Home Blog Page 1542

रेल्वेच्या तुमच्या कन्फर्म तिकिटावर करू शकेल दुसरा प्रवास

पुणे : रेल्वेप्रवासासाठी काढलेले तिकीट हे अहस्तांतरणीय असते मात्र आता तुम्ही तुमचे कन्फर्म तिकीट रक्ताच्या नात्यातील कुठल्याही अन्य प्रवाशाला ट्रान्सफर करू शकणार आहात. त्यासाठी रेल्वेने काही नियमांमध्ये बदल केला आहे. यापूर्वी तुम्ही तुमच्या कन्फर्म तिकिटावर कुणी अन्य व्यक्ती प्रवास करताना आढळला तर त्याला गुन्हा मानला जात असे.

सोप्या भाषेत सांगायचं तर तिकीट बुक केल्यानंतर काही कारणानं तुम्हाला प्रवास करणं शक्य झालं नाही तर तुम्हाला कन्फर्म तिकीट कॅन्सल करावे लागत होतं. आता मात्र तसं करावं लागणार नाही. कॅन्सल केल्यावर रेल्वे प्रवाशांना अनेकदा आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत असे. त्यामुळे इंडियन रेल्वेने आता आरक्षित तिकिटांवर प्रवाशांना खास प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली आहे

त्याअंतर्गत जे लोक कन्फर्म तिकिटावर प्रवास करू इच्छित नाही त्यांना तिकीट ट्रान्सफर करता येणार आहे. तिकीट ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला एक अ‍ॅप्लिकेशन स्टेशन मास्टर यांना द्यावे लागेल. याद्वारे तुम्ही तुमच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला तुमचे कन्फर्म तिकीट ट्रान्सफर करू शकता. रेल्वेच्या या निर्णयानं रेल्वे प्रवाशांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे.

दंगली घडवणाऱ्याना अद्दल घडवणार-देवेंद्र फडणवीस

पुणे-उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन केले. फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की,महाराष्ट्रात ज्या दोन ठिकाणी दंगली झाल्या, त्याठिकाणी आता पूर्णपणे शांतता आहे. पोलिस पूर्णपणे सक्रिय आहेत.

राज्यात काही लोक जाणून बुजून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवून देणार नाही आणि जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात त्यांना अद्दल घडवणार असा गंभीर इशारा दंगली घडवणाऱ्याना त्यांनी दिला. काहीजण राज्यात मुद्दाम राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ते सफल होणार नाहीत, जे अशा प्रकारे दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आम्ही सोडणार नाही.

विधानसभेतील 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे निर्णय घेण्याचे सोपवले आहे.याबाबत विधानसभा अध्यक्ष यांनी लवकर निर्णय घ्यावा असे सांगण्यात आले आहे याबाबत फडणवीस म्हणाले,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे गेल्या कित्येक वर्षापासून कायद्याची प्रॅक्टिस करत आहेत. त्यांचा कायद्याचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे ते हे कोणतही बेकायदेशीर काम करणार नाही, कुणी कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी ते दबावाला बळी पडणार नाहीत, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला पिंपरीत दाखवले काळे झेंडे; छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला घेतले ताब्यातगृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पिंपरी चिंचवड शहरात दौऱ्यावर असताना पिंपरी येथे त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.याप्रकरणी छावा संघटनेचे शहर उपाध्यक्ष गणेश भांडवलकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सायबर आणि अंतराळाशी संबंधित नव्याने उदयाला येणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने वाटचाल करत राहणे भारतासाठी अतिशय गरजेचे- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पुण्यामध्ये डीआयएटीच्या 12व्या दीक्षांत समारंभात प्रतिपादन

पुणे-15 मे 2023

सायबर आणि अंतराळाशी संबंधित नव्याने उदयाला येणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी  भारताला पूर्णपणे सक्षम बनवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने वाटचाल करण्याचा आणि प्रगती साध्य करण्याचा सल्ला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संशोधन संस्थांना दिला आहे.  ते आज महाराष्ट्रात पुण्यामध्ये संरक्षणविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान संस्थेच्या(DIAT) 12 व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. सध्याच्या जागतिक परिस्थितीत विविध देशांमध्ये सातत्याने बदलत राहणाऱ्या राजकीय आणि आर्थिक समीकरणांची राजनाथ सिंह यांनी यावेळी माहिती दिली.

विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि युद्धाचे डावपेच अतिशय वेगाने  निर्माण होत आहेत आणि त्यामुळे सध्या जगाला अनुभव येत असलेल्या नॉन-कायनेटिक आणि संपर्करहित युद्धांना तोंड देण्यासाठी पारंपरिक पद्धतींबरोबरच  अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात अतिशय वेगाने प्रगती होणे गरजेचे आहे असे संरक्षणमंत्री म्हणाले.

“आपल्या प्रतिस्पर्ध्यांकडे अधिक जास्त आधुनिक तंत्रज्ञान असेल तर भविष्यात ही बाब आपल्यासाठी चिंताजनक ठरेल. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानविषयक प्रगतीच्या दिशेने आगेकूच करणे ही आपल्यासाठी अतिशय तातडीची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले.  ही जबाबदारी आपल्या संस्थांची आहे, असे ते म्हणाले. संरक्षण क्षेत्र म्हणजे एका जागी स्थिर असलेला तलाव नसून एक वाहती नदी आहे. ज्या प्रकारे एखादी नदी आपल्या वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना ओलांडत पुढे जात राहते त्या प्रकारे आपल्याला सुद्धा सर्व अडथळे पार करून पुढे गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

संरक्षण संशोधन आणि अतिशय अचूकता असलेले तंत्रज्ञान यांच्यातील जवळचा संबंध अधोरेखित करत राजनाथ सिंह यांनी डीआयएटी सारख्या  संस्थांना केवळ संरक्षण क्षेत्रासाठीच नव्हे तर सामान्य नागरिकांना देखील तितक्याच प्रमाणात फायदेशीर असलेले नवीन नवोन्मेषी संशोधन हाती घेण्याचे आवाहन केले.  संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनाबाबत सविस्तर माहिती देताना  संरक्षणमंत्र्यानी ही संकल्पना म्हणजे सर्वात महत्त्वाचा घटक  असून देशातील संरक्षण सामग्रीला बळकटी देण्यासाठी अतिशय  महत्त्वाची आहे असे सांगितले. त्याचवेळी त्यांनी ही बाब स्पष्ट केली की  स्वावलंबन म्हणजे जगापासून वेगळे होणे नव्हे, “  आज संपूर्ण जग एक जागतिक गाव बनले असून  वेगळे राहणे शक्य होणार नाही.” स्वावलंबनाचे उद्दिष्ट आपल्या मित्र देशांच्या सुरक्षाविषयक गरजांची पूर्तता करतानाच आपल्या स्वतःच्या क्षमतेने सामग्री/ प्लॅटफॉर्म यांचे उत्पादन करून  संरक्षण दलांच्या गरजा भागवणे हे आहे,” असे ते म्हणाले.

संरक्षण उपकरणांच्या आयातीवरील अवलंबित्व भारताच्या धोरणात्मक स्वायत्ततेमध्ये अडथळा ठरू शकते यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला. या मुख्य कारणांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार या क्षेत्रात आत्मनिर्भरत बनण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले. “आत्मनिर्भरतेशिवाय, आपण आपल्या राष्ट्रीय हिताच्या अनुषंगाने जागतिक समस्यांवर स्वतंत्रपणे  निर्णय घेऊ शकत नाही. आपण जितकी जास्त उपकरणे आयात करू त्याचा तितका जास्त प्रतिकूल परिणाम आपल्या व्यापार संतुलनावर होईल. निव्वळ आयातदार होण्याऐवजी निव्वळ निर्यातदार होण्याचे आमचे ध्येय आहे. यामुळे केवळ आपली अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही, तर रोजगाराच्या संधीही वाढतील,” असे संरक्षण मंत्री यावेळी म्हणाले.

स्वावलंबनाला चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने उचललेल्या अनेक पावलांचा संरक्षण मंत्र्यांनी उल्लेख केला.  यामध्ये सशस्त्र दलांसाठी 411 प्रणाली   /उपकरणे असलेल्या चार सकारात्मक स्वदेशीकरण सूची  जाहीर करणे समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी चौथी सकारात्मक स्वदेशीकरण सूची जारी करण्यात आली आहे. या सूचीमध्ये एकूण 4,666 धोरणात्मकदृष्ट्या-महत्त्वाच्या लाईन रिप्लेसमेंट युनिट्स /उप-प्रणाली/ स्पेअर्स आणि घटकांचा समावेश आहे. या उपाययोजना  म्हणजे संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भरता’ प्राप्त करण्याच्या सरकारच्या दृढ वचनबद्धतेचा दाखला असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

राजनाथ सिंह यांनी नवोन्मेष क्षेत्राला सरकार देत असलेल्या विशेष प्राधान्यावर देखील प्रकाश टाकला. आज भारत हे स्टार्ट अप्ससाठी दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे केंद्र आहे आणि संरक्षण मंत्रालयाकडे सतत नवनवीन कल्पना येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. “डिफेन्स इंडिया स्टार्ट-अप चॅलेंजच्या गेल्या सात आवृत्त्यांमध्ये 6,000 हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या प्रयत्नात भारतीय स्टार्ट-अप्स महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. आता आणखी नवे पेटंट दाखल केले जात आहेत, हे नवोन्मेष सामर्थ्याचे  लक्षण आहे,” असेही ते म्हणाले.

सरकारच्या प्रयत्नांमुळे दिसून येत असलेल्या परिणामांवर, संरक्षण  मंत्री म्हणाले की आज भारत रायफल, ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, हलकी लढाऊ विमाने आणि स्वदेशी विमानवाहू वाहक तयार करत आहे, असे संरक्षण मंत्र्यांनी सरकारच्या विविध प्रयत्नामुळे मूर्त रुपात दिसत असलेल्या परिणामाबद्दल बोलताना सांगितले. संरक्षण निर्यातीत अलिकडच्या वर्षांत अनेक पटींनी वाढ झाली आहे. या निर्यातीत 2014 मधील 900 कोटी रुपयांवरून 2022-23 च्या आर्थिक वर्षात 16,000 कोटी रुपयांपर्यंत वृद्धी झाली आहे. भारत अनेक देशांना संरक्षण उपकरणे निर्यात करत आहे.अनेक देशांनी भारताच्या उत्पादन क्षमतेमध्ये स्वारस्य आणि विश्वास दाखवला आहे, असे ते म्हणाले. 2047 पर्यंत मजबूत, समृद्ध, आत्मनिर्भर आणि विकसित भारताचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यासाठी देशाच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले.

संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थेचे (DIAT) कुलपती असलेल्या संरक्षण मंत्र्यांनी या दीक्षांत समारंभात 261 M.Tech./ M.Sc उत्तीर्ण विद्यार्थी आणि विविध विषयांत 22 पीएच.डी. मिळवणाऱ्या 22 विद्यार्थ्यांसह 283 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली. याप्रसंगी एकूण 20 सुवर्णपदके बहाल करण्यात आली. राजनाथ सिंह यांनी संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थेत हाती घेण्यात आलेल्या विविध संशोधन उपक्रमांचे प्रयोगशाळेतले  प्रात्यक्षिकही पाहिले.

राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

औरंगाबाद  – सर्वसामान्य, शेतकरी-कष्टकऱ्यांचे हे सरकार असून त्यांच्या कल्याणाचे विविध निर्णय घेऊन जनतेला न्याय देण्याचे काम हे सरकार करीत आहे. राजपूत समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे,  राजपूत समाजाच्या पुढील ‘भामटा’ हा शब्द काढण्यात येईल आणि केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दरम्यान, महाराणा प्रतापसिंह हे स्वाभिमानी राजे होते, त्यांनी प्राण पणाला लावून राष्ट्राप्रति असणारा स्वाभिमान जपला. जनतेचा राजा म्हणून ओळख असलेल्या महाराणा प्रताप सिंहांचा इतिहास अजरामर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी केले.

औरंगाबाद शहरात सकल राजपूत समाजाच्या वतीने आज ‘वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.  अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते.  कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार जयकुमार रावल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराणा प्रतापसिंह आणि शिवाजी महाराज हे साहसी होते. महाराणा प्रतापसिंह यांनी सवंगड्यांना देखील युद्धाचे धडे दिले. सर्वसामान्य जनतेला आपलंसं केलं. महाराणा प्रतापसिंह यांनी अकबराच्या सैन्याला जेरीस आणले. हे दोन्ही धर्मवीर राजे आपल्या भूमीत होऊन गेले. यांचा आदर्श घेऊन आपण पुढे जात आहोत, असे सांगून राजपूत समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढून टाकण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केल्याची घोषणा करून आता यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल. राजपूत समाजाचे आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात येणार असून महाराणा प्रताप यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

लढवय्ये महाराणा प्रतापसिंह स्वाभिमानाचे प्रतिक- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

राष्ट्रीय स्वाभिमानाची भावना महाराणा प्रतापसिंह यांच्यात होती. त्यांनी आपले जीवन जंगलात व्यतित केले.  असे हे लढवय्ये महाराणा प्रताप सिंह स्वाभिमानाचे प्रतिक आहेत. पाचशे वर्षांपूर्वी महाराणा प्रताप जेवढे महत्त्वाचे होते आजही तेवढेच महत्त्वाचे आहेत, आणखी हजारो वर्षांनंतरही ते  महत्वाचे असतीलच. महाराणा प्रताप यांच्या कार्यकाळाला मुघल काळ न म्हणता महाराणा प्रताप काळ म्हणून ओळखले जावे, अशी अपेक्षाही केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केली. 

राजपूत समाजाला योजनेपासून वंचित ठेवणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राजपूत समाजाचे या देशाच्या इतिहासात  मोठे योगदान आहे. प्राण गेले तरी चालेल पण देशसेवा महत्वाची मानणारा हा समाज आहे. अशा या  समाजाला आता कोणत्याही योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी येत्या  15 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.

9 मुली खडकवासला धरणात बुडाल्या, 7 जणींची सुखरूप सुटका; दोघींचा मृत्यू

पुणे– खडकवासला धरणा जवळ डोणजे, गोर्हे खुर्द याठिकाणी नऊ मुली पाण्यात बुडाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेत सात मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली असून दोन बेपत्ता मुलींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.खुशी संजय खुर्दे (वय 13, पाण्याच्या टाकीजवळ, सोळंकी लेआऊट, ता. बुलढाणा) शितल भगवान टिटोरे (वय 18, आंबोडा झरीझरी, ता. जि. बुलढाणा) ही मृत मुलींची नावे आहेत. सर्व मुली मूळच्या बुलढाण्याच्या असून गोरेखुर्द या गावात गोरे खुर्द या गावात बारशाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या. कलमाडी फार्म हाऊस जवळ खडकवासला धरणाच्या पाण्यात आज सकाळी 9 मुली होण्यासाठी उतरल्या होत्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने सर्व नऊ मुली पाण्यात बुडाल्या. सुदैवाने 7 जणी वाचल्या मात्र दोघींचा मृत्यू झाला आहे.

प्राप्त झालेल्या प्रर्थामिक माहितीनुसार, डोनजे परिसरात गोऱ्हे खुर्द तालुका हवेली गावच्या हद्दीत आज सकाळी पोहण्यासाठी नऊ मुली पाण्यात उतरलेल्या होत्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने नऊ मुली पाण्यात बुडाल्याने त्यांनी आरडाओरड सुरू केली.

यावेळी जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी त्यापैकी सात मुलींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले तर दोन मुली अद्याप सापडल्या नाहीत.याबाबतची माहिती हवेली पोलिसांना कळवताच ते घटनास्थळी दाखल झाले. तसेच पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे जवान दाखल होऊन त्यांनी बेपत्ता मुलींचा पाण्यात शोध घेतला .

गोऱ्हे खुर्द येथे उदरनिर्वाहासाठी आलेल्या संजय लहाणे यांच्या घरी मांडव परातणीचा कार्यक्रम होता. त्यासाठी बुलढाणा व जळगाव येथून त्यांचे नातेवाईक आले होते. लहाणे खडकवासला धरणाच्या पाण्याच्या कडेला पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. सकाळी उठल्यानंतर मुलींनी पोहण्याचा हट्ट केला. सोबत आलेल्या वृद्ध महिलांनी मुलींना पाण्यात जाऊ नका असे सांगितले परंतु मुलींनी ऐकले नाही.पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने मिना संजय लहाणे यांच्यासह इतर सहा मुली पाण्यात बुडू लागल्या. काठावर बसलेल्या दोघींनी आरडाओरड केल्यानंतर सावडण्याच्या कार्यक्रमासाठी आलेले स्थानिक संजय माताळे, राजेंद्र जोरी, कालिदास माताळे,शिवाजी माताळे व रमेश भामे हे मदतीसाठी धावले.

संजय माताळे यांनी पाण्यात उडी घेऊन एक-एक करुन पाच जणींना पाण्याबाहेर काढले. राजेंद्र जोरी, कालिदास माताळे व इतरांनी बाहेर काढलेल्या मुलींच्या पोटातील पाणी बाहेर काढून तातडीने खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल केले. हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, हवालदार दिनेश कोळेकर व विलास प्रधान हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

पीएमआरडीए चे विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज माळी, किशोर काळभोर, सुरज माने, योगेश मायनाळे व ओंकार इंगवले या जवानांनी बुडालेल्या दोघींचे मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढले

18 कोटींमध्ये झाला होता आर्यन खान प्रकरणाचा सौदा, समीर वानखेडेंविरोधात FIR मध्ये खुलासा

मुंबई-आर्यन खान प्रकरणात NCB चे माजी अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सीबीआयने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) मुंबई झोनच्या माजी संचालकाविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अडकवण्यात येणार नसल्याच्या बदल्यात 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप समीर वानखेडेवर आहे.एफआयआरनुसार, समीर वानखेडेच्या सांगण्यावरून गोसावीने आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची मागणी केली होती. या रकमेच्या बदल्यात आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते.

एफआयआरच्या प्रतीनुसार, समीर वानखेडे यांनी गोसावी यांना सौद्याच्या पैशाच्या प्रकरणात संपूर्ण सूट दिली होती. गोसावी यांनी 18 कोटींचा सौदा पक्का केला होता. एवढेच नाही तर गोसावी यांनी 50 लाख रुपये अॅडव्हान्सही घेतले होते.तपासात समीर वानखेडेने यांनी आपल्या परदेश प्रवासाबाबत योग्य माहिती दिली नव्हती. त्यांनी त्यांच्या महागड्या घड्याळ आणि कपड्यांबद्दल सत्य देखील सांगितले नाही. समीर वानखेडे यांच्या बेहिशोबी मालमत्तेचाही एफआयआरमध्ये उल्लेख आहे.

12 मे रोजी समीर वानखेडेवर मोठ्या कारवाईत सीबीआयने त्यांच्या घरावर छापा टाकला होता. सीबीआयच्या पथकाने वानखेडे यांची त्यांच्या मुंबईतील घरी 13 तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. सीबीआयचे अधिकारी वानखेडेचे वडील, सासरे आणि बहीणच्याही घरी पोहोचले होते.आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला. समीर वानखेडेंच्या घरी सीबीआयचा छापा; आयर्नखानच्या नातेवाईकांना लाच मागितल्याचे प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीने अहवाल दिल्यानंतर सीबीआयने हे पाऊल उचलले. यासह कार्डेलिया क्रूझ केसमध्ये लाच मागितल्याच्या प्रकरणी वानखेडेंसह इतरांवरही बेहिशीबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

शाश्वत विकास सहज शक्य आहे: आनंद चोरडिया यांचे विज्ञान व्याख्यानमालेत शंभरावे मुख्य भाषण

पुणे, – 15 मे २०२३

उद्योजक आणि पर्यावरण योद्धा, आनंद चोरडिया यांचा प्रवास स्वच्छ आणि हरित भारतामध्ये आरोग्य आणि संपत्तीच्या विविध शोधांना एकत्र आणण्याचा आहे. “शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही समुदायांना शाश्वत, स्वच्छ, हरित, आरोग्यदायी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने व्यवहार्य जीवनशैलीचे पर्याय प्रदान करण्याच्या दृष्टीकोनातून मी द इको फॅक्टरी फाउंडेशन (TEFF) सुरू केला आहे”, आनंद चोरडिया, संचालक, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, सुहाना मसाला, तसेच संस्थापक, द इको फॅक्टरी फाउंडेशन (TEFF), म्हणाले. मराठीविज्ञानपरिषदपुणेपिपरीचिंचवडसायन्सपार्कआयोजित विज्ञानव्याख्यानमाला शतकपूर्ती समारंभात ते बोलत होते.

शेखर सिंग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त आणि अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क हे या कार्यक्रमासाठी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्रकुमार सराफ, अध्यक्ष, मराठी विद्या परिषद, पुणे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कचे संस्थापक संचालक प्रवीण तुपे यांनी सर्व पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागत करून सायन्स पार्कच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध विज्ञान उपक्रमांची माहिती दिली, तसेच सायन्स पार्कच्या स्थापनेपासूनचा इतिहास सविस्तर मांडला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांनी उपस्थितांना संबोधित करताना शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धन तसेच संवर्धन यांच्यात समतोल साधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

त्यानंतर आनंद चोरडिया यांनी नियोजित कचरा व्यवस्थापन, विल्हेवाट, पुनर्वापर आणि कचऱ्याचे व्यवस्थापन याबद्दल अभ्यासपूर्ण भाषण केले आणि शाश्वत विकास सहज शक्य आहे यावर भर दिला. “विविध सेंद्रिय भाज्या, फळे, कडधान्ये आणि औषधी वनस्पती वाजवी दरात वाढवणे आणि विकणे ते कचर्‍यापासून सर्वोत्तम निर्मिती करणे, हे सर्व TEFF करते. उदयोन्मुख प्रतिभेकडे विशेष लक्ष दिले जाते: अगदी नवोदित अन्न शास्त्रज्ञांपासून ते एक धाडसी नवीन भाषा बोलणाऱ्या कृषी व्यवसायीपर्यंत,” त्यांनी स्पष्ट केले.

सायन्स पार्कनतर्फे राष्ट्रीय स्तरावर अशी विज्ञान व्याख्याने आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली गेली.

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात भगवद््गीतेच्या १८ अध्यायांचे पठण 

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे व गीता धर्म मंडळाच्या पुढाकाराने आयोजन ; तब्बल ५० हून अधिक साधकांचा सहभाग
पुणे : नैनं छिद्रन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक : न चैनं क्लेदयंत्यापो न शोषयति मारुत… या भगवद््गीतेतीचा सार असलेल्या या श्लोकासह संपूर्ण गीतेचे पठण लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात झाले. भगवद््गीतेची प्रार्थना, १८ अध्यायांचे पठण, गीता महात्म्य, गीतेची आरती आणि विष्णूसहस्त्रनाम पठणाने दत्तमंदिराचा परिसर भक्तीमय झाला. 
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या १२६ व्या वर्षी व गीता धर्म मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त भगवद््गीता ज्ञानयज्ञ सामुदायिक गीता पठण कार्यक्रमाचे आयोजन मंदिरात करण्यात आले होते. दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे, गीता धर्म मंडळाचे डॉ. मुकुंद दातार, डॉ. मुकुंद कोंढवेकर, अनुजा चोपडे, सुनिता फडके, विनया मेहेंदळे आदींनी आयोजन केले.  
डॉ. मुकुंद दातार म्हणाले, गीता धर्म मंडळाच्या स्थापनेला १०० वर्षे झाली असून लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतून याचा प्रारंभ झाला. शताब्दीनिमित्त गीता घरोघरी हा उपक्रम आम्ही राबवित आहोत. सर्वांनी गीता शिकून त्याचे पठण करावे, हा आमचा प्रयत्न आहे. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात देखील तीन तास गीता पठण करीत ५० साधक सहभागी झाले आहेत. 
युवराज गाडवे म्हणाले, भगवद्गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ म्हणून ‘गीतोपनिषद’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे. सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. यात एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत. भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे याचे पठण मंदिरात करण्यात आले.

ना आश्वासन, ना तारीख थेट संवाद अन जागेवरच निर्णय

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा कोथरुडमधील उपक्रमाचा तिसरा टप्पा

पुणे: पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या ‘थेट भेट’ उपक्रमाच्या माध्यमातून आज कोथरुडमधील थोरात गार्डन येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर ना आश्वासन, ना तारीख थेट जागेवर निर्णय देत नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या कोथरुडमधील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी थेट भेट उपक्रम सुरू केला असून, आज या उपक्रमातील तिसऱ्या टप्प्यातील कार्यक्रम कोथरुडमधील थोरात गार्डन येथे झाला. यावेळी उद्यानात येणाऱ्या नागरिकांनी आपल्या तक्रारी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या समोर मांडल्या.

यात प्रामुख्याने लहान मुलांसाठी बालनाट्याचा कार्यक्रमाचे आयोजन, उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर उद्यानातील डायनासोर पुन्हा कार्यान्वित करणे, स्वच्छता गृहातील दिवे यांसह टवाळखोर तरुणांवर चाप बसवणे आदी समस्या मांडल्या. कोल्हापूरच्या धर्तीवर कोथरुड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या टेरेसवर तारांगण उभारावे, अशी अपेक्षा काही नागरिकांनी व्यक्त केली.

त्यावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सर्व समस्या निवारण करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या टेरेसवर तारांगण साकारण्यासाठी आयुक्तांशी चर्चा करुन त्याची अंमलबजावणी करु, अशी ग्वाही दिली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्यतत्परतेवर नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

मुंबईतील इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. १४ : – मुंबईतील इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार असून यासाठी आवश्यकता भासल्यास प्रचलित  नियमांत बदल करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

गोरेगांव येथील नेस्को मैदानावर आयोजित गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट गृहनिर्माण सहकारी संस्था पुरस्कार -२०२३ प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर , मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे  (म्हाडाचे ) मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न मोठा आहे. या विषयावर या परिषदेत चर्चा करण्यात आली. काही कायदे आणि नियम यांचा फेरआढावा घेणे आवश्यक आहे. त्यात बदल होणे गरजेचे आहे. शासन स्तरावरून या सूचनांची सकारात्मक दखल घेतली जाईल. त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थांनी “सेल्फ रिडेव्हलपमेंट” हे धोरण राबविण्याचे ठरविले आहे. या स्वयंपुनर्विकासाचा  सर्वसामान्यांना लाभ होणार आहे. यासाठी ‘स्वयं  पुनर्विकास  महामंडळ ‘ स्थापन व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावर शासन निश्चितच सकारात्मक विचार करेल असेही श्री. शिंदे म्हणाले.

गृहनिर्माण संस्थेला दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदर कमी करणे, बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवरील चाळीचा प्रश्न, ज्या इमारतींना ओसी  प्रमाणपत्र मिळाले नाही अशा इमारतींचा पुनर्विकास, यासारख्या अनेक मागण्यांवर शासन तोडगा काढेल असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी पुरस्कार मिळालेल्या गृहनिर्माण संस्थाचे अभिनंदन केले तसेच वर्षा बंगल्यावर चहापानाचे आमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिले.

दि. डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह फेडरेशन हे भारतातील सर्वात मोठे फेडरेशन असून २४ हजार गृहनिर्माण संस्था यांचे सदस्य आहेत. गेल्या पंचाहत्तर वर्षांपासून सातत्य राखत उत्तम कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या शिखर संस्थेचे तसेच मुंबै बॅंकेचे कौतुक केले.

यावेळी बोलताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, गृहनिर्माण संस्थांच्या जागेसंबधी महसूल विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या विविध मागण्या या परिषदेत करण्यात आल्या. या मागण्यांवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. विदर्भात नझुलच्या जमिनीसंदर्भात लागू केलेला निर्णय इतर ठिकाणी लागू करता येईल, जमिनीवर भरावयाच्या करासंदर्भातही काही महत्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे. यानुसार वारंवार कर भरण्याची आवश्यकता राहणार नाही असा प्रस्ताव मांडत आहोत. सर्व परवानग्या आणि मंजुऱ्यांसाठी एक खिडकी योजना आणली आहे. मुंबईत सहकार भवन साठी जागा द्यावी  ही मागणी या परिषदेत करण्यात आली , त्यासाठी गोरेगाव येथे जागा देण्याचे आश्वासन श्री. विखे-पाटील यांनी यावेळी दिले. परिषदेच्या भव्य आणि यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

गृहनिर्माण संस्थांना पुरस्कार

स्वच्छता, पर्यावरण रक्षण, सौदर्यीकरण आणि आरोग्यविषयक जनजागृती या निकषांवर आधारित हजारो संस्थांच्या प्रवेशिकांमधून निवडक काही संस्थांना यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. एक लाख रूपयांचा धनादेश, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी असे या पुरस्काराचे स्वरूप होते. निवडक पाच संस्थांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर इतर संस्थांना संचालक मंडळाच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात छेडा हाईट्स, रहेजा विस्टा, स्प्लेंडर कॉम्प्लेक्स, विशाल सह्याद्री आणि संजोग को. ऑप. संस्थांचा समावेश होता.

पूरग्रस्तांच्या वाढीव बांधकामावर कारवाई नको, नियमित करा :आबा बागुल सर्वपक्षीय प्रतिनिधींना घेऊन मुख्यमंत्री शिंदेंना भेटणार

सर्वसामान्य पुरग्रस्तवासीयांच्या घरांवर
‘ बुलडोझर’ ,धनदांडग्यांना ‘अभय’
‘प्रशासक राज’च्या मनमानीचा सुट्टीच्या दिवशी फटका : पर्वती दर्शनमधील हजारो नागरिक आक्रमक

पुणे-पुरग्रस्तांचे पुनर्वसन झाले, गावठाण म्हणून पालिकेत ठरावही झाला मात्र कुटुंबांत सदस्यांची संख्या वाढली ;पण आजतागायत नावावर घरेही नाहीत की दुरुस्ती, वाढीव बांधकामाबाबत निर्णयही नाही असे असताना जमापुंजीतून आम्ही थोडेफार वाढीव बांधकाम केले मात्र त्यावर सुट्टीच्या दिवशी अचानक यंत्रणा कामाला लावून आमच्या घरांवर पालिका आयुक्तांनी तडकाफडकी ‘बुलडोझर’ फिरवला मग ही तत्परता आयुक्त शहरात बेकायदेशीररित्या उभारलेल्या रूफटॉप हॉटेलसह अनधिकृत बांधकामे केलेल्या बलाढ्य व्यावसायिकांवर दाखवतील का? अशा शब्दात पर्वती दर्शन येथील पूरग्रस्त वासीयांनी टाहो फोडला.
पर्वती दर्शन येथील पूरग्रस्त वसाहतीत रविवारी पालिका प्रशासनाने अचानक अतिक्रमण विरोधी कारवाई केली. मात्र प्रशासक तथा पालिका आयुक्त या भागातून जात असताना त्यांनी याठिकाणी तातडीने कारवाई करण्याचे फर्मान सोडले आणि अर्धा तासात सुट्टीच्या दिवशी सर्व यंत्रणा जागेवर पोहचली आणि कारवाई सुरु केली असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. पूरग्रस्त वसाहतीत आम्ही अनेक वर्षे राहत आहोत.तसेच गावठाण म्हणूनही पालिकेत ठराव झालेला आहे. पुनर्वसनात ही घरे आम्हाला मिळाली मात्र अद्याप ही घरे नावावर झालेली नाहीत. आज आमच्या कुटुंबात सदस्यांची संख्या वाढल्याने घरे अपुरी पडत आहेत. त्यात अनेक घरांची डागडुजी तसेच थोडेफार वाढीव बांधकामे कुटुंबाची गरज लक्षात घेऊनच जमापुंजीतून केली.असे असले तरी पूरग्रस्त वसाहतीतील बांधकामांबाबत पालिका प्रशासनच काय जिल्हाधिकारी कार्यालयातकडेही नियमावली नाही. असे असतानाही प्रशासक तथा आयुक्तांच्या ‘आले मनात’ यानुसार मनमानीने आमच्या घरांवर सुट्टीच्या दिवशी कशी काय कारवाई ? असा संतप्त सवालही नागरिकांनी केला आहे.

दरम्यान याबाबत महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते व माजी उपमहापौर आबा बागुल यांनीही पर्वती दर्शन पूरग्रस्त वसाहत संदर्भात गावठाणाचा दर्जा देण्याबाबत पालिकेत यापूर्वीच ठराव झालेला असल्याचे स्पष्ट केले.
ते म्हणाले, पूरग्रस्त वसाहतीतील रहिवाशांनी किती दिवस परवड सहन करायची यावर विचार करण्याची गरज आहे. ज्यावेळी इथे लोकांचे पुनर्वसन झाले ,त्यावेळी असणारी कुटुंबे आणि त्यांची सदस्य संख्या मात्र आज वाढली आहेत. साहजिकच घरे अपुरी पडत असल्याने कष्टकरी असणाऱ्या या वर्गाने जमापुंजीतून उभारलेली वाढीव बांधकामाची घरे जमीनदोस्त करण्यापेक्षा कोणता तोडगा काढता येतो हे पाहणे महत्वाचे आहे.त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पूरग्रस्त वसाहतीतील रहिवाशांच्या समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासंदर्भात निवेदन देणार असून पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला जाईल असेही आबा बागुल म्हणाले.

सामान्य मुंबईकरांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १४: सामान्य मुंबईकरांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी ‘ॲक्शन मोड’वर काम करीत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे दि डिस्ट्रिक्ट को-ऑप. हौसिंग फेडरेशन लिमिटेड व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सहकार मंत्री अतुल सावे, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मनोज कोटक, आमदार प्रविण दरेकर, आमदार अमित साटम, आमदार विद्या ठाकूर, आमदार मनीषा चौधरी, आमदार भारती लव्हेकर, प्रकाश दरेकर, सिद्धार्थ कांबळे, चंद्रशेखर प्रभू आदी व्यासपीठावर उपस्थित होते.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सोपी करण्यासाठी ‘ईज ॲाफ डुईंग बिझनेस’ गरजेचे आहे. गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास योजनेची संपूर्ण प्रक्रिया राबविण्यासाठी ‘एक खिडकी योजना’ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध विभागांच्या समन्वयासाठी विशेष कक्षही सुरु करण्यात येईल. या योजनेंतर्गत स्वयंपुनर्विकास प्रस्तावांना ३ महिन्यात मान्यता देण्यात येईल. गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी तसेच रस्त्यांलगतच्या गृहनिर्माण संस्थांना वाढीव चटईक्षेत्राचा लाभ मिळण्यासाठी रस्त्यांच्या ९ मीटर रुंदीची अट रद्द करण्यात येईल. पुनर्विकासामध्ये सगळ्या कराराकरिता आकारल्या जाणाऱ्या मुद्रांक शुल्काप्रमाणे स्वयंपुनर्विकासाकरिता देखील १०० रुपये  मुद्रांक शुल्क आकारण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

स्वयंपुनर्विकास प्रक्रियांसाठी ऑनलाईन प्रणाली

स्वयंपुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांना  व्याज सवलत देण्यात येईल.  मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र, स्टॅम्प ॲडज्युडीकेशन करणे, नोंदणी करणे, मालमत्ता पत्रकात नोंद करणे या  बाबींसाठी कायदेशीर बदल करण्याचे ठरविले आहे.  ही प्रक्रिया सोपी आणि गतिमान करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येईल. या प्रणालीद्वारे अर्जावर एका महिन्यात निर्णय घ्यावा लागणार आहे. दस्त नोंदणी ॲानलाईन पद्धतीने होणार आहे. दहा दिवसात प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात येणार असून ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर चार दिवसात फेरफार करण्यात येईल अशी ॲानलाईन प्रणाली सुरु करण्यात येणार आहे. दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

’म्हाडा आपल्या दारी’ उपक्रम राबविणार

जुन्या गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कनव्हेअन्स) साठी मुद्रांक शुल्काच्या थकबाकीकरिता अभय योजना आणण्यात येईल. म्हाडाच्या ५६ वसाहतीत व इतर म्हाडाच्या भूखंडावरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना वाढीव सेवाशुल्क रद्द करण्याचा निर्णयदेखील यावेळी जाहीर करण्यात आला. ‘म्हाडा आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येईल. पुनर्विकासासाठी लागणाऱ्या सर्व बाबी एकाच ठिकाणी मिळण्यासाठी हा उपक्रम राबविला जाईल, अशी माहितीही श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

स्वयंपुनर्विकास आर्थिक महामंडळ विचाराधीन

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास प्रकल्पांकरिता कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात येईल. पुनर्विकासाबाबतच्या तक्रार निवारण समितीमध्ये सदस्य म्हणून संबंधित जिल्हा को-ऑप. हौसिंग फेडशनच्या प्रतिनिधीचा समावेश करण्यात येईल.

स्वयंपुनर्विकास आर्थिक महामंडळ सुरु करण्याचा विचार करण्यात येत आहे. बॅंकांना एकत्र करुन निधी जमा करण्यासाठी हे महामंडळ सुरु करण्याचा विचार राज्य शासन करीत आहे.  सहकार विभागाने अधिक सहकार्याच्या भावनेने काम करावे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उत्तम कामगिरी करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कोथरूडमधील महिला व तरुणींना ‘द केरल स्टोरी’चे मोफत स्क्रिनिंग

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा उपक्रम

पुणे-सध्या बहुचर्चित द केरल स्टोरी चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीचा बनला असून, समाजातील ज्वलंत विषय अधिकाधिक माहिला आणि तरुणींनी हा विषय समजून घ्यावा, यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष उपक्रम घेतला आहे. नामदार पाटील यांच्या माध्यमातून कोथरुडमधील दहा हजार पेक्षा जास्त महिला आणि तरुणींना ‘द केरल स्टोरी’ चित्रपट दाखविण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, आजपर्यंत पाच हजार पेक्षा जास्त महिलांनी हा सिनेमा पाहिला आहे.

समाजातील ज्वलंत विषय मांडण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे सिनेमा. द केरल स्टोरीज हा असाच समाजातील ज्वलंत विषय मांडणारा सिनेमा असून, सध्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीचा बनला आहे. हजारो तरुणी आणि तरुणी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत आहेत.

कोथरूड मतदारसंघातील सर्व महिलांना ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील सत्य परिस्थितीची जाणीव व्हावी यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला असून, हा सिनेमा मोफत दाखवण्यात येत आहे. जवळपास दहा हजार पेक्षा जास्त महिला व तरुणींनी हा चित्रपट पाहावा यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. गेल्या आठ दिवसांत पाच हजार पेक्षा जास्त महिला व तरुणींनी हा चित्रपट पाहिला आहे.

सफाई कामगारांच्या मृत्यूप्रकरणी काही तासांतच सफाई कामगारांच्या कुटुंबीयांना ५० लाखाचे अर्थसहाय्य मंजूर

पुणे दि.१४- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलता व शासनाच्या विविध विभागांच्या कार्यतत्परतेमुळे परभणी तालुक्यात भाऊचा तांडा येथील दुर्घटनेत मृत पावलेल्या सफाई कामगारांच्या कुटुंबियांना अवघ्या काही तासांतच ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य शासनाने मंजूर केले आहे.

सोनपेठ तालुक्यातील शेळगाव ग्रामपंचायती अंतर्गत भाऊचा तांडा येथील शेतामधील सेप्टिक टॅंकची सफाई करताना दुर्दैवाने ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ११ मे २०२३ रोजी रात्री ९ वाजता घडली होती. याबाबत जिल्हाधिकारी परभणी यांनी मुख्यमंत्री यांना अवगत केल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार काही तासातच शासकीय अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

मृत पावलेल्या एकूण ५ सफाई कामगारांच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य अदा करण्याकरिता सामाजिक न्याय विभागाने प्रत्येक व्यक्ती १० लाख याप्रमाणे एकूण ५० लाख रुपयांचा निधी १२ मे २०२३ च्या शासन निर्णयानुसार मंजूर केला आहे.

सद्यस्थितीत सदर मंजूर केलेल्या निधीचा पहिला हप्ता प्रत्येकी ५ लाख याप्रमाणे रुपये २५ लाख रुपये तात्काळ उपलब्ध करून दिले आहेत. हा निधी लवकरच सदर मयत झालेल्या कामगारांच्या वारसांना मिळणार आहे.

हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम २०१३ अंतर्गत महाराष्ट्र राज्यात दूषित गटारामध्ये उतरून काम करताना मृत्यू झालेल्या मॅन्युअल स्कॅवेंजर यांच्या वारसांना रुपये १० लाख रुपये नुकसान भरपाई रक्कम अदा करण्याची तरतूद आहे.

जिल्हाधिकारी परभणी यांनी १२ मे रोजी समाज कल्याण विभागास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी समाज कल्याण विभागास तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे व आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यावर तात्काळ पाठपुरावा करुन नुकसान भरपाई मंजूर केली आहे.

गांधींबाबत बुध्दीभेदाचे प्रयत्न हाणून पाडा : निरंजन टकले

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी , युवक क्रांती दलाकडून आयोजन

पुणे :

‘सत्य, लोकशाही, प्रेम,समता,बंधुता ही श्वाश्वत मुल्ये आहेत, चिरंतन मुल्ये आहेत. संघ, सावरकरवादी आणि रा. स्व. संघाला द्वेष वाढवून ही शाश्वत मूल्ये नष्ट करायची आहेत. द्वेषाचे हे राजकारण फेकून द्यायचे असेल तर गांधींजींप्रमाणे चिरंतन, शाश्वत मुल्यांचा आक्रमक प्रसार करावा लागेल ‘, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी रविवारी केले.’कर्नाटक मधील युवापिढीने द्वेषाचे राजकारण फेकून दिले. पुढील पिढी लोकशाहीमधेच नांदावी, असे वाटत असेल तर आपण या पिढीत प्रबोधनाचा आग्रह धरला पाहिजे. संघटन, विचार प्रसाराची यंत्रणा तयार करावी लागणार आहे. सत्तेविरुद्ध सत्याचा विजय होणारच आहे ‘, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे पुण्यात ‘ गांधी दर्शन शिबिर ‘ या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रविवार, दि. १४ मे २०२३ रोजी सकाळी १० ते ६ या वेळात ही कार्यशाळा गांधी भवन, कोथरूड पुणे येथे पार पडली.या कार्यशाळेत ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, प्रा. श्रीरंजन आवटे यांनी मार्गदर्शन केले.डॉ. कुमार सप्तर्षी,(अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि संस्थापक, युवक क्रांती दल) हे अध्यक्षस्थानी होते.अन्वर राजन, डॉ. उर्मिला सप्तर्षी, प्रशांत कोठडिया, संदीप बर्वे,सुदर्शन चखाले ,सचिन पांडुळे , अस्लम बागवान ,अप्पा अनारसे,प्रसाद झावरे-पाटील उपस्थित होते.

निरंजन टकले म्हणाले, ‘गांधीजींनी चरख्याद्वारे सर्वसामान्य माणसाला कार्यप्रवण केले, आश्वस्त केले आणि इंग्रजांच्या दडपशाहीविरोधात अहिंसात्मक साधन दिले. महात्मा गांधींनी मध्ययुगीन उदाहरणे सांगितली नाही,त्यांनी वर्तमानातील प्रश्नांना वर्तमानकालीन उत्तरे दिली.कोणत्याही खोट्या प्रचाराबाबत मनात प्रश्न आले पाहिजेत.विश्लेषण करता आले पाहिजे. तरच बुध्दीभेद करणाऱ्या प्रचार साहित्याचे प्रयत्न हाणून पाडता येतील.’चले जाव ‘ सारख्या शब्दांना गांधीजींनी मंत्राचे सामर्थ्य दिले. कारण त्यांना नैतिक अधिष्ठान होते.गांधीजींचे विरोधक, मारेकरी सत्तेवर आले असले तरी त्यांच्यापैकी कोणीही नथुराम हे नाव मुलाबाळांना दिलेले नाही. ही शरम जिवंत आहे, तो पर्यंत गांधीजी जिवंत राहतील.स्वातंत्र्यसंग्रामाचे, स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास सांगणारे संग्रहालय व्हायला हवे, म्हणजे स्वातंत्र्यलढयात कोण सहभागी होते, कोण नव्हते , हेही सर्वांसमोर येईल’, असेही टकले यांनी सांगितले.

रा. स्व. संघाकडून गांधींबद्दलचा अपप्रचार : डॉ.कुमार सप्तर्षी

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘ संघाला पुराणकालीन व्यवस्था आणायची आहे. यज्ञ संस्कृतीचा ब्राह्मण वर्चस्ववाद आणायचा आहे. व्यक्तीचा मानसिक दृष्टया ताबा घेऊन ते प्रसार करतात. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मुल्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नको आहेत . संघाने अपप्रचार करून गांधीजींची चुकीची प्रतिमा पसरवली आहे. खरे गांधी विचारांनी अजून जिवंत आहेत. खरा गांधी झाकोळून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कॉंग्रेसही गांधी विचार पुढे नेण्यात अपयशी ठरली.गांधी हे शास्त्र आहे. सार्वजनिक जीवनात ते उपयुक्त आहे, ज्यांनी सत्याग्रहाची कास धरली, त्यांना अपयश येत नाही. सत्याला सामर्थ्याची जोड दिली तरच विजय होतो . लोक उभे राहिले की द्वेषवादी वृतीचा पराभव होतो, हे कर्नाटकात दिसले आहे’, असेही डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले.