Home Blog Page 1531

आता संजय राऊतांविरोधात ईडीने दाखल केली सुधारित याचिका

मुंबईसंजय राऊत यांना तारीख पे तारीख देत १०२ दिवस तुरुंगात ठेवल्यानंतरही ईडी समाधानकारक तापास करू शकली नाही आणि पुरावे सादर करू शकली नाही त्यामुळे ईडी ला झापून न्यायालयाने राऊत यांना जामीन दिल्यावरही ईडी शांत बसलेली नाही आता संजय राऊत यांना मिळालेल्या जामीनाविरोधात ईडीकडून हायकोर्टात सुधारीत याचिका दाखल करण्यात आली आहे.या याचिकेवर २५ नोव्हेंबरला यावर सुनावणी होणार आहे.

मुंबई हायकोर्टात ईडीने ही सुधारित याचिका दाखल केली आहे, मागच्या वेळी न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे ईडेनी याचिका दाखल केली होती, त्यामध्ये काही सुधारणा करून याचिका दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर ही नवीन याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यामुळे २५ नोव्हेंबरच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय होतं याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी वाहतुकीसाठी १००%  इलेक्ट्रिक वातानुकूलित टारमॅक कोच सादर करणारा पहिला ग्राउंड हँडलर

·         दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर १२ बसेस तैनात केल्या जातील.

·         २०३० पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्याच्या भारतीय विमान वाहतूक मंत्रालयाच्या उद्दिष्टाला पाठिंबा देण्याची बांधिलकी जपताना सेलेबी इंडियाच्या शाश्वत दृष्टीकोनाचे दर्शन

·         मेड इन इंडिया इकोलाईफ कोचेस ही फास्ट प्लगइन चार्जिंग लिथियम-आयन बॅटरी द्वारे चालणारी शून्य-उत्सर्जन वाहने आहेत

·         प्रत्येक बसची रेंज २०० किमी असून ती उच्च व्होल्टेज आणि वेगवान चार्जिंग स्टेशन वापरून चार्ज केली जातील आणि मोक्याच्या ठिकाणी ठेवली जातील.

दिल्ली: भारतीय विमान वाहतूक मंत्रालयाच्या २०३० पर्यंत विमान वाहतूक विभागाचे डिकार्बोनाइज करण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत सेलेबी इंडियाने भारतात दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी वाहतुकीसाठी पहिले १००% इलेक्ट्रिक वातानुकूलित टारमॅक कोच सादर करून आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे.  

इकोलाईफ हे मेड इन इंडिया झिरो एमिशन व्हेईकल (ZEV), हवाई प्रवाशांसाठी सौंदर्यदृष्ट्या डिझाइन केलेले टारमॅक कोच आहे. जलद प्लग-इन चार्जिंग लिथियम-आयन बॅटरीद्वारे समर्थित, या बस अत्यंत कार्यक्षम PSPM इलेक्ट्रिक मोटर्सवर चालतात आणि प्रवाशांना शांत आणि अखंड राइड देतात. उच्च-शक्तीच्या मोनोकोक स्ट्रक्चर्ससह बांधलेल्या, बसेसमध्ये दीर्घ टिकाऊपणा आणि सर्वोत्तम आरामक्षमता आहे.

या प्रसंगी बोलताना सेलेबी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मुरली रामचंद्रन म्हणाले, “आम्ही एक जबाबदार संस्था आहोत ज्यात आमच्या कार्याचा मुख्य आधारस्तंभ म्हणून शाश्वतता निर्माण करण्यावर भर आहे. विमान वाहतूक क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. शाश्वत विमान वाहतुकीच्या या दृष्टीकोनाखाली, आम्ही यापूर्वीच टॅक्सी बॉट्स आणि ब्रिज-माउंटेड उपकरणे यांसारखे उपाय अंमलात आणले आहेत. आता १२ मेड इन इंडिया १००% इलेक्ट्रिक वातानुकूलित टारमॅक कोचेसची भर पडल्यावर आम्ही कार्यक्षमतेचे उपाय, ऊर्जा संक्रमण, आणि नावीन्यपूर्णतेच्या माध्यमातून देशभरात सरकारच्या समन्वयाने विमान वाहतूक क्षेत्रात आमचे पाठबळ देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

श्री रामचंद्रन पुढे म्हणाले, “या नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ईको लाईफ बसेसमध्ये चढणे आणि डी-बोर्डिंग करणे सोपे करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्ती, वृद्ध आणि आजारी लोकांसाठी व्हील-चेअर सुविधा असून व्हीलचेअर डॉक करण्यासाठी नियुक्त जागा आहे. सुरक्षितता हा एक महत्त्वाचा घटक आहे हे ध्यानात घेत या बसेस सर्व आधुनिक वैशिष्ठ्यांसह सुसज्ज आहेत जसे की इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल चार्जिंग यूएसबी सॉकेट्स, आपत्कालीन सुरक्षित स्टॉप बटणे इत्यादी.”

सेलेबीने नेहमीच तंत्रज्ञान विकासाला चालना दिली असून विशेषत: जर त्यांचा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होत असेल आणि आपल्या लोकांना काम करण्यासाठी एक अधिक चांगले ठिकाण बनत असेल तर नक्कीच प्रोत्साहन दिले आहे. भारतात, इलेक्ट्रिक टग्स, इलेक्ट्रिक पुशबॅक आणणारे आणि विद्यमान उपकरणे इलेक्ट्रिक उपकरणांसह बदलण्यासाठी ऑर्डर देणारे आम्ही पहिले होतो. शाश्वत तंत्रज्ञानाची मागणी वाढत आहे आणि यामुळे विमान वाहतूक उद्योगातील नवकल्पनांचा वेग वाढला आहे. २०१९ मध्ये  सेलेबीने भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात टॅक्सी बॉट्स सादर केले आणि एअर इंडिया त्यांचा वापर करणारी जगातील पहिली व्यावसायिक विमान कंपनी बनली. टॅक्सी बॉट्स टर्मिनल गेटपासून टेक-ऑफ पॉइंटपर्यंत अरुंद विमान टोइंग करून विमानांचे इंजिन बंद करून ८५% इंधन वापर कमी करण्यास मदत करतात; बाहेरील वस्तूंचे नुकसान देखील ५०% ने कमी करतात.

विमानांना पार्क केलेले असते तेव्हा कूलिंग आणि पॉवर प्रदान करणाऱ्या ब्रिज-माउंटेड इक्विपमेंट (BME) सेवा सेलेबीने दिल्ली, मुंबई आणि बंगलोर विमानतळ येथे प्रदान केलेली आणखी एक पर्यावरण पूरक सेवा आहे. बीएमई सेवा CO2 उत्सर्जन (अंदाजे ८०-८५%) आणि ध्वनी प्रदूषण कमी करतात.

ग्राउंड हँडलिंगमधील ६० वर्षांहून अधिक आंतरराष्ट्रीय अनुभवासह सेलेबी एव्हीएशन भारतीय विमान वाहतूक उद्योगासाठी शाश्वत, कार्यक्षम आणि दर्जेदार ग्राउंड हँडलिंग सेवा सादर करत आहे. ते दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, कोचीन, अहमदाबाद, कन्नूर आणि लवकरच MOPA येथे न्यू गोवा विमानतळासह विविध भारतीय विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवेमध्ये गुंतलेले आहेत आणि इतर शहरांमध्ये कामकाज वाढवण्याची त्यांची योजना आहे. शाश्वत पद्धती, नावीन्यपूर्णता, प्रगत तंत्रज्ञान आणि प्रक्रियांचे प्रमाणीकरण या गोष्टी सेलेबीच्या सेवांना विमान वाहतूक ग्राउंड हँडलिंग सेवांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण ठरवतात.

इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेतर्फे डिजिटल जीवन प्रमाणपत्र आणि सामान्य विमा या सेवा ग्राहकांच्या दारी उपलब्ध

0

मुंबई, 16 नोव्हेंबर 2022

आयपीपीबी अर्थात इंडिया पोस्ट पेमेंट बँक बँकिंगशी संबंधित इतर सर्व सुविधांसह निवृत्तीवेतन धारकांच्या सोयीसाठी जीवन प्रमाण सेवा पुरवत आहे. निवृत्तीवेतन सुरळीतपणे मिळण्यासाठी आवश्यक असलेली जीवन प्रमाण सेवा म्हणजेच डिजिटल स्वरूपातील हयातीचा दाखला निवृत्तीवेतन धारकांना त्यांच्या राहत्या ठिकाणी उपलब्ध करून देणे शक्य व्हावे यासाठी आयपीपीबीने केंद्रीय निवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन धारक कल्याण विभागाच्या सहकार्याने नवा उपक्रम हाती घेतला आहे. आधार क्रमांकाच्या मदतीने बायोमेट्रिक प्रमाणीकरणावर आधारित असलेली ही सेवा वयोवृद्ध निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत सोयीची आहे. आतापर्यंत देशातील 11 लाख निवृत्तीवेतन धारकांनी जीविताचा दाखला सादर करण्यासाठी आयपीपीबीच्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळण्याच्या सेवेचा लाभ घेतला आहे.

“तुमची बँक, तुमच्या दारी”या घोषवाक्यासह आपल्या देशातील सर्वात सुलभपणे उपलब्ध, किफायतशीर आणि विश्वसनीय बँक म्हणून ओळखली जावी या ध्येयासह आयपीपीबी कार्यरत आहे. देशातील जनतेला बँकिंग सेवेत अंतर्भूत सर्व सुविधा सुलभतेने उपलब्ध व्हाव्या यासाठी आयपीपीबीने 1 लाख 37 हजारांहून अधिक टपाल कार्यालयांच्या राष्ट्रीय पातळीवरील जाळ्याचा लाभ करून घेतला असून त्यापैकी 1 लाख 10 हजार टपाल कार्यालये ग्रामीण भारतात आहेत. ग्राहकांना त्यांच्या घरातच सर्व बँकिंग सेवा पुरवता याव्या यासाठी आयपीपीबीने 1 लख 89 हजारहून अधिक पोस्टमन आणि ग्रामीण टपाल सेवकांना स्मार्टफोन आणि बायोमेट्रिक साधनांनी सुसज्ज केले आहे. साडेपाच कोटींहून अधिक ग्राहकांना बँकिंग सेवा पुरवत असलेल्या आणि त्यातील बहुतांश ग्राहक ग्रामीण भारतातील असलेल्या,आयपीपीबीने स्वतःला व्यापक आर्थिक समावेशाला चालना देणारी आणि ग्राहकांचे सर्वाधिक प्राधान्य तसेच विश्वास असलेली बँक म्हणून स्वतःला स्थापित केले आहे. टपाल विभागाची 100%मालकी असलेल्या आणि विभागाकडून प्रोत्साहन दिली गेलेली आयपीपीबी ही रिझर्व्ह बँकेकडून शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळविणारी देशातील पहिली पेमेंट्स बँक देखील आहे.

सर्वसामान्य विमा

गेल्या काही वर्षांमध्ये आयपीपीबीने ग्राहकांना स्पर्धात्मक दरांमध्ये दर्जेदार सेवा पुरवण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीचा स्वीकार केला आहे. आयपीपीबीने ग्राहकांना व्यक्तिगत विमा तसेच सामान्य गटविमा सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने टाटा आणि बजाज यांसारख्या मोठ्या उद्योगांशी सहकारी संबंध स्थापित केले आहेत. संयुक्त उपक्रमाद्वारे आयपीपीबीच्या ग्राहकांमध्ये विम्याविषयी जागरुकता निर्माण केली आणि त्यातून अनुक्रमे 399 आणि 396 रुपयांच्या अगदी स्वस्त विमा हप्त्यामुळे ग्राहकांनी विकत घेतलेल्या विमा पॉलिसीजच्या संख्येत अभूतपूर्व वाढ दिसून आली. संपूर्ण भारतभरात एकूण 72 कोटी 88 लाख रुपयांची विमाविषयक उलाढाल झाली आणि त्यात  महाराष्ट्रातील ग्राहकांनी काढलेल्या 30 कोटी 66 लाख रुपयांच्या विमा पॉलिसीजचा समावेश आहे. अखिल भारतीय स्तरावर सामान्य विमा विक्रीत महाराष्ट्र परिमंडळ सर्वोच्च स्थानी आहे.

आयपीपीबीने ग्राहकांना किफायतशीर दरात दर्जेदार सेवा पुरविण्यावर लक्ष केंद्रित केले असून देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बँकिंग सेवा पोहोचावी यासाठी आयपीपीबी कटिबद्ध आहे. 

इफ्फीच्या 53 व्या आवृत्तीत विविध श्रेणीतील स्पर्धेत अर्जेंटिनाचे आठ चित्रपट

#IFFIWOOD (SHARAD LONKAR)

अर्जेंटिनाच्‍या लोकांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करायचे असेल तर त्‍याला ‘टॅंगो’असे म्हणता येईल. टँगो म्हणजे नाट्यमय, उत्‍कटतेने प्रगट होणारे. चित्रपट निर्मितीमध्‍ये अतिशय चांगली, प्रभावी भूमी आणि चित्रपटविषयक परिणामकारी इतिहास असलेला देश म्‍हणून अर्जेंटिना ओळखला जातो. या देशामध्‍ये कला आणि करमणूक या गोष्‍टी मध्‍यवर्ती मानल्या जातात, त्‍यामुळेच इथला चित्रपट इतिहास मोठा आहे. 1896 मध्‍ये पॅरिसमध्‍ये ल्युमियरचे सिनेमॅटोग्राफ पहिल्‍यांदा आले, त्यानंतर अवघ्‍या एका वर्षामध्‍ये त्यांची आयात करणारा  अर्जेंटिना हा पहिला देश आहे. जगामध्‍ये पहिली ॲनिमेटेड फिल्म ‘एल ॲपोस्‍टोल’ ’ ची निर्मितीही अर्जेंटिनामध्‍येच झाली होती. ल्‍युक्रेसिया  मार्ट्रेल , मार्टिन रेज्‍टमन आणि पॅब्‍लो ट्रॅपेरो  या दिग्गजांनी अर्जेंटिनामध्‍ये नवसिनेमाचे नेतृत्व केले. अशी समृद्ध परंपरा असलेल्या अर्जेंटिनामधून भारतीय आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) च्या 53 व्या आवृत्तीमध्‍ये  आपल्या सर्वांसाठी वेगवेगळ्या श्रेणीतल्‍या स्पर्धेमध्‍ये आठ चित्रपट दाखवले जाणार आहेत.

रॉड्रिगो ग्युरेरो दिग्दर्शित ‘सेव्हन डॉग्स’ हा चित्रपट आंतरराष्‍ट्रीय चित्रपटाच्या श्रेणीत ‘सुवर्ण मयूर’साठी स्‍पर्धेत आहे. केवळ 80 मिनिटांच्‍या या चित्रपटामध्‍ये माणूस आणि त्‍याच्याकडे असलेले  पाळीव प्राणी यांच्यातील संबंध दाखवण्‍यात आले आहेत.

महोत्सवामध्‍ये अँड्रिया ब्रागा दिग्दर्शित ‘सेल्फ डिफेन्स’ हा चित्रपट  दाखविण्‍यात येणार आहे.  ‘दिग्दर्शनामध्‍ये पदार्पणाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट’ या श्रेणीमध्‍ये असणार   आहे. हा चित्रपट एका फिर्यादीच्या कथेविषयी आहे. भूतकाळात झालेल्‍या हत्याकांडांच्या  मालिकेच्या   प्रकरणाची उकल करण्‍यासाठी तो आपल्या  गावी परत येतो, असे याचे कथानक आहे.

या महोत्सवात प्रदर्शित होणारे अर्जेंटिनाचे  इतर चित्रपट पुढीलप्रमाणे आहेत.  मिस विबोर्ग (2022), द बॉर्डर्स ऑफ टाइम (2021), द सबस्टिट्यूट (2022), रोब ऑफ जेम्स (2022) आणि इआमी (2022) आहेत.

जर तुम्ही अर्जेंटिनाला आत्तापर्यंत फक्त त्याच्या फुटबॉल दिग्गजांसाठी ओळखत असाल, तर या नोव्हेंबर 2022 मध्ये गोव्यात बसून तिथल्या  चित्रपटसृष्टीचा अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा!

इफ्फीविषयी थोडेसे

वर्ष 1952 पासून सुरु झालेला इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा आशियातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव आहे. चित्रपट निर्मिती, त्यांतील कथा आणि या निर्मितीमध्ये गुंतलेल्या व्यक्ती यांचा उत्सव साजरा करणे ही या महोत्सवाच्या आयोजनामागील संकल्पना आहे. या महोत्सवाद्वारे आपण समाजात मोठ्या प्रमाणात आणि सखोलपणे चित्रपटांविषयीचे सजग कौतुक आणि उत्कट प्रेम जोपासून, वाढवून त्याचा प्रसार करण्याचा, आपापसात प्रेम,समजूतदारपणा आणि बंधुत्व यांचे सेतू बांधण्याचा आणि त्यांना व्यक्तिगत तसेच सामूहिक उत्कृष्टतेची नवी उंची गाठण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो.

या महोत्सवाचे यजमान राज्य असलेल्या गोव्याच्या सरकारच्या एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा या संस्थेच्या सहकार्याने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे दर वर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.या वर्षी आयोजित होत असलेल्या 53 व्या इफ्फी महोत्सवाविषयीची सर्व अद्ययावत माहिती, उत्सवाच्या www.iffigoa.org या संकेतस्थळावर, पत्रसूचना कार्यालयाच्या pib.gov.in या संकेतस्थळावर तसेच इफ्फीचे ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम या समाज माध्यम मंचांवर तसेच गोव्याच्या पत्रसूचना कार्यालयाच्या समाज माध्यम स्थळांवर उपलब्ध आहे. लक्षात असू द्या, चित्रपटांच्या सोहोळ्याचा भरभरून आनंद घेऊया आणि एकेमकांना त्यात सहभागी करून घेऊया.

ग्वाल्हेर- मुंबई- ग्वाल्हेर अशा थेट विमानसेवेचे उद्घाटन

0

नवी दिल्‍ली-

नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज मुंबई ते ग्वाल्हेर थेट विमान मार्गाचे उद्घाटन केले.

या नवीन सेवेमुळे या दोन शहरांमधील संपर्क वाढेल तसेच त्यांच्यातील व्यापार, वाणिज्य आणि पर्यटनाला चालना मिळेल. भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि इतिहास आणि संस्कृतीचे भांडार असलेल्या ग्वाल्हेर दरम्यान हवाई संपर्क सुरू करणे हे देशाच्या कानाकोपऱ्याला हवाई सेवेद्वारे जोडण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे, असे सिंधिया यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले.

औद्योगिकीकरणाचे केंद्र म्हणून ग्वाल्हेरचा उदय होण्याची वाढती शक्यता असल्याचे सिंधिया यांनी सांगितले. नवीन हवाई मार्गामुळे नागरिकांच्या वेळेची बचत करणारा पर्यायी प्रवासी मार्ग उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. हा मार्ग रोजगार आणि उद्योजकतेच्या नवीन संधींना प्रोत्साहन देईल, असेही ते म्हणाले.

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या प्रयत्नांमुळे देशातील नागरी विमान वाहतूक सुविधांमध्ये वाढ झाली आहे, असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील विमानतळांची संख्या वाढत असून विमानतळांच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात येत आहे, असेही तोमर म्हणाले. ग्वाल्हेर विमानतळाची निर्मितीही नव्या पद्धतीने होणे ही सर्वांसाठी एक महत्त्वाची कामगिरी आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले.

ग्वाल्हेर आणि मुंबई दरम्यान नवीन उड्डाणे सुरू झाल्यामुळे ग्वाल्हेरच्या विकासाला आणि दोन्ही शहरांमधील व्यावसायिक संबंधांना चालना मिळेल, असे त्यांनी पुढे सांगितले.

Flt No.FromToFreq.Dep. timeArr. timeAircraftEffective from
6E 276MumbaiGwalior124612:1014:10 Airbus15 to 30November 2022
6E 265GwaliorMumbai124614.4516:45
6E 276MumbaiGwalior234612:1014:10 Airbus01 December2022
6E 265GwaliorMumbai234614.4516:45

* * *

सहायक पोलीस निरीक्षक हर्षदा दगडे एक लाख रुपयांच्या लाच प्रकरणात सस्पेंड

पुणे-एक लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात कोंढवा पोलिस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले. हर्षदा बाळासाहेब दगडे असे निलंबित केलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

तक्रारदाराच्या विरोधात कौटुंबीक हिंसाचाराच्या दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी; तसेच आई-वडील, बहिणीला अटक न करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक हर्षदा दगडे यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी दगडे यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दगडे यांनी केलेले वर्तन बेजबाबदार, पोलीस दलाची प्रतिमा करणारे असल्याचे उघड झाल्याने पोलीस आयुक्त गुप्ता यांनी दगडे यांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश दिले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना उत्पन्नांची संधी;  प्रति हेक्टर ७५ हजार रू. दराने भाडेतत्वावर जमीन घेणार

0

मुंबई, दि.१६ नोव्हेंबर २०२२:

राज्यातील ज्या ग्रामीण भागांमध्ये गावठाण व कृषि वीजवाहिन्यांचे विलगीकरण झाले आहे अशा  कृषी वीजवाहिन्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. यासाठी लागणाऱ्या जमिनी प्रति वर्ष ७५ हजार रु प्रति हेक्टर या दराने भाडेतत्वावर महावितरणद्वारे घेण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून ३ हजार  कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येणार असून याकरिता १५ हजार एकर जमिनीवरून सुमारे ४ हजार मेगावॅट विजेची  निर्मिती होणार आहे.

 या योजनेद्वारे कृषी अतिभारीत उपकेंद्राच्या ५ किमीच्या परिघात २ ते १० (२X५) मे.वॅ. क्षमतेचे सौर प्रकल्प कार्यान्वित करुन या कृषी वाहिन्यांवरील कृषी ग्राहकांना दिवसा ८ तास वीज देण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे. सदर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महावितरणने ऑनलाईन लँड पोर्टल सुरू केले आहे. शेतकरी किंवा तत्सम व्यक्ती विकेंद्रित सौर प्रकल्प उभारण्यासाठी आपली जमीन देऊ शकतो. तसेच सौर ऊर्जा प्रकल्प महावितरणच्या जवळच्या ३३/११ कि.व्हो. उपकेंद्राशी थेट जोडला जाईल.

या संदर्भात मा. उपमुख्यमंत्री यांनी  या योजनेबाबत  नुकतीच आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील ३० टक्के कृषी वाहिन्या सौर ऊर्जेवर आणण्याबाबतचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी ४ हजार मेगावॅट वीज निर्मितीसाठी महावितरण शेतकऱ्यांची जमीन भाडेतत्वावर घेणार आहे. यासाठी दोन हजार ५०० उपकेंद्रामधील ४ हजार  मे.वॅ. क्षमतेच्या ३ हजार  कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्याकरिता १५ हजार एकर जमिनीची आवश्यकता आहे.

सदर उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी जमीन तातडीने उपलब्ध व्हावी याकरिता प्रत्येक जिल्ह्यासाठी समिती गठीत करण्यात आली असून या समितीमध्ये जिल्हाधिकारी, महावितरणच्या मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता, नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक व महाऊर्जा  या विभागाचे प्रतिनिधी यांचा समावेश राहील. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता शासनाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीसाठी  आगाऊ ताबा घेण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्याच्या दृष्टीने लागणारी खाजगी जमीन महावितरणला भाडेपट्टयाने उपलब्ध करुन देताना जागेची त्या वर्षीच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने निर्धारित केलेल्या किंमतीच्या ६ टक्के दरानुसार परिगणत केलेला दर किंवा प्रति वर्ष ७५ हजार  रु प्रति हेक्टर यापैकी जी रक्कम जास्त असेल त्यादराने वार्षिक भाडेपट्टयाचा दर निश्चित करण्यात आला आहे. प्रथमवर्षी आलेल्या पायाभूत वार्षिक भाडेपट्टी दरावर (Base rate) प्रत्येकी वर्षी ३  टक्के सरळ पध्दतीने भाडेपट्टी दरात वाढ करण्यात येईल.

राज्य सरकारद्वारे निश्चित केलेल्या जमिनींचा निविदा प्रक्रियेमध्ये समावेश करण्यात येईल. या जमिनीची निवड सौर ऊर्जा प्रकल्पधारक करतील. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर सदर जमिनीवर सौर ऊर्जा निर्मितीचे देयक भाडेपट्टीपेक्षा कमी असल्यास भाडेपट्टीची रक्कम जमीनधारकास अदा करण्याची जबाबदारी सौर ऊर्जा प्रकल्पधारकांची राहील.

वरील निर्णय मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, कुसुम घटक ‘ अ ‘ योजनांना लागू राहील. तसेच वरील निर्णयानुसार लागू केलेला भाडेपट्टी दर हा दि. २ नोव्हेंबर २०२२ नंतर अर्ज केलेल्या जागांसाठी लागू राहील. या अनुषंगाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली जमीन भाडेतत्वावर देण्यासाठी www.mahadiscom.in/land_bank_portal/index_mr.php. या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

२०२६ पर्यंत ५ वीं आर्थिक महसत्ता म्हणून भारताचा उदय-खासदार संजय सेठ

एमआयटी डब्ल्यूपीयूत मिटसॉगच्या १८व्या बॅचचा  शुभारंभ

पुणे, १६ नोव्हेंबरः“ मंदीच्या काळानंतर भारतात १ लाख ३० हजार कोटींचा जीएसटी जमा झाला होता. आता हा जीएसटी १ लाख ५४ हजार कोटी पर्यंत जमा होतांना देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे. त्यामुळे २०२६ पर्यंत भारत संपूर्ण विश्वात ५वीं आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल,”असे विचार झारखंड येथील रांचीचे खासदार संजय सेठ यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी च्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या वतिने आयोजित मास्टर इन पॉलिटिकल लिडरशीप अँड गव्हर्नमेंट (एमपीजी) १८ व्या बॅचच्या शुुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी राज्यसभा सदस्य डोला सेन, राज्य सभा सदस्य गुलाम अली खताना  विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड होते.
तसेच यूपीएससीचे माजी अध्यक्ष डी.पी.अग्रवाल, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, मिटसॉगचे संचालक डॉ. के. गिरीसन व प्रा. परिमल माया सुधाकर उपस्थित होते.
संजय सेठ म्हणाले ,“ राष्ट्रभाव, दूरदृष्टी, आणि भाषेवर नियंत्रण हे गुण राजकारणात येतांना अंगी बाळगावे. पण तत्पूर्वी समाजकारणात प्रवेश करावा. वर्तमानकाळात राजकारणाची परिभाषा बदलताना दिसत आहे. पूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक मोठ्या प्रमाणात होते परंतू आता सुशिक्षित युवकांची संख्या वाढली आहे. राजकीय क्षेत्रात तुलनात्मक अध्ययन करण्याची सवय लावून घ्यावी.”
गुलाम अली खताना म्हणाले,“युवकांना राजकारणात नाही लोकतंत्रला सशक्त करण्यासाठी यावे लागेल. येथे आल्यावर लक्ष्य निर्धारित करून त्या दिशेने स्वतःला झोकून घ्यावे. लोकशाहीमध्ये कोणताही व्यक्ती गोंधळला जाणार नाही असे कार्य करावे. युवकांनी राजकारणाचे प्रशिक्षण घेतांना शिक्षणाची कॉपी न करता आपल्या पॅशन नुसार कार्य करावे. नेता बनल्या नंतर जनतेशी सदैव संवाद साधत रहावे.”
डोला सेन म्हणाल्या ,“जनता, समाज आणि देशाच्या उज्वल भविष्यासाठी चांगल्या सुशिक्षित व्यक्तींनी राजकारणात यावे. वाढत जाणार्‍या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रशिक्षित राजकारणी लोकांची गरज आहे. येथील गरीबी, उपसमार, लहान मुलांची समस्या सोडण्यासाठी सर्वांनी समोर यावे.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“आजदी के अमृत महोत्सव च्या काळात देशाची स्थिती बदलण्याची गरज आहे. राजकारणात तंत्रज्ञानाचा उपयोग कसा केला जावा यासाठी भर देण्याची गरज आहे. वर्तमानकाळात राजकारणावर संशोधन करण्याची वेळ आली आहे. २००५ मध्ये सुरू केलेल्या या पाठ्यक्रमाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आज देशातील वेगवेगळ्या राजकीय पक्ष व सामाजिक क्षेत्रात कार्य करीत आहेत. हेच आमचे यशाचे गमक आहे.”
परिमल माया सुधाकर यांनी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या स्थापनेची पार्श्वभूमी सांगितली. तसेच राहुल कराड यांच्या मार्गदर्शनात देशात प्रथमच राष्ट्रीय विधायक परिषदेचे आयोजन करण्याचा उद्देश सांगितले. राजकारणात चांगल्या व्यक्तींनी येण्याचे आवाहन ही त्यांनी केले.
यावेळी विद्यार्थी के सूजाता व शिवम कोटियाल यांनी विचार मांडले.
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक व स्वागत पर भाषण केले.
प्रा.डॉ. पोर्णिमा बागची यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. के. गिरीसन यांनी आभार मानले.

वारज्यातील गुंडांवर मोक्का :पुणे पोलिसांची १०७ वी कारवाई

पुणे-वारजे माळवाडी परिसरात दहशत माजवून गुन्हेगारी करणाऱ्या सराईत रवींद्र ढोले टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. संंबंधित टोळीविरूद्ध वेगवेगळ्या स्वरूपाचे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. त्यानुसार पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी टोळीवर मोक्कानुसार केलेली ही 107 वी कारवाई आहे.रविंद्र वामन ढोले (वय 30 टोळीप्रमुख रा. कर्वेनगर,पुणे) प्रतीक प्रवीण दुसाने (वय 29 रा. आनंदनगर, सिंहगड रोड ,पुणे) अशी मोक्कानुसार कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

सराईत ढोले आणि दुसाने यांनी सिंहगड रोड व वारजे भागात खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, जबरी चोरी, मालमत्तेचे नुकसान करणे, जखमी करणे, जीवे मारण्याची धमकी देण्याचे गुन्हे केले आहेत. त्यांच्याविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडू हाके यांनी पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्यावतीने अपर आयुक्त राजेंद्र डहाळे यांना पाठविला.

प्रस्तावाची पडताळणी करून पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ढोले टोळीविरूद्ध मोक्का कारवाई केली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलांडे करीत आहेत. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त राजेंद्र डहाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडु हाके, पोलिस निरीक्षक, दत्ताराम बागवे, उपनिरीक्षक मनोज बागल, सचिन कुदळे,अमोल भिसे, नितीन कातुर्डे, गोविंद कपाट, प्रियांका कोल्हे यांनी केली.सदर गुन्हयाचा पुढील तपास रुक्मिणी गलंडे, सहा. पोलिस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे शहर हे करीत आहेत.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली चालु वर्षातील 44 वी व एकूण 107 वी कारवाई आहे.

ग्लोबल वॉर्मिंग मुळे झालेल्या विस्थापित नागरिकांना फक्त नुकसान भरपाई मिळते,त्यांचे शाश्वत पुनर्वसन होत नाही -डॉ.नीलमताई गो-हे

पुणे-“जागतिक तापमान वाढीमुळे अनेक नैसर्गिक आपत्ती उदा.पुर,कडे कोसळणे रोगराई इत्यादी यामुळे अनेकदा नागरिकांचे स्थलांतर केले जाते.मात्र या नागरिकांना फक्त नुकसान भरपाई दिली जाते त्यांचा शाश्वत विकास केला जात नाही असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलमताई गो-हे यांनी केले.त्या डेव्हलपमेंट सपोर्ट टिम आणि स्त्री आधार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “हवामान बदलाचा महिलांच्या आरोग्यावरील परिणाम’ या विषयी आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या,तसेच फक्त तापमान वाढ या एकाच बाबीवर लक्ष केंद्रीत न करता त्यावर परिणाम करणार्‍या बाबींवर सुद्धा विचार केला पाहिजे असे पुढे संगितले. मराठा चेंबर्सच्या सेनापती बापट संकुलात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपीकल मिटिरियालॉजीचे शास्त्रज्ञ डॉ.रॉक्सी मॅथ्यू,डेव्हलपमेंट सपोर्ट टिमच्या कार्यकारी विश्वस्त श्रीमती हरविंदर उर्फ मिनी बेदी या मान्यवरांच्या बरोबरच विविध संस्थांचे सदस्य उपस्थित होते.या प्रसंगी डॉ.रॉक्सी मॅथ्यू,यांनी दृक श्राव्य सदरीकरणातून या बाबत सखोल माहिती दिली.या प्रसंगी डॉ रॉक्सी यांनी वातावरण बदलाच्या अनुषंगाने नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम बाबत ३ ते ५ महिने अगोदर माहिती देता येवू शकते असे सांगितले. त्यामुळे प्रशासनास साथीच्या रोगाबाबत पूर्व कल्पना मिळाल्याने यावरती नियंत्रण मिळविण्यासठी नियोजन करता येवू शकते यावर भर दिला.

गौण खनिज उत्खनन प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

0

मुंबई, दि. 16 : अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी तसेच उत्खननापासून वाहतुकीपर्यंतच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.

गौण खनिज आणि त्यापासून तयार केलेल्या उपपदार्थांच्या वाहतुकीबाबतची बैठक आज महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार धैर्यशील माने, आमदार जयकुमार गोरे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. विखे- पाटील म्हणाले की, अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक हा सातत्याने कळीचा मुद्दा ठरला आहे. अनेकदा उत्खननावर आळा घालणाऱ्या महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्लेही झाले आहेत. वैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीसाठी ऑनलाईन प्रक्रिया आणल्यामुळे अवैध वाहतुकीला आळा बसणार असून वैध प्रक्रिया सुलभपणे राबविणे व त्याचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य होणार आहे.

शेती महामंडळाच्या जमिनीचे बाह्य स्त्रोताद्वारे सर्वेक्षण करावे – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश

0

मुंबई दि. 16 : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जमिनींचे संरक्षण होऊन त्यांचा सुयोग्य वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी महामंडळाच्या जमिनीचे बाह्य स्त्रोताद्वारे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे, असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिले.

या संदर्भात महसूलमंत्री श्री. विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महसूल‍ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्यासह महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजीत माने, अतिरिक्त जिल्हाधिकारी रुपाली आवळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. विखे- पाटील म्हणाले की, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाने वाटप जमिनीचे 7/12 करण्याची प्रलंबित प्रकरणे, अतिक्रमण प्रकरणे, जमीन मोजणी इत्यादि बाबींना प्राधान्य द्यावे.

अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील निमगांव कोऱ्हाळे, साकुरी आणि शिर्डी येथील जमिनींसंदर्भातील सार्वजनिक प्रयोजनासाठी प्राप्त झालेले विविध प्रस्ताव संचालक मंडळाच्या आगामी बैठकीत सादर करुन याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची आकारीपड जमीन, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील हरीगाव येथील शेती महामंडळाच्या मालकीच्या क्षेत्रामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणे, एक एकरपेक्षा कमी देय क्षेत्र असल्याने अपात्र ठरलेल्या खंडकरी यांना क्षेत्र वाटप करण्यासाठी धोरण ठरविणे, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या मालमत्तेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करणे तसेच याबाबत एक आराखडा तयार करणे आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

००००

उपमुख्यमंत्र्यांची जनरल ॲटोमिकच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा

0

मुंबई, दि. 16 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनरल ॲटोमिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक लाल यांनी सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

बैठकीत जनरल ॲटोमिक कंपनीचे भारतात विस्तारीकरण करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर आण्विक ऊर्जा आणि ड्रोन या विषयांमध्येही जनरल ॲटोमिकने जागतिक स्तरावर राबविलेल्या योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.

वॉरंट नसताना,उद्धटपणा करत मला पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतले -संजय निरुपम

पुणे- गजानन कीर्तिकरांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी बाइक रॅली काढण्याच्या तयारीत असलेले काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना वर्सोवा पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.पोलिस सकाळीच माझ्या घरी घुसले. त्यांच्याकडे कसलेही अटक वॉरंट नव्हते. उद्धटपणा करत त्यांनी मला आंदोलन करणार असल्यामुळे पोलिस ठाण्यात आणले, असा आरोप निरुपम यांनी केला आहे.

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी नुकताच बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यांनी केलेला पक्षप्रवेश उत्तर पश्चिम मुंबईतील मतदारांचा अपमान आहे. त्यामुळे त्यांनी त्वरित खासदारकीचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी माजी खासदार व काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज बुधवारी दुपारी तीन वाजता बाइक रॅली काढण्यात येणार होती. पण त्यापूर्वीच पोलिसांनी संजय निरुपम अटक करून, त्यांना वर्सोवा पोलिस ठाण्यात नेले व रॅली काढण्यास अटकाव केला.

पोलिसांच्या दडपशाहीविरोधात निरुपम म्हणाले की, अतिशय, निष्क्रिय निरुपयोगी खासदार गजानन कीर्तिकर यांनी नुकताच शिंदे गट जॉइन केला. कीर्तिकर तुम्ही निष्क्रिय, निरुपयोगी आहात. त्यामुळे राजीनामा द्यावा, अशी मागणी करत आम्ही दुपारी तीन वाजता बाइक रॅली काढणार होतो. मात्र, शिंदे सरकारला आमची इतकी भीती वाटली की त्यांनी सकाळपासूनच मला घेरले.

निरुपम पुढे म्हणाले की, पोलिस अधिकारी कसलेही अरेस्ट वॉरंट नसताना जबरदस्तीने माझ्या घरात घुसले. मला वर्सोवा पोलिस ठाण्यात घेऊन आले . हे सरकार आमच्या राजकीय आंदोलनाने घाबरली आहे. एसीपी मानेंनी माझ्यासोबत जो उद्धटपणा केला. या प्रकरणी त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली.

सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहास बदलण्याचा प्रकार:बाजीप्रभूंच्या वंशजांनी केले खबरदार

सुबोध भावेंना विनंती केली होती ; चित्रपट प्रदर्शनापूर्वी दाखवा पण … दाखविला नाही

अफजल खानाच्या समयी बाजी प्रभूंची उपस्थिती:शिरवळ येथील स्त्रियांचा बाजार -अशा प्रसंगांना आधार नाही

बाजीप्रभू आणि त्यांचे बंधू फुलाजीप्रभू यांनी बांदल देशमुखांच्या सैन्याचे नेतृत्व केले. दोन्ही भावांनी प्राणांची आहुती देऊन शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. मात्र, चित्रपटात दोन्ही भावांच्या लहानपणीच्या कटू प्रसंग दाखवून फुलाजी प्रभू यांची प्रतिमा मलीन करण्यात आली.

पुणे-सिनेमॅटिक लिबर्टी ही काल्पनिक गोष्टीमधे घेता येते, पण ऐतिहासिक घटनांमधे नाही. सिनेमॅटिक लिबर्टी याचा अर्थ इतिहास बदलणे असा होत नाही. ऐतिहासिक घटनांचा क्रम बदलणेही अनुचित आहे. ऐतिहासिक चित्रपट काढताना निर्माता, दिग्दर्शक, कलाकार तसेच इतिहास सल्लागार यांना खूप जबाबदारीने हे कार्य करावे लागते. दुर्दैवाने ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या बाबतीत अशा अनेक ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या घटना दाखविलेल्या आहेत, असे मत बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज अमर वामनराव देशपांडे, किरण अमर देशपांडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.पत्रकार परिषदेला रूपाली देशपांडे, महेश देशपांडे, सुभाष दिघे, सागर दिघे, राहुल दिघे, मोहनेश दिघे, मंदार कुलकर्णी, राजेंद्र देशपांडे उपस्थित होते.

अमर देशपांडे म्हणाले, हरहर ‘महादेव चित्रपटाच्या संदर्भात काही त्रुटीवर इतिहास अभ्यासकांनी देखील यातील काही प्रसंगांवर आक्षेप घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मुळातच हिरेपारखी होते. गुणग्राहकतेमुळे त्यांनी अनेक माणसे जोडली. शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे यांना वरच्या घाटामध्ये जासलोलगड किंवा कासलोलगड हा किल्ला वसवण्याची जबाबदारी दिली होती व तसे पत्र उपलब्ध आहे. परंतु चित्रपटांमध्ये अनेक जागी देवळे बांधण्यात आली असा प्रसंग दाखवण्यात आला आहे.

पन्हाळा लढाई म्हणले की आपल्याला आठवते ते म्हणजे बांदल देशमुख, बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांचे नाव. बाजीप्रभू यांनी बांदल देशमुख यांचे सैन्याचे नेतृत्व यांनी केले होते. बांदल सैन्याने या युद्धात मोठा पराक्रम गाजवला आणि राजांचे प्राण वाचवले. बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्यामधील लहानपणीचा कटू प्रसंगांना कोणताही ऐतिहासिक आधार नाही. या दोन्ही भावांनी स्वराज्यासाठी प्राणांची एकत्रित आहुती दिलेली आहे, अशा प्रसंगामुळे फुलाजी प्रभू यांची प्रतिमा मलिन होत असल्याचे ते म्हणाले.

चित्रपटांमध्ये शिरवळ येथील स्त्रियांचा जो बाजार दाखवलेला आहे. त्यासाठी सुद्धा,कोणता ऐतिहासिक संबंध घेतला होता, याचे दिग्दर्शक/निर्मात्यांनी यांनी स्पष्टीकरण द्यावे. बाजीप्रभूच्या मृत्यूनंतर बाबाजी प्रभू यांना बाजीप्रभू यांच्या पक्षात सरदारी दिली व इतर सात मुलांना पालखीचा मान व तैनाती करून दिल्या.बाजीप्रभू देशपांडे हे अत्यंत पराक्रमी योद्धा होते, परंतु चित्रपटांमध्ये अनेक वेळा ते भावनिक होताना दाखवलेले आहेत.

अफजलखानाच्या प्रसंगी बाजीप्रभू तेथे उपस्थित होते. याला काही ऐतिहासिक संदर्भ आहे का? सदर चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपट दाखवावा, अशी आम्ही कलाकार सुबोध भावे यांना विनंती केली होती. याबाबत निर्माते संपर्क साधतील असे सांगण्यातही आले होते. परंतु तसे झाले नाही प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट निदान इतिहास सल्लागारांना दाखवला होता का, हेसुद्धा महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.