तेरे मेरे मिलन की ये रैना, या गीताच्या भावपूर्ण आठवणींना उजाळा देण्यासाठी ईफ्फीने केले प्रतिनिधींना निमंत्रित

Date:

(Sharad Lonkar)

आयुष्य लहान आणि भौगोलिकदृष्ट्या मर्यादित असू शकते, मात्र कलेला वेळ आणि स्थानाचे बंधन नाही. त्यामुळेच कलाकार आपल्या मनात आणि हृदयात कायम जिवंत राहतो.  मुंबईत या वर्षी फेब्रुवारीमध्ये निधन झालेल्या सूरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आदरांजली वाहण्यात येत आहे. या  दिग्गज गायिकेची भावपूर्ण गाणी तर अनेक आहेत, प्रत्येक गाण्यातून त्यांनी भारतीय चित्रपट आणि संस्कृतीत स्वतःचे मोठे योगदान दिले आहे, तरीही या महान कलाकाराला श्रद्धांजली वाहण्यासाठी, ईफ्फीने  हृषिकेश मुखर्जी यांचा 1973 वर्षी प्रदर्शित झालेला अभिमान हा संगीतमय भावनाप्रधान   चित्रपट निवडला आहे.

भारतीय चित्रपटांच्या 70 च्या दशकातील हृदयस्पर्शी आठवणींच्या हिंदोळ्यावरुन मारलेला फेरफटका, तरुण आणि वृद्ध अशा दोन्ही पिढीतील, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सिनेरसिकांसाठी दुहेरी पर्वणीच ठरते.  अभिनेते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी खूप सुंदरपणे साकारलेल्या सुबीर आणि उमा या प्रमुख पात्रांच्या जीवनात, प्रेम, सांगितीक महत्वाकांक्षा आणि अहंकार या भावभावनांच्या परस्पर सरमिसळीतून निर्माण होणाऱ्या क्लेशदायी कल्लोळाशी ते एकरुप होतील आणि पुन्हा पुन्हा एकरुप होतच राहतील.  इतकेच काय, ‘तेरे मेरे मिलन की ये रैना’, ‘तेरी बिंदिया रे’ आणि ‘नदीया किनारे’ यासारख्या सुमधूर गाण्यांच्या हृदयद्रावक सादरीकरणाच्या स्वर्गीय सौंदर्यात न्हाऊन निघत, चित्रपटरसिक या  मुलभूत जीवनसंघर्षात  तल्लीन होऊन जातील.  चित्रपट रसिक ज्यांना प्रेमाने दिदी म्हणतात, त्या लताजींनी,  ‘अब तो है तुमसे हर खुशी अपनी’ आणि ‘लुटे कोई मन का नगर’… या चित्रपटातल्या अन्य गाण्यांमध्येही आपला कालातीत आवाज आणि सर्वस्व ओतले आहे.

Late Lata Mangeshkar (file pic)

भारतीय संस्कृती आणि जीवनपद्धती सतत तुमच्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवा: लता मंगेशकर यांनी इफ्फीच्या 33 व्या महोत्सवात,  उद्घाटन सोहळ्यात म्हटले होते.

ऑक्टोबर 2002 मध्ये नवी दिल्ली इथे झालेल्या ईफ्फीच्या 33 व्या महोत्सवात, लतादिदींनी चित्रपट निर्माते आणि चित्रपट प्रेमींना दिलेल्या या  संदेशाला, आत्ता या महोत्सवात या महान गायिकेला आदरांजली अर्पण करत असताना उजाळा देणे, नक्कीच उचित ठरेल.

संपन्न आणि सभ्य भारतीय संस्कृतीचं तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पिछाडीवर पडण्यापासून रक्षण करायला विसरू नका असं आवाहन या महोत्सवाचं उद्घाटन करताना लता मंगेशकर यांनी चित्रपट निर्मात्यांना केलं. भारतीय सिनेमाचे आद्य प्रवर्तक दादासाहेब फाळके यांच्या जोडीने भारतीय सिने उद्योगाला नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीतही अथक परिश्रम घेतलेल्या कलाकारांचा असीम त्याग कायम स्मरणात ठेवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या सह कलाकारांना केलं. भारताच्या सर्व भागातल्या कलाकारांनी भारतीय सिने उद्योगाच्या विकासाकरता योगदान दिल्याची आठवण त्यांनी  इफ्फी-33 च्या शिष्टमंडळाला करून दिली.

भारतीय सिनेमात अमूल्य योगदान देणाऱ्या संगीताचा संदर्भ देत लता मंगेशकर म्हणाल्या की, भारतीय जीवन आणि समाजाच्या प्रत्येक पैलूमध्ये संगीताचा अंतर्भाव आहे. ते केवळ समृद्ध झालं नाही तर त्याने भारतीय सिनेमाला अद्वितीय ओळख निर्माण करून दिली आहे. त्यावेळच्या माहिती आणि प्रसारण मंत्री सुषमा स्वराज यांनी भारतीय सिनेमाला इतर देशांमध्ये प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी प्रशंसा केली. येत्या काही वर्षात हा उद्योग नवीन उंची गाठेल याबाबत संगीतप्रेमींच्या पिढया आशादायी होत्या असं त्या म्हणाल्या. 

लता मंगेशकर : संगीताला समर्पित केलेलं आयुष्य.

लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मराठी आणि कोकणी संगीतकार पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या घराण्यात झाला. त्यांचा मूळ नाव हेमा असून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यासह इतर पाच भावंडांमध्ये त्या वयानं सर्वात मोठ्या होत्या. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय संगीतकार तसंच रंगभूमी कलाकार होते.

लता मंगेशकर यांनी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं आणि त्यानंतर 1942 मध्ये ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटात अभिनय केला. 1946 मध्ये त्यांनी वसंत जोगळेकर दिग्दर्शित हिंदी चित्रपट ‘आपकी सेवा मे’ मध्ये पहिल्यांदा हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं.

1972 मध्ये लता मंगेशकर यांना ‘परिचय’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. पुढील काळात या ज्येष्ठ गायिकेनं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक पुरस्कार पटकावले.  यात प्रतिष्ठेच्या भारतरत्न पुरस्कारासह फ्रेंच सरकार द्वारा मानाचा लीजन ऑफ हॉनर खिताब, दादासाहेब फाळके पुरस्कार, तीनदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चार वेळा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. 1984 मध्ये मध्यप्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्काराची तर 1992 मध्ये महाराष्ट्र सरकारने सुद्धा गायनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी लता मंगेशकर पुरस्काराची घोषणा केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....