पुणे-एक लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात कोंढवा पोलिस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले. हर्षदा बाळासाहेब दगडे असे निलंबित केलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
तक्रारदाराच्या विरोधात कौटुंबीक हिंसाचाराच्या दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी; तसेच आई-वडील, बहिणीला अटक न करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक हर्षदा दगडे यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी दगडे यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दगडे यांनी केलेले वर्तन बेजबाबदार, पोलीस दलाची प्रतिमा करणारे असल्याचे उघड झाल्याने पोलीस आयुक्त गुप्ता यांनी दगडे यांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश दिले.