पुणे- महापालिकेतील कंत्राटी , सफाई , शिपाई ,प्रक्षिशीत संगणक कामगार , पाणीपुरवठा कामगार , खाजगी सुरक्षारक्षक कर्मचाऱयांवर होत असलेला अन्याय दूर करून कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करणे बाबत तसेच पुणे शहर जिल्ह्यातील गटई ( चर्मकार ) बांधवाचे प्रश्न व त्यांना बैठे परवाने (लायसन्स ) व स्टोल्स देण्याबाबत निवेदन देउनहि ठोस कारवाई न झाल्याने पुणे मनपातील कंत्राटी कामगार व पुणे शहर जिल्ह्यातील गटाई कामगारांचे प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पुणे महापालिका प्रवेश द्वारावर रिपब्लिकन संघर्ष दल महाराष्ट्र प्रदेश कृत रिपब्लिकन कामगार संघटना व रिपब्लिकन चर्मकार आघाडीच्यावतीने प्रचंड निदर्शन आंदोलनकरण्यात आले . यामध्ये रिपब्लिकन संघर्ष दलाचे नेते संजय भीमाले यांच्याहस्ते संघटनेच्या मागण्याचे निवेदन अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबेला आगरवाल यांना देण्यात आले .
या रिपब्लिकन संघर्ष दलाचे पुणे शहराध्यक्ष नितीन बालकी , अर्चना कांबळे , प्रतिभा केंगार , संजू बनसोड , शिवलाल चिंचोले , चंद्रकांत चव्हाण , विशाल आंदे , विजय वरछे , बंडू पुरुषोत्तम , किसन उतपुरे , शाम उतपुरे , भीमछावाचे अध्यक्ष शाम गायकवाड , संघर्षाचा आवाजचे संजय सोनवणे , विकास साळवे , जीवन गनपुरी ,गजानन बिजोरे , जयपाल आंबीपुरे , गजानन अवसारे , पुष्पा पाटोळे , साधना जाधव आदी प्रमुख कार्यक्रर्ते व मोठ्या संख्येने गटई ( चर्मकार ) बांधव व कंत्राटी कामगार सहभागी झाले होते .