योजनांची अंमलबजावणी परिणामकाररित्या करावी-मंत्री प्रकाश जावडेकर

Date:

 पुणे:- केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘दिशा’ समितीचा उद्देश आहे. यासाठी सर्व संबधित विभागांनी ताळमेळ ठेवून, योजनांची अंमलबजावणी परिणामकारित्या करावी, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे व्यक्त केले.

            जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, खा. शिवाजीराव आढळराव पाटील, खा.अनिल शिरोळे, आ.बाबुराव पाचर्णे,आ.माधुरी मिसाळ, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रभाकर गावडे उपस्थित होते.

            यावेळी श्री. प्रकाश जावडेकर म्हणाले, दिशा समितीमधील लोकप्रतिनिधींच्या सहभागामुळे योजना राबविणाऱ्या विभागांमध्ये उत्तरदायित्व निर्माण होऊन पारदर्शकता वाढण्यास मदत होईल. योजनांची अंमलबजावणी करताना संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिंधींना विश्वासात घेऊन त्यांचे सहकार्य घ्यावे. विविध योजनांची अंमलबजावणी झाल्यानंतर, लाभार्थ्यांचे मेळावे आयोजित करावे. लाभार्थ्यांच्या अनुभवावर आधारीत यशोगाथा व चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित करावी. यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे.

            उद्योजकांसाठी बँकांतर्फे राबविण्यात येणारी मुद्रा योजनेसह प्रधानमंत्री जनधन योजना, वित्तीय समायोजना, प्रधानमंत्री उज्ज्व्‍ला योजना, पोस्ट ऑफीस बँक योजना, रेल्वे विकासाच्या योजना, टेलीकॉम विभागातर्फे ग्राम पंचायतींना इंटरनेट वापरासाठी पुरविण्यात येणाऱ्या  ब्रॉड बँड आणि फायबर कनेक्टीव्हीटी योजनांच्या प्रगतीचा आढावा घेऊन, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. खा.शिवाजीराव आढळराव पाटील, खा.अनिल शिरोळे यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

            बैठकीला पोस्ट, रेल्वे, बँक, टेलीकॉम, महसूल, महानगरपालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य विभागांचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चंद्रकांतदादांचा पाच महापालिकांमध्ये प्रचाराचा झंझावात

एकूण १०० पेक्षा जास्त बैठका, ५० चौक सभा, १०...

मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी इतिहासात डोकवावं आणि वर्तमानात पाहावं.…..

-भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण मुंबई- संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी जे...

मतदानाकरिता मतदानादिवशी सुट्टी-कामगार उपआयुक्त निखील वाळके

पुणे, दि. 13 : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५-२६ करीता मतदारांना...

मतदानासाठी भरपगारी सर्वांनाच सुट्टी

पुणे- महानगरपालिका सार्वत्रिक निडणूकीसाठी दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी...