिखाण पुस्तकात आहे. मला आठवते केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात होतो. पी. चिदंबरम हे त्यावेळी माझे सहकारी होते. कायद्यात कशी दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे, या संबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणला, तो प्रस्ताव वाचल्यानंतर मी डॉ. मनमोहन सिंगांना सांगितले हा प्रस्ताव अत्यंत घातक आहे, आपण करता कामा नये, त्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला. ज्याला अटक केली त्याने स्वत: गुन्हा केला नाही हे सिद्ध करावे अशी तरतूद कायद्यात प्रस्तावित केली गेली. मी स्वत: विरोध केला, हे करु नका, उद्या राज्य बदलले तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागेल हे सांगितले, ते ऐकले गेले नाही. राज्य गेले आणि पहिली कारवाई चिदंबरम यांच्यावर करण्यात आली. विरोधकांवर अशा केसेस अधिक केल्या जातील ही शंका माझ्या सारख्याला होती ती खरी ठरली, असे शरद पवार म्हणाले.

संबंध नसताना राऊतांना गुंतवले

शरद पवार यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईवरही भाष्य केले. ते म्हणाले, संजय राऊतांनी काय केले होते, ते नियमित सामनामध्ये रोखठोक भूमिका मांडतात, ते सुरु होते. ती त्यांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती. ते अस्वस्थ होते, फक्त संधीची वाट पाहत होते. त्यांना पत्राचाळ प्रकरणाने संधी दिली. पत्राचाळीमध्ये कष्ट करणारे मध्यमवर्गीय लोक राहत होते. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला, त्या चाळकऱ्यांना घरे मिळावी अशी त्यांची मागणी होती. ते संजय राऊत यांच्याकडे गेले. संजय राऊत यांच्या नेहमीच्या लिखाणाने दुखावलेल्या शासकीय यंत्रणेला संधी मिळाली. ईडीचे योगदान या प्रकरणात अधिक आहे. ईडीने केलेल्या केसमध्ये संजय राऊत यांचा संबंध नसताना गुंतवले गेले. जिथे अन्याय होतो, अत्याचार होतो तिथे सामना उभा राहतो. शासकीय यंत्रणेत भ्रष्टाचार आहे, त्याच्या विरोधात ते नेहमीच लिहितात याची कल्पना आपल्या सर्वांना आहे, असे शरद पवार म्हणाले.

कारवाई दूरच, पण राऊतांनाच आत जावे लागले

मुंबई, महाराष्ट्रात काही लोक चुकीचे काम करत होते, हे माहीत असताना त्यांच्या संबंधी कारवाई होत नव्हती. संजय राऊतांनी खासदार म्हणून देशाच्या प्रमुखांना पत्र लिहिलं. जे लोक शासकीय यंत्रणा यांच्याशी भ्रष्टाचाराच्या मार्गानं संबंध ठेवतात, अशा लोकांमार्फत पैसे कसे गोळा केले जातात याचे सविस्तर लिखाण केंद्र सरकारला कळवले. त्या प्रकरणात 30 ते 35 लोक असे होते, कंपन्या होत्या, त्यांच्याकडून पैसे काढले गेले, ती रक्कम 58 कोटींच्या आसपास होती. ही माहिती संजय राऊतांकडे आल्यानंतर त्यांनी देशाच्या प्रमुख लोकांना लिखित स्वरुपात दिली, त्याचा परिणाम एकच झाला, कारवाई झाली नाही पण त्यांना आत जावे लागले. संजय राऊत यांना अटक झाली, त्याबद्दल पुस्तक लिहिण्यात आले आहे, असे शरद पवार म्हणाले.

पवारांनी संजय राऊतांच्या पुस्तकावरही केले भाष्य

संजय राऊतांच्या पुस्तकात दोन राजवटींचा पुस्तकात उल्लेख आहे. एक एनडीएच्या काळात आणि नंतर यूपीएच्या काळातील. ईडीने कोणत्या पक्षांवर केसेस केल्या याची माहिती आहे. एनडीएच्या काळात 21 जणांवर कारवाई केली होती. यूपीएच्या काळात 9 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं. अटक कुणाला केली नाही. एनडीएच्या काळात काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादी, शिवसेना, द्रमुक, बिजू जनता दल, आरजेडी, बसपा, सपा, टीडीप, आप, मार्क्सवादी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, मनसे, अण्णा द्रमुक, टीआरएस एवढ्या पक्षाच्या नेत्यांवर चौकशा करून केसेस केल्या, असंही शरद पवार म्हणाले.

तसेच मी विचार करतोय, हे पुस्तक वाचल्यावर महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने देशात परिवर्तन केलं तर पहिलं काम हे करावं लागेल राजकीय पक्षांचा जो अधिकार आहे, जो ईडी कायद्याचा आधार घेऊन उद्ध्वस्त करायचा जी तरतूद झाली आहे, ती बदलावी लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

स्वर्गासारख्या आपल्या देशाला नरक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नरकात टाकण्यासाठी लढावं, जिंकावं लागेल

मुंबई

“हा एक कसोटीचा क्षण आहे. दिवस येतात, दिवस जातात. शरद पवार म्हणाले, सरकार येतं, तसं सरकार जातं. हे सरकार सुद्धा उद्या जाणार आणि ते आपल्याला घालवावंच लागेल. मला हे व्हायचं, आहे मला ते व्हायचं आहे, म्हणून नाही.

स्वर्गासारख्या आपला देश आहे. त्या देशाचा नरक करण्याचा जो प्रयत्न चालू ठेवला आहे, त्यांना नरकात टाकण्यासाठी म्हणून आपल्याला लढावं लागेल. नुसतं लढावं नाही तर, जिंकावं लागेल”, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्या प्रसंगी बोलताना ते असं म्हणाले आहेत. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात हा प्रकाशन सोहळा पार पडला आहे. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पटकथाकार, लेखक, कवी जावेद अख्तर होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले हे प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला संजय राऊत यांच्या आई, वहिनी, दोन्ही मुली, जावई आणि दोन्ही भाऊ उपस्थित आहेत. घर जर ढेपाळलं तर, लढवय्या हा लढूच शकत नाही. संजय राऊत यांच्या आईने आणि सर्व कुटुंबीयांनी जे धाडस दाखवलं, त्या धाडसाला सीमाच नाही. संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर मी आणि रश्मी ठाकरे त्यांच्या घरी गेलो होतो. यावेळी आम्ही त्यांना धीर देण्या ऐवजी संजय राऊत यांच्या आई आणि सगळ्यांनी आम्हालाच धीर दिला. आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसे भेटत राहतात. काही कायमची सोबत राहतात आणि काही संधीसाधू असतात. संधी सध्या झाली की पळून जातात. मला असं वाटतंय की, आज आपल्या सगळ्यांची परीक्षा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे घेत आहेत. आयुष्यभर त्यांनी जे काही दिलं, त्यांच्याकडून कोणी काय घेतलं, हे ते बघत आहेत. त्यांचं एक वाक्य आहे, ‘शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा.’ संजय राऊत यांनी पुस्तकाचे नाव नरकातला स्वर्ग ठेवलं आहे. जो माणूस नरकात स्वर्ग शोधतो, तो काय धाटणीचा माणूस असेल, हे वेगळं सांगायला नको. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुषभरात मराठी माणूस आणि हिंदूंना आत्मविश्वास आणि जिद्द दिली. नाही तर आज मुंबई आणि महाराष्ट्रात आपली परिस्थिती काय असती, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ते बघत आहेत की, मी जे दिलं, ते घेणारे खरे किती आहेत आणि भाडखाऊ पळणारे किती आहेत.”

उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज जे स्वर्गात गेलेत त्यांच्या दृष्टितीने त्यांना सुद्धा हा कार्यक्रम बघितल्यानंतर हेवा वाटत असेल. मगाशी संजय राऊत तुमचं भाषण सुरु असताना जणू तुम्ही एक विरोधी पुस्तक लिहिलं आहे, अशा थाटात बोलत होता. त्यांना सुद्धा हेवा वाटला असेल, अरे आपण सुद्धा इथं राहिलो असतो. नरक आणि स्वर्ग या कल्पना खऱ्या आहेत की, खोट्या आहेत? याची कल्पना नाही. पण जिथे आहोत तिथे आनंदाने राहावं, दुसऱ्याला आपण आनंद देऊ शकलो नाही, तर निदान त्रास तरी देऊ नये, एवढं जरी माणसाने पाळलं तरी, असं वाटतं आपण आयुष्य जगलो. आज आपण जे बघत आहोत, याला लोकशाही मानायची की हुकूमशाही? हा प्रश्न आणि त्यांचं उत्तर हे सोपं आहे. पण हुकूमशहा कोणीही असला तर त्याला एक ना एक दिवस जावं लागतं. हिटलरला संपूर्ण जग घाबरत होतं. पण संजय राऊत तुम्ही जे आधी लिहायचे त्यात एक आवडीचा शब्द होता, ‘नियती’. नियतीने कदाचित त्याला (हिटलरला) सांगितलं असेल, सगळं जग घाबरतं, तू नाही ना घाबरत. मग घालून घे स्वतःला गोळी. मग त्याला सुद्धा आत्महत्या करावी लागली. हा हुकूमशहाचा शेवट असतो.”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “या पुस्तकासंदर्भात संजय राऊत यांच्या मुलाखती येत आहेत, त्यातले काही प्रसंग चर्चिले जात आहे. यातच एक प्रसंग आहे तो, अमित शहा यांचा. मला जर कोणी विचारलं की, अमित शहा तुमच्या घरी आले होते का? बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मदत केली होती का? मी सांगणे मला आठवत नाही. कारण आपल्या घराण्याने, आपल्या वाडवडिलांनी कोणावर काही उपकार केले असतील तर, उपकार हे मोजायचे नसतात. उपकार करायचे असतात, पण मोजायचे नसतात. उपकाराची फेड ही कृतज्ञाने करायची की आपकाराने करायची, हे ज्याच्या त्याच्यावर असतं. काही वेळेला असं वाटतं की, कोणाला मदत करताना सुद्धा आपण विचार करू शकत नाही. साकेत गोखले तुम्ही आताच सांगतलं की, एक कैदी असा होता की, ज्याला जामीन मंजूर झाला, पण त्याकडे 500 रुपये नव्हते भरायला. काय करायचं या गोष्टीला? इकडे करोडो रुपयांचे भ्रष्टाचार सुरू आहेत. तर एका बाजूला एक कैदी 500 रुपये नाही म्हणून तुरुंगात पडला आहे. ही जी पद्धत आहे, त्याला लोकशाही म्हणायचं आपण? हे एकाधिकारशाहीने चाललं आहे. मला आठवत आहे की, अनिल देशमुख माझ्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. असा कोणता देश असेल, ज्या देशात मुख्यमंत्र्यांना अटक होते. अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती. हेमंत सोरेन आणि गृहमंत्र्यांना अटक झाली. मी मुख्यमंत्री असताना आपल्या राज्याच्या डीजींना आणि सीएसला सीबीआयने बोलवलं होतं. ज्यांच्या शेंड्या केंद्राच्या हातात असतील आणि विरोधी पक्षांच्या सरकारमध्ये अशी माणसे असतील, तर त्यांचं काम ते कसं करू शकतील. ममता बॅनर्जी यांनाही तोच अनुभव आला होता. त्यांच्या सीएसने शेवटी राजीनामा दिला. आपल्या देशात संघराज्य पद्धती आहे. केंद्र हा शब्द नाही. केंद्र सरकारला जितका अधिकार आहे, तितकाच अधिकार कायद्याने राज्य सरकारला सुद्धा आहे आणि असलाच पाहिजे. ईडी, आयटी, सीबीआय आणि पीएमएलए कायदा लावण्याचा अधिकार दिल्लीतील सरकारला असेल तर, तोच अधिकार आमच्या राज्य सरकारला सुद्धा पाहिजे. टाका त्यांच्यावर सुद्धा धाडी, बसवा त्यांना सुद्धा आतमध्ये. संजय राऊत, साकेत गोखले आणि अनिल देशमुख हे भोगून आले आहेत. या तिघांकडेही चार्ज द्या, मग ते सांगतील त्यांच्यावर धाडी टाका. त्यांना तुरुंगात टाका आणि सिद्ध करा की, तुम्ही निर्दोष आहे. या सगळ्या प्रकाराविरोधात लढत राहिलं पाहिजे.”

ते म्हणाले की, “आज निवडणूक आयोगाचे सगळे अधिकारी आले होते, वन नेशन, वन इलेक्शन. यासाठी साकेत गोखलेही आले होते. आपल्याकडून अनिल परब आणि अनिल देसाई यांना मी पाठवलं होतं. वन नेशन, वन इलेक्शन, फार गोंडस आहे. पण निवडणुकीमध्ये पारदर्शकता कुठे आहे. आता आपल्या सरन्यायाधीशांच्या मातोश्रीने सांगितलं की, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. संशय जर का मोकळा करायचा असेल तर, एक तरी निवडणूक देशात बॅलेट पेपरवर घ्या आणि मग तुमची टिमकी वाजवा. पण ते होणार नाही. मग दुसरा विषय मी त्यांना मांडायला सांगितला की, वन नेशन, वन इलेक्शनमध्ये सगळ्यांना एका पातळीवर उभं करा. कारण वन नेशन म्हटलं तर, देशाचा पंतप्रधान आहे आणि देशाचा पंतप्रधान हा एका पक्षाचा प्रचारक होऊ शकत नाही. एक तर त्याने प्रचारक होऊ नये आणि प्रचार करायचा असेल तर, स्वतःच्या पक्षाबरोबर, इतर पक्षांचा आणि अपक्ष उमेदवारांचा प्रचार सुद्धा त्यांनी केला पाहिजे. तर मी म्हणेल लोकशाही आहे.”