Home Blog Page 2884

महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील बचावकार्यात सहभागी सर्व यंत्रणांचे महसूल मंत्री व भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मानले आभार

0

मुंबई –  मुंबई ते कोल्हापूर जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणी बदलापूर-वांगणी दरम्यानअडकलेली होती त्यात तब्बल 1200 प्रवासी प्रवास करत होते मात्र महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या विविध यंत्रणांनी  वेळीच युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केल्यामुळे हे सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या बचावकार्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सर्व यंत्रणांचे व वांगणी येथील ग्रामस्थांचे राज्याचे महसूल मंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांत दादा पाटील आभार व्यक्त केले आहे.

श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मध्य रेल्वेकडून महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये 1200 प्रवासी अडकल्याची माहिती संपूर्ण यंत्रणांना तत्काळ घटनास्थळी पोहचण्याचे आदेश  महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये अडकलेल्या सर्व 1200 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून त्यासाठी राज्याचे डिझास्टर मॅनेजमेंट ची टीम एनडीआरएफ, नेव्ही, रेल्वे प्रशासन व स्थानिक प्रशासन यांनी युद्धपातळीवर कार्य केले. नौसेना आणि एनडीआरएफ टीम प्रमुख यांना राज्य सरकारने मदतीसाठी संपर्क करताच या यंत्रणांनी बचावकार्यात मोलाची भूमिका बजावली. नेव्हीचे पाणबुडे अशी संपूर्ण यंत्रणा बचावकार्यात लागली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घटनेची दखल घेत संपूर्ण संपूर्ण यंत्रणांना तत्काळ बचावकार्य करण्याचे आदेश दिले होते एनडीआरएफच्या सहा बोटी सकाळी नऊ वाजता पासून बचाव कार्यात लागल्या होत्या. त्यांच्यासह स्थानिक पोलिस प्रशासन कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, तहसीलदार, हे सुध्दा बचावकार्यात घटनास्थळी हजर होते . त्यानंतर नेवी व एअर फॉर्स ला सुद्धा पाचारण करण्यात आले होते. एअरफॉर्स दलातील हेलिकॉप्टरने नऊ जणांना ठाणे येथे सुरक्षित स्थळी पोचविण्यात आले. सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी सात लोकांना बाहेर काढण्यात आले त्यानंतर अकरा वाजून पन्नास मिनिटांनी 117 लोकांना बाहेर काढण्यात आले. दुपारी एक च्या दरम्यान  पाचशे लोकांची सुटका यामधून करण्यात आली. या रेल्वे मध्ये 1200 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत होते त्यापैकी नऊ या गर्भवती महिला होत्या त्यांनाही वेळेत उपचार देऊन सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले याठिकाणी 37 डॉक्टरांची चमू ही उपलब्ध करून देण्यात आली होती तसेच ॲम्बुलन्स औषध उपचार याचीही ही सेवाही उपलब्ध करून देण्यात आली होती. 40 बसेस आणि टेम्पो याच्या साह्याने बदलापूर येथे प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात येत होते अशी माहिती देत श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या सर्व यंत्रणांचे आभार व्यक्त केले आहेत.

कॉंग्रेसने गरीबीचे तर भाजपने समृद्धीचे समान वाटप केले -प्रकाश जावडेकर

0

पुणे- नरेंद्र मोदी गरीबांतून आलेले पंतप्रधान आहेत. त्यामुळे गरीबांचे प्रश्‍न त्यांना माहिती आहेत. गेली पाच वर्षे गरीबांसाठी विकास योजना राबविल्या. गेल्या पन्नास दिवसांत गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, व्यापारी यांना सक्षम करणारे आणि सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करणारे निर्णय केंद्र सरकारने घेतले. प्रत्येक घरात शुद्ध पाणी देण्याची योजना सुरू केली आहे. कॉंग‘ेसने गरीबीचे समान वाटप केले तर भाजप सरकार समृद्धीचे समान वाटप करीत आहे. हा या दोन पक्षांतील राज्य कारभारातील फरक आहे. म्हणून जगात दबदबा निर्माण करणार्‍या, अर्थव्यवस्था पुढे नेणार्‍या सर्वसामान्य नागरिकांची प्रगती करणार्‍या आणि गरीबांना सामर्थ्यवान करणार्‍या मोदी सरकारला देशात मोठा पाठिंबा मिळत असल्याचे मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.


पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोथरुड विधानसभा मतदारसंघात भाजपा सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ करताना श्री. जावडेकर बोलत होते. राजीव गांधी पार्क रस्ता आणि साम‘ाज्य सोसायटीमध्ये हे अभियान राबविण्यात आले. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, शहर सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, नगरसेविका छाया मारणे, डॉ. श्रद्धा प्रभुणे, अल्पना वरपे, हर्षाली माथवड, मंडल अध्यक्ष प्रकाश बालवडकर, अजय मारणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. जावडेकर पुढे म्हणाले, ‘भाजप हा जगातील सर्वांत जास्त सभासद असणारा राजकीय पक्ष आहे. सध्या भाजपची सदस्य संख्या  अकरा कोटी इतकी आहे. या वर्षी ती सात कोटीने वाढविण्याचा संकल्प आहे. भाजप हा असा एकमेव पक्ष आहे जो जनतेमध्ये जाऊन सभासद नोंदणी करतो. त्यासाठी तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर केला जात आहे. मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धन्यवाद यात्रांच्या आयोजनातून जनसंवाद साधला जात आहे. आमचे सर्व खासदार, मंत्री, बूथस्तरावरील कार्यकर्ते सात दिवस सभासद नोंदणी अभियानात सहभागी झाले आहेत. जनतेची पक्षाशी असलेली नाळ घट्ट करण्याचा प्रयत्न आहे. त्याला नागरिकांचा भरभरून पाठिंबा मिळत आहे.’

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षपदी आता रुपाली चाकणकर …

0

पुणे- राष्ट्रवादी महिला आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी  पुण्याच्या रुपाली चाकणकर यांची चित्रा वाघ यांच्या जागी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. चित्रा वाघ यांनी शुक्रवारी महिला अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. आज शनिवारी तातडीने यापदावर नियुक्ती करण्यात आली .खडकवासला विधानसभा मतदार संघातून चाकणकर या राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार म्हणूनही त्यांच्याकडे पाहण्यात येते आहे. त्यांची निवड होताच शरद पवार यांनीही त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छ्या दिल्या आहेत .

गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षाशी सुरुवातीपासून एकनिष्ठ राहणारे अनेक नेते भाजपच्या गळाला लागले आहेत. त्यातच राष्ट्रवादीच्या तडफदार महिला नेत्या म्हणून ओळख असलेल्या चित्रा वाघ यांनीदेखील पक्षाला राम राम ठोकला  आहे. चित्रा वाघ यांनी काही वैयक्तिक कारणांमुळे राष्ट्रवादीला सोडल्याचं बोललं जातं आहे. बराच काळ राष्ट्रवादी महिला आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. चित्रा वाघ यांनी पक्ष सोडणं हा खूप मोठा धक्का मानला जात असतानाच रुपाली चाकणकर यांची महिला आघाडीच्या राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांनी आतापर्यंत महिला आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक संघटनात्मक पदांवर त्यांनी काम केलं आहे. सामाजिक कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

सत्तेचा गैरवापर करून फोडा फोडी – शरद पवार

0

पुणे-सत्ताधारी भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असल्यामुळे आघाडीतील अनेक नेत्यांचे पक्षांतर होत आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी भाजप आणि सेनेवर त्यांनी टीका केली. तसेच जे पक्षातून गेलेत त्यांच्या किंवा त्याबद्दल काही चिंता वाटत नसल्याचे सांगून यापूर्वी आम्ही ६ चे साथ केलेले आहेत असे हि म्हटले.  पुण्यात एका कार्यक्रमासाठी शरद पवार आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि अनेक चालू घडामोडींवर आपले मत मांडले.

यावेळी शरद पवार म्हणाले की, मागील काही महिन्यात आघाडीमधील काही नेते मंडळी सत्ताधारी भाजप आणि सेनेत जाताना दिसत आहेत. अशीच परिस्थिती १९८० सालीदेखील झाली होती. ती परिस्थिती आणि आताची परिस्थिती जवळपास सारखीच आहे. त्यावेळी जे सत्ताधारी पक्षात गेले होते, त्या सर्वांना पराभवाचा सामना करावा लागला होता आणि आम्ही नव्याने तसेच ताकदीने पुन्हा उभा राहिलो होता. आतादेखील त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते, असे ते म्हणाले.

“यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना अधिक संधी दिली जाणार आहे. सध्या आघाडीमध्ये ज्या पक्षांतरच्या घटना घडत आहेत, त्यात सत्ताधारी भाजप-शिवसेनेकडून सत्तेचा गैरवापर होत आहे. आघाडीतील काही नेत्यांना ‘तुमची ईडी आणि अन्य काही विभागामार्फत चौकशी लावू’, असे सांगण्यात येत असल्याचे ऐकण्यात आले आहे. अशा प्रकाराच्या दबाव तंत्रामुळे आघाडी मधील नेत्यांना भाजप आणि सेना ओढून घेत आहे. अशाप्रकारे सत्तेचा गैरवापर केल्याचे मी आजवर कधीही पाहिलेले नाही, असे त्यांनी नमूद केले.

“कर्नाटकमध्ये भाजपने सत्तेचा गैरवापर करूनच सत्ता मिळविली आहे. हा सर्व प्रकार तेथील आणि देशभरातील जनतेने पाहिला आहे”, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

संजय दत्त निर्मित पहिला मराठी चित्रपट ‘बाबा’ २ ऑगस्टला

0

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची पहिली मराठी  निर्मिती असलेल्या बाबा’ चित्रपटाविषयी सध्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत बरीच उत्सुकता आहे. ‘संजय दत्त प्रॉडक्शन्स’ व ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’निर्मित आणि राज आर गुप्ता दिग्दर्शित बाबा’ चित्रपट २ ऑगस्ट २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आगळ्या अशा कथेवर बेतलेलापण क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी पटकथा आणि तिला तेवढ्याच सशक्त अभिनयाची जोड रसिकांसमोर येत असल्याने या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तसेच भावनेला भाषा नसते’,हा सरळसाधा संदेश ‘बाबा’ चित्रपटातून देण्यात आला आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणात चित्रित झालेला हा चित्रपट पाहणे चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे.

बाबामध्ये तनु वेडस मनू’ आणि हिंदी मिडीयम’ फेम दीपक दोब्रीयाल याची प्रमुख भुमिका आहे. तो या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याच्याबरोबर नंदिता पाटकर प्रमुख भूमिकेत आहे. त्यांना स्पृहा जोशीअभिजित खांडकेकरचित्तरंजन गिरीजयवंत वाडकर आणि प्रमुख भूमिकेतील बालकलाकार आर्यन मेंघजी यांची साथ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले आहे. याआधी त्यांनी धागा’ या झी5 वर प्रदर्शित झालेल्या मराठी लघुपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाला रोहन रोहन यांचे संगीत असून पार्श्वसंगीत सुस्मित लिमये यांचे आहे.

चित्रपटाची सहनिर्मिती संजय एस दत्त प्रॉडक्शन्सबरोबर ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्सच्या अशोक आणि आरती सुभेदार यांच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझर आणि पोस्टरला सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद लाभतो आहे.अडगुलं मडगुलं‘ या गेल्या आठवड्यात प्रकाशित झालेल्या पहिल्या गाण्यालाही रसिकांनी डोक्यावर घेतले आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी आणि इतर भाषेतील चित्रपटसृष्टींमध्येही चित्रपटाचा बोलबाला आहे. या चित्रपटाचा पहिला ट्रेलर दस्तुरखुद्द संजय दत्तने चित्रपटातील सर्व अभिनेते आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत नुकताच प्रकाशित केला. या ट्रेलरने चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक वाढवली आहे कारण चित्रपटात अनेक चकित करणारे टप्पे असल्याचा अंदाज बाबाचा हा ट्रेलर देतो.

एका ऐकू-बोलू न शकणाऱ्या जोडप्याची आणि त्यांच्या आठ वर्षांच्या बोलू न शकणाऱ्या मुलाची ही कथा आहे. एका छोट्याशा गावात आपल्या छोट्याशा विश्वात हे कुटुंब खुश आहे. पण अशातच एक वादळ त्यांच्या आयुष्यात येते. एक उच्चभ्रू जोडपे त्यांच्या घरी येते आणि त्यांच्या मुलावर आपला हक्क सांगते. स्थानिक पोलीस हस्तक्षेप करतात आणि त्यांना मुलावरील हक्क कोर्टात शाबित करून आणायला सांगतात. त्यातून पुढे काय होते,बाबा सर्व संकटांवर मात करून आपल्या मुलाला त्या कायदेशीर लढाईत जिंकतो कि त्याला हार मानावी लागतेहे अनुभवण्यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट रसिकांना पाहावी लागणार आहे.

ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्सचे अशोक सुभेदार म्हणतात की “ह्या चित्रपटाच्या मनिष सिंगने लिहिलेल्या मूळ कथेला राज गुप्ता यांचे उत्तम दिग्दर्शन लाभले आहे. बाप आणि मुलाची ही एक सुंदर अशी कथा आहे. कोकणातल्या निसर्गरम्य चित्रीकरणामुळे ते अधिकच खुलले आहे. याची कथा प्रत्येक वयोगटातील प्रत्येक रसिकाला खिळवून ठेवेल आणि त्याला भावूक करेलयात शंका नाही.

दिग्दर्शक राज आर गुप्ता यांनी म्हटले, “माझे असे ठाम मत आहे कि भावनांना भाषा नसते. हा संदेश या चित्रपटातील कलाकारांनी अगदी सुंदररित्या अधोरेखित केला आहे. एक कुटुंब सर्व आव्हानांवर मात करत एकत्र राहण्यासाठी कशी धडपड करत असतेयाची ही एक आंबट-गोड कथा आहे.

कल्याणमधील पेट्रोल पंप गेला पाण्याखाली

0

ठाणे- मुंबईसह महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरल्याचे पाहायला मिळत आहे. बदलापूर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण याठिकाणी मुसळधार पावसाने थैमान घातला आहे. उल्हास नदीला पाणी पातळीत वाढ झाली असून, अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

याच पावसामुळे कल्याणमधील एका पेट्रोल पंप पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी 100 लोक अडकल्याची समोर आली आहे. या पेट्रोल पंपावरील गाड्याही पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे. दरम्यान या ठिकाणच्या रस्त्यात पाणी जास्त असल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे.दरम्यान या लोकांच्या बचावासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. तसेच आर्मी आणि एअर फोर्सची मदत मागितल्याची माहिती समोर आली आहे.

 

व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेऊन, आगामी निवडणूक प्रत्येक बूथवर लढवू – पृथ्वीराज चव्हाण

0

पुणे – विधानसभेची आगामी निवडणूक गेल्या पाच वर्षातील सरकारचा कारभार, भ्र्रष्टाचार, चुकीची आर्थिक धोरणे, विकास यापेक्षाही काँग्रेसच्या गावोगावच्या बूथ कार्यकर्त्यांसाठी ही वैचारिक लढाई आहे. मतदार यादीपासून ते मतदारसंपर्क, प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीपर्यंतचे बूथव्यवस्थापनाचे प्रशिक्षण कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे. या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांना निवडणुकीच्या सूक्ष्म व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यासाठी ही निर्धार कार्यशाळेचे आय़ोजन केले आहे. निवडणूक व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घ्या, बूथ कार्यकर्त्यांना देऊन प्रशिक्षित करून आगामी निवडणूक प्रत्येक बूथवर लढवू या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने राज्यातील प्रत्येक विभागातील निवडक कार्यकर्त्यांसाठी“निर्धार” या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन पुण्यात केले आहे. या कार्यशाळेचे उदघाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस आणि प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव, अन्य राष्ट्रीय चिटणीस व महाराष्ट्राचे सहप्रभारी वांशी रेड्डी, संपतकुमार, आशिष दुआ, बी. एम. संदीप, प्रदेश सरचिटणीस आणि प्रशिक्षण विभागाचे समन्वयक अभय छाजेड यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी तिरंगी सुती हार व पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केल्यावर पृथ्र्वीराज चव्हाण यांनी दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उदघाटन केले.

काँग्रेस पक्षातील नव्या तरूण बूथकार्यकर्त्यांना कार्यकर्त्याला निवडणूक, त्यातील सूक्ष्म व्यवस्थापन आणि तंत्राबद्दल प्रशिक्षित करून प्रत्येक बूथवर निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने ही कार्यकर्त्या प्रशिक्षणाची संकल्पना राहुल गांधी यांनी मांडली, असे सांगून चव्हाण म्हणाले,  बूथ कार्यकर्त्यांना मतदारयादी, मतदारांशी संपर्क, त्यांना सरकारच्या चुकीच्या धोरणांची महिती देऊन त्यांच्याशी संवाद साधणे, संपर्क ठेवणे आणि त्यांचे मतदान पक्षाला करून घेणे ते शेवटी मतमोजणी पर्यंत बूथ कार्यकर्त्याने करावयाच्या कामाची सखोल महिती सतत देत रहाणे आवश्यक आहे. अशा कार्यकर्त्यांशी त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवणा-या प्रशिक्षित कार्यकर्त्यांची साखळी तयार करण्याची ही तयारी म्हणजे पशिक्षणासाठी प्रशिक्षक तयार करण्यासाठीची कार्यशाळा आहे.

सध्या सत्तेचा नंगा नाच सुरू आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे. काँग्रेस पक्षाचा कणा असलेली सहकार चळवळ मोडीत काढण्यात येत आहे. निवडणुकीत हे सर्व मुद्दे असतीलच पण ते बूथ कार्यकर्त्यांलाही मतदारांच्या घरी जाऊन त्यांना सांगता येणे गरजेचे आहे. कारण ही निर्णायक लढाई असून समाजाच्या भवितव्यासाठीच्या या लढाईतील शिलेदार म्हणून या वर्गातील प्रशिक्षणार्थींची निवड झाली आहे. आपण बथपर्यंत प्रशिक्षित कार्यकर्त्यांची साखळी तयार करून ही वैचारिक लढाई जिंकू असा विश्वास चव्हाण यांनी शेवटी व्यक्त केला.

या कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करताना सचिन राव म्हणाले, काँग्रेसचा अनपेक्षित पराभव झाला असला तरी आजही पक्षासाठी समर्पितपणे काम करणारा कार्यकर्ता प्रत्येक गावात आहे. या कार्यकर्त्यांशी संपर्क करणे, त्यांच्या सोबत बैठक घेणे, त्यांना लागणा-या प्राथमिक गोष्टींची पूर्तता करणे, त्यांना योग्य सूचना देणे किंवा त्यांच्याकडचे अनुभव जाणून घेणे अशी कामे या वर्गातील प्रशिक्षित कार्यकर्त्यांना करायची आहे. या प्रशिक्षणासाठी आलेले सर्व जण पक्षाचे काम म्हणून नव्हे तर  बूथ कार्यकर्त्यांप्रती आपले असलेले कर्तव्य बजावण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संपतकुमार यांनी सांगितले की, आज लोकशाहीवादी काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट आहे. यातून पक्षाला उभारी देण्यासाठी बदलत्या युगात आलेले निवडणूक व्यवस्थापन, बूथ व्यवस्थापन, ईव्हीएमचे तंत्र या सगळ्याची महिती कार्यकर्त्याला असणे गरजेचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. यातून मतदारांपर्यंत पोचून त्यांचे मत काँग्रेसपक्षाकडे आणणे आपले सर्वांचे अंतिम धेय्य आहे.

अभय छाजेड म्हणाले, आजच्या परिस्थितीत जातीयवादी शक्तींविरूद्ध कार्यकर्त्यांनी आवाज उठवणे आवश्यक आहे. हे आव्हान पेलण्यासाठी निव़णुकीतील परभावानंतर मलूल झाला कार्यकर्त्याला पुन्हा भक्कमपणे उभे करण्यासाठीही कार्यशाळा आहे. या दोन दिवस चालणा-या कार्यशाळेतील कार्यक्रमांची महिती प्रदेश काँग्रेसचे अमर खानापुरे यांनी दिली. या कार्यशाळेत गुजरातचे उत्तम परमार, डॉ.  भालचंद्र मुणगेकर, सचिन सावंत असे मान्यवर काँग्रेसची वैचारिक बैठक, भ्रष्टाचार, बेरोजगारी, कृषी धोरणे, कायदासुव्यवस्था आणि बूथ कार्यकर्ता अशा विषयांवर महिती देणार आहेत. त्यानंतर प्रशिक्षणार्थींमध्ये याच विषयावर ग्रुप डिस्क्शन होणार आहे.

रायगड जिल्ह्याला जलाशयाचे रुप; भीषण पूरस्थितीमुळे नागरिकांचे स्थलांतर

0

रायगड- 24 तासांपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठावरील गावांना धोका निर्माण झालाय. त्यामुळेच अनेक ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सावित्री, आंबा, कुडंलिका नदीने पहाटेच धोक्याची पातळी ओलांडली. महाड आणि नागोठणे शहरातील खालच्या भागांमध्ये गुडगाभर पाणी साचले होते. रोहा तालुक्यातील रोठ आणि वरोसे गावाला पाण्याने वेढा दिलाय. ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धरणही ओव्हरफ्लो झाल्याने सोलनपाडा गाव रात्रीच स्थलांतरीत करण्यात आले आहे. कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील बिरदोले गावाला पाण्याने वेढा दिला असून येथील उल्हास नदी किनारी अनेक गावांमध्ये पाणी साचले आहे. यासोबतच कुडंलिका नदीनेही सकाळीच धोक्याची पातळी ओलांडली असल्यामुळे नागोठणे-रोहा मार्गावरील पुल बंद करण्यात आला आहे.

वाहतुकीवर परिणाम
माणगाव ते श्रीवर्धन रोडवरील मोर्बापर्यंतचा रस्ता पाण्याखाली गेल्याने मार्ग बंद होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. खोपोली-पाली-वाकण मार्ग बंद करावा लागला आहे. आंबा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक महत्त्वाचे पूल पाण्याखाली गेले. पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांचा सपंर्क तुटला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात भातशेतीचे बांध तुटल्यामुळे लावणीसाठी आणलेली रोपे वाहुन गेल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

पुण्यातील झेड ब्रीजचा काही भाग कोसळला

0

पुणे – राज्यात आज सर्वत्र पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुण्यातही शुक्रवारपासून पावसाला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी दुर्घटना घडत असून मध्यवर्ती भागात असलेल्या झेड ब्रीजचा काही भाग कोसळला आहे. माहितीनुसार, ट्रकने धडक दिल्याने पुलाचा भाग कोसळला आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. दुचाकी वाहनांसाठी झेड ब्रीज सुरक्षित असला तरीही नागरिकांनी गाड्या हळू चालवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी च्या भागावर बॅरिकेटस लावण्यात आले आहेत.

 

 

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश, प्रवाशांमध्ये 9 गरोदर महिलाही होत्या

0

मुंबई -पावसाच्या जोरदार तडाख्याचा फटका रेल्वेला मोठ्या प्रमाणात बसला असून वांगणी-बदलापूर रेल्वे मार्गावर अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेस मधील ९ गरोदर महिलांसह सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

काल संध्याकाळपासून मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आज  सकाळीसुद्धा अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. रेल्वे ट्रकवरही पाणी आल्यामुळे अनेक ट्रेन उशिराने धावत आहेत. पावसामुळे मुंबईत येणारी 17 विमान उड्डाणे इतरत्र वळवण्यात आली आहेत.

वांगणी-बदलापूर रेल्वे मार्गावर महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ट्रेनमध्ये जवळपास 700 प्रवासी अडकले होते, आता त्या सर्वांना सुखरुप ठिकाणी हलवण्यात आले आहे. नौदलाची ८ बचाव पथकं, ३ पाणबुड्यांचे पथके आणि एक सी किंग हेलिकॉप्टर बचावकार्यात लागले होते. या प्रवाशांध्ये 9 गरोदर महिलांचाही समावेश होता. दरम्यान, एक्सप्रेसमधील प्रवाशांसाठी प्रशासनाने विशेष ट्रेनची व्यवस्था केली आहे. कल्याणवरुन ही विशेष ट्रेन निघेल.

शनिवार आणि रविवारी राज्यातील अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे. या काळात रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात प्रशासनाने सज्ज राहावे, असा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच काळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार तर मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

 

संभाजी बागेत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवा -संभाजी ब्रिगेड

0

पुणे- छत्रपती संभाजी उद्यानात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा तात्काळ बसवा अन्यथा पुतळा बसवण्यास ‘संभाजी ब्रिगेड’ला परवानगी द्या..अशी मागणी करत आज संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त सौरव राव यांची भेट घेतली आणि संभाजी ब्रिगेड व अनेक शिवप्रेमी, विविध संघटना यांनी वारंवार मागणी करून सुद्धा ‘आयुक्त व महापौर’ चालढकल व वेळकाढूपणा बसवण्यासाठी करत आहेतअशी तक्रार केली .

छत्रपती संभाजी महाराज उद्यान हे फक्त छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे. उद्यानात छत्रपती संभाजी महाराजांचे उत्तम व आदर्श स्मारक करावे व छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा तात्काळ बसवावा… राजकारण व वेळकाढूपणा करत आहे… महापौर जातीयवादीपणा करून राजकारण करत आहेत. मनपा कारभाऱ्यांची पुतळा बसवावा हि इच्छा नाही. भाजप नेते संघाचा अजेंडा राबवतात म्हणून बहुजन महापुरूषांना डावलतात. यांना बहुजनांचा इतिहास मान्य नाही. तो डावलण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न सुरू आहे. मनपाने पुतळा लवकर बसवावा अन्यथा संभाजी ब्रिगेड यापुढे शिवनिती’ने आंदोलन होईल.छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने असलेल्या उद्यानात शंभूराजेंची नाटकांमधून बदनामी करणारा राम ग. गडकरीचा पुतळा असण्याचे कारण म्हणजे… इतिहासाचा विपर्यास आहे. नाट्यकर्मी अथवा कलाकारांना ते आदर्श असतील तर त्यांनी गडकरींचा पुतळा ‘बालगंधर्व अथवा अन्य ठिकाणी’ सन्मानाने बसवावा… मात्र संभाजी उद्यानात नको आहे. पुतळा तयार असून बसवला जात नाही. अंतर्गत राजकारणामुळेच पुतळा बसवला जात नाही. असे संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी म्हटले आहे .

 

पुणे तिथे लाईट उणे ..बत्ती गुल -महापारेषण कंपनीच्या १३२ कि व्हो भूमिगत वाहिनी नादुरस्त

0

पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून प्रयत्न
पुणे-महापारेषण कंपनीच्या १३२ कि व्हो. जी.आय.एस. रास्तापेठ उपकेंद्राला वीजपुरवठा करणा-या भूमिगत
वाहिनीत आज सकाळी ११.१० वाजता तांत्रिक बिघाड झाल्याने पुणे शहरातील जवळपास दिड लाख
ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. या तांत्रिक बिघाडाचा फटका महावितरणच्या ६ उपकेंद्रांना बसला. मात्र
पर्यायी व्यवस्थेच्या सहाय्याने दुपारपर्यंत ब-याच भागाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश
आले.
प्राप्त माहितीनुसार महापारेषण कंपनीच्या १३२ कि व्हो. जी.आय.एस. रास्तापेठ उपकेंद्राला वीजपुरवठा
करणारी वाहिनी नादुरस्त झाल्याने या उपकेंद्राचा वीजपुरवठा ठप्प झाला. त्यामुळे पुणे शहरातील रास्तापेठ,
कसबा पेठ, आदि पेठासह सर्व पेठांचा मध्यवर्ती परिसर तसेच लुल्लानगर, कोंढवा, गुलटेकडी, कॅम्प, स्वारगेट,
मंडई, लक्ष्मी रोड, सिंहगड रोड, मार्केट यार्ड, ससून इस्पितळ परिसर या भागाचा खंडित झालेला वीजपुरवठा
पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्याचे महावितरणकडून युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले. दुपारी दीड वाजेपर्यंत
जवळपास ९० टक्के ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. उर्वरित ग्राहकांचा वीज पुरवठा
संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरळीत करण्यात आला.
दरम्यान १३२ कि व्हो वाहिनीच्या दुरुस्तीसाठी महापारेषणकडून प्रयत्न सुरु झाले तरी या कामास ४ दिवसाचा
कालावधी लागणार आहे, असे महापारेषणकडून सांगण्यात आले आहे. या कालावधीत १३२ कि व्हो रास्तापेठ
जी.आय.एस. उपकेंद्र बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्थेतून विजेचे भार व्यवस्थापन करावे लागणार
आहे. वेळेवर उद्भवणा-या त्रांत्रिक अडचणीमुळे काही भागात नाइलाजाने तात्पुरते भारनियमन करावे लागेल.
सुमारे दीड लाख ग्राहकांना होणारा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणला तारेवरची कसरत करावी
लागणार आहे. तेंव्हा या परिस्थितीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात
येत आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांचा राजीनामा

0

पुणे: राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. त्या लवकरच भाजप प्रवेश करणार आहेत. ..

.

सचिन अहिर यांच्यानंतर मुंबईत राष्ट्रवादीला आणखी खिंडार पडल्याचे दिसते. राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले प्रसाद यांच्या मध्यस्थीतून मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ भाजपात प्रवेश करणार आहेत. सोबतच माजी मंत्री मधुकर पिचड यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचडही भाजपात डेरेदाखल होणार आहे. अकोल्यातील अनेक पिचड समर्थकांनी राष्ट्रवादीतील पदाचा राजीनामा देण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसचे मुंबईतील वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर हे सुद्धा ३० जुलै भाजपात प्रवेश करतील.

काँग्रेसमधील तीन विद्यमान आमदार भाजपात प्रवेश करत आहेत. साता-यातील माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, सावनेरचे आमदार सुनील केदार आणि गोंदियातील आमदार गोपाळदास अग्रवाल हे सुद्धा ३० जुलै रोजी भाजपवासी होणार असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

आघाडीतील अनेक नेते भाजपा जात असून, येत्या ३० जुलैला त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. १ ऑगस्टपासून मुख्यमंत्री यांच्या महाजनादेश यात्रेला प्रारंभ होत आहे. त्याआधीच आघाडीतील अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश उकरणार असल्याचे कळते.

 

मुंबईत मुसळधार पाऊस

0

मुंबई- शहर आणि उपगनर तसेच ठाण्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत संततधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवेत पाणी भरल्याने हा सबवे वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. भांडुपमध्ये एलबीएस मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्याने पाणी भरले आहे.

हिंदमाता, माटुंगा किंग्ज सर्कल या भागातही पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने मुंबई पालिका आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

मुंबईत विविध भागांत पाणी भरल्याने रस्तेवाहतूक मंदावली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू असून मध्य आणि हार्बर मार्गावर रखडपट्टी सुरू आहे. मध्य रेल्वेच्या गाड्या १५ मिनिटं उशिराने धावत असून हार्बर मार्गावरही तशीच स्थिती आहे.

मुंबईत रात्रभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी नागरिकांसाठी विशेष आवाहन केले आहे. ज्या भागात पाणी भरले आहे तिकडे जाणे टाळा तसेच समुद्रापासूनही दूर राहा. स्वत:ची काळजी घ्या. काही समस्या उद्भवल्यास १०० नंबरवर कॉल करा किंवा ट्विट करा, असे पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.

दक्षिण मुंबईतील सी. पी. टँक भागात म्हाडाच्या ७ मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील भिंतीचा भाग कोसळल्याची माहिती देण्यात आली असून खबरदारी म्हणून ही पूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हांमध्ये काही भागांत मुसळधार तर पालघर जिल्ह्याच्या काही भागांत अतिवृष्टी होऊ शकते, असे हवामान विभागाकडून पुढे नमूद करण्यात आले आहे. मुंबई आणि उपनगरांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करून प्रशासनाला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

संततधार पावसामुळे विमानतळाजवळील क्रांतीनगर वस्तीत पाणी शिरले आहे. सध्या तिथे गुडघाभर पाणी आहे. पाऊस न थांबल्यास मिठी नदीचे पाणी आणखी वाढण्याची भीती असून नदीकाठच्या वस्तीतील अनेक कुटुंबानी घरे रिकामी करून शाळेत आसरा घेतला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारं मोडकसागर धरणही भरून वाहू लागलं आहे. हे धरण आज सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी वाहू लागलं, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली. गेल्यावर्षी हे धरण १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी भरून वाहू लागलं होतं.
मोडकसागर धरण ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात वैतरणा नदीवर असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी हे एक मुख्य धरण आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणक्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून काल आधी तानसा आणि आज मोडक सागर धरणही वाहू लागलं आहे. मुंबईकरांसाठी ही सुखद बातमी आहे.

मुंबईला अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, भातसा, विहार आणि तुलसी या सात धरणांमधून पाणीपुरवठा होतो. यापैकी मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत असलेलं तुलसी हे धरण सर्वात आधी भरून वाहू लागलं होतं. १२ जुलै रोजी हे धरण भरलं. त्यानंतर काल दुपारी २.५० वाजता तानसा धरण भरून वाहू लागलं होतं. त्याचवेळी पालिका अधिकाऱ्यांनी मोडकसागरही लवकरच भरेल, अशी शक्यता व्यक्त केली होती. काल मोडकसागर ८४.०३ टक्के भरलं होतं. संततधार पावसामुळे यात वाढ होऊन हे धरण आज पूर्ण भरलं.

बदलापूर स्टेशनमध्ये रूळ पाण्याखाली गेले आहेत. पावसाची संततधार सुरू असल्याने पाणी वाढत चालले असून स्वीमिंग पूलसारखी स्थिती बदलापूर स्टेशनात दिसत आहे.

कल्याण-कर्जत मार्गावरील रेल्वेवाहतूक ठप्प झाली आहे. अनेक गाड्या कल्याणजवळ अडकून पडल्या असून मुंबईतून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची कोंडी झाली आहे. कल्याण स्टेशनवर सध्या प्रवाशांची मोठी गर्दी आहे.

शहिदांचा त्याग, समर्पण वाया जाऊ न देण्याचा प्रण करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

कारगिल विजय दिनानिमित्त शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून मुख्यमंत्री फडणवीस यांची शहीदांना मानवंदना

मुंबई : कारगिल विजय दिनानिमित्त तिन्ही सैन्य दलांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना अभिवादन केले तसेच मानवंदना दिली.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संदेश वहीत भावना नोंदविल्या. ते म्हणतात, “कारगिल विजयदिन हा आपल्यासाठी अभिमानाचा आणि आपल्या वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्याचा क्षण आहे. या शहीदांनी आपल्या भविष्यासाठी त्यांचा आज म्हणजे वर्तमान त्यागले आहे, ही भावना सदैव जागृत ठेवावी लागेल. शहीदांचा त्याग आणि समर्पण वाया जाऊ न देण्याचा प्रण करावा लागेल. त्यासाठी आपल्याला, देशाला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी प्रयत्न करू या.”

भारतीय लष्कर, वायूसेना आणि नौसेना यांच्या वतीने कुलाबा लष्करी तळाच्या प्रांगणात हा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. तिन्ही दलांच्या सशस्त्र तुकड्यांनी शहीद स्मारकास मानवंदना दिली.

यावेळी लेफ्टनंट जनरल एस.के.प्राशर,व्हाईस ॲडमिरल अजितकुमार पी. यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

००००