Home Blog Page 1574

‘वीरबाईक’ सादर करून ऊडचलो ने इलेक्ट्रिक सायकलींसाठी प्रस्थापित केला एक नवीन मापदंड

·ग्राउंड ब्रेकिंग इलेक्ट्रिक सायकल सादर करत वसुंधरा दिन करणार साजरा. पार केल्या सर्व क्षमता चाचण्या – आयपी रेटेड ६५ आणि ६७, वजनाने हलकी आणि कामगिरीप्रणीत

· आर्मी ऑलिव्ह ग्रीन, नेव्हल व्हाइट, एअर फोर्स ब्लू, कमांडो ब्लॉक आणि इन्फंट्री ग्रे अशा संरक्षण दलांच्या रंग पर्यायांमध्ये उपलब्ध

·नवीन कोरी करकरीत इलेक्ट्रिक सायकल ही सर्वांसाठी एक उत्तम भेट आहे. आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी निस्वार्थ बलिदानाचे प्रतीक असलेल्या तुमच्या संरक्षण सेवेच्या आयडीचे स्टिकरिंग करून वैयक्तिकृत करण्याचा पर्याय

पुणे, २१ एप्रिल २०२३: अग्रगण्य ग्राहक तंत्रज्ञान कंपनी ऊडचलोने ‘वीरबाईक’ नावाची वैशिष्ट्यपूर्ण  इलेक्ट्रिक सायकल सादर केली आहे. सशस्त्र दलांमुळे प्रेरित झालेल्या सर्व भारतीयांसाठी शाश्वत आणि परवडणारे वाहतुकीचे पर्याय सादर करण्यासाठी कंपनीने हे पर्यावरण पूरक वाहन सादर केले आहे. “वीर” हे नाव भौतिकशास्त्रातील ओहमचा नियम V=IR वरून प्रेरित आहे. इलेक्ट्रिकल सर्किटमधील व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स यांच्यातील संबंध यातून सूचित होतो. तसेच आपल्या सैनिकांसारखा जो धाडसी आणि शूर असतो अशा माणसाला ‘वीर’ असे म्हणतात.

ई-बाईक बद्दल बोलताना वीरबाईकचे सह-संस्थापक आणि संशोधन विकास प्रमुख श्री. साहिल उत्तेकर म्हणाले, ‘वीरबाईक’ ही एक उच्च-कार्यक्षमता असलेली इलेक्ट्रिक सायकल असून आरामदायी आणि सुलभ राइड पुरविण्यासाठी डिझाइन केलेली आहे. ही बाईक केवळ पर्यावरण पूरक आहे असे नाही तर कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठीही डिझाइन केलेली आहे. ती आयपी रेटेड ६५ आणि ६७ आहे. टिकाऊ हलक्या वजनाच्या चौकटीसह, इलेक्ट्रिक कट ऑफसह असलेले डिस्क ब्रेक आणि अॅडजस्ट करता येण्याजोग्या सीट आहे. ‘वीरबाईक’ वजनाने देखील हलकी आहे आणि त्यामुळे ती रोजच्या वापरासाठी एक आदर्श पर्याय आहे. माननीय पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या अनुषंगाने या सायकलच्या भारतात सर्व भागांचे उत्पादन भारतात करण्यात आले आहे.

टिकाऊ असण्यासोबतच वीरबाइक खिशालाही परवडणारी आहे. वाहतूकीचा हा परवडणारा पर्याय असून त्याचा कमी देखभाल खर्च हे बजेटचा विचार करून खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी उत्कृष्ट पर्याय आहे. ही ई-बाईक सैनिकाला त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत १५ लाखांपर्यंत बचत करण्यास सक्षम करेल. शिवाय याला इतर कोणत्याही वाहनाप्रमाणे नंबर प्लेटची आवश्यकता नाही. सैनिकांच्या सतत होणाऱ्या बदलांमुळे त्यांना जो आरटीओचा प्रश्न भेडसावत असतो त्याचा त्रासही यामुळे होणार

नाही. पर्यावरणाचे रक्षण करत स्वतःचे वेगळेपण दाखवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी आकर्षक आणि स्टाइलिश डिझाइनसह ही सायकल ही एक आदर्श निवड आहे प्रत्येक ई-बाईक दर वर्षी  २४० किलोग्राम कार्बनडाय ऑक्साइड कमी करू शकते. वेबसाइटवर उपलब्ध सोप्या आर्थिक पर्यायातून ग्राहक आता वीरबाईक घेऊ शकतात.

सादरीकरणाबद्दल बोलताना ऊडचलो चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कुमार म्हणाले, “वीरबाईक ही एक अभिमानास्पद नवकल्पना असून ती पूर्णपणे भारतात संकल्पित आणि विकसित केली गेली आहे. यातून स्वदेशी संशोधन आणि विकासासाठी असलेली आमची बांधिलकी दिसून येते. आमचे ध्येय आमच्या ग्राहकांना शाश्वत, परवडणारे आणि टिकाऊ वाहतुकीचे पर्याय प्रदान करणे हे नेहमीच राहिले आहे आणि ‘वीरबाईक’ हे त्या ध्येयाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आपल्या सैनिकांचे जीवन अधिक आरामदायी बनवणे हे  ऊडचलोचे ध्येय आहे आणि ‘वीरबाईक’ हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. ‘वीरबाईक’ पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. त्यात विशेष ऑलिव्ह ग्रीन एडिशनचा समावेश आहे, जो केवळ सशस्त्र दलांना त्यांचे शौर्य आणि त्याग यासाठीचा सलाम म्हणून उपलब्ध आहे.”

वीरबाईक virbike.com वर खरेदीसाठी उपलब्ध आहे आणि कंपनी ग्राहकांना आकर्षक लॉन्च ऑफर सादर करत आहे. सायकल एक वर्षाच्या वॉरंटीसह मिळत असून ग्राहकांना त्रासमुक्त अनुभव मिळावा यासाठी ऊडचलो कडे देशभरात सेवा केंद्रांचे विस्तृत जाळे आहे.

वीरबाईक सादर करून ऊडचलो ने ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण उपाय प्रदान करण्याची आपली बांधिलकी  पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. कंपनीने आधीच स्वतःला ग्राहक क्षेत्रातील अग्रगण्य म्हणून स्थापित केले आहे आणि वीरबाईकच्या सादरीकरणातून इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातही ते आपला  ठसा उमटवणार आहेत.

‘वीर सावरकर : फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन   

मुंबई: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देशभक्ती, त्याग, त्यांचे बलिदान कुठल्याही शब्दात व्यक्त करता येत नाही. त्यांचा त्याग सर्वश्रुत आहे. त्यांनी केलेले देशकार्य शब्दांच्या पलिकडे आहे. असा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास उदय निरगुडकर अनुवादित ‘वीर सावरकर : फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’  या पुस्तकातून सर्वांसमोर आला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर व चिरायू पंडित यांनी इंग्रजी भाषेत लिहिलेल्या ‘द मॅन व्हू कुड प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाचे उदय निरगुडकर यांनी मराठीत अनुवादित केलेल्या ‘वीर सावरकर : फाळणी रोखण्याची क्षमता असलेला महापुरुष’ या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

कार्यक्रमाला व्यासपीठावर खासदार राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री आशिष शेलार, अतुल भातखळकर, नितेश राणे, सदा सरवणकर, पुस्तकाचे मूळ लेखक तथा केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर,  लेखक उदय निरगुडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री शिंदे पुढे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर समजायचे असतील तर हे पुस्तक प्रत्येकाने वाचले पाहिजे. सावरकरांच्या बाबतीत ब्रिटिशांच्या मनात भीती होती. त्यांना दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा त्यांनी सुनावली. सावरकर यांनी अंदमानच्या कारागृहात अत्यंत हाल अपेष्टा सहन केल्या  त्याचा विचारही केला तरी आपल्या अंगावर शहारे येतात. अशा या राष्ट्रनायकाची २८ मे रोजी येणारी जयंती राज्यात दिमाखात साजरी झाली पाहिजे. या माध्यमातून त्यांची देशभक्ती घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मात्र हे कार्य त्यांच्या देशभक्ती व कर्तृत्वापुढे कमीच आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेतून त्यांचा इतिहास, देशभक्ती, त्याग सर्वांपुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला.

कार्यक्रम प्रसंगी आमदार अतुल भातखळकर, आशिष शेलार, केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर, उदय निरगुडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन स्वप्निल सावरकर यांनी केले.

बाळासाहेब चांदेरे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

पुणे- शिवसेनेचे (ठाकरे ) जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. असे पत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख असलेल्या शिवसेनेकडून काढण्यात आले आहे. चांदेरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदेंच्या गटात प्रवेश करणार आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यालयातून पत्र काढण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

महावितरणच्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

पुणे, दि. २० एप्रिल २०२३: महावितरणमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी पुणे परिमंडलाच्या रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीमध्ये भारतरत्न सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते नुकतेच झाले.

या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश राऊत व श्री. सतीश राजदीप, सहायक महाव्यवस्थापक सौ. माधुरी राऊत (वित्त व लेखा) व ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) तसेच सर्व कार्यकारी अभियंता, अधिकारी आणि लघुप्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष पटनी यांची उपस्थित होते.

महावितरणकडून पुणे परिमंडलातील अभियंता, अधिकारी, कर्मचारी तसेच महावितरणशी संबंधित एजन्सीजच्या कर्मचाऱ्यांना, प्रतिनिधींना विविध प्रकारचे नियमित प्रशिक्षण देण्यात येते. पुणे परिमंडलाच्या रास्तापेठ येथील पूर्वीच्या मध्यवर्ती ग्राहकसेवा केंद्राची जागेमध्ये ८० जणांची आसनव्यवस्था तसेच प्रोजेक्टर, ध्वनी व्यवस्था उभारून हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध प्रशिक्षणाचे वर्ग आयोजित करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांना ‘स्वरप्रतिभा कोहिनूर’ पुरस्कार

पुणे-दीनानाथ मंगेशकर यांच्या २४ एप्रिल या पुण्यतिथी दिनानिमित्त मंगळवार दि. २५ एप्रिल रोजी लेडी रमाबाई हॉल, स.प. महाविद्यालय, पुणे येथे सायं. ५:०० वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये  दीनानाथ मंगेशकर यांच्या निवडक ध्वनीमुद्रिकांवर आधारित ‘ दीनानाथ मंगेशकर जीवन आणि संगीत – वसा आणि वारसा’ श्राव्य कार्यक्रम आणि ज्येष्ठ नाट्यसंगीत गायिका सौ. आशा खाडिलकर यांना ‘स्वरप्रतिभा कोहिनूर पुरस्कार’ प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ११,००० रु. रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ सिने-संगीत अभ्यासक सुलभा तेरणीकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून ध्वनीमुद्रिका संग्राहक व संगीत रंगभूमीचे अभ्यासक राजेंद्र ठाकूरदेसाई आणि पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. युवा गायिका तन्मयी मेहेंदळे यांच्या प्रार्थनेनी कार्यक्रमास प्रारंभ होईल. नीलिमा बोरवणकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील अशी माहिती ‘स्वरप्रतिभा’ या संगीताला समर्पित दिवाळी अंकाचे संपादक व संयोजक प्रवीण प्र. वाळिंबे यांनी सांगितली.

‘स्वरप्रतिभा’ हा संगीताला समर्पित दिवाळी अंक यंदा २०वे वर्ष सादर करीत असून त्यानिमित्त हा पुरस्कार देत आहोत असे सांगून प्रवीण प्र. वाळिंबे म्हणाले की, या कार्यक्रमात मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या दुर्मिळ, निवडक रेकॉर्ड्सवर आधारित ‘मा. दीनानाथ मंगेशकर जीवन आणि संगीत – वसा आणि वारसा’ हा श्राव्य कार्यक्रम सादर केला जाणार आहे. मराठी संगीत रंगभूमी वरील देखणे गायक नट, शास्त्रीय संगीत व नाट्यसंगीत यावर प्रभुत्व असलेले कल्पक प्रयोगशील संगीततज्ञ म्हणून मा. दीनानाथ यांच्यी कारकीर्द अल्पायुषी ठरली. तरीही त्यांच्या संगीताचा वारसा त्यांच्या पंचप्राण असलेल्या मुली व मुलाने अवघ्या विश्वात नेला.

या श्राव्य कार्यक्रमात  मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे जीवन, त्यांची गाजलेली नाटके आणि मूळ ध्वनीमुद्रित नाट्यगीते ऐकवली जाणार आहेत. त्यांचे सुपुत्र पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या रचना,  लता मंगेशकर, आशा भोसले यांनी गायलेली गाणी असा सर्व मंगेशकरी संगीताचा हा श्राव्य कार्यक्रम आहे. मानापमान रणदुंदुभी,  भाव बंधन पुण्यप्रभाव  इत्यादी नाटकातील पदे  रसिकांना ऐकवली जातील.

सुलभा तेरणीकर व राजेंद्र ठाकूर देसाई निवेदनासह हा कार्यक्रम सादर करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे असे प्रवीण प्र. वाळिंबे यांनी सांगितले.

अक्षय तृतीयेच्या दिवशी सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरु ठेवण्याचे नोंदणी महानिरीक्षक यांचे आदेश

पुणे, दि. २०: अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांच्या मागणीनुसार सह दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी २२ एप्रिल २०२३ रोजी सुरू ठेवण्याचे निर्देश राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण हिरालाल सोनवणे यांनी दिले आहेत.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार करण्याची नागरिकांमध्ये भावना असते. त्यानुसार नागरिकांना जमीन, सदनिका आदी खरेदी विक्री करता यावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात काही ठराविक सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सुरू ठेवावयाची कार्यालये निश्चित करण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांच्या सह जिल्हा निबंधकांना देण्यात आले आहेत.

पुणे शहरात ५ सह दुय्यम निबंधक कार्यालये राहणार सुरू
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शनिवार २२ एप्रिल आणि रविवार २३ एप्रिल रोजी शहरात ५ सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये सिद्धी टॉवर दापोडी येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्र. १७ आणि युगाई मंगल सभागृह एरंडवणे येथील सह दुय्यम निबंधक हवेली क्र. २२ ही कार्यालये दुपारी १ ते रात्री ८.४५ वा., युगाई मंगल सभागृह एरंडवणे येथील सह दुय्यम निबंधक हवेली क्र. २१ आणि सिद्धी टॉवर दापोडी येथील सह दुय्यम निबंधक हवेली क्र. २५ ही कार्यालये सकाळी ७.३० ते दुपारी ३.३५ वा. पर्यंत, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय इमारत येथील सह दुय्यम निबंधक हवेली क्र. २३ कार्यालय सकाळी ९.४५ ते सायं. ६.१५ वा. पर्यंत सुरू राहणार असल्याचेही कळविण्यात आले आहे

पुण्‍याच्या लष्‍करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने नौकानयन मोहीम

पुणे, 20 एप्रिल 2023

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लष्‍करी अभियांत्रिकी विद्यार्थ्‍यांकडून ‘ब्लू वॉटर सेलिंग’  मोहिमेचे आयोजन करण्यात  आले आहे. एचबीटीसी मार्वे  ते आयएनएस  मांडवी- गोवा आणि पुन्‍हा नौका परत आणणे असे एकूण  570 सागरी  मैल अंतर कापणारी ही मोहीम आयोजित केली आहे.  यामध्‍ये तीनही सेवांचा संयुक्त सहभाग आहे.  तसेच  सशस्त्र दलांमध्ये साहसी  मोहिमांना  प्रोत्साहन देण्‍यासाठी या नौकानयन मोहिमेचे आयोजन करण्‍यात आले आहे. लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयातील 12 तरुण आणि उत्साही  लष्करी अधिका-यांना कठोर प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांची  निवडी या मोहिमेसाठी  करण्‍यात आली आहे.

या नौकानयन मोहिमेत कॅप्टन विवेक कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखालील ‘ओशिन’ आणि कॅप्टन रोहितसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील ‘जलाश्व’ या दोन सीबर्ड क्लास बोटींसह सहभागी होत आहेत. सीबर्ड क्लास सेलबोटची रचना 1922 मध्ये स्कॉटिश नौका डिझायनर अल्फ्रेड मायलने यांनी केली होती. या बोटीमध्‍ये  26 फूट लांब लाकडी डोलकाठी, 6.5 फूट तुळई- दांडी असून बोटीचे क्षेत्रफळ  260 चौरस फूट आहे.

अधिकाऱ्यांनी आर्मी अॅडव्हेंचर नोडल सेंटर, एचबीटीसी मार्वे येथे ब्लू वॉटर सेलिंगचे  दोन आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.  या अभ्‍यासक्रमामध्ये हवामानाचा  अंदाज, ‘ऑफशोअर नेव्हिगेशन’ , समुद्रातील सुरक्षितता,  हवामान एकदम बदल्‍यास वापरावयाच्या  युक्ती, पाल दुरुस्ती, बोटीची देखभाल, तरतूद आणि संपर्क प्रणाली या विषयांचा समावेश आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, संघांना   19 एप्रिल 2023 रोजी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी आयएनएस मांडवीच्या प्रवासासाठी रवाना करण्‍यात आले. नौकानयन मोहिमेला लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ऑफिशिएटिंग  कमांडंट मेजर जनरल विनायक सैनी  यांनी हिरवा झेंडा दाखवला.

उद्यापासून (दि. २१) रंगणार रोलबॉल विश्व करंडक स्पर्धेचा थरार,२७ देश विजेतेपदासाठी भिडणार

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन

पुणे : सहाव्या वरिष्ठ गटाच्या विश्व करंडक रोलबॉल स्पर्धेचे बिगुल वाजले असून उद्या (दि.२१) पासून या रोमहर्षक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत २७ देश सहभागी झाले असून विजेतेपदासाठी ते भिडणार आहेत.

ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडियम येथील बॅडमिंटन हॉल मध्ये रंगणार आहे. स्पर्धेचे उदघाटन राज्याचे उच्च तंत्र व शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सायं ४ वाजता करण्यात येणार असून यावेळी पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त शेखर सिंग, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, रोलबॉलचे जनक राजू दाभाडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेचे उदघाटन सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात येणार असून, यावेळी विविध कलाकार कलाविष्कार सादर करणार आहेत.

स्पर्धेची पहिली लढत पुरुष विभागातील होणार असून या लढतीमध्ये भारतासमोर पोलंड संघाचे आव्हान असणार आहे. महिला विभागातील पहिली लढत अ गटातील नेपाळ व इजिप्त या दोन संघांदरम्यान होणार आहे.

आंतरराष्ट्रीय रोलबॉल संघटनेचे तांत्रिक समिती अध्यक्ष डॉ. आनंद यादव व स्पर्धा तांत्रिक अध्यक्ष जेकब न्याऊडोह (केनिया) यांनी जाहीर केलेली गटवारी

पुरुष विभाग :
अ गट : भारत, अर्जेंटिना, इजिप्त, फिजी, पोलंड व युगांडा
ब गट : केनिया, श्रीलंका, आयव्हरी कोस्ट, फ्रान्स, इराण व सिएरा लिओन
क गट : बेलारूस, सौदी अरेबिया, नेपाळ, गिनी,ओमान व ब्राझील
ड गट: न्युझीलंड, येमेन, युएई, इंग्लंड, लॅटव्हिया

महिला विभाग
अ गट : केनिया, फ्रान्स, आयव्हरी कोस्ट, श्रीलंका, नेपाळ व इजिप्त
ब गट : भारत, पोलंड, लॅटव्हिया, अर्जेंटिना, सिएरा लिओन.

शेतकऱ्यांना वीजजोडणीसाठी महावितरणची सर्वोत्तम कामगिरी:सर्वाधिक कनेक्शन, सर्वात कमी प्रतीक्षा यादी

मुंबई, दि. २० एप्रिल २०२३: महावितरणने २०२२ -२३ या नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात एक लाख ७० हजार २६३ कृषी पंपांना वीज कनेक्शन देऊन गेल्या दहा वर्षातील सर्वोत्तम कामगिरी केली असून याबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. कृषीपंपांना दहा वर्षातील सर्वाधिक वीज कनेक्शन देण्यासोबतच प्रलंबित कनेक्शनची संख्या आतापर्यंतची सर्वात कमी झाल्याने महावितरणला दुहेरी यश मिळाले आहे, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी ऊर्जा खात्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर महावितरणला शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनचा पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याची सूचना केली होती. शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी पैसे भरल्यानंतर कृषीपंपासाठी प्रत्यक्ष कनेक्शन मिळण्यास विलंब होतो, त्याला पेड पेंडिंग म्हणतात. मा. ऊर्जामंत्र्यांच्या आदेशानुसार कृषीपंपांना प्राधान्याने वीज कनेक्शन देण्यासाठी महावितरणने योजना आखली. अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत गेल्या दहा वर्षामध्ये एका आर्थिक वर्षातील कृषीपंपांची सर्वाधिक वीज कनेक्शन देण्यात यश मिळविले. यापूर्वी २०१९ -२० या आर्थिक वर्षात ९६ हजार ३२७, २०२०-२१ या आर्थिक वर्षात एक लाख १७ हजार ३०४ आणि २०२१ -२२ या आर्थिक वर्षात  एक लाख ४५ हजार ८६७ कृषीपंपांना वीज कनेक्शन देण्यात आली होती.

महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीमुळे कृषीपंपांच्या प्रलंबित वीज कनेक्शनची संख्या कमी होऊन ती एक लाख ६ हजार ३४० इतकी झाली आहे. ही आतापर्यंतची एका आर्थिक वर्षातील सर्वात कमी संख्या आहे. याआधी २०१९ -२० या आर्थिक वर्षाच्या अखेरीस प्रलंबित कनेक्शनची संख्या एक लाख ६७ हजार ३८३ होती तर २०२० -२१ मध्ये  एक लाख ८४ हजार ६१३ आणि २०२१ -२२ मध्ये एक लाख ८० हजार १०४ होती.

महावितरणने नुकत्याच संपलेल्या २०२२ – २३ या आर्थिक वर्षात दिलेल्या कृषी पंपांच्या कनेक्शनचे वैशिष्ट्य म्हणजे या वर्षात महावितरणने एकूण १ लाख ७० हजार कनेक्शनपैकी १ लाख ५९ हजार कनेक्शन ही पारंपरिक पद्धतीने दिली आहेत. सौरपंप किंवा उच्चदाब वितरण प्रणाली या विशेष योजनांतील केवळ ११,००० कनेक्शन आहेत. याआधीच्या वर्षात दिलेल्या एक लाख ४५ हजार ८६७ कृषीपंप कनेक्शनपैकी ४६ हजार १७५ कनेक्शन ही सौर किंवा उच्च वीजदाब प्रणालीतील होती. २०२२-२३ मध्ये सौर आणि उच्चदाब वितरण प्रणाली योजनांचा फारसा आधार नसताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने दिलेल्या कनेक्शनची कामगिरी उल्लेखनीय आहे. २०२२ -२३ या आर्थिक वर्षात सर्वोत्तम कामगिरी झाल्यामुळे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून नव्या आर्थिक वर्षात प्रलंबित कृषीपंप वीजजोडण्या जलदगतीने देण्याचे नियोजन महावितरणने केले आहे.

गावाबाहेर शेतामध्ये दूर दूर असलेल्या विहिरींसाठी कृषी पंप कनेक्शन देताना अनेक अडचणी येतात. कृषी पंपाला वीज कनेक्शन देण्यासाठी विजेचे खांब, वाहिन्या इत्यादी सुविधा आधी निर्माण कराव्या लागतात. पावसाळ्यात तसेच शेतात पिके उभी असताना विजेचे खांब उभारणे, वाहिन्या जोडणे, ट्रान्सफॉर्मर बसविणे ही कामे करता येत नाहीत. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर, सततचा पाऊस अशा नैसर्गिक संकटांमुळे शेतांमध्ये वीज कनेक्शनच्या पायाभूत सुविधा उभारण्यात अनेक अडथळे आले. तरीही महावितरणने दहा वर्षातील सर्वाधिक वीज कनेक्शन देणे आणि प्रतीक्षा यादीतील संख्या कमी करून हे यश मिळविले.

ऊर्जामंत्र्यांनी पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्याची सूचना दिल्यानंतर महावितरणने हे काम आव्हान म्हणून स्वीकारले. कृषी पंपांना कनेक्शन देण्यासाठी कामाचा पाठपुरावा करण्यासाठी संपूर्ण राज्य पातळीवर दर पंधरा दिवसांनी स्वतः अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आढावा घेत होते. कृषी पंपांना कनेक्शन हा महावितरणसाठी अत्यंत प्राधान्याचा विषय झाला व त्याचा सातत्याने पाठपुरावा चालू होता. शेतकऱ्यांना कनेक्शन देण्यासाठी राज्य शासनाने ८०० कोटी रुपयांचा निधी दिला तर महावितरणने स्वतःचा २४१ कोटी रुपये निधी खर्च केला. याखेरीज शेतकऱ्यांच्या वीजबिल वसुलीतून मिळालेला पैसाही कृषीपंपांना कनेक्शन देण्यासाठी वापरण्यात आला.

“आज जगाला भेडसावणाऱ्या प्रत्येक समस्येवर गौतम बुद्धांनी उपाय सांगितले आहेत.”

नवी दिल्ली, 20 एप्रिल 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत हॉटेल अशोका इथे आजपासून सुरु झालेल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन केले. यावेळी, पंतप्रधानांनी इथे आयोजित फोटो प्रदर्शन पहिले आणि बुद्धांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण केली. तसेच यावेळी उपस्थित एकोणीस मान्यवर बौद्ध भिक्खूना त्यांचा पोशाख चीवर भेट दिला.

यावेळी सर्वप्रथम पंतप्रधानांनी या परिषदेसाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. भारताची ‘अतिथी देवो भव’ ही संस्कती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आमच्या देशात येणारे सगळे लोक देवासमान आहेत, अशी या बुद्धाच्या भूमीची परंपरा आहे. आज जेव्हा गौतम बुद्धांची शिकवण आणि त्यांच्या आदर्शानुसार आयुष्य व्यतीत करणाऱ्या अनेक व्यक्ती इथे एकत्र आल्यामुळे, साक्षात बुद्धांच्याच अस्तित्वाचा अनुभव येतो आहे, असे पंतप्रधान म्हणाले.  “बुद्ध हे एक व्यक्तिमत्व नाहीत, ते एक भावना आहेत” .बुद्ध हे असे चैतन्य आहे, ज्यामुळे व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन होते, बुद्ध हा एक विचार आहे जो परिवर्तन घडवून आणतो आणि गौतम बुद्ध हा विवेक आहे जो प्रकट करण्याच्या पलीकडचा आहे. “हा बुद्ध विवेक हा शाश्वत  आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. या ठिकाणी विविध क्षेत्रातले इतके लोक उपस्थित आहे, याचा अर्थ असा आहे की बुद्धाच्या विचारांचा प्रचंड प्रसार झाला आहे, जो संपूर्ण मानवतेला एका धाग्यात बांधून ठेवतो. जगाच्या कल्याणासाठी बुद्धाच्या कोट्यवधी अनुयायांची एकत्रित इच्छाशक्ती आणि निश्चय अतिशय महत्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रसंगाचे महत्व सांगताना पंतप्रधान म्हणाले, की ही पहिली जागतिक बौद्ध परिषद या दिशेने काम करण्यासाठी सर्व देशांना एक मंच उपलब्ध करून देईल.  हा भव्य सोहळा आयोजित केल्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्रालय आणि अंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघाचे आभार मानले.

पंतप्रधानांनी बौद्ध धर्माशी असलेला आपला संबध अधोरेखित केला कारण वडनगर हे त्यांचे मूळ गाव एक महत्वाचे बौद्ध केंद्र आहे, युआन त्सांगने देखील वडनगरला भेट दिली होती. बौद्ध संस्कृतीशी असलेलं नातं समजावून सांगण्यासाठी त्यांनी सारनाथच्या संदर्भात काशीचा देखील उल्लेख केला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत काळ साजरा करत असताना जागतिक बौद्ध परिषद  हात आहे, याचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की भारताने भविष्यासाठी मोठी उद्दिष्टे निश्चित केली असून जागतिक हितासाठी नवीन संकल्प केले आहेत. भारताने अलीकडच्या काळात विविध क्षेत्रांमध्ये प्राप्त केलेल्या अद्वितीय यशाची प्रेरणा स्वतः भगवान बुद्ध यांच्याकडून मिळालेली आहे, यावर त्यांनी भर दिला.

भगवान बुद्धांनी दाखवलेला सिद्धांत, सराव आणि अनुभूतीचा मार्ग अनुसरत भारताने गेल्या नऊ वर्षाच्या प्रवासात या तीनही तत्वांचे पालन केले, असे पंतप्रधान म्हणाले.  भगवान बुद्धांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी भारताने संपूर्ण समर्पण वृत्तीने आणि समर्पण भावनेने कार्य केले असे सांगून भारत आणि नेपाळ मधील बुद्धिस्ट सर्किट चा विकास, सारनाथ आणि कुशीनगर येथील नूतनीकरण कार्य, कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्या सहकार्याने लुंबिनी येथे भारत आंतरराष्ट्रीय बौद्ध वारसा आणि संस्कृती केंद्राची स्थापना अशी कधी उदाहरणे पंतप्रधानांनी दिली.

मानवतेच्या प्रश्नांसाठी भारतात उपजत असलेल्या सहानुभूतीचे श्रेय पंतप्रधानांनी भगवान बुद्धांच्या शिकवणीला दिले. भारताने राबवलेल्या शांतता मोहिमेचा आणि तुर्की मध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपासारख्या आपत्तीमध्ये मदत कार्यात भारताने मनापासून केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला.“ 140 कोटी भारतीयांची ही भावना संपूर्ण जगाने पहिली, समजून घेतली आणि स्वीकारली”, असे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघासारखे व्यासपीठ समान विचार आणि समान भावना असलेल्या राष्ट्रांना बुद्ध धम्म आणि शांतता यांचा प्रसार करण्यासाठी संधी उपलब्ध करून देते, असे ते म्हणाले.

एखाद्या समस्येपासून ते  समाधानापर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा खरा  बुद्धांचा वास्तविक प्रवास आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भगवान बुद्धांनी इतरांच्या आयुष्यातील दुःख पाहून  किल्ले आणि राजवाड्यांमधील जीवनाचा त्याग केला, असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी भगवान बुद्धांच्या जीवन प्रवासाबद्दल बोलताना केला.  समृद्ध जगाचे स्वप्न साकारण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या स्व आणि संकुचित मनोवृत्तीचा त्याग आणि जग या विशाल संकल्पनेला पूर्णपणे आत्मसात करणे या बुद्धांनी दिलेल्या मंत्रांचा स्वीकार करणे, असे ते म्हणाले.   साधनसंपत्तीची कमतरता असलेल्या देशांचा विचार केला तर एक चांगले आणि स्थिर जग निर्माण होईल यावर त्यांनी भर दिला. प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक राष्ट्राचे आता स्वतःसह जागतिक हिताला प्राधान्य असणे ही काळाची गरज आहे,  असे त्यांनी सांगितले.

युद्ध, आर्थिक अस्थिरता, दहशतवाद आणि धार्मिक कट्टरता आणि जगातील प्रजाती लुप्त होत असताना तसेच  हिमनद्या वितळत असताना हवामान बदलाचे मोठे आव्हान जगासमोर असल्याने  सध्याचा काळ हा या शतकातील सर्वात आव्हानात्मक काळ आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या सर्वांमध्ये देखील भगवान बुद्धांवर निष्ठा असलेलेआणि सर्व प्राणिमात्रांचे कल्याण मानणारे लोक आहेत. ही आशा, हा विश्वास या पृथ्वीची सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा ही आशा एकरूप होईल तेव्हा बुद्धाचा धम्म या  जगाची श्रद्धा बनेल आणि बुद्धाची अनुभूती ही मानवतेची श्रद्धा बनेल.

आधुनिक काळातील सर्व समस्या परमेश्वराच्या प्राचीन शिकवणींद्वारेच सोडवल्या जातात असे सांगून,  पंतप्रधानांनी भगवान  बुद्धांच्या  शिकवणीची प्रासंगिकता अधोरेखित केली. भगवान बुद्धांनी शाश्वत शांतीसाठी युद्ध, पराभव आणि विजयाचा त्याग करण्याचा उपदेश केला, असे पंतप्रधान म्हणाले. शत्रुत्वावर कधीही शत्रुत्वाने विजय मिळवता येत नाही आणि आनंद हा एकतेत असतो. त्याचप्रमाणे दुसऱ्याला उपदेश करण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःच्या आचरणाकडे पाहावे ही गौतम बुद्धांची शिकवण आत्मसात केली तर सध्याच्या  जगात सर्वत्र प्रचलित असलेला  स्वतःचे विचार इतरांवर लादण्याचा प्रकार बंद होईल, असे ते म्हणाले. परमेश्वराच्या शिकवणीची शाश्वत प्रासंगिकता अनुभवण्यासाठी स्वतःच स्वतःचा प्रकाश व्हा, अर्थात अप्प दीपो भवः, या त्यांच्या आवडत्या बुद्ध शिकवणीचा त्यांनी पुनरुच्चार केला, ‘आम्ही तो देश आहोत ज्याने जगाला बुद्ध दिलेला आहे,  युद्ध नाही’ असे काही वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रांना सांगितल्याचे त्यांनी स्मरण केले.

पंतप्रधान म्हणाले, “बुद्धाचा मार्ग हा भविष्याचा  आणि शाश्वततेचा मार्ग आहे. जगाने बुद्धाच्या शिकवणुकीचे  पालन केले असते तर हवामान बदलाच्या    समस्येला  तोंड  द्यावे लागले नसते. हे सांगताना पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, देशांनी  इतरांबद्दल आणि भावी  पिढ्यांचा विचार करणे थांबवले, त्‍यामुळे ही समस्या उद्भवली.    या चुकीचे आता आपत्‍तीमध्‍ये रूपांतर झाले आहे.  बुद्धांनी  वैयक्तिक लाभाचा विचार न करता सर्वांनी चांगले  आचरण करावे, असा उपदेश केला कारण अशा वर्तनामुळे सर्वांगीण- सर्वांचे कल्याण होते.

प्रत्येक व्यक्तीचा पृथ्वीवर कोणत्या ना कोणत्या मार्गाने  परिणाम होत आहे, मग त्यामध्‍ये  जीवनशैली, आहार  किंवा प्रवास करण्‍याच्या सवयी असे काहीही असो, त्याचा परिणाम होत असतो, असे   पंतप्रधानांनी अधोरेखित करून  हवामान बदलाशी लढण्यासाठी प्रत्येकजण योगदान देऊ शकतो हे निदर्शनास आणून दिले. बुद्धाच्या प्रेरणेने  प्रभावित झालेल्या भारताने राबविलेल्या उपक्रमावर पर्यावरणासाठी जीवनशैली किंवा ‘  मिशन लाइफ’ याबाबत पंतप्रधानांनी सांगितले.  जर लोक जागरूक झाले आणि त्यांनी  जीवनशैली बदलली, तर हवामान बदलाची ही मोठी समस्या हाताळता    येईल. “मिशन लाइफ बुद्धाच्या प्रेरणेने प्रभावित आहे आणि ते बुद्धांच्या विचारांना पुढे नेत आहे”, असे पंतप्रधान  मोदी यांनी नमूद केले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी भौतिकवाद आणि स्वार्थी विचारांच्या  व्याख्यांमधून बाहेर पडून ‘ भवतु सब्ब मंगलम ‘ चा विचार केला पाहिजे, अर्थात बुद्धाला केवळ प्रतीक बनवायचे नाही तर त्याचे प्रतिबिंब  आत्मसात करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.  भूतकाळात अडकून न राहता  नेहमी पुढे जाणे हे बुद्धांच्या वचनाचे स्मरण ठेवले  तरच हा संकल्प पूर्ण होईल, असेही ते यावेळी म्हणाले.  सर्वांनी एकत्रितपणे कार्य केल्यामुळे  संकल्प यशस्वी होतील, असा विश्वासही  पंतप्रधानांनी व्यक्त केला.

केंद्रीय संस्कृती  मंत्री जी किशन रेड्डी, केंद्रीय कायदा आणि  न्याय मंत्री  किरेन रिजिजू, केंद्रीय संस्कृती राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि  मीनाक्षी लेखी आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाचे महासचिव डॉ धम्मपिया यावेळी उपस्थित होते.

पार्श्‍वभूमी :-

संस्कृती  मंत्रालयाच्या वतीने, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्या सहकार्याने 20-21 एप्रिल रोजी या  दोन दिवसीय शिखर परिषदेचे  आयोजन  केले  आहे. “समकालीन आव्हानांना प्रतिसाद : तत्त्वज्ञान ते रूढ प्रघात”  या संकल्पनेवर   जागतिक  बौद्ध शिखर परिषदेचे आयोजन केले आहे.

सार्वत्रिक चिंतेच्या मुद्द्यांवर जागतिक बौद्ध धम्म नेतृत्व आणि बौद्ध विद्वानांची मते जाणून घेताना, धोरणात्मक माहिती देणे आणि एकत्रितपणे मार्गदर्शन  करण्यासाठी एक प्रयत्‍न म्हणून या शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. बुद्ध धम्माची मूलभूत मूल्ये समकालीन परिस्थितींमध्ये प्रेरणा आणि मार्गदर्शन कसे देऊ शकतात याचा शोध  शिखर परिषदेमधून  घेतला  जात आहे.

या शिखर परिषदेतला जगभरातून  नामवंत विद्वान, संघ नेते आणि धर्म अभ्यासक सहभागी झाले आहेत.  जागतिक समस्यांवर ते  चर्चा करतील आणि वैश्विक मूल्यांवर आधारित बुद्ध धम्मामधील  उत्तरे शोधतील. या परिषदेमध्‍ये  बुद्ध धम्म आणि शांतता; बुद्ध धम्म: पर्यावरणीय संकट, आरोग्य आणि शाश्‍वतता; नालंदा बौद्ध परंपरेचे जतन; बुद्ध धम्म तीर्थक्षेत्र, जिवंत वारसा आणि बुद्ध अवशेष: दक्षिण, आग्नेय  आणि पूर्व आशियातील देशांबरोबर  भारताचा  शतकानुशतके जुन्या सांस्कृतिक संबंधांचा  पाया; अशा चार संकल्पनावर चर्चा होत आहे.

दिल्लीच्या पांढऱ्या वाघांच्या बछड्यांना राष्ट्रीय प्राणी उद्यानातील पांढऱ्या वाघांच्या क्षेत्रात सोडले (व्हिडीओ)

नवी दिल्ली-केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय प्राणी उद्यानात, पांढऱ्या वाघाच्या बछड्यांना, पांढऱ्या वाघांसाठीच्या क्षेत्रात सोडले. या दोन बछड्यांचे नामकरणही त्यांनी केले. मादी बछड्याचे नाव ‘अवनी’ म्हणजे पृथ्वी तर नर बछड्याचे नाव ‘व्योम’ म्हणजे अवकाश असे ठेवण्यात आले. त्यांच्या पालकांचे नाव, विजय आणि सीता असे आहे.

सीता वाघीणीने, 24 ऑगस्ट 2022 रोजी या दोन पिल्लांना जन्म दिला. आता ही पिल्ले आठ महिन्यांची झाली आहेत. आतापर्यंत, हे बच्चे रात्रीच्या वेळी निवाऱ्यात आणि दिवसभर आईजवळ टतिच्या पिंजऱ्यात ठेवले जाई. आता मात्र ही पिल्ले मोठी झाली आहेत, आणि त्यांना त्यांच्या हालचाली करण्यासाठी अधिक जागा लागते, म्हणून त्यांना आता या प्राणी संग्रहालयातच वेगळ्या भागात सोडण्यात आलं असून, तिथे जाणारे लोकही त्यांना बघू शकतील.

यावेळी, यादव यांनी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांशीही संवाद साधत, त्यांना लाईफ या मिशनबद्दल माहिती दिली. तसेच शाश्वत जीवनशैली आणि नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन यांचे महत्त्वही त्यांना समजावून सांगितले.

शाळेतील मुले आणि प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत 8 महिन्यांच्या अवनी आणि व्योम यांना त्यांच्या गोठ्यात सोडण्यास हिरवी झेंडी दाखविली. प्राणीसंग्रहालयाला भेट देणारे पर्यटक आता अवनी आणि व्योम यांना पाहू आणि नमस्कार करू शकतील.

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहरांबद्दल आस्था ठेऊन; शहर विकासावर आपल्या कारकीर्दीची छाप सोडावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबई, दि. २० : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आमच्या सरकारने विकासाच्या विविध प्रकल्पांना दिलेली गती लक्षात घेता नागरिकांच्या सोईचा महाराष्ट्र घडविण्याची वाटचाल सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहरांबद्दल आस्था, जिव्हाळा ठेऊन काम करावे आणि आपल्या कारकीर्दीची छाप शहर विकासावर सोडावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील महापालिका आयुक्त, नगरपालिका, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांना केले.

एनसीपीएच्या सभागृहात नगरविकास दिनानिमित्त झालेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी यावेळी उपस्थित होते.

पुरस्कारांच्या रकमेत भरघोस वाढ

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, राज्यात नागरीकरण वेगाने होत आहे. त्यासाठी मुलभूत सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे. विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून वाढत्या नागरिकीकरणाला सोयी देण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यंदा नगरविकास विभागाने घेतलेल्या स्पर्तील विजेत्या महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांना देण्यात आलेल्या विविध पुरस्कारांच्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे. त्याच उपयोग शहराच्या सुशोभीकरणासाठी योग्य पद्धतीने करावा. शहरांची स्वच्छता करताना लोकसहभाग वाढवा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त

नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून देण्यात येणाऱ्या सेवा गतिमान, दर्जेदार तसेच पारदर्शक पद्धतीने देण्यात याव्यात. प्रशासन लोकाभिमुख व्हावे यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम करावे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी करांची वसुली १०० टक्के होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ज्या शहरासाठी आपली नियुक्ती झाली त्याचं आपण देणे लागतो या भावनेतून अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. नगरविकास विभागाने केंद्र शासनाकडे पाठविलेल्या १५ हजार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. डबल इंजिन सरकार असल्याने त्याचा फायदा होतो, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.

विकासाचे निर्णय कागदावर न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी

शहरे सुशोभित करताना तेथील इतिहास, संस्कृती यांचे दर्शन घडावे अशा पद्धतीने कामे करा. ज्या प्रगत महापालिका आहे त्यांनी अन्य नगरपालिका, नगरपरिषदा यांना मार्गदर्शन करावे जेणेकरून महानगरांप्रमाणे छोटी शहरे देखील विविध विकास कामे आपल्या भागात राबवतील. विकासाचे निर्णय कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

शहरांमधील बदल दृष्यस्वरूपात जाणवले पाहिजे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे. शहरांचा विकास करताना कल्पकता आणि अंमलबजावणी यांचा समन्वय योग्य प्रमाणात झाला पाहिजे.  विकासकामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था या सेवा देणाऱ्या आहेत. शहरांमधील बदल दृष्यस्वरूपात जाणवले पाहिजे. अधिकाऱ्यांनी काम करताना आपल्या कारकीर्दीचा ठसा शहर विकासावर उमटवला जाईल, अशी कामगिरी करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, अमृत योजना अशा अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण शहराचा कायापालट होत आहे. विकास आराखड्यामध्ये सुधारणा होत आहे विकास आराखडे वेगाने तयार करण्याचे काम सुरू आहे, ज्यामध्ये घनकचरा पिण्याचे पाण्याची व्यवस्था वेगवेगळ्या पायाभूत सुविधा तयार केल्या जात आहेत. त्यासाठी निधीची कमतरता नाही, असेही त्यांनी सांगितले.

झपाट्याने नागरिकरण झालेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख असून त्यामुळे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा या जलदगतीने आणि गुणवत्तापूर्ण दिल्या जाव्यात. योजनांची अंमलबजावणी पारदर्शकपणे करा, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ चा निकाल

शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ चा  निकाल यावेळी घोषित करण्यात आला. यामध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे सहा वेगवेगळ्या गटात विभागणी करण्यात आली असून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेस अनुक्रमे १५ कोटी, १० कोटी व ५ कोटी या प्रमाणे पारितोषिक देण्यात आले. “अ” व” ब” वर्ग महानगरपालिका गटामध्ये नागपूर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. “क” वर्ग महानगरपालिका गटामध्ये नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण -डोंबिवली महानगरपालिका व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. “ड” वर्ग महानगरपालिका गटामध्ये पनवेल महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका व अहमदनगर महानगरपालिका यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.

“अ” व” ब” वर्ग नगरपरिषद गटामध्ये शिरपूर-वरवाडे नगरपरिषद, उमरखेड नगरपरिषद  व हिंगोली नगरपरिषद यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.”क” वर्ग नगरपरिषद गटामध्ये  वेंगुर्ला नगरपरिषद व महाबळेश्वर नगरपरिषद यांना  अनुक्रमे प्रथम व  द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येऊन तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पवनी नगरपरिषद व सोनपेठ नगरपरिषद यांना देण्यात आले. नगरपंचायत गटामध्ये  मौदा नगरपंचायत व देवरुख नगरपंचायत यांना अनुक्रमे प्रथम व  द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येऊन तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देवळा (नाशिक) नगरपंचायत व बाभुळगाव नगरपंचायत यांना देण्यात आले.

राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीची तपासणी व मूल्यमापन करण्यात आले. यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण ५ गटातील प्रत्येकी ३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले.

यामध्ये “अ”, “ब” व “क” वर्ग महानगरपालिका गटामध्ये नाशिक महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका व पुणे महानगरपालिका यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले. “ड” वर्ग महानगरपालिका गटामध्ये इचलकरंजी महानगरपालिका,  मीरा-भाईंदर महानगरपालिका व कोल्हापूर महानगरपालिका यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले.

“अ” व” ब” वर्ग नगरपरिषद गटामध्ये शिरपूर-वरवाडे नगरपरिषद, हिंगोली नगरपरिषद  व बुलढाणा नगरपरिषद यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले. “क” वर्ग नगरपरिषद गटामध्ये  सोनपेठ नगरपरिषद, नळदुर्ग नगरपरिषद  व पाढंरकवडा नगरपरिषद यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले. नगरपंचायत गटामध्ये कणकवली  नगरपंचायत लोहारा नगरपंचायत, कोरची बुद्रुक नगरपंचायत व यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले. नगररचना विभाग, मंत्रालयीन नगरविकास विभाग यामधील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत माहिती, शिक्षण व संवाद घटकाच्या जिंगल व फिल्मचा शुभारंभ, DAY-NULM लोगो, फिल्म, पुस्तिका व नगर विकास विभागाने राबविलेल्या विशेष कार्यक्रमांबाबत कॉफी टेबल बुकचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.  कार्यक्रमाची सुरूवात राज्यगीताने झाली. प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी प्रास्ताविक केले. नगरपालिका संचालनालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  किरण कुलकर्णी यांनी आभार मानले.

रेल्वे यार्डमधील माथाडी कामगारांना मुलभूत सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात – कामगार मंत्री सुरेश खाडे

मुंबई, दि. २० : विविध रेल्वे यार्डमध्ये माथाडी बोर्डात नोंदणी असलेले कामगार मालाची चढ-उतार करतात, या कामगारांना पाणी, शेड, शौचालय, सुसज्ज विश्रांतीगृह, वीज आदी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. विविध रेल्वे यार्डामध्ये या सुविधा देण्यासंदर्भात तातडीने क्रियाशील आराखडा सादर करावा. माथाडी कामगारांचे प्रलंबित वेतन तातडीने वितरीत करण्याच्या सूचना कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केल्या.

रेल्वे यार्डात माथाडी कामगार व अन्य घटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनातील अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांसोबत आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना देताना मंत्री श्री. खाडे बोलत होते. या बैठकीत कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, अपर कामगार आयुक्त शिरीन लोखंडे, महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अधिकारी पोपटराव देशमुख यांच्यासह अन्य ११ माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

मंत्री श्री. खाडे म्हणाले की, विविध ११ कामगार व माथाडी संघटनांच्या मागण्या प्राप्त झाल्या आहेत. सर्व रेल्वे यार्डात माथाडी कामगारांसाठी अंतर्गत रस्ते व धक्क्यासाठी येणारा रोड सुस्थ‍ितीत तयार करून देणे. कामगारांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुसज्ज शौचालय, धक्क्यावर कायमस्वरूपी शेड, विद्युत सेवा, विश्रांतीगृह, जुन्या रस्त्यावरील खड्डे भरण्यात यावे. तसेच, माल उतरवताना रेल्वे आणि प्लॅटफॉर्म मध्ये अंतर फार असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे, यावर पर्याय म्हणून लोखंडाच्या पायरीचा वापर करण्यात यावा. संबंधीत कामे तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने रेल्वे विभागाने तातडीने आराखडा तयार करून सादर करावा, असे मंत्री श्री. खाडे यांनी यावेळी सांगितले.

मानवतेच्या दृष्टीकोनातून माथाडी कामगारांचा विचार करून त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या. त्यांचे प्रलंबित वेतन तातडीने अदा करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सुचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

राष्ट्रीय स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने पुण्यातील गणेशखिंड इथल्या केंद्रीय विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन

 

पुणे, 20 एप्रिल 2023


राष्ट्रीय स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने  पुण्यातील गणेशखिंड इथल्या केंद्रीय विद्यालयात चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . पत्र सूचना कार्यालयाच्या सहकार्याने वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन विभागात पार पडलेल्या या स्पर्धांमधून सुमारे 120 विद्यार्थी – विद्यार्थिनी सहभागी झाले होते. विद्यालयाच्या प्राचार्या शबाना खान आणि पुण्यातील पत्र सूचना कार्यालयाचे  उपसंचालक महेश अय्यंगार यांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना पुरस्कार वितरण करण्यात आले .

यावेळी बोलताना प्राचार्या खान यांनी मुलांना आपला वर्ग , शाळा आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. प्रत्येकाने स्वच्छतेच्या बाबतीत हे कर्तव्य पार पाडले तर देश स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
 

स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे यावेळी  प्रदर्शन सादर करण्यात आले.उपस्थित विद्यार्थ्यांपैकी प्रातिनिधिक स्पर्धकांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला . शाळेचे उपमुख्याध्यापक कनाराम चौधरी, कला शिक्षक अलीम बागवान आणि उज्वल अवारे यांचे या स्पर्धेच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य लाभले.

महाराष्ट्र भूषण सोहळ्यानंतरच्या दुर्दैवी घटनेची वस्तुस्थिती तपासण्यासाठी एक सदस्यीय समिती

मुंबई, दि. २० :- खारघर (जि. रायगड) येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात येत आहे.
महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल. ही समिती एका महिन्याच्या मुदतीत याबाबतचा अहवाल सादर करेल.
भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी- दक्षता घ्यावी, याबाबतही समिती शासनास शिफारशी करेल.