Home Blog Page 1536

तेरे मेरे मिलन की ये रैना, या गीताच्या भावपूर्ण आठवणींना उजाळा देण्यासाठी ईफ्फीने केले प्रतिनिधींना निमंत्रित

(Sharad Lonkar)

आयुष्य लहान आणि भौगोलिकदृष्ट्या मर्यादित असू शकते, मात्र कलेला वेळ आणि स्थानाचे बंधन नाही. त्यामुळेच कलाकार आपल्या मनात आणि हृदयात कायम जिवंत राहतो.  मुंबईत या वर्षी फेब्रुवारीमध्ये निधन झालेल्या सूरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आदरांजली वाहण्यात येत आहे. या  दिग्गज गायिकेची भावपूर्ण गाणी तर अनेक आहेत, प्रत्येक गाण्यातून त्यांनी भारतीय चित्रपट आणि संस्कृतीत स्वतःचे मोठे योगदान दिले आहे, तरीही या महान कलाकाराला श्रद्धांजली वाहण्यासाठी, ईफ्फीने  हृषिकेश मुखर्जी यांचा 1973 वर्षी प्रदर्शित झालेला अभिमान हा संगीतमय भावनाप्रधान   चित्रपट निवडला आहे.

भारतीय चित्रपटांच्या 70 च्या दशकातील हृदयस्पर्शी आठवणींच्या हिंदोळ्यावरुन मारलेला फेरफटका, तरुण आणि वृद्ध अशा दोन्ही पिढीतील, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सिनेरसिकांसाठी दुहेरी पर्वणीच ठरते.  अभिनेते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी खूप सुंदरपणे साकारलेल्या सुबीर आणि उमा या प्रमुख पात्रांच्या जीवनात, प्रेम, सांगितीक महत्वाकांक्षा आणि अहंकार या भावभावनांच्या परस्पर सरमिसळीतून निर्माण होणाऱ्या क्लेशदायी कल्लोळाशी ते एकरुप होतील आणि पुन्हा पुन्हा एकरुप होतच राहतील.  इतकेच काय, ‘तेरे मेरे मिलन की ये रैना’, ‘तेरी बिंदिया रे’ आणि ‘नदीया किनारे’ यासारख्या सुमधूर गाण्यांच्या हृदयद्रावक सादरीकरणाच्या स्वर्गीय सौंदर्यात न्हाऊन निघत, चित्रपटरसिक या  मुलभूत जीवनसंघर्षात  तल्लीन होऊन जातील.  चित्रपट रसिक ज्यांना प्रेमाने दिदी म्हणतात, त्या लताजींनी,  ‘अब तो है तुमसे हर खुशी अपनी’ आणि ‘लुटे कोई मन का नगर’… या चित्रपटातल्या अन्य गाण्यांमध्येही आपला कालातीत आवाज आणि सर्वस्व ओतले आहे.

Late Lata Mangeshkar (file pic)

भारतीय संस्कृती आणि जीवनपद्धती सतत तुमच्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवा: लता मंगेशकर यांनी इफ्फीच्या 33 व्या महोत्सवात,  उद्घाटन सोहळ्यात म्हटले होते.

ऑक्टोबर 2002 मध्ये नवी दिल्ली इथे झालेल्या ईफ्फीच्या 33 व्या महोत्सवात, लतादिदींनी चित्रपट निर्माते आणि चित्रपट प्रेमींना दिलेल्या या  संदेशाला, आत्ता या महोत्सवात या महान गायिकेला आदरांजली अर्पण करत असताना उजाळा देणे, नक्कीच उचित ठरेल.

संपन्न आणि सभ्य भारतीय संस्कृतीचं तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पिछाडीवर पडण्यापासून रक्षण करायला विसरू नका असं आवाहन या महोत्सवाचं उद्घाटन करताना लता मंगेशकर यांनी चित्रपट निर्मात्यांना केलं. भारतीय सिनेमाचे आद्य प्रवर्तक दादासाहेब फाळके यांच्या जोडीने भारतीय सिने उद्योगाला नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीतही अथक परिश्रम घेतलेल्या कलाकारांचा असीम त्याग कायम स्मरणात ठेवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या सह कलाकारांना केलं. भारताच्या सर्व भागातल्या कलाकारांनी भारतीय सिने उद्योगाच्या विकासाकरता योगदान दिल्याची आठवण त्यांनी  इफ्फी-33 च्या शिष्टमंडळाला करून दिली.

भारतीय सिनेमात अमूल्य योगदान देणाऱ्या संगीताचा संदर्भ देत लता मंगेशकर म्हणाल्या की, भारतीय जीवन आणि समाजाच्या प्रत्येक पैलूमध्ये संगीताचा अंतर्भाव आहे. ते केवळ समृद्ध झालं नाही तर त्याने भारतीय सिनेमाला अद्वितीय ओळख निर्माण करून दिली आहे. त्यावेळच्या माहिती आणि प्रसारण मंत्री सुषमा स्वराज यांनी भारतीय सिनेमाला इतर देशांमध्ये प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी प्रशंसा केली. येत्या काही वर्षात हा उद्योग नवीन उंची गाठेल याबाबत संगीतप्रेमींच्या पिढया आशादायी होत्या असं त्या म्हणाल्या. 

लता मंगेशकर : संगीताला समर्पित केलेलं आयुष्य.

लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मराठी आणि कोकणी संगीतकार पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या घराण्यात झाला. त्यांचा मूळ नाव हेमा असून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यासह इतर पाच भावंडांमध्ये त्या वयानं सर्वात मोठ्या होत्या. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय संगीतकार तसंच रंगभूमी कलाकार होते.

लता मंगेशकर यांनी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं आणि त्यानंतर 1942 मध्ये ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटात अभिनय केला. 1946 मध्ये त्यांनी वसंत जोगळेकर दिग्दर्शित हिंदी चित्रपट ‘आपकी सेवा मे’ मध्ये पहिल्यांदा हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं.

1972 मध्ये लता मंगेशकर यांना ‘परिचय’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. पुढील काळात या ज्येष्ठ गायिकेनं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक पुरस्कार पटकावले.  यात प्रतिष्ठेच्या भारतरत्न पुरस्कारासह फ्रेंच सरकार द्वारा मानाचा लीजन ऑफ हॉनर खिताब, दादासाहेब फाळके पुरस्कार, तीनदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चार वेळा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. 1984 मध्ये मध्यप्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्काराची तर 1992 मध्ये महाराष्ट्र सरकारने सुद्धा गायनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी लता मंगेशकर पुरस्काराची घोषणा केली.

फेस ऑथेंटिकेशन अर्थात चेहरा प्रमाणीकरण तंत्राद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्राचा प्रचार करण्यासाठी निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे पथक अंबरनाथला भेट देणार

0

मुंबई- केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने (DoPPW) केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या प्रसारासाठी देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये, केंद्रीय राज्यमंत्री (पीपी) डॉ. जितेंद्र सिंह यांनी, कोणत्याही अँड्रॉइड मोबाइल फोनद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे अगदी महत्वाचे चेहरा प्रमाणीकरण (फेस ऑथेंटिकेशन) तंत्र सुरू केले होते. आता, निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग (DoPPW)  हे डिजिटल तंत्रज्ञान वापरून काढण्यात येणाऱ्या जीवन प्रमाणपत्राचा प्रचार करण्यासाठी आणि फेस ऑथेंटिकेशन तंत्र (चेहरा प्रमाणन तंत्र) लोकप्रिय करण्यासाठी एक विशेष देशव्यापी मोहीम सुरू करत आहे. सर्व नोंदणीकृत निवृत्तीवेतनधारक संघटना,  निवृत्तीवेतन वितरण बँका, भारत सरकारची मंत्रालये आणि सीजीएचएस आरोग्य केंद्रे यांना निवृत्तीवेतनधारकांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ अर्थात जीवन सुलभीकरणासाठी विशेष शिबिरे आयोजित करून जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट/फेस ऑथेंटिकेशन तंत्राचा प्रचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या श्रृंखलेत, केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे (DoPPW) पथक येत्या बुधवारी (16 नोव्हेंबर 2022) रोजी महाराष्ट्रातील अंबरनाथला भेट देणार आहे, जिथे अंबरनाथ शाखेतील केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी ही मोहीम आयोजित केली जाईल. सर्व निवृत्तीवेतनधारक डिजिटल माध्यमातून त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी केंद्राला भेट देऊ शकतात.

1 ऑक्टोबर 2022 पर्यंत एकूण 29 लाख 29,986 डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (DLC) जारी करण्यात आले होते. यापैकी एकूण 1 लाख 52 हजार 172 निवृत्तीवेतन धारकांनी फेस ऑथेंटिकेशनद्वारे डिजिटल लाइफ सर्टिफिकेटचा पर्याय निवडला आहे. डीएलसी निवडणाऱ्या केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांची संख्या 11 लाख 95 हजार 594 आहे, त्यापैकी 96,099 केन्द्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांनी फेस ऑथेंटिकेशनद्वारे डीएलसीची निवड केली आहे.

यापूर्वी जीवन प्रमाणपत्र प्रत्यक्ष स्वरूपात सादर करावे लागत होते आणि त्यासाठी वृद्ध निवृत्तीवेतनधारकांना तासनतास बँकांबाहेर रांगेत उभे राहावे लागत होते. आता घरबसल्या एका बटणाच्या क्लिकवर जीवन प्रमाणपत्र सादर करणे शक्य झाले आहे. मोबाईलद्वारे फेस ऑथेंटिकेशनद्वारे प्रथमच जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेत, आधार क्रमांक, ओटीपीसाठी मोबाइल क्रमांक, पीपीओ क्रमांक आणि बँक/पोस्ट ऑफिसमधील खाते क्रमांक यासंबंधीचे तपशील आवश्यक आहेत. ही सुविधा राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांना आणि राज्याच्या कोषागार कार्यालयाच्या स्वरूपात वितरण प्राधिकरणासाठी देखील उपलब्ध आहे.

निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने (DoPPW)  सर्व निवृत्तीवेतनधारकांना विभागाच्या DOPPW_INDIA OFFICIAL,  या अधिकृत  यू ट्यूब  वाहिनीला भेट देण्याची विनंती केली आहे, जिथे साध्या भाषेत चेहरा प्रमाणीकरण तंत्राद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया स्पष्ट करणारे दोन व्हिडिओ अपलोड केले आहेत. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने  सर्व पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र डिजिटल माध्यमातून सादर करण्यासाठी केंद्राला भेट देण्याचे आवाहन केले आहे.

उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मुंबईच्या विकासाची मारेकरी- आ. अतुल भातखळकर यांचा आरोप

0

मुंबई-
स्वतःला हिंदुत्व, मराठी आणि मुंबईचे ठेकेदार मानणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी हिंदू समाज आणि मुंबईतील जनतेत फूट पाडण्याचे घाणेरडे काम सुरू केले आहे. त्यांनी मुंबईच्या विकासात खोडा घालण्याचे काम केले असून मुंबईच्या विकासाची खरी मारेकरी उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना असल्याची जहरी टीका भाजपा मुंबई प्रभारी आ. अतुल भातखळकर यांनी केली. मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित ‘जागर मुंबईचा’ या अभियानंतर्गत जाहीर सभेत ते शनिवारी बोलत होते. कांदिवली येथे भव्य सभा पार पडली. खा. गोपाळ शेट्टी, आ. योगेश सागर प्रमुख उपस्थित होते.

आ. अतुल भातखळकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे कर्तृत्व असे आहे की, त्यांच्या नावातून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव हटवायला हवे. शिवप्रताप दिनानिमित अफजलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने केले. मात्र, सामना वर्तमानपत्रात याची बातमी नाही. कंगना राणावतचे घर पाडले तेव्हा त्याची हेडिंग होती. तुम्ही खोटे हिंदुत्ववादी आहात अशी टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी करून मुख्यमंत्री पद मिळवले. मुंबईतील अनेक प्रकल्प रोखण्याचे काम उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुलाने केले. कोणत्याही व्यवसाय न करता उद्धव ठाकरे यांची संपत्ती करोडो रुपये कशी? महापालिकेतून येणारे खोके बंद झाल्यामुळे उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले आहेत असा टोला आ. भातखळकर यांनी लगावला. मुंबई मेट्रोचा वाढत्या खर्चाला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. कोरोना काळात उद्धव ठाकरे किंवा त्यांचा मुलगा एकदाही घराबाहेर पडला नाही. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बाहेर पडून समाजासाठी काम करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरे डॉक्टर असून त्यांच्यामुळेच अडीच वर्षे घरात बसलेले घराबाहेर पडू लागले आहेत. आता त्यांचे आजारपण कुठे गेले? असा सवाल आ. भातखळकर यांनी केला.

खा. गोपाळ शेट्टी म्हणाले, मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला आहे. मुंबई महानगरपालिका फायद्यात येण्यामागे भारतीय जनता पक्षाचे योगदान आहे. भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी शिवसेनेवर अंकुश ठेवण्याचे काम केले. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी टेंडर सिस्टीम बदलावी लागेल असेही ते म्हणाले.

आ. योगेश सागर म्हणाले, घराणेशाहीचा फायदा एका विशिष्ट घराण्याला झाला. मुंबई महापालिकेत ३ लाख करोड रुपयांचा भ्रष्टाचार केवळ एका परिवारामुळे झाला. लांगूलचालन, भ्रष्टाचार तुष्टीकरणाविरोधात उभा राहावे लागेल.

यावेळी कमलेश यादव, गणेश खणकर, प्रतिभा गिरकर, लीना दहेलकर उपस्थित होते.

इंद्रधनुष्‍य कला महोत्‍सव: विद्यार्थ्‍यांच्‍या कलागुणांना वाव मिळण्‍यासाठी ठरले उत्‍तम व्‍यासपीठ

”इंद्रधनुष्‍य 2022” या अठराव्‍या महाराष्‍ट्र राज्‍य आंतरविद्यापीठ युवक महोत्‍सवाचे आयोजन दि. 5 ते 9 या कालावधीत महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे करण्‍यात आले होते. या महोत्‍सवात 21 विद्यापीठांच्‍या 826 विद्यार्थ्‍यांनी सहभाग नोंदवून 29 कलाप्रकार सादर केले. हा महोत्‍सव विद्यार्थ्‍यांच्‍या कलागुणांना वाव मिळण्‍यासाठी एक उत्‍तम व्‍यासपीठ ठरले आहे. या महोत्‍सवाचा थोडक्‍यात परिचय……..

देश व राज्‍य पातळीवर चांगले कलाकार, खेळाडू, उत्‍तम वक्‍ते घडवण्‍यासाठी विविध महोत्‍सवांचे आयोजन केले जाते. अशा महोत्‍सवांच्‍या माध्‍यमातून युवकांना मोठ्या प्रमाणावर आपल्‍या विविध कलागुणांना वाव देता येतो. भविष्यात उत्‍तम कलाकार होण्यासाठी अशा महोत्‍सवाचा फायदा युवकांना निश्चितच होतो. देशात, महाराष्‍ट्र राज्‍य विविध क्षेत्रामध्‍ये अग्रेसर असून कला क्षेत्रातसुध्‍दा अग्रेसर आहे. आजच्‍या स्‍पर्धेच्‍या युगात युवकांसाठी चांगले व्‍यासपीठ उपलब्‍ध व्‍हावे या उद्देशाने शासन व विविध संस्‍था प्रयत्‍न करत असतात. याचाच एक भाग म्‍हणून राज्यातील, सर्व विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना एक चांगले व्यासपीठ मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ युवक महोत्सव ”इंद्रधनुष्य” या नावाने 2003 मध्‍ये तत्‍कालीन मा. राज्यपाल श्री. महंमद फजल यांच्‍या मार्गदर्शनाखाली ”इंद्रधनुष्‍य युवक महोत्‍सव” सुरू करण्यात आला होता.

प्रत्येक समाजात एका पिढीकडून दुस-या पिढीला सामाजिक, सांस्कृतीक संचिताचे संक्रमण होत असते. महाराष्ट्र राज्याला कला व संस्कृतीची गौरवशाली ऐतीहासीक परंपरा लाभलेली आहे. या कलेची जोपासणा करणे, तीचे संवर्धन करणे आणि महाविद्यालयीन व विद्यापीठस्तरीय कलावंत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील पारंपारीक लोककलांचे जतन व संवर्धन करणे या उद्देशांनी इंदधनुष्य आंतरविद्यापीठीय सांस्कृतीक युवक महोत्सवाची सुरुवात केलेली आहे. ही स्पर्धा, संगीत, नृत्य, वाड्.मय, रंगमंच, ललीतकला, लघुचित्रपट आणि सांस्कृतीक रॅली या सात विभागामध्ये विभागली आहे. या सात विभागाचे पुढे 30 विविध कला प्रकारामध्ये या स्पर्धा घेतल्‍या जातात.

यंदाच्‍या राहुरी येथे पार पडलेल्‍या ”इंद्रधनुष्य” कला महोत्सवातून, महाराष्ट्रातील प्रतिभावंत कलावंत विद्यार्थ्यांची मांदियाळी कलापंढरीत एकत्र येवून त्‍यांनी आपली कला सादर केली. यामुळे आपले ज्ञान व कलाकौशल्य सादरीकरणाला व्यापक मंच इंद्रधनुष्याच्या माध्‍यमातुन विद्यार्थ्यांना उपलब्ध झाला होता. 2003 साली सुरु झालेल्‍या या युवक महोत्सवाचे यंदाचे अठरावे वर्ष होते. या महोत्‍सवाचे उद्घाटन राज्‍याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते 8 नोव्‍हेंबर 2022 रोजी झाले.

इंद्रधनुष्‍य या युवक महोत्‍सवात राज्‍यातील विविध 21 विद्यापीठांचे एकुण 826 विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्‍ये 445 विद्यार्थी व 381 विद्यार्थिनी तसेच 68 प्राध्‍यापक सहभागी झाले होते. या महोत्‍सवात 29 कला प्रकार सादर करण्‍यात आले. या महोत्‍सवाचे सर्वसाधारण विजेतेपद मुंबई विद्यापीठाने पटकविले. तर सर्वसाधारण विजेतेपदाचा फिरता चषक सावित्री फुले पुणे विद्यापीठाने पटकाविला. गोल्‍डन बॉयचा पुरस्‍कार पुणे विद्यापीठाच्‍या अथर्व ओंकार वैराटकर याने तर गोल्‍डन गर्लचा पुरस्‍कार मुंबई विद्यापीठाची रीया धनंजय मोरे हिने पटकाविला. या महोत्‍सवात मुख्‍य 5 प्रकारचे सर्वसाधारण विजेतेपद देण्‍यात आले. यामध्‍ये संगीत प्रकारात सर्वसाधारण विजेतेपद सावित्री फुले पुणे विद्यापीठ यांनी पटकाविले, तर नृत्‍य वाड्.मय कला प्रकार, रंगमंचीय कला, ललीत कला या प्रकारात मुंबई विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकविले. यामध्‍ये 29 कला प्रकारांमध्‍ये प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षिसांचे वाटप असे एकूण 87 बक्षिसांचे वाटप करण्‍यात आली. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या नयनरम्य परिसरात या महोत्सवाचे विद्यापीठाने अतिशय उत्तम नियोजन केले होते.

  • डॉ. रवींद्र ठाकुर, जिल्हा माहिती अधिकारी, अहमदनगर

औद्योगिक सुरक्षा क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी: प्रा. धनंजय कुलकर्णी

पुणे-राज्य सरकारने प्रत्येक उद्योगासाठी स्वतंत्र सुरक्षा अधिकाऱ्याची नियुक्ती अनिवार्य केल्याने, औद्योगिक सुरक्षा क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या असल्याचे मत डीईएसचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

डीईएस टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या ‘ॲडव्हान्सड् डिप्लोमा इन इंडस्यिल सेफ्टी’ या अभ्यासक्रमाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात कुलकर्णी मार्गदर्शन करत होते. एरंडवणा अग्निशमन दलाचे प्रमुख राजेश जगताप, इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष खेमराज रणपिसे, विभाग प्रमुख डॉ. आर. एस. डोंगरे, अभ्यासक्रमाच्या प्रमुख ऋतुजा यमकनमरडी यांची प्रमुख उपस्थिती होती.

जगताप म्हणाले, ‘सुरक्षितता हे सेवाभावी कार्य आहे. सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. औद्योगिक क्षेत्रापेक्षा नागरी भागातील सुरक्षितता आव्हानात्मक आहे. असुरक्षितता काय आहे, याचा विचार करून सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्या लागतात.’

विजयकुमार कुलकर्णी, राजेंद्र पवार, राहिल मसूरकर, प्रमोद भालेराव, घनश्याम मैथडी, वैभव काळे, महेश पवार या माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. खेमराज रणपिसे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. डोंगरे यांनी प्रास्ताविक, ऋतुजा यमकनमरडी यांनी सूत्रसंचालन केले.

‘नेहरू हे धर्मद्वेष्टे नव्हते पण, ते धर्मांधतेवर उत्तर शोधत होते, धर्मनिरपक्षतेची मूलभूत चौकट आपण स्वीकारली आहे, याचे भान त्यांना सतत होते-श्रीरंजन आवटे

पुणे:’नेहरू हे धर्मद्वेष्टे नव्हते पण, ते धर्मांधतेवर उत्तर शोधत होते. धर्मनिरपक्षतेची मूलभूत चौकट आपण स्वीकारली आहे, याचे भान त्यांना सतत होते.टीका ऐकून घेण्याची त्यांची तयारी होती.दंगलींनी जवळपास बेचिराख झालेल्या देशाची सूत्र हातात घेताना आणि नंतर ब्रिटिशांच्या नावाने खडे फोडत न बसता नवी रचना त्यांनी उभी करून दाखवली.स्वतंत्र भारतात सर्वांना मताधिकार  दिला, ही ऐतिहासिक गोष्ट आहे असे प्रतिपादन प्रा. श्रीरंजन आवटे यांनी येथे केले.

‘.संविधानिक राष्ट्रवाद मंचा’च्या वतीने, भारताचे पहिले पंतप्रधान आणि विश्वनेते पं.जवाहरलाल नेहरू यांच्या १३३ व्या जन्मदिनानिमित्त रविवार, १३ नोव्हेंबर रोजी सकाळी आयोजित ‘ सोहळा पंडित नेहरूंच्या विचाराचा ‘ या प्रा. श्रीरंजन आवटे यांच्या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला. हे व्याख्यान एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, नवी पेठ, पुणे येथे झाले. 
या व्याख्यानामधून पंडितजींचे विचारविश्व आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या काही महत्त्वाच्या परिमाणांचा वेध घेण्याचा    प्रयत्न   श्रीरंजन आवटे  केला. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते,  महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव  अन्वर राजन हे होते.व्यासपीठावर अरुणा तिवारी, प्रसाद झावरे, प्रशांत कोठडिया उपस्थित होते.महावीर जोंधळे, अंजली चिपलकट्टी, डॉ. प्रदीप आवटे,जांबुवंत मनोहर यांच्यासहित अनेक मान्यवर सभागृहात उपस्थित होते.

श्रीरंजन आवटे म्हणाले, ‘पंतप्रधान,धोरणकर्ता,विश्वनेता म्हणून त्यांनी ठसा उमटवला.स्वातंत्र्यपूर्व भारत आणिआणि स्वातंत्र्योत्तर भारत यांना जोडणारी भारत जोडो यात्राच जणू नेहरू यांनी काढली.नेहरूंना यांना समजावून घेणे म्हणजे भारताच्या,आपल्या मुळांचा शोध घेणे होय. नेहरू हेच गांधीजींचे राजकीय वारस आहेत, विनोबा भावे हे त्यांचे अध्यात्मिक वारस आहेत.’फॅसिझम आणि साम्राज्यवादाचे त्यांचे आकलन महत्वपूर्ण होते.   नेहरूंनी वैश्विक भानातून नवराजकारण भारतात घडवलं. स्वातंत्र्य मिळविण्याआधीच विभूतीपूजेपासून सावध केले.पं. नेहरूंच्या प्रचंड योगदानानंतरही त्यांच्या पश्चात देशाने आणि काँग्रेसनेही पं. नेहरूंकडे दुर्लक्ष केले, हे दुर्देव आहे’
प्रशांत कोठडिया म्हणाले, ‘ नेहरूंना ,गांधींना टाळता येणार नाही.पं. नेहरूंना कधीही आपण विश्वगुरु असल्याची जाहिरात केली नाही, तरी त्यांना विश्वनेता म्हणून मान्यता मिळाली, कारण त्यांनी मूलभूत योगदान दिले

सोमवार, १४ नोव्हेंबर २०२२ रोजी, सायंकाळी ६ वाजता याच विषयावरील पुढील व्याख्यान होणार आहे.या दुस-या व्याख्यानाचे अध्यक्षस्थान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इतिहास विभागाच्या प्रमुख आणि इतिहास तज्ञ डॉ. प्रा. श्रद्धा कुंभोजकर हे भुषविणार आहेत.   

पुणे ते बँकॉक या थेट विमान सेवेचे उदघाटन

पुणे –

12 नोव्हेंबर 2022 म्हणजे आजपासून पुणे-बँकॉक-पुणे दरम्यान विमान सेवा सुरु होत आहे.  या मार्गावर दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी विमान उड्डाणे होतील.

Flight NoSectorDepArr.FrequencyAircraft
SG 81PNQ-BKK18:4500:40Tue, Thu, Sat, SunB-737
SG 82BKK-PNQ14:1517:10Tue, Thu, Sat, SunB-737

पुणे आणि बँकॉक दरम्यानच्या या हवाई संपर्कामुळे व्यापार, शिक्षण आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात भारत आणि थायलंड या देशांमधील द्विपक्षीय देवाणघेवाणीला प्रोत्साहन मिळेल, असे ज्योतिरार्दित्य सिंदिया यांनी आपल्या भाषणात सांगितले.

ते पुढे म्हणाले की, पुणे विमानतळ हे देशातील महत्त्वाचे विमानतळ असून या विमानतळावर पायाभूत सुविधा उभारण्याला सरकार चालना देत आहे.  या विमानतळाचे नवीन टर्मिनल पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल, तर नवीन आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनल (मालवाहतूक केंद्र) डिसेंबर 2024 पर्यंत विकसित होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत वापरासाठी एक एकीकृत एअर कार्गो टर्मिनल मार्च 2023 पर्यंत विकसित केले जाईल, अशी माहितीही सिंदिया यांनी यावेळी दिली. इथे बहु-स्तरीय वाहनतळ आधीच बांधून तयार असून ते लवकरच कार्यान्वित होतील असेही ते म्हणाले.

स्पाईसजेट कंपनीचे  SG-81 हे विमान पुण्याहून संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी उड्डाण करेल  आणि थायलंडच्या प्रमाणवेळेनुसार पहाटे 12 वाजून 40 वाजता बँकॉक विमानतळावर उतरेल. तर  SG-82 हे विमान बँकॉकहून थायलंडच्या प्रमाणवेळे नुसार दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी उड्डाण करून,  पुण्यात संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी  पोहोचेल.  या मार्गावर बोईंग 737  विमान उड्डाणे करणार आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002ODAS.jpg

***

बेरोजगारांना नियमबाह्य पद्धतीने वापरून घेणारी महापालिका

सहा वर्षानंतर,निवडणुकीच्या तोंडावर कामगार नेत्याला समजले : कंत्राटी कामगारांचे शोषण होते …..

पुणे- गेली सहा वर्षाहून जास्त काळ कामगार नेता म्हणून राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयात आपला ठिय्या ठाम मांडून बसलेल्या एका ‘तथाकथित’ कामगार नेत्याला महापालिका निवडणुका जवळ आल्यावर समजले आहे कि, पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांचे शोषण होते आहे.आणि आता त्यामुळे कधी छोटी ,छोटी आंदोलने करत कधी प्रसिद्धी मिळवत यावर आपण जागृत असल्याचे दर्शवण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे. याच पक्षाच्या एका नगरसेवकाने कंत्राटी म्हणून नेमणूक नसतानाही महापालिकेच्या मिळकत कर विभागात एकाला काहीही आधार नसताना तसेच ‘बस इथे कामावर ‘ सुरु कर काम , म्हणून तोतया नौकरी दिल्याचे अनेकांना ताहुक होते पण ‘माय मराठी ‘ ने याच विभागात स्ट्रिंग ऑपरेशन करत कॉंग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांच्या सहाय्याने या विभागात बोगस लोक कामगार म्हणून बसतात याचा पर्दाफाश केल्यावर पोलिसात त्या एका विरुद्ध गुन्हा तर दाखल झाला .पण पुढले सारे सोपस्कार गुंडाळून ठेवण्यात आले. कंत्राटी कामगार महापालिकेच्या विविध खात्यात नव्हे तर काही पदाधिकार्यांच्या कार्यालयात काम करत होते. ,एक ना एक दिवस आपल्याला इथे कायम नौकरी मिळेल या आशेने सारी पिळवणूक ,शोषण ते सहन करत होते याचा संपूर्ण नाहीच पण अत्यल्प अंशी आता निवडणुकीच्या तोंडावर कामगार नेत्याला साक्षात्कार होऊ लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधी सल्लागार कार्यालयाकडे माहितीच नाही –

पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागात माय मराठीने दोन वरिष्ठ नगरसेवकांच्या सहाय्याने स्ट्रिंग ऑपरेशन करून बोगस कामगार खुर्चीवर बसून महापालिकेचा आर्थिक कारभार पाहत आहे हे रंगे हाथ पकडून दिल्याच्या घटनेला सुमारे ५ वर्षे उलटली . दुसर्या दिवशी महापालिकेने शिवाजीनगर पोलिसात तक्रार नोंदविली .फरार आरोपीला काही दिवसानंतर अटक झाली .पुढे मिळकतकर विभागप्रमुख शासकीय अधिकारी असल्याने पुण्यातून त्यांची बदली झाली . पण महापालिकेने पोलिसात दाखल केलेल्या या तक्रारीचे काय झाले ? हि केस महापालिकेच्या वतीने कोणी लढविली ? या केसचा निकाल लागला कि नाही ? लागला असेल तर काय लागला ? या प्रश्नांची उत्तरे महापालिकेच्या विधी सल्लागार कार्यालाकडे नाही . आम्हाला कहीही माहिती नाही , किंवा माहिती घेऊन सांगते .. अशा स्वरूपाचे उत्तर गेली वर्षभर विधी सल्लागार कार्यालय देत आहे.

कंत्राटी कामगारांचीच नाही तर बोगस कामगारांचीही पिळवणूक गेली ६ वर्षांपासून

कायम स्वरूपी कामगार ,अधिकारी भरती करायची नाही आणि निव्वळ कंत्राटी कामगार ठेकेदारांमार्फत भरती करून त्यांच्याकडून आपल्याला हवे तसे कामकाज करवून घेण्याची पद्धत गेली ६ वर्षे महापालिकेत राबविली जाते आहे.कंत्राटी कामगाराला १० हजाराच्या वर पगार हाथी येत नाही , किमान वेतन कायद्याची इथे पायमल्ली होते आहे . हे मुद्दे माय मराठी ने ६ वर्षे सातत्याने मांडले .पण तरीही कामगार नेते गप्पच का रहिले ? सुमारे २०0 कामगारांची नावे सादर करून त्याबाबत हि प्रश्न उपस्थित केले. पण नगरसेवक आणि प्रशासन यांचीच मिलीभगत असल्याने हा अंधार दूर करण्यास कोणीही पुढे आले नाही .निव्व ळ कंत्राटी च नाही तर ..असेच .. बस कर काम सुरु म्हणून बसविलेले अनेक (ज्यांना तोतया म्हणता येईल ,पण म्हणणे कठीण जाईल ) जण महापालिकेत काम करत आले . ज्यांना ना जॉईन लेटर,ना ओळखपत्र दिले होते, ज्यांना पगार खाते प्रमुख किंवा कोणी अधिकारी आपापल्या खिशातून करत होते .ज्यात संगणक ऑपरेटर चा हि सहभाग होता .अशा काही शे कामगारांनी एक ना एक दिवस आपल्याला इथेच कामावर घेतील म्हणून हि सारी नियमबाह्य पद्धती अंगिकारली आणि इथल्या कार्यपद्धती अनुसरण्यात धन्यता मानली .

कुलकर्णी नावाच्या तत्कालीन एका शासकीय अधिकार्याच्या अखत्यारीत त्याच्याच कार्यालयात बसलेला एक असाच बोगस कर्मचारी ‘माय मराठी ‘ ने भाजपच्या एका नगरसेवकाच्या मदतीने या अधिकार्याच्याच पुढ्यात उभा केला मात्र त्यावर तसूभरही कार्यवाही न करता हा कुलकर्णी ठम्म बसून राहिला , पुढे तो अधिकारी निलंबित झाला पण कर्मचारीमात्र तसाच राहीला.

बेरोजगारांना नियमबाह्य पद्धतीने वापरून घेणारी महापालिका अशीच झाली होती ओळख

या सर्व प्रकारांमुळे ‘ माय मराठी ने सातत्याने महापालिकेवर टीकास्त्र सोडले ,बेरोजगारांना अशा नियमबाह्य पद्धतीने वापरून घेऊन त्यांना तोतया बनवून त्यांचे आयुष्य खराब करण्याएवजी त्यांना सेवेत सामावून घ्या असेही सुचविले . पण तसे केले तर संबधितांचे उखळ पांढरे कसे होणार ? आणि नियमबाह्य कामे करायला कोणी कायम कर्मचारी कसा पुढे येणार ? या साऱ्या प्रश्नांमुळे आता महापालिकेतील आणि महापालिकेच्या सर्व कार्यालयातील कायम आणि कंत्राटीआणि अन्य कर्मचाऱ्यांची अचानक तपासणी केंद्रीय कर्मचारी आयोगाने केली पाहिजे अशी स्थिती आहे. बेरोजगार तरुणाईची पिळवणूक करणारी महापालिका असाच प्रवास गेली ६ वर्षे इथे सुरु होता. तत्कालीन मनसेच्या एक महिला नेत्या आणि सध्या मनसेचे मोठे नेते मानले जाणारे प्रस्थ यांच्याकडे या प्रकरणांची इथंभूत माहिती होती,अजूनही असेल. त्यांनी या अन्यायाविरोधात वेळोवेळी आंदोलनेही केली होती .

ठाण्यात आठ कोटींच्या बनावट नोटा जप्त- दोन हजार रुपयांच्या नोटांचे ४०० बंडल सापडले, दोघांना अटक

0

ठाणे -येथील घोडबंदर परिसरात तब्बल आठ कोटी रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिट – पाचच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी पालघर येथे राहणाऱ्या राम हरी शर्मा (५२) आणि राजेंद्र राऊत (५८) या दोघांना अटक केली आहे. तसेच यातील त्यांचा साथीदार आरोपी मदन चौहान आणि इतर साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

घोडबंदर येथील गायमुख चौपाटी परिसरात काही जण एका कारमधून बनावट नोटांची वाहतूक करणार असल्याची गुप्त माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. गुप्तचरांकडून मिळालेल्या या माहितीनुसार पोलिसांनी गायमुख चौपाटी परिसरातील माउली उपाहारगृहाजवळ दोन जण घेऊन जात असलेल्या इन्व्होवा एमएच ०४ डीबी ५४११ या गाडीची तपासणी केली. या तपासणी दरम्यान पोलिसांना गाडीमध्ये भारतीय चलनातील दोन हजार रुपयांच्या नोटांचे ४०० बंडल आढळून आले. या नोटांची पाहणी केली असता सर्व नोटा बनावट असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या प्रकरणी पोलिसांनी राम हरी शर्मा आणि राजेंद्र राऊत या दोघांना बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी पालघर येथील रहिवासी आहे. तर यांचा साथीदार असलेला मोहन चौहान आणि इतर साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तसेच इतक्या मोठया प्रमाणात बनावट नोटा कुठे छापण्यात आल्या ? त्याच्या उपयोग नेमका कशासाठी आणि कुठे होणार होता ? यामागे कोणी इतर कोणी मुख्य सूत्रधार आहे का ? याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडलाचे ‘सवाल अंधाराचा’ द्वितीय

नांदेड परिमंडलाचे ‘नजरकैद’ प्रथम

पुणे, दि. १२ नोव्हेंबर २०२२: महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागातील पुणे परिमंडलाच्या ‘सवाल अंधाराचा’ या नाट्यकृतीने द्वितीय क्रमांकाचा तर औरंगाबाद प्रादेशिक विभागातील नांदेड परिमंडलाच्या ‘नजरकैद’ने प्रथम क्रमांकाचा करंडक पटकावला. कोल्हापूर येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात दि. १० व ११ रोजी महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागातील ‘सवाल अंधाराचा’ (पुणे परिमंडल), औरंगाबाद- ‘नजरकैद’ (नांदेड परिमंडल), नागपूर- ‘तो परत आलाय’ (चंद्रपूर परिमंडल) व कल्याण- ‘सलवा जुडूम’ (सांघिक कार्यालय, मुंबई) या प्रादेशिकस्तरावरील विजेत्या नाटकांचे सादरीकरण झाले. शनिवारी (दि. ११) थाटात झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे, चित्रपट अभिनेते श्री. ऋषिकेश जोशी यांच्याहस्ते मुख्य अभियंता व नाट्यनिर्माता श्री. सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता व दिग्दर्शक श्री. राजेंद्र पवार यांच्यासह पुणे परिमंडलाच्या रंगकर्मींनी उपविजेत्याचा करंडक स्वीकारला. या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके यांची उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते नाट्यस्पर्धेच्या वैयक्तिक गटातील विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

वैयक्तिक गट विजेते- दिग्दर्शन– प्रथम – प्रमोद देशमुख (नांदेड) / द्वितीय – राजेंद्र पवार (पुणे), अभिनय (पुरुष)– प्रथम- प्रमोद देशमुख (नांदेड)/ द्वितीय – किशोर साठे (सांघिक कार्यालय, मुंबई), अभिनय (स्त्री)– प्रथम- पूर्वा देशमुख (नांदेड)/ द्वितीय- सोनाली बावस्कर (पुणे), नेपथ्य– प्रथम- संध्या चिवंडे (चंद्रपूर) / द्वितीय- उत्क्रांत धायगुडे, सुधाकर जाधव व सुनील वनमोरे (नांदेड), प्रकाशयोजना– प्रथम- सुनील भिसे व सुनील कांबळे (सांघिक कार्यालय, मुंबई)/ द्वितीय- रविंद्र गाडगे व सुहास पडोळे (चंद्रपूर), पार्श्वसंगीत– प्रथम- राजेश आरेकर व शैलेंद्र पाटील (नांदेड) / द्वितीय- विजय जाधव व अभिजित टेंभुर्णे (पुणे), रंगभूषा व वेशभूषा– प्रथम- पंडित तेलंग व गिरीश डोंणगावकर (नांदेड) / द्वितीय- महेशचंद्र तेलंग व सुशील विखार (चंद्रपूर), अभिनय उत्तेजनार्थ– सायली सायंकार (चंद्रपूर), प्रणाली निमजे (मुंबई ), राजकुमार सिंदगीकर (नांदेड) व संतोष गहेरवार (पुणे) तसेच बालकलाकार म्हणून भार्गवी शिंदे, अर्णव शिंदे व पलश रहाटे (सांघिक कार्यालय, मुंबई) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली.

पत्रकारांनी ट्वेन्टी-ट्वेन्टी, व्हायरल न्यूज पेक्षा सत्यनिष्ठतेवर भर द्यावा-सत्य प्रकाश नायक

पुणे १२ नोव्हें. : “समाजाच्या, देशाच्या हितासाठी सत्ताधाऱ्यांना सत्याचा आरसा दाखवण्याचे दायित्व माध्यमांवर आहे. ट्वेन्टी-ट्वेन्टी, व्हायरल न्यूजमध्ये न अडकता पत्रकारांनी सत्यनिष्ठतेवर, दुसऱ्यांच्या वेदना कमी करणारी पत्रकारिता करण्यावर भर द्यावा. त्यातूनच समाजात आणि माध्यमांत संवाद, सर्वसमावेशकता आणि शांततेची संस्कृती रुजेल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सत्य प्रकाश नायक यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनच्या वतीने लोणी काळभोर येथील विश्वराज बागेतील जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती सभागृहात (घुमट) आयोजित तीन दिवसीय चौथ्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेचा समारोप त्यांच्या मार्गदर्शनाने झाला. आर. के. लक्ष्मण म्युझियम, मुंबई प्रेस क्लब, द फॉरेन करस्पॉंडंट क्लब आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सहयोगाने ही परिषद भरविण्यात आली होती.

यावेळी माखनलाल चतुर्वेदी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ जर्नालिझम अँड कम्युनिकेशनचे कुलगुरू प्रा. के. जी. सुरेश, बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतील सामाजिक शास्त्राचे प्राध्यापक प्रियंकार उपाध्याय, डीडी न्यूजच्या वरिष्ठ निवेदिका रीमा पराशर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस, स्कुल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनचे संचालक धीरज सिंह, दूरदर्शनचे माजी महासंचालक मुकेश शर्मा, ‘मिटसॉग’चे संचालक डॉ. के. गिरीसन, विद्यार्थी प्रतिनिधी रुपम उत्तम उपस्थित होते.

सत्य प्रकाश नायक म्हणाले, “पत्रकारांनी आपला आवाज क्षीण होऊ देता कामा नये. ‘जटायू’ पक्षाने रावणा विरोधात जसा लढा दिला, त्याप्रमाणे पत्रकारांनी समाजाच्या समस्या सोडण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. देशात गरिबी, निरक्षरता, भ्रष्टाचार असे अनेक मुद्दे आहेत. या प्रश्नांना वाचा फोडली, तर समाजात शांतता प्रस्थापित होऊ शकेल.”

प्रा. के. जी. सुरेश म्हणाले, “तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पत्रकारिता करण्याची सवय मागे पडत आहे. वातानुकूलित खोलीत बसून, डेस्क स्टोरी करणे म्हणजे पत्रकारिता नव्हे. सत्यनिष्ठ आणि प्रामाणिक पत्रकारिता ही सध्याची गरज आहे. देशाचा विकास व समाजातील सकारात्मकता हीच खरी पत्रकारिता आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली पाहिजे.”

रीमा पराशर म्हणाल्या, “शांतता कंटाळवाणी नाही, तर आनंददायक आहे, हे समजून घ्यायला हवे. गोंधळ घालणारी, रंजक पत्रकारिता समाजाच्या हिताची नाही. त्यातून विश्वसनीयता कमी होत आहे. सोशल मीडियामुळे लोकांमध्येही जागरूकता वाढत आहे. त्यामुळे बातमीची शहानिशा करून प्रसिद्ध करायला हवी. विद्यार्थ्यांनी ग्लॅमरच्या मागील मेहनत समजून घ्यावी.”

प्रा. प्रियंकार उपाध्याय म्हणाले, “समाज परिवर्तनात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, सोशल मीडियाच्या प्रभावाने पत्रकारितेचा मूळ गाभा हरवत चालला आहे. वाईट बातम्यांना टीआरपी अधिक मिळत असल्याने चांगल्या बातम्या दुर्लक्षित होतात. डिजिटल मीडियातून द्वेष भावना पसरणार नाही, याची आपण काळजी घ्यायला हवी. मानवी हक्क आणि लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक करण्याचे दायित्व पत्रकारांवर आहे. त्यासाठी समाजात माध्यम साक्षरतेचे महत्व रुजावे.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी उपस्थितांना ऑनलाईन स्वरूपात मार्गदर्शन केले. 
प्रा. डॉ. रवीकुमार चिटणीस यांनी ‘एमआयटी’च्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची विस्तृत माहिती दिली. गेल्या तीन दिवसांत माध्यमांच्या विविध पैलूंवर चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. के. गिरीसन यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. धीरज सिंग यांनी आभार मानले.

 एखाद्या गोष्टीचा कांगावा करणं ही आव्हाडांची स्टाइल-उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई-एखाद्या गोष्टीचा कांगावा करणे ही जितेंद्र आव्हाडांची स्टाइल आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी लगावला. आव्हाडांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.जितेंद्र आव्हाडांना न्यायालयाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच तपासाला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.आव्हाडांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, एखाद्या गोष्टीचा कांगावा करणे ही जितेंद्र आव्हाडांची स्टाइल आहे. कुठल्याही गोष्टीचे उद्दातीकरण करण्याचा प्रयत्न ते करतात. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह जाऊन थिएटरमध्ये जो तमाशा केला, मारहाण केली. त्यामुळे कारवाई झाली. कोणीही असे केले असते, तर असेच झाले असते. खूप काही तरी केल्याचा देखावा करण्याचा आव्हाडांना नाद. त्यातून असे प्रकार होतात, असे म्हणत त्यांनी टोला लगावला.

फाशी झाली तरी चालेल, पण शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण होऊ देणार नाही-जितेंद्र आव्हाड यांचा पुन्हा इशारा

शिवरायांच्या नावाखाली पुरदरेंचे विचार पुढे करणाऱ्यांचा टप्प्यात कार्यक्रम करण्यात येईल

मुंबई- फाशी झाली तरी चालेल, पण शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण होऊ देणार नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला. प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी तुरुंगातून जामिनावर बाहेर येताच त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.माझ्या अटकेवेळी पोलिसांची हतबलता दिसून आली. शिवाजीराजेंची होणारी बदनामी रोखण्याचा आम्ही गुन्हा केला का, असा सवाल आव्हाड यांनी केला.शिवरायांच्या नावाखाली पुरदरेंचे विचार पुढे करणाऱ्यांचा टप्प्यात कार्यक्रम करण्यात येईल असेही ते म्हणाले.

शिवाजी राजेंना नरसिंहाच्या अवतार दाखवल्याने त्यांच्या चातुर्याला धक्का लागला आहे. महिलांचा बाजार भरत होता, असा खोटा इतिहास हर हर महादेव चिटपटात दाखवला आहे. याचे काहीच ऐतिहासिक पुरावे नाही असे सांगताना महाराजांनी माणसांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. तरीही तसे दाखविण्यात आले आहे. असे म्हणत शिवाजी महाराजांच्या इतिहासला ठेच पोहचत आहे. बाजूप्रभू त्यांच्या विरोधात होते हे दाखवत बाजीप्रभू देशपांडेच्या इतिहासाला धक्का लावत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. शिवरायांच्या नावाखाली पुरदरेंचे विचार पुढे करणाऱ्यांचा टप्प्यात कार्यक्रम करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

डीसीपी दबावत होते – आव्हाड

महाराष्ट्राला दाखविण्यासाठी घाईगडबडीने अटक करण्यात आली, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. आम्ही काहीही करू शकतो हे दाखविण्यासाठी आम्हाला अटक करण्यात आली. आम्हाला काल पोलिस ठाण्यात ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला, प्रेक्षकाला आम्ही मारहाण केली नाही हे त्यांनेच स्पष्ट केले आहे. तरीही मला अटक करण्यात आली, यामागे कोण आहे. हे स्पष्ट करण्याची गरज नाही ते सर्वांना माहिती आहे. गडकरी, पुंरदरे, यांचे नावे जेम्स लेन यांनी म्हटले होते. पोलिसांचा यात काहीच दोष नाही त्यांच्यावर दबाव होता असा आरोप आव्हाडांनी केला आहे.

महाराष्ट्रातले पाटील बायकांची विक्री करतात हे दाखवून मराठीविरुद्ध मराठा वाद लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठ्यांचे शौर्य कमी करण्याचा, दाबण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे. देशपांडे यांच्याबद्दल काहीतरी चुकीचा इतिहास दाखविला आहे. शिवाजीमहाराजांना महिलांबद्दल आदर नसल्याचे दाखविण्यात येत आहे, हे चुकीचा इतिहास आम्ही सहन करणार नाही. ऐतिहासिक संदर्भ नाही अशी प्रकरणे चित्रपटात दाखवायची आणि महाराष्ट्राचा इतिहास चुकवायचा हे आम्ही सहन करणार नाही. यासाठी मला फाशी झाली तरी चालेल पण शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण होऊ देणार नाही असेही आव्हाडांनी म्हटले आहे.

बांधकामाच्या ठिकाणी इमारतीच्या पार्किंगमध्ये पाण्याच्या टाकीत बुडून लहान मुलीचा मृत्यू; दोघांवर गुन्हा दाखल ,अटक नाही .

 कात्रज-मांगडेवाडी परिसरातील एका बांधकामाच्या ठिकाणी इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीत 2 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. शुक्रवारी (11 नोव्हेंबरला) ही घटना घडली. सहानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बांधकाम व्यावसायिक सचिन चोरगे आणि ठेकेदार शिवाजी पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रज भागातील मांगडेवाडी परिसरात चोरगे यांच्याकडून नियोजित गृहप्रकल्पाचे बांधकाम करण्यात येत आहे. सुनील सहानी बांधकाम मजूर असून ते गृहप्रकल्पाच्या परिसरात कुटुंबीयांसह राहायला आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सिका सुनील सहानी (वय-2) असे मृत झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. याबाबत सुनील सहानी (वय-27,रा.मांगडेवाडी,पुणे) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार सहानी हे सदर बांधकामाच्या ठिकाणी मजुरी काम करत हाेते. त्यावेळी पाण्याच्या टाकीस बांधकाम व्यवसायिक व ठेकेदार यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने टाकीस झाकण न लावता, चारही बाजूने सुरक्षित जाळी न लावता व काेणतेही सुरक्षा व्यवस्था, उपाय याेजना न करता पाण्याची टाकी उघडी ठेवली त्यामुळे संबंधित टाकीत पडून अन्सिका हिचा टाकीतील पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यु झाला आहे. याबाबत पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नितीन जाधव करत आहे.

मार्केटयार्ड परिसरात 5 ते 6 जणांकडून दिवसाढवळ्या दरोडा,गोळीबार करत 28 लाखांची रोकड लुटली

पुणे-पुण्यातील मार्कटयार्ड परिसरात मास्क लावून आलेल्या पाच ते सहा आराेपींनी गाेळीबार करत व्यापाऱ्यांची 28 लाख रुपयांची राेकड जबरदस्तीने पळवून नेल्याचा प्रकार शनिवारी दुपारी घडला आहे. अंगडिया ऑफिसमधून सदर आराेपींनी संबंधित राेकड पळवून नेताना त्यांच्या जवळील पिस्तुलमधून एक राऊंड फायर केल्याने खळबळ उडाली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच, मार्केटयार्ड पाेलिस घटनास्थळी दाखल झाले असून पाेलिसांनी आराेपींचा शाेध सुरू केला आहे.

मार्केटयार्ड परिसरात पी.एम. अंगडिया यांचे कार्यालय आहे. ते कुरिअर कार्यालय असल्याची माहिती मिळत आहे. आज याठिकाणी पाच ते सहा जण आले त्यांनी गोळीबार करून 28 लाखांची रोकड घेऊन फरार झाले.तक्रारदार हे आज सकाळी 11 च्या सुमारास कार्यालयात आले. त्यानंतर त्यांनी पैसे तपासून पाहिले.
त्यानंतर पावणे बारा च्या सुमारास पाच ते सहा आरोपी ऑफिसमध्ये आले. त्यांनी दारातून पिस्तुल दाखवली. त्यानंतर दुसऱ्या साथीदाराने त्यांना ढकलून कार्यालयाच्या बाहेर काढलं. कार्यालयात असलेल्या काचेवर गोळीबार करुन काच फोडली. त्यानंतर आरोपी पैसे घेऊन पळून गेले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिली. या घटनेत कोणी जखमी झाले नाही. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरु आहे.