Home Blog Page 3034

शालोम ख्रिश्चन असोसिएशनचे अध्यक्ष ख्रिस्तोपर राजमनी पुरस्काराने सन्मानित

0

पुणे-

जागतिक मानवाधिकार दिनानिमित मानवाधिकार प्रखर शोध मोहीम सोसायटीच्यावतीने यंदाच्या वर्षीचा विशेष पुरस्कार ख्रिस्तोपर राजमनी यांना शाल , श्रीफळ व पुष्पगुछ देउन देण्यात आला . ख्रिस्तोपर राजमनी  हे शालोम ख्रिश्चन असोसिएशनचे अध्यक्ष असून त्यांनी गरजू महिलांना मदत , तसेच चर्चचे नूतनीकरण , रंगकाम , दफनभूमीमध्ये रंगरंगोटी , पाण्याची व्यवस्था , रुग्णांना रुग्णवाहिका , नाताळनिमित्त सामूहिक प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सवाची गाण्याच्या स्पर्धा , रुग्णांना आर्थिक व वैद्यकीय मदत त्यांनी केली आहे . त्यानिमित्ताने त्यांना विशेष पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमात पीटर डिक्रूज , विल्सन डॅनियल यांचा सत्कार करण्यात आला .

यावेळी  मानवाधिकार प्रखर शोध मोहीम सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष अभिमन्यू गवळी , राष्ट्रीय महासचिव राजेश गवळी ,पुणे शहर  अध्यक्ष अशोक जगताप , निवृत्त लेफ्टनंट जनरल आर. आर . निभोरकर  ,   उपजिल्हाधिकारी सय्यद सूर्यवंशी ,आमदार  जगदीश मुळीक  , पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानुरू , जॉन मुनावर सिंग , रिटा मारियन , सुनील रॉय , अँजलिस अँथोनी , येसू नंदन , जेम्स पॉल , रिबेलो जेकब , डेव्हिस दास आदी मान्यवर उपस्थित होते . 

जिल्हा पातळीवर मानवी हक्क संरक्षणासाठी न्यायालय झाले पाहिजे-अ‍ॅड.असिम सरोदे

0
पुणे : आज समाजात ज्या घटनेवर राजकारण होईल, अशा गोष्टींची चर्चा होते. परंतु ज्या घटनेचे राजकाराण होऊ शकत नाही अशा गोष्टींचा कुठेही उल्लेख केला जात नाही, हे दुर्देव आहे. त्यामुळे मानवी हक्काचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी  जिल्हा पातळीवर पोलीस स्टेशनमध्ये मानवी हक्क संरक्षणाचे सेल असायला हवे. तिथे मानवी हक्क उल्लंघनाच्या गुन्ह्यांची नोंद असली पाहिजे. दुर्देवाने असे सेल कुठेही नाहीत. जिल्हा पातळीवर मानवी हक्क संरक्षण न्यायालय झाले पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे प्रतिपादन अ‍ॅड. असिम सरोदे यांनी केले.
मानवी हक्क दिनानिमित्त मानवी हक्क  संरक्षण आणि जागृती संस्थेच्यावतीने मानव आधिकार पुरस्कार वितरण सोहळ््याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मालधक्का चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, राजस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. डी सावंत, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र.चिं. शेजवलकर, संपादक उन्मेश गुजराथी, संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. अभिषेक हरिदास, संस्थेचे कायदे विषयक सल्लागार अ‍ॅड. शार्दुल जाधवर, श्रीकांत जोगदंड, अनिल कदम, सोमनाथ सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते करतार सिंग, सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत साबळे, पत्रकार सुनील सवाशे, सामाजिक कार्यकर्ते प्रविण निकम, सौनम जांभुळकर, कृषीकांत आदिवासी शिक्षणसंस्था भीमाशंकर यांना मानव अधिकार पुरस्काराने गौरविण्यात आले. विशेष कार्य मानवधिकार पुरस्कार शिक्षण तज्ज्ञ डॉ. हरिदास, मानव अधिकार कार्यकर्त्या संगिता जोगदंड यांना देण्यात आला.
सुभाष वारे म्हणाले, भारताचे संविधान हे जगातील सर्वात उत्तम संविधान आहे हे आपल्यावर राज्य करणारे इंग्रज आज म्हणत आहेत. परंतु आपले संविधान तळागाळातील लोकापर्यंत नीट पोहचले नाही. त्याकरीता सर्वांनी संविधान वाचले पाहिजे. मानवी अधिकारांचा संकोच होत आहे तो थांबविला पाहिजे.
अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, मानवी हक्क कायदा हा नक्की काय आहे हे अनेकांना माहिती नाही. परंतु मानवी हक्काची होणारी पायमल्ली थांबविण्यासाठी आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आज ही संस्था कार्य करीत आहे हे उल्लेखनीय आहे. यावेळी डॉ. प्र.चिं.शेजवलकर, संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर व डॉ. ए.डी सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.  कृष्णा पठाडे यांनी सूत्रसंचालन केले. विकास कुचेकर यांनी प्रास्ताविक केले. विकास कदम यांनी आभार मानले.

पुण्यातील कॉंग्रेस भवनात ‘आनंद उत्सव ‘ (पहा तर हा व्हिडीओ)

पुणे-पाच राज्यातील निवडणुकीत कमबॅॅक ने पुण्यातील कॉंग्रेस भवनात ‘आनंद उत्सव ‘साजरा करण्यात आला. एरवी सुने सुने पडणारे कॉंग्रेस भवन आज मोटारी आणि कार्यकर्त्यांच्या तसेच माध्यम प्रतिनिधींच्या गर्दीने फुलून गेले होते.

पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे ,ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर ,उल्हास पवार ,अभय छाजेड,मोहन जोशी ,अरविंद शिंदे ,कमल व्यवहारे ,सोनाली मारणे,अविनाश बागवे, संगीता तिवारी ,अजित दरेकर ,बाळासाहेब अमराळे,कौस्तुभ गुजर ,राजा महाजन आदी कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस भवनात सकाळपासूनच गर्दी केली होती . अगोदर शहराध्यक्ष यांच्या कार्यालयात टीव्हीवर पाच राज्यातील निवडणुकींचे निकाल पाहता पाहता या सर्वांच्या आनंदला उधाण आले आणि मग फटाके, पेढे आणि ढोल ताशाबरोबर नाचो ..उत्सव  मोठ्या जोशात साजरा करण्यात आला पहा या आनंदाला उधाण आलेल्या जल्लोषमय उत्सवाची एक व्हिडीओ झलक …

वसंत रांजणे इलेव्हन संघाचा मोठा विजय

0

पुणे: साई9स्पोर्ट्स यांच्या तर्फे दुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक  क्रिकेट स्पर्धेत वसंत रांजणे इलेव्हन संघाने डी.बी. देवधर एलेव्हन संघाचा 8 गडी राखून दणदणीत पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

नेहरू स्टेडीयम क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात सचिन सामलच्या नाबाद 36 धावांच्या बळावर वसंत रांजणे इलेव्हन संघाने डी.बी. देवधर एलेव्हन संघाचा 8 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना पराग चितळे ,सुभाष रांजणे, मोहन जाधव व विवेक मालशे यांच्या अचूक गोलंदाजीने डी.बी. देवधर एलेव्हन संघाचा डाव 15 षटकात 6 बाद 74 धावांवर रोखला. अनंत नेरळकरच्या एकतर्फी 44 धावा संघाचा डाव भक्कम करू शकल्या नाहीत. 74 धावांचे लक्ष सचिन सामलच्या नाबाद 36 व  सनी मारवाडीच्या 19 धावांसह वसंत रांजणे इलेव्हन संघाने 3 चेंडू बाकी असताना 2 बाद 76 धावांसह सहज पुर्ण केले. 50 चेंडूत नाबाद 36 धावा करणारा सचिन सामल सामनावीर ठरला. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी

डी.बी. देवधर एलेव्हन- 15 षटकात 6 बाद 74 धावा(अनंत नेरळकर 44, पराग चितळे 2-14, सुभाष रांजणे 1-12, मोहन जाधव 1-5, विवेक मालशे 1-23) पराभूत वि वसंत रांजणे इलेव्हन – 14.3 षटकात 2 बाद 76 धावा (सचिन सामल नाबाद 36, सनी मारवाडी 19, रोहुल कानडे नाबाद 5, पराग कानडे 1-17, करण थापा 1-14) सामनावीर- सचिन सामल

वसंत रांजणे इलेव्हन संघाने 8 गडी राखून सामना जिंकला. 

नको असलेल्यांना मतदारांनी नाकारले, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

0

मुंबई – पाच राज्यांमध्य्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. दरम्यान, या निवडणुकीत भाजपाची दाणादाण उडाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धल ठाकरे यांनी भाजपाला टोला हाणला आहे. ”नको असलेल्यांना मतदारांनी नाकारले. पर्याय कोण या प्रश्नात गुंतून न पडता नको असलेल्यांना नाकारणाऱ्या मतदारांचे मी अभिनंदन करतो,” अशा शब्दात विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालांचे शिकसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले.

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालांबाबत प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुकीत हार जीत तर होतच असते. जिंकतो त्याचे अभिनंदन होत असते. पण या चार राज्यात परिवर्तन घडवणाऱ्या मतदारांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी इव्हीएम, पैसेवाटप, गुंडगिरी आणि पर्याय कोण? या प्रश्नांमध्ये अडकून न पडता जे नको आहेत, त्यांना नाकारले. मतदारांच्या या धाडसाने देशाला दाखवलेली ही दिशा आहे.”
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने जबरदस्त यश मिळवले आहे. छत्तीसगडमध्ये भाजपाची 15 वर्षांपासूनची काँग्रेसची सत्ता उखडून टाकत काँग्रेसने प्रचंड बहुमत मिळवले. तर राजस्थानमध्येही काँग्रेसने निर्णायक आघाडी घेतली आहे. तर मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसकडून भाजपाला टक्कर मिळत आहे.

धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती -मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं – अशोक चव्हाण

0

मुंबई-आज जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्व सिद्ध झाले आहे. हा धनशक्तीवर जनशक्तीचा विजय आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. २०१९ मध्ये केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तेवर येणार याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. ‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं’ असे अशोक चव्हाण म्हणाले.

आता मोदी लाट ओसरली असून देशात मोदींच्या नेतृत्वाचा प्रभाव जाणवला नाही असे ते म्हणाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर करडी नजर ठेवल्यामुळे भाजपाला मतदान यंत्रात फेरफार करणे शक्य झाले नाही असा दावा त्यांनी केला. हा निकाल म्हणजे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती प्रभावी ठरली असेच म्हणावे लागेल.

महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी या मुद्यांवर भाजपाचे सरकर सपशेल अपयशी ठरले असे ते म्हणाले. हा हुकूमशाहीवर लोकशाहीचा विजय आहे. भाजपा मोजक्या उद्योगपतींसाठी सत्तेचा वापर करतं होतं असा आरोप त्यांनी केला. हा हुकूमशाहीवर लोकशाहीचा विजय आहे. तिरस्कारावर प्रेमाचा आणि अहंकारावर नम्रतेचा विजय आहे असे अशोक चव्हाण म्हणाले.

हा लोकविरोधी भाजपा सरकारच्या विरोधात जनतेने दिलेला कौल आहे. महाराष्ट्रातील फडणवीस सरकार फक्त आता काही महिन्यांपुरता आहे. महाराष्ट्रातही तुम्हाला हाच कल दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इव्हेंट, जाहीरातबाजी करुन काही काळासासाठी जनतेची दिशाभूल करता येते असे काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

अंकुर स्पोर्ट्स क्लब (पुरुष गट ) व राजमाता जिजाऊ संघाने (महिला गट ) पटकावला नामदार चषक

0
पुणे- -अजय तांबट मित्र परिवारातर्फे सणस मैदानावर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत  (नामदार चषक ) मुंबईच्या अंकुर स्पोर्ट्स क्लबने पुरुष गटात तर, पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने महिला गटात रविवारी रात्री झालेल्या अंतिम सामन्यात आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करीत अंतिम फेरी जिंकली . त्याचबरोबर नामदार चषकावर आपले नावही कोरले . या दोन्ही विजेत्या संघाना प्रत्येकी रोख १ लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे पुरस्कार देण्यात आले .
 अंतिम सामन्यात अंकुर स्पोर्ट्स क्लब व मुंबईच्याच स्वस्तिक क्लब मध्ये चुरशीचा सामना रंगला अंकुश स्पोर्ट्स क्लबने स्वस्तिकची २४-२१ असा तीन गुणांनी चुरशीच्या सामन्या त पराभव केला. मध्यंतरापर्यंत अंकुर सांग १४-७ असा आघाडीवर होता . परंतु स्वस्तिकच्या खेळाडूंनी चांगला खेळ करत सामन्यात रंगत आणली एकवेळ दोन्ही संघात १७ व १८ गुणांवर बरोबरी झाली होती . परंतु नंतर अंकुरच्या सुशांत साहिल ,अभिजित कदम , मिलिंद कोलते या खेळाडूंनी जोमंदारपणे खेळ केला आणि विजयश्री खेचून आणली . स्वस्तिककडून. निलेश शिंदे , हरिदास भायताडे  व अभिषेक चव्हाण यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली . परंतु ते संघाचा पराभव चुरशीच्या सामन्यात टाळू शकले नाही .
महिलांचा अंतिम सामना मात्र एकतर्फीच झाला . पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने सायली किरपाळे , स्नेहल शिंदे, पल्लवी जमदाडे , व काजल जाधव यांच्या बहारदार खेळाच्या जोरावर ,पुण्याच्याच सुवर्णयुग संघाचा ३१–१० असा दणदणीत पराभव केला . सुवर्णयुगकडून शिवानी जोगण व स्वाती कांबळे यांनी चांगले प्रयत्न केले .
महिला गटात स्नेहल शिंदे हिला सर्वोत्कृष्ट खेळाडू , चढाईसाठी स्वाती कंधारे , सर्वोत्कृष्ट पकडसाठी दिव्या गोगावले याना पुरस्कार प्रदान करण्यात आले . तर पुरुष गटात निलेश शिंदे , शशांत साहिल , अजिंक्य कापरे , याना सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळाला .
स्पर्धेतील विजेते व उपविजेत्याना पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या बक्षिसे देण्यात आली याप्रसंगी खासदार अनिल शिरोळे , सयोंजक अजय तांबट , नगरसेवक राजेश येनपुरे , नगरसेविका आरती कोंढरे ,जेष्ठ खेळाडू शांताराम जाधव, मधुकर नलावडे  आदी मान्यवर उपस्थित होते.

दुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन, राजू भालेकर इलेव्हन संघांची विजयी सलामी

0

पुणे: साई9स्पोर्ट्स यांच्या तर्फे दुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक  क्रिकेट स्पर्धेत  भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाने   वसंत रांजणे इलेव्हन संघाचा 27 धावांनी तर  राजू भालेकर इलेव्हन संघाने डी.बी. देवधर एलेव्हन संघाचा 49 धावांनी  पराभव करत उद्धाटनाचा दिवस गाजवला.

व्हिजन क्रिकेट अकादमी येथील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत रणजीत खिरीदच्या जलद अर्धशतकी खेळीच्या जोरावर   भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाने  वसंत रांजणे इलेव्हन संघाचा 27 धावांनी पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. पहिल्यांदा खेळताना  भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाने 15 षटकात 5 बाद 123 धावा केल्या. यात  रणजीत खिरीदने केलळ 31 चेंडूत 50 धावा केल्या तर  आशिष देसाईने 28 व शंतनू  सुगवेकरने  23 धावा करून रणजीतला सुरेख साथ दिली. 123 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना प्रभाकर मोरे व अनिरुध्द ओक यांच्या अचूक गोलंदाजीपुढे  वसंत रांजणे इलेव्हन संघ 15 षटकात 8 बाद 96 धावांत गारद झाला. सनी मारवाडीने 22 व  मोेहन जाधव आणि गिरिष कुलकर्णी यांनी प्रत्येकी 16 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला.  भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाकडून प्रभाकर मोरेने  26 धावात 3 तर अनिरुध्द ओकने 11 धावात 2 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. 31 चेंडूत 50 धावा करणारा रणजीत खिरीद सामनावीर ठरला.

दुस-या लढतीत नितिन सालमच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर राजू भालेकर इलेव्हन संघाने डी.बी. देवधर एलेव्हन संघाचा 49 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना नितिन सालमच्या 30 धावांसह  राजू भालेकर इलेव्हन संघाने 15 षटकात 7 बाद 117 धावा केल्या. 117 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मंदार दळवी , अभिजीत फरांदे , नितिन सालम व शाम ओक यांच्या आक्रमक गोलंदाजीपुढे डी.बी. देवधर एलेव्हन संघ केवळ 14 षटकात सर्वबाद 68 धावांत गारद झाला. 22 चेंडूत 30 धावा व 6 धावांत 2 गडी बाद करणारा  नितिन सालम सामनावीर ठरला. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी

 भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन- 15 षटकात 5 बाद 123 धावा(रणजीत खिरीद 50(31), आशिष देसाई 28(27), शंतनू  सुगवेकर  23(18), पराग चितळे 3-14, सुभाष रांजणे 1-20, विवेक मालशे 1-30) वि.वि  वसंत रांजणे इलेव्हन – 15 षटकात 8 बाद 96 धावा(सनी मारवाडी22(17), मोेहन जाधव 16(18), गिरिष कुलकर्णी 16(13), प्रभाकर मोरे 3-26, अनिरुध्द ओक 2-11, शंतनू सुगवेकर 1-7, विश्वास गवते 1-15, भुषण देशपांडे 1-22) सामनावीर – रणजीत खिरीद 

भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन  संघाने 27धावांनी सामना जिंकला.  

राजू भालेकर इलेव्हन- 15 षटकात 7 बाद 117 धावा(नितिन सालम30(22), नितिन हार्डीकर 16(9), विनायक द्रविड 14(20),  रमेश हजारे 3-23, प्रसाद कानडे 2-20, आनंद नेरळकर 1-19, दिनेश कुंटे  1-18) वि.वि डी.बी. देवधर एलेव्हन-14 षटकात सर्वबाद 68 धावा(दिनेश कुंटे 27(33), मंदार दळवी 3-9, अभिजीत फरांदे 3-3, नितिन सालम 2-6, शाम ओक 2-16 ) सामनावीर- नितिन सालम

राजू भालेकर इलेव्हन संघाने 49 धावांनी सामना जिंकला.  

ग्रामीण विद्यार्थ्यांना ५० लाख किमतीच्या जीवनोपयोगी साहित्याचे वितरण

0
कडूस (ता. खेड ) येथे खास सोहळा
पुणे :’रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन ‘च्या वतीने १००५  ग्रामीण विद्यार्थ्यांना एकूण ५० लाख  किमतीच्या जीवनोपयोगी आणि शिक्षणोपयोगी साहित्याचे वितरण रविवार, ८ डिसेंबर रोजी  करण्यात आले .
रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन,रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंट ,’स्कॉ ‘ कॅनडा ही संस्था यांच्या संयुक्तपणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले .
 या जीवनोपयोगी साहित्याच्या संचात कपडे ,शैक्षणिक साहित्य ,झोपण्याचे साहित्य (स्लीपिंग किट ),दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंचा  समावेश आहे .
  या कार्य्रक्रमात देसाई रुग्णालयातर्फे विद्यार्थ्यांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली .
 रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन चे माजी अध्यक्ष आणि या प्रकल्पाचे समन्वयक शैलेश गांधी     ,पंकज आपटे ,अमृता देवगावकर ,बिनायक चौधरी ,समीर रुपाणी तसेच ‘ स्कॉ’ कॅनडा संस्थेचे   ख्रीस हिल्स , सरपंच जयश्री नेहरे या कार्यक्रमाला उपस्थित होते.१९७० साली या सामाजिक उपक्रमाला सुरुवात झाली . कॅनडातील सामाजिक संस्था या उपक्रमाला मदत करत आले आहेत .

कर्तृत्वावर वेळोवेळी प्रोत्साहनाची थाप असावी-शिवप्रसाद मंत्री

0

पुणे :- छत्रपतीं शिवाजी महाराज घडले ते जिजाबाईंनी दिलेल्या संस्कारांमुळेच. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले याशिवाय राष्ट्राप्रती निष्ठा व आदरभाव,शौर्य,निडरता ,कर्तव्यदक्षता अशा अनेक गोष्टींचे बाळकडू महाराजांना जिजामातांकडून मिळाले.यातूनच समजते कि, एक प्रतिभावंत,कर्तृत्ववान व्यक्तिमत्व घडवण्यासाठी पालकांनाही तेवढेच परिश्रम घ्यावे लागतात. अशा भावना शिवप्रसाद मंत्री यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.

त्यांच्या अतुलनीय जीवनप्रवासातून प्रेरणा घेत पालकांची ‘पालकत्वाची’ जबाबदारी किती महत्वाची आहे हे देखील त्यांनी पालकांना समजावून सांगितले. जिजामातांप्रमाणे कर्तृत्वावर वेळोवेळी प्रोत्साहनाची आणि मार्गदर्शनाची थाप घालणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

आय पेरेंट्स सत्रांतर्गत गोयल गंगा इंटरनैशनल स्कूलच्या आवारात हा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या संचालिका सोनू गुप्ता, मुख्याध्यापिका भारती भागवाणी तसेच समस्त शिक्षक , विद्यार्थी आणि पालकही उपस्थित होते.

‘पालक’ हे मुलांचे पहिले गुरु असतात त्यामुळे त्यांचे अनुकरण ते करत असतात म्हणूनच पालकांनी सकारात्मक गोष्टी स्वतःच्या अनुकारांतून मुलांना शिकवाव्यात अशा भावना सोनू गुप्त यांनी मांडल्या.

समाविष्ट गावांच्या विकासासाठी अकराशे कोटीची तरतूद करा -खासदार सुप्रिया सुळे

0

पुणे -शहरात समाविष्ट झालेल्या ११ गावांचा विकास करण्यात  सरकार अपयशी ठरले असून सध्या गावाची परिस्थिती लक्षात घेता. या गावांच्या विकासासाठी पुणे महापालिकेने प्रत्येक गावाला शंभर कोटी रुपये या प्रमाणे अकराशे कोटी रुपयांचा निधी द्यावा  अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलना दरम्यान केली. पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. या गावातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे,महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते दिलीप बराटे,नगरसेवक प्रकाश कदम,योगेश ससाणे,भैय्या जाधव ,विशाल तांबे,युवराज बेलदरे,रुपाली चाकणकर ,सचिन दोडके,बाळा धनकवडे,अश्विनी भागवत  आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते .कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे,अभय छाजेड यांनी महापालिकेसमोर मोर्चात सहभागी होऊन याप्रकरणी कॉंग्रेस पक्ष राष्ट्रवादीबरोबर खांद्याला  खांदा लाऊन लढा देईल असे आश्वासन दिले.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्य सरकारने पुणे शहरालगतची अकरा गावे महापालिकेत समाविष्ट करून दोन वर्षाचा कालावधी झाला. मात्र अद्यापही त्या ठिकाणी कोणतीही विकासकामे करण्यात आलेली नाहीत.याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसला असून या आंदोलनाची दखल सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने न घेतल्यास भविष्यात आणखी तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

बालगंधर्व ….हेच शिवाजी महाराज ,आंबेडकर ,फुलेंच्या नावाचे मंदिर असते तर ?…. विश्वंभरांचा पुणेकरांना सवाल

0

पुणे-बालगंधर्व पाडावे की नाही? हा भावनिक मुद्दा नाही हे पहिल्यांदा स्पष्ट केलं पाहिजे. हा अस्मिता वगैरेचाही मुद्दा नाही; तर समाजाच्या सांस्कृतिक अभिरुचीचा प्रश्न आहे. विचार करा की हे बालगंधर्व रंगमंदिर नसून ‘शिवाजी महाराज रंगमंदिर’ , डॉ. आंबेडकर रंगमंदिर, स्वा. सावरकर रंगमंदिर, म.फुले रंगमंदिर असतं तर? तर कोणत्या ना कोणत्या जाती-धर्माच्या लोकांनी रक्ताचे पाट वाहण्याची भाषा केली असती. पण हे स्मारक एका कलाकाराचे स्मारक आहे त्यामुळे त्याला पाडण्याचा प्रस्ताव कोणीही कधीही मांडू शकतो. असे स्पष्ट मत डॉ.विश्वंभर चौधरी यांनी येथे मांडले  आहे .

ते म्हणाले ,’काही दिवसांपूर्वी डॉ. होमी भाभा यांच्या बंगल्याचा असाच सहज लिलाव झाला होता. कोणी हू की चू केलं नव्हतं. कारण आम्हाला फक्त राजकीय, जातीय, धार्मिक अस्मिता आहेत, वैज्ञानिक किंवा कलाविषयक अस्मिता तयारच झालेल्या नाहीत. समाज म्हणजे जाती-धर्म-वंश-भाषा-प्रदेश यांच्या टोकाच्या अस्मिता हेच आम्हाला शिकवलं गेलं आहे. वैज्ञानिक किंवा कलाविषयक काही अभिरुची असू शकते, वैज्ञानिक-कलाकार यांच्याही आठवणी जपायच्या असतात हे आम्हाला शिकवलेलेच नाही. त्यातून कला हा तर आपल्याकडे ऐच्छिक विषय आहे.

बालगंधर्व रंगमंदिर हा पुण्याचा एक सांस्कृतिक मानबिंदू आहे. आरेखनापासून उभारणीपर्यंत स्वत: पुलंनी या वास्तूसाठी खस्ता खाल्ल्या आहेत. नेमकं जन्मशताब्दी वर्षातच बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यासाठी एक पराकोटीचं सांस्कृतिक निर्ढावलेपण लागतं. पुण्याच्या सध्याच्या कारभाऱ्यांनी ते पुरेपूर कमावलं आहे असं दिसतं.

आम्हाला त्या गाण्याबिण्यातलं काही कळत नाही बुवा हे अभिमानाने सांगणारे लोक आपल्याकडे आहेत. म्हणजे गाण्यातलं सगळ्यांनाच कळले पाहिजे असं अजिबात नाही. पण कळत नाही यात तरी अभिमान बाळगण्यासारखं काय आहे? मुद्दा असा आहे की कलाविषयक इतकी इदासिनता ज्या समाजात असते त्या समाजात कलाकारांची स्मारकं आवश्यकच असतात. अन्यथा समाज फक्त राजकारणाच्या अंगानं सुजत जाण्याचा आणि आपण त्यालाच बाळसं समजण्याचा धोका वाढत जातो. म्हणूनच अस्मितेचा किंवा भावनेचा विषय म्हणून नाही तर समाजाचं निरोगीपण टिकण्याच्या दृष्टीने बालगंधर्व नावाच्या गायकाचं हे पुलं नावाच्या एका साहित्यिकानं आखलेलं स्मारक अबाधित राहणं आवश्यक आहे.

शेक्सपिअरचं घर असो की वर्डस्वर्थचं स्मारक, ते बघायला पुणेकर गर्दी करतील पण आपल्याच भूमीतल्या एका कलाकाराचं स्मारक वाचवण्यासाठी पुढे येतील का? हा प्रश्नच आहे. तरीही यावर बोललं पाहिजे. मान्य की हा व्यावसायिकरणाचा म्हणजे वाढीव एफ.एस.आयचा जमाना आहे आणि सर्वच गोष्टींचं, वास्तूंचं व्यापारीकरण होत आहे. तरीही काही गोष्टी, काही वास्तू एफएसआयपेक्षा मोठ्या आहेत हे ठामपणे सांगावं लागतं. अन्यथा कारभाऱ्यांना मोकळीक दिली तर लालमहाल आणि शनिवारवाड्याच्या डोक्यावरही मॉल्स, मल्टीप्लेक्स दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

योजनांची अंमलबजावणी परिणामकाररित्या करावी-मंत्री प्रकाश जावडेकर

0

 पुणे:- केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘दिशा’ समितीचा उद्देश आहे. यासाठी सर्व संबधित विभागांनी ताळमेळ ठेवून, योजनांची अंमलबजावणी परिणामकारित्या करावी, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे व्यक्त केले.

            जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, खा. शिवाजीराव आढळराव पाटील, खा.अनिल शिरोळे, आ.बाबुराव पाचर्णे,आ.माधुरी मिसाळ, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रभाकर गावडे उपस्थित होते.

            यावेळी श्री. प्रकाश जावडेकर म्हणाले, दिशा समितीमधील लोकप्रतिनिधींच्या सहभागामुळे योजना राबविणाऱ्या विभागांमध्ये उत्तरदायित्व निर्माण होऊन पारदर्शकता वाढण्यास मदत होईल. योजनांची अंमलबजावणी करताना संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिंधींना विश्वासात घेऊन त्यांचे सहकार्य घ्यावे. विविध योजनांची अंमलबजावणी झाल्यानंतर, लाभार्थ्यांचे मेळावे आयोजित करावे. लाभार्थ्यांच्या अनुभवावर आधारीत यशोगाथा व चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित करावी. यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे.

            उद्योजकांसाठी बँकांतर्फे राबविण्यात येणारी मुद्रा योजनेसह प्रधानमंत्री जनधन योजना, वित्तीय समायोजना, प्रधानमंत्री उज्ज्व्‍ला योजना, पोस्ट ऑफीस बँक योजना, रेल्वे विकासाच्या योजना, टेलीकॉम विभागातर्फे ग्राम पंचायतींना इंटरनेट वापरासाठी पुरविण्यात येणाऱ्या  ब्रॉड बँड आणि फायबर कनेक्टीव्हीटी योजनांच्या प्रगतीचा आढावा घेऊन, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. खा.शिवाजीराव आढळराव पाटील, खा.अनिल शिरोळे यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

            बैठकीला पोस्ट, रेल्वे, बँक, टेलीकॉम, महसूल, महानगरपालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य विभागांचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

‘सीए’ सामाजिक-आर्थिक विकासाचे प्रतिनिधी- प्रमोदकुमार गुप्ता

0
पुणे : “प्रामाणिक करदात्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सामाजिक-धार्मिक संस्थानीही प्राप्तिकरातील तरतुदी समजून घेत वेळेवर लेखा परीक्षण करावे. त्यासाठी लेखापालांनी (सीए) पुढाकार घ्यावा. कारण तेच सामाजिक व आर्थिक विकासाचे प्रतिनिधी आहेत,” असे प्रतिपादन दिल्ली येथील मुख्य प्राप्तिकर आयुक्त प्रमोदकुमार गुप्ता यांनी केले.
दि इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) ‘सेवाभावी आणि धार्मिक संस्थांसाठीच्या प्राप्तिकरातील तरतुदीं’ यावर एक दिवसाची कार्यशाळा आयोजिली होती. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवनात झालेल्या कार्यशाळेवली पुण्यातील प्राप्तिकर विभागाचे आयुक्त एस. एस. मीना, अतिरिक्त आयुक्त संदीप साळुंखे, अभिषेक मेश्राम, नरेंद्र काणे, सीए शशांक पत्की, आयसीएआयच्या उपाध्यक्षा सीए ऋता चितळे, जगदीश धोंडगे, अभिषेक धामणे यांची प्रमुख उपस्थिती होती. १९० पेक्षा जास्त सीए या कार्यशाळेत सहभागी झाले.
प्रमोदकुमार गुप्ता म्हणाले, “करदाते, सीए आणि कर विभागातील अधिकारी यांनी एकमेकांशी समन्वय साधून चांगले वातावरण ठेवले पाहिजे. सेवाभावी संस्थांनी कर भरताना तरतुदी अभ्यासाव्यात व त्यानुसार आपल्या खर्चाचा ताळेबंद करावा. त्यासाठी सीए मंडळींनी मार्गदर्शन करावे.”
शशांक पत्की, एस. एस. मीना यांनीही या विषयावर मार्गदर्शन केले. सीए ऋता चितळे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. अभिषेक धामणे यांनी आभार मानले.

दहशतवाद संपवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे -मनिंदर सिंग बिट्टा यांचे आवाहन

0

पुणे : “भारतमाता हाच माझा धर्म असून, वंदे मातरम ही माझी जात आहे. मानवतेच्या भावनेतून आपण एकमेकांकडे पहिले पाहिजे. मात्र,  आज देशात धर्म, जात, पक्ष या माध्यमातून वेगवेगळे गट पडले आहेत. दहशतवाद, नक्षलवाद असे गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहेत. अशावेळी राजकारणापलीकडे जाऊन राष्ट्र प्रथम हा विचार ठेवून सर्वानी एकत्र यावे,” असे आवाहन ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटचे (एआयएटीएफ) चेअरमन मनिंदरजीत सिंग बिट्टा यांनी केले.

पुण्यातील पद्मा प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश कला क्रिडामंच येथे आयोजित ‘पद्मा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’ वितरण सोहळ्यात बिट्टा बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना ‘पद्मा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’, तर आमदार महेश लांडगे यांना ‘पद्मा संघर्ष राज्यस्तरीय युवा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी एआयएटीएफ मुंबईचे अध्यक्ष पी. एस. अहुजा, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहूल जाधव, आमदार राहूल कुल, विचारवंत दत्ता कोहिनकर, पद्मा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे, उद्योजक संतोष धनकवडे, ऋषी बालगुडे, ऍड. मंदार जोशी, विकास कांबळे, अनिल बोडके, निखिल निगडे आदी उपस्थित होते. शिंदे यांच्या वतीने त्यांचे मित्र बळवंत सासवे यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये वीरमाता ताराबाई साष्टे, चाटे शिक्षण संस्थेचे प्रा. फुलचंद चाटे, चोरडिया शिक्षण संस्थेचे डॉ. संजय चोरडिया, सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, धीरज घाटे, उद्योजक अमित गायकवाड, डॉ. वैशाली जाधव यांचा समावेश होता.

मनिंदरजित सिंग बिट्टा म्हणाले, “देशाच्या रक्षणासाठी सीमेवर जवान अहोरात्र पहारा देतात. त्यांच्यावर पाकिस्तानसारख्या राष्ट्रांकडून गोळीबार केला जातो. अशावेळी नवज्योत सिंग सिद्धूसारख्या जबाबदार व्यक्तीने  केवळ आपल्या फायद्यासाठी शत्रूराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना पाकिस्तानात जावून भेटणे चुकीचे आहे. जेएनयू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमीत समाज विघातक कारवाया करणाऱ्यांचा बीमोड करण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे.”
महेश लांडगे म्हणाले, “राजकारणात येण्यापूर्वीपासून नागरिकांची सेवा करत आलो. यामुळेच नगरसेवक ते आमदारपदापर्यंत पोहचलो. संघर्ष करणाऱ्याला कुठलेही ध्येय गाठणे अशक्‍य नसते. गरजूंना मदत करणे हेच मोठे काम असून, यापुढेही पद असो वा नसो ते सुरु राहील.संघर्षाशिवाय जीवनाला अर्थ नसतो. संघर्षातून आलेल्या माणसाला परिस्थितीची जाणीव असते, हे नितीन काळजे आणि राहुल जाधव या पिंपरीच्या दोन्ही महापौरांमध्ये पाहिले आहे.”
राहुल कुल म्हणाले, “पर्यावरण, पाणी, शेती, रोजगार यासंबंधित अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. हे सोडवण्यासाठी धोरणात्मक काम करणारी माणसे चांगली हवीत. त्यासाठी ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत चांगले लोक निवडून देणे युवकांच्या हाती आहे.”
उदय जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शशिकांत कांबळे यांनी केले. सुत्रसंचालन संकर्षण कऱ्हाडे आणि मोनिका जोशी यांनी केले. तत्पूर्वी, अभिजित व प्रसेनजीत या कोसंबी बंधूंच्या देशभक्तीपर आणि सिनेगीतांनी कार्यक्रमात रंगात आणली.