Home Blog Page 3007

हंगामा प्लेच्या पुढील मराठी ओरिजिनल मालिकेसाठी भाऊ कदम, सागर कारंडे, भाग्यश्री मोटे एकत्र

0

विनोदाच्या अफलातून टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेले भाऊ कदम लवकरच दिसणार आहेत हंगामा प्लेच्या पुढील मराठी ओरिजिनल मालिकेत. या मालिकेचे शीर्षक आहे श्री कामदेव प्रसन्न. त्यांच्यासोबत या मालिकेत प्रमुख भूमिकांत आहेत प्रसिद्ध विनोदवीर सागर करंडे आणि सुपरस्टार भाग्यश्री मोटे. या मालिकेचे तपशील अद्याप उघड करण्यात आलेले नसले, तरी असे समजते की सागर यामध्ये एका लाजाळू आणि अंतर्मुख माणसाची भूमिका करत आहे आणि भाग्यश्रीची व्यक्तिरेखा गुप्तपणे त्याच्यावर प्रेम करणा-या मुलीची आहे. या मालिकेत नामवंत अभिनेते आशा शेलार व विनय येडेकरही महत्त्वाच्या भूमिकांत आहेत.

या बातमीला दुजोरा देत भाऊ कदम म्हणाले, “हंगामा प्लेच्या श्री कामदेव प्रसन्न या नवीन मराठी मालिकेसाठी मी शूटिंग सुरू केले आहे. या मालिकेतील माझी व्यक्तिरेखा शब्दश: या पृथ्वीवरील नाही! या मालिकेमध्ये मी आयुष्यातील काही मजेशीर प्रसंगांमध्ये सागरला मदत करताना दिसेन. खरे तर माझी व्यक्तिरेखा हाच त्याच्या आयुष्यातील गोंधळाचे कारण आहे. हंगामा प्लेसोबत एका डिजिटल मालिकेत काम करायला मिळत आहे याबद्दल मला आनंद वाटत आहे. डिजिटल माध्यमाने रोचक कथा सांगण्याची संधी दिली आहे आणि कलावंतांना यामुळे कोणत्याही अडसराशिवाय काम करण्याचे स्वातंत्र्य मिळत आहे.”

लँडमार्क निसानने पुण्यात सादर केली नवी किक्स

0

दर्जेदार गुणवैशिष्ट्ये : व्ह्यू मॉनिटर, ८.० फ्लोटिंग इन्फोटेनमेंट सिस्टिम, चामड्याचे मऊ डॅशबोर्ड आणि डोअर ट्रिम्स

  • ऑटो एसीसह ऑफर मूल्य; एबीएस+ ईबीडी+ ब्रेक असिस्ट; दुहेरी एअरबॅग्स आणि निसानच्या स्टँडर्ड गुणवैशिष्ट्यांसह सर्व स्वरूपांसाठी निसान कनेक्ट
  • २७ विविध अॅसेसरीजसह ड्राइव्ह पर्सनलायझेशन, या प्रकारातील कोणत्याही कारपेक्षा सर्वाधिक अॅक्सेसरीज
  • सर्वात कमी किमतीत उपलब्ध, त्याचबरोबर तीन वर्षांचे मोफत देखभाल पॅकेज

 

पुणे : लँडमार्क निसानने आज आपली बहुप्रतिक्षित अशी इंटेलिजन्ट एसयूव्ही निसान किक्स भारतात सादर केली. नवी निसान किक्स ही मालकांना प्रीमिअम दर्जा, प्रशस्त अशी अंतर्गत सजावट तसेच स्टायलिश बाह्यरूपाचा अनोखा मिलाफ असलेले मूल्य प्रदान करते. कल्पकता आणि सहज-सुलभता याबाबतीत सर्वोत्तम अशा गुणवैशिष्ट्यांसह सादर करण्यात आलेली नवी निसान किक्स ही ९,५५,००० रुपये या सादर मूल्याला भारतात उपलब्ध आहे. नव्या निसान किक्सची डिलिव्हरी ही लँडमार्क निसानच्या डीलरशीपकडे आजपासून सुरू होईल.

ड्रायव्हिंग पर्सनलायझेशन

ही कार डिझेलमध्ये एक्सएल, एक्सव्ही, एक्सव्ही प्रीमिअम तसेच एक्सव्ही प्रीमिअम प्लस या चार स्वरूपांमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर पेट्रोलमध्ये ही कार एक्सएल आणि एक्सव्ही या दोन स्वरूपांमध्ये उपलब्ध आहे. नवी निसान किक्स ही ११ आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. पर्ल व्हाइट, ब्लेड सिल्व्हर, ब्राँझ ग्रे, फायर रेड, अम्बर ऑरेंज, डीप ब्लू पर्ल, नाइट शेड, फायर रेड आणि ओनिक्स ब्लॅक, ब्राँड ग्रे आणि अम्बर ऑरेंज, पर्ल व्हाइट आणि ओनिक्स ब्लॅक, पर्ल व्हाइट आणि अम्बर ऑरेज या रंगांमध्ये ही कार उपलब्ध आहे.

नवी निसान किक्स ही २७ विविध अॅसेसरीजसह वैयक्तिकरण करण्यात आली आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार या सर्व सोयीसुविधा उभारण्यात आल्या आहेत. सर्वात टिकाऊ आणि कस्टम-फिटेड दर्जेदार अॅसेसरीज या एका वर्षाच्या वॉरंटीसह अथवा २० हजार किलोमीटरपर्यंत (जे पहिले येईल ते) उपलब्ध आहेत.

‘रबर उद्योग हा भारताच्या आर्थिक प्रगतीचा ट्रिगर’

0

केंद्रीय वाणिज्य, उद्योग व नागरी विमानवाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन

  • इंडिया रबर एक्स्पो २०१९ प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्ष विक्रम मक्कर यांच्यासह सुरेश प्रभूंची उपस्थिती

मुंबई – रबर उद्योग हा भारताच्या आर्थिक प्रगतीचा ट्रिगर असून भारतीय उद्योगाने महत्त्वाच्या अनेक जागतिक बाजारपेठांवर परिणाम घडवणारी सकारात्मक भरारी घेतली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य, उद्योग व नागरी विमानवाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतेच येथे केले. बॉम्बे कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या इंडिया रबर एक्स्पो २०१९ या तीन दिवसीय प्रदर्शनाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पेट्रोकेमिकल्स रिलायन्स इंडिया लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपुल शहा, सन्माननीय पाहुणे म्हणून त्रिपुरा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष टिंकू रॉय व बीकेटी इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तथा केएम फिलिप पुरस्कार विजेते अरविंद पोद्दार हे नामवंत उपस्थित होते.

इंडिया रबर एक्स्पो २०१९ चे (आयआरई २०१९) आयोजन ऑल इंडिया रबर इंड्स्ट्रीज असोसिएशनतर्फे (एआयआरआयए) करण्यात आले. आशिया खंडातील अशा स्वरुपाचा हे सर्वांत मोठे प्रदर्शन असून त्यात ५० देशांचे प्रतिनिधी, तसेच रबर उद्योगातील कंपन्यांची ३६० हून अधिक दालने होती. आयआरई २०१९, एआयआरआयए आणि ओरिएंटल रबर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विक्रम मक्कर, तसेच प्रदर्शनाचे निमंत्रक विष्णू भीमराजका यांच्या चैतन्यशील नेतृत्वाखाली राबवल्या गेलेल्या या उपक्रमाने दहाव्या वर्षात पदार्पण केले आहे. याआधी चेन्नईत वर्ष २०१७ मध्ये झालेल्या प्रदर्शनाच्या तुलनेत यंदाच्या प्रदर्शनाची व्याप्ती दुप्पटीने वाढली आहे.

यंदा बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये २७००० चौरस मीटर जागेत भरवण्यात आलेले आयआरई २०१९ हे प्रदर्शन प्रगती, देवाण-घेवाण व सहयोगासाठी मौल्यवान व्यासपीठ ठरले. वर्ष २००१ मध्ये सुरवात झाली तेव्हा ते केवळ ३००० चौरस मीटर जागेत आयोजित करण्यात आले होते. गेल्या १८ वर्षांत त्याच्या जागेचा नऊपट विस्तार झाला असून त्याला २७००० हून अधिक प्रेक्षकांनी भेट दिली.

उद्घाटन केल्यानंतर बोलताना सुरेश प्रभू म्हणाले, “व्यावसायिक गुंतवणूका व सहयोग करण्यासाठी सुयोग्य व पसंतीच्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. आता आपल्याला फायद्यांचे एकत्रीकरण करुन भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याची गरज आहे, ज्यासाठी मी याआधीच एक योजना तयार केली आहे. त्यातील २० टक्के रक्कम निर्मिती क्षेत्रातून येईल. या योजनेमध्ये रबर उद्योगाचे भरीव योगदान असेल, यासाठी मी प्रयत्न करेन.”

विक्रम मक्कर म्हणाले, “रबर उद्योग हा सर्व उद्योगांचा जीवरक्षक असून कोणताही उद्योग रबरापासून बनवलेल्या उत्पादनांखेरीज काम करु शकत नाही. रबर हे सर्व उद्योगांसाठी मोठ्या संधी निर्माण करत आहे. दुसरीकडे जागतिकीकरणाचा स्वीकार करणे भारतभरातील व्यवसायांना अनिवार्य ठरले आहे. या पार्श्वभूमीवर एआयआरआयएने आयोजित केलेले इंडियन रबर एक्स्पो २०१९ हे प्रदर्शन भारत व परदेशांतील रबर उद्योगासाठी अद्वितीय व्यासपीठ आहे.”

ते पुढे म्हणाले, “ या प्रदर्शनाने जगासाठी एक उदाहरण घालून दिले आहे. ते म्हणजे भारतीय रबर उद्योग हा तंत्रज्ञान, अभिनवता व स्थानिक तसेच जागतिक बाजारपेठांतील उभरत्या संधी याबाबत गरुड भरारी घेण्यास सज्ज झाला आहे. ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन (एआयआरआयए) या संघटनेने आपल्या कामाने वर्षानुवर्षे लोकप्रियता संपादन केली असून या प्रदर्शनाला रबर क्षेत्राच्या उत्कृष्टतेचे सर्वांगीण प्रतिक बनवत राष्ट्रीय पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीला पोचवले आहे. प्रदर्शनात कच्च्या मालाच्या पुरवठादारांनी गुंतवणूक केली असून सर्व रबर यंत्रसामग्रीचे भाग प्रदर्शित करण्यात आले आहेत. जगभरातील तंत्रज्ञांनी व तज्ज्ञांनी आपल्या कौशल्याचे सादरीकरण करणाऱ्या कार्यशाळा घेतल्या आहेत. आयआरई २०१९ हे प्रदर्शन भारतीय रबर उद्योगाच्या सुवर्णयुगासाठी खरोखर चालना देणारा घटक ठरेल.”

संरक्षण, पायाभूत सुविधा, विमान उत्पादन व वाहतूक अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात स्थानिकीकरण होण्याची गरज आहे, कारण भारत अद्यापही या क्षेत्रांत प्रचंड गुंतवणूक करत असून तंत्रज्ञान व उपकरणे खरेदी करत आहे. भारतीयीकरणातून स्वयंपूर्णता हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपल्याला रबराच्या दर्जेदार सुट्या भागांची गरज आहे, या मुद्यावर श्री. मक्कर यांनी भर दिला.

तंत्रज्ञ असलेल्या विक्रम यांना रबर उद्योगाचा २५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी त्यांचे प्रशिक्षण पश्चिम जर्मनीतील सीम्पेलकाम्प, तसेच अन्य प्रतिष्ठित कंपन्यांतून पूर्ण केले आहे. रबर उद्योगातील उत्तम कामगिरीचा पूर्वेतिहास असलेल्या विक्रम यांना प्रकल्प अंमलबजावणी, उपकरणे निवड व आधुनिकीकरणाचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांच्याकडे प्रक्रिया व संमिश्रण यातील तांत्रिक स्पर्धात्मकता, तसेच उत्पादन व खरेदी यातील कौशल्यही आहे. श्री. मक्कर हे तिसऱ्या पिढीचे उद्योजक असून त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली ओरिएंटल रबर इंडस्ट्रीज ही स्थापनेचा ७० वा वर्धापनदिन साजरा करत असलेली कंपनी भारतातील कन्व्हेयर बेल्ट्सची एक सर्वांत मोठी उत्पादक म्हणून उदयाला आली आहे.

आयआरई २०१९ प्रदर्शनात चीन, कोरिया, जपान व युरोपमधील देश सहभागी झाले. प्रदर्शनात खास रबर परिषद, कार्यशाळा, खरेदीदार-विक्रेते मेळावा अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मक्कर यांच्या नेतृत्वाने रबर उद्योगातील कुशल व बुद्धिमान तंत्रज्ञ, धोरणकर्ते, लघु व मध्यम उद्योग, खरेदीदार, विक्रेते व जागतिक बड्या कंपन्यांना एकत्र आणले.

स्मार्ट सिटी आणि पीएमपीएमएलच्या बोगस कारभाराचा बागवेंनी केला पर्दाफाश (व्हिडीओ)

0

पुणे – स्मार्ट सिटी आणि पीएमपीएमएलच्या बोगस कारभाराचा काल मुख्यसभेत कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी सादरीकरणसह पर्दाफाश करून या दोन्ही कंपन्या महापालिकेच्या पर्यायाने जनतेच्या पैशांवर चालत असूनही त्या आपल्या कामकाजाबाबत पालिकेचे अथवा जनतेचे दायित्व न स्वीकारता परस्पर बोगस कारभार करत असून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले यासाठी त्यांनी केलेल्या कामकाजाचे  कार्यवृत्त महापालिकेच्या सभागृहात सर्व नगरसेवकांसमोर ठेवले पाहिजे असा दिलेला प्रस्ताव भाजपने बहुमताच्या जोरावर फेटाळून लावला. त्यांचा हा प्रस्ताव दप्तरी दाखल करावा अशी उपसूचना भाजपच्या मनीषा नागपुरे यांनी दिली ती भाजपच्या संख्याबळावर संमत झाली.
महापालिकेच्या मुख्य सभेच्या मान्यतेनंतर स्थापन झालेल्या स्मार्ट सिटी आणि पीएमपीएमएल ने निव्वळ महापालिकेकडून पैसे घ्यायचे आणि मनमानी कारभार करायचा याबाबत बागवे यांनी संगणकावर मुख्य सभेत छायाचित्रांसह सादरीकरण केले. आणि बोगस कारभाराची माहिती दिली .या दोन्ही कंपन्यांच्या धोरणात्मक आणि आर्थिक निर्णयाचा कार्यवृत्तांत मुख्य सभेला  सादर केला पाहिजे असा प्रस्ताव दिला .
या कंपन्या बरखास्त कराव्या अशी मागणी आपण केली नाही . मात्र भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक कारभार झाला तरच तो जनहिताचा होईल आणि जनतेचा दिलेला पैसा योग्य मार्गे खर्ची होईल त्यासाठी या दोन्ही कंपन्यांवर किमान जनतेने निवडून दिलेल्या सर्व लोकप्रतिनिधी यांनी  नियंत्रण ठेवायला हवे मात्र यावर केवळ चारच लोकप्रतिनिधी नियंत्रण ठेवत असल्याने सर्व कारभार बोगस पद्धतीने होत असल्याचा आरोप बागवे यांनी यावेळी केला .पीएमपीएमएल मध्ये केवळ भाड्याने बसेस घेण्यावर कोट्यावधींची उधळण,सायकल चालवू या हा संदेश आणि सायकल मार्गाच्या नावाखाली शेकडो कोटीची उधळण ,तसेच पदपथावरून मंदिरे ,गरिबांच्या झोपड्या ,रोजगाराचे व्यवसाय उखडून टाकायचे आणि पदपथ मात्र पादचाऱ्यांना उपलब्ध करून देण्याएवजी एल and टी कंपनीला जाहिरातींचे फलक लावायला उपलब्ध करून देणे अशा प्रकारांचा सचित्र पर्दाफाश यावेळी करण्यात आला .

 

रिपब्लिकन कामगार संघटना व रिपब्लिकन चर्मकार आघाडीच्यावतीने प्रचंड निदर्शने

0

पुणे- महापालिकेतील कंत्राटी , सफाई , शिपाई ,प्रक्षिशीत संगणक कामगार , पाणीपुरवठा कामगार , खाजगी सुरक्षारक्षक कर्मचाऱयांवर होत असलेला अन्याय दूर करून कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करणे बाबत तसेच पुणे शहर जिल्ह्यातील गटई ( चर्मकार ) बांधवाचे प्रश्न व त्यांना बैठे परवाने (लायसन्स ) व स्टोल्स देण्याबाबत निवेदन देउनहि ठोस कारवाई न झाल्याने पुणे मनपातील कंत्राटी कामगार व पुणे शहर जिल्ह्यातील गटाई कामगारांचे प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पुणे महापालिका प्रवेश द्वारावर रिपब्लिकन संघर्ष दल महाराष्ट्र प्रदेश कृत रिपब्लिकन  कामगार संघटना व रिपब्लिकन चर्मकार आघाडीच्यावतीने प्रचंड निदर्शन आंदोलनकरण्यात आले . यामध्ये  रिपब्लिकन संघर्ष दलाचे नेते संजय भीमाले यांच्याहस्ते संघटनेच्या मागण्याचे निवेदन अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबेला आगरवाल यांना देण्यात आले .

या रिपब्लिकन संघर्ष दलाचे पुणे शहराध्यक्ष नितीन बालकी  , अर्चना कांबळे , प्रतिभा केंगार , संजू बनसोड , शिवलाल चिंचोले , चंद्रकांत चव्हाण , विशाल आंदे , विजय वरछे , बंडू पुरुषोत्तम , किसन उतपुरे , शाम उतपुरे , भीमछावाचे अध्यक्ष शाम गायकवाड , संघर्षाचा आवाजचे संजय सोनवणे , विकास साळवे , जीवन गनपुरी ,गजानन बिजोरे  जयपाल आंबीपुरे , गजानन अवसारे , पुष्पा पाटोळे , साधना जाधव आदी प्रमुख कार्यक्रर्ते व मोठ्या संख्येने गटई ( चर्मकार ) बांधव व कंत्राटी कामगार सहभागी झाले होते .

डॉ दीपक टिळक यांच्या हस्ते ‘शिक्षक गौरव पुरस्कार २०१९’ प्रदान

0
पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पी ए इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स ,आर्ट अँड डिझाईन’ कडून  ,डॉ दीपक टिळक यांच्या हस्ते ‘शिक्षक गौरव पुरस्कार २०१९’ प्रदान करण्यात आले .
शहरातील १० शाळांचे मुख्याध्यापक आणि १० महाविद्यालयांचे प्राचार्यांना या समारंभात गौरविण्यात आले . हा कार्यक्रम २३ जानेवारी रोजी सकाळी आझम कॅम्पस च्या हाय टेक हॉल मध्ये झाला .
यावेळी सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार ,’सिटीस इन्फोटेक ‘ चे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षद सांगळे ,सोसायटीचे सचिव लतीफ मगदूम , सहसचिव इरफान शेख ,प्राचार्य डॉ ऋषी आचार्य उपस्थित होते
‘शहरातील मुख्याध्यापक आणि प्राचार्यांचा बहुमान करण्याची ही प्रथा स्तुत्य असून त्यामुळे सर्वांच्या योगदानाची दखल घेतली गेली ‘,असे उदगार डॉ . दीपक टिळक यांनी यावेळी बोलताना काढले .

कोची ब्लू स्पायकर्स आणि यू मुम्बा व्हॉली यांच्यातील सामन्याद्वारे रुपे प्रो व्हॉलीबॉल लीगचा प्रारंभ

0

मुंबई  – नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख उत्पादन असलेल्या रुपेने भारतातील नवा फ्रँचाईझी आधारित स्पोर्ट्स लीग – प्रो व्हॉलीबॉल लीगच्या शीर्षक प्रायोजकत्वाचे हक्क संपादन केले असून ही लीग २ फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे भारतातील सर्व बँका आणि आर्थिक संस्थांना देशांतर्गत कार्ड पेमेंट यंत्रणा उभारून देण्याचा विचार पूर्णत्वाला नेण्यासाठी स्थापन करण्यात आलेली रुपे सहा वेगळ्या शहरांत होत असलेल्या सहा फ्रँचाईझीच्या या लीगची शीर्षक प्रायोजक असेल.

 बेसलाइन व्हेंचर्स आणि व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांचा उपक्रम असलेली ही लीग आता पहिल्या सीझनमध्ये रुपे प्रो व्हॉलीबॉल लीग या नावाने ओळखली जाईल. या सहकार्याविषयी आनंद व्यक्त करत एनपीसीआयच्या विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. कुणाल कलावातिया म्हणाले, ‘रुपे हे ६० कोटी भारतीयांसाठी पसंतीचे कार्ड आहे आणि ११०० बँक्स आज रुपे कार्ढचे वितरण करतात. व्हॉलीबॉल हा उत्तम सांघिक खेळ आहे आणि देशभरात सर्वत्र खेळला जातो. ज्याप्रमाणे रुपे डिजिटल पेमेंट उपक्रम सक्षम करत आहे, त्याप्रमाणे प्रो व्हॉलीबॉल लीग हा खेळ पुढे आणि देशाला समान खेळभावनेसह जोडेल असे आम्हाला वाटते. रुपे प्रो व्हॉलीबॉल लीगसह आम्हाला तरुण आणि निरोगी भारताची ताकद साजरी करायची आहे.’

या घडामोडीविषयी तुहिन मिश्रा, सह- संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक, बेसलाइन व्हेंचर्स म्हणाले, ‘शीर्षक प्रायोजक म्हणून रुपेचे सहकार्य मिळाल्याने आम्ही आनंदित झालो आहोत. वेगवान, थरारक आणि आपल्या तरुण व दमदार देशाला साजेशा खेळामध्ये रुपेने गुंतवणूक केल्याचे पाहाणे आश्वासक आहे. ज्याप्रमाणे रुपे डिजिटल भारताची क्रांती घडवून आणत आहे, त्याप्रमाणे प्रो व्हॉलीबॉल लीगद्वारे व्हॉलीबॉल क्रांती घडवण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रयत्नांत मदत करण्यासाठी रुपेइतका चांगला जोडीदार मिळाला नसता.  ’

रुपेचे स्वागत करत भारताचे पूर्वीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सध्याचे सचिव श्री. रामावतार सिंग जाखर म्हणाले, ‘पीव्हीएलच्या संघात आम्ही रुपेचे मनापासून स्वागत करत आहोत. असा प्रतिष्ठित आणि देशाचा अभिमान असलेला ब्रँड व्हॉलीबॉलसारख्या तळागाळातील खेळाडूंच्या आवडत्या खेळाला पाठिंबा देत असल्याचे पाहाणे भारावणारे आहे. आमचे सहकार्य दमदार असेल याची खात्री वाटते.’

लीगची उद्घाटनपर आवृत्ती दोन फेब्रुवारी रोजी राजीव गांधी मैदान, कोची येथे कोची ब्लू स्पायकर्स आणि यू मुम्बा व्हॉली यांच्यातील सामन्याद्वारे होईल. नोव्हेंबर २०१८ मध्ये जाहीर करण्यात आलेले सहा संघ पहिल्या सीझनमध्ये राउंड रॉबिन फॉरमॅटमध्ये एकमेकांविरोधात खेळणार असून यात एकूण १८ सामने होणार आहेत. अहमदाबाद डिफेंडर्सची मालकी बॉनहोमी स्पोर्ट्स इव्हेंट्स मॅनेजमेंट लि.,कडे आहे, तर केरला कालीकत हिरोची मालकी बीकन स्पोर्ट्सकडे आणि चेन्नई स्पार्टन्सची मालकी चेन्नई स्पार्टन्स प्रा. लि. कडे आहे. यू मुम्बा व्हॉलीची मालकी यू स्पोर्ट्सकडे असून कबड्डी लीगमधील एक संघही त्यांच्या मालकीचा आहे. ब्लॅक हॉक्स हैद्राबादची मालकी अजाइल एंटरटेनमेंट प्रा. लि.कडे आणि कोची ब्लू स्पायकर्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या कोची फ्रंचाईझीची मालकी थॉमस मुथ्थुटकडे आहे. दोन फेब्रुवारीपासून सुरू होत असलेले सर्व सामने सोनी सिक्स आणि सोनी टेन ३ वर थेट प्रसारित होणार असून सोनी लिव्हवरही ते लाइव्ह स्ट्रीम केले जातील.

विद्यार्थ्यांना डॉक्टर ,इंजिनिअर तर बनवता,त्याबरोबर ‘संपूर्ण भारतीय’ देखील घडवा -जावेद अख्तरांचा शिक्षण संस्थांना सल्ला

0

पुणे : जी गतिमंद मुलं असतात. ती बाकी काहीच  करू शकत नाही. एकाला पेपर दिले तर तो कागदावर शीप काढेल. दुसरा पेपराचे बारीक तुकडे करेल, तिस-याला मागच्या आणि पुढच्या पन्नास वर्षांच्या तारखा माहिती असतील. एकच गोष्ट तो अगदी मनापासून करेल. बाकी काहीच त्याला येणार नाही. हा एक मानसिक आजार आहे. पण विचार केला तर अशाच प्रकारे देशातील एककल्ली शिक्षणपद्धतीमुळे विद्याथर्थ्यांना इंजिनिअरिंग, मेडिसीन, चार्टर्ड अकाऊटिंग त्या त्या विषयांची माहिती तर होते. मात्र  इतर विषयात त्यांची पाटी कोरीच राहाते. विदयार्थ्यांना संपूर्ण ‘भारतीय’ च  बनविले जात नाही अशा शब्दातं देशाच्या शिक्षणव्यवस्थेवरच ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी ताशेरे ओढले.

सिंबायोसिसच्या रौप्यमहोत्सवी सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा,  सिंबायोसिसचे संस्थापक- अध्यक्ष डॉ शां.ब मुजुमदार, सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका  डॉ विद्या येरवडेकर उपस्थित होत्या. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांना जावेद अख्तर यांच्या हस्ते सिंबायोसिस सांस्कृतिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच  महोत्सवाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नाट्य, गायन,संगीत, नृत्य आणि चित्रपट या क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या संस्थांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये भरत नाट्य मंदिर, भारत गायन समाज,आर्य संगीत प्रसारक मंडळ, मनीषा नृत्यालय आणि आशय फिल्म क्लब यांचा समावेश होता.

जावेद अख्तर यांनी आपल्या भाषणात देशातील शिक्षणपद्धतीवरच टीकास्त्र सोडले.  सेंटर फॉर अडव्हायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशच्या कमिटीमध्ये असताना एक प्रश्न उपस्थित केला होता. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कोणत्याही शाळेमध्ये गेल्यास  तिथल्या आठ वर्षांच्या मुलाला  चित्र काढ असे सांगितले जाते तेव्हा  तो डोंगर, त्याच्यामागे सूर्य, घर, एक दार खिडकी आणि अगदीच जमल्यास नदी व  त्यात नाव हेच चित्र काढेल. भारतातील प्रत्येक शाळांमधील सात ते आठ वर्षांचा मुलगा हेच चित्र रंगवताना दिसेल.  मग आपण मुलांना कोणत्याप्रकारचे शिक्षण देत आहोत? असा सवाल उपस्थित करीत ते म्हणाले, आपण  मुलांची  कल्पनाशक्ती हिरावून घेत त्यांना एका चौकटीत बसवत आहोत. ज्या मुलाने नदी, डोंगराच्या मागे उगवणारा सूर्य ते घर या गोष्टी जर  पाहिल्याच नसतील तर त्याला आपण का हे चित्र बनवायला लावत आहोत?  तो आठ वर्षांचा मुलगा आपली गल्ली किंवा घराचे चित्र का बनवत नाही? पण त्यांना हेच करायचे असे सांगितले आहे.

मला सात ते आठ वर्षांपूर्वी आर्थिक मंत्रालयाने वक्ता म्हणून  बोलावले होते. खरेतर लेखकाचा अर्थ खात्याशी काडीमात्र संबंध नसतो अशी मिश्किल टिप्पणी करीत ते पुढे म्हणाले, तेव्हा मला प्रश्न विचारला होता की देशाच्या अंदाजपत्रकामध्ये बदल करायचा झाल्यास काय कराल ? तेव्हा अंदाजपत्रकात शिक्षणासाठी 10 टक्के तरतूद करेन असे उत्तर दिले होते. सध्याच्या शिक्षण क्षेत्राला अनेक समस्यांनी ग्रासले आहे.  त्यामध्ये भाषा ही प्रमुख समस्या आहे.  दोन वेळेची रोटी खाऊन जगणारे लोक  मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालत आहेत. इंग्रजी यायलाच हवी हे खरं आहे. जे इंग्रजी सोडा म्हणतात ते आपले शत्रूच आहेत. पण आपल्या भाषेची किंमत मोजून  इंग्रजीला महत्व देता कामा नये. त्यामुळे उच्च मध्यमवर्गीय भाषेपासून तुटत चालला आहे. भाषेच्या मजबूत खांबावरच संस्कृती टिकून असते, अशा शब्दातं त्यांनी मातृभाषेचे महत्व विशद केले. इंग्रजीच्या मानसिकतेमुळे आपण आपल्या मुलांना विहिरीतले बेडूक बनवत आहोत. ज्यांना संस्कृती, इतिहासाबद्दल माहिती नाही. आपण शिक्षणाचा वृक्ष तर उभा करीत आहोत. मात्र त्याची मूळ, फांद्या वेगळ्या ठिकाणी अशी सध्याची परिस्थिती आहे, अशी टीकाही  त्यांनी केली.

राष्ट्रवादा’चा खरा अर्थ उमगला नाही
‘राष्ट्रवादी कोण आणि राष्ट्रद्रोही कोण, यातच आपण गुंतून गेलो आहोत. हा आमचा देश, हा त्यांचा देश, हा भेदभाव काय कामाचा ?… खरंतर, राष्ट्रवाद ही जगण्याची रीत आहे. त्यात देशाप्रती कर्तव्य अपेक्षित आहे. पण आम्हाला या शब्दाचा खरा अर्थ उमगू शकलेला नाही, अशी खंत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केली. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातर्फे फेस्टिव्हल ऑफ  थिंकर्स या कार्यक्रमात त्यांनी  ‘राष्ट्रवादा’वर राज्यकर्त्यांना खडे बोल सुनावले. निव्वळ शाब्दिक राष्ट्रवादापेक्षा आज आपल्याला सदभावनेच्या राष्ट्रवादाची गरज आहे. दुदैवाने  तसे आज घडताना मात्र दिसत नाही. राष्ट्रवादाच्या घोषणा देण्यापेक्षा खरी देशभक्ती, खरे देशप्रेम महत्त्वाचे. दुदैवाने आपण सामाजिक बांधिलकी विसरत गेलो, असल्याचे ते म्हणाले.

कॉंग्रेस भवनात आनंदाला उधाण..(व्हिडीओ)

पुणे- प्रियंका गांधी यांची पक्षात महासचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याच्या वृत्तानंतर पुण्याच्या कॉंग्रेस भवनात आनंदाला उधाण आले .

शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे यांचा काळच वाढदिवस झाला ,आणि आज प्रियांका यांच्या सक्रीय राजकरणात प्रवेशाची बातमी येथे येवून धडकली .

मग काय ,आनंद नेहमीच मोठ्या उत्साहाने साजरा करणाऱ्या शहर अध्यक्षांच्या आनंदाला पारावर उरला नाही, लाडू, पेढे आले वाटप सुरु झाले, बँड बाजा आला … प्रियांकाच्या रूपाने जणू इंदिरा गांधीच पक्षाला पुन्हा लाभत असल्याचे चित्र-स्वप्न येथे रंगू लागले आणि रंगता रंगता ..भांगडा रंगला ..आणि या सर्व आनंदोत्सवात सहभागी होणार नाही ते कॉंग्रेस कार्यकर्ते कुठले ..अभय छाजेड ,दीप्ती चवधरी ,कमल व्यवहारे ,नीता राजपूत ,सोनाली मारणे,बाळासाहेब अमराळे ,चंद्रशेखर कपोते ,रमेश अय्यर ,दापोडीचे भुतडा असे पाहता पाहता वेगाने कॉंग्रेस भवनाकडे आलेली मंडळी या उत्सवात तेवढ्याच वेगाने सहभागी झाली ….पहा या आनंदोत्सवाची एक व्हीडीओ झलक …

आता इंदिराजी कि झलक …प्रियांका गांधी अखेर राजकारणात -काँग्रेसचा मास्टर स्ट्रोक

0

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. प्रियांका गांधी यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर उत्तर प्रदेश पूर्वच्या प्रभारी पदाची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. या माध्यमातून त्यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला असून हा काँग्रेसचा मास्टर स्ट्रोक मानला जात आहे.

काँग्रेसने उत्तरप्रदेशमध्ये दोन सरचिटणीस नियुक्त केले आहेत. यानुसार उत्तर प्रदेश (पश्चिम)ची जबाबदारी ज्योदिरादित्य सिंधिया यांच्यावर सोपवण्यात आली आहे. एक फेब्रुवारीपासून प्रियांका गांधी आपली जबाबदारी सांभाळतील.
काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून यासंदर्भातील घोषणा केली आहे. 47 वर्षीय प्रियांका यांची तुलना अनेकवेळा त्यांच्या आजी आणि भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली होती. काँग्रेसने त्यांनाच लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाची उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली होती. परंतु, आपले बंधू तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पुढे केले. 2004 पासूनच आपल्या आई तसेच यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या प्रचार सभांना उपस्थिती लावली. परंतु, सक्रीय राजकारणापासून स्वतःला दूरच ठेवले. आता मात्र, काँग्रेसने त्यांना सरचिटणीस पद देऊन सक्रीय राजकारणात उतरवले आहे.

देशात लोकसभा निवडणुकीच्या विजयाचा मार्ग हा उत्तर प्रदेशातूनच जातो असे म्हटले जाते. या राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. या जागा ज्यांच्या त्यांचीच केंद्रात सत्ता असल्याचा इतिहास आहे. अशात काँग्रेस केवळ एक जबाबदार व्यक्ती निवडून उत्तर प्रदेश काबीज करू शकणार नाही ही गोष्ट काँग्रेसला समजली असावी. त्यामुळेच, काँग्रेसने प्रियांका गांधी वढेरा यांना सक्रीय राजकारणात उतरवले असे सांगितले जात आहे. मुळातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात लोकसभा निवणडुकीत कुठलाही धोका पत्करण्यासाठी काँग्रेस तयार नाही हेच प्रियांकांना राजकारणात उतरवून पक्षाने सिद्ध केले आहे.

 

जुन्नरमध्ये बिबट्याने केली मेंढपाळाच्या ४ महिन्यांच्या मुलीची शिकार

0

पुणे – जुन्नर तालुक्यातील येडगाव खानेवाडी येथे मंगळवारी रात्रीच्या सुमाराम धनगरांच्या वाड्यावर (मेंढरासोबत वास्तव्याचे ठिकाण) बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये बिबट्याने शिकारीच्या हेतुने ४ महिन्यांच्या मुलीची शिकार केली आहे. कल्याणी सुखदेव झिटे, असे त्या चिमुकल्या मुलीचे नाव आहे.
सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे धनगर समाज रोज एका गावातून दुसऱ्या गावात आपला संसार मेंढ्याबरोबर मांडत आहेत. सध्या जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मेंढपाळांचा उघड्यावरचा हा संसार धोक्यात आला असून मंगळवारी बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकल्या मुलीचा जीव गेला. या घटनेनंतर जुन्नर तालुक्यात सध्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येडगाव खानेवाडी येथील एका शेतात धनगरांचा वाडा वास्तव्यासाठी होता. मंगळवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने या वाड्यावर हल्ला करत चिमुकल्या मुलीला शिकारीच्या हेतुने उचलुन नेले. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने या मुलीचा शोध घेतला असता, तिचा मृतदेह वाड्याजवळीच असलेल्या रामदास भिकाजी भोर यांच्या फ्लॉवरच्या शेतीमध्ये आढळून आला. दरम्यान, दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले वाढत असताना मानवी जीवांसह पाळीव प्राण्यांना बिबट्यापासून मोठा धोका निर्माण झाला आहे. बिबट्याच्या या दहशतीवर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून जोर धरत आहे.

अवांतर वाचनाला प्रोत्साहन द्या ! :माजी कुलगुरू डॉ . एस .एन पठाण यांचे आवाहन

0
संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे स्नेह संमेलन उत्साहात
पुणे :’ चंगळवादाचा धोका वाढत असताना शिक्षणातून चारित्र्य संवर्धन होण्याची जबाबदारीही वाढली आहे . अशा परिस्थितीत  विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनाला आपण शिक्षण प्रक्रियेत प्रोत्साहन दिले पाहिजे आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा घेण्यासाठी वाचनाचे सकस पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत ,’ असे आवाहन  राज्याचे माजी शिक्षण संचालक आणि नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ . एस .एन पठाण यांनी काढले .
संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे वार्षिक  स्नेह संमेलन  एमआयटी (कोथरूड )प्रांगणात उत्साहात  झाले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम . आय . टी . च्या विश्वस्त डॉ . स्वाती -चाटे -कराड होत्या . राज्याच्या उच्च माध्यमिक -माध्यमिक परीक्षा मंडळाच्या अध्यक्ष डॉ . शकुंतला काळे प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होत्या .
डॉ . पठाण म्हणाले ,’जागतिकीकरणाचा लोंढा येत असताना चंगळवाद वाढत आहे . चारित्र्य घडण या शिक्षणाच्या मूळ उद्देशाकडे दुर्लक्ष होत आहे . मग आदर्श समाज कसा घडणार असा प्रश्न पडतो . समाजात अन्याय ,अत्याचार ,अस्वस्थता वाढत असताना शिक्षणातून चारित्र्य संवर्धन होणार नसेल तर ते कुचकामी ठरेल ‘
मराठी माध्यमाचे विद्यार्थी भाग्यवान आहेत कारण त्यांना अवांतर वाचनासाठी भरपूर चांगले पर्याय उपलभ आहेत . वाचनातून भेटणाऱ्या सकस व्यक्तिरेखा वाचून आणि भोवतालची ऊत्तुंग व्यक्तिमत्वे पाहून विद्यार्थी प्रेरित होऊ शकतात ,असेही ते म्हणाले .
डॉ शकुंतला काळे यांनी तणावमुक्त होऊन शालान्त परीक्षा कशी द्यावी ,याबद्दल मार्गदर्शन केले . तर डॉ . स्वाती चाटे -कराड यांनी मराठी विद्यार्थ्यांनी न्यूनगंड ठेवू नये ,असे आवाहन केले .
यावेळी किसन बुचडे ,प्राचार्य नागनाथ सानप यांच्या हस्ते डॉ . एस एन पठाण यांचा सत्कार करण्यात आला .

केजे महाविद्यालयात ‘मल्हार युवा महोत्सव’ उत्साहात

0

पुणे : “प्रत्येकाच्या आतमध्ये सुप्त गुण दडलेले असतात. या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर आयोजिले जाणारे महोत्सव उपयुक्त ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी पुस्तकी ज्ञानासह कला-कौशल्ये आत्मसात करावीत,” असे मत प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी केजे शैक्षणिक संस्थेच्या केजे अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित ‘मल्हार युवा महोत्सवा’च्या उद्घाटनावेळी जितेंद्र भुरुक बोलत होते.

सहा दिवसांच्या या युवा महोत्सावात अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, व्यवस्थापनशास्त्र व वास्तुशास्त्राच्या विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला. फॉर्मल टाय डे, साडी डे, रोज डे, बॉलीवुड डे, चॉकलेट डे, स्कूल डे, मिसमॅच डे, सिग्नेचर डे, ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट डे व ट्रेडीशनल डे आदी दिवस साजरे झाले. विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे, पेन्सिल स्केचेस, छायाचित्रे, हस्तकला व रांगोळींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या कलादालनाचे उद्घाटन सुनंदा जाधव व विभावरी जाधव यांनी केले.

‘म्युझिकल इव्हीनींग’मध्ये प्रसिध्द डीजे मित यांच्या उपस्थितीत मुलांनी नृत्याचा आनंद घेतला. गायन, संगीत, नृत्य, नाटक आदी कलांचे सादरीकरण सांस्कृतिक कार्यक्रमात झाले. विद्यार्थ्यांनी दर्जेदार गाणी, नृत्य व नाटकांद्वारे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सर्व कलेतील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने पारितोषिके प्रदान करण्यात आली. कृष्णात पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. सुहास खोत यांनी महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.

महोत्सवाच्या समारोपावेळी भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभागाचे प्रमुख कृष्णाथ पाटील, संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा देशमुख-जाधव, विभावरी जाधव, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, संचालक डॉ. व्यासराज काखंडकी, ट्रिनिटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. जी. फाकटकर, ट्रिनिटी अ‍ॅकॅडमीचे प्राचार्य डॉ. एन. जे. उके, डॉ. मंगेश कश्यप, जी. बी. इंगोले, सर्व विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. ‘मल्हार युवा महोत्सवा’चे समन्वयक व केजे अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास खोत, प्रा. छबिलदास गाजरे, प्रा. विकास मरळ, प्रा. अमृता ताकवले व सहकार्‍यांनी मेहनत घेतली.

मधुमेह व अस्थिघनता तपासणी शिबिराचे सुर्यदत्ता पुनर्वसन केंद्रांतर्गत आयोजन

0
पुणे : सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सुर्यदत्ता ग्लोबल रिहबिलिटेशन सेंटर फॉर डिअ‍ॅडिक्शनतर्फे चेलाराम डायबेटिस अ‍ॅन्ड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने संस्थेच्या कर्मचार्‍यांसाठी मोफत मधुमेह व अस्थिघनता तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. बावधनच्या सरपंच पियुषा दगडे आणि सामाजिक कार्यकर्ते बबन दगडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. या दोघांनेही आपली मधुमेह व अस्थिघनता तपासणी करुन घेतली. 
 
या शिबिरात जवळपास 130 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा समावेश होता. तपासणीअंती आवश्यकतेनुसार उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. कर्मचार्‍यांचे आरोग्य सदृढ राहावे, यासाठी भविष्यातही विविध प्रकारची शिबिरे संस्थेच्या वतीने घेतली जाणार आहेत, असे सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले. दगडे दाम्पत्याने या उपक्रमाचे कौतुक करीत सुर्यदत्ता संस्थेला व चेलाराम हॉस्पिटला धन्यवाद दिले. 

शिवनेरीसह, जुन्नर मध्ये साकारनार प्राचीनवस्तू संग्रहालय

0
डेक्कन कॉलेज, खा.आढळराव,सह्याद्री गिरीभ्रमन संस्थेचे प्रयत्न
जुन्नर /आनंद कांबळे
शिवजन्मभूमी महाराज किल्ले शिवनेरीवर  तसेच जुन्नर शहरात  प्राचीन वस्तु आणि शिवकालीन शस्रास्र संग्रहालय साकारणार आहे.  आणि डेक्कन कॉलेजच्या वतीने भारतीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून जुन्नरच्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्था  सहकार्याने हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे.
शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पा अंतर्गत सुमारे ८६ कोटी रुपयांचा विकास प्रकल्प राज्य शासनाच्या विविध विभागांद्वारे २००२ पासून सुरु आहे.शिवकालीन दुर्गबांधनीचे  मॉडेल फोर्ट म्हणून किल्ले शिवनेरीचे संवर्धन करण्यात येत आहे.
. या प्रकल्पामुळे शिवनेरीला भेट देणाऱ्या  दुर्गप्रेमी पर्यटक आणि शिवप्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जुन्नर तालुक्याला इ.स.पूर्व इतिहास असून, या इतिहासाची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही. यामुळे शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांना आकर्षण वाटेल असे   प्राचीन वस्तु आणि शिवकालीन शस्रास्र संग्रहालय     उभारावीत अशी मागाणी होती.
शिवनेरीवरील अंबरखाना इमारती मध्ये कायमस्वरुपी माहिती केंद्र आणि शिवकालीन शस्रास्र संग्रहालय उभारण्यात यावे अशी मागणी १९ फेब्रुवारी २००७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याकडे  जुन्नरमधील सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने केली होती. अशी माहिती संस्थचे अध्यक्ष संजय खत्री यांनी दिली.
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संग्रहालयाला मान्यता दिली होती. भारतीय पुरात्तव विभागाचे जुन्नर विभागाचे संरक्षक सहाय्यक बी.बी.जंगले यांनी  अंबरखाना इमारतीच्या संवर्धनाला सुरुवात केली.
मात्र  हा प्रस्ताव पुढे बाजूला पडला.
खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्य शासनाबरोबर, विद्यमान केंद्रिय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालिका उषा शर्मा यांचे बरोबर संग्रहालयाबाबत पाठपुरावा  केला.
यानंतर डेक्कन कॉलेजचे कुलगुरु डॉ.वसंत शिंदे यांनी शिवनेरी सह जुन्नर शहरात देखील पुरातत्व वस्तु संग्रहालय उभारण्याबाबत नियोजन केले.  संग्रहालयासाठी  डॉ. शिंदे यांनी  जुन्नर नगर पालिकेच्या  जिजामाता उद्याना शेजारील जुन्या विश्रामगृहाची  जागा देण्याची मागणी नगर पालिकेकडे केली आहे.
जुन्नरचे  नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच जागा डेक्कन कॉलेजला  सदर जागा हस्तांतरीत  करण्याची तयारी दर्शविली असल्याचे डॉ. वसंत  शिंदे यांनी सांगितले.
१)””पुढील महिन्यात  शिवनेरीवरील शिवजयंती सोहळ्यात संग्रहालयाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक घोषणा करतील, यासाठी आम्ही पाठपुरावा करत  आहोत.
– संजय खत्री 
अध्यक्ष, सह्याद्री गिरिभ्रमण संस्था, जुन्नर
२)””  किल्ले शिवनेरीवरील  अंबरखाना ही वास्तू वापरात येऊन चांगले संग्रहालय झाले तर हे दुर्गप्रेमी  पर्यटकांसाठी मार्गदर्शक  माहिती केंद्र होईल. त्याच्या कार्यवाहीसाठी  केंद्र, राज्य सरकारसह विविध विभागांशी पत्रव्यवहार करीत आहे. 
– खासदार शिवाजीराव आढळराव पाटील
३)””जुन्नर शहर 2000 वर्षांपूर्वी  सातवाहनांची साम्राज्याची  पहिली राजधानी होती. सातवाहन साम्राज्याचे   रोमन आणि ग्रीक लोकांबरोबर व्यापारी संबंध होते.डेक्कन कॉलेजच्या माध्यमातून जुन्नर मध्ये   उत्खनन करण्यात आलेले आहे.सुमारे2000वर्षांपूर्वीच्या प्राचीन तसेच शिवकालीन  लोकसंस्कृतीची माहिती व्हावी, यासाठी संग्रहालयासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत.
– डॉ. वसंत शिंदे
कुलगुरू, डेक्कन कॉलेज (अभिमत विद्यापीठ)
४)-जुन्नर मध्ये प्रस्तावित असलेल्या    प्राचीनवस्तू संग्रहालयासाठी जागा तसेच   आवश्यक ती  प्रशासकीय पूर्तता करण्यासाठी जुन्नर नगरपालिकेच्या वतीने सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल.–शाम पांडे,नगराध्यक्ष जुन्नर नगर पालिका