Home Blog Page 2419

एकनाथ खडसेंचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

0

भाजपचे जेष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी गेल्या चाळीस वर्षांपासून भाजपसाठी कार्य केले. मात्र राजकारणात झालेल्या अन्यायामुळे ते भाजपला रामराम ठोकत आता हातावर घड्याळ बांधले आहे.

अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती. या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. एकनाथ खडसे यांनी मुलगी रोहिणी खडसेंसह राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी एकनाथ खडसे यांच्यासह मुलगी रोहिणी खडसे आणि तब्बल 68 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला.

‘वर्दीतील स्त्रीशक्ती’ : पोलीस कॉन्स्टेबल रेखा काळे

0

मुंबई, दि. 23 : कोरोनाच्या लढ्यात आमच्या पोलीस दलातील स्त्रीशक्तीने कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केले आहे. त्या स्त्री शक्तीचा सन्मान व गौरव करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न..

भक्ती-शक्ती व कृषी संस्कृतीचे प्रतीक असणारे नवरात्रीचे मंगल पर्व सुरु असताना महाराष्ट्र पोलीस दलातील स्त्रीशक्तीच्या कार्याचा यथोचित गौरव करणे मला गरजेचे वाटते.

महाराष्ट्र पोलीस दलातील असामान्य कार्य करणाऱ्या स्त्री शक्तीची ओळख करुन देत असताना मला मनस्वी आनंद होत आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

रेखा काळे

मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल रेखा काळे या प्रसूती रजेवर आपल्या गावी बेलवंडी, श्रीगोंदा येथे गेल्या होत्या. तिथे त्यांना प्राथमिक शाळेमध्ये क्वारंटाईन व्हावे लागले. काळे यांनी पतीच्या मदतीने क्वारंटाईन असलेल्या शाळेची साफसफाई केली आणि झाडांना पाणी घालून शाळेचा परिसर हिरवागार केला. हिरवा रंग हा निसर्गाशी, भूमीशी असलेले नाते दर्शवितो. काळे यांनी आपल्या या कार्यातून समृद्धीचा नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून काळे यांच्या अभिजात कार्याचा मला अभिमान आहे.

महाराष्ट्र पोलीस दलामध्ये स्त्रीशक्ती अनेक प्रकारे समाजाप्रती आपली बांधिलकी जपत आहेत, असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढले.

घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षावाले यांच्यासाठी राज्य सरकारने काय दिले ? (व्हिडीओ)

0

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटलांचा सवाल

पुणे- कोरोनाच्या संकट काळात ६ महिन्याहून अधिक काल ज्यांचे व्यवसाय बंद राहिले, नौकऱ्या गेल्या हातावर पोट असणाऱ्या अशा गोरगरीबांसाठी राज्य सरकारने कोणते पैकेज जाहीर केले ? कोणती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचविली ? असा सवाल आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे केला. निव्वळ केंद्राकडे बोट दाखविण्याचा उद्योग या सरकारने केला असाही आरोप त्यांनी येथे केला . भाजपचे नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी वेडेपाटील यांच्या प्रभागातील ८०० रिक्षाचालकांना व्यवसाय करताना दक्षता म्हणून प्रावासी आणि रिक्षाचालक यांच्या दरम्यान राहील असा संरक्षक प्लास्टिक च्या पडद्या चे आणि मास्क चे मोफत वाटप केले . याचवेळी ज्या महिला कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी योगदान दिले अशा १४ महिला कार्यकर्त्यांचा आ. पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अल्पना वर्पे, श्रद्धा प्रभुणे, किरण दगडे पा. आणि भाजपचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आ. पाटील पुढे म्हणाले ,’ लोकांना चरितार्थासाठी ,व्यवसायासाठी उपयुक्त ठरतील असे कार्यक्रम घ्यावेत अशा सूचना आपण भाजपच्या आमच्या नगरसेवकांना केल्या आहेत .त्या दृष्टीने वेडेपाटील यांनी सुरु ठेवलेली वाटचाल निश्चित कोतुकास्पद आहे. पण एखादी व्यक्ती, संस्था, संघटना यांच्याकडून होणार्या मदतीला मर्यादा येतात. सरकारने नाभिक समाजाचे असतील ,रिक्षाचालक असतील, किंवा मोलमजुरी करणाऱ्या महिला असतील अशा हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांचे या ६ महिन्यात बुडालेले रोजगार पाहता त्यांना स्वतः हून पुढे येऊन मदतीचा हाथ द्यायला हवा होता . तो काही दिल्याचे दिसत नाही. वेडेपाटील यावेळी म्हणाले याच पुण्यात मी अडीच वर्षे रिक्षा चालविली . रिक्षाचालकांचे प्रश्न आणि समस्या मी जाणून आहे . असंख्य प्रवासी आणि खुद्द रिक्षावाला या दोहोंच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी म्हणून आपण संरक्श पडदा आणि मास्क चे मोफत वाटप करत आहे. यापूर्वीही आपण असंख्य स्तरावर कोरोना काळात गरजूंना मदतीचा हात दिला आज माझ्या या कामाचे कौतुक खुद्द नेत्यांनी केल्याने मला आणखी प्रेरणा मिळाली आहे. 

पुण्यातील प्रसिद्ध व्यवसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता

0

पुणे : ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक व बांधकाम व्यावसायिक गौतम विश्‍वानंद पाषाणकर (वय 65) हे बुधवारी सायंकाळी साडे चार वाजल्यापासून बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पाषाणकर हे कृषी महाविद्यालयाजवळील मोदीबागेमध्ये राहतात. बुधवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या ठिकाणी गेले होते. तेथून ते दुपारी चार वाजता जंगली महाराज रस्त्यावरील त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कार चालकाला पानशेत येथे एका कामानिमित्त पाठविले. त्यानंतर गणेशखिंड रस्त्यावरील एलआयसी कार्यालयापर्यंत गेले.

तेथून ते बेपत्ता झाले.

दरम्यान, कारचालकाने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे चालकाने याबाबत पाषाणकर यांचे पुत्र कपिल पाषाणकर यांना हि माहिती दिली. त्यानंतर पाषाणकर कुटुंबीयांनी त्यांचा तत्काळ शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. त्यामुळे त्यांनी याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश मुलाळे करीत आहेत. गौतम पाषाणकर कोणाला आढळल्यास त्यांनी कपिल पाषाणकर ( मोबाईल क्रमांक 9822474747) किंवा शिवाजीनगर पोलिस ठाणे (020-25536263) यांच्याशी संपर्क साधावा

स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्प महापौरांनी रखडवला – अश्विनी कदम यांचा आरोप (व्हिडीओ )

0

पुणे- मार्च महिन्याच्या कार्यपत्रिकेवरील अनेक खर्चिक विषय मंजूर केले ,पण अजिबात खर्च न करता केवळ शासनाकडे पत्रव्यवहार सुरु करून प्रकल्पाची प्रोसिजर सुरु करणारा प्रस्ताव म्हणजेच स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव पुण्याच्या महापौरांनी जाणून बुजून रखडवून ठेवल्याचा आरोप आज राष्ट्रवादीच्या नगरसेविका आणि स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी नितीन कदम यांनी येथे केला. प्रसंगी भाजपच्या राजकारणाला ओळखून आयुक्तांनी दक्षिण पुण्याचा हा महत्वाचा प्रकल्प मार्गस्थ करण्यासाठी शासनाकडे आपण हून स्वतःच्या अधिकारात पत्र पाठवावे अशी मागणी हि त्यांनी येथे केली .

त्या म्हणाल्या , राष्ट्रवादीचे नेते शरद पवार अजित पवार ,सुप्रिया सुळे हे पूर्वीपासून पुण्यात मेट्रो व्हावी आणि सर्व पुणेकरांना तिचा फायदा व्हावा म्हणून प्रयत्नशील आहेत. पण भाजपने सुरुवातीला मेट्रोचा निधी नागपूरला पळविला , तरीही आमचे नेते आणि आम्ही पाठपुरावा सुरूच ठेवला . आता स्वारगेट ते कात्रज च्या प्रस्तावावर केवळ काही कागदपत्रे ,पत्रव्यवहार शासनाशी करायचा आहे . म्हणजेहा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजितदादा च पुढे नेणार आहेत . सध्या या साठी महापालिकेला कोणताही खर्च करायचा नाही . तरीही महापौरांनी मार्च महिन्याच्या कार्यपत्रीकेवरील हा विषय तिष्ठत ठेवला आहे. वास्तविक पाहता या महिन्यातील कार्य पत्रिकेवरील अनेक खर्चिक विषय मंजूर करण्यात आले . मात्र हा प्रस्ताव जाणून बुजून पुढे ढकलण्यात आला. ऑनलाईन सभेद्वारे देखील हा विषय पुकारून त्यास मान्यता घेता आली असती . पण त्यांनी तसा कोणताही प्रयत्न केला नाही.

या प्रकरणी तातडीने त्यांनी कार्यवाही करावी अन्यथा आयुक्तांनी आपल्या अधिकारात या प्रकरणी स्वत शासनाशी कागदोपत्री संपर्क साधावा म्हणजे प्रकल्प वेळेत पूर्ण होईल .

विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी घेतला जातोय राष्ट्रगीताचा आधार (व्हिडीओ)

0

पुणे-आज झालेल्या महापालिकेच्या मुख्य सभेत केवळ विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी अचानकपणे राष्ट्रगीत लावून सभा संपविण्यात (तहकूब )करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

विरोधकांना बोलूनच द्यायचे नाही. गार्हाणी मांडून द्यायची नाहीत .किंवा काही गोष्टींकडे काना डोळा करायचा या वृत्तीने अचानक राष्ट्रगीत लावण्यात आले . आणि यावेळी खुद्द व्यासपीठावर आणि सभागृहात अनेक जण बोलत होते . काहींचे हातवारे तर काहींचे चालणे सुरु होते . आणि विशेष म्हणजे विरोधकांनी मांडलेल्या दुसऱ्या तहकुबी चे काय ? हा प्रश्न उपस्थित होता . विरोधकांनी तहकुबी तर मांडली होती . ती स्वीकारली कि नाही ? हे देखील न सांगता सभा पहिल्या सूचनेनुसार तहकूब करण्यात आली . जे कि आपणही तहकुबी मांडत आहोत असे सभागृहात त्या अगोदर कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी सांगितले होते.

शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार , विपक्ष्नेत्या दिपाली धुमाळ आणि बागुल यांनी हि दुसरी तहकुबी मांडली होती जिचे वाचन हि त्यांनी सभागृहात केले होते. .

याबाबत पहा शिवसेनेचे सुतार , कॉंग्रेसचे बागुल आणि राष्ट्रवादीच्या धुमाळ यांनी काय म्हटले आहे.

महापालिकेच्या मुख्य सभेत शेवटी आक्रीतच घडतंय (पहा व्हिडीओ )

0

पुणे महापालिका मुख्य सभा २२ ऑक्टोबर २०२०

पुणे पदवीधर मतदार नोंदणीतील त्रुटी दूर करा- आ.चंद्रकांतदादा पाटील

0
  • भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई – पुणे विधानपरिषद पदवीधर मतदार संघातील मतदारांची यादी तयार करण्याच्या ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटी दूर करा, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. या संदर्भात श्री.पाटील यांनी गुरुवारी मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात श्री.पाटील यांनी म्हटले आहे की, पदवीधर मतदारसंघाच्या मतदार ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी दूर न करताच निवडणूक घेण्याची तयारी सुरू आहे.या बाबीकडे राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष यापूर्वीच वेधण्यात आले होते.ऑनलाईन भरलेले अर्ज नाकारले जाणे अशा अनेक तक्रारी मतदारांनी केल्या आहेत.त्याच बरोबर सर्व्हर यंत्रणा काम करत नसल्यानेही या प्रक्रियेत अनेक अडचणी येत असल्याने ऑफलाईन अर्ज भरण्याची परवानगी देण्यात यावी.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती हे श्री.पाटील यांच्या समवेत उपस्थित होते.

दस-याच्या मुहूर्तावर सोनाली खरे करतेय 8 वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक

0

मनोरंजन- अभिनेत्री सोनाली खरे 2014 मध्ये ‘बे दुणे दहा’ ह्या टिव्ही मालिकेमध्ये दिसली होती. त्यानंतर तिने ‘7, रोशन व्हिला’, ‘हृदयांतर’, सिनेमांमध्ये काम केलं. सोनाली यंदा दस-याच्या मुहूर्तावर टेलिव्हिजन विश्वात परततेय. कलर्स मराठीवरच्या ‘आज काय स्पेशल’ ह्या कुकिंगविषयक शोमध्ये सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत ती दिसणार आहे. 


आपल्या कमबॅकविषयी सोनाली खरे म्हणते, “मला आनंद आहे की, मी पून्हा एकदा माझ्या आवडत्या टीव्ही क्षेत्रात परततेय. स्वयंपाक करणं, कोणत्याही गृहिणीला नवीन नाही. आणि मला पहिल्यापासूनच बेकिंगची आवड होती. पण लॉकडाउनमध्ये मी भरपूर नव्या रेसिपी शिकले. त्यामूळे जणू ह्या शोची रंगीत तालिम झाली होती. त्यात मला माझ्या काही पूर्वीच्या सहकलाकारांसोबतही ह्या शोमूळे स्क्रिन शेअर करायला मिळणार आहे, ह्याचा एक वेगळाच आनंद आहे.”


सोनालीने ह्याअगोदर ‘कॉलेज माझी जान’, ‘गमंतगढ’, ‘आम्ही सारे खवैय्ये’, अशा टेलिव्हिजन शोजचे सुत्रसंचालन केले होते.आता  सोनालीच्या चाहत्यांना दस-यापासून तिला टेलिव्हिजनवर पून्हा पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.  
ह्या शोची खासियत सांगताना सोनाली म्हणते, “इतर कुकिंगविषयीच्या शोमध्ये फक्त येणारे पाहुणेच रेसिपी दाखवतात. पण इथे मात्र मीही काही पदार्थ बनवणार आहे. योगाभ्यांसामूळे शिकलेल्या काही टिप्स आणि काही किचनटिप्सही मी शेअर करणार आहे. आलेल्या पाहुण्यांसोबत माझ्या कुकिंगविषयीच्या गप्पा रंगणार आहेत. काही फुडरिलेटेड खेळही असतील. जे प्रेक्षकांना नक्कीच मनोरंजक वाटतील. असं मला वाटतं.”

  
‘न्यू नॉर्मल’मध्ये शुटिंग करण्याच्या अनुभवाबद्दल सोनाली म्हणते, “सतत मास्क घालण्याची सवय नसते. त्यामूळे पूर्णवेळ मास्क घालून शूटिंगस्थळी राहणं, हे थोडं दमछाक करवणारं असलं, तरीही आपल्या सुरक्षेसाठी महत्वाचं आहे, असं मला वाटतं. स्वादिष्ट जेवण बनवण्याची पहिली पायरी ही स्वच्छता (hygine) आहे. त्यामूळे सेटवरचं वातावरणं तसंच असतं, ह्याचा मला आनंद आहे.”

गोदरेज अप्लायन्सेचे फ्रीज आता 6 इन 1 कनव्हर्टिबल फ्रीझर तंत्रज्ञानासह ग्राहकांसाठी करणार जास्त काम

0
  • फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर श्रेणीतील दोन फ्रीजमध्ये उपलब्ध – गोदरेज इयॉन व्हाइब आणि गोदरेज इयॉन व्हॅलॉर, 6 इन 1 कन्व्हर्टिबल तंत्रज्ञान देते सर्वाधिक लवचिकता
  •  हे तंत्रज्ञान देते या विभागातील सर्वात कमी तापमान, दीर्घकाळ जतन करण्यासाठी आदर्श -25 अंश

राष्ट्रीय – थिंग्ज मेड थॉटफुली’ या आपल्या तत्वज्ञानाशी सुसंगत राहात गोदरेज अप्लायन्सेस या आघाडीच्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादक कंपनीने ग्राहकांसाठी आणखी एक स्मार्ट तंत्रज्ञान आणले असून त्याचे नाव कन्व्हर्टीबल फ्रीझर विथ 6 इन 1 फ्रीझर मोड्स असे आहे. यात फ्रीझरपासून डीप फ्रीझरपर्यंत आणि कोल्ड स्टोअरेज मोडही देण्यात आला आहे.

महामारीचा काळ आणि संसर्गाची भीती लक्षात घेता लोकांनी फ्रीजमध्ये फळे व भाज्या तसेच शिजलेले अन्न, पुढच्या जेवणआची जेवणाची तयारी, फ्रोझन फुड यांचा नेहमीपेक्षा जास्त साठा करायला सुरुवात केली आहे. ग्राहक एकमेकांकडून शिकलेल्या नवनव्या पद्धतींचा अवलंब करत आहेत – जास्तीत जास्त जेवण तयार ठेवणे आणि दीर्घ काळासाठी साठवून ठेवण्याच्या युक्तींचा त्यात समावेश आहे. मसाले आणि भाज्या चिरून फ्रीझमध्ये साठवल्या जात आहेत, तर बाजारातून विकत घेतल्या जाणाऱ्या आइस्क्रीमची जागा घरच्या कुल्फी, आइस्क्रीमने घेतली आहे. फ्रीझरमध्ये वेगवेगळ्या वस्तू साठवल्या जात आहेत आणि दीर्घ काळासाठी ठेवल्या जात आहेत. पूर्वी फ्रीझरचा तितकासा वापर व्हायचा नाही आणि आता फ्रीझरच, काय पण मुख्य फ्रीजही भरलेला असायचा.

अशा परिस्थितीत 6 इन 1 कनव्हर्टीबल फ्रीझर तंत्रज्ञान गरजेचे झाले आहे. यामध्ये गरजेनुसार बनवलेल्या सहा कुलिंग पर्यायांमधून निवड करता येते.

·         ऑटो मोड – डिफॉल्ट सेटिंग जी कुशलतेने फ्रीझरचे तापमान नियंत्रित करते.

·         लो लोड मोड – फ्रीझर पूर्ण भरलेला असतानाही कमी उर्जेचा वापर

·         आइस्क्रीम मोड – आइस्क्रीमसाठी आदर्श तापमान

·         हाय लोड मोड – मुख्य विभाग भरलेला असतानाही हाय लोड मोड फ्रीझरचे तापमान योग्य प्रमाणात राखते

·         डीप फ्रीझर मोड – फ्रोझन डेझर्ट्स, फ्रोझन मटार यांच्यासाठी आदर्श म्हणजेच -18 अंशाइतके तापमान राखत फ्रोझन पदार्थ जतन करते.

·         कोल्ड स्टोअरेज मोड – -25 अंशाइतके तापमान ठेवून फ्रोझन अन्न चांगल्या प्रकारे जतन करते. मांस ठेवण्यासाठी सर्वात योग्य

गोदरेज इयॉन व्हाइब आणि गोदरेज इन व्हॅलोर अशा दोन फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर श्रेणीमध्ये ही सोय उपलब्ध असून त्याला इंटेलिजंट इनव्हर्टर तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. रेफ्रिजरेटर व्हेरिएबल कॉम्प्रेसर स्पीडसह कुलिंग अडजस्ट करते आणि त्यामुळे चांगली कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि आवाजाशिवाय कामकाज शक्य होते. पफ शिकनेस 2.75 इंची असून ही रेफ्रिजरेटर मॉडेल्स सर्वोत्तम कुलिंग राखतात व पर्यायाने पदार्थ दीर्घकाळ ताजे राखतात. यामध्ये भाज्यांसाठी 27 लीटर्सचे मोठे ट्रे देण्यात आले आहेत, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या सर्व भाज्या ठेवणे शक्य होते. सध्याच्या लॉकडाउनच्या काळात ग्राहकांच्या अन्न साठवण्याच्या आणि जतन करण्याच्या सवयी बदलत आहेत आणि नवे गोदरेज इयॉन व्हाइब आणि इन व्हॅलोर त्यांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी बनवण्यात आल्या आहेत. 261 लीटर्स आणि 290 लीटर्स क्षमतेमधअये उपलब्ध असलेल्या या मॉडेल्सची किंमत रू. 23,500 (+ कर) पासून सुरू होते.

या लाँचविषयी गोदरेज अप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख आणि ईव्हीपी श्री. कमल नंदी म्हणाले, ‘या महामारीमुळए ग्राहकांच्या मानसिकतेवर तसेच निर्णयांमध्ये बदल होत आहेत. साठवणुकीची जागा, लवचिकता आणि सोयीस्करपणा अशा वैशिष्ट्यांची ग्राहकाला आज जास्त गरज आहे, कारण त्यामुळे वारंवार बाहेर जाणे टाळता येते तसेच त्यांना आपल्या कामाचे जास्त चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येते. गोदरेजमध्ये आम्ही ग्राहकांच्या आयुष्यात बदल घडवून आणणारी अर्थपूर्ण उत्पादने तयार करण्यावर भर देतो व त्यासाठी त्यांच्या तत्कालीन गरजा जाणून घेण्याकडे आमचा कल असतो. आमचे नवे गोदरेज 6 इन 1 कन्व्हर्टीबल फ्रीझर हा ग्राहकांच्या सध्याच्या समस्या सोडवण्याचा असाच एक प्रयत्न आहे. ग्राहक आजच्या अवघड काळात योग्य मूल्याच्या शोधात आहे आणि आम्हाला खात्री आहे, की हे अभिनव तंत्रज्ञान त्यांना दैनंदिन जीवनात चांगली मदत करेल.’

गोदरेज अप्लायन्सेसच्या रेफ्रिजरेटर विभागाचे उत्पादन समूह प्रमुख श्री. अनुप भार्गवा म्हणाले, आम्ही नुकतेच लाँच केलेली कन्व्हर्टीबल फ्रीझर टेक्नॉलॉजी विथ 6 इन 1 फ्रीझर मोड्स ग्राहकांना त्यांच्या रेफ्रीजरेटरकडून जास्तीत जास्त सोय देणारे आहे. स्टायलिश आणि स्लीक असे हे फ्रीज ग्राहकांच्या साठवणुकीसाठी भरपूर जागा, दीर्घकाळ जतनाच्या गरजा पूर्ण करणारे आहेत. आम्हाला खात्री आहे, की ही नवी श्रेणी 250 कोटी रुपयांची उत्पन्ननिर्मिती करेल आणि रेफ्रिजरेटर विभागातील आमचे स्थान अधिक बळकट करेल.

होंडा टुव्हीलर्सने निर्यात व्यवसायात गाठली नवी उंची एसपी 125 सीकेडी किट्ससह युरोपियन बाजारपेठेत विस्तार

0

नवी दिल्ली, – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने (एचएमएसआय) एसपी125 या आपल्या प्रगत, अत्याधुनिक आणि स्टायलिश मोटरसायकलीची युरोपमधे निर्यात करणार असल्याचे जाहीर केले आहे. ही मोटरसायकल सीकेडी मार्गाद्वारे निर्यात केली जाणार आहे.

या नव्या कामगिरीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘बीएसआयव्हीकडून बीएसव्हीआयच्या दिशेने जाणे ही भारतीय वाहन उद्योगासाठी आव्हानात्मक बाब होती. होंडा टुव्हीलर्स इंडियाने या आव्हानाचे संधीत रुपांतर करत प्रगत देशांना निर्यात करण्याचे ठरवले आणि 125 सीसी मोटरसायकल एसपी 125 च्या सीकेडी किट्सची निर्यात सुरू केली. हे आमच्या उत्पादनांचा चांगला दर्जा आणि तंत्रज्ञानाचे तसेच जागतिक विस्तार करण्याच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. आम्ही भविष्यात अशा प्रकारच्या विविध नव्या बाजारपेठांमधे विस्तार करण्यासाठी उत्सुक आहोत.’

प्रगत, 125 सीसी मोटरसायकल – एसपी125 चे 2000 सीकेडी किट्स युरोपला घेऊन जाणारी कन्साइनमेंट ऑगस्ट 2020 मधे पाठवण्यात आली आहे.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे एसपी125 ही होंडाने गेल्या वर्षी (नोव्हेंबर 2019) भारतात लाँच केलेली पहिली बीएसव्हीआय मोटरसायकल आहे. 19 नवे पेटंट अर्ज असलेल्या या नव्याकोऱ्या एसपी 125 बीएसव्हाय एचईटी इंजिन आणि ईएसपी तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे, जे 16 टक्के जास्त मायलेज देते तसेच या क्षेत्रात पहिल्यांदाच येत असलेलल्या 9 प्रकारच्या तंत्रज्ञानांची आणि वैशिष्ट्ये (पूर्णपणे डिजिटल मीटर, डिस्ट्न्स टु एम्प्टी, सरासरी इंधनक्षमता, रियल टाइम इंधनक्षमता, एलईडी डीसी हेडलॅम्प, इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच, इंटिग्रेटेड हेडलॅम्प बीम/पासिंग स्विच, इको इंडिकेटर, गियर पोझिशन इंडिकेटर) या गाडीत अनुभवता येतील.

एसपी125 बीएसव्हीआयचे सध्या होंडा टुव्हीलर्स, तापुकारा कारखाना, राजस्थान येथे उत्पादन केले जात आहे.

जगभरात निर्यात

होंडा टुव्हीलर्स इंडियाने अक्टिव्हा या मॉडेलसह 2001 मधे निर्यात सुरू केली.

सध्या होंडा आशिया, मध्यपूर्व आणि लॅटिन अमेरिका या आघाडीच्या निर्यात बाजारपेठांसह 25 वैविध्यपूर्ण बाजारपेठांतील 25 लाख ग्राहकांना 18 दुचाकी मॉडेल्ससह सेवा देत आहे.

महापालिका आयुक्तांचा कालावधी पाच वर्षांचा असावा :- आबा बागुल यांची पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0

पुणे : महापालिकांच्या विकासास चालना मिळावी आणि धोरणात सातत्य रहावे याकरिता आयुक्तपदाचा कालावधी पाच वर्षांसाठी असावा. अशा मागणीचे पत्र महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

महापालिका आयुक्त पदावर शासनाकडून आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते. त्यांचा निर्धारित कालावधी तीन वर्षांचा असतो. तीन वर्षातील वर्ष-दीड वर्षाचा कालावधी शहराच्या समस्या समजून घेण्यात जातो. त्यानंतर नियोजनपूर्वक विकासकामाला लागेपर्यंत तीन वर्षांचा कालावधी संपून जातो. नवीन आलेले आयुक्त यांचाही वेळ समस्या समजून घेण्यात जातो, कधी-कधी कामांचा प्राधान्यक्रम बदलला जातो आणि त्यातून शहर विकासाचा बट्ट्याबोळ होतो. मोठ्या शहरातील विकास प्रकल्प राबविण्यासाठी आयुक्तांना किमान पाच वर्षांचा कालावधी देणे आवश्यक आहे. मोठा कालावधी मिळाल्यास आपल्या कारकिर्दीत कामाचा निकाल दाखवून द्यायचा आहे. ही भावना त्यांच्यात निर्माण होईल आणि शहर विकासासाठी ते पोषक ठरेल असे आबा बागुल यांनी पत्रात म्हटले आहे.

तसेच या सूचनेचा गांभीर्याने विचार व्हावा, व सर्व पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करावी अशी विनंती बागुल यांनी प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांना केली आहे.

महावितरणच्या थेट संपर्काला प्रतिसाद देत वीजग्राहकांकडून 100 कोटींचा भरणा

0

पुणे : वीजबिलांचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांशी मोबाईलद्वारे थेट प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना चालू व थकीत देयके भरण्याची विनंती करण्यात येत आहे. त्यास प्रतिसाद देत पुणे परिमंडलातील 68 हजार वीजग्राहकांनी आतापर्यंत 99 कोटी 61 लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.

पुणे परिमंडलात लॉकडाऊनच्या मार्च, एप्रिल व मे तसेच जून महिन्यामध्ये वीजबिलांचा भरणा 50 टक्क्यांपर्यंत खालावला होता. त्यानंतर जुलैपासून वीजबिलांचा भरणा वाढला असला तरी सद्यस्थितीत पुणे परिमंडलामधील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 11 लाख 65 हजार ग्राहकांकडे 794 कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. थकबाकीच्या अशा बिकट स्थितीत ज्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे पाच हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे त्यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून वीजबिलांच्या थकीत रकमेचा भरणा करण्याची विनंती महावितरणकडून करण्यात येत आहे. यासोबतच वीजबिलांबाबत काही तक्रारी किंवा शंका असल्यास त्याचेही निवारण करण्यात येत आहे.

      थेट संपर्क साधून वीजबिलांचा भरणा करणाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंत पुणे परिमंडलातील 68 हजार 300 थकबाकीदारांनी 99 कोटी 61 लाख रुपयांचा भरणा केला आहे. यामध्ये पुणे शहरातील 26 हजार 725 ग्राहकांनी 43 कोटी 60 लाख, पिंपरी व चिंचवड शहरातील 16 हजार 900 ग्राहकांनी 23 कोटी 90 लाख आणि आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी व वेल्हे तालुक्यातील 24 हजार 700 ग्राहकांनी 32 कोटी 10 लाख रुपयांचा भरणा केला आहे.

वीजग्राहकांना ‘अनलॉक’नंतर मीटर रिडींगप्रमाणे वीजबिल देण्यात येत आहे. यापूर्वी ‘लॉकडाऊन’मधील वीजबिलांबाबत निर्माण झालेला संभ्रम महावितरणकडून दूर करण्यात आला आहे. वीजक्षेत्रातील तज्ञांनी सुद्धा रिडींगप्रमाणे तीन ते चार महिन्यांचे एकत्रित दिलेले वीजबिल अचूक असल्याचा निर्वाळा दिला आहे. लॉकडाऊनमधील वीजबिलांबाबत शंका निरसन करण्यासाठी पुणे परिमंडल अंतर्गत गेल्या जूनपासून आतापर्यंत 97 वेबिनार व 115 मेळावे घेण्यात आले तर 286 ठिकाणी ग्राहक मदत कक्ष स्थापन करण्यात आले. यामध्ये सुमारे 4 लाख 2 हजार वीजग्राहकांचे शंका समाधान करण्यात आले आहे. मीटर रिडींगप्रमाणे देण्यात आलेले वीजबिल अचूक असल्याचे ग्राहकांनी देखील मान्य केले आहे. तरीही वीजबिल नियमित भरण्याचे प्रमाण वाढलेले नसल्याने थकबाकीमध्ये मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमिवर घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील वीजग्राहकांशी थेट मोबाईलद्वारे प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना थकबाकी भरण्याची विनंती करण्यात येत आहे.

गेल्या मार्च महिन्यापासून कोरोना, ‘निसर्ग’ चक्रीवादळ, अतिवृष्टी, पूरपरिस्थिती अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पुणे परिमंडलात अहोरात्र ग्राहकसेवा देण्यात येत आहे. मात्र वीजबिलांचा व थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरण सध्या गंभीर आर्थिक संकटात आहे. अशा बिकट परिस्थितीत वीजग्राहकांनी सहकार्यकरून थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. पुणे परिमंडलातील सर्व वीजबिल भरणा केंद्र सुरु आहेत. यासोबतच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईट किंवा मोबाईल अॅपद्वारे तसेच इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा घरबसल्या करण्याची सोय उपलब्ध आहे.

नियंत्रित जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई

0

मुंबई, दि. 22 : मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात दक्षता पथकाकडून नियंत्रित जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा मुंबईचे संचालक कैलास पगारे यांनी दिली.

मुंबई – ठाणे शिधावाटप क्षेत्रातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना (NFSA), प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आत्मनिर्भर भारत योजना तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या गैरलाभार्थी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य तसेच गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेलचा पुरवठा व वितरण यामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याबाबत दक्षता घेण्याकरिता प्रधान कार्यालय तसेच परिमंडळ कार्यालय व परिमंडळ कार्यालय अधिनस्त शिधावाटप कार्यालयांतर्गत एकूण 44 दक्षता पथके गठित करण्यात आलेली आहेत. या दक्षता पथकामार्फत लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.

अंधेरी विभागात नियंत्रित अन्नधान्याच्या अवैधरित्या वाहतूक प्रकरणी ट्रक क्रमांक एमएच 04 जीआर 4696 मधून गहू 158.48 क्विंटल, तांदूळ 26.25 क्विंटल जप्त करण्यात आला असून एमआय डीसी अंधेरी पालीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्र.627/2020, गु.प्र.शा.गु.र.क्र.132/2020 दिनांक 10.09.2020 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हा नोंद प्रकरणी एकूण रु.17,22,388.87/- इतके किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

दहिसर विभागात विनापरवाना अनधिकृतरित्या अन्नधान्याची साठवणूक व वाहतूक प्रकरणी ट्रक क्रमांक एमएच 10 सीआर 4197, तांदूळ 163.50 क्विंटल व गहू 424.50 क्विंटल व इतर वस्तू जप्त करण्यात आला असून एम.एच.बी. पोलीस ठाणे, बोरीवली येथे गु.नो.क्र 17/2020 दिनांक 23.09.2020 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हा नोंद प्रकरणी एकूण रुपये 35,80,723/- इतके किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

भायखळा विभागात घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून स्टीलच्या पाईपद्वारे अनधिकृतपणे दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याप्रकरणी घरगुती वापराचे एकूण 60 सिलेंडर व टेम्पो क्रमांक एमएच 04 एफपी 7182 जप्त करण्यात आला असून भायखळा पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद क्र 379/2020, दिनांक 25.09.2020 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हा नोंद प्रकरणी एकूण रुपये 1,46,670/- इतके किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

कांजूरमार्ग विभागात नियंत्रित शिधाजिन्नसांचा साठा विनापरवाना साठवणूक व वाहतूक प्रकरणी बोलेरो पिकअप क्र. एमएच 06 बीडब्ल्यु 0523 व ट्रक क्र. एमएच 03 व्हीसी 1233, गहू 103.50 क्विंटल जप्त करण्यात आला असून कांजूरमार्ग पोलीस ठाणे, मुंबई येथे वि.स्था.गु.नो.क्र 46/2020 दिनांक      17.10.2020 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हा नोंद प्रकरणी एकूण रूपये 16,79,794/- इतके किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

भांडूप विभागातील अधिकृत शिधावाटप दुकान क्रमांक 30 ई 84 दुकानाच्या संपूर्ण तपासणीअंती गहू 34.75 क्विंट्टल  चना डाळ 0.90  क्विंट्टलचा अतिरिक्त साठा तसेच तांदूळ 0.68 क्विंटल कमी आढळून आल्याप्रकरणी कांजूर मार्ग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्रमांक 49/2020 दिनांक 20.10.2020 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हा नोंद प्रकरणी एकूण रूपये 1,02,103/- इतके किंमतीचा अपहार आढळून आलेला आहे.

मनोरंजन क्षेत्राबाबतचे धोरण लवकरच निश्चित करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

0

मुंबई, दि. 22 : राज्यात मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषांतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात घेता मनोरंजन क्षेत्राबाबतचे धोरण सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निश्चित करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या (फिल्मसिटी) संचालक मंडळाची बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासह सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर, चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा वर्मा, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, चित्रनगरीच्या सहव्यवस्थापकीय संचालिका आंचल गोयल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले, आज मनोरंजन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारले आहे. असे असल्याने याबाबतचे धोरण असणे गरजेचे आहे. चित्रपट, मालिका, ओटीटी यांच्यासह रंगमंच,लोककला, माहितीपट, जाहिरातपट यांचा या धोरणात समावेश करण्यात येणार असून दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत या धोरणाचे प्रारुप तयार करण्यात यावे. धोरणाचे प्रारुप सांस्कृतिक कार्य विभागाला सादर केल्यानंतर हे धोरण मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात येईल. मनोरंजन क्षेत्रामुळे अनेकांना रोजगार मिळत असल्याने या क्षेत्रास उद्योग क्षेत्राचा दर्जा मिळण्याबरोबरच लघु आणि मध्यम उद्योगांना मिळणाऱ्या सवलती मिळणे आवश्यक आहे. या क्षेत्रास उद्योग क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठीही सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.

एक खिडकी योजनेचे विस्तारीकरण करण्यात येत असताना यामध्ये केंद्र आणि राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या परवानगी एकाच ठिकाणी देता येतील का याबाबत अभ्यास करण्यात यावा, तसेच महाराष्ट्रातील पर्यटकांनाही माहित नसलेली तरीही वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या पर्यटनस्थळांचाही यामध्ये समावेश करण्यात यावा अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी दिल्या. सध्या मुंबई आणि मुंबई उपनगरात चित्रीकरणाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना राबविण्यात येत असून दुसऱ्या टप्प्यात ही योजना पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा 6 जिल्ह्यात राबविण्यात येणार असून तिसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.

भाड्यामध्ये 25 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात यावी – राज्यमंत्री

कोविड -19 पार्श्वभूमीवर राज्यात 24 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर मिशन बिगीन अगेन अंतर्गत 25 जूननंतर चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात आली. या काळात अनेक चित्रपट आणि मालिका निर्मात्यांनी चित्रनगरी येथील स्टुडिओ चित्रीकरणासाठी आरक्षित केले होते. मात्र लॉकडाऊनमुळे चित्रीकरण होऊ शकले नसल्याने अनेक चित्रपट संघटनांनी आकारण्यात येणाऱ्या भाड्यामध्ये सूट मिळावी अशी मागणी केली होती. या मागणीला अनुसरुनच चित्रनगरीत चित्रीकरण करणाऱ्या निर्मात्यांना 25 टक्क्यांपर्यंत भाड्यामध्ये सवलत किंवा चित्रीकरणासाठी नव्याने तारखा देण्यात येतील.

चित्रनगरीसाठी तांत्रिक तज्ञ आणि कुशल मनुष्यबळ यांची नियुक्ती आणि पॅनेल तयार करणे, सलग चित्रीकरण करणाऱ्या निर्मात्यांना चित्रीकरण दरात सवलत देणे, चित्रनगरी येथे मुख्य सुरक्षा कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक करणे,चित्रनगरीमध्ये उपहारगृह सुरु करणे, वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी इंटर्नशिप सुरु करणे, चित्रनगरीच्या भाडे सवलती पध्दतीत सुधारणा करणे आणि चित्रनगरीचे उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे अशा विविध मुद्यांवर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.