विद्यार्थीदशेतच रुजावी पर्यावरण संवर्धनाची चळवळ-डॉ. विजय भटकर
पुणेकर धावले संविधानासाठी, समतेच्या न्यायासाठी
पुणे : ‘एक धाव समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्वासाठी…एक धाव आपल्या संविधानासाठी’ असा उद्घोष करीत पुणेकर रविवारी सकाळी संविधानाच्या सन्मानासाठी धावले. निमित्त होते, भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान सन्मान समितीच्या वतीने संविधान जागर सप्ताहात आयोजित संविधान दौडचे. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील आंबडेकर पुतळ्यापासून सणस मैदानापर्यंत ही संविधान दौड झाली.
सकाळी सात वाजता महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र सचिव व संविधान दौडचे मुख्य संयोजक बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, नगरसेविका सुनीता वाडेकर, शहराध्यक्ष अशोक कांबळे, महेश शिंदे, नीलेश आल्हाट, विठ्ठल गायकवाड, शाम गायकवाड, बसवराज गायकवाड, बाबुराव घाडगे, संदीप धांडोरे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते या संविधान दौडचे आंबेडकर पुतळ्याजवळ उद्घाटन झाले. सणस मैदानावर या दौडची सांगता झाली.
महाराष्ट्र ऍथलेटिक संघाचे अध्यक्ष अभय छाजेड यांच्या हस्ते दौडमधील सहभागी स्पर्धकांना गौरविण्यात आले. त्यामध्ये पुरुष गटात रविकुमार महतो, स्वामीनाथ आसवले, अब्दुल कुरैशी, प्रेम कांबले, शब्बीर मंसूरी, दीपक शुक्ला, मोबिन शेख, सुदेश कदम, अशोक जाधव, रतन बोदरे, अक्षय कांबळे, भूषण बांगरे, स्वस्तिक कस्बे, अजय ठाकुर, बबन वाघचौरे यांना, तर महिला गटात रसिका पवार, प्रतिक्षा खरात, रईसा चम्बूर, सोनाली कोकाटे, श्रद्धा मांजरे यांना आणि अपंग गटात बबन बोराडे यांना सन्मानित करण्यात आले.
शिल्पा शेट्टीच्या उपस्थितीतील बजाज अॅलियान्झ लाइफच्या प्लँकेथॉन उपक्रमाने आज गिनीज बुकामध्ये नवा जागतिक विक्रम
पुणे: बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लि. या भारतातील एका आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपनीने चांगले आरोग्य राखण्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आयोजित केलेल्या प्लँकेथॉन उपक्रमाने आज गिनीज बुकामध्ये नवा जागतिक विक्रम रचला. या उपक्रमामध्ये, विक्रमी संख्येच्या लोकांनी एकाच वेळी एक संपूर्ण मिनिट अॅब्डॉमिनल प्लँक स्थिती कायम ठेवली. पुणे येथील एएफएमसी ग्राउंड येथे, 2353 लोकांनी अॅब्डॉमिनल प्लँक केल्याने नवा जागतिक विक्रम रचण्यात आला.
अभिनेत्री, होस्ट व फिटनेसप्रेमी शिल्पा शेट्टी कुंद्रा यांनी बजाज अॅलियान्झ लाइफच्या प्लँकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या लोकांना प्रोत्साहन दिले. गिनिज वर्ल्ड रोकॉर्ड्स™चे अधिकृत निर्णायक रिशी नाथही उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आणि एक मिनिट सर्वांनी एकत्रितपणे ‘सर्वाधिक लोकांनी अॅब्डॉमिनल प्लँक स्थिती करणे’ या श्रेणीसाठी नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स रचल्याचा आनंद घेतला.
बजाज अॅलियान्झ लाइफ प्लँकेथॉन हा कंपनीच्या #36SecPlankChallenge या यशस्वी अभियानातील अंतिम उपक्रम होता. लोकांनी निरोगी राहावे, या उद्देशाने आयोजित केलेल्या सोप्या व धमाल कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हे अभियान आखले होते. यामध्ये, 36 सेकंद प्लँक करण्यासाठी लोकांनी त्यांचे मित्र, कुटुंब व सहकारी यांना सोशल मीडियावर आव्हान दिले. गेल्या काही महिन्यांत या अभियानामध्ये, सायना नेहवाल, गीता फोगट व दीपा मलिक अशा खेळाडूंनी, फिटनेसप्रेमींनी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व भारतातील कॉर्पोरेट अधिकाऱ्यांनी भाग घेतला.
नवा जागतिक विक्रम रचण्याबद्दल, बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्सचे चीफ मार्केटिंग ऑफिसर चंद्रमोहन मेहरा म्हणाले, “भारताला जागतिक नकाशावर स्थान देईल अशी भव्य फिटनेस चळवळ सुरू करण्याची आमची बांधिलकी प्लँकेथॉन उपक्रमातून दिसून येते. जीवनातील विविध उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी आरोग्य चांगले असणे अतिशय गरजेचे आहे. #36SecPlankChallenge उपक्रमाच्या यशामुळे आम्हाला हा उपक्रम आणखी पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे, तसेच विश्वासार्ह भागीदाराच्या मदतीने आरोग्यविषयक उद्दिष्ट्ये साध्य करत असताना उपलब्ध असणाऱ्या शक्यताही दिसून आल्या.”
बजाज अॅलियान्झ लाइफच्या प्लँकेथॉनसाठी एकत्र आलेल्या लोकांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी उपस्थित असलेल्या अभिनेत्री व फिटनेसप्रेमी शिल्पा शेट्टी कुंद्रा यांनी सांगितले, “बजाज अॅलियान्झ लाइफने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने #36SecPlankChallenge या उपक्रमाद्वारे अनेक लोकांना एकतर आरोग्यदायी उपक्रम सुरू करण्यासाठी किंवा व्यायामाच्या दैनंदिन वेळापत्रकाचा आणखी आनंद घेण्यासाठी उत्तेजन दिले. असंख्य लोकांना यशस्वीपणे एकत्र आणल्याबद्दल व गिनिज वर्ल्ड रोकॉर्ड्स® रचल्याबदद्ल त्यांचे मनापासून अभिनंदन. सक्रिय जीवनशैली कायम राखण्यासाठी, या लोकांपैकी अनेक जण यापुढेही सामध्ये सातत्य ठेवतील, अशी खात्री आहे व अपेक्षा आहे. असे रंजक उपक्रम आणखी असंख्य जणांना यामध्ये सहभागी होण्यासाठी उत्तेजन देतील.”
गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्स™चे अधिकृत निर्णायक रिशी नाथ यांनी सांगितले, “आज, गिनिज बुकात नवा जागतिक विक्रम रचत असताना, येथे दिसून आलेला प्रचंड उत्साह पाहणे आनंदकारक व आश्चर्यकारक होते. “सर्वाधिक लोकांनी अॅब्डॉमिनल प्लँक स्थिती करणे” या श्रेणीमध्ये नवा विक्रम रचल्याबद्दल बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्सचे अभिनंदन.
बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडविषयी
बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्स ही भारतातील एक आघाडीची खासगी विमा कंपनी आहे. ही बजाज समूहासाठी वित्तीय सेवा हाताळणारा व्यवसाय बजाज फिनसर्व्ह लिमिटेड व जगातील आघाडीचा विमा समूह व जगातील एक सर्वात मोठी संपत्ती व्यवस्थापक अॅलियान्झ एसई यांच्यातील संयुक्त भागीदारी आहे.
बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने 2001 मध्ये कार्य सुरू केले आणि आज 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत कंपनीच्या देशात 624 हून अधिक शाखा आहेत. कंपनी आपल्या सक्षम उत्पादनांद्वारे आयुर्विमा उत्पादने उपलब्ध करते व त्यामध्ये ग्राहकांना त्यांच्या जीवनातील उद्दिष्टे पूर्ण करता यावीत म्हणून पारंपरिक विमा उत्पादने व युलिप यांचा समावेश आहे. कंपनी समूह विमा व आरोग्य विमा योजनाही उपलब्ध करते.
फडणवीस साहेब,जो वादा किया हो..निभाना पडेगा (व्हिडीओ)
मुंबईः पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी,पत्रकार पेन्शन,छाटया वृत्तपत्रांचे अस्तित्व संपवून टाकणारे जाहिरात धोरण मागे घेणे,अधिस्वीकृतीबाबतच्या जाचक अटी शिथिल करणे आणि मजिठियाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकारांच्या अन्य संघटनांच्यावतीने सोमवार दिनांक 26 नोव्हेंबर 2018 रोजी राज्यभर जिल्हाधीकारी कार्यालया समोर सकाळी 11 वाजे पासून धरणे अंदोलन करण्यात येणार असून सर्व पञकार संघटना व पञकार बांधवाणी या अंदोलनात सहभागी होऊन पञकाराची एकजूट शासनाला दाखवावी असे अवाहन मराठी पञकार परीषदेच्या वतीने एस एम देशमूख यांनी केले आहे .
ते म्हणाले,’पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाला पण त्याची अंमलबजावणी होत नाही,पेन्शनची घोषणा झाली पण अजून त्याचीही अंमलबजावणी नाही,छोटया वृत्तपत्रांसाठीच्या जाहिरात धोरणात बदल करून ते छोटी वृत्तपत्रे बंदच होतील अशा पध्दतीनं आखले गेले आहे त्याचा मोठा फटका वृत्तपत्र व्यवसायाला बसणार आहे,मजिठियाच्या अंमलबजावणीबाबतही आनंदी आनंद आहे.सरकार घोषणा करते पण अंमलबजावणी करीत नसल्यानं राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष आहे.तो व्यक्त करण्यासाठी सोमवारी दिनांक 26 नोव्हेंबर 2018 रोजी राज्यातील पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करतील.आपल्या भागातील आमदारांना भेटून पत्रकारांचे प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्याबाबत विनंती करतील 26 तारखेला छोटया आणि जिल्हा वृत्तपत्रांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर अग्रलेख लिहून शासनाचे लक्ष पत्रकारांच्या प्रश्नांकडं वेधण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने केले आहे.
16 नोव्हेंबर रोजी राज्यातील पत्रकारांनी राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या सरकारी कार्यक्रमावर बहिष्कार टाकून आपल्या संतप्त भावना व्यक्त केलेल्या आहेत.आता थेट रस्त्यावर उतरून पत्रकार आपला आक्रोश जनता आणि सरकारच्या कानावर घालणार आहेत. देशात आणि राज्यात विविध मार्गानं पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे.पत्रकारांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांकडं केलं जाणारं दुर्लक्ष हा त्याचाच भाग आहे.सरकारच्या या धोरणाच्या विरोधात राज्यातील सर्व पत्रकार संघटनांनी आपसातील वाद बाजूला ठेऊन या आंदोलनात सहभागी व्हावे हे आंदोलन राज्यभरात पञकाराचे नेते एस एम देशमूख यांचे नेतृत्वा खाली करण्यात येणार आहे. या अंदोलनात मोठ्या संख्येने पञकार बांधवानी सहभागी व्हावे असे आवाहन मराठी पञकार परीषदेचे विश्वस्त किरण नाईक अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा कार्याध्यक्ष गजानन नाईक सरचिटणीस अनिल महाजन कोषाध्यक्ष शरद पाबळे सर्व पदाधीकारी यांनी केले आहे .
एसएमएस पाठवा,आपल्या मागण्या थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडा..
सीएमओतील काही झारीतले शुक्राचार्य मुख्यमंत्र्यांशी पत्रकारांचा थेट संवाद होऊ देत नाहीत.त्यामुळं आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी एसएमएस किंवा ट्टिटरच्या माध्यमाचा उपयोग करावा लागतो.असेही श्री देशमुख यांनी सांगितले.
ते म्हणाले,’सोमवार दिनांक 26 नोव्हेंबर 2018 रोजी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोबाईल नंबरवर हजारो एसएमएस करून पत्रकारांचेप्रश्न पुन्हा एकदा त्यांच्या कानावर घातले जाणार आहेत.त्यांच्या ट्टिटरवरून देखील पत्रकार आपल्या संतप्त भावना श्री.फडणवीस यांच्या कानावर घालतील.मुख्यमंत्र्यांबरोबरच विरोधी पक्षांनी पत्रकारांचेप्रश्न विधानसभेत उपस्थित करावेत यासाठी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना देखील एसएमएस पाठवून आणि त्यांच्या ट्टिटरवरून आपलं गाऱ्हाणे त्यांच्याही कानी घातलं जाणार आहे.सर्व पत्रकारांना विनंती आहे की,26 नोव्हेंबर 18 रोजी म्हणजे सोमवारी एसएमएस पाठवून आपल्या मागण्या थेट मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्याचं आवाहन पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदेनं केलं आहे.
एसएमएस पाठविण्यासाठी खालील फोन नंबर्स आहेत.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ः 9373107881
राधाकृष्ण विखे पाटील ः 9821013853
धनंजय मुंडे ः 9850777777
ट्टिटर
देवेद्र फडणवीस @Dev_Fadnavis
राधाकृष्ण विखे पाटील @RadhakrishnaVik
धनंजय मुंडे @dhananjay_munde
एसएमएसचा मजकूर ः
पत्रकार संरक्षण कायदा,पत्रकार पेन्शन योजना,मजिठियाची अंमलबजावणी झालीच पाहिजे.. छोटया वृत्तपत्रांना न्याय द्या..अधिस्वीकृतीचे निमय शिथिल करा .. या मागण्यांसाठी आज १०,००० पत्रकार रस्त्यावर उतरले आहेत.
पत्रकारांना वारंवार रस्त्यावर उतरण्याची वेळ यावी हे दुःखद आहे साहेब..आता आश्वासनं नकोत,अंमलबजावणी हवीय मुख्यमंत्री साहेब.
(खाली आपलं नाव गाव,वृत्तपत्राचं नाव लिहावं )
विरोधी पक्ष नेत्यांना पाठवायचा एसएमएस. पत्रकार संरक्षण कायदा,पत्रकार पेन्शन,मजिठिया,छोटया वृत्तपत्रांचे प्रश्न,अधिस्वीकृतीचे प्रश्न विधिमंडळात उपस्थित करून पत्रकारांना सहकार्य करावे ही विनंती. वरील मागण्यांसाठी राज्यातील १०,००० पत्रकार आज रस्त्यावर उतरले आहेत.
(खाली आपलं नाव गाव,वृत्तपत्राचं नाव लिहावं )
घोषणा —
जो वादा किया हो..निभाना पडेगा
पत्रकार सुरक्षा कानून लाना पडेगा !
————–
हमारी मांगे पुरी करो..वरना
2019 नजदिक आ रहा है !
—————
मिडिया पर हमले बढ रहे है !
पत्रकार सुरक्षा कानून कहा है ?
——-
आश्वासनांचा पाऊस पडला..
अंमलबजावणीचा मात्र दुष्काळ आहे..
———
अधिस्वीकृती म्हणजे पत्रकारितेचा पासपोर्ट नाही,
पत्रकारांना सवलती देताना अधिस्वीकृतीची अट रद्द करा
————
मजिठियाची अंमलबजावणी होत का नाही ?
श्रमिक पत्रकारांना न्याय मिळत का नाही ?
———–
नवे जाहिरात धोरण छोटया वृत्तपत्रांसाठी
‘डेथ वॉरंट’ आहे,ते मागे घ्या,छोटया वृत्तपत्रांना न्याय द्या !
————–
एकमतानं मंजूर झालेल्या पत्रकार संरक्षण कायद्याचं
घोडं नेमकं पेंड कुठं खातंय ?
————-
JOURNALISM IS
NOT A CRIME
————-
STOP ATTACKS ON
JOURNALIST
————-
STOP
KILLING JOURNALIST
THEY ARE YOUR VOICE
___________________________________
हमे चाहिए,पत्रकार सुरक्षा कानून,
पेन्शन और मजिठिया
—————–
अधिस्वीकृतीचे निमय ग्रामीण पत्रकारांवर अन्याय
करणारे आहेत,त्यात बदल करा..
——————–
पत्रकार म्हणजे वेठबिगार नाहीत..
आमच्या मागण्यांचा सहानुभूतीनं विचार करा..
————–
लक्षात ठेवा,2019 जवळ आलंय,
पत्रकारांशी पंगा महागात पडेल !
जिल्हा परिषद शिक्षिका अनुराधा काजळे निघाल्या किलीमांजारो शिखरावर
360 एक्सप्लोरर मार्फत पहिल्या जिल्हा परिषद शिक्षक जाणार आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या एक वर्षांपासून खडतर सराव
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षिका अनुराधा काजळे या दक्षिण आफ्रिकेतील किलिमांजारो शिखर सर करण्यासाठी रविवारी रवाना झाल्या आहेत. 360 एक्सप्लोररच्या वतीने आयोजित मोहिमेचा फ्लॅग ऑफ एव्हरेस्टवीर व विश्वविक्रमवीर आनंद बनसोडे यांच्या हस्ते करून शुभेच्छा देण्यात आल्या. या शिखरावर जाणाऱ्या त्या सोलापुरातील पहिल्या महिला ठरणार आहेत. यासोबतच जिल्हा परिषदेच्या पहिल्या शिक्षिका होण्याचा मानही त्यांनाच मिळणार आहे.
आफ्रिकेतील टांझानिया देशातील हे शिखर असून याची उंची समुद्र सपाटी पासून 19,341फूट आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी 15 ऑगस्ट 2015 रोजी हे शिखर सर करून त्यावर भारताचे राष्ट्रगीत वाजवून विश्वविक्रम केला होता. गेल्या 6 वर्षात सोलापूरमधील जवळपास 250 प्रोफेशनल गिर्यारोहक व ट्रेकर्स आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत. गेल्या 3 वर्षात तब्बल 12 लोकांनी आनंद बनसोडेच्या मार्गदर्शनाखाली माउंट किलीमांजारो हे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर सर केले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गेले 1 वर्ष सराव करून अनुराधा काजळे या मोहिमेवर जात आहेत.
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडेने स्थापन केलेल्या 360 एक्सप्लोरर मार्फत साहसी खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी वेगवेगळ्या जागतिक मोहीम आखल्या जात आहेत त्या मध्ये वेगवेगळ्या खंडातील गिर्यारोहण, स्काय डायविंग, स्कुबा डायविंग हे सर्व समाविष्ट आहे.
–360 एक्सप्लोरर टीचर्स ट्रेकिंग क्लब–
सोलापूर मधील सर्वच शिक्षकाना ट्रेकिंग ची आवड निर्माण व्हावी तसेच त्याच्यामार्फत विद्यार्थ्यांना या क्षेत्राची ओळख निर्माण व्हावी म्हणून आनंद बनसोडे व इतर गिर्यारोहकांनी “360 एक्सप्लोरर टीचर्स ट्रेकिंग क्लब” सोलापूरमध्ये सुरू केले आहे. त्याची अध्यक्ष म्हणून अनुराधा काजळे यांची सर्वानुमते निवड झाली आहे.
-अनुराधा काजळे यांची माहिती-
अनुराधा काजळे या सोलापूर जिल्हा परिषद विडी घरकुल शाळेतील शिक्षिका आहेत. त्या कवयित्री असून त्यांचे ‘मनीचे गुज’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यांनी यापूर्वी स्वर्गारोहिणी व कळसुबाई यासह विविध शिखर सर केले आहेत. त्यांचा स्वकुळरत्न यासह विविध पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. नुकतीच त्यांची 360 एक्सप्लोरर टीचर्स ट्रेकिंग क्लबच्या अध्यक्षपदीही निवड करण्यात आली आहे.
– आनंद बनसोडे –
“सोलापूरमधील प्रथम शिक्षिका व महिला गिर्यारोहक म्हणून अनुराधा काजळे यांचे प्रथम अभिनंदन. त्याचे त्यांच्या स्वप्नावरील प्रेम व जिद्द याची तोड कशाशीही करता येणार नाही. किलीमांजारो सर करून जिल्हापरिषद शिक्षकांपुढे एक आदर्श निर्माण करतील यात शंका नाही. 360 एक्सप्लोरर मार्फत अनेकांना जागतिक मोहिमांसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.”
चारुहास पंडित आणि चिमुकल्यांनी साकारला वाडा संस्कृतीतील ‘चिंटू ‘ !
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन-१० हजार विद्यार्थी होणार सहभागी
पुणे :’भारतीय संविधान दिवस ‘ २६ नोव्हेंबर निमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी च्या ३० शैक्षणिक आस्थापनातर्फे भारतीय घटनेच्या उद्देशिकेचे भव्य सामूहिक वाचन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे . संस्थेचे अध्यक्ष डॉ . पी . ए . इनामदार यांनी ही माहिती दिली .
संस्थेचे १० हजार विद्यार्थी ,प्राचार्य ,प्राध्यापक ,शिक्षकवर्ग या उपक्रमात सहभागी होणार आहे . संस्थेच्या आझम कॅम्पस ( पुणे कॅम्प )येथील मैदानात हा कार्यक्रम सोमवारी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी पावणे अकरा वाजता होणार आहे .
प्रीती झांगियानी, परवीन दबास, मुकेश ऋषी, परवेझ दमानिया यांनी केले आर्ट इन्फिनिटी असोसिएशनच्या ‘आर्टिव्हल २०१८’ चे उदघाटन !
पर्यटनस्थळी सर्कसला संधी द्या; केंद्र व राज्य सरकारांची मदत हवी – सुजित दिलीप
पुणे -26 नोव्हेंबर हा भारतीय सर्कसचा जन्मदिवस असून 136 वर्षांची मोठी परंपरा लाभलेल्या
भारतीय सर्कसला केंद्र व राज्य सरकारने आधार दिला पाहिजे. देशातील विविध पर्यटनस्थळी
कायमस्वरूपी सर्कस शो करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, आंतरराष्ट्रीय सर्कस देशात आणून
भारतीय सर्कस समवेत त्यांचे एकत्रित शो संपूर्ण वर्षभर तेथे चालू ठेवणे, प्रत्येक राज्यात
कौशल्यविकास योजनेअंतर्गत सर्कसशाळा सुरू करून सर्कसमधील कलाकसरतींचे प्रशिक्षण देणे,
प्रमुख शहरांमध्ये सर्कस महोत्सव भरवणे, वस्तीत येणार्या वाघ, बिबट्यांना सर्कसमध्ये
संगोपनासाठी ठेवणे अशा प्रकारे केंद्र व राज्य सरकार सर्कस उद्योगाला मदत करू शकेल व
त्यायोगे खंगत चाललेल्या भारतीय सर्कस उद्योगाला चालना मिळेल व सर्कस कला जिवंत
राहण्यास मदत होईल असे मत रॅम्बो सर्कसचे चालक सुजित दिलीप यांनी पत्रकार परिषदेत
व्यक्त केले.

भारतीय सर्कसचे जनक विष्णुपंत छत्रे यांनी 26 नोव्हेंबर 1882 मध्ये मुंबईतील बोरिबंदर
येथे ‘ग्रँड इंडियन सर्कस’चा पहिला शो केला आणि भारतीय सर्कसचा जन्म झाला. त्यास यंदा
136 वर्ष पूर्ण झाली आहेत. तसेच जागतिक सर्कसचे देखील यंदा 250वे वर्ष आहे. त्या
पार्श्वभूमीवर सुजित दिलीप बोलत होते.
ते म्हणाले, पुण्यात सध्या मगरपट्टा-मुंढवा परिसरात रॅम्बो सर्कस चालू असून सोमवार
दि. 26 नोव्हेंबर 2018 रोजी दुपारी 1.30 वाजता सर्व सर्कस कलावंतांसमवेत भारतीय सर्कसचा
जन्म दिवस साजरा केला जाईल. विष्णुपंत छत्रेंच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण केल्यानंतर
विष्णुपंत छत्रेंच्या घराण्याचे वारस सौ. कल्पना व अजय छत्रे, आंतरराष्ट्रीय सर्कसपटू दामू धोत्रे
यांचे नातू विलास धोत्रे, ‘सर्कस-सर्कस’ पुस्तकाच्या लेखिका कै. श्यामला शिरोडकर यांची कन्या
जानकी मोरे, ‘सर्कस विश्व’ आणि ‘वर्ल्ड ऑफ सर्कस’चे लेखक प्रवीण प्र. वाळिंबे यांचे सत्कार
करण्यात येणार आहेत.
ते पुढे म्हणाले, आंतरराष्ट्रीय सर्कस कलावंतांचा समावेश असणारी ‘सर्क्यू दु सोलेल’
(Cirque du Soliel) ही नामवंत सर्कस मुंबईत वांद्रा, कुर्ला कॉम्प्लेक्स येथे सुरू झाली असून, याचे
जनक कॅनडाचे ‘गाय लालीब्रेट’ (Guy Laliberte) यांनी जगातील 35 देशांमधील सर्कस कलावंतांना
एकत्र करून ‘सर्क्यू दु सोलेल’ (Cirque du Soliel) या नावाने अनेक सर्कस प्रॉडक्सन तयार केले
व जगात अनेक शहरांमध्ये त्यांचे प्रयोग सुरू आहेत. अतिशय आधुनिक तंत्रज्ञान, लाईट इफेक्टस्
या समवेत या आंतरराष्ट्रीय सर्कसपटूंच्या कसरतींना मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे ही
आनंदाची बाब आहे. त्यांनी युरोप, अमेरिकेत सर्कस कलावंतांना प्रशिक्षण देण्यासाठी सर्कस शाळा
सुरू केल्या. तसेच तेथील पर्यटन स्थळांपाशी कायम स्वरूपी सर्कस शो चालू ठेवले. याच धर्तीवर
आपल्या देशातही पर्यटन स्थळांजवळ कायम स्वरूपी सर्कस शो होण्याची व्यवस्था व्हायला हवी.
आता आंतरराष्ट्रीय सर्कस देखील भारतात येण्यास सुरूवात झाल्यामुळे भारतीय व आंतरराष्ट्रीय
सर्कसच्या कलावंतांचे एकत्रित शो पर्यटनस्थळी निश्चित आकर्षण बनतील. त्यामुळे सर्कस
कलावंतांना वर्षभर रोजगार मिळून भारतीय सर्कस उद्योगाला चालना मिळेल. तसेच
कौशल्यविकास (स्किल इंडिया) अंतर्गत प्रत्येक राज्यात सर्कस शाळा सुरू केल्यास त्यातूनही
दर्जेदार सर्कस कलावंत निर्माण होऊ शकतील. केरळमधील त्तेलिचेरी येथे सुरू झालेली सर्कसशाळा
आता बंद असून तेथेही आर्थिक मदत देऊन ही सर्कसशाळा सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी
देशातील सर्कस उद्योगही निश्चित योगदान देईल असे ते म्हणाले.
सध्या जंगलातून वस्तीकडे वाघ, बिबट्या येण्याचे प्रमाण वाढले असून नुकतेच नरभक्षक
बनलेल्या वाघिणीला ठार मारण्यात आले. या दुर्मिळ प्राण्यांना न मारता बिबट्यासारखे प्राणी
देशातील सर्कसला दिल्यास त्यांचे संगोपन सर्व प्रकारच्या सोयी सुविधांसह सर्कस चालक करू
शकतील. त्यामुळे सर्कसला देखील उर्जित अवस्था येऊ शकेल असे ते म्हणाले.
चलो अयोध्या मोहिमेसाठी पुण्यात मोटारसायकल रॅली
पुणे – राममंदिर व्हावे यासाठी शिवसेनेने ‘चलो अयोध्या’चा नारा दिला. यासाठी विविध मार्गाने प्रसिध्दी केली जात आहे. त्याच पाश्वभूमिवर आज पुणे शहरात शिवसैनिकांकडून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाऊन राममंदिरसाठी महाआरती करणार आहेत
येरवडा परिसरातून या रॅलीची सुरवात करण्यात आली. पुणे शहर शिवसेनेच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो शिवसैनिक दुचाकी घेऊन रॅलीत सहभागी झाले. शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. एकंदरीत पाहता भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने घोषित केलेल्या ‘चलो अयोध्या’ मोहिमे ला यशस्वी करण्यासाठी राज्यभरात शिवसैनिक कामाला लागल्याचे चित्र आहे
महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक अयोध्येला नेऊन शक्ती प्रदर्शनाचा शिवसेनेचा अजेंडा आहे. त्यामुळे पुणे शहरातूनही मोठ्या संख्येने शिवसैनिक अयोध्येला रवाना करण्याचे शहर शिवसेनेचे प्रयत्न आहेत. पुण्यातल्या या बाईक रॅलीमध्ये सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, माजी आमदार तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पणत्यांनी उजळून निघाला श्रीकृष्ण मंदिर परिसर
नवीन मराठी शाळेत दुसऱ्या सत्राची सुरुवात विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण स्वागताने
पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत फुलांच्या पायघड्या,रांगोळ्या घालून, फुगे व फुले विद्यार्थ्यांना देऊन, औक्षण करून विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. शाला समिती अध्यक्ष डॉ. सुनील भंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी मिकीमाऊस, छोटा भीम असे कार्टून विश्वातील त्यांचे दोस्त देखील आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सौ.कल्पना वाघ, ज्येष्ठ शिक्षिका सौ.जयश्री खाडे व सौ. तनुजा तिकोने यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली.
मा.मुख्याध्यापिका सौ वाघ बाईंनी स्वागत व प्रास्ताविका मध्ये सर्व विद्यार्थी ,शिक्षक व सेवकांचे स्वागत केले. तसेच दिवाळी सुट्टीत विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध गोष्टी ,मजा याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शाळेतील शिक्षिका सौ.अर्चना देव यांनी विद्यार्थ्यांना ‘जादुची मडकी’ व ‘बडबड’ अशा दोन बोधप्रद व विद्यार्थ्यांचे मनोरंजन करणाऱ्या गोष्टी सांगितल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रुपाली सावंत आभार प्रदर्शन सौ. योगिता भावकर यांनी केले.
लठ्ठपणाबाबत जागृतीसाठी रॅली
पुणे : जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त वाइब्स पुणे संस्थेतर्फे लठ्ठपणा विरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. २५ नोव्हेंबर २०१८) सकाळी ७.०० वाजता भांडारकर रस्त्यावरील संस्थेच्या कार्यालयातून ही रॅली निघणार असून, विधी भांडारकर रस्ता, विधी महाविद्यालय, राष्ट्रीय चित्रपट संग्रहायलमार्गे प्रभात रस्ता, कर्वे रस्ता ते गुडलक चौक अशी ही रॅली असणार आहे. कल्याणीनगर परिसरातही संस्थेच्या वतीने लठ्ठपणा जागृतीसाठी रॅली काढण्यात येणार आहे.
आरोग्य व सौंदर्य क्षेत्रात १९९६ पासून कार्यरत असलेल्या वाईब्स संस्थेकडून दरवर्षी जागतिक लठ्ठपणा दिनाच्या निमित्ताने लठ्ठपणाबाबत जनजागृती केली जाते. अनेक गंभीर आजारांच्या मुळाशी लठ्ठपणा असू शकतो. अतिरिक्त वजनामुळे रक्तदाब, हायकोलेस्ट्रॉल व शरीराच्या तक्रारींमुळे हार्ट अॅटॅकचा धोकाही वाढतो. अतिउच्च रक्तदाबाच्या ५० टक्क्यांहून अधिक केसमध्ये पेशंटना हा त्रास फक्त अधिक वजनामुळे होतो. वाढत्या वजनामुळे डायबेटिस होण्याचे प्रमाणही बरेच आहे. सांध्याचेही विकार जडतात. अतिरिक्त वजनामुळे सांध्याच्या नाजूक आवरणावरही ताण येतो. लठ्ठपणाशी निगडीत आजारांमध्ये निद्रानाश, हार्निया, वेरीकोज वेन्स, सांध्याचे विकार, मूत्राशयाचे आजार, श्वास अडकून अचानक मृत्यू, यासह श्वसनाच्या अनेक आजारांचा समावेश आहे. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्याची गरज असल्याचे संयोजकांनी म्हटले आहे. अधिकाधिक नागरिकांनी या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहनही संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
पाडगावकर यांनी मराठी कवितेला समृद्ध केले ‘ : डॉ. कल्याणी हर्डीकर
केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत दुहेरीत भारताच्या एन विजय सुंदर व रामकुमार रामनाथन या जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश
एकेरीत स्वीडनच्या इलियास यमेरचा अंतिम फेरीत प्रवेश
पुणे: एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित पाचव्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत दुहेरीत भारताच्या एन विजय सुंदर व रामकुमार रामनाथन या जोडीने आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत दुहेरीत उपांत्य फेरीत भारताच्या एन विजय सुंदर व रामकुमार रामनाथन या जोडीने स्लोव्हाकियाच्या आंद्रेज मार्टिन व चीनच्या हंस पॉडलिपींक कॅस्टीलो यांचा टायब्रेकमध्ये 7-6(7), 6-0असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत तैपेईच्या हसीह चेंग पेंग व यांग सुंग हुआ या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या मॅक्स पुरसेल व लूक सेव्हिल यांचा (4)6-7, 6-3, 10-6असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
एकेरीत उपांत्य फेरीत तिसऱ्या मानांकित स्वीडनच्या इलियास यमेर याने कॅनडाच्या ब्रेडन चेन्यूरचा 6-3, 3-6, 6-3असा तीन सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ( उपांत्य फेरी):
इलियास यमेर(स्वीडन)(3)वि.वि.
ब्रेडन चेन्यूर(कॅनडा)6-3, 3-6, 6-3;
प्रजनेश गुन्नेश्वरण(भारत)(4)वि.राडू एल्बोट(मालदोविया)(1)
दुहेरी गट: उपांत्य फेरी:
हसीह चेंग पेंग(तैपेई)/यांग सुंग हुआ(तैपेई)वि.वि.मॅक्स पुरसेल(ऑस्ट्रेलिया)/लूक सेव्हिल(ऑस्ट्रेलिया)(4)6-7, 6-3, 10-6;
एन विजय सुंदर(भारत)/रामकुमार रामनाथन(भारत)वि.वि.आंद्रेज मार्टिन(स्लोव्हाकिया)/हंस पॉडलिपींक कॅस्टीलो(चीन)(4)7-6(7), 6-0;






