डॉ दीपक टिळक यांच्या हस्ते ‘शिक्षक गौरव पुरस्कार २०१९’ प्रदान
पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पी ए इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स ,आर्ट अँड डिझाईन’ कडून ,डॉ दीपक टिळक यांच्या हस्ते ‘शिक्षक गौरव पुरस्कार २०१९’ प्रदान करण्यात आले .
शहरातील १० शाळांचे मुख्याध्यापक आणि १० महाविद्यालयांचे प्राचार्यांना या समारंभात गौरविण्यात आले . हा कार्यक्रम २३ जानेवारी रोजी सकाळी आझम कॅम्पस च्या हाय टेक हॉल मध्ये झाला .
यावेळी सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार ,’सिटीस इन्फोटेक ‘ चे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षद सांगळे ,सोसायटीचे सचिव लतीफ मगदूम , सहसचिव इरफान शेख ,प्राचार्य डॉ ऋषी आचार्य उपस्थित होते
‘शहरातील मुख्याध्यापक आणि प्राचार्यांचा बहुमान करण्याची ही प्रथा स्तुत्य असून त्यामुळे सर्वांच्या योगदानाची दखल घेतली गेली ‘,असे उदगार डॉ . दीपक टिळक यांनी यावेळी बोलताना काढले .