नवी दिल्ली, – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने (एचएमएसआय) एसपी125 या आपल्या प्रगत, अत्याधुनिक आणि स्टायलिश मोटरसायकलीची युरोपमधे निर्यात करणार असल्याचे जाहीर केले आहे. ही मोटरसायकल सीकेडी मार्गाद्वारे निर्यात केली जाणार आहे.
या नव्या कामगिरीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘बीएसआयव्हीकडून बीएसव्हीआयच्या दिशेने जाणे ही भारतीय वाहन उद्योगासाठी आव्हानात्मक बाब होती. होंडा टुव्हीलर्स इंडियाने या आव्हानाचे संधीत रुपांतर करत प्रगत देशांना निर्यात करण्याचे ठरवले आणि 125 सीसी मोटरसायकल एसपी 125 च्या सीकेडी किट्सची निर्यात सुरू केली. हे आमच्या उत्पादनांचा चांगला दर्जा आणि तंत्रज्ञानाचे तसेच जागतिक विस्तार करण्याच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. आम्ही भविष्यात अशा प्रकारच्या विविध नव्या बाजारपेठांमधे विस्तार करण्यासाठी उत्सुक आहोत.’
प्रगत, 125 सीसी मोटरसायकल – एसपी125 चे 2000 सीकेडी किट्स युरोपला घेऊन जाणारी कन्साइनमेंट ऑगस्ट 2020 मधे पाठवण्यात आली आहे.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे एसपी125 ही होंडाने गेल्या वर्षी (नोव्हेंबर 2019) भारतात लाँच केलेली पहिली बीएसव्हीआय मोटरसायकल आहे. 19 नवे पेटंट अर्ज असलेल्या या नव्याकोऱ्या एसपी 125 बीएसव्हाय एचईटी इंजिन आणि ईएसपी तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे, जे 16 टक्के जास्त मायलेज देते तसेच या क्षेत्रात पहिल्यांदाच येत असलेलल्या 9 प्रकारच्या तंत्रज्ञानांची आणि वैशिष्ट्ये (पूर्णपणे डिजिटल मीटर, डिस्ट्न्स टु एम्प्टी, सरासरी इंधनक्षमता, रियल टाइम इंधनक्षमता, एलईडी डीसी हेडलॅम्प, इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच, इंटिग्रेटेड हेडलॅम्प बीम/पासिंग स्विच, इको इंडिकेटर, गियर पोझिशन इंडिकेटर) या गाडीत अनुभवता येतील.
एसपी125 बीएसव्हीआयचे सध्या होंडा टुव्हीलर्स, तापुकारा कारखाना, राजस्थान येथे उत्पादन केले जात आहे.
जगभरात निर्यात
होंडा टुव्हीलर्स इंडियाने अक्टिव्हा या मॉडेलसह 2001 मधे निर्यात सुरू केली.
सध्या होंडा आशिया, मध्यपूर्व आणि लॅटिन अमेरिका या आघाडीच्या निर्यात बाजारपेठांसह 25 वैविध्यपूर्ण बाजारपेठांतील 25 लाख ग्राहकांना 18 दुचाकी मॉडेल्ससह सेवा देत आहे.